Friday, 22 January 2021

राष्ट्र आणि राज्य या भिन्न संकल्पना :-



🏅राज्यराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्र या संकल्पनांच्या दृष्टीने या पुस्तकात भारताच्या स्वातंत्र्योत्तर पन्नास वर्षांचा आढावा घेतला आहे.


🏅 तयामुळे राज्य, राष्ट्र, राज्यराष्ट्र व सांस्कृतिक राष्ट्र या संकल्पनांचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. राज्य आणि राष्ट्र या दोन शब्दांच्या अर्थांमध्ये अनेकवेळा गल्लत होते.


🏅 पाश्चिमात्य विचारवंतांनी या विषयावर बरीच चर्चा करूनही बहुतांश वेळा या शब्दांना समान अर्थाने मानले गेले. 



🏅राज्य म्हणजे असे प्रदेश किंवा देश ज्यांच्यावर एक शासनव्यवस्था आहे. वेगवेगळे देश, वसाहती किंवा प्रदेशांमध्ये एक समान शासनव्यवस्था असेल तर ते सर्व मिळून एक राज्य बनेल. 


🏅जथील लोक काही समान ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्यांनी एकत्र आलेले असतात व त्यांच्यामध्ये एक बांधिलकीची भावना असते. त्यास राष्ट्र म्हणतात.



🏅जव्हा आपण पाश्चिमात्य राष्ट्रे (Western Nations), किंवा आफ्रिकन राष्ट्रे (African Nations) म्हणतो, तेव्हा ते राष्ट्र नसून राज्य असते. 


🏅सयुक्त राष्ट्रे (United Nations) ही संघटना राष्ट्रांची नाही तर ‘राष्ट्रराज्यांची' (Nation States) संघटना आहे. 

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...