२५ डिसेंबर २०२०

Online test Series

वय (वयवारी)


🏮🏮🏮 परकार पहिला 🏮🏮🏮


📍नमूना पहिला –

उदा.👁

अश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षापूर्वी अश्विनचे वय 11 वर्षे होते ; तर 5 वर्षांनंतर अश्विन व राणी यांच्या वयातील फरक किती?


1) 15 वर्षे 2)10 वर्षे 3)5 वर्ष 4) 20 वर्षे


उत्तर : 5 वर्षे

स्पष्टीकरण :-

वय वाढले तरी दोघांच्या वयांतील फरक तेवढाच राहतो.

अश्विन राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा म्हणजे फरक 5 वर्षेच राहील.

 

📍नमूना दूसरा –

उदा.👁

जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 49 वर्षे असल्यास जान्हवीच्या आईचे वय किती ?


1)11 वर्षे   2 )36 वर्षे  3)  34 वर्षे  4) 38 वर्षे


उत्तर : 38 वर्षे

क्लृप्ती :-

दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज+दोन संख्यातील फरक)÷2

(49+27) ÷ 2 = 38

लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2 (49-27) ÷ 2 = 11

 

🏮नमूना तिसरा –

उदा.👁

रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयांतील फरक 16 वर्षे असल्यास; त्या दोघांच्या वयांची बेरीज किती?


1) 24 वर्षे  2) 32 वर्षे

3) 40 वर्षे   4) 48 वर्षे


उत्तर : 32 वर्षे

स्पष्टीकरण :-

राम व हरीच्या वयांचे प्रमाण = 3x : x    

दोघांच्या वयांची बेरीज = 3x + x = 4x

फरक = 3 x – x = 2x =16,   

:: x=8

:: 4x = 4×8 = 32

 

👁 नमूना चौथा –

उदा.🌷

अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे व अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे. सुरेशचे वय 10 वर्षे असल्यास अजयचे वय किती?

21 वर्षे

23 वर्षे

15 वर्षे

28 वर्षे

उत्तर : 21 वर्षे

स्पष्टीकरण :-

सुरेशचे वय = 10 वर्षे, म्हणून अशोकचे वय = 2x-5= 20 -5 = 15 वर्षे,

:: अशोकचे वय = 15 वर्षे यानुसार अजयचे वय x मानल्यास     

x/3+8=15 म्हणून x/3=7, :

: x=21




🏮🏮🏮 परकार दूसरा🏮🏮🏮

नमूना पहिला –

उदा.

सीता व गीता यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 6:5 आहे. दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते, तर सीताचे आजचे वय किती?

10 वर्षे

12 वर्षे

15 वर्षे

18 वर्षे

उत्तर : 12 वर्षे

स्पष्टीकरण :-

    सीता     :    गीता

आजचे वय      6x     :     5x

दोन वर्षापूर्वीचे (6x-2)2    :     (5x-2)

 

6x-2/5x-2 = 5/4b

:: 4(6x-2) =5(5x-2)    24x-8=25x-10     :: x=2

:: सीताचे आजचे वय = 6x = 6×2=12 वर्षे

 

📍नमूना दूसरा –

उदा.👈

मुलगी व आई यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांचे गुणोत्तर 1:5 होते, परंतु 5 वर्षांनंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 2:5 होईल, तर मुलीचे आजचे वय किती?

6 वर्षे

10 वर्षे

35 वर्षे

11 वर्षे

उत्तर : 11 वर्षे

स्पष्टीकरण :-

                         मुलगी    :    आई

5 वर्षांपूर्वी                 1      :     5            

आजचे वयांचे                         

गुणोत्तर               (x+5)    :    (5x+5)            

5 वर्षांनंतर                         

वयांचे गुणोत्तर        (x+10)   :    (5x+10)

        

x+10/5x+10 = 2/5

:: 5(x+10) = 2(5x+10)

5x=50=10x+20

5x=30

:: x=6

मुलीचे आजचे वय = x+5     

:: 6+5 = 11 वर्षे

 

🛑 नमूना तिसरा –

उदा.👁 

मुलगा, आई, वडील यांची आजची वये अनुक्रमे 10 वर्षे, 30 वर्षे व 40 वर्षे आहेत, तर किती वर्षांनी त्यांची वये 3:7:9 या प्रमाणात होतील ?

10

6

3

5

उत्तर : 5

स्पष्टीकरण:

3+7+9=19 भाग,  उदाहरणाप्रमाणे (10+30+49) = 80     

80+3x/19 =19×5 = 95  

85 – 80 = 15,

3x=15     

:: x=5

काळ ,काम & वेग पायाभुत संकल्पनांसह सोडवलेली उदाहरणे "आपणही सोडवुन पाहावीत"


(पायाभुत संकल्पनांसह सोडवलेली उदाहरणे "आपणही सोडवुन पाहावीत")


   🚇🏃🚴‍♀

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

     ✍️मजा निर्मळ (STI)

     👉9595805222

〰️〰️〰️🔥〰️〰️〰️🔥〰️〰️〰️〰️


🚀 ‘काळ’ म्हणजे काम करण्यासाठी लागणारा वेळ . काळ आणि काम यांचे ‘सम प्रमाण’ असते. कारण कमी वेळ काम केले तर कमी काम होईल. जास्त वेळ काम केले तर जास्त काम होईल.


🚀 वग म्हणजे काम करण्याची गती. वेळ आणि वेग यांचे ‘व्यस्त प्रमाण’ असते. म्हणजे काम करण्याचा वेग वाढविला तर काम कमी वेळेत पूर्ण होते. उलट वेग कमी केला तर जास्त वेळ लागेल.


         ❤️ IMP points ❤️


1)    काळ व काम : एखादे काम पूर्ण करण्यास लागणारा काळ (वेळ) ते काम करीत असलेल्या व्यक्तींच्या संख्येवर अवलंबून असतो. 


2)    काम आणि लागणारा काळ (वेळ) हे सम चलनात असते.


3)    काम करणाऱ्या संख्या व लागणारा काळ (वेळ) हे व्यस्त चलनात असते.


4)    काळ, अंतर व वेग (सूत्र) : अंतर = वेग x वेळ


https://telegram.me/Rajmargbymunjanirmal


🚨 सोडवून दाखविलेली उदाहरणे 🚨


1) 3 कागद टाईप करावयास 40 मिनिटे लागली, तर 12 कागद टाईप करावयास किती वेळ लागेल?


1) 2 तास 40 मिनिटे 

2) 2 तास 30 मिनिटे 

3) 3 तास 

4) 3 तास 20 मिनिटे


स्पष्टीकरण


टाईप करावयाचे कागद वाढले म्हणून त्यासाठी जास्त वेळ लागणार.


3 कागदांना 40 मिनिटे


12 कागदांना 160 मिनिटे = 2 तास 40 मिनिटे


काम चौपट वेळ चौपट ( सम प्रमाण) पर्याय क्र. 1 हे उत्तर✅


2) एका मजुराने 8 खड्डे दोन तासांत खोदले, तर आणखी दोन खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल?


1) 35 मिनिटे 2) 30 मिनिटे 3) 25 मिनिटे 4) 40 मिनिटे


स्पष्टीकरण – 8 खड्डे तयार करण्यास 2 तास 120 मिनिटे


दोन खड्डे तयार करण्यास 30 मिनिटे


काम कमी वेळ कमी ( सम प्रमाण ) पर्याय क्र. 2 हे उत्तर✅


3) एक मजूर एक काम 12 दिवसांत पूर्ण करतो, तर तो एका दिवसात किती काम करील?


1) 1/3 2) 1/6 3) 1/8 4) 1/12


स्पष्टीकरण


मजुराला काम पूर्ण करण्यास 12 दिवस लागतात.


म्हणजे एका दिवसात तो कामाचा 12 वा भाग किंवा 1/12 भाग तयार करतो.


:. पर्याय क्र. 4 हे उत्तर✅


4) एक मजूर एक काम 12 दिवसांत पूर्ण करतो, तर 4 दिवसांत तो किती काम करील?


1) ¼ 2) 1/3 3) 1/6 4) 1/12


स्पष्टीकरण


संपूर्ण कामाला 12 दिवस लागतात.


म्हणून 1 दिवसाचे काम 1/12 आणि 4 दिवसांचे काम 4/12 = 1/3


:. पर्याय क्र. 2 हे उत्तर✅


5) 2 माणसे एक काम 6 दिवसांत करतात, तर तेच काम 4 माणसे किती दिवसांत करतील?


1) 3 दिवस 2) 4 दिवस 3) 2 दिवस 4) 5 दिवस


स्पष्टीकरण


माणसे वाढली तर काम कमी दिवसांत पूर्ण होईल म्हणून हे ‘व्यस्त प्रमाण’


आहे .


2 माणसांना 6 दिवस लागतात.


4 माणसांना 3 दिवस लागतात.


माणसे दुप्पट झाली म्हणून दिवस निमपट लागणार. :. पर्याय क्र. 1 हे उत्तर✅


https://telegram.me/Rajmargbymunjanirmal


6) घर बांधण्याचे काम 12 सुतार 8 दिवसांत करतात. जर 4 सुतार वाढले तर ते काम किती दिवसांत पूर्ण होईल?


1) 3 दिवस 2) 4 दिवस 3) 5 दिवस 4) 6 दिवस


स्पष्टीकरण


4 सुतार वाढविले म्हणजे 12+ 4 = 16 झाले.


सुतारांचे गुणोत्तर 12/16 , दिवसांचे गुणोत्तर 8/ क्ष चा व्यस्त क्ष /8


12/16 = क्ष /8 तिरकस गुणाकाराने 12 x 8 = 16 x क्ष


16 क्ष = 12 x 8


:. क्ष = 6 :. पर्याय क्र. 4 हे उत्तर✅


7) एक भिंत बांधण्यास 6 गवंड्यांना 14 दिवस लागतात. काही कारणामुळे त्यांपैकी 2 गवंडी निघून गेले, तर बाकीचे गवंडी ते काम किती दिवसांत पूर्ण करतील?


1) 20 दिवस 2) 21 दिवस 3) 22 दिवस 4) 24 दिवस


स्पष्टीकरण


6 गवंडी – 2 गवंडी = 4 गवंडी राहिले.


6 गवंड्यांना 14 दिवस लागतात.


4 गवंड्यांना क्ष दिवस लागतील.


6/4 = क्ष /14 तिरकस गुणाकाराने 6 x 14 = 4 क्ष


4 क्ष = 84


:. क्ष = 21 दिवस :. पर्याय क्र. 2 हे उत्तर✅


8) 100 मीटर लांबीची एक आगगाडी एका खांबास 9 सेकंदांत ओलांडते, तर गाडीचा दर ताशी वेग काय ?


1) 50 कि.मी. 2) 45 कि.मी. 3) 40 कि.मी. 4) 36 कि.मी.


स्पष्टीकरण


आगगाडी एका खांबास ओलांडते म्हणजे स्वतःच्या लांबीइतके अंतर तोडते . आगगाडी 9 सेकंदात 100 मीटर जाते तर 3,600 सेकंदात किती जाईल?


3,600 x 100/9 = 40,000 मीटर.


40,000 मीटर ÷ 1,000 = 40 किलोमीटर :. पर्याय क्र. 3 हे उत्तर✅


9) 150 मीटर लांबीची आगगाडी 250 मीटर लांबीच्या पुलास ओलांडून जाते. गाडीचा वेग दर ताशी 40 किलोमीटर असेल, तर पूल ओलांडण्यास गाडीला किती वेळ लागेल?


1) 200 सेकंद 2) 300 सेकंद 3) 32 सेकंद 4) 36 सेकंद


स्पष्टीकरण


आगगाडीस तोडावयाचे एकूण अंतर =


स्वतःची लांबी 150 मीटर + पूलाची लांबी 250 मीटर = एकूण 400 मीटर


गाडीचा वेग दर ताशी 40 किलोमीटर आहे.


40 किलोमीटर जाण्यास गाडीला 3,600 सेकंद लागतात.


1 किलोमीटर जाण्यास 3,600सेकंद ÷ 40 = 90 सेकंद लागतील.


400 मीटर म्हणजे 0.4 किलोमीटर जाण्यास


90 x 0.4 = 36 सेकंद लागतील. :. पर्याय क्र. 4 हे उत्तर✅


10) ताशी 24 किलोमीटर वेगाने गेल्यास एका


भावी अधिकारी®, [14.06.17 08:30]

गावी पोहोचण्यास 2 तास 30 मिनिटे लागतात, तर ताशी 30 कि.मी. वेगाने गेल्यास किती वेळ लागेल?


1) 2 तास 2) 2 तास 10 मिनिटे 3) 1 तास 35 मिनिटे 4) 1 तास 45 मिनिटे


स्पष्टीकरण


24 किलोमीटर वेगाने 150 मिनिटे लागतात.


30 किलोमीटर वेगाने किती मिनिटे लागतील?


वेग वाढल्याने वेळ कमी लागेल. ( व्यस्त प्रमाण)


वेगाचे गुणोत्तर 24/30, वेळेचे गुणोत्तर 150 / क्ष चा व्यस्त क्ष/ 150


24/30 = क्ष /150 तिरकस गुणाकाराने 24 x 150 = 30 क्ष


30 क्ष = 24 x 150


:. क्ष = 120 मिनिटे = 2 तास :. पर्याय क्र. 1 हे उत्तर✅

〰️〰️〰️〰️〰️👇👇〰️〰️〰️〰️〰️

https://telegram.me/Rajmargbymunjanirmal

〰️〰️〰️〰️👆👆👆👆〰️〰️〰️〰️

11) ताशी 48 कि.मी. वेगाने जाणारी एक आगगाडी एका खांबास 18 सेकंदांत ओलांडते , तर त्या आगगाडीची लांबी किती असावी?


1) 235 मीटर 2) 240 मीटर 3) 200 मीटर 4) 242 मीटर


स्पष्टीकरण


आगगाडीची लांबी म्हणजे तिने 18 सेकंदांत तोडलेले अंतर


आगगाडीचा ताशी वेग 48 कि.मी.


3,600 सेकंदांत 48,000 मीटर


36 सेकंदांत 480 मीटर


18 सेकंदात 240 मीटर


:. आगगाडीची लांबी = 240 मीटर :. पर्याय क्र. 2 हे उत्तर✅


12) जे काम ‘अ’ 60 दिवसांत करतो तेच काम एकटा ‘ब’ 40 दिवसांत करतो, तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसांत करतील?


1) 22 दिवस 2) 42 दिवस 3) 24 दिवस 4) 27 दिवस


स्पष्टीकरण

एकटा ‘अ’ 60 दिवसांत काम करतो.

त्याचे 1दिवसाचे काम 1/60

एकटा ‘ब’ 40 दिवसांत काम करतो.

त्याचे 1 दिवसाचे काम 1/40

‘अ’ आणि ‘ब’ दोघांचे 1 दिवसाचे काम

1/60 + 1/40 = 5 / 120 = 1/24

‘अ’ आणि ‘ब’ दोघांचे 1 दिवसाचे काम 1/24

म्हणजेच त्या दोघांना ते काम करण्यास 24 दिवस लागतील.

:. पर्याय क्र. 3 हे उत्तर✅


13) रस्ता तयार करण्याचे एक काम 60 मजूर रोज 6 तास काम करून 56 दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम 40 मजूर रोज 7 तासांप्रमाणे काम करून किती दिवसांत संपवतील?


1) 72 दिवस 2) 70 दिवस 3) 75 दिवस 4) 80 दिवस


स्पष्टीकरण


60 मजूरांना 56 दिवस लागतात.

60 x 56 = 40 x (व्यस्त प्रमाण )

40x = 3,360

:. x = 84

40 मजूरांना रोज 6 तासांप्रमाणे 84 दिवस लागतील.

6 x 84 = 7x (व्यस्त प्रमाण )

7x = 504

:. x = 72

7 तासांप्रमाणे 72 दिवस लागतील . पर्याय क्र. 1 हे उत्तर✅



14) ताशी 40 कि.मी. वेगाने जाणार्‍या 380 मीटर लांबीच्या आगगाडीला त्याच दिशेला ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी 320 मीटर लांबीची आगगाडी किती वेळात ओलांडील?


1) 9 मिनिटे 2) 7 मिनिटे 3) 2 मिनिटे 4) 3 मिनिटे


स्पष्टीकरण

एका आगगाडीने दुसर्‍या आगगाडीस ओलांडून जाण्यासाठी तोडावयाचे अंतर=

380 मीटर + 320 मीटर = 700 मीटर

दोन्ही आगगाड्यांची जाण्याची दिशा एकच असल्यामुळे तोडावयाचे अंतर दोन्हींच्या वेगांच्या वजाबाकीने म्हणजे ताशी

(54 – 40 ) 14 कि.मी. वेगाने तोडले जाईल.

14,000 मीटर अंतर तोडण्यास 60 मिनिटे लागतील.

1,400 मीटर अंतर तोडण्यास 6 मिनिटे लागतील

700 मीटर अंतर तोडण्यास 3 मिनिटे :. पर्याय क्र. 4 हे उत्तर✅



15) एका हौदात एका नळातून पाणी सोडले असता तो भरण्यास पाच तास लागतात.


त्या हौंदातील पाणी सोडण्यास दोन तोट्या आहेत; त्यापैकी कोणतीही एक तोटी सोडली तर 20 तासांत हौद रिकामा होतो. जर हा नळ आणि या दोन तोट्या एकाच वेळी सोडल्या तर तो हौद भरण्यास किती वेळ लागेल?


स्पष्टीकरण

नळामुळे हौद पाच तासात पूर्ण भरतो.

:. तो हौद एका तासांत 1/5 इतका भरतो.

एका तोटीमुळे तो 20 तासांत रिकामा होतो.

:. एका तासात तो 1/20 इतका रिकामा होतो.

:. दोन तोट्या वापरल्यास एका तासात तो 2/20 किंवा 1/10 इतका रिकामा होईल.

आता नळ व दोन्ही तोट्या एकाच वेळी सोडल्यासतो हौद 1 तासात 1/5 भरला जाईल आणि 1/10 इतका रिकामा होईल. एका तासात तो 1/5 – 1/10 इतका भरेल.

1/5 = 2/10 :. 2/10 – 1/10 = 1/10

:. एका तासात हौद 1/10 इतका भरेल .

म्हणजेच हौद भरण्यास 10 तास लागतील. :. पर्याय क्र. 3 हे उत्तर✅



वेग , वेळ आणि अंतर गणित उदाहरण





🚨नमूना पहिला 🚨–


उदा.

300 मीटर लांबीच्या ताशी 72 कि.मी. वेगाने जाणार्‍या आगगाडीच्या एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?


45 से.

15 से.

25 से

.35 से. 


उत्तर : 15 से.


क्लृप्ती :-


एका तासाचे सेकंद = 3600 व 1 कि.मी. = 1000 मी. 3600/1000=18/5, या आधारे वेग व वेळ काढताना 18/5 ने गुणा व अंतर काढताना 5/18 ने गुणा.  


खांब ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5 ∶:  300/72×18/5=15 सेकंद


🚨नमूना दूसरा –🚨


उदा.


ताशी 40 कि.मी. वेगाने जाणार्याल 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?


1मि. 12से.

1मि. 25से.

36से

.1मि. 10से. 


उत्तर : 1मि. 12से.


क्लृप्ती :-


एकूण कापावयाचे अंतर = गाडीची लांबी + पूलाची लांबी = 400+400 =800 मि.

पूल ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी + पूलाची लांबी/ताशी वेग × 18/5


🚨नमूना तिसरा –🚨


उदा.


ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेंकदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?


540मी.

 162मी. 

270मी. 

280मी. 


उत्तर : 270 मी.


सूत्र :-


गाडीची लांबी = वेग × वेळ × 5/18 = 54×18×5/18 = 270 मी.


🔴नमूना चौथा 🔴–


उदा.


800 मी. अंतर 72 सेकंदात ओलांडण्यार्‍या गाडीचा ताशी वेग किती कि.मी. ?


54 कि.मी.

40 कि.मी.

  50 कि.मी.

60 कि.मी. 


उत्तर : 40 कि.मी.  


क्लृप्ती :-


वेग = अंतर/वेळ ×18/5 = 800/72 × 18/5 = 40     

(वेग काढताना 18/5 ने गुणणे)




🔴नमूना पाचवा 🔴–


उदा.


मुंबईला नागपूरला जाणार्‍या दोन गाड्यांपैकी ताशी 60 कि.मी. वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7.30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 कि.मी. वेगाने सकाळी 8.30 वाजता सुटली, तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील?


दु.12 वा.

12.30 वा.

1.30 वा.

11.30 वा. 


उत्तर : 12.30 वा.


क्लृप्ती :-


भेटण्यास दुसर्‍या गाडीला लागणारा वेळ

= वेळेतील फरक × पहिल्या गाडी चा/वेगातील फरक = 1 तास×60/75-60 = 60/15 = 4 तास


🔴नमूना सहावा –🔴


उदा.


मुंबई ते गोवा हे 540 कि.मी. अंतर. मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणार्याा गाडीची त्याचवेळी गोव्याहून सटलेल्या ताशी 75 कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?


दु.12.30वा.

दु.12वा.

दु.1.30वा.

दु.1वा. 


उत्तर : दु.12.30वा.


क्लृप्ती :-


लागणारा वेळ = एकूण अंतर/दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज


🚨नमूना सातवा 🚨–


उदा.


ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?


300 कि.मी.

240 कि.मी.

210 कि.मी.

270 कि.मी. 


उत्तर : 240 कि.मी.


स्पष्टीकरण :-


60 व 75 चा लसावी = 300

300 ÷ 60 = 5 तास     :: 60 मिनिटे फरक = 60×5=300 कि.मी.

300 ÷ 75 = 4 तास     :: 48 मिनिटे फरक = 4×60 = 240 कि.मी.

〰️〰️〰️〰️〰️〰️🚨🚨〰️〰️〰️〰️

विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना



🔶राजश्री योजना : राजस्थान 


🔶 कन्याश्री योजना : पश्चिम बंगाल 


🔶 भाग्यलक्ष्मी योजना : कर्नाटक


🔶 लाडली लक्ष्मी योजना : मध्य प्रदेश 


🔶 लाडली : दिल्ली व हरियाणा


🔶 मख्यमंत्री लाडली योजना : उत्तर प्रदेश 


🔶 मख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना : बिहार


🔶 किशोरी शक्ति योजना : ओडिशा 


🔶 ममता योजना : गोवा 


🔶सरस्वती योजना : छत्तीसगढ


🔶 माझी कन्या भाग्यश्री योजना : महाराष्ट्र


🔶 नदा देवी कन्या योजना : उत्तराखंड .

रिलायन्स उभारणार जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय; जागा, नाव आणि कधी सुरु होणार हे ही ठरलं.


🔥कापड, टेलिकॉमबरोबरच अनेक श्रेत्रांमध्ये असणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आता गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय उभारणार आहे. हे प्राणी संग्रहालय गुजरातमधील जामनगर येथे उभारण्यात येणार आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.


🔥रिलायन्सच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या प्राणीसंग्रहालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी तसेच सपरटणारे प्राणीही पर्यटकांना पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील वेगेगवेळ्या भागांमधील प्राणी या संग्रहालयामध्ये असतील असं सांगण्यात आलं आहे.


🔥ह प्राणीसंग्रहालय २८० एअर परिसरावर निर्माण केलं जाणार आहे. जामनगरमधील मोती खावेडी येथे रिलायन्सचा रिफायनरी प्रोजेक्ट आहे. या ठिकाणापासूनच जवळच हे प्राणीसंग्रहालय उभारलं जाणार आहे. रिलायन्सचा हा रिफायनरी प्रोजेक्ट जगातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. येथून रिलायन्स समुहाचा पेट्रोकेमिकल्समधील सर्व व्यवसाय चालतो.

रशियात पुतीन सरकारचा नवा कायदा.


🥀रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एका विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचं कायद्यामध्ये रुपांतर झालं आहे.


🥀तर या नवीन कायद्यामुळे राष्ट्राध्यक्ष पदाचा त्याग केल्यानंतरही राष्ट्रध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीविरोधात कोणत्याच प्रकारचा कायदेशीर खटला दाखल करता येणार नाही. म्हणजेच एकदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्या व्यक्तीला कायदेशीर खटल्यांपासून मरेपर्यंत संरक्षण मिळणार आहे.


🥀तसेच या कायद्यासंदर्भातील माहिती मंगळवारी ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात आली. या कायद्यामुळे राष्ट्राध्यक्ष पदावर असणाऱ्या व्यक्तीने किंवा त्यांच्या कुटुंबियांनी या कालावमध्ये केलेल्या गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यात आलं आहे.


🥀तर या व्यक्तींविरोधात या नवीन कायद्यानुसार कोणताही न्यायालयीन खटला चालवता येणार नाही. केवल खटल्यापासून मुक्ती नाही तर माजी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबियांची कोणत्याही प्रकारची चौकशी करण्याचा हक्क पोलीस किंवा इतर तपास यंत्रणांना असणार नाही अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे.

‘एमपीएससी’ परीक्षार्थीना दिलासा

 राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा तब्बल चार वेळा स्थगित करून पुन्हा काही महिन्यांनी घेण्यात येणार असली तरी ‘चालू घडामोडी’ या महत्त्वाच्या विषयाच्या अभ्याक्रमात कुठलाही बदल होणार नसल्याची खात्रीशीर माहिती आयोगातील एका मोठय़ा अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे पुढे होणाऱ्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मार्च २०२० पर्यंतच्या ‘चालू घडामोडीं’वरच प्रश्न येणार हे स्पष्ट झाले आहे.

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम हा अवांतर विषयांवर असला तरी आयोग विविध विषयांचा अभ्यासक्रम निश्चित करून देतो. यातील बहुतांश विषयांमध्ये फारसा बदल होत नसला तरी ‘चालू घडामोडी’ हा दैनंदिन विषय असल्याने त्यात बदल अपेक्षित असतो. त्यामुळे आयोग ‘चालू घडामोडीं’साठी परीक्षेच्या तारखेनुसार एक निश्चित कालमर्यादा ठरवून देत असते. त्यामुळे विद्यार्थी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यासही परीक्षेच्या तारेखा अंदाज घेऊन करीत असतात. मात्र, यंदा मार्च महिन्यापासून लागलेली टाळेबंदी व अन्य कारणांनी आयोगाने पूर्व परीक्षा तब्बल चारदा स्थगित केली. ११ ऑक्टोबरला होणारी परीक्षा अगदी तोंडावर आली आली असताना मुख्यमंत्र्यांनी ९ ऑक्टोबरला मराठा आंदोलनाचा धसका घेत परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. याला दोन महिने लोटूनही परीक्षेच्या नवीन तारखेबाबत अद्यापही निश्चिती नाही. परीक्षेची मूळ तारीख आणि आताच्या कालावधीमध्ये तब्बल दहा महिन्यांचा कालावधी लोटून गेल्याने पुढील काही महिन्यात होणाऱ्या परीक्षेमध्ये विशेषत: ‘चालू घडामोडी’ विषयाच्या अभ्यासक्रमात बदल होणार की जुन्याच तारखेच्या आधारावर अभ्यासक्रम राहणार, असा प्रश्न परीक्षार्थीसमोर होता. ‘चालू घडामोडी’ हा विषयच वारंवार बदलणारा असल्याने आयोग अभ्यासक्रम बदल करणार, अशीही चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होती. या सर्वाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही होत होता. मात्र, परीक्षांच्या तारखा बदलल्या तरी अभ्यासक्रमात कुठलाही बदल होणार नसून चालू घडामोडींसाठी मार्च २०२० पर्यंतचाच अभ्याक्रम दिला जाणार असल्याची माहिती आयोगातील एका अधिकाऱ्याने दिली. याशिवाय परीक्षेची तारीखही लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती आहे.

नव्या प्रश्नपत्रिका काढणे कठीण

करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आयोगाने यंदा परीक्षा केंद्रांमध्ये वाढ केली. राज्यात तब्बल ७६१ केंद्रांवर परीक्षा होणार होती. सर्व जिल्हा केंद्रांवर प्रश्नपत्रिका आताही सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या प्रश्नपत्रिका आयोगाने अद्यापही परत बोलावल्या नसल्याने याच प्रश्नपत्रिकांवर परीक्षा होणार आहे. शिवाय नव्याने प्रश्नपत्रिका काढणे कठीण असल्याने अभ्यासक्रमात कुठलाही बदल करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

ठाकरे सरकारकडून रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा.


📜ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा दिला आहे. रेस्तराँ आणि बार चालकांच्या परवाना शुल्कात राज्य सरकारने ५० टक्क्यांची कपात केली आहे. करोना आणि लॉकडाउनच्या काळात इतर सर्व क्षेत्रांप्रमाणेच लिकर इंडस्ट्रीला मोठा फटका बसला होता.


📜कोविड काळात लॉकडाउन असताना राज्यातील परवानाधारक मद्यविक्रीची दुकानं बंद होती. त्यामुळे या बंद असलेल्या दुकानांच्या परवाना शुल्कात सूट देण्याची मागणी करण्यात आली होती. जी मान्य करण्यात आली आहे. ज्यांनी आधीच परवाना शुल्काची रक्कम भरली आहे त्यांना ती पुढील आर्थिक वर्षात दिली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे .


📜लॉकडाउनमधून सूट देत असताना म्हणजेच अनलॉकमध्ये जात असताना ठाकरे सरकारने मंदिरांच्या आधी बार सुरु केले, दारु दुकानांना संमती दिली आणि दारु परवान्यांच्या शुल्कात ५० टक्के सूट देण्यात आली आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे समाजातले इतरही घटकही त्रस्त झाले आहेत. वारंवार मागण्या करुनही त्यांना दिलासा मिळत नाही.


📜मग हे सरकार दारुवाल्यांवर मेहरबान का? का दारुवाले या सरकारमधल्या काही मंत्र्यांवर मेहरबान आहेत? असा प्रश्न विचारत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या निर्णयावर टीका केली आहे. सामान्य माणूस भरमसाठ वीज बिलात सवलत मागत होता. त्यासाठी रस्त्यावरही उतरला तरीही या सरकारने सूट दिली नाही. घरपट्टी, पाणीपट्टी असेल कशातच सामान्य माणसांना दिलासा दिला नाही. मग दारुवाल्यांनाच दिलासा का? दारुवाल्यांचं भलं करणं हाच या सरकारचा किमान समान कार्यक्रम आहे का? असाही प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

मराठा समाजाला EWS चा लाभ, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय.


🔓मराठा समाजाला EWS चा लाभ देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजासाठी महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.


🔓तयानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.


🔓मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थी आणि उमेदवारांची होणारी फरफट लक्षात घेऊन ठोस पाऊल टाकण्यात आलं आहे.


🔓एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरती यासाठी होण्याकरता ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मराठा समाजासाठी हा खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...