Thursday, 31 December 2020

मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये विदर्भातील १० जिल्ह्य़ांकडे पाठ.


🔰‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये विदर्भातील जिल्ह्य़ांकडे पाठ फिरवण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत तिसऱ्या टप्प्यात अमरावती वगळता इतर १० जिल्ह्य़ांमध्ये उद्योग उभारण्याच्या दृष्टीने एकही करार करण्यात आलेला नाही. विदर्भात गुंतवणूक करण्यात मोठे उद्योजक अनुत्सुक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. मूलभूत सोयीसुविधांचा अभाव व राजकीय उदासीनतेमुळे विदर्भात नवीन उद्योग येत नसल्याचे चित्र आहे.


🔰राज्यात गुंतवणूक वाढून उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०’ उपक्रम राबविण्यात येत आहे. रोजगारनिर्मिती होण्यासोबतच अर्थव्यवस्थेला चालना देणे हा त्यामागचा उद्देश. या माध्यमातून औद्योगिकदृष्टय़ा मागास व अप्रगत भागात नवे उद्योग येणे अपेक्षित असताना समृद्ध भागातच नव्या उद्योगांसाठी करार करण्यात आले आहेत.


🔰वर्षभरात परदेशी कंपन्या आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांशी सामंजस्य करारांद्वारे राज्यात २ लाख कोटींची गुंतवणूक केली. गेल्या आठवडय़ात तिसऱ्या टप्प्यामध्ये २५ भारतीय कंपन्यांशी ६१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले. त्यातून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होईल. यामध्ये पुणे, ठाणे आदी भागांमध्येच गुंतवणूक करण्यात उद्योजकांचा कल आहे. विदर्भ, मराठवाडय़ात गुंतवणूक करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.


🔰विदर्भातील ११ जिल्ह्य़ांपैकी केवळ अमरावती जिल्ह्य़ात २ उद्योगांचे करार झाले. उर्वरित १० जिल्ह्य़ांची पाटी कोरीच राहिली. अमरावती जिल्ह्य़ात वस्त्रोद्योग व रसायने उद्योगाचे करार झाले. त्यातून सुमारे ९०० कोटींची गुंतवणूक होऊन दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल.

वाणिज्यिक बँकात ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’लागू.


🍀रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार वाणिज्यिक बँका  ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ लागू करत आहेत.


🍀तर 50,000 रुपयांवरील व्यवहारासाठी धनादेशाबरोबर संबंधितांनी खाते क्रमांक, आयएफसी कोड, खातेदाराचे नाव व संपर्क क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.


🍀तसेच‘इन्सर्ट’नंतर ‘स्वाईप’ पद्धतीद्वारे व्यवहार करण्यासाठी एटीएम कार्डना चुंबकीय पट्टीची अनिवार्यता 2020 मध्ये अंमलात आली.


🍀सरक्षिततेच्या दृष्टीने यापुढचे पाऊल म्हणून संपर्करहित एटीएम कार्ड संबंधित ‘पीओएस’च्या एक इंच अंतरावरून कार्यान्वित करून व्यवहार करता येणार आहे.


🍀एटीएम कार्ड तसेच यूपीआयद्वारे सध्या असलेली  2,000 रुपयांची मर्यादा 5,000 रुपयांपर्यंत  वाढविण्यात आली आहे.

‘सहायक-एनजी’: विमानातून सोडता येऊ शकणारी मालवाहू पेटी



भारतीय नौदलाने संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या ‘सहायक-एनजी’ या विमानातून खाली सोडता येऊ शकणाऱ्या स्वदेशी मालवाहू पेटीची (container) पहिली चाचणी यशस्वीपणे पार पाडली.


ठळक बाबी


भारतीय नौदलाची रसद आणि इतर सामुग्री वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यासाठी अश्या पेट्या तयार करण्यात आलेल्या आहेत. पेट्यांमधून संकटकाळात गरजेच्या अभियांत्रिकी सामानाचे वहन कशा पद्धतीने करता येणार, याबाबत संशोधन करण्यात आले आहे.


भारतीय नौदलाच्या विमानातून गोव्याच्या सागरी प्रदेशात पेट्या खाली सोडण्यात आल्या होत्या. गोव्यापासून 2000 किलोमीटर अंतरावर तैनात जहाजांना काही अभियांत्रिकी साधनसामुग्री पुरविण्याचा प्रयोग करण्यात आला.


अश्या सुविधेमुळे आवश्यकतेच्यावेळी जहाजांना सामुग्री, सामानाचे सुटे भाग घेण्यासाठी किनाऱ्यापर्यंत यावे लागणार नाही.


‘सहायक-एनजी’ची आधुनिक आवृत्ती ‘सहायक एमके 1’ तयार करण्यात आली आहे. या नवीन आवृत्तीमध्ये GPS म्हणजेच वैश्विक स्थान प्रणालीच्या मदतीने हवेतून पेटी खाली सोडण्यात येतात. या पेटीची वहन क्षमता 50 किलो वजन एवढी आहे. विमानातून ही पेटी नियोजित स्थानी खाली सोडता येते.

वहाबी आंदोलन


🔹वहाबी चे प्रवर्तक रायबरेली चे 'सैय्यद अहमद' होते

🔸वहाबी 1828 ई. ते 1888 पर्यंत

🔹आन्दोलनाचे मुख्य केन्द्र पटना शहर होते

 🔸पटना चे विलायत अली व इनायत अली या आन्दोलन चे प्रमुख नायक होते 

🔹ह आन्दोलन मूलता मुस्लिम सुधारवादी आन्दोलन होते

 🔸ज उत्तर पश्चिम, पूर्वी भारत तथा मध्य भारतात होते



📚 सय्यद अहमद ची इच्छा 📚

🔹सय्यद अहमद इस्लाम धर्मातील परिवर्तने तथा सुधारणांच्या  विरुद्ध होते

🔸तयांची इच्छा हजरत मोहम्मद  कालीन इस्लाम धर्माला पुन:स्थापित करण्याची होती

🔹सय्यद अहमद पंजाब चे सिक्ख आणि  बंगाल चे  अंग्रेजांना विरोध केला

🔸अनुयायांना शस्त्र धारण व प्रशिक्षित करुन स्वयं सैनिकी वेशभूषा धारण केली,

🔹तयांनी पेशावर वर 1830 ई. मध्ये काही काळासाठी अधिकार ठेवला

🔸अापल्या नावाचे सिक्के भी चालवले


📚  फाँसी ची शिक्षा 📚

🔸1857 मध्ये आन्दोलनाचे नेतृत्व पीर अली ने केले

🔹कमिश्नर टेलबू ने  एलिफिन्सटन सिनेमा समोर एका झाडाला लटकवून फाँसी दिली

🔸तयांच्याबरोबर ग़ुलाम अब्बास, जुम्मन, उंधु, हाजीमान, रमजान, पीर बख्श, वहीद अली, ग़ुलाम अली, मुहम्मद अख्तर, असगर अली, नन्दलाल एवं छोटू यादव यांना फाँसी वर दिली


फॉर्वर्ड ब्लाॕक



🔹सभाषचंद्र बोस यांनी १९३९ च्या त्रिपुरी कॉग्रेस अधिवेशनात अध्यक्षपदी विराजमान होवुनही गांधीजींसोबत झालेला सुप्त संघर्षामुळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर ३ मे १९३९ रोजी  फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली . फॉरवर्ड ब्लॉकच्या स्थापनेची घोषणा करताना कलकत्त्यामधे बोस म्हणाले की, 


"जे कोण सामील होत आहेत, त्यांनी कधीही पाठ दाखवुन पळुन जाऊ नये आणि आणि आपले बोट कापुन रक्ताने त्यावर सही करुन तारणपत्र भरावे."


या भावपुर्ण आव्हानाला प्रतिसाद देत "सतरा" तरुण मुलींनी पुढे येवुन तारण फॉर्मवर सह्या  केल्या.


 🔸पक्षाचे उद्दीष्ट -


कॉंग्रेसमधील सर्व डाव्या पक्षांना एकत्रित करणे आणि कॉंग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व विकसित करणे हे होते. 


🔹अध्यक्ष -उपाध्यक्ष


बोस फॉरवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष आणि एस.एस. कवेशर त्याचे उपाध्यक्ष झाले.


जूनच्या शेवटी मुंबईत फॉरवर्ड ब्लॉक कॉन्फरन्सन्स आयोजित करण्यात आली  त्या परिषदेत फॉरवर्ड ब्लॉकची घटना आणि कार्यक्रम मंजूर झाला. 


जुलै १९३९ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक समितीची घोषणा केली.


🔺तयात 

अध्यक्ष - सुभाषचंद्र बोस,

उपाध्यक्ष- एस.एस. कविशर 

सरचिटणीस- लाल शंकरलाल 

सचिव- पंडित बी त्रिपाठी आणि मुंबईचे खुर्शेद नरिमन .


आंध्र प्रदेश-अन्नपुर्ना

मुंबई- सेनापती बापट, हरी विष्णू कामथ तामिळनाडू- पासमोन यू. मुथुरमलिंगम बिहारमधील - शील भद्र यागी हे प्रमुख सदस्य होते. 


मुखपत्र-फार्वड ब्लॉक


"नागपुर-पहिली परिषद "


२०-२२ जून १९४० रोजी फॉरवर्ड ब्लॉकने नागपुरात पहिली अखिल भारतीय परिषद घेतली.

 परिषदेने फॉरवर्ड ब्लॉकला समाजवादी राजकीय पक्ष म्हणून घोषित केले आणि २२ जूनची तारीख ही फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने स्थापनेची तारीख मानली. 


ब्रिटीश राजवटीविरूद्ध संघर्षाचा आग्रह धरला आणि परिषदेने 'ऑल पावर टू द इंडियन पीपल' हा ठराव संमत केला. याच वेळी पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली आणि एच.व्ही. कामथ सरचिटणीस म्हणून निवडले गेले.

ताश्कंद करार



● भारत आणि पाकिस्तान यांमध्ये रशियातील ताश्कंद येथे १० जानेवारी १९६६ रोजी हा करार झाला.


● भारतावरील पाकिस्तानी आक्रमणामुळे ५ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर १९६५ पर्यंत झालेल्या युद्धाची समाप्ती या कराराने झाली. 


● भारताचे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट रशियाच्या मध्यस्थीने हा करार झाला.


●या करारान्वये संयुक्त राष्ट्र–सनदेप्रमाणे परस्परांशी स्नेहपूर्ण शेजारसंबंध निर्माण करण्याची व परस्परविरुद्ध सैन्यबळाचा उपयोग न करता, आपापसांतील तंटे शांततामय मार्गाने सोडविण्याची हमी देण्यात आली.


● २५ फेब्रुवारी १९६६ च्या आत आपापली सैन्ये ५ ऑगस्ट १९६५ च्या स्थानावर परत घेण्याचे मान्य करण्यात आले.


● एकमेकांच्या अंतर्गत काराभारात ढवळाढवळ न करणे.


● एकमेकांच्या विरुद्धच्या प्रचारास आळा घालणे.


● एकमेकांचे राजदूत पुनश्च स्थानापन्न करून १९६१ च्या व्हिएन्ना कराराप्रमाणे त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे.


● एकमेकांमधील आर्थिक व व्यापारी संबंध, दळणवळण व सांस्कृतिक देवाणघेवाण यांचे पुनरुज्जीवन करणे व अस्तित्वात असलेल्या कराराची अंमलबजावणी करणे.


● युद्धकैद्यांची अदलाबदल करणे.


● उभयदेशांतील लोकांना मोठ्या संख्येने देशत्याग करावा लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करणे आणि युद्धकाळात उभयदेशांनी एकमेकांची जी मालमत्ता व परिसंपत्ती ताब्यात घेतली असेल, ती परत करण्यासाठी वाटाघाटी करणे.


● अत्युच्च व इतर स्तरांवर परस्परांच्या हितसंबंधाच्या प्रश्नावर वेळोवेळी विचारविनिमय करणे. 


● या करारानंतर लगेच भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ताश्कंद येथेच निधन झाले.

इतिहासातील काही महत्त्वपूर्ण तथ्य



●निष्काम कर्ममठ (1910) महर्षी धो.के.कर्वे


●निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे यांना संबोधतात.


●हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले यांना संबोधतात.


●महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील यांना संबोधतात.


●हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय यांना संबोधतात.


●महाराष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले यांना संबोधतात.


●अहिल्याश्रम (1923) वि.रा.शिंदे


●पवनार आश्रम ,वर्धा (1921) विनोबा भावे


●अनाथ बालिका आश्रम (1899) महर्षि धो.के.कर्वे


●विक्टोरीया अनाथाश्रम (1869) महात्मा फुले


●विक्टोरीया मराठा बोर्डींग (1901) शाहू महाराज


●सेवा समिती (1910) हृदयनाथ कुंझर


●पूना सेवा सदन (1884) रमाबाई रानडे


●शारदा सदन मुंबई (1889 ) पंडिता रमाबाई


●मुक्ती सदन केडगाव (1898) पंडिता रमाबाई 


●कृपा सदन, प्रीती सदन —पंडिता रमाबाई


●केसरी — लोकमान्य टिळक


●महाराष्ट्र केसरी — पंजाबराव देशमुख


●महाराष्ट्र धर्म —विनोबा भावे


●अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) पंजाबराव देशमुख


●पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) साने गुरुजी


●नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) बाबासाहेब आंबेडकर


●पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —(नेतृत्व) एस.एम.जोशी


●कुसाबाई शी पुनर्विवाह 1874 रोजी  विष्णू शास्त्री पंडित यांनी केला.


●गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) महर्षी धो.के.कर्वे यांनी केला.


●स्वत:च्या मुलीचा पुनर्विवाह  रा.गो.भांडारकर यांनी केला.


●विधवा विवाह उत्तेजक मंडळी  (1893)महर्षी धो.के.कर्वे


●पुनर्विवाह उत्तेजक मंडळी (1865) न्या.म.गो.रानडे


●विधवा विवाह पुस्तक — विष्णू शास्त्री पंडित 


●विधवा विवाहाचा कायदा व पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता (1917) शाहू महाराज यांनी दिली.


●आंतर जातीय विवाहास मान्यता देणारा  कायदा (1918)  शाहू महाराज यांनी केला.

कलम 371 :- मध्ये विविध राज्यांकरिता विशेष तरतुदी दिलेल्या आहेत.



🎯 या कलमांतर्गत  राज्यपालास राष्ट्रपतीच्या निर्देशानुसार काही विशेष जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्याबाबतीत राज्यपालास जरी मंत्रिमंडळाचा सल्ला घेण्याची गरज असली तरी तो अंतिमतः स्वच्छेने कृती करू शकतो. 


🎯 या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत


● क- 371     :-  महाराष्ट्र & गुजरात


● क- 371 A :-  नागालँड


● क- 371  B :- आसाम 


● क- 371  C :-  मनिपुर 


● क- 371  D :- } आंध्रप्रदेश & तेलंगणा

● क- 371  E :- }


● क- 371  F :-  सिक्कीम 


● क- 371  G :- मिझोरम


●  क- 371  H :- अरुणाचल प्रदेश


●  क- 371  I :-  गोवा 


 ● क- 371  J :- कर्नाटक


🎯 Note : 371 D, E, G व I मध्ये दिलेल्या विशेष तरतुदींमध्ये राज्यपालाच्या स्वेच्छाधीन अधिकारांचा समावेश होत नाही

सटॅच्यू ऑफ युनिटी


✔️मर्तिकार :- शिल्पकार राम सुतार 

✔️ कोठे :-  नर्मदा नदी , गुजरात

✔️ उची :- १८२ मीटर 

✔️ जगातला हा आत्तापर्यंतचा सर्वात 

      भव्य पुतळा आहे. 

✔️ लोकार्पण :-पंतप्रधान नरेंद्र मोदी

 ✔️ पतळ्याचे वजन :-  १७०० टन 

✔️ ह शिल्प जगातील सर्वात उंच शिल्प 

      आहे. 

✔️ पायांची उंची :- ८० फूट,

✔️ हाताची उंची :-  ७० फूट

✔️ चीन मधील स्प्रिंग टेम्पलमध्ये  

     असलेल्या गौतम बुद्धाच्या पुतळ्याची       

     उंची १५३ मीटर आहे.


✔️  हा पुतळा आत्तापर्यंत जगातला उंच 

       पुतळा मानला जायचा, मात्र 'स्टॅच्यू 

       ऑफ युनिटी'ने त्याचा पुतळ्याचाही 

       रेकॉर्ड मोडला आहे.

✔️  'स्टॅच्यू ऑफ युनिटी' बनण्यास 

        कालावधी :-  ३३ महिने 

✔️ पतळ्याच्या निर्मितीत ३ हजार ५०० 

      पेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता. 

✔️ खर्च :-  २ हजार ९८९ कोटी रुपये 

✔️ सरवात :- ३१ ऑक्टोबर २०१३

✔️ सरदार पटेल यांच्या १३८ व्या 

     जयंतीच्या औचित्याने सुरु करण्यात 

     आले होते.

✔️ नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री 

      होते

✔️ लोकार्पण सोहळ्यासाठी 'युनिटी ट्रेन' 

      नावाची ट्रेनही धावणार आहे.

✔️ या ट्रेनमधून वाराणसी, मिर्झापूर, 

      अलाहबाद,रायबरेलीहून लोक या  

      ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे

आतरराष्ट्रीय विमानांवर आता 31 जानेवारीपर्यंत बंदी

 

♒️आतरराष्ट्रीय विमानांवर आता 31 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मोदी सरकारने हा तातडीचा निर्णय घेतला आहे.


♒️करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.


♒️तर आधी ही बंदी 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती 7 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.


♒️विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना  यातून वगळण्यात आलं आहे असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...