Sunday, 10 January 2021

पक्षांतर बंदी कायदा म्हणजे काय असते ?


⚡️ राष्ट्रवादीच्या काही आमदारांसोबत अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने आमदारांना उद्देशून शरद पवार यांनी पक्षांतर बंदी कायद्याची आठवण करून दिली आहे. 


💫 तया पार्श्वभूमीवर पक्षांतर बंदी कायद्याद्वारे आमदारांवर काय कारवाई होते, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ  


🧐 पक्षांतरबंदी कायदा केव्हा लागू झाला ? : 52 व्या घटना दुरुस्तीत 1985 पासून देशात पक्षांतरबंदी कायदा लागू करण्यात आला. एकतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केल्यास ते पक्षांतर होत नाही अशी तरतूद करण्यात आली होती.


📍 सदस्य अपात्र कसा ठरतो ? :

▪️ पक्षादेशाचे (व्हिप) पालन न केल्यास सदस्य अपात्र ठरू शकतो.

▪️ अन्य पक्षात प्रवेश केल्यास सदस्य अपात्र ठरू शकतो.

▪️ अन्य पक्षांच्या बैठकांना हजेरी लावल्यास सदस्य अपात्र ठरू शकतो.


🔍 बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्याशी फारकत घेऊन भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. 


🎯 पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा : 

 2003 मध्ये करण्यात आलेल्या घटना दुरुस्तीनुसार एकूण सदस्यसंख्येच्या दोन तृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केले तरच सदस्यत्व कायम राहू शकते.

No comments:

Post a Comment