Sunday, 31 January 2021

जाणून घ्या देशातील 10 अस्वच्छ शहरे

नागरी स्वच्छता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशात सर्वाधिक चार, तर अन्य विभागांतील 13 असे एकूण 17 पुरस्कार मिळवून ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे. 


तर दुसरीकडे सर्वाधिक अस्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल दहापैकी सहा शहरे बिहारमधील असल्याची माहिती समोर आली आहे. 


🛑 10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या सर्वात अस्वच्छ शहरांची यादी


🔟 अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये दहाव्या स्थानी आहे बिहारमधील साहारसा हे शहर.


9️⃣ बिहारमधीलच बिहार शरीफ शहर नवव्या स्थानी आहे. 


8️⃣ आठव्या स्थानी आहे नागालँण्डमधील दिमापूर एमसी हे शहर. 


7️⃣ अरुणाचल प्रदेशमधील इटानगर हे या यादीमध्ये सातव्या स्थानी आहे. 


6️⃣ मघालयमधील शिलाँग शहर अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये सहाव्या स्थानी आहे. 


5️⃣ अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी आहे परसा बाजार. हे शहर बिहारमध्ये आहे.


4️⃣ चौथ्या स्थानी बिहारमधील भागलपूर शहर आहे.


3️⃣ तिसऱ्या स्थानी पंजाबमधील अबोहार शहर आहे. 


2️⃣ दसऱ्या स्थानी बिहारमधील बक्सर शहर आहे.


1️⃣ सर्वात अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये बिहारमधील गया शहर अव्वल स्थानी आहे.


✅ विशेष : अस्वच्छ शहरांच्या यादीमध्ये अव्वल दहामध्ये महाराष्ट्रातील एकही शहर नाही आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...