२४ डिसेंबर २०२०

आयपीलमध्ये आता ‘दस का दम’; दोन नव्या संघांना मंजुरी

‘आयपीएल’मध्ये नवीन दोन संघांचा समावेश करण्यात आला आहे. २०२२ च्या हंगामात आयपीएलचे एकूण दहा संघ असतील. गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ८९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय प्रथम श्रेणीच्या सर्व खेळाडूंना (महिला आणि पुरुष ) करोना महामारीमुळे सामने न होऊ शकल्यामुळे योग्य तो मोबदला देण्यावरही एकमत झालं आहे. २०२८च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबतही या सभेमध्ये निर्णय झाला.

‘‘२०२१मध्ये ‘आयपीएल’चे संघ वाढवणे अतिशय घाईचे ठरेल. निविदा प्रक्रिया, खेळाडूंचा लिलाव, आदी प्रक्रिया इतक्या कमी कालावधीत पूर्ण करणे कठीण जाईल. त्यामुळेच २०२२पासून १० संघांचे ‘आयपीएल’ असेल. त्यामुळे स्पर्धेमधील सामन्यांची संख्या वाढणार आहे. 

नवीन दोन संघ कोणते असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. आयपीएल २०२१ नंतर नव्या दोन संघाबाबत लिलाव प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

लेवांडोस्की सर्वोत्तम

🔥अर्जेटिनाचा लिओनेल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या मातब्बर खेळाडूंची मक्तेदारी संपुष्टात आणून पोलंडचा कर्णधार रॉबर्ट लेवांडोस्कीने ‘फिफा’च्या वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर नाव कोरले. महिलांमध्ये इंग्लंडच्या लुसी ब्राँझने सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर मोहोर उमटवली.

🔥झुरिच येथे झालेल्या या आभासी सोहळ्यादरम्यान विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली. परंतु ‘फिफा’चे अध्यक्ष जिआनी इन्फॅन्टिनो यांनी म्युनिक येथे जाऊन लेवांडोस्कीला पुरस्कार प्रदान केल्याची चित्रफीत या सोहळ्यादरम्यान दाखवण्यात आली. नेहमीप्रमाणे जगभरातील निवडक राष्ट्रीय फुटबॉल संघांचे कर्णधार, प्रशिक्षक, क्रीडा पत्रकार आणि चाहत्यांच्या मतांचा आढावा घेऊन विजेत्यांची निवड करण्यात आली.

🔥३२ वर्षीय लेवांडोस्कीने यंदा बायर्न म्युनिकला चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने हंगामात सर्वाधिक ५५ गोल करतानाच बायर्नला बुंडेसलिगाचे जेतेपदही जिंकून दिले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी Live Tv वर घेतली करोना लस

🔥अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जाहीरपणे करोना लस घेतली आहे.

🔥 जेव्हा करोना लस उपलब्ध होईल तेव्हा लोकांच्या मनात भीती नसावी आणि ते लस घेण्यासाठी तयार असावेत यासाठीच आपण जाहीरपणे लस घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

🔥जोय बायडन यांनी ख्रिश्चियाना केअर हॉस्पिटलमध्ये Pfizer-BioNTech ची लस घेतली.

सावित्रीबाई फुले जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी होणार


🔶 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी हा जन्मदिवस हा राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 


🔶 स्त्री शिक्षणातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.


🔶 या दिवशी शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे, निबंध, वक्तृत्व, परिसंवाद व एकांकिकांचे आयोजन करण्यात येईल. 


🔶सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांत, शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल.


🔶 त्यांच्या नावाने स्त्री शिक्षणात कार्यरत शिक्षिका, अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या यांना पुरस्कार देण्यात येईल, अशी माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.

Online Test Series

गोवा मुक्ती लढा


🔺पोर्तुगालने  आपल्या ताब्यातील भारतीय प्रदेश हाती सोपवण्यास नकार दिला. तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांना संघर्ष करावा लागला.


🔺पोर्तुगीज शासनाविरुध्द जनतेत जागृती घडवून आणण्याचे कार्य प्रथम डॉ. टी. बी. कुन्हा यांनी केले.


🔺आपल्या लिखाणातून त्यांनी पोर्तुगिजांच्या शोषक कारभारावर कोरडे ओढले.


🔺पोर्तुगिजांविरुध्द लढा देण्यासाठी लोकांना संघटित करण्याच्या हेतूने त्यांनी गोवा काँग्रेस समिती स्थापन केली.


🔺1946 साली गोवा मुक्तीसाठी डॉ. राममनोहर लोहिया यांनी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. याच सुमारास गुजरातमधील दादरा व नगरहवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी आझाद गोमांतक दलाची स्थापना करण्यात आली होती.


🔺2 ऑगस्ट, 1954 रोजी या दलाच्या तरूणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा व नगरहवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला.


🔺या हल्ल्यात विश्वनाथ लवंदे, नानासाहेब काजरेकर, सुधीर फडके इत्यादींनी भाग घेतला होता.


🔺1954 सालापासून गोवा मुक्ती चळवळीला विशेष गती मिळाली. गोवा मुक्ती समिती स्थापन करण्यात आली.


🔺 या समितीने सत्याग्रहींच्या अनेक तुकडया गोव्यात पाठवल्या. त्यात सेनापती बापट, महादेवशास्त्री जोशी व त्यांच्या पत्नी सुधाताई तसेच सुधीर फडके, नानासाहेब गोरे इत्यादी नामवंतांनी भाग घेतला.


🔺भारत सरकार पोर्तुगालशी सामोपचाराने वाटाघाटी करत होते. परंतु त्याला प्रतिसाद मिळेना. अखेरीस डिसेंबर 1861 मध्ये भारताचे सैन्य गोव्यात शिरले.


🔺काही दिवसांतच पोर्तुगीज लष्कराने शरणागती पत्करली.


· गोवा मुक्त झाला.


· भारताच्या भूमीवरून साम्राज्यवादाचे पूर्णपणे उच्चाटन झाले.

ब्राम्हो समाज व त्याची स्थापना



धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या युगाला राजा राममोहन रॉय यांच्या कार्यापासूनच खर्‍या अर्थाने सुरवात झाली राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772 रोजी राधानगर (बंगाल) येथे झाला.


 विद्यार्थीदशेत असताना इंग्रजी संस्कृत, अरबी, आणि फार्सी, या भाषा चा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांनी बंगालमध्ये इंग्रजी राजवट कशी स्थिर झाली हे प्रत्यक्ष पाहिले.


 ब्रिटिशांचे अनेक गुण भारतीय विचारवंतांना अंतर्मुख करु लागले होते. आपल्या समाजातील रुढी, परंपरा व अंधश्रध्दा यामुळे भारतीय समाजाची अधोगती झाली आहे, याची जाणीव रॉय यांना होती. त्यांनी काही काळ ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीपण केली होती त्या काळात ख्रिश्चन मिशनर्‍यांचे कार्य त्यांनी अगदी जवळून पाहिले होते. हिंदू धर्मातील एकेश्र्वरवाद, मुर्तिपूजा, आणि जातिभेद, समाजाच्या प्रगतीतील प्रमुख अडथळे आहेत. असे त्यांचे मत होते. त्यामुळे भारतीय समाजाला जागृत करावयाचे असेल तर या अनिष्ट रुढी आणि परंपरांचा त्याग केला पाहिजे असा प्रसार रॉय यांनी सुरु होता. सतीची चाल बंद करण्याचा प्रयत्न रॉय यांनी केला. अर्थात हे काम सोपे नव्हते शतकानुशतकांचा धर्माचा पगडा समाजातील उच्चवर्णियांवर होता. स्वार्थी भटभिक्षुकांची समाजावर फार जबरदस्त पकड होती. पती निधनानंतर विधवा स्त्रीने स्वत:च्या मृत पतिसमवेत जाळून घेणे म्हणजे सती जाणे आणि हाच धर्म मानला जात होता. संवाद कौमुदी नावाच्या पाक्षिकातून त्यांनी सतीच्या अमानुष पध्दतीवर कडाडुन टिका केली. रॉयसारख्या लोकांचा पाठिंबा असल्यामुळे बेंटिंकने 1829 साली सतीबंदीचा कायदा केला सतीच्या रुढीप्रमाणे बालविवाह, कन्याविक्रय आणि बहुपत्नित्वाची पध्दती समाजासाठी लांच्छानास्पद असल्याचे मत रॉय यांनी मांडले होते.


▪️ब्राम्हो समाजाची स्थापना :


त्या सुमारास ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदू धर्मावर प्रखर हल्ले होते. हे हल्ले परतवून हिंदू धर्म व संस्कृती यांचे संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या बुरसटलेल्या धर्मकल्पना हिंदूंनी फेकून दिल्या पाहिजेत असे रॉय यांना वाटत होते. हिंदू धर्माची मूळ बैठक वेदांताच्या तत्वज्ञानावर आहे हे ओळखून रॉय यांनी वैदिक विचारसरणीचा पुरस्कार केला. वेदांत सूत्रावरील शांकर भाष्याचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले. अनेक उपनिषदांचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले. वेदांत सार नावाचा ग्रंथ लिहून वेदांचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. केवळ ग्रंथ लिहून व वृत्तपेतातून लेखन करुन धार्मिक व सामाजिक सुधारणा होणार नाहीत याची त्यांना जाणीव होती. म्हणून त्यांनी 1828 मध्ये ब्राम्होसमाज स्थापन केला. तेव्हा ब्राम्हो समाजाला असंख्य अनुयायी मिळाले. या समाजाचा प्रसार बंगाल बाहेर इतर प्रांतातही झाला होता.

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे.


📚 दी इंडियन स्पेक्टॅटर :-

 बेहरामजी मलबारी..


📚 इडियन :-

 फिल्ड किशोरीचंद मित्र..


📚 अबला बांधव :-

 द्वारकानाथ गांगुली..


📚 फरी हिन्दुस्थान :-

तारकानाथ दास..


📚 परिदर्शक :-

 बिपिनचंद्र पाल..


📚 जन्मभूी :- 

पट्टाभि सितारामय्या..


📚 मबई समाचार :-

 फरदुनजी मर्झबान..


📚 तलवार :-

 विरेंद्रनाथ चटोपाध्याय..


📚 लीडर पं. मदन :-

 मोहन मालवीय..


📚 पख्तून :- 

खान अब्दुल गफारखान..


📚 इडियन मजलीस :-

 अरविद घोष (केम्ब्रिज)..

विभक्ती व त्याचे प्रकार


🔶 नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.


🔶 नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात.


🔰 नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात.


▪️ प्रथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत – 

      कर्ता


▪️ व्दितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते – 

      कर्म


▪️ तृतीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण


▪️ चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते – 

      संप्रदान


▪️ पंचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान


▪️ षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध


▪️ सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ – 

     अधिकरण

मानव विकास अहवाल 2020 प्रसिद्ध; भारताचे स्थान एकाने घसरून 131 वर.


🔰 सयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (UNDP) यांच्यावतीने ‘मानव विकास निर्देशांक 2020’ अहवाल प्रसिद्ध. 


🔰 दशातले आरोग्य, शिक्षण आणि लोकांच्या जीवनमानाचे मोजमाप करण्यासाठी मानव विकास निर्देशांकाचा वापर केला जातो.


✳️ ठळक बाबी :-


🔰निर्देशांकामध्ये नॉर्वे देश प्रथम स्थानी असून त्याच्यापाठोपाठ आयर्लंड, स्वित्झर्लंड, हाँगकाँग आणि आईसलँड यांचा क्रमांक लागतो.


🔰 यदा भारताच्या स्थानामध्ये पुन्हा एकदा घसरण होऊन तो 189 देशांच्या यादीमध्ये 131 व्या क्रमांकावर आहे.


🔰 भारताचे गेल्या वर्षीचे मानव विकास निर्देशांकातले मूल्य 0.645 एवढे आहे. त्यामुळे भारताला मध्यम मानव विकासाच्या श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे.


🔰 गल्या वर्षी भारतीयांचे जीवनमान हे 69.7 वर्षे एवढे होते, जेव्हा की ते बांगलादेशात 72.5 वर्षे आणि पाकिस्तानात 67.3 वर्षे एवढे आहे.मध्यम मानवी विकासाच्या क्रमवारीमध्ये भारत व भुटान 129 व्या, बांगलादेश 133 व्या आणि पाकिस्तान 154 व्या स्थानी आहे.


🔰 दशाच्या दरडोई उत्पन्नामध्ये घसरण होऊन ते वर्ष 2018 मधल्या 6829 डॉलरवरून 6681 डॉलरवर आले आहे.


🔰 कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या बाबतीत भारत देशाने अधिक प्रगती केली आहे.


🔰 आर्थिक सुरक्षितता आणि जमिनीच्या मालकीमुळे महिलांच्या सुरक्षेमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लिंगभेदावरून होणारे छळ देखील कमी झाले आहे.


🔰 मानव विकास निर्देशांक हा देशांचे विकसित, विकसिनशील व अविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. 


🔰 हा निर्देशांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.


🔰1990 साली पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी मानव विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते.

अमेरिकेतील पोस्ट ऑफिसला भारतीय वंशाच्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव.


🔺अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एका विधेयकावर स्वाक्षरी केली असून त्याचे कायद्यात रुपांतर झालं आहे.


🔺तर या नवीन कायद्यानुसार टेक्सास राज्यातील एका पोस्ट ऑफिसला दिवंगत शीख पोलीस अधिकारी संदीप सिंह धालीवाल यांचे नाव  देण्यात आलं आहे.


🔺एका वर्षापूर्वी ह्यूस्टन शहरामध्ये आपले कर्तव्य बजावत असतानाच धालीवाल यांच्यावर एका व्यक्तीने गोळीबार केला होता. या हल्ल्यात जखमी झालेले धालीवाल हे उपचारादरम्यान मरण पावले. त्यांच्या सन्मानार्थ टेक्सासमधील पोस्ट ऑफिसचे नाव बदलण्यात आलं आहे.


🔺तसेच टेक्सासमधील ह्यूस्टन येथील 315 एडिक्स होवेल रोडवरील पोस्ट ऑफिसचे नाव डेप्युटी संदीप सिंह धालीवाल पोस्ट ऑफिस बिल्डिंग असं करण्याबद्दलचा कायदा संमत करण्यात आला आहे.

लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त मदत केलेल्या टॉप टेन खासदारांच्या यादीत राहुल गांधी



लॉकडाउनमध्ये सर्वात जास्त मदत केलेल्या टॉप १० खासदारांमध्ये राहुल गांधी यांचा समावेश झाला आहे. 


GovernEye या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात सर्वाधिक मदत केलेल्या १० खासदारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत राहुल गांधी यांचं नाव आहे. नेल्लोरचे खासदार अडाला प्रभाकर रेड्डी, वायनाडचे खासदार राहुल गांधी, भाजपाचे खासदार अनिल फिरोजिया यांचाही या यादीत समावेश आहे.


१ ऑक्टोबरला GovernEye या संस्थेने त्यांचं सर्वेक्षण सुरु केलं होतं. त्यामध्ये एकूण २५ खासदारांची निवड करण्यात आली होती. त्यातून एकूण १० खासदारांची यादी निश्चित करण्यात आली. या यादीत राहुल गांधींच्या नावाचीही समावेश आहे.


प्रत्यक्ष मतदारसंघात घेण्यात आलेल्या नागरिकांच्या मुलाखती आणि अभिप्राय यातून सर्वाधिक मदत केलेल्या २५ खासदारांची नावं ठरवण्यात आली. त्यातून १० नावांची यादी तयार करण्यात आली असंही या संस्थेने म्हटलं आहे.


कोण आहेत टॉप १० खासदार


अनिल फिरोजिया – भाजपा

अडाला प्रभाकर रेड्डी-वायएसआरसीपी

राहुल गांधी-काँग्रेस

महुआ मोइत्रा-तृणणूल काँग्रेस

एल.एस. तेजस्वी सूर्या-भाजपा

हेमंत तुकाराम गोडसे – शिवसेना

सुखबीर सिंग बाद-एसएडी

शंकर लालवानी -भाजपा

नितीन गडकरी-भाजपा

डॉ. सुमाती थमीझाची-डीएमके

प्रौढ स्त्रीला इच्छेनुसार लग्नाचा आणि धर्मांतराचा हक्क.


🔶परौढ स्त्री आपल्या इच्छेनुसार लग्न करण्यास आणि इतर कुठलाही धर्म स्विकारण्यास मुक्त असून तिच्या या निर्णयामध्ये कोणतंही कोर्ट हस्तक्षेप करु शकत नाही, असा महत्वूपर्ण निर्णय कोलकाता हायकोर्टानं दिला आहे.


🔶नया. संजीब बॅनर्जी आणि न्या. अरिजीत बॅनर्जी  यांच्या खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला आहे.


🔶दशात सध्या लव्ह जिहाद या संकल्पनेची चर्चा असून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी भाजपाशासित राज्यांनी यासंदर्भात कायदे केले आहेत. लग्नासाठी जबरदस्तीनं धर्मांतर केल्यास कडक शिक्षेची तरतूद या कायद्यांमध्ये करण्यात आली आहे.

भारतात महामार्गांचा हरित विकास.


🔶 जागतिक बँकेची 500 दशलक्ष डॉलरच्या प्रकल्पाला मान्यता

भारत सरकार आणि जागतिक बँक यांनी राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये सुरक्षित आणि हरित राष्ट्रीय महामार्ग मार्गिका तयार करण्यासाठी 500 दशलक्ष डॉलर एवढा अंदाजित खर्च असलेल्या प्रकल्पावर स्वाक्षरी केली आहे.


🔶भारत सरकारच्या वतीने डॉ. महापात्रा आणि जागतिक बँकेच्या वतीने कार्यवाहक संचालक सुशिला गुल्याणी यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या.


🛑 ठळक बाबी....


🔶या प्रकल्पामुळे सुरक्षा आणि हरित तंत्रज्ञानातली रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाची क्षमता वृद्धिंगत होणार.

हरित राष्ट्रीय महामार्ग मार्गिका प्रकल्प स्थानिक आणि किरकोळ साहित्य, औद्योगिक उप-उत्पादने आणि इतर जैवविज्ञान उपायांसाठी सुरक्षित आणि हरित तंत्रज्ञानाचा आरखडा एकत्रित करून रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय विविध भौगोलिक क्षेत्रातल्या एकूण 783 किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्यासाठी मदत करणार आहे.हा प्रकल्प महामार्गांच्या बांधकाम आणि देखरेख क्षेत्रात हरितगृह वायु (GHG) उत्सर्जन कमी करण्यात मदत करणार.


🔴 जागतिक बँक (WB) विषयी....


🔶जागतिक बँक (WB) ही भांडवल पुरविण्यासाठी विकसनशील देशांना कर्ज देणारी एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँक (International Bank for Reconstruction and Development- IBRD) आणि आंतरराष्ट्रीय विकास महामंडळ (International Development Association -IDA), अश्या दोन संस्थांचा समावेश आहे.जागतिक बँक हा संयुक्त राष्ट्रसंघ प्रणालीचा एक भाग आहे.


🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि तीन इतर संस्थांसह जागतिक बँकेची स्थापना 1944 साली झालेल्या ब्रेटोन वूड्स परिषदेत करण्यात आली.संयुक्त राज्ये अमेरिका या देशाची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथे जागतिक बँकेचे मुख्यालय आहे.

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...