२२ जानेवारी २०२१

महाराष्ट्र : पंचायत राज आणि महत्वाचे प्रश्न



1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?

*उत्तर* : स्थानिक स्वराज्य संस्था


2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती?

*उत्तर* : 2 ऑक्टोबर 1953


3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली?

*उत्तर* : 16 जानेवारी 1957


4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती?

*उत्तर* : वसंतराव नाईक समिती


5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती?

*उत्तर* : 27 जून 1960


6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते?

*उत्तर* : महसूल मंत्री


7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या?

*उत्तर* : 226


8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली?

*उत्तर* : जिल्हा परिषद


9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत?

*उत्तर* : तीन (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद)


10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला?

*उत्तर* : 1  मे 1962

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महत्वाचे प्रश्न

    भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) 🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) 🔹भारतातील ...