१८ डिसेंबर २०२०

भारत - बांगलादेश यांच्यात ७ सामंजस्य करार.


🔰 भारत - बांगलादेश यांच्यात काल ७ सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये हायड्रोकार्बन क्षेत्र, सामुदायिक विकास, सीमापार हद्दी संवर्धन, घनकचरा विल्हेवाट, शेती अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे.


🔰 या वेळी जिलाहाटी-हल्दीबारी रेल्वेमार्ग तब्बल ५५ वर्षांनी सुरू केला. आसामला पश्चिम बंगाल तर्फे बांगलादेशला जोडणार.


भारतीय गुणवत्ता परिषद देशभरात ‘हायजीन रेटिंग ऑडिट एजन्सी’ (HRAA) नेमणार.



🔰भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) यांनी ‘हायजीन रेटिंग ऑडिट एजन्सी’ (HRAA) अर्थात ‘आरोग्यपूर्ण स्वच्छता मानांकन परीक्षण केंद्र’ योजनेची घोषणा केली आहे.


🔰या योजनेच्या अंतर्गत भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असलेल्या स्वच्छतेला मापण्यासाठी देशभरात ‘हायजीन रेटिंग ऑडिट एजन्सी’ (HRAA) नेमणार आहे.  


🔰मान्यताप्राप्त HRAA केंद्र FSSAIने ठरविलेल्या अन्न गुणवत्ता आणि सुरक्षा प्रक्रियेच्या अनुपालनाची पडताळणी करण्यासाठी आणि स्वच्छता मानांकन देण्यासाठी जबाबदार असणार.


🔰अन्न-व्यवसायांसाठी ही एक प्रमाण प्रणाली आहे. ग्राहकांना अन्नपदार्थाच्या गुणवत्तेबाबत माहिती पुरवून ते निवडीबाबत निर्णय घेण्यास सक्षम करणे हा या योजनेचा हेतू आहे. ही योजना हॉटेल, उपहारगृह, कॅफेटेरिया, ढाबा, मिष्ठान दुकाने, बेकरी, मांस विक्री दुकाने अश्या सर्व ठिकाणी लागू असणार आहे.

करोनामुळे परीक्षा देता न आलेल्या UPSC उमेदवारांना मिळणार पुन्हा संधी? केंद्र सरकार म्हणतं…



अचानक उद्भवलेल्या करोनाच्या संकटामुळे शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. शैक्षणिक परीक्षांबरोबरच केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगांकडून घेणाऱ्या विविधा स्पर्धा परीक्षांनाही याचा फटका बसला होता. अनेक उमेदवारांना परीक्षेला मुकावे लागले होते. परीक्षा देता न आलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.


करोनामुळे युपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेला मुकलेल्या परीक्षार्थींना पुन्हा संधी देण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परीक्षार्थींना पुन्हा एक देण्यासंदर्भात युपीएससी आयोगाला निर्देश देण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे. या याचिकेवर ए.एम. खानविलकर यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली.


यावेळी न्यायालयाने केंद्र सरकार व युपीएससी आयोगाला सल्ला दिला. करोनामुळे नागरी सेवा परीक्षेला मुकलेल्या उमेदवारांना पुन्हा एक संधी देण्याच्या प्रस्तावावर निर्णय घ्यावा

Online Test Series

त्रिकोणमिति : महत्वपूर्ण सूत्र

 🟥🟥 तरिकोणमिति : महत्वपूर्ण सूत्र 🟥🟥


🔴 योग सूत्र

➭ Sin(A+B) = SinACosB+CosASinB

➭ Sin(A-B) = SinACosB-CosASinB

➭ Cos(A+B) = CosACosB-SinASinB

➭ Cos(A-B) = CosACosB+SinASinB


🔴 अन्तर सूत्र

➭ tan(A+B) = tanA+tanB/1-tanAtanB

➭ tan(A-B) = tanA-tanB/1+tanAtanB


🔴 C-D सूत्र

➭ SinC+SinD = 2Sin(C+D/2) Cos(C-D/2)

➭ SinC-SinD = 2Cos(C+D/2) Sin(C-D/2)

➭ CosC+CosD = 2Cos(C+D/2) Cos(C-D/2)

➭ CosC-CosD = 2Sin(C+D/2) Sin(D-C/2)

➭ CosC-CosD = -2Sin(C+D/2) Sin(C-D/2)


🔴 रपांतरण सूत्र

➛ 2SinACosB = Sin(A+B)+Sin(A-B)

➛ 2CosASinB = Sin(A+B)-Sin(A-B)

➛ 2CosACosB = Cos(A+B)+Cos(A-B)

➛ 2SinASinB = Cos(A-B)-Cos(A+B)


🔴 दविक कोण सूत्र 

➛ Sin2A = 2SinACosA

➛ Cos2A = Cos²A-Sin²A = 2Cos²-1 = 1-2Sin²A

➛ tan2A = 2tanA/1-tan²A

➛ Sin2A = 2tanA/1+tan²A

➛ Cos2A = 1-tan²A/1+tan²A


🔴विशिष्ट सूत्र

➛ Sin(A+B)Sin(A-B) = Sin²A-Sin²B 

                                 = Cos²B-Cos²A

➛ Cos(A+B)Cos(A-B) = Cos²A-Sin²B = Cos²B-Sin²A


🔴 तरिक कोण सूत्र

➛ Sin3A = 3SinA-4Sin³A

➛ Cos3A = 4Cos³A-3CosA

➛ tan3A = 3tanA-tan³A/1-3tan²A


🔴 महत्वपूर्ण सर्वसमिकाएं

➛ Sin²θ+Cos²θ = 1

➭ Sin²θ = 1-Cos²θ 

➭ Cos²θ = 1-Sin²θ

➛ 1+tan²θ = Sec²θ

➭ Sec²θ-tan²θ = 1

➭ tan²θ = Sec²θ-1

➛ 1+Cot²θ = Cosec²θ

➭ Cosec²θ-Cot²θ = 1

➭ Cot²θ = Cosec²θ-1

चालू घडामोडी प्रश्नसंच


66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?

(A) अंधाधुन

(B) उरी: द सर्जिकल स्ट्राईक

(C) पद्मावत

(D) बधाई हो

Ans:-A


कोणत्या ब्रिटिश विनोदी अभिनेत्याला लॉस एंजेलिसमधील ‘2019 ब्रिटानिया पुरस्कार’ सोहळ्यात चार्ली चॅपलिन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे?

(A) जॉर्ज कार्लिन

(B) स्टीव्ह कूगन

(C) रसेल हॉवर्ड

(D) जोसेफ हॉवर्ड

Ans:-B


जलसंवर्धनाशी संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने शालेय विद्यार्थ्यांसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक मोहीम सुरू केली. त्या कार्यक्रमाचे नाव काय आहे?

(A) समग्र जल सुरक्षा

(B) समग्र जल शिक्षा सुरक्षा

(C) समग्र जल-जीवन सुरक्षा

(D) समग्र शिक्षा-जल सुरक्षा

Ans:-D


खालीलपैकी कोणत्या राज्याने 2019 या वर्षासाठी "AQ" या मालिकेच्या अंतर्गत चालवली जाणारी ‘स्मॉल सेव्हिंग्ज इन्सेंटिव्ह स्कीम’ सादर केली?

(A) पश्चिम बंगाल

(B) तामिळनाडू

(C) ओडिशा

(D) महाराष्ट्र

Ans:-C


भारतातली पाण्याखालून जाणारी पहिली रेलगाडी कुठे धावणार?

(A) हुसेन सागर तलाव, हैदराबाद

(B) हुगळी नदी, कोलकाता

(C) ब्रह्मपुत्र नदी, गुवाहाटी

(D) अपोलो वॉटरफ्रंट बंदर क्षेत्र, मुंबई

Ans:-B


कोणत्या लघू वित्त बँकेला 8 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) अनुसूचित बँकेचा दर्जा प्राप्त झाला?

(A) इक्विटास स्मॉल फायनान्स बँक

(B) फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक

(C) एयू स्मॉल फायनान्स बँक

(D) जन स्मॉल फायनान्स बँक

Ans:-D


कुठे इंटरनेशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) तर्फे तिसरी आंतरराष्ट्रीय विद्युत-क्षम वाहन (EV) परिषद आयोजित करण्यात आली?

(A) गुरुग्राम

(B) नवी दिल्ली

(C) मुंबई

(D) गुवाहाटी

Ans:-A


CREDAI आणि CBRE या संस्थांच्या संयुक्त अहवालाच्या मते, युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकाचा देश आहे?

(A) प्रथम

(B) द्वितीय

(C) तृतीय

(D) चतुर्थ

Ans:-D


CREDAI आणि CBRE या संस्थांच्या संयुक्त अहवालाच्या मते, कोणता देश युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकाचा देश आहे?

(A) संयुक्त राज्ये अमेरीका

(B) ब्रिटन

(C) चीन

(D) जापान

Ans:-A


कोण 2018-19 या सालासाठी युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) याच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्ड' या पुरस्काराचा विजेता आहे?

(A) मारिओ मॅन्डझुकिक

(B) लिओनेल मेस्सी

(C) क्रिस्टियानो रोनाल्डो

(D) यापैकी कुणीही नाही

Ans:-B


कोणती व्यक्ती लवाद व समन्वय (दुरुस्ती) कायदा-2019 अंतर्गत स्थापना करण्यात येणार्‍या लवाद परिषदेचे अध्यक्ष असणार?

(A) भारताचे राष्ट्रपती

(B) पंतप्रधान

(C) अर्थमंत्री

(D) भारताचे प्रधान न्यायाधीश

Ans:-D



कोणत्या फिन-टेक स्टार्टअप कंपनीने 'फ्रीडम कार्ड' सादर केले आहे जे सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी तसेच स्टार्टअप्स उद्योगांसाठी भारतातले पहिले कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड आहे?

(A) लेन्डिंगकार्ट

(B) मशरेक ग्लोबल

(C) एनकॅश

(D) क्याश

Ans:-C


कोणत्या खासगी बँकेने हेल्थकॅश या संकल्पनेसह को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड सादर केले?

(A) बंधन बँक

(B) इंडसइंड बँक

(C) फेडरल बँक

(D) RBL बँक

Ans:-D


‘रॉजर्स चषक 2019’ या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकाराचा विजेता कोण आहे?

(A) रॉजर फेडरर

(B) राफेल नदाल

(C) डॅनिल मेदवेदेव

(D) यापैकी नाही

Ans:-B


रॉजर्स चषक ही कॅनडामध्ये आयोजित केली जाणारी वार्षिक ___ स्पर्धा आहे.

(A) बॅडमिंटन

(B) टेबल टेनिस

(C) टेनिस

(D) स्क्वॅश

Ans:-C


कॉंगो प्रजासत्ताक या देशासाठी भारताचे पुढील राजदूत कोण असणार आहेत?

(A) घोटू राम मीना

(B) अरुण कुमार सिंग

(C) गायत्री कुमार

(D) संजय कुमार वर्मा

Ans:-A


प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक ___ यांचे 10 ऑगस्ट 2019 रोजी पानिमोरा (ओडिशा) येथे निधन झाले. पानिमोरा येथील उरलेल्या 32 सैनिकांमधील शेवटच्या दोन सैनिकांपैकी ते एक होते.

(A) प्रकाश महापात्रा

(B) प्रत्यूश दाश

(C) दयानिधी नायक

(D) अमित कुमार

Ans:-C


भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या दोन वर्षांच्या कामकाजावर आधारित असलेल्या पुस्तकाचे नाव ओळखा.

(A) वाइस प्रेसिडेंट नायडू

(B) लिसनिंग, लर्निंग अँड लिडिंग

(C) व्हॉट शुड डू अॅज लीडर

(D) लिडिंग इंडिया

Ans:-B


ऑगस्ट 2019 महिन्यात कोणत्या भारतीय क्रिडा मंडळाने राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीच्या (NADA) कक्षेत येण्यास मान्य केले?

(A) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ

(B) भारतीय नौदल क्रिडा नियामक मंडळ

(C) भारतीय सैन्य क्रिडा नियामक मंडळ

(D) भारतीय स्क्वॉश नियामक मंडळ

Ans:-A


संरक्षण मंत्र्यांनी सेवेत असलेल्या कुटुंबातल्या एकट्या पुरुष पालक कर्मचार्‍यांना बाल देखरेख रजा (CCL) सुविधेचा लाभ देण्यास मान्यता दिली. त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 

I. 40 टक्के अपंगत्व असलेल्या बालकांच्या बाबतीत CCL रजा घेण्यासाठी बालकासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.

II. CCL रजेचा कमीतकमी कालावधी जो एका वेळी मिळू शकेल तो 5 दिवस एवढा कमी करण्यात आला आहे.

(A) केवळ I

(B) केवळ II

(C) I आणि II दोन्ही

(D) ना I, ना II

Ans:-C


ग्वाटेमाला या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली?

(A) सँड्रा टॉरेस

(B) जिमी मोरालेस

(C) अलेजान्ड्रो मालडोनाडो

(D) अलेजान्ड्रो गियामॅटी

Ans:-D


इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमी (INSA) याच्या प्रथम महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?

(A) चंद्रिमा शहा

(B) देविका लाल

(C) सुब्रत बॅनर्जी

(D) कविता देसाई

Ans:-A


भारत आणि चीन या दोन शेजारी देशांमधील सांस्कृतिक आणि लोकसंबंध अधिक दृढ करण्यासाठी __ करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या.

(A) पाच

(B) दोन

(C) चार

(D) तीन

Ans:-C


ऑगस्ट महिन्यात निधन झालेल्या ज्येष्ठ वकिल आणि अतिरिक्त महाधिवक्ता राहिलेल्या व्यक्तीचे नाव काय होते?

(A) संजय जैन

(B) अमरेंद्र शरण

(C) देवेंद्र यादव

(D) विपुल नगर

Ans:-B


रिलायन्स जियो कंपनीने भारतभर क्लाऊड डेटा सेंटरांची स्थापना करण्यासह  डिजिटलीकरणाला गती देण्यासाठी ___ सोबत दीर्घकालीन भागीदारी केली आहे.

(A) मायक्रोसॉफ्ट

(B) गुगल

(C) इन्फोसिस

(D) विप्रो

Ans:-A


मोटरस्पोर्ट्सच्या शर्यतीचे विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे?

(A) ऐश्वर्या पिसे

(B) अरमान इब्राहिम

(C) आदित्य पटेल

(D) समीरा सिंग

Ans:-A


कोणते शहर फिजी या देशाची राजधानी आहे?

(A) हेलसिंकी

(B) हवाना

(C) सुवा

(D) ओस्लो

Ans:-C


कोणती व्यक्ती आशियाई क्रिडापटू संघाच्या क्रिडापटू आयोगाची सदस्य बनली?

(A) दुती चंद

(B) पी. टी. उषा

(C) पी. व्ही. सिंधू

(D) मेरी कोम

Ans:-B


12 ऑक्टोबरपासून तीन दिवस चालणारी ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2019’ ही परिषद कुठे भरणार आहे?

(A) श्रीनगर

(B) जयपूर

(C) कोचीन

(D) मुंबई

Ans:-A


कॅब-सेवा देणारी ओला या कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्राशी संबंधित कोणत्या स्टार्टअप कंपनीचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली?

(A) Ridder.ai

(B) Stack.ai

(C) Yolo.ai

(D) Pikup.ai

Ans:-D


कोण फ्रान्सच्या सरकारकडून 'शेवेलीएर डी आय’ऑरड्रे ड्यू मेरीट एग्रीकोलेटो' हा सन्मान प्राप्त करणारा पहिला भारतीय आचारी ठरला?

(A) अर्जुन देसाई

(B) सुभाष गर्ग

(C) प्रियम चटर्जी

(D) दिपक मिश्रा

Ans:-C


फिजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली?

(A) न्या. मदन लोकूर

(B) न्या. कमल कुमार

(C) न्या. ए. के. मिश्रा

(D) न्या. टी. एस. ठाकूर

Ans:-A


‘टी-20 फिजिकल डिसअॅबिलिटी वर्ल्ड क्रिकेट सिरीज 2019’ ही स्पर्धा कुणी जिंकली?

(A) भारत

(B) पाकिस्तान

(C) बांग्लादेश

(D) इंग्लंड

Ans:-A

आजचे प्रश्नसंच

 .......हा रूपेरी रंगाचा धातू विक्षोभक पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो .

1) calcium 

2) magnesium

3) जस्त

सोडियम✅


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

पचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड कीती कार्यकाळासाठि होते.

1) दिड वर्षे 

2) अडिच वर्षे✅

3) पाच वर्षे

4) एक वर्षे


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आवर्तसारणीच्या मध्यातील 3 ते 12 गणातील संकरामक मूलद्रव्यांच्या बाह्यतम .....कक्षा अपूर्ण असतात.

1) एक

2) दोन✅

3) तीन

4) चार


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सिलिकॉन या मूलद्रव्यांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दांत  समरपक पणे करता येईल.

1) वाहक

2) रोधक

3) अर्धवाहक✅

4) या पैकी नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे.

1) स्थानांतरणीय

2) परिवलन

3) कंपन.✅

4)या पैकी नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

हअरचे उपकरण कशासाठी वापरता येवू शकते.

1) द्रवाचे तापमान मोजने

2) द्रवाची घनता मोजने✅

3) द्रवाचे वजन मोजने

4) द्रवातील विद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

परायोगिक तत्त्वावर भारतात दूरदर्शनची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

1) 1951

2) 1955

3) 1959✅

4) 1965


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

वास्तव प्रतिमा नेहमी ..........असते.

1) सुलटि

2) कशीही

3) मोठी 

4) यापैकी नाही✅


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

वस्तू लंबरूप दिशेने फेकल्यास तिच्या दिशा वेगाची दिशा.......

1) बदलते

2) भरकटते

3) बदलत नाही मात्र वेगाचे परिणाम कमी होत जाते.✅

4) निश्चित सांगता येनार नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

एक वातावरण दाबास पाण्याचे वाफेत रूंपातर झाल्यावर वाफेचे आकारमान हे पाण्याच्या आकारमानापेक्षा सुमारे ......पट असते .

1) 117 पट

2) 1100 पट

3) 1670 पट✅

4) 5000 पट


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹.

खालीलपैकी कोणता रंग हा सात रंगाचे मिक्षण मानल्या गेलेल्या पाढंऱ्या रंगाचा घटक होऊ शकत नाही.

1) निळा 

2) काळा✅

3) निळ्या 

4) पिवळ्या


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Jp⤵️


गनपावडर चा उल्लेख कोणाच्या साहित्यात सर्वप्रथम आढळला.

राँजर बेकन


JEE Main परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; चार टप्प्यात होणार परीक्षा.


🔰‘आयआयटी’सह इतर काही केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात ‘जेईई मेन्स’ वर्षभरात चार सत्रात घेतली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी ही माहिती दिली. पहिल्या सत्रातील परीक्षा फेब्रवारीमध्ये घेतली जाणार आहे. परीक्षेनंतर ४ ते ५ दिवसात निकाल जाहीर होईल, अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली.


🔰करोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. केंद्र व राज्य सरकारांकडून घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांचाही खोळंबा झाला होता. मात्र, नव्या वर्षात केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं जेईई मेन्स परीक्षेसाठी वेळापत्रक निश्चित केलं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी याची माहिती दिली.


🔰जईई मेन्स परीक्षा पुढच्या वर्षी चार टप्प्यात (सत्रात) घेतली जाणार आहे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात टप्प्याटप्प्यानं ही परीक्षा घेतली जाणार आहे. पहिलं सत्र २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे. परीक्षेचा निकाल लगेच जाहीर केला जाणार आहे. परीक्षेच्या अखेरच्या तारखेनंतर चार ते पाच दिवसांत निकाल प्रसिद्ध केला जाणार असल्याचं रमेश पोखरियाल निशांक यांनी सांगितलं.

UNDP मानव विकास अहवाल 2020.


🔰सयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (UNDP) यांच्यावतीने ‘मानव विकास निर्देशांक 

2020’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. देशातले आरोग्य, शिक्षण आणि लोकांच्या जीवनमानाचे मोजमाप करण्यासाठी मानव विकास निर्देशांकाचा वापर केला जातो.


🔴ठळक बाबी....


🔰निर्देशांकामध्ये नॉर्वे देश प्रथम स्थानी असून त्याच्यापाठोपाठ आयर्लंड, स्वित्झर्लंड, हाँगकाँग आणि आईसलँड यांचा क्रमांक लागतो.यंदा भारताच्या स्थानामध्ये पुन्हा एकदा घसरण होऊन तो 189 देशांच्या यादीमध्ये 131 व्या क्रमांकावर आहे.भारताचे गेल्या वर्षीचे मानव विकास निर्देशांकातले मूल्य 0.645 एवढे आहे. त्यामुळे भारताला मध्यम मानव विकासाच्या श्रेणीमध्ये स्थान मिळाले आहे.


🔰गल्या वर्षी भारतीयांचे जीवनमान हे 69.7 वर्षे एवढे होते, जेव्हा की ते बांगलादेशात 72.5 वर्षे आणि पाकिस्तानात 67.3 वर्षे एवढे आहे.मध्यम मानवी विकासाच्या क्रमवारीमध्ये भारत व भुटान 129 व्या, बांगलादेश 133 व्या आणि पाकिस्तान 154 व्या स्थानी आहे.


🔰दशाच्या दरडोई उत्पन्नामध्ये घसरण होऊन ते वर्ष 2018 मधल्या 6829 डॉलरवरून 6681 डॉलरवर आले आहे.

कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या बाबतीत भारत देशाने अधिक प्रगती केली आहे.

आर्थिक सुरक्षितता आणि जमिनीच्या मालकीमुळे महिलांच्या सुरक्षेमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लिंगभेदावरून होणारे छळ देखील कमी झाले आहे.


🔰मानव विकास निर्देशांक हा आकडागातल्या देशांचे विकसित, विकसिनशील व अविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. हा निर्देशांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.


🔰1990 साली पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन ह्यांनी मानव विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते.

मानवी विकास निर्देशांकात भारताची घसरण.


🔰भारतातील दरडोई उत्पन्न, जीवनशैलीचा दर्जा, आरोग्य आणि शैक्षणिक स्थिती यांच्या घसरलेल्या आलेखामुळे मानवी विकास निर्देशांकात भारताची घसरण झाली आहे.


🔰तर 189 देशांच्या यादीत भारत 131 व्या स्थानी  असल्याचे संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम (यूएनडीपी)ने जाहीर केलेल्या अहवालत स्पष्ट झाले आहे.


🔰दशाची आरोग्य, शौक्षणिक स्थिती तसेच राहणीमानाचा दर्जा यावर मानवी विकास निर्देशांक (एचडीआय) मोजला जातो.


🔰भारताचे एचडीआय मूल्य 0.645 इतके नोंदवले गेले. त्यामुळे भारताची गणना मध्यम मानवी विकास वर्गवारीत झाली आहे.


🔰मध्यम मानवी विकास वर्गवारीसह मानवी विकास निर्देशांकात भूतान 129, बांगलादेश 133, नोपाळ 142 आणि पाकिस्तान 154 स्थानावर आहे.

इस्रो’च्या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण.



🅾️भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारताचा  42 वा संप्रेषण उपग्रह यशस्वीपणे अवकाशात  सोडला.


🅾️तर हा उपग्रह आपत्ती व्यवस्थापन आणि माहिती महाजाल संपर्कतेसाठी काम करणार आहे. कोविड-19च्या स्थितीत इस्रोने केलेले हे दुसरे प्रक्षेपण आहे.

श्रीहरिकोटा येथील द्वितीय प्रक्षेपण केंद्रातून पीएसएलव्ही-सी 50 रॉकेटने अवकाशात झेप  घेतली.


🅾️तसेच हा उपग्रह देशाच्या मुख्य भूमीसह अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपला व्यापणाऱ्या वारंवारिता स्पेक्ट्रमच्या विस्तारित सी बॅण्डमध्ये सेवा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.


🅾️तर सीएमएस-01, इस्रोचा संप्रेषण उपग्रह आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे हे 52 वे अभियान आहे.

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...