Sunday, 3 January 2021

भारत: 1 जानेवारी 2021 पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी UNSCचा एक अस्थायी सदस्य


🔰1 जानेवारी 2021 पासून भारत संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या (UNSC) अस्थायी सदस्याच्या रुपात सहभागी होणार आहे. आठव्यांदा भारताची अस्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.


🅾️ठळक बाबी


🔰सयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत भारत, नॉर्वे, केनया, आयर्लंड आणि मॅक्सिको हे 2021 या वर्षात अस्थायी सदस्याच्या रूपात सहभागी होणार आहेत. त्याव्यतिरिक्त एस्टोनिया, नायझर, सेंट विन्सेंट, ट्युनिशिया आणि व्हिएतनाम हेदेखील अस्थायी सदस्य आहेत.


🔰सदस्याच्या रूपात भारताच्या कार्यकाळात दशतवादाला विरोध, शांततेचं संरक्षण, समुद्री सुरक्षा, तंत्रज्ञान, महिला आणि तरुणांचा विकास यांसारख्या विषयांना भारत प्राधान्य देणार आहे.

ऑगस्ट 2021 मध्ये भारत UNSC अध्यक्ष असणार आणि 2022 मध्ये देखील पुन्हा एका महिन्यासाठी परिषदेचा अध्यक्ष असणार. इंग्रजी वर्णमालानुसार सदस्यांच्या नावाने UNSCचे अध्यक्षपद प्रत्येक सदस्याला  एका महिन्यासाठी दिले जाते.


🅾️सयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) 


🔰ह संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा प्रमुख अंगापैकी एक आहे. ही परिषद आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा राखण्यास जबाबदार आहे. 1945 साली स्थापना झालेल्या या संघटनेचे आज 15 सदस्य आहेत, ज्यात अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स हे कायमस्वरूपी (स्थायी) सदस्य आहेत. या कायमस्वरूपी सदस्यांकडे ‘व्हीटो’ (नकाराचा) अधिकार आहे. उर्वरित 10 तात्पुरता (अस्थायी) सदस्यांची निवड दोन वर्षांसाठी केली जाते. परिषदेच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ एक महिन्याचा असतो.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...