भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) “पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड (PIDF)” अर्थात “देयके पायाभूत सुविधा विकास कोष” योजनेची घोषणा केली असून त्याच्या कार्यान्वयन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
🔍योजनेविषयी....
250 कोटी रुपयांच्या प्राथमिक योगदानासह देयके पायाभूत सुविधा विकास कोष तयार केला आहे.
योजना 1 जानेवारी 2021 पासून पुढील तीन वर्षांसाठी कार्यरत असणार आणि या काळातली प्रगती पाहता हा मर्यादित कालावधी आणखी दोन वर्षांसाठी वाढविला जाऊ शकतो.
योजनेच्या कालावधीसाठी 345 कोटी रुपयांचे कर्ज दिले जाणार असून, त्यापैकी 250 कोटी रुपये RBI तर उर्वरित रक्कम अधिकृत कार्ड नेटवर्क हे गोळा करणार आहेत.
हा निधी अधिग्रहणकर्त्यांना स्तर-3 ते स्तर-6 केंद्रे आणि ईशान्य राज्यांमध्ये पॉइंट ऑफ सेल (PoS) पायाभूत सुविधा तैनात करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे.या निधीचा उपयोग बँक आणि अ-बँकांना देयके पायाभूत सुविधा तैनात करण्यासाठी अनुदानासाठी केला जाणार आहे.
उपकरणे उपलब्ध नसलेल्या परिवहन व आतिथ्य, सरकारी देयके, इंधन पंप स्टेशन, सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत दुकाने, आरोग्य सुविधा आणि किराणा दुकान यासारख्या अत्यावश्यक सेवा प्रदान करणाऱ्या व्यापारी केंद्रांवर भर देणे, हे या योजनेचे प्राथमिक उद्दीष्ट आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा