भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी भारताचा ४२ वा संप्रेषण उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडला. हा उपग्रह आपत्ती व्यवस्थापन आणि माहिती महाजाल संपर्कतेसाठी काम करणार आहे.
कोविड-१९च्या स्थितीत इस्रोने केलेले हे दुसरे प्रक्षेपण आहे. उपग्रह उत्तम स्थितीत असल्याचे इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी म्हटले आहे.
श्रीहरिकोटा येथील द्वितीय प्रक्षेपण केंद्रातून बुधवारी दुपारी पीएसएलव्ही-सी ५० रॉकेटने अवकाशात झेप घेतली.
हा उपग्रह देशाच्या मुख्य भूमीसह अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपला व्यापणाऱ्या वारंवारिता स्पेक्ट्रमच्या विस्तारित सी बॅण्डमध्ये सेवा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सीएमएस-०१, इस्रोचा संप्रेषण उपग्रह आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे हे ५२ वे अभियान आहे.
No comments:
Post a Comment