Thursday 7 January 2021

स्वतंत्र विद्यापीठासाठी समिती अस्तित्वात नाही, उच्च तंत्र शिक्षण विभागाची माहिती



उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्यात आली. पुढील तीन महिन्यात समिती अहवाल सादर करणार. शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी ऑगस्टमध्ये असे जाहीर केले होते. मात्र अशी कोणतीही समिती उच्च तंत्र व शिक्षण विभागाने गठीत केली नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानेही शिक्षण विभागाच्या या माहितीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र विद्यापीठाचे स्वप्न बाळगून असलेल्या उस्मानाबादकरांचा माहविकास आघाडीकडूनही भ्रमनिरास झाला आहे.


मागील वर्षी 20 ऑगस्ट रोजी मुंबई येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक झाली. या बैठकीत जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू आर. एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जाहीर केली होती.


या समितीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे डी.टी शिर्के, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, माजी प्राचार्य डॉ.अनार साळुंखे, शिक्षणतज्ञ एम.डी. देशमुख, विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय निंबाळकर, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.धनराज माने यांच्यासह औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचा समावेश असल्याचे खासदार राजेनिंबाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले होते

No comments:

Post a Comment