Tuesday, 13 December 2022

प्रार्थना समाज



🔸दादोबा पांडुरंग यांचे बंधू आत्माराम पांडुरंग यांच्या अध्यक्षतेखाली ३१ मार्च १८६७ रोजी प्रार्थनासमाजाची स्थापना झाली. पुणे, नगर, सातारा इ. ठिकाणी प्रार्थनासमाजाच्या शाखा निघाल्या.


🔸सबोध-पत्रिका' या नावाचे मुखपत्रही प्रार्थना समाजाने चालविले होते.


🔸परमहंस सभेचे प्रकट रूप असलेल्या प्रार्थना समाजाचे स्वरूप हे बंगालमधील ब्राह्मो समाजाची मिळतेजुळते असले तरी ब्राह्मो समाजाचा अनुभव महाराष्ट्रातील परिस्थिती लक्षात घेऊन महादेव गोविंद रानडे आणि रा गो भांडारकर यांनी प्रार्थना समाजाची तत्त्वे आणि उपासना पद्धती निश्‍चित केली होती.


🔸शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे असे मत मांडणाऱ्या रानडे यांच्या विचारांचा प्रभाव प्रार्थना समाजाच्या कार्यकर्त्यांवर होता. प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते लक्ष्मण भिकोबा चव्हाण यांनी सन १८७६मध्ये मुंबईतील चाळवाडी येथे पहिली रात्रशाळा सुरू केली


🔸परार्थना समाजाचे कार्यकर्ते उमाया लालशंकर यांनी अनाथ मुलांसाठी आधारगृह सुरू केले


🔸प्रार्थनासमाजाची धर्मतत्त्वे : 

(१) परमेश्वराने हे सर्व ब्रह्मांड निर्माण केले. तोच एक खरा ईश्वर. तो नित्य, ज्ञानस्वरूप, अनंत, कल्याणनिधान, आनंदमय, निरवयव, निराकार, एकमेवाद्वितीय, सर्वांचा नियंता, सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, कृपानिधी, परमपवित्र व पतितपावन असा आहे. 

(२) केवळ त्याच्याच उपासनेच्या योगे इहलोकी व परलोकी शुभ प्राप्त होते. (३) त्याच्या ठायी पूज्यबुद्धी व अनन्यभाव ठेवून त्याचे मानसिक भजन-पूजन करणे व त्यास प्रिय अशी कृत्ये करणे, हीच त्याची खरी उपासना. (४) प्रतिमा व इतर सृष्ट पदार्थ यांची पूजाअर्चा किंवा आराधना करणे हा ईश्वरोपासनेचा खरा प्रकार नव्हे. 

(५) परमेश्वर सावयव रूपाने अवतार घेत नाही आणि कोणताही ग्रंथ साक्षात ईश्वरप्रणीत नाही.

 (६) सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून भेदभाव न राखता परस्परांशी त्यांनी बंधुभावाने वागावे, हे ईश्वरास प्रिय आहे.


🔸रानडे-भांडारकर, वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर, द्वा. गो. वैद्य, विठ्ठल रामजी शिंदे वगैरेंच्या व्याख्यानांचे व प्रवचनांचे जे संग्रह उपलब्ध आहेत, त्यांवरून प्रार्थनासमाजाची ओळख पटते. उपनिषदे, इतर सर्व धर्मग्रंथांतील पारमार्थिक व नैतिक सिद्धांत प्रार्थनासमाज मानतो. साधकाला मध्यस्थाशिवाय म्हणजे पुरोहिताशिवाय अंतःप्रेरणेतून व स्वानुभवातून सत्याचे ज्ञान होऊ शकते. विवेकबुद्धीने धर्म व नीतितत्त्वे समजू शकतात. आत्मपरीक्षण आणि आत्मनिवेदनप्रधान असा हा प्रवृत्तिमार्ग आहे. सर्वांगीण सामाजिक सुधारणेचा पाया सद्धर्म व सदाचरणावर आधारित असावा, यावर प्रार्थनासमाज भर देतो.


No comments:

Post a Comment