\
🍄भारत सरकारने येत्या 23 जानेवारी 2021 पासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे 125 वे जयंती वर्ष राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुयोग्य पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.
🍄नताजींनी देशासाठी नि:स्वार्थ भावनेने केलेल्या सेवेचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने त्यांची जयंती अर्थात 23 जानेवारी हा दिवस “पराक्रम दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
🍄दशातल्या नागरिकांना आणि विशेषत: तरुणांना संकट काळात नेताजींप्रमाणे धैर्याने वागण्याची प्रेरणा मिळावी आणि त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
🍁इतर ठळक बाबी
🍄नताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण वर्षभर साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांची औपचारिक सुरुवात 23 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. कोलकता येथे आयोजित केलेल्या उत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत.
🍄पतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली येत्या 23 जानेवारी 2021 रोजी कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे या स्मरणोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी एका सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर, नेताजींच्या जीवन आणि कार्यावर आधारित कायमस्वरुपी प्रदर्शन व प्रोजेक्शन मॅपिंग प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
नेताजी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एक विशेष नाणे आणि टपाल तिकीट यांचे विमोचन केले जाणार आहे.
🍄ओडीशाच्या कटक येथे नेताजींच्या जन्मस्थळी देखील संस्कृती मंत्रालय एक कार्यक्रम आयोजित करणार आहे.
🍁नताजी सुभाषचंद्र बोस (23 जानेवारी 1897 – 18 ऑगस्ट 1945 ?)
🍄सभाषचंद्र बोस भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती होते. ‘नेताजी’ ही त्यांना लोकांनी दिलेली उपाधी आहे. त्यांचा जन्म कटकला (ओडीशा) येथे झाला.
🍄1927 साली ते सक्रिय राजकारणात पडले. ते बंगाल प्रांतिक काँग्रेस परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यांनी यूथ लीग स्थापन करून तरुणांना संघटित केले. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही जवाहरलाल नेहरूंबरोबर त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी मिळून 1928 साली इंडिया इंडिपेंडन्स युथ लीगची स्थापना केली.
🍄21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना करण्यात आली. सुभाषबाबू स्वतः राष्टप्रमुख, पंतप्रधान, संरक्षण मंत्री व सरसेनापती झाले. या शासनाला जपान, जर्मनी, इटली, ब्रह्मदेश आदी अकरा राष्ट्रांनी मान्यता दिली. या सरकारने इंग्लंड-अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारून स्वतःची तिकिटे व नोटाही काढल्या. जपानने अंदमान, निकोबार व जित बेटांचा ताबा या सरकारकडे सोपविला. ब्रह्मदेशामधून आझाद हिंद सेना भारताच्या दिशेने पुढे गेल्या.
🍄सायगावहून 17 ऑगस्ट 1945 रोजी त्यांनी प्रयाण केले. मार्गावर 18 ऑगस्ट रोजी तैपे (तैवान) येथील विमानतळावर विमानास अपघात होऊन त्यांचे निधन झाले, असे समजण्यात येते.
No comments:
Post a Comment