Friday, 21 June 2024

महत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग


1. तांब्याचा उपयोग :

भांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी. 


विद्युत विलेपनासाठी व तांब्याचे क्षार तयार करण्याकरिता.

तांब्यापासून तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र -  पितळ

धातू व प्रमाण - तांबे (60 ते 90 %) व जस्त (40 ते 10%)


उपयोग - भांडी तयार करण्याकरिता 


संमिश्र - ब्राँझ

धातू व प्रमाण - तांबे (81 ते 90%) व कथील (19 ते 10%)  


उपयोग - बेअरिंग, जहाजाची बांधणी, पुतळे, नाणी आणि पदके तयार करण्याकरिता 


संमिश्र - जर्मन सिल्व्हर  

धातू व प्रमाण - तांबे (50%), जस्त (25%) व निकेल (25%) 


उपयोग - हे संमिश्र उच्च प्रतीचे विद्युत रोधक आहे, म्हणून त्याचा उपयोग विद्युत रोधक उपकरणे तयार करण्याकरिता केला जातो. 


संमिश्र - बेल मेटल  

धातू व प्रमाण - तांबे (78%) व कथील (22%) 


उपयोग - घंटया, तास तयार करण्याकरिता 


संमिश्र - अॅल्युमिनीयम ब्राँझ

उपयोग - तांबे व अॅल्युमिनीयम भांडी तयार करण्याकरिता 


संमिश्र - गनमेटल  

धातू व प्रमाण - तांबे (88%) कथील (10%) व जस्त (2%) 


उपयोग - बंदुका व बॉयलरचे सुटे भाग व जस्त तयार करण्याकरिता



2. लोखंडाचे प्रकार व उपयोग :

लोखंडाचे तीन प्रकार पडतात. 


ओतीव लोखंड आणि बीड : झोतभट्टीमध्ये लोखंडाची धातुके वितळयानंतर त्यापासून लोहरस तयार होतो. हा लोहरस थंड झाल्यानंतर जे लोखंड तयार होते त्यास ओतीव लोखंड किंवा बीड असे म्हणतात. 


नरम किंवा घडीव लोखंड : ओतीव लोखंडाच्या उपयोग नरम लोखंड तयार करण्याकरिता केला जातो. 


पोलाद : ओतीव लोखंडापासून पोलाद तयार करण्याकरिता बेसिमर भट्टी किंवा विवृत भट्टीचा उपयोग केला जातो. 


लोखंडाचे संमिश्र आणि त्याचे उपयोग :

संमिश्र - स्टेनलेस स्टील

धातू - लोखंड, क्रोमीअम, कार्बन


उपयोग - तीक्ष्ण हत्यारे, भांडी सायकली व स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व निकेल तयार करण्याकरिता 


संमिश्र - टंगस्टन स्टील  

धातू - लोखंड, टंगस्टन व कार्बन


उपयोग - जलद गतीने कापण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे तयार करण्याकरिता.


संमिश्र - मॅगनीज स्टील

धातू - लोखंड व मॅगनीज 


उपयोग - कठीण खडकाला छिद्रे पाडणारी हत्यारे तयार करण्याकरिता. 


संमिश्र - क्रोमीअम स्टील

धातू - लोखंड व क्रोमीअम


उपयोग - बॉलबेअरिंग, रोलर बेअरिंग स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व खडक फोडण्याकरिता वापरण्यात येणार्‍या यंत्राचा जबडा तयार करण्याकरिता.



3. अॅल्युमिनीअमचा उपयोग :

घरातील भांडी, वमानाचे भाग, फोटोफ्रेम तयार करण्याकरिता 


चॉकलेट, सिगारेट आदि वस्तूच्या आवरणाकरिता 


विद्युत वाहक तारा तयार करण्याकरिता. 


रुपेरी रंग तयार करण्याकरिता. 


अॅल्युमिनीयमपासुन तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र - ड्युरालयुनिम

धातू - अॅल्युमिनीयम, तांबे, मॅग्नेशियम व मॅगनीज 


उपयोग - हवाई वाहने, मोटारीचे साचे आणि आगगाडीचे भाग तयार करण्याकरिता. 


संमिश्र - मॅग्नेलियम

धातू - अॅल्युमिनीयम व मॅग्नेशियम


उपयोग - शास्त्रीय तराजूच्या दांडया, घरघुती उपकरणे व हवाई वाहने तयार करण्याकरिता. 


संमिश्र - अॅल्युमिनीअम ब्राँझ

धातू - तांबे, अॅल्युमिनीयम, लोखंड व कथील अॅल्युमिनीयम, कोबाल्ट.


संमिश्र - अल्किनो

धातू - अॅल्युमिनीयम, कोबाल्ट व निकेल 


उपयोग - विद्युत जनित्राकरिता लागणारे उच्च प्रतीचे चुंबक तयार करण्याकरिता.



4. जस्ताचे उपयोग :

लोखंड व पोलाद गंजू नये म्हणून त्यावर विलेपन करण्याकरिता. 


विद्युत घटामध्ये इलेक्ट्रोड म्हणून उपयोग केला जातो. 


धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.



5. पाराचा उपयोग :

हवादाबमापी आणि तापमापीमध्ये पार्‍याचा उपयोग करतात. 


बाष्पदीप तयार करण्याकरिता पार्‍याचा उपयोग करतात. 


आरसे तयार करण्याकरिता केला जातो.



6. सोडीयमचे उपयोग :

सोडीयम बाष्पदीपामध्ये सोडीयमचा उपयोग करतात.


उच्च तापमान दर्शक तापमापीमध्ये त्याचा उपयोग होतो.



7. मॅग्नेशियमचे उपयोग :

क्षणदिप्ती छायाचित्रणामध्ये मॅग्नेशियमचा उपयोग करतात. 


शोभेच्या दारूमध्ये.


धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता. 


धातूची जोडकामे करण्याकरिता थमाईट मिश्रण तयार करण्यासाठी.



8. चांदीचा उपयोग :

दागिने तयार करण्याकरिता 


चांदी व पारा यापासून तयार झालेल्या मिश्रणाचा उपयोग दातांमधील पोकळी बुजविण्याकरिता केला जातो. 


छायाचित्रण, औषधे आणि अंकनशाई तयार करण्याकरिता. 


विद्युतविलेपन आणि रजत विलेपन तयार करण्याकरिता.



9. सोन्याचे उपयोग :

नाणी व दागिने तयार करण्याकरिता व संवेदनशील विद्युत उपकरणामध्ये विद्युतवाहक म्हणून या धातूचा उपयोग केला जातो.



10. शिशाचा उपयोग :

मुद्रण धातूचे खिळे तयार करण्याकरिता.  


दारूगोळा तयार करण्याकरिता.  


विद्युत घटात इलेक्ट्रोड तयार करण्याकरिता. 


विद्युत परीपथकात वितळतार करण्यास. 


अणुभट्टीतून न्युट्रॉन शोषक म्हणून भिंती तयार करण्याकरिता.    


डाग देण्याचा धातू व सहज


कृत्रिम वायू इंधने :- 


1) कोल गॅस – दगडी कोळशाच्‍या भंजक ऊर्ध्‍वपतनाने हा वायू मिळवितात. इंधन म्‍हणून व प्रकाशासाठी त्‍याचा उपयोग करतात. हा वायू विषारी आहे. यातील घटकांचे प्रमाण – हायड्रोजन (H2) (40% ते 50%) + मिथेन (CH4) (30% ते 35%) + कार्बन मोनॉक्‍साईड (CO) (5% ते 10%) + C2H + C2H2 (2% ते 4%) + नायट्रोजन N2 (6% ते 8%) + कार्बन डायॉक्साईड (1% ते 2%).


इंधन मूल्‍य – 1000 घन फूट (27 घन मीटर) वायूपासून 1000 कॅलरी उष्‍णता मिळते.


2) ऑईल गॅस – हा वायू केरोसीनचे भंजन करून मिळतो. प्रयोगशाळेत व लघुउद्योगात त्‍याचा वापर होतो.


3) पेट्रोल गॅस – पेट्रोलचे भंजन करून मिळवितात. त्‍यात प्रोपेन, ब्‍युटेन, इलिथीन आणि ब्‍युटीलीन यासारखे हायड्रोकार्बन असतात. घरगुती वापरासाठी इंधन म्‍हणून व प्रयोगशाळेत वापरतात.


4) वॉटर गॅस – CO आणि H2 हे याचे प्रमुख घटक आहेत. कार्बन मोनॉक्‍साईड (45%) + हायड्रोजन (45%) + N2 + Co2 + CH4 (10%) या वायूला ‘नील वायू’ असे म्‍हणतात. इंधनमूल्‍य 1000 घनफूट (27 घमी) वायूपासून 3560 कॅलरी उष्‍णता मिळते.


5) प्रोड्यूसर गॅस – CO + N2 यांच्‍या मिश्रणास प्रोड्यूसर गॅस म्‍हणतात. नायट्रोजन (65.3%) + कार्बन मोनॉक्‍साईड (34.7%) इंधनमूल्‍य 1000 घनफूट (27 घमी) वायूपासून 1130 कॅलरी उष्‍णता मिळते. काचनिर्मिती भट्टयांत या गॅसचा उपयोग करतात.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...