प्र.1) "महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले
मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले
खरा वीर वैरी पराधीन तेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा"
या कवितेद्वारे त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत नव चैतन्य आणले ते कोण?
1) संत गाडगेबाबा 2) प्र.के.अत्रे
3) सेनापती बापट. 4) केशवसुत
प्र.2) ----------------- पासून कामगार दिन प्रतिवर्षी साजरा केला जातो?
1) 1 मे 1891 2) 1 मे 1886
3) 1 मे 1902 4) 1 मे 1881
प्र.3) संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ------------ यांचा सहभाग होता ?
अ) अमर शेख ब) श्री गव्हाणकर
क) अण्णाभाऊ साठे ड) शंकरराव जाधव
पर्यायी उत्तरे:
1) अ आणि ब फक्त 2) ब, क आणि ड फक्त
3) अ, ब आणि क फक्त 4) वरील सर्व बरोबर
प्र.4) -------------- यांनी आपल्या मराठा या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तसेच विरोधकांवरही बोचरी व कठोर टीका केली ?
1) प्र.के.अत्रे 2) श्रीपाद डांगे
3) एस.एम.जोशी 4) प्रबोधनकार ठाकरे
प्र.5) काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे प्रक्षोभक विधान ------------- या नेत्याने केले ?
1) स.का.पाटील 2) मोरारजी देसाई
3) भाई उद्धवराव पाटील 4) लालजी पेंडसे
प्र.6. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील पहिले हुतात्मा कोण?
1) सीताराम बनाजी पवार 2) गंगाराम विष्णू गुरव 3) मनू कर चांदेकर 4) बाबूराव दे. पाटील
प्र.7) --------------- यांनी जनसत्ताच्या अंकात लढल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्र होणार नाही या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध केला?
1) शंकरराव मोरे 2) केशवराव जेधे
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 4) अमृत डांगे
प्र.8) अकोला करार- 1947 बाबत योग्य विधाने ओळखा?
अ) दार कमिशनसमोर महाराष्ट्राची मांडणी करणे.
ब) वराड -नागपूरमधील जनतेची संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीबाबत कसलीही शंका नाही हे दर्शवणे.
क) हा करार धनंजयराव गाडगीळ यांच्या योजनेवर आधारित होता.
ड) एका प्रांतात महाविदर्भ व पश्चिम महाराष्ट्र असे दोन प्रांत असावेत.
पर्यायी उत्तरे:
1) अ आणि ब फक्त 2) अ, ब आणि क फक्त
3) अ, ब आणि ड फक्त 4) वरील सर्व बरोबर
प्र.9) ---------------- रोजी मराठी भाषिकांचे मुंबई राजधानी असणारे महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात आले?
1) 1 मे 1961 2) 1 मे 1962
3) 1 मे 1960 4) 1मे 1956
प्र.10) --------------- यांनी पाच हजार वर्षांनी सुध्दा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही,अशी दर्पोक्ती केली?
1) स.का.पाटील 2) मोरारजी देसाई
3) शंकरराव देव 4) शंकरराव चव्हाण
--------------------------------------------------------------प्र.11) संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात 107 हुतात्मे झाले कोल्हापूर येथील------- हे 107 वे हुतात्मे होय?
1) गिरधर लोहार 2) लक्ष्मण गावडे
3) बाबुराव पाटील 4) शंकरराव तोरस्कर
प्र.12) स्वतंत्र विदर्भाची मागणी --------------यांनी केली होती?
1) शेषराव वानखेडे 2) बापूजी आणे
3) डॉ. खेडकर 4) धनंजय गाडगीळ
प्र.13) खालीलपैकी कोणी संयुक्त महाराष्ट्र महामंडळ स्थापन करून मराठी भाषिकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला?
1) सेनापती बापट 2) शंकरराव देव
3) बापूजी अणे 4) शंकरराव मोरे
प्र.14) मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर केंद्रीय अर्थ मंत्री पदाचा राजीनामा महाराष्ट्र वरील होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ ------------- यांनी दिला?
1) डॉ.बाबासाहेब आंबेडकर 2) मोरारजी देसाई
3) चिंतामणराव देशमुख 4) शंकरराव चव्हाण
प्र.15) 12 मे 1946 रोजी ------------- या ठिकाणी भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात ग.त्र्यं. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा ठराव झाला?
1) पुणे 2) औरंगाबाद 3) बेळगाव 4) मुंबई
--------------------------------------------------------------
✅ उत्तरतालिका:
1-3 2-1 3-3 4-1 5-2
6-1 7-1 8-4 9-3 10-1
11-4 12-2 13-1 14-3 15-3
No comments:
Post a Comment