Monday, 25 January 2021

आदिवासी कल्याण मंत्रालयाचे ‘श्रमशक्ती’ व्यासपीठ



▪️कद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते गोव्याच्या पणजी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात "श्रमशक्ती" नामक एका राष्ट्रीय स्थलांतरण समर्थन व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले.


🛑ठळक बाबी...


▪️सकेतस्थळ आधारित या व्यासपीठावर स्थलांतर करणाऱ्या कामगारांच्या विषयीची राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील माहिती उपलब्ध असणार.


▪️आकडेवारीतले अंतर दूर करण्यासाठी तसेच रोजगार आणि उत्पन्न निर्मितीच्या शोधात असलेल्या स्थलांतरित कामगारांना सक्षम बनविण्यात व्यासपीठाची मदत होणार आहे.


▪️रोजगाराच्या स्थलांतरणाची प्रक्रिया सुरक्षित आणि उत्पादनक्षम असावी याची खात्री करण्यासाठी केंद्रीय सरकारने स्थलांतरित कामगारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाची "श्रमसाथी" नामक एक मार्गदर्शन पुस्तिका देखील तयार केली आहे.


▪️गोव्यामध्ये विविध राज्यांतून गोव्यात येणाऱ्या स्थलांतरितांच्या मदतीसाठी गोव्यात एक समर्पित ‘स्थलांतर कक्ष’ देखील उघडण्यात आले आहे. परप्रांतीय कामगारांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी असे केंद्र उघडणारे गोवा हे भारतातले पहिले गंतव्यस्थान बनले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...