Saturday, 16 January 2021

भारतामधील राज्यांचे राज्यपाल


भारत देशामधील २९ (२९ वे तेलंगणा) राज्यांच्या राज्यप्रमुखाला राज्यपाल (गव्हर्नर) असे संबोधले जाते. राष्ट्रपतीप्रमाणे राज्यपाल हे पद औपचारिक असते व त्याला मर्यादित अधिकार असतात. भारतामधील केंद्रशासित प्रदेशांसाठी उप-राज्यपाल (लेफ्टनंट-गव्हर्नर) असतात. राज्यपाल व उप-राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते व त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.


प्रत्येक राज्यामधील विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्याची नेमणूक करणे राज्यपालाचे काम आहे.



राज्यपाल



राज्यपाल किंवा गव्हर्नर (Governor) हा एखाद्या देशाच्या विभागाचा (राज्य, प्रांत, इत्यादी) विभागप्रमुख आहे. भारत देशामध्ये सर्व राज्यांचे राज्यप्रमुख राज्यपाल असतात. उदा. महाराष्ट्राचे राज्यपाल. भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे. राज्याचा संकटकालीन निधी हा राज्यापालाच्या हाती असते. इवलेसे|rajyapal राज्याचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असते.



जगात इतर अनेक देशांमध्ये राज्यपाल हे पद अस्तित्वात असून प्रत्येक देशाच्या घटनेप्रमाणे राज्यपालाला विविध अधिकार असतात. अमेरिका देशाच्या सर्व राज्यांचे सरकारप्रमुख राज्यपाल असतात.


भारतातील नियुक्ती


राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीव्दारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो. 


🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

No comments:

Post a Comment