Monday 11 January 2021

12 जानेवारीला द्वितीय राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाचे आयोजन


🔰23 डिसेंबर 2020 ते 12 जानेवारी 2021 या कालावधीत द्वितीय युवा संसद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महोत्सवाच्या समारोप प्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.


⭕️ठळक बाबी


🔰“युवा - उत्साह नये भारत का” हा यंदाच्या महोत्सवाचा विषय आहे.

देशभरातून 2.34 लक्ष युवकांनी या आभासी परिषदेच्या पहिल्या टप्प्यात भाग घेतला. त्यापाठोपाठ राज्य युवा संसद देखील आभासी माध्यमातून 1 ते 5 जानेवारी 2021 या काळात सुरू झाली. कार्यक्रमाचा अंतिम टप्पा हा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये 11 जानेवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आला.


🔰24 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा उद्‌घाटन समारंभ आणि दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाचा समारोप समारंभ दोन्हीही एका दिवशी म्हणजे 12 जानेवारी 2021 रोजी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आले आहेत.


🔰24 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा समारोप डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, नवी दिल्ली येथे 16 जानेवारी 2021 रोजी होणार आहे.


⭕️पार्श्वभूमी


🔰नागरी सेवांसह विविध क्षेत्रांमध्ये येत्या काही वर्षात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या आणि ज्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे, अशा 18 ते 25 या वयोगटातल्या युवकांची मते ऐकण्यासाठी ‘राष्ट्रीय युवा संसद महोत्सव’ या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.


🔰पहिला कार्यक्रम 2019 या काळात ‘बी द व्हॉइस ऑफ न्यू इंडिया अँड फाइंड सोल्युशन अँड कॉन्ट्रिब्यूट टू पॉलिसी’ (नव्या भारताचा आवाज बना आणि मार्ग शोधा आणि यंत्रणेत सहभागी व्हा) या विषयाला अनुसरून आयोजित करण्यात आला होता.


🔰राष्ट्रीय युवा महोत्सव हा प्रत्येक वर्षी 12 ते 16 जानेवारी या काळात साजरा केला जातो. 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणून देशभर राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. या वर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाबरोबरच परिषदेचे देखील आयोजन करण्यात येते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...