Friday, 1 January 2021

जपान तयार करतोय जगातील पहिलं ‘लाकडी सॅटलाइट

🔰अमेरिकेच्या ‘नासा’ या अवकाश संशोधन केंद्राच्या माहितीनुसार अवकाशात सध्या 5 लाखांहून अधिक निरुपयोगी तुकडे पृथ्वीभोवती घिरट्या घालत आहेत.


🔰तर यातील अनेक तुकडे हे अतिशय वेगानं फिरत असून यातून सॅटलाइट आणि उपग्रहांचं नुकसान होऊ शकतं. या निरुपयोगी तुकड्यांमुळे अवकाशातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रालाही धोका निर्माण झाला आहे.


🔰तसेच 2023 सालापर्यंत अवकाशातील निरुपयोगी उपकरणांच्या अडचणीवर मात करण्यासाठी जपानची क्योटो यूनिव्हर्सिटी आणि कंस्ट्रक्शन कंपनी Sumitomo Forestry एकत्र आले आहेत.


🔰तर येत्या काळात ‘लाकडी सॅटलाइट’ तयार करण्यासाठी जपान प्रयत्न करत आहे.

जपानने अंतराळातील प्रदुषणावर मात करण्यासाठी लाकडी सॅटलाइट तयार करण्यावर काम सुरू केलं आहे.


🔰तापमानात होणारे बदल आणि सूर्याच्या प्रखर किरणांना झेलू शकेल इतक्या क्षमतेचा सॅटलाइट तयार करण्यात येत आहे.

तसेच यासाठी पृथ्वीवरील विविध परिस्थितींमध्ये लाकडाचे परिक्षण केले जात आहे.

लाकडी सॅटलाइट त्यांचं अवकाशातील काम पूर्ण झाल्यानंतर पृथ्वीवर परतत असताना पूर्णपणे जळून राख होतील आणि त्याचे कोणतेही अवशेष अवकाशात राहणार नाहीत, यावर संशोधन केलं जात आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...