Sunday, 31 January 2021

देशभरात विशेष पल्स पोलिओ अभियान.....

राष्ट्रीय लसीकरण दिवसाची सुरुवात 17 जानेवारीपासून होणार होती. मात्र 16 जानेवारीपासून कोविड-19 लसीकरण अभियान सुरु झाल्याने पोलिओ लसीकरण मोहिमेला स्थगिती दिली. 


भारताच्या राष्ट्रपती कार्यालयाशी सल्लामसलत करून आरोग्य मंत्रालयाने पोलिओ लसीकरण दिन 31 जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला. 


हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिवस किंवा पोलिओ संडे म्हणून देखील ओळखला जातो.


🎯 महत्त्वाच्या बाबी : 


• 0 ते 5 वर्षांच्या मुलांना पोलिओ ड्रॉप्स दिले जातील.


• 31 जानेवारीपासून सुरु होणारे अभियान 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार.


• ज्या रविवारी लसीकरण अभियान सुरु होते, त्या दिवसाला राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून मानले जाते.


• 1995 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल पोलिओ निर्मूलन उपक्रमाच्या पुढाकाराने भारताने पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम सुरू केला.


• पोलिओ लसीकरण अभियान वर्षातून दोनदा आयोजित केला जातो.


• कोविड-19 संकटाच्या काळात पोलिओ लसीकरण अभियान राबवण्यात येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना लसीकरण शिबिरात न घेण्याचा सल्ला दिला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...