नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
२६ डिसेंबर २०२०
17वी बिहार विधानसभा निवडणूक - 2020
👉 या निवडणुकीचे एकूण 3 टप्पे
📌पहिला टप्पा - 28 ऑक्टोबर : 71 जागा
📌दसरा टप्पा 3 नोव्हेंबर : 94 जागा
📌 तिसरा टप्पा 7 नोव्हेंबर :- 78 जागा
▪️मतदानाचा निकाल : 10 नोव्हेंबर 2020
▪️बिहार विधानसभा जागा : 243
▪️बिहार विधानसभा पक्ष : 13
📌सर्वाधिक जागा राष्ट्रीय जनता दल पक्षांनी जिंकल्या आहेत (75) त्यानंतर भारतीय जनता पक्षाने (74) जागावर विजय मिळवला.
📌या निवडणुकीत एकूण 7 लाख 6 हजार 252 मतदारांनी नोटा पर्यायाचा स्वीकार केला. (एकूण मतदारांपैकी 1.7% )
📌या निवडणुकीत एनडीए ला 125 जागा मिळाल्या तर युपीएला 111 जागा तर इतर पक्षांना 67 जागा
♦️नितीशकुमार 17 व्या बिहार विधानसभेचे मुख्यमंत्री
📌नितीशकुमार सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले ते बिहार राज्याचे 37 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
📌बिहार विधानसभा निवडणूकीत 243 पैकी 125 जागा जिंकलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) नेते व संयुक्त जनता दलाचे प्रमुख म्हणून नितीश
कुमार यांची ओळख आहे.
📌मागील दोन दशकात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची ही त्यांची सातवी वेळ आहे.
📌शपथ बिहारचे राज्यपाल फागु चौव्हान यांनी दिली.
♦️उपमुख्यमंत्री पदी शपथ -
1. तारकिशोर प्रसाद (भाजप),
2. रेणू देबी
📌बिहारच्या इतिहासातील सर्वात अल्पकालीन मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार (80 दिवस) यांना ओळखले जाते.
♦️JDU जनता दल (युनायटेड)
📌सथापना : 30 ऑक्टोबर, 2003
📌सस्थापक अध्यक्ष : नितिश कुमार
📌जनतादल युनायटेड हे बिहार आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांत राज्यपक्ष म्हणून ओळखले जातात.
📌लोकसभेमध्ये सदस्य संख्येच्या दृष्टीने हा 7 व्या क्रमांकाचा पक्ष आहे.
♦️NDA - नॅशनल डेमाक्रॉटिक अलायन्स
📌सथापना : 1998
📌सस्थापक : अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी,बाळासाहेब ठाकरे
📌अध्यक्ष : नरेंद्र मोदी
📌2019 च्या लोकसभा निवडणूकीमध्ये NDA ने एकूण 543 पैकी 350 जागा मिळविल्या.
♦️पक्षनिहाय जिंकलेल्या जागा.
राष्ट्रीय जनता दल -75
भारतीय जनता पक्ष -74
जनता दल -43
राष्ट्रीय काँग्रेस - 19
कम्युनिस्ट पार्टी - 12
एमआयएम- 05
हिंदुस्थान अवाम मोर्चा -
विकसील इन्सान पार्टी-
♦️भारतीय निवडणूक आयोग
📌कलम 324 (1)अंतर्गत स्थापन (स्वतंत्र घटनात्मक संस्था)
📌कार्यकाळ : 6 वर्षे (वयाची 65)
📌रचना : 2 + 1
📌 सध्या मुख्य निवडणूक आयुक्त : सुनील अरोरा (नेमणूक-राष्ट्रपती)
📌पहिले निवडणुक आयुक्त : सूकुमार सेन
चालू घडामोडी
1). NCAER ने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे.. ?
(National Council Of Applied Economic Research)
>>> -7.3 %
2). भारतातील पहिले अवयवदाता स्मारक नुकतेच कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे. ?
>>> राजस्थान
3). कोणत्या राज्याने फायर सेफ्टी कंपलायन्स नावाचे पोर्टल सुरु केले आहे. ?
>>> गुजरात
4). कोणत्या राज्यसरकारने विद्यार्थ्यांना 1.3 लाख स्मार्टफोन वितरित केले आहे. ?
>>> पंजाब
5). कोणत्या राज्यसरकारने महिलांसाठी 'BC सखी योजना' सुरु केली आहे. ?(Banking corresponding)
>>> उत्तरप्रदेश
6). खेलो इंडिया युथ गेम्सची चौथी आवृत्ती कोठे आयोजित केली आहे. ?
4). हरियाणा
1). दिल्ली
2). मुंबई
3). आसाम
7). कोणत्या खेळाला प्रतिस्पर्धी खेळ म्हणून मान्यता दिली आहे. ?
>>> योगासन
8). बाँक्सीग वर्ल्ड कप 2020 मध्ये भारताने किती सुवर्णपदके मिळवली आहेत. ?
>>> सुवर्ण - 3 रजत -2 कांस्य -4
अमित पंघाल - 52 KG
मनिषा मौन - 57 KG
सिमरनप्रीत कौर - 60 KG
आयोजन - जर्मनी (कोलोन)
9). भारतातील पहिली डायव्हरलेस मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात चालू करणार आहे. ?*
>> दिल्ली
10). महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये गाढवांसाठी पहिला पूर्ण वेळ दवाखाना उभारण्यात येत आहे. ?
>>> नांदेड (बिलोली) - सगरोळी
BCCI ने नुकतीच भारतीय संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. ?
>>> चेतन शर्मा
*12). सुगंधाकुमारी यांचे नुकतेच वयाच्या 86 व्या वर्षात निधन झाले आहे. त्या कोण होत्या..?*
>>> कवयित्री
13). कोणता दिवस 'सुशासन दिन म्हणून साजरा करतात. ?
>>> 25 डिसेंबर
14). कोणता दिवस राष्ट्रीय हक्क दिन म्हणून साजरा करतात. ?
>>> 24 डिसेंबर
*15). आंतराष्ट्रीय गीता महोत्सव -2020 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. ?*
>>> कुरुक्षेत्र
16). ADB ने कोणत्या राज्यासाठी 2100 करोड रुपयांचे कर्ज म्हणून मंजूर केले आहे.. ?
>>> त्रिपुरा
17). कोणत्या बँकेने 'infinite India' नावाचे आँनलाईन पोर्टल लाँन्च केले आहे. ?
>>> ICICI बँक
18). धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या " तेल व वायू रिझर्व" चे उद्घाटन केले आहे. ?
>>> पश्चिम बंगाल
19). अंदमान आणि निकोबार चे पोलिस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे. ?
>>> सत्येंद्र गर्ग
20). कोणत्या बँकेने सुरक्षा दलांसोबत मिळून 'बडोदा मिलिट्री सँलरी पँकेज" समझौत्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ?
>>> बँक आँफ वडोदा
महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू नेमका कशासाठी? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले
🔰ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून राज्यात मंगळवारपासून ५ जानेवारीपर्यंत मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. करोना काय फक्त रात्री फिरतो का? असा उपरोधिक सवालही विरोधक विचारत आहे. विरोधकांच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.
🔰राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट झाली होती. नववर्षांच्या सुरुवातीला शाळा-महाविद्यालयांप्रमाणेच सर्वसामान्यांसाठी उपनगरी रेल्वेसेवा सुरू करण्याची तयारी करण्यात येत होती. मात्र, ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने राज्य सरकार अधिक सावध झाले.
🔰मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे रविवारी दुपारी समाजमाध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदी वा रात्रीची संचारबंदीची शक्यता फेटाळली होती. परंतु ब्रिटनमधील करोनाचा नवा प्रकार लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला.
FASTag नसेल तर थर्ड पार्टी विमाही मिळणार नाही
❇️1 जानेवारीपासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. यामुळे फास्टॅग आत प्रत्येक वाहनाला लावावा लागणार आहे.
❇️तसेच जर तुमच्या वाहनाला फास्टॅग नसेल तर तुम्हाला थर्ड पार्टी विमाही काढता येणार नाहीय. एप्रिल, 2021 पासून हा नियम लागू होणार आहे. याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिली आहे.
❇️जानेवारीपासून फास्टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे जुन्या गाड्यांनाही फास्टॅग लावावा लागणार आहे. 2017 पासूनच्या वाहनांना फास्टॅग अनिवार्य होते.
❇️फास्टॅग खरेदी करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसनची फोटो कॉपी, वाहनाचे आरसी बुक लागणार आहे. फोटो आयडीसाठी आधार कार्ड, पासपोर्ट किंवा पॅनकार्ड द्यावे लागणार आहे.
❇️एनएचएआयनुसार तुम्ही फास्टॅग कोणत्याही बँकेकडून खरेदी करू शकतात. यासाठी 200 रुपये घेतले जातात.
❇️फास्टॅगवर कमीत कमी 100 रुपये रिचार्ज करता येणार आहे. सरकारने बँक आणि पेमेंट वॉलेटमधून रिचार्ज करण्य़ासाठी अतिरिक्त चार्ज लावण्यासाठी सूट दिलेली आहे.
जव्हारमध्ये १२ व्या शतकातील आदिवासी संस्कृतीच्या पाऊलखुणा
🎗शरपारख ते नाशिक व शूरपारख ते भरूच या दरम्यान प्राचीन काळी असलेल्या व्यापारी मार्गावर जामसर हे महत्त्वाचे शहर असल्याचे तसेच सहाव्या ते बाराव्या शतकांदरम्यान या भागात आदिवासी लोकसंस्कृतीचे प्रबळ प्रस्थ असल्याचे पुरावे पुरातत्त्व अभ्यासकांना मिळाले आहेत. जामसर तलाव पाणथळ जागा मिळून घोषित करण्यात आली असून जैवविविधतेने नटलेला हा संपूर्ण परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची संधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाली आहे.
🎗परातत्त्व अभ्यासक सदाशिव टेटीवलकर यांनी १९८० च्या सुमारास जामसेर भागास भेट दिली होती. त्यानंतर २०१८ साली ठाणे, जिल्हा वेटलँड समितीने ‘स्येंमंतक’सह या परिसरास भेट दिली तेव्हा विखुरलेले अवशेष निदर्शनास आले. ठाणे जिल्ह्य़ाच्या या जैववैविध्य समितीमध्ये समर्थ परब या अभ्यासकाचादेखील समावेश होता. जैववैविध्य आणि पुरातत्त्व असे दोन्ही विषय त्याच्या अभ्यासाचे असल्याने त्याला या ठिकाणी पाचारण करण्यात आले.
🎗‘‘हे सर्व अवशेष मध्ययुगीन काळातील संस्कृतीचे असल्याचे अभ्यासावरून दिसून आले असून त्या काळात या भागात आदिवासी संस्कृती प्रबळपणे अस्तित्वात असल्याचे प्रकाशझोतात आले आहे. या संशोधनामुळे संस्कृतीमधील टप्प्यांमध्ये सलगता प्रस्थापित झाली असून संस्कृतिबदलाचे पुरावेदेखील पुढे आले आहेत.
Good Governance Day : 25 डिसेंबरला साजरा केला जातो सुशासन दिन, काय आहे कारण?
भारताचे माजी पंतप्रधानअटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी भारतात 'गुड गवर्नेंस डे' अर्थात सुशासन दिन साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो. अटल बिहारी वाजपेयी एक प्रतिभासंपन्न असं व्यक्तिमत्व होतं. त्यांनी भारताचं नाव अनेक क्षेत्रात मोठं केलं.
2014 सालीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी 'गुड गवर्नेंस डे' साजरा करण्याची घोषणा केली होती.
भारत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे की, प्रत्येक वर्षी 25 डिसेंबर रोजी सुशासन दिन साजरा केला जावा. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना कामातून श्रद्धांजली अर्पण केली जावी. या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याची आठवण केली जाते. तसेच अनेक ठिकाणी सेमिनार आणि कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. त्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तित्व आणि कृतित्वाचा परिचय करुन दिला जातो.
2021 च्या सुरुवातीला चांद्रयान-3 मोहिम लाँच होऊ शकते..
◾️ करोनामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-3 मोहिमेला विलंब झाला आहे.
◾️ 2021च्या सुरुवातीला चांद्रयान-3 मोहिम लाँच होऊ शकते.
◾️“2021या वर्षाच्या सुरुवातीला चांद्रयान-3चंद्राच्या दिशेने झेपावेल. चांद्रयान-2 सारखी चांद्रयान-3 मोहिम असेल.
◾️ चांद्रयान-2 प्रमाणे चांद्रयान-3 तीन मोहिमेत लँडर, रोव्हर असेल पण ऑर्बिटर नसेल” केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिली.सध्या चांद्रयान-2 चा ऑर्बिटर चंद्रभोवती भ्रमण करत आहे.
◾️ या ऑर्बिटरच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती वैज्ञानिकांना मिळत आहे.
सीरमने बनविली पहिली स्वदेशी न्यूमोनिया लस
🔶न्यूमोनिया तापाविरोधात सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेली पहिली स्वदेशी बनावटीची लस येत्या आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे.
🔶भारतामध्ये न्यूमोनियामुळे अर्भके मरण पावण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्यासाठी सीरमची स्वदेशी लस वरदान ठरणार आहे.
🔶फायझर व ग्लॅक्सोस्मिथक्लाइन या विदेशी कंपन्यांनी न्यूमोनियावर बनविलेल्या लसी सध्या बाजारात उपलब्ध असून त्यापेक्षा सीरमच्या लसीची किंमत खूपच कमी आहे.
🔶सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या न्यूमोनियावरील स्वदेशी लसीची बाजारपेठेत विक्री करण्यास औषध महानियंत्रकांनी जुलैमध्ये परवानगी दिली होती.
🔶तर या लसीच्या मानवी चाचण्यांचे तीन टप्पे सीरम इन्स्टिट्यूटने भारत तसेच आफ्रिकेतील गाम्बिया या देशात पार पडले होते.
चार राज्यांत पुढील आठवडय़ात करोना लसीकरण सराव फेऱ्या
🔶कोविड-19 लसीकरण मोहिमेसाठी जी यंत्रणा उभारण्यात आली आहे त्याच्या सुसज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारने 28 आणि 29 डिसेंबर रोजी पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये सराव फेऱ्यांचे आयोजन केले आहे.
🔶तसेच लशीच्या वितरणावर देखरेख ठेवण्यासाठीचा ऑनलाइन मंच को-विनमध्ये आवश्यक ती नोंदणी करणे, चाचणीपत्र आणि त्याचे वितरण, पथकातील सदस्य तैनात करणे, सायंकाळच्या बैठका आणि अहवाल यांचा सराव फेऱ्यांमध्ये अंतर्भाव करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे कोविड-19 लशी ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या शीतकरण व्यवस्थेची चाचणी, चाचणीसाठी येणाऱ्या गर्दीचे शारीरिक अंतर ठेवून व्यवस्थापन करणे यांचाही सराव फेऱ्यांमध्ये समावेश करण्यात येणार आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
🔶तर प्रत्येक राज्याने दोन जिल्ह्य़ांत अशा फेऱ्या आयोजित करावयाच्या आहेत. जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण भाग येथे मुख्यत्वे फेऱ्यांचे आयोजन अपेक्षित आहे.
मेघालयमध्ये ‘स्नेकहेड’ माशाची नवी प्रजाती
मेघालयच्या डोंगराळ भागात ‘स्नेकहेड’ या माशाच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. चमकदार रंग आणि सापाप्रमाणे तोंड असणाऱ्या चन्ना कुळातील माशांची संख्या मेघालयात मोठय़ा प्रमाणात असून, या कुळातील नवीन प्रजाती नुकतीच समोर आली आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संशोधक प्रवीणराज जयसिन्हा, अरुमुगम उमा, एन.मौलीथरन, गजेंद्र सिंह, बंकित के. मुखिम आणि तेजस ठाकरे यांच्या चमूने या प्रजातीवर संशोधन केले आहे. नुकतेच अमेरिकन सोसायटी ऑफ इचिथोलॉजिस्ट आणि हर्पेटोलॉजिस्टच्या ‘कोपिया’ या नियतकालिकामध्ये यासंदर्भात शोधनिबंध प्रकाशित झाला.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मेघालयमधील एरिस्टोन रेडॉन्ग्संगी यांनी या प्रजातीचे छायाचित्र जयसिन्हा यांना पाठवले. त्यानंतर त्यांनी आपल्या चमूसह मेघालयाचा दौरा करून या प्रजातीचा अभ्यास केला. गुणसूत्रे, आकारशास्त्राच्या अभ्यासाद्वारे जयसिन्हा यांनी त्यावर जानेवारीमध्ये शोधनिबंध लिहिला. त्यानंतर एक वर्षांने कोपियाने त्यावर शिक्कामोर्तब केले.
एरिस्टोन यांनी ही प्रजाती सर्वप्रथम आमच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे या प्रजातीचे नामकरण ‘चन्ना एरिस्टोनी’ असे करण्यात आल्याचे जयसिन्हा यांनी सांगितले. डोंगराळ भागातील वाहत्या पाण्याच्या प्रवाहांमध्ये हा मासा हमखास सापडतो.
तसेच पाण्यात दगडांच्या सांद्रीमधून त्याचा अधिवास असतो असे त्यांनी नमूद केले. तसेच या माशास वर्षभर थंड पाणी आणि भरपूर ऑक्सिजनची गरज असते.
या माशास चांगली मागणी असते.
महाराष्ट्रात चन्ना कुळातील प्रजाती ‘डाकू’ या नावाने ओळखली जाते, असे जयसिन्हा यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत राज्यातून या प्रजातीचे अस्तित्व जवळपास नामशेष झाले असून, गेल्या वर्षी रत्नागिरीजवळ नोंद झाली होती.
1 जानेवारीपासून सर्व वाहनांना फास्टॅग अनिवार्य
नवीन वर्षात 1 जानेवारी 2021 पासून देशात सर्व प्रकाराच्या नवीन अथवा जुन्या सर्व वाहनांना फास्टॅग लावणे अनिवार्य करण्यात येणार आहे. या निर्णयाची येत्या दि. 1 जानेवारी, 2021 पासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
केंद्रीय सरकारच्या रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्रालयाने फास्टॅगच्या आवश्यकतेसंदर्भात घोषणा केली असून ‘केंद्रीय मोटार वाहन नियम-1989’ यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.
फास्टॅग सुविधा
‘फास्टॅग’ सुविधेच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल संकलित करण्यात येत आहे. फास्टॅग - इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (ETC) योजनेच्या अंतर्गत ही सुविधा अंमलात आणली जात आहे. फास्टॅग ऑनलाइन रिचार्ज केले जाऊ शकते.
रेडिओ-फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानावर ही सुविधा चालते. गाडीच्या वाहकाला ऑनलाइन पद्धतीने ‘फास्टॅग’चे टॅग मिळते. त्याच्या खात्यात वाहक काही रक्कम टाकणार. नाक्यावरचे टॅग रीडर प्रत्येक वेळी वाहकाने वाहनावर चिपकवलेले टॅग वाचणार आणि त्यातून टोल रक्कम वजा होणार.
देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवर हा प्रकल्प भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) राबवित आहे.
स्वयंचलित पद्धतीने तात्काळ होणारा व्यवहार वाहनांच्या दळणवळणाला गती देणार. त्यामुळे वाहनांच्या रांगा नाक्यावर दिसणार नाहीत. उभ्या अवस्थेत असलेल्या चालू गाड्यांमुळे वायफळ जाणार्या इंधनाची बचत होण्यास मदत मिळणार.
देवनागरीत मुद्रित झालेला जगातील पहिला ग्रंथ मिरजेत!
देवनागरी लिपीमध्ये मुद्रित झालेला जगातील पहिला ग्रंथ आणि जगातील पहिली मुद्रित भगवद्गीता मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात समाविष्ट झाली आहे.
इसवीसन १८०५ मध्ये छपाई झालेल्या या भगवद्गीतेनंतरच देवनागरीमध्ये ग्रंथ छपाईची परंपरा सुरू झाली. इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांच्या संग्रहात असलेल्या या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील संशोधक मिरजेस भेट देत आहेत.
कुरूक्षेत्रावर झालेल्या कौरव-पांडव युद्धावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले तत्त्वज्ञान म्हणजे गीता हा ग्रंथ. श्रीकृष्णाने गीतेतून अर्जुनाला केलेले हे उपदेश आजच्या जगालाही तेवढेच लागू आहेत, असे मानले जाते. त्यामुळेच शेकडो वर्षांनंतरही भगवद्गीता या ग्रंथाचा प्रभाव भारतीय समाजावर तर दिसतोच, पण या ग्रंथातील या तत्त्वज्ञानाचा शोध घेत अनेक परदेशी अभ्यासकही भारताकडे आकर्षित होत असतात.
यातील अनेकजण या महाकाव्याचा आणि त्यानिमित्ताने त्याच्या पहिल्या मुद्रित प्रतीचा शोध घेत अगदी मिरजेतही दाखल होतात. आज, २५डिसेंबरच्या गीता जयंतीनिमित्त हा ग्रंथ पाहण्यास खुला ठेवला आहे.
देवनागरीमध्ये छपाई सुरू होण्यापूर्वी गीतेच्या हस्तलिखित प्रती काढण्यात येत होत्या. परंतु या पद्धतीत प्रती तयार करण्यावर मर्यादा होत्या.
त्यामुळे हा ग्रंथ सामान्यांना सहजप्राप्त होत नव्हता. ब्रिटिशांच्या आगमनानंतर मुद्रणकलेला प्रारंभ झाला. मात्र सुरुवातीस देवनागरीतील ही छपाई रोमन लिपीमध्ये केली जात होती.
इसवीसन १८०५ मध्ये बंगालमध्ये श्रीरामपूर येथे विल्यम कॅरे याने देवनागरी लिपीमध्ये ‘ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज’ प्रसिद्ध केले होते.
याच वर्षी पुणे येथे सवाई माधवरावांच्या दरबारात असलेला इंग्रज वकील चार्लस् मॅलेट याने येथील एका तांबट कारागिराला तांब्याच्या पत्र्यावर मुद्रण करण्यास शिकविले. त्याच्याकडून त्याचवर्षी देवनागरी लिपीतून छपाईस प्रारंभ होणार होता.
हे समजल्यावर या कारागिराला मिरजेचे तत्कालीन संस्थानिक गंगाधरराव पटवर्धन उर्फ पहिले बाळासाहेब यांनी मिरजेत बोलावून घेतले. त्याच्याकडून देवनागरीतील पहिला मुद्रित ग्रंथ म्हणून भगवद्गीतेची छपाई करवून घेतली. एकप्रकारे १८०५ मध्येच छपाई झालेला हा ग्रंथही देवनागरीतील पहिला मुद्रित ग्रंथ ठरला.
१६६ पृष्ठांची गीता
या ग्रंथासाठी प्रथम तांब्याच्या पत्र्यावर भगवद्गीता कोरण्यात आली. या ठशांच्या आधारे पुढे छपाई करत या भगवद्गीतेच्या काही प्रती मुद्रित करून घेण्यात आल्या. या प्रथम मुद्रित प्रतीमधील एक प्रत मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात आहे.
१६६ पृष्ठांच्या या भगवद्गीता ग्रंथाच्या शेवटी मुद्रणस्थळ, काळाचा उल्लेख केला आहे. यामध्ये मिरजेचा उल्लेख ‘मरकडेय मुनीक्षेत्रे’ असा तर काळाचा उल्लेख ‘शके १७२७, क्रोधननाम संवत्सरे’ असा आलेला आहे.
Latest post
ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.
१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...
-
✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ? 👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये ) ✏️ मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 👉 360 ग्रॅम...
-
१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४ - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...
-
📖 MPSC Maths Marathi🌷: ⚫️ वर्तुळ ⚫️ 1. त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्या ...