Friday, 1 January 2021

मुकेश अंबानींना मागे टाकत चीनचे बॉटल वॉटर किंग शानशान बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती.


🔰चीनचे के झोंग शानशान हे एक असे श्रीमंत व्यक्ती आहेत ज्यांचा माध्यमांमध्ये खूपच कमी प्रमाणात उल्लेख होतो. मात्र, शानशान यांनी विविध क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. पत्रकारिता, मशरुमची शेती आणि हेल्थ केअर या क्षेत्रात त्यांचं चीनमध्ये मोठ नाव आहे. हेच शानशान आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. भारताचे मुकेश अंबानी आणि चीनचे जैक मा आणि इतर श्रीमंतांना मागे टाकत त्यांनी हे स्थान पटकावलं आहे.


🔰बलूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, शानशान यांची एकूण संपत्ती ७०.९ अब्ज डॉलरपासून ७७.८ अब्ज डॉलरच्या जवळपास आहे. याप्रकारे शानशान जगातील ११ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. शानशान यांनी ही संपत्ती खूपच कमी वेळेत कमावली आहे, जो स्वतःच एक विक्रम आहे. काही काळापर्यंत चीनच्या बाहेर जगात त्यांच्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती होती.


🔰६६ वर्षीय शानशान यांचा राजकारणात हस्तक्षेप नाही त्यामुळे त्यांची ‘लोन वोल्फ’ अशीही ओळख बनली आहे. त्यांनी विविध क्षेत्रात चांगलं यश मिळवलं आहे. चीनची लस बनवणारी कंपनी बीजिंग वंताई बायोलॉजिकल फार्मेसी इंटरप्रायझेसला त्यांनी एप्रिल महिन्यांत अधिग्रहित केलं. त्यानंतर काही महिन्यांनंतर बाटलीबंद पाणी तयार करणारी कंपनी नोंग्फू स्प्रिंग देखील ताब्यात घेतली. त्यानंतर या कंपनीला त्यांनी बाजारातील मोठी कंपनी बनवलं. शेअर बाजारात नोंग्फूचे शेअर १५५ टक्क्यांनी वाढले आहेत. तर वंताईच्या शेअरमध्ये २ हजार टक्के वाढ झालेली पहायला मिळाली.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...