Tuesday, 5 January 2021

अंटार्क्टिकासाठी 40 वी भारतीय वैज्ञानिक मोहीम



भारताने अंटार्क्टिकासाठी 40 वी वैज्ञानिक मोहीम आयोजित केली आहे. भारतीय मोहीम देशाच्या चार दशकांच्या दक्षिणेकडील बर्फाळ प्रदेशातल्या वैज्ञानिक प्रयत्नांचे प्रतिक आहे. 40 व्या भारतीय अंटार्क्टिका मोहिमेचा प्रवास 5 जानेवारी 2021 रोजी गोव्याहून 43 सदस्यांसह सुरु झाला.


‘चार्टर्ड आईस’ श्रेणीचे ‘एमव्ही वॅसिली गोलोव्हिन’ हे जहाज 30 दिवसांचा प्रवास करून अंटार्क्टिकाला पोहोचेल. चमूला तिथे सोडल्यानंतर हे जहाज एप्रिल 2021 मध्ये भारतात परत येणार. परत येताना जहाज मागील फेरीतल्या चमूला परत घेऊन येणार.


अभ्यासले जाणारे विषय - हवामान बदल, भूगर्भशास्त्र, समुद्रातले निरिक्षण, विद्युत व चुंबकीय प्रवाह मोजमाप, पर्यावरणी देखरेखीसाठी चालू असलेल्या वैज्ञानिक प्रकल्पांना पाठबळ देण्यावर भर दिला आहे; अन्न, इंधन, तरतुदी आणि अतिरिक्त वस्तूंचे पुनर्वसन; आणि हिवाळ्यातल्या चमूला परत आणण्यावर भर दिला आहे.


पार्श्वभूमी


भारत सरकारने 1981 सालापासून ‘अंटार्क्टिका संशोधन’ हा एक प्रमुख राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेतला आहे. पहिल्या फेरीमध्ये डॉ. एस.झेड. कासिम यांच्या नेतृत्वात 21 वैज्ञानिक आणि सहाय्यक कर्मचारी यांच्या पथकाचा समावेश होता.


या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर, भारतीय अंटार्क्टिका कार्यक्रमाने आता अंटार्क्टिकामध्ये दक्षिण गंगोत्री, मैत्री आणि भारती अशी तीन कायमस्वरूपी संशोधन केंद्रे उभारली आहेत. आजपर्यंत, अंटार्क्टिकामध्ये मैत्री आणि भारती अशी दोन कार्यान्वित संशोधन केंद्रे आहेत.

राष्ट्रीय अंटार्क्टिक व महासागरी संशोधन केंद्र ‘नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिक अँड ओशन रिसर्च’ पणजी (गोवा) येथे आहे.


अंटार्क्टिका खंड


अंटार्क्टिका पृथ्वीवरील दक्षिण ध्रुवाभोवतीचे हिमाच्छादित व पर्यावरण प्रदूषणमुक्त खंड आहे. ते जागतिक हवामानाचे नियंत्रक म्हणून ओळखले जाते. या खंडाचे क्षेत्रफळ 1.42 कोटी चौ. किमी. आहे. पृथ्वीवरील एकूण गोड्या जलसंसाधनांपैकी 70 टक्के जलसंसाधन अंटार्क्टिकावर हिमरूपात आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...