०७ जानेवारी २०२१

देशातील आनंदी शहरांत महाराष्ट्रातील तीन शहरे


● ‘इंडियन सिटिज हॅपीनेस रिपोर्ट २०२०’नुसार आनंदी शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

● प्रा. राजेश पिल्लानिया यांनी ऑक्टोबर २०२० ते नोव्हेंबर २०२० या दरम्यान देशभरातील वेगवेगळ्या शहरांतील १३ हजाराहून अधिक नागरिकांशी चर्चा करून ही यादी तयार के ली आहे. गेल्या अनेक दशकांपासून व्यवस्थापनासंदर्भातील संशोधनामध्ये राजेश कार्यरत आहेत. 

● वयोमान, शिक्षण, कमाई आणि शहरात वास्तव्य करताना मिळणाऱ्या सोई-सुविधा तसेच जीवनशैली या निकषांच्या आधारे आनंदी शहरांची यादी करण्यात आली आहे. 

● राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर या यादीमध्ये १२ व्या स्थानी आहे. 

● देशातील सर्वाधिक आनंदी शहरांपैकी अव्वल २५ शहरांमध्ये पुण्याबरोबरच नागपूर आणि मुंबई या शहरांचा समावेश आहे. 

● देशातील आनंदी शहरांमध्ये पुणे १२ व्या स्थानी असून नागपूर १७ व्या आणि मुंबई २१ व्या स्थानी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

● आनंदी शहरांमध्ये लुधियाना प्रथम स्थानी तर  अहमदाबाद आणि चंदिगड शहरे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थानी आहेत.


आनंदी शहरांची क्रमानुसार यादी

लुधियाना, अहमदाबाद, चंदिगड, सुरत, वडोदरा, अमृतसर, चेन्नई, जयपूर, जोधपूर, हैदराबाद, भोपाळ, पुणे, नवी दिल्ली, डेहराडून, फरिदाबाद, पाटणा, नागपूर, इंदूर, कोची, भुवनेश्वर, मुंबई, गुवाहटी, धनबाद, नोएडा, जम्मू, कानपूर, बंगळूरू, कोलकता, लखनऊ, शिमला, रांची, गुरुग्राम, विशाखापट्टणम, रायपूर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...