Wednesday, 6 January 2021

भारतीय हवामान विभागाचा “वर्ष 2020 मधले भारतातले हवामान’ अहवाल.


🔰भारतीय हवामान विभागाने (IMD) “वर्ष 2020 मधले भारतातले हवामान’ या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.


🔴ठळक नोंदी ...


🔰वर्ष 2020 हे वर्ष 1901 पासूनचे आठवे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवले गेले.सर्वात उष्ण हवामानाची वर्षे म्हणून नोंदवल्या गेलेल्या वर्षांपैकी बारा वर्षे ही गेल्या पंधरा वर्षातली म्हणजे 2006-2020 मधली वर्षे आहेत.


🔰मागील दशक (2001 - 2010/2011 - 2020) हे देखिल नोंदवले गेलेल्या सर्वाधिक उष्ण दशकांपैकी एक आहे.

देशभरात झालेला नैऋत्य मौसमी हंगामातला (जून ते सप्टेंबर) पाऊस सरासरीपेक्षा जास्त (LPAच्या 109 टक्के) होता.


🔰दशभरातले 2020 या वर्षातले ईशान्य मोसमी हंगामामधले पावसाचे प्रमाण सर्वसाधारण होते.


🔰2020 या वर्षामध्ये उत्तर हिंद महासागरात पाच वादळे तयार झाली. ही वादळ म्हणजे अतीशक्तिशाली वादळ ‘अम्फान’, अतितीव्र चक्रीवादळ ‘निवारा’ आणि ‘गती’,  तीव्र चक्रीवादळ ‘निसर्ग’ आणि चक्रीवादळ ‘बुरेवी’.


🔰हवामानासंबधीत प्रभावी मोठ्या घटना देशात घडल्या. उदाहरणार्थ - अतिशय मुसळधार पाऊस, पूर, दरडी कोसळणे, वादळ, विजांचे थैमान, थंडीची लहर इत्यादी.


🔰वार्षिक पृष्ठभाग तसेच हवेचे तापमान वर्ष 2020 मध्ये सामान्य तापमानापेक्षा जास्त होते. यावर्षी देशभरात जमीन आणि हवेचे तापमान हे सरासरी +0.29 अंश सेल्सियस राहिले.


🔰दशभरातल्या हवामानाच्या नोंदी वर्ष 1901 पासून केल्या जातात. या नोंदींनुसार 2020 हे आठवे सर्वाधिक उष्ण वर्ष आहे.


🔰‘WMO स्टेट ऑफ ग्लोबल क्लायमेट’ याच्यानुसार, जागतिक पातळीवर पृष्ठभाग तापमानातला फरक वर्ष 2020 मध्ये (जानेवारी तो ऑक्टोबर) हा +1.2 अंश सेल्सियस राहिला.

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...