Monday, 11 January 2021

एज्युकॉन -2020’: आंतरराष्ट्रीय अखंड परिषद


🔰7 जानेवारी 2021 रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्या हस्ते दोन दिवस चाललेल्या आभासी ‘एज्युकॉन 2020 नामक आंतरराष्ट्रीय अखंड परिषदेचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्‌घाटन करण्यात आले.


⭕️ठळक बाबी


🔰“जागतिक शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी युवकांच्या परिवर्तनासाठी शिक्षण कल्पना” ही या कार्यक्रमाची संकल्पना होती.

ग्लोबल एज्युकेशनल रिसर्च असोसिएशन (GERA) संस्थेच्या सहकार्याने केंद्रीय विद्यापीठ पंजाब (भटिंडा) या संस्थेनी ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती.


🔰परिषदेत ब्रिटन,  कॅनडा, थायलँड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भुटान आणि भारतातल्या अभ्यासकांनी मुख्य संकल्पनेला पकडून दहा उपसंकल्पनांवर  31 तास अखंड चर्चा केली.

भारतात अशा प्रकारची ही पहिलीच परिषद आयोजित केली गेली आहे जिथे भारतात योग्य दर्जेदार शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी उच्च शिक्षणात ICT तंत्राच्या वापराच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी जगभरातल्या विद्वानांनी अखंड चर्चा केली.


🔰या आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे भावी शिक्षकांना शिक्षणाच्या क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी विविध तंत्रज्ञान आणि त्यांची कार्यप्रणालीची ओळख करून घेण्यास मदत झाली.

No comments:

Post a Comment