Sunday, 10 January 2021

टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन अशक्य.


🔶जपानसह काही देशांमध्ये करोनाची साथ पुन्हा तीव्र झाल्यामुळे येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यांत लांबणीवर पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन अवघड आहे, असे मत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.


🔶टोक्योसहित काही राज्यांमध्ये जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी गुरुवारी आणीबाणी जाहीर केली आहे. यासंदर्भात कॅनडाचे ‘आयओसी’ सदस्य रिचर्ड पौंड यांनी ‘बीसीसी’ वृत्तवाहिनीवर म्हटले की, ‘‘सध्या करोना संसर्गाची रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे. त्यामुळे ऑलिम्पिकबाबत अनिश्चितता पसरली आहे.’’


🔶जपानमध्ये गुरुवारी २,४४७ नव्या रुग्णांची विक्रमी नोंद झाली. त्यामुळे लागू करण्यात आलेली आणीबाणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत असेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. या परिस्थितीतही ऑलिम्पिक होईल, अशी संयोजकांना आशा आहे. परंतु याकरिता कृती आराखडा त्यांच्याकडे नाही, असे पौंड यांनी सांगितले. खेळाडूंना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहन पौंड यांनी केले आहे. २३ जुलै ते ८ ऑगस्ट या काळात ऑलिम्पिक आयोजित केले जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...