१७ डिसेंबर २०२०

'BSE ई-अ‍ॅग्रीकल्चरल मार्केट्स लिमिटेड' किंवा BEAM



कृषी उत्पन्नासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) याने त्यांच्या व्यासपीठावर 'BSE ई-अ‍ॅग्रीकल्चरल मार्केट्स लिमिटेड' किंवा BEAM नामक एक इलेक्ट्रॉनिक स्पॉट मंच स्थापित केला आहे. BSE इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या त्याच्या सहाय्यक कंपनीमार्फत BEAM मंचाचे व्यवस्थापन केले जाणार आहे.


हा मंच उत्पादक, मध्यस्थ, ग्राहक तसेच सहाय्यक सेवांचा समावेश असलेल्या मूल्यवर्धित साखळीमधला व्यवहार सुलभ करणार.


वैशिष्टे


यात व्यापारी व शेतकर्‍यांना तसेच भागधारकांना विविध कृषी वस्तूंची जोखीम मुक्त खरेदी व विक्री सुलभ करून देण्याच्या हेतूने सोयीस्कर उपाययोजना उपलब्ध करुन देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला आहे.


मंच कमी खर्चाची मध्यस्थी, उत्पादकांची वर्धित प्राप्ती, सुधारित खरेदी कार्यक्षमता आणि अधिक प्रतिस्पर्धात्मक किंमती याची खात्री देणार. तसेच खरेदी आणि व्यापाराशी संबंधित अडथळे दूर करण्यात देखील मदत करणार.


शेतकरी देशभरातल्या बाजारपेठांपर्यंत पोहोचू शकणार आणि त्यांच्या उत्पन्नाचा लिलाव करू शकणार. त्यामुळे गुणवत्तेवर आधारित कृषी-उत्पन्नाला उत्कृष्ट किंमत मिळण्यास मदत होणार.

RRB NTPC Mumbai official notice

 


🔰 परीक्षा 28.12.2020 ते 13.01.2021 दरम्यान होतील.


🔰 प्रवेशपत्र परीक्षेच्या 4 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येतील.


🔰 रजिस्ट्रेशन नंबर विसरला असाल तर forget रजिस्ट्रेशन नंबर वर क्लिक करून उमेदवार आपला रजिस्ट्रेशन नंबर पुन्हा मिळवू शकतील. ( सुविधा परीक्षेच्या 4 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल )

सवच्छ सर्वेक्षण २०२०


🎯 कद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे . स्वच्छ भारत सर्वेक्षणचं हे पाचवं वर्ष आहे


१) इंदूर - मध्यप्रदेश 

२) सुरत - गुजरात 

३) नवी मुंबई - महाराष्ट्र 

४) अंबिकापूर - छत्तीसगड 

५) म्हैसूर - कर्नाटक 

६) विजयवाडा - आंध्रप्रदेश 

७) अहमदाबाद - गुजरात 

८) नवी दिली शहर - दिल्ली 

९) चंद्रपूर - महाराष्ट्र

१०) खारगोन - मध्यप्रदेश 

१८) धुळे - महाराष्ट्र

२५) नाशिक - महाराष्ट्र


 मध्यप्रदेशातील इंदूर शहराला सलग चौथ्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर


 प्राचीन पवित्र नगरी वाराणसीला गंगा नदीच्या किनाऱ्यावरील सर्वात स्वच्छ शहराचा सन्मान


 कराड नगरपरिषदेनं एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला आहे


 सासवड दुसऱ्या तर लोणावळा तिसऱ्या क्रमांकावर आहे .

बायडेन यांचा व्हाईट हाऊसचा मार्ग मोकळा.



जुने पान उलटून आता नव्याने एकत्र येत जखमांवर फुंकर घालण्याची ही वेळ आहे, असे अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितले. प्रतिनिधी वृंदानेही त्यांच्या विजयार शिक्कामोर्तब केले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र पराभव मान्य करण्यास नकार देतानाच निकालाविरोधात अनेक न्यायालयांत आव्हान याचिका दाखल केल्या होत्या.


अमेरिकेतील ५३८ जणांच्या प्रतिनिधिवृंदाने सोमवारी बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले असून आता  व्हाइट हाऊसकडे जाण्याचा बायडेन यांचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकी अध्यक्षीय प्रक्रियेत प्रतिनिधी वृंदाचे शिक्कामोर्तब हा अंतिम टप्पा असतो. पुढील वर्षी जानेवारीत बायडेन हे देशाची सूत्रे हाती घेतील. अमेरिकी निवडणूक पद्धतीत मतदार हे प्रतिनिधी निवडीसाठी मतदान करीत असतात व ते प्रतिनिधी एक आठवडय़ानंतर अध्यक्षीय उमेदवारांसाठी प्रत्यक्षात मतदान करतात.


डेलावेअरमधील विमिंग्टन येथून केलेल्या भाषणात बायडेन यांनी सांगितले की, ३ नोव्हेंबरच्या अध्यक्षीय निवडणुकीतील विजयाने अमेरिकेतील इतिहासाचे एक नवे पान उघडले गेले आहे. या आधीच्या राजवटीत लोकशाहीच पणाला लागली होती. पण निवडणुकीतील निकालानंतर आता ही लोकशाही पुन्हा मजबूत होणार आहे. कायद्याचे राज्य, राज्यघटना व लोकांची इच्छा यांचाच विजय झाला असून  ट्रम्प यांनी निवडणूक निकालास आव्हान देण्याचा केलेला प्रयत्न फसला आहे.


लोकशाहीची ज्योत अनेक वर्षांंपूर्वी पेटवली गेली ती कुणीच विझवू शकत नाही. सत्तेचा गैरवापर, कुठल्या रोगाची साथ किंवा अन्य कशाचाही परिणाम न होता ही ज्योत तेवत राहणार आहे. अमेरिकी लोकशाहीच्या मूल्यांचा यात विजय झाला असून ज्या लोकांनी मतदान केले. ज्यांनी लोकशाही संस्थांवर विश्वास टाकला त्यांचा हा विजय असून यातून देशातील एकजूट दिसून आली आहे. आता आपण जुने पान उलटून नव्या पानावर आहोत, सर्वाची एकजूट करु. पूर्वीच्या जखमांवर फुंकर घालण्याचे काम करावे लागणार आहे.

यकेच्या पंतप्रधानानी स्वीकारलं प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्याचं निमंत्रण; मोदींनाही ‘रिटर्न गिफ्ट’



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ नोव्हेंबर रोजी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे औपचारिक आमंत्रण दिलं होतं. दरम्यान, बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे निमंत्रण स्वीकारलं असून ते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.


ब्रिटननं ही आपल्यासाठी मोठ्या सन्मानाची बाब असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी ७ परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे. यावर्षी ब्रिटनमध्ये जी ७ परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमनिक राब यांनी मंगळवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान बोरिस जॉन्सन यांनी निमंत्रण स्वीकारल्याची घोषणा केली.


बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर त्यांचा पहिला मोठा भारत दौरा असेल. ब्रेक्झिटनंतर पहिल्यांदाच ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येत असल्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपण त्यांचं निमंत्रण स्वीकारलं असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी ७ परिषदेसाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रणही दिलं आहे. 

"चलेजाव चळवळ १९४२"



नुकतेच ७५ वर्ष पुर्ण

(संकल्प से सिध्दी - घोषणा)


२अधिवेशने-

१-वर्धा -प्रस्ताव संमत

२-गवालिया टँक,मुंबई-सुरु


◾️ठराव मंजुर-८ अॉगस्ट १९४२


◾️कारण-

क्रिप्स वाटाघाडी फिस्कटल्या

जपाण आक्रमण

महागाईचा भडका

महायुध्द


◾️घोषणा-

चले जाव (युसुफ मेहेरअली)

करा अथवा मरा(गांधी)


◾️अटक-(अॉपरेशन झिरो अवर)

गांधी-आगाखाण पॕलेस,पुणे

नेहरु-अल्मोडा

जयप्रकाश नारायण-हजारीबाग कारागृह


◾️असहभागी घटक-

मुस्लीम लीग,

हिंदु महासभा

लिबरल पार्टी

भारतीय कम्युनीस्ट पक्ष


◾️पत्रीसरकार-

महाराष्ट्र - सातारा

उत्तर प्रदेश -बलिया (भारतातील पहिले )

बंगाल -मिदनापुर /तामलुक-(गांधी बुढी-मतंगिणी हाजरा)

बिहार -पुर्णिया


◾️गव्हर्नर -लाॕर्ड लिनलिथगो

INC चे अध्यक्ष-मौलाना आझाद


◾️९ अॉगस्टला गवालिया टॕंक वर झेंडा फडकवणारी महिला-अरुणा असफ अली.

भारतातील व्यापारी कंपनीची स्थापना

  


1 ) पोर्तुगीज इस्ट इंडिया कंपनी :- इ .स. 1498


2) ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी :- इ .स. 1600


3 ) डच  इस्ट इंडिया कंपनी :- इ .स. 1602


4 )  डेन इस्ट इंडिया कंपनी :- इ .स. 1616


5 ) फ्रेंच इस्ट इंडिया कंपनी :- इ .स.1664


6 ) ओस्टेंड इस्ट इंडिया कंपनी :- इ .स.1722


7 ) स्वीडिस इस्ट इंडिया कंपनी :- इ .स.1731 

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती...



🔶 मानवी डोक्याचे वजन ?

→   १४०० ग्रॅम.

 

🔶 सामान्य रक्तदाब ? 

→   १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 


🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?

→   न्यूरॉन. 


🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?

→   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.

→   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी. 


🔶 शरिरातील एकूण रक्त ? 

→   ५ ते ६ लीटर.

 

🔶सर्वात लहान हाड ? 

→   स्टेटस ( कानाचे हाड ) 


🔶 सर्वात मोठे हाड ?

→   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड ) 


🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?

→   १२० दिवस. 


🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ? 

→   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी. 


🔶पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ? 

→   २ ते ५ दिवस. 


🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?

→   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी. 


🔶हिमोग्लोबिनचे प्रमाण ?

→   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी. 

→   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी. 


🔶 हरदयाचे सामान्य ठोके ? 

→   ७२ ते ७५ प्रति मिनिट. 


🔶 नाडी दर (पल्स रेट) ?

→   ७२ प्रतिमिनिट. 


🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?

→   थायरॉईड ग्रंथी. 


🔶 सर्वात मोठा स्नायू ?

→   ग्लुटियस म्याक्सीमस. 


🔶एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?

→   ६३९.


🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?

→   मोनोसाईटस - ३ ते ८%. 

→   बेसोफिल्स - ०.५%. 

→   लिम्फोसाईटस - २० ते २५%. 

→   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%. 


🔶शरीराचे तापमान ? 

→   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन. 


🔶परौढांमधील दातांची संख्या ?

→   ३२.


 🔶लहान मुलांमधील दातांची संख्या ?

→   २० दूधाचे दात. 


🔶 सर्वात पातळ त्वचा ? 

→   पापणी (कंजक्टायव्हा)

अफजल खान वध


◾️सथान:- प्रतापगड


◾️अफजलखान शिवाजी महाराज व संभाजी कावजी कडून ठार


◾️12000 घोडदळ

11500 पायदळ/ बंदूकधारी

85 हत्ती 1000 उंट

80-90 तोफा घेऊन निघाला


◾️खानाने आपला मुक्काम वाई येथे टाकला,पूर्वी वाईचा सुभेदार असल्याने त्याला त्या भागाची चांगली माहिती होती


◾️भटीची वेळ 10 नोव्हेंबर 1659 रोजी ठरली


◾️परत्येक पक्षाचे 10 अंगरक्षक असतील व त्यातील एकजण शामियान्याबाहेर थांबेल.


◾️निःशस्त्र भेटायचे ठरले तरी खानाने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता व खानाकडून घातपाताच्या शक्यतेमुळे शिवाजींनी अंगरख्याखाली चिलखत चढवले होते व लपवण्यासारखी सोपी वाघनखे हातामध्ये लपवली होती


◾️खानाने महाराजांना अलिंगनादरम्यान काखेत दाबून बिचव्याचा वार केला पण चिलखतामुळे महाराज बचावले. खानाने दगा केला म्हणून महाराजांनी लपवलेल्या वाघनखाने खानाची आतडी बाहेर काढली


◾️सय्यद बंडाने शिवाजीवर वार केला परंतु जिवा महालाने आपल्यावर घेतला व शिवाजींचा रस्ता मोकळा केला. इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला परंतु संभाजी कावजीने प्रथम भोईंचे पाय तोडले.

🔺"होता जिवा म्हणून वाचला शिवा"


इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले


1) अलीपूर कट:- 1908

🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष


2) नाशिक कट:- 1910

🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर


3) दिल्ली कट:- 1912

🔶 रासबिहारी बोस


4) लाहोर कट:- 1915

🔶विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस


5) काकोरी कट:- 1925

🔶 सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन


6) मीरत/मेरठ कट:- 1928

🔶 मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे


7) लाहोर कट:- 1928

🔶 भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद


8) चितगाव कट:- 1930

🔶 सर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष


शेतकरी आंदोलन : “मोदी कोणीची चौकीदारी करतात?, अदानी-अंबानींची की शेतकऱ्यांची.


🦋पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या तीन नव्या शेतकरी कायद्यांविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. मात्र आता या आंदोलकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपा विरुद्ध भाजपाविरोधक अशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. 


🦋सत्ताधारी नेते या आंदोलनासाठी विरोधी पक्षांना जबाबदार धरत आहेत, तर विरोधी पक्षातील नेतेमंडळी कायदे मागे घेण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देताना दिसत आहेत. भाजपा नेत्या बबिता फोगाटने शेतकरी आंदोलन हे तुकडे तुकडे गँगने हायजॅक केल्याचं ट्विट केलं होतं. यावरुनच आता ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी भाजपाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तिखट शब्दांमध्ये टीका केली आहे.


🦋परशांत भूषण यांनी ट्विटरवरुन शेतकरी आंदोलनाला आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यांना तुकडे-तुकडे गँग म्हणणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. “अदानी आणि अंबानींच्या तुकड्यांवर जगाणारे लोकं आज आपल्या शेतकऱ्यांना तुकडे तुकडे गँग म्हणत आहेत,” असं ट्विट प्रशांत भूषण यांनी केलं आहे.


🦋तर अन्य एका ट्विटमधून प्रशांत भूषण यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. “आता मोदी चौकीदार आहेत हे मान्यच करावं लागेल. प्रश्न फक्त इतका आहे की ते चौकीदारी कोणाची करतात. अदानी-अंबानींची की शेतकऱ्यांची?”, असा टोला प्रशांत यांनी ट्विटमधून लगावला आहे.

ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीचा प्रवास १०० दिवसांवर .


🌼करोना संसर्ग अजूनही जगभरात कायम असला तरी टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पुढील वर्षी ठरल्याप्रमाणे होणार असे सांगण्यात येत आहे. त्यानुसार ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीचा प्रवास बरोबर १०० दिवसांवर आल्याचे घोषित करण्यात आले आहे.


🌼ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीचा प्रवास फुकुशिमा येथून १० हजार खेळाडूंकडून तसेच काही हजार स्वयंसेवकांकडून २५ मार्चपासून सुरू होईल, असे संयोजन समितीने स्पष्ट केले. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे जर ऑलिम्पिकचे आयोजन झाले असते तर या वर्षीदेखील फुकुशिमा येथूनच क्रीडा ज्योतीच्या प्रवासाला सुरुवात होणार होती.


🌼‘‘प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे क्रीडा ज्योतीच्या मार्गात मोठय़ा संख्येने प्रवेश देणार नाही. तसेच गाडय़ांची संख्यादेखील त्या दरम्यान कमी असेल असे आम्ही पाहू. १२१ दिवस क्रीडा ज्योतीचा प्रवास असणार आहे, तसेच ८५९ शहरांमधून तिचा प्रवास असेल,’’ असे टोक्यो ऑलिम्पिकच्या संयोजन समितीचे उपव्यवस्थापकीय संचालक युकिहिको नुनोमूरा यांनी सांगितले.

2020 में मिले अवार्ड , पार्ट - 01


🔵 वॉन कर्मन पुरस्कार 2020 

♦️ क . सिवन 


🔵 पथ्वी विज्ञान मंत्रालय राष्ट्रीय पुरस्कार : लाइफटाइम उत्कृष्टता पुरस्कार 

♦️ परोफेसर अशोक साहनी 


🔵 BET 2020 हूमैनटेरियन अवार्ड

♦️ पॉपस्टार बेयोन्से 


🔵 डायना पुरस्कार 2020

♦️ फरेया ठकराल 


🔵 SKOCH पुरस्कार 

♦️ नागालैंड में मोन जिला प्रशासन 


🔵 राष्ट्रमंडल 2020 का लघुकथा सम्मान

♦️ कतिका पांडे 


🔵 पॉल हैरिस फैलो 

♦️ EK प्लानीस्वामी 


🔵 मोहन बागान फुटबॉल क्लब लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड

♦️ अशोक कुमार 


🔵 मोहन बागान रत्न 

♦️ गरबख्श सिंह + पलाश नंदी 


🔵 मानवता के लिए गुलबेंकियन पुरस्कार

♦️ गरेटा थनबर्ग 


🔵 करमवीर चक्र अवार्ड 

♦️ सनील यादव SS


🔵 लोकमान्य तिलक नेशनल अवार्ड 2020

♦️ सोनम वांगचुक 


🔵 यरोपियन 2020 यूएस ग्रीन बिल्डिंग काउंसिल लीडरशिप अवार्ड

♦️ अतरराष्ट्रीय ओलंपिक समिति के लुसाने में स्थित नए मुख्यालय 


🔵 यएस - इंडिया बिजनेस काउंसिल ग्लोबल लीडरशिप अवार्ड 2020

♦️ नटराजन चन्द्रशेखरन + जिम ताइक्लेट


🔵 इफ्रा बिजनेस लीडर ऑफ द ईयर 2020

♦️ वद प्रकाश दुदेजा 


🔵 सिंगापुर में राष्ट्रपति पुरस्कार

♦️ कला नारायणसामी


🔵 मस क्रिकेटर ऑफ द ईयर 2020

♦️ कविंटन डि कॉक


🔵 वीमेंस क्रिकेटर ऑफ द ईयर 2020

♦️ लौरा वोल्वाईट 


🔵 पर्यावरण संरक्षण में उल्लेखनीय योगदान के लिए प्रथम पुरस्कार

♦️ लबनान में तैनात भारतीय सेना


🔵 दादा साहेब फाल्के पुरस्कार 2020

♦️ कसंग डी थोंगडोक 


🔵 CII - ITC ससटेनेबिलिटी पुरस्कार 2019

♦️ NTPC 


🔵 लीजेंड ऑफ एनिमेशन पुरस्कार

♦️ अर्नब चौधरी


🔵 2020 नेशनल मंडेला पुरस्कार

♦️ मरियाना वर्दिनोयनिस + मोरिसाना कौयाते


🔵 परतिष्ठित ग्लोबल ह्यूमेनेटेरियन अवार्ड ' टॉप पब्लिसिस्ट '

♦️ सचिन अवस्थी


🔵 गस्टेव ट्राउवे अवार्ड

♦️ भारत की पहली सौर उर्जा संचालित नौका आदित्य


🔵 मरणोपरांत नाट्य और प्रभाकर पुरस्कार 

♦️ रत्नाकर मटकारी

ब्रेकडान्सिंग: 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नवा क्रिडाप्रकार


🎭आतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) युवा प्रेक्षकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने ‘ब्रेकडान्सिंग’ याला ऑलिम्पिक खेळाचा दर्जा दिला. ब्रेकडान्सिंगला “ब्रेकिंग” या नावाने संबोधले जाणार आहे.


🎭आता, ब्रेकडान्सिंग हा एक अधिकृत ऑलिम्पिक खेळ बनला. हा खेळ 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळणार.


🎭तयाव्यतिरिक्त, स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लाइंबिंग आणि सर्फिंग या खेळांचाही समावेश करण्यात आला आहे. या तीन खेळांचा समावेश टोकियो (जपान) शहरात 23 जुलै 2021 पासून होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये केला जाणार आहे.


⭕️आतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) विषयी


🎭आतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) हे जागतिक ऑलिम्पिक चळवळीचे सर्वोच्च प्राधिकरण आहे. लुसाने (स्वित्झर्लंड) शहरात संस्थेचे मुख्यालय आहे. IOC दर चार वर्षांनी जागतिक स्पर्धांचे आयोजन करते. ते उन्हाळी आणि हिवाळी ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यासाठी जबाबदार आहे.


🎭IOC याची निर्मिती पिअरे डी कौर्बर्टिन यांनी 23 जून 1894 रोजी केली आणि डेमेट्रीओस विकेलस यांची प्रथम अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्याचे 105 सक्रिय सदस्य, 32 मानद सदस्य, 2 प्रतिष्ठित सदस्य (सेनेगल आणि अमेरिका) आहेत.

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे


Q1) कोणत्या देशाचे नाव अमेरिकेच्या ‘स्टेट स्पॉन्सर ऑफ टेररिजम’ याच्या यादीतून वगळण्यात आले?

उत्तर :- सुदान


Q2) कोणत्या जिल्ह्यात ‘डोब्रा चंटी पूल’ उभारण्यात आला?

उत्तर :- टिहरी-गढवाल


Q3) कोणत्या संस्थेनी ‘अग्नीशोधक आणि अग्नीशमन प्रणाली (FDSS)’ तंत्रज्ञान विकसित केले?

उत्तर :- अग्नी स्फोटक व पर्यावरण सुरक्षा केंद्र (CFEES)


Q4) कोणत्या राज्यात ‘पाक्के व्याघ्र प्रकल्प’ आहे?

उत्तर :- अरुणाचल प्रदेश


Q5) 2020 साली ‘शांती आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन’चा विषय काय आहे?

उत्तर :- सायन्स फॉर अँड विथ सोसायटी


Q6) कोणत्या व्यक्तीला ‘JCB प्राइज फॉर लिटरेचर 2020’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

उत्तर :-  एस. हरीश


Q7) कोणत्या राज्यात ‘हॉर्नबिल महोत्सव’ साजरा करतात?

उत्तर :-  नागालँड


Q8) कोण तृतीयपंथी लोकांच्या जीवनावर लिहिलेल्या “रासाथी” या शीर्षकाच्या कादंबरीचे लेखक आहे?

उत्तर :- ससिंद्रन कल्लीनकील


Q9) कोणत्या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन’ साजरा करतात?

उत्तर :- 9 नोव्हेंबर


Q10) ___ संस्थेच्यावतीने ‘अॅंटी-सॅटेलाईट (ए-सॅट)’ क्षेपणास्त्र प्रणालीच्या एका प्रतिरूपाचे अनावरण करण्यात आले.

उत्तर :- संरक्षण संशोधन विकास संघटना (DRDO)

पाकिस्तानात कठोर कायद्याला मंजुर.


🔰पाकिस्तानमध्ये बलात्काराविरोधात कठोर कायदा  करण्यात आला आहे. बलात्कार प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी करणं तसचं कठोर शिक्षा देण्याची या कायद्यात तरतूद आहे.तर इतकंच नाही तर तर दोषी आढळलेल्या व्यक्तीला नपुंसक करण्याचाही उल्लेख या कायद्यात आहे.

 

🔰पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी या नव्या कायद्यावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

नव्या कायद्यामध्ये बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात सहभागी असणाऱ्यांचं नॅशनल रजिस्टर तयार केलं जाणार आहे. यासोबतच पीडितेची ओळख गुप्त ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.


🔰राष्ट्रपती भवनाकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेलं असून या नव्या अध्यादेशांतर्गत बलात्कार प्रकरणांची लवकर सुनावणी व्हावी यासाठी देशभरात विशेष न्यायालयं उभारली जाणार  आहेत. चार महिन्याच्या आत प्रकरणाचा निकाल लावला जाईल.

प्लासीची लढाई

१७५५ मध्ये सेंट डेव्हिड येथे त्याची गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. हिंदुस्थानात येताच त्याने बंगालचा नबाब सिराजुद्दौला याच्या सैन्यास कलकत्ता येथे हाकलून दिले आणि फ्रेंचांकडून चंद्रनगर घेऊन बंगालमधून त्यांचे कायमचे उच्चाटन केले. पुढे १७५६ मध्ये बंगालचा सुभेदार अलीवर्दीखान मरण पावल्यावर त्याचा नातू सिराजुद्दौला हा गादीवरआला.

या वेळी यूरोपात इंग्रज व फ्रेंच यांमध्ये पुन्हा युद्ध जंपले. त्यामुळे इंग्रज गव्हर्नर ड्रेक याने सिराजुद्दौला याची परवानगी न घेता, कलकत्ता येथील फोर्ट विल्यमची तटबंदी सुरू केली. यावेळी डाक्क्याचा कारभारीही सिराजुद्दौलाविरुद्ध उठला. सिराजुद्दौलाने त्याचा बंदोबस्त केला, परंतु त्याचा मुलगा किसनदास सर्व संपत्तीनिशी इंग्रजांना मिळाला.

सिराजुद्दौलाने तटबंदी बंद करण्याविषयी तसेच किसनदासास ताब्यात देण्याविषयी इंग्रजांस सांगितले. पण ही गोष्ट इंग्रजांनी ऐकली नाही, तेव्हा त्याने इंग्रजांवर चढाई केली. कलकत्त्यास वेढा घालून ते ठिकाण काबीज केले. या वेळी जनता सिराजुद्दौलाच्या कारभारास कंटाळली होती. तिने मीर जाफर ह्या सेनापतीच्या नेतृत्वाखाली बंड केले. क्लाइव्हाने ह्या संधीचा फायदा घेऊन कट केला  त्यात मीर जाफर ह्यास हाताशी धरले आणि सिराजुद्दौलास पदच्युत करून मीर जाफर यास नबाब करण्याचे ठरविले. क्लाइव्हने नबाबावर चालून जावे व मीरजाफरने आयत्या वेळी त्यास मिळावे, असा उभयतांमध्ये बेत ठरला. हा बेत उमीचंद सावकारास कळला, त्याने क्लाइव्हकडून गुप्ततेसाठी बरीच रक्कम मागितली. क्लाइव्हने ते मान्य केले. पण दोन स्वतंत्र कागद करून रकमेचा आकडा घातलेल्या कागदावर गव्हर्नर वॉट्सनची खोटी सही केली.

सिराजुद्दौलाचा १७५७ मध्ये प्लासीच्या लढाईत पराभव केला आणि बंगालमध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घातला. त्यानंतर त्याने मीर जाफरला मुर्शिदाबादच्या गादीवर बसवून त्याच्याकडून २३,४०,००० रु. रक्कम, २५ लाखांचा मुलूख व कंपनीस बिहारमधील सोन्याचा मक्ता मिळविला. साहजिकच त्यामुळे फ्रेंच व डच ह्यांचा बंदोबस्त झाला. परंतु १७५९ मध्ये दिल्लीच्या बादशाहचा मुलगा शाह आलमने अलाहाबाद आणि अयोध्या येथील सरदारांशी संगनमत करून मीर जाफरवर स्वारी केली. दरम्यान क्लाइव्हने त्यास मीर जाफरकडून नजराणा देऊन ते प्रकरण मिटविले. याकरिता चोवीस परगण्याच्या मालकी हक्काबद्दल कंपनीकडून येणारा वसूल क्लाइव्हला लावून दिला. १७६० मध्ये तो इंग्लंडला परतला. तेथे प्लासीचा लॉर्ड हा किताब देऊन त्याचा सन्मान करण्यात आला

Onine Test Series

नोबेल पुरस्कार २०२० विजेते


🏆 वद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२० 

👤 १) हार्वे अल्टर (अमेरिका)

👤 २) मायकल होउगटन (ब्रिटन)

👤 ३) चार्ल्स राइस (अमेरिका)


🏆 भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) रॉजर पेनरोज (ब्रिटन)

👤 २) रेनहार्ड गेंजेल (जर्मनी)

🙎‍♀ ३) अॅण्ड्रीया गेज (अमेरिका)


🏆 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२० 

🙎‍♀ १) इमॅन्यूअल शार्पेंची (जर्मनी)

🙎‍♀ २) जेनफिर डाउडना (अमेरिका)


🏆 साहित्यातील नोबेल पुरस्कार २०२० 

🙎‍♀ १) लुईस ग्लुक ( अमेरिका )


🏆 शांततेतील नोबेल पुरस्कार २०२० 

🌾 १) संयुक्त राष्ट्र अन्न सुरक्षा कार्यक्रम


🏆 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) पॉल आर. मिलग्रोम (अमेरिका)

👤 २) रॉबर्ट बी. विल्सन (अमेरिका)

महाराष्ट्रातील मुख्य संस्था


1. सत्यशोधक समाज

- स्थापना: 24 सप्टेंबर 1873, पुणे

- संस्थापक: महात्मा फुले 

- ब्रीद वाक्य: सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी


2. प्रार्थना समाज

- स्थापना: 31 मार्च 1867, मुंबई 

- संस्थापक अध्यक्ष: डाॅ. आत्माराम पांडुरंग 

- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले.


3. सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना असोसिएशन)

- स्थापना: 2 एप्रिल 1870, पुणे 

- संस्थापक: न्या. रानडे & गणेश वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)

- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी


4. आर्य समाज

- स्थापना: 10 एप्रिल 1875, मुंबई 

- संस्थापक: स्वामी दयानंद सरस्वती

भारतीय वंशाचे राजा जॉन ‘नासा’च्या चांद्रवीर चमूत



⚡️अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने चंद्रावरील ‘आर्टेमिस’ मानवी अवकाश मोहिमेसाठी संभाव्य चांद्रवीरांची नावे निश्चित केली असून त्या अठरा जणांमध्ये भारतीय वंशाचे अमेरिकी राजा जॉन वुरुपतूर चारी यांचा समावेश करण्यात आला आहे. या चमूत निम्म्या महिला आहेत. 


⚡️चारी हे अमेरिकेच्या हवाई दलातील माजी अधिकारी आहेत. नासाने त्यांची निवड चांद्रमोहिमेतील संभाव्य चांद्रवीरात केली आहे. नासाने बुधवारी १८ संभाव्य चांद्रवीरांची यादी जाहीर केली असून आर्टेमिस चांद्र अवतरण मोहिमेत त्यांच्यापैकी काहींना संधी मिळण्याची शक्यता आहे. 


⚡️ही मोहीम २०२४ मध्ये माणसाला चंद्रावर उतरवणार आहे. दशक अखेरीस चंद्रावर शाश्वत मानवी अस्तित्व निर्माण करण्याचा हेतू या मोहिमेत असून त्याची पहिली पायरी म्हणून २०२४ मध्ये पहिली महिला चंद्रावर उतरणार आहे. 


⚡️यापूर्वी अमेरिकेच्या अपोलो मोहिमांनी चंद्रावर मानवी मोहिमा राबवल्या होत्या.

शक्ती कायदा:-



 महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर जलद करवाई करता यावी आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला शिक्षा देता यावी यासाठी महाराष्ट्र सरकार दोन कायदे करणार आहे.


 आंध्र प्रदेशच्या 'दिशा' कायद्याच्या धर्तीवर 'शक्ती' नावाचे हे दोन कायदे असतील. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेलं हे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडलं जाणार आहे.

 महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कारवाई करता यावी, यासाठी प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) ॲक्ट 2020 आणि स्पेशल कोर्ट ॲड मशिनरी फॉर इंप्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ 2020 अशी दोन विधेयकं विधिमंडळासमोर मांडण्यात येणार आहेत.


सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण अध्यक्षतेखाली यासाठी एक उपसमिती नेमण्यात आली होती. या समितीमध्ये अनिल देशमुख, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड या मंत्र्यांचा समावेश होता


● प्रस्तावित 'शक्ती' कायद्यानुसार :-


• महिला अत्याचारांच्या प्रकरणात 21 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करुन खटला चालवून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे. महिलांवरील अॅसिड हल्ले आणि बलात्कारासारखे गुन्हे अजामीनपात्र करण्यात येणार आहेत.


• इतकंच नाही तर महिलांचा जर ई-मेल, इलेक्ट्रॉनिक मीडियातून किंवा मेसेजद्वारे छळ करण्यात आला तसंच त्यांच्यावर जर कुणी आक्षेपार्ह कमेंट केली तर त्यासाठीही कडक शिक्षा होणार आहे.


• हे सगळे गुन्हे अजामीनपात्र असतील


• बलात्कार प्रकरणी, Rarest of rare प्रकरणात फाशीच्या शिक्षेचीही तरतूद ठेवण्यात आली आहे.


• आपल्याच ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची तरतूद करण्यात आलीय.


• 16 वर्षांपेक्षा कमी असलेल्या मुलींवर अत्याचार झाल्यास गुन्हेगाराला मरेपर्यंत जन्मठेप होऊ शकते.


• सामूहिक बलात्कारप्रकरणी 20 वर्ष कठोर जमठेपेची तरतूद किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि 10 लाख रुपये दंड किंवा मृत्युदंडाची तरतूद असेल


• 12 वर्षाखालील मुलीवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत कठोर जन्मठेपेची शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड


• महिलांवर पुन्हा पुन्हा अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकते.


• अॅसिड हल्ल्याप्रकरणी किमान 10 वर्षांची किंवा मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि पीडित व्यक्तीला दंडाची रक्कम द्यावी लागेल


• अॅसिड फेकण्याचा प्रयत्न केल्यास 10 ते 14 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो


• महिलेचा कोणत्याही पद्धतीने छळ केल्यास किमान 2 वर्ष तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड होऊ शकतो


• सोशल मीडिया, मेल, मेसेज, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या माध्यमातून महिलांवर कमेंट करणे, धमकी देणे, चुकीची माहिती पसरवणे यासाठी पण शिक्षेची तरतूद या प्रस्तावित कायद्यांत करण्यात आलीये.


● याचबरोबर फौजदारी प्रक्रियेमध्येही या कायद्याअंतर्गत काही बदल सुचवले गेलेत.


•  तपासाचा कालावधी दोन महिन्यांवरून 15 दिवसांचा केला आहे.


•  खटला चालवण्याचा कालावधी दोन महिन्यांवरून 30 दिवसांचा केला गेलाय.


•  अपील करण्याचा कालावधी सहा महिन्यांवरून 45 दिवसांवर आणण्यात आलाय.


•प्रक्रियांमध्ये बदल करत असतानाच इतरही व्यवस्थांमध्ये म्हणजे न्यायालयीन, पोलीस आणि सामाजिक व्यवस्थांतही काही प्रस्ताव सूचवण्यात आलेत.


•  36 अनन्य विशेष न्यायालयं स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.


•  प्रत्येक घटकामध्ये महिला आणि लहान मुलांवरील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी जिल्हा अधीक्षक किंवा आयुक्तालयात विशेष पोलीस पथक, ज्यामध्ये किमान एका महिला अधिकाऱ्याचा समावेश असेल, असं नेमण्याचंही प्रस्तावित आहे.


• पीडितांना मदत आणि सहकार्य करण्यासाठी सेवाभावी संस्थांना अधिसूचित करण्याचाही प्रस्ताव आहे.

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे (१९५० ते १९८५)


🇮🇩 १९५० : राष्ट्रपति सुकर्णो (इंडोनेशिया) 

🇳🇵 १९५१ : त्रिभुवन बीर बिक्रम शाह (नेपाल) 

🚫 १९५२ : आमंत्रण नाही

🚫 १९५३ : आमंत्रण नाही

🇧🇹 १९५४ : जिग्मे दोरजी वांगचुक (भूटान)  

🇵🇰 १९५५ : मलिक गुलाम मुहम्मद (पाकिस्तान) 

⛳️ १९५६ : आर. ए. बटलर (युके) व कोटारो तनाका (जापान)

⛳️ १९५७ : जॉर्जिया झुकोव (सोवियत युनियन)

🇨🇳 १९५८ : मार्शल ये जियानिंग (चीन)

🇬🇧 १९५९ : ड्यूक प्रिंस फिलिप (यूनाइटेड किंगडम)

⛳️ १९६० : क्लीमेंट वोरोशिलोव (सोवियत युनियन) 

🇬🇧 १९६१ : महारानी एलिझाबेथ द्वितीय (यूके) 

🇩🇰 १९६२ : विग्गो कंम्पमन्न (डेनमार्क) 

🇰🇭 १९६३ : नोरोडोम सिहानोक (कंबोडिया)

🇬🇧 १९६४ : लॉर्ड लुईस माउंटबैटन (यूके)

🇵🇰 १९६५ : राणा अब्दुल हमीद (पाकिस्तान)

🚫 १९६६ : आमंत्रण नाही

🇦🇫 १९६७ : मोहम्मद जहीर शाह (अफगानिस्तान)

⛳️ १९६८ : अलेक्सी कोसिगिन (सोवियत युनियन) व जोसीप ब्रोज टिटो (यूगोस्लाविया)

🇧🇬 १९६९ : टोडोर झिव्कोव (बल्गेरिया)

🇧🇪 १९७० : राजा बौदौइन (बेल्जियम) 

🇹🇿 १९७१ : जूलियस न्येरे (तंझानिया)

🇲🇺 १९७२ : सीईवोसगुर रामगुलाम (मॉरीशस)

⛳️ १९७३ : मोबूतु सेसे सेको (जैरे)

⛳️ १९७४ : जोसीप ब्रोज़ टिटो (यूगोस्लाविया) व सिरिमावो बंडरानाइक (श्रीलंका)

🇿🇲 १९७५ : केनेथ कौंडा (झाम्बिया)   

🇫🇷 १९७६ : जाक शिराक (फ्रांस) 

🇵🇱 १९७७ : एडवर्ड गिरेक (पोलंड)  

🇮🇪 १९७८ : पैट्रिक हिलेरी (आयर्लंड)

🇦🇺 १९७९ : मैल्कम फ्रेजर (ऑस्ट्रेलिया)

🇫🇷 १९८० : वैलेरी गिस्कर्ड डी एस्टाइंग (फ्रांस)

🇲🇽 १९८१ : जोस लोपेज पोर्टिलो (मॅक्सिको) 

🇪🇸 १९८२ : जुआन कार्लोस आई (स्पेन)

🇳🇬 १९८३ : शेहू शागरी (नाइजेरिया)

🇧🇹 १९८४ : जिग्मे सिंग्ये वांगचुक (भूटान)

🇦🇷 १९८५ : राउल अल्फोन्सिन (अर्जेंटीना) .



🛑 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे (१९८६ ते २०२१) 


🇬🇷 १९८६ : एंड्रियास पैपांड्रेउ (ग्रीस) 

🇵🇪 १९८७ : एलन गार्सिया (पेरू)

🇱🇰 १९८८ : जे. आर. जयवर्धने (श्रीलंका)

🇻🇳 १९८९ : गुयेन वान लिन (वियतनाम)

🇲🇺 १९९० : अनिरुद्ध जुग्नाथ (मॉरीशस) 

🇲🇻 १९९१ : ममून अब्दुल गयूम (मालदीव)

🇵🇹 १९९२ : मारियो सोरेस (पोर्तुगाल)  

🇬🇧 १९९३ : जॉन मेजर (यूनाइटेड किंगडम)

🇸🇬 १९९४ : गोह चोक टोंग (सिंगापुर) 

🇿🇦 १९९५ : नेल्सन मंडेला (दक्षिण अफ्रीका) 

🇧🇷 १९९६ : डॉ. फर्नांडो हेनरीक कार्डोसो (ब्राझील) 

🇹🇹 १९९७ : बासदेव पांडे (त्रिनिदाद आणि टोबैगो

🇫🇷 १९९८ : जैक शिराक (फ्रान्स) 

🇳🇵 १९९९ : बिरेंद्र वीर विक्रम शाह देव (नेपाल)

🇳🇬 २००० : ओलेजगुन ओबासांजो (नाइजेरिया)

🇩🇿 २००१ : अब्देलजीज बुटीफिला (अल्जेरिया)    

🇲🇺 २००२ : कसम उतेम (मॉरीशस)

🇮🇷 २००३ : मोहम्मद खटामी (ईरान)  

🇧🇷 २००४ : लुइज इनासिओ लुला दा सिल्वा (ब्राझील) 

🇧🇹 २००५ : जिग्मे सिंग्ये वांगचुक (भूटान)

🇸🇦 २००६ : अब्दुल्ला बिन अब्दुलअजीज अलसऊद (सऊदी अरब)

🇷🇺 २००७ : व्लादिमीर पुतिन (रशिया)

🇫🇷 २००८ : निकोलस सरकोजी  (फ्रान्स)

🇰🇿 २००९ : नूरसुल्तान नजरबायेव (कजाखस्तान) 

🇰🇷 २०१० : ली मयूंग बाक (दक्षिण कोरिया) 

🇮🇩 २०११ : सुसिलो बांम्बांग युधोयोनो ( इंडोनेशिया)

🇹🇭 २०१२ : यिंगलुक शिनावात्रा (थायलंड)

🇧🇹 २०१३ : जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक (भूटान)

🇯🇵 २०१४ : शिन्जो आबे (जापान) 

🇺🇲 २०१५ : बराक ओबामा (अमेरिका)

🇫🇷 २०१६ : फ्रेंकोइस होलैंड (फ्रान्स) 

🇦🇪 २०१७ : शेख मोहम्मद बिन जायेद अल नाहयान (युएई)

⛳️ २०१८ : आशियान देशाचे प्रमुख

🇿🇦 २०१९ : सिरिल रामफोसा (दक्षिण आफ्रिका)

🇧🇷 २०२० : जायर बोल्सनारो (ब्राझील)

🇬🇧 २०२१ : बोरिस जॉनसन (यूके) .

सर्व धर्मातील नागरिकांसाठी एकाच आधारावर घटस्फोट.


🔰दशातील सर्व धर्मातील नागरिकांसाठी एकाच आधारावर घटस्फोट देण्यात यावा या मागणीसाठीच्या याचिकेवर सुनावणीस मान्यता देताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे.


🔰आतरराष्ट्रीय करार आणि भारतीय घटनेचा सन्मान करत देशातील सर्व नागरिकांसाठी घटस्फोट एकाच आधारावर देण्यात यावा, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.तर त्यावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला नोटीस बजावली असून सरकारने आपले म्हणणे मांडल्यानंतर पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे.


🔰घटस्फोटासंबंधी कायदे (कलम 14, 15, 21 आणि 44) तपासून एकाच आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी भारतीय विधि आयोगाला सूचना करण्याचे निर्देश देऊ असे सरन्यायाधीश एस.ए. बोबडे आणि न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना आणि व्ही. रामसुब्रमनियन यांच्या पीठाने सांगितले.

WhatsApp Payments सर्व्हिस भारतात सुरू.


➡️भारतात डिजिटल पेमेंट सर्व्हिस प्रोव्हाईडरमध्ये  (Digital Payment Service Providers) आज आणखी एक नवीन नाव जोडले आहे.


➡️ ज व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट्स सर्व्हिस (WhatsApp Payments service) आहे.आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, एसबीआय आणि एचडीएफसी या प्रमुख बँकांच्या भागीदारीने फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने भारतात डिजिटल पेमेंट सर्व्हिस सुरू केली आहे.


➡️तसेच याठिकाणी या चारही बँकांचे कोट्यावधी ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने ऑनलाईन पैसे पाठवू शकतात आणि आपल्या खात्यावर मागवू शकणार आहेत.

तर यासाठी त्यांना व्हॉट्सअ‍ॅपच्या होमपेजवर उजवीकडे वरच्या बाजूस दिसणार्‍या तीन डॉट्सवर क्लिक करावे लागेल.


➡️यानंतर, आपल्याला Payment चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर पेमेंट विंडो उघडेल, ज्यामध्ये तुम्हालाAdd new payments method वर क्लिक करावे लागेल. त्यावर क्लिक करा आणि accept केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपने भागीदारी केलेल्या बँकांची नावे दिसतील.

वाचा :- महत्त्वाचे प्रश्न उत्तरे


१) कोणत्या बँकेला ' BestPerforming Bank Award ' देण्यात आला आहे ? 

✓ आंध्र बँक


२) देशातील पाहिले ट्रान्सजेंडर विद्यापीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यातयेणार आहे ? 

✓कुशीनगर (उ.प्र.)


३) नवी दिल्लीतील प्रगती मैदान मेट्रो  स्थानकाचे नाव बदलून काय ठेवण्यातआले ? 

✓ सुप्रीम कोर्ट मेट्रो स्थानक


४) कोणते राज्य २०२० मधील प्रत्येक  महिन्याचा पहिला दिवस                            No Vehicle Day म्हणून पाळणारआहे? 

✓ राजस्थान


५) कोणते राज्य पहिल्यांदाच हिम बिबट्याचे सर्वेक्षण करणार आहे ?

 ✓ उत्तराखंड


६) कोणत्या राज्य सरकारने २०२० हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून घोषित केले आहे ? 

✓ तेलंगणा


७) कोणत्या राज्यातल्या परिवहनविभागाने नुकतीच ' दामिनी ' नावाचीमहिलांसाठी एक हेल्पलाइन सुरू केली ? 

✓ उत्तर प्रदेश


८) राज्यातील पहिले दिव्यागंसाठी न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले ? 

✓ शिवाजीनगर पुणे


९)' जल जीवन हरियाली मिशन ' हा  कोणत्या राज्याचा उपक्रम आहे ?

✓ बिहार


१०) कोणते राज्य LGBT समुदायासाठी समर्पित राज्यस्तरीय अदालतआयोजित करणार आहे ? 

✓ केरळ

ओला कंपनी भारतात उभारणार इलेक्ट्रिक स्कूटर चा जगातील सर्वात मोठा कारखाना

🔰ओला कंपनी भारतात जगातील इलेक्ट्रिक स्कूटर ची मोठी फॅक्टरी उभारणार आहे.ही फॅक्टरी तमिळनाडू राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे.

▶️ ओला कंपनी या प्रोजेक्टसाठी 2400 कोटीची गुंतवणूक करणार आहे. यामुळे किमान दहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

▶️ सुरुवातीच्या वर्षाला 2000000 स्कूटर उत्पादित केल्या जाणार आहे.

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...