Thursday 7 January 2021

ब्रेकिंग न्यूज! पोलीस भरतीचा जीआर रद्द: गृहमंत्र्यांची मोठी घोषणा!



✍🏻 आज गृहमंत्र्यांनी पोलीस भरतीसंबंधित मोठी घोषणा केली. यामध्ये भरतीसाठी निघालेला आधीचा 4 जानेवारी चा जीआर रद्द करण्यात आला आहे.


💁‍♀️ 4 जानेवारी रोजी एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून भरती व्हावे लागेल असा जीआर काढला होता. या जीआर ला बराच विरोध झाला. यानंतर गृह विभागाने हा निर्णय आता रद्द केला आहे.


➡️ एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस चा लाभ मिळावा म्हणून आता गृह विभाग नवीन जीआर शुद्धिपत्रक काढणार आहे. 


📌 याविषयी गृहमंत्र्यांनी सांगितले की, "पोलिस भरती 2019 साठी ज्या एस ई बी सी उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील 23 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयाचा लाभ मिळावा म्हणून, लवकरच दुसरा जीआर गृह विभागाकडून निर्गमित करण्यात येईल."


🔎 जन्या जीआर मध्ये काय होते?


▪️ या आधीच्या जीआर मध्ये पात्रता ठरवताना, उमेदवारांना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार होती. त्यामुळे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी आणि शर्ती ची पूर्तता करतात त्यांना खुल्या प्रवर्गातून विचार करावा असंही सांगितलं होतं. त्यामुळे याला बराच विरोध झाला होता.

No comments:

Post a Comment