🔰12 जानेवारी 2021 रोजी देशभरात ‘युवाः – उत्साह नये भारत का’ या संकल्पनेखाली ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा करण्यात आला आहे.
🔰सवामी विवेकानंद यांच्या 158 व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे नेहरू युवा केंद्र संघटनेच्यावतीने आयोजन करण्यात आले.
🔴पार्श्वभूमी.
🔰सयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णयानुसार, स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीत वर्ष 1984 याला ‘आंतरराष्ट्रीय युवा वर्ष’ घोषित करण्यात आले होते.
🔰तयापाठोपाठ, भारत सरकारने 1984 सालापासून दरवर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा करण्याची घोषणा केली.
🔰सवामी विवेकानंद (12 जानेवारी 1863 – 4 जुलै 1902)
🔰सवामी विवेकानंद यांचे मूळ नाव वीरेश्वर तर रूढ झालेले नरेंद्रनाथ ही नाव होते. ते एकोणिसाव्या शतकात बंगालमध्ये होऊन गेलेले एक जगद्विख्यात संन्यासी होते.
🔰अमेरिकेत जाऊन शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्मपरिषदेस हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले.
🔰11 सप्टेंबर 1893 रोजी त्यांनी केलेल्या पाच मिनिटांच्या पहिल्या भाषणाने सारी सभा मंत्रमुग्ध झाली आणि सतरा दिवस चाललेल्या त्या परिषदेवर सर्वांत अधिक प्रभाव त्यांचा पडला.
🔰1 मे 1897 रोजी ‘रामकृष्ण मिशन’ या नावाची संन्याशांची संस्था त्यांनी स्थापन केली. कलकत्त्यातील बेलूर मठ हे तिचे केंद्र-कार्यालय आहे.
No comments:
Post a Comment