Monday 18 January 2021

अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला


संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारीपासून होणार असून वित्त वर्ष २०२१-२२चा केंद्रीय अर्थसंकल्प सोमवार, १ फेब्रुवारी २०२१ला सादर केला जाणार आहे. करोना प्रतिबंधित उपाययोजनांचा भाग म्हणून यंदा अर्थसंकल्पाच्या छापील प्रती संसद सदस्यांना वितरित करण्यात येणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनास प्रारंभ होणार असून पहिल्या टप्प्यात सत्र १५ फेब्रुवारीपर्यंत चालेल. तर पुन्हा ८ मार्चपासून संसदेचे सत्र सुरू होईल. ८ एप्रिलला अधिवेशन संस्थगित होईल, अशी माहिती लोकसभेच्या सचिवांनी गुरुवारी दिली.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २०२०-२१चे आर्थिक सर्वेक्षण संसदेत मांडले जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन पुढील आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर करतील.


चालू आर्थिक वर्षांच्या सलग दोन तिमाहीतील शून्याखाली आक्रसणारा विकास दर, रोडावणारा महसूल व विस्तारणारी वित्तीय तूट आदींच्या आव्हानांचे प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पात उमटण्याची शक्यता आहे.


वित्त वर्षांच्या प्रारंभालाच करोना-टाळेबंदीच्या संकटा दरम्यान आर्थिक साहाय्याच्या क्रमवार व क्षेत्रनिहाय उपाययोजना राबविल्यानंतर नव्या अर्थसंकल्पात पुन्हा अर्थव्यवस्थेला थेट हातभार लागेल अशा निर्णयांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...