नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
१५ डिसेंबर २०२०
काही समानार्थी म्हणी
आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
खाण तशी माती - बाप तसा बेटा
आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण
mpsc ने विचारलेल्या मराठी व्याकरण या विषयावरील प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे
Q116) 'सूर्यास्त अधिक सांगणे न लगे' या विमानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. (STI MAIN 2016)
🔴अनियमित ✅✅✅
⚫️शक्य
🔵परयोजन
⚪️भावकर्तुक
Q117) 'तुम्ही पुढे व्हा, मी आलोच.' या विधानातील काळ ओळखा:(PSI MAIN 2016)
🔴वर्तमान काळ
⚫️भतकाळ
🔵सनिहीत भविष्यकाळ✅✅✅
⚪️अपूर्ण वर्तमानकाळ
Q118) कर्तरी प्रयोगात आपली हुकूमत चालवितो. (TAX asst 2017)
🔴कर्ता✅✅✅
⚫️कर्म
🔵लिंक
⚪️वचन
Q119)___हा प्रयोग इंग्रजीतून मराठी आला आहे. (STI 2016)
🔴नवीन कर्मनी✅✅✅
⚫️समापण कर्मणी
🔵शक्य कर्मणी
⚪️पराण कर्मणी
Q120) 'नेआण' या शब्दाचा समास कोणता? (STI 2017)
🔴दवंद्व समास
⚫️समहार समास
🔵बहुव्रीही समास
⚪️इतरेतर द्वंद्व ✅✅✅
Q121) द्वंद्व समासाचा कोणता प्रकार मराठीत नाही? (STI 2017)
🔴वकल्पिक
⚫️इतरेतर
🔵समाहार
⚪️एकशेष✅✅✅
Q122)शब्दांच्या शक्ती ........ आहेत. (Clerk 2015)
🔴3✅✅✅✅
⚫️4
🔵2
⚪️1
Q123) सर्वांना समज दिली जाईल या वाक्याचा प्रयोग ओळखा. (राज्यसेवा मुख्य 2016)
🔴कर्म कर्तरी ✅✅✅
⚫️भाव कर्तरी
🔵शक्य कर्मनी
⚪️यापैकी नाही
Q124)जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना------म्हणतात. (Clerk 2017)
🔴करियाविशेषण
⚫️उभयानव्यी
🔵कवलप्रयोगी✅✅✅
⚪️शब्दयोगी
Q125)'मला गाडीत पहिले आसन मिळावे' या वाक्याचा प्रकार ओळखा?(PSI 2016)
🔴आज्ञार्थी
⚫️सकेतार्थी
🔵सवार्थी
⚪️विद्यर्थी✅✅✅
चालू घडामोडी प्रश्नसंच
१) प्रधानमंत्री मातृवंदन योजनेत पात्र लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळते ?
अ) १५०० रुपये
ब) २००० रुपये
✓क) ५००० रुपये
ड) ६००० रुपये
२) खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने ' शिवभोजन ' योजना सुरू केली.
अ) छत्तीसगड
ब) हरियाणा
क) गुजरात
✓ड) महाराष्ट्र
३) मराठवाडा साहित्य परिषदेचा यंदाचा कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
✓अ) डॉ. अक्षयकुमार काळे
ब) दिनकर मनवर
क) यशवंत मनोहर
ड) यापैकी नाही
४) खालीलपैकी कोणत्या शहरात भारत पर्व २०२० हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
अ) मुंबई
ब) पुणे
क) नागपुर
✓ड) नवी दिल्ली
५) खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने ' मुख्यमंत्री कृषक दुर्घटना कल्याण योजना ' लागू केली ?
अ) महाराष्ट्र
✓ब) उत्तरप्रदेश
क) केरळ
ड) आसाम
सरकारी कर्मचाऱ्यांनाही आता ड्रेस कोड; जीन्स टी-शर्टवर बंदी
सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश
🔶सरकारी कर्मचाऱ्यांनाही आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहेत. कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे आधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थीत असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरुप ठरेल अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होते.
🔶सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून एका चांगल्या प्रतीच्या वागणुकीची तसेच व्यक्तीमत्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते. अशा परिस्थितीत जर आधिकारी व कर्मचारी यांची वेशभूषा ही अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्याच्या एकंदरीत कामकाजावरही होतो. या सर्व बाबी विचारात घेता मंत्रायलय तसेच सर्व राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत पुढील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत…
१) गडद रंगांचे चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत. तसेच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स टी-शर्टचा वापर कार्यालयामध्ये करू नये.
२) खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा.
३) महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा तसेच पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बूट (शूज), सॅन्डल याचा वापर करावा.
४) कार्यालयामध्ये स्लिपरचा वापर करू नये
५) सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा. जसे महिला कर्मचार्यांनी कार्यालयात साडी, सलवार/चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पँट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा यासह पेहराव करावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर पॅन्ट असा पेहराव करावा.
६) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता घ्यावी.
भौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा
👉 अम्पिअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे परिमाण. एका संकेदाला वाहणारा 6x10 इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे एक अॅम्पिअर होय.
👉 बार :- बार (हवेचा दाब) मोजण्याचे परिमाण. एका चौ.से.मी. वर असलेला 10 डाईन एवढा हवेचा भार म्हणजे 1 बार होय. एका बारचा हाजारावा भाग म्हणजे मिलिबार होय.
👉 कलरी :- उष्णतेचे परिमाण. 1 ग्रॅम वजनाच्या पाण्याचे तापमान 1 सें.ग्रॅ. मे वाढवण्यास जेवढी उष्णता लागते ती एक कॅलरी होय. एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थापासून शरीरास किती ऊर्जा वा उष्णता मिळेल तेही या परिमाणात व्यक्त करतात.
👉 ओहम :- विद्युतरोधाचे परिमाण 1 अॅम्पियर वाहकाच्या दोन टोकांमध्ये 1 व्होल्ट विद्युतदाब असताना विद्युतधारा जाऊ दिली असता जितका विद्युत विरोध निर्माण होतो. तो 1 ओहम होय. 1 ओहम = 1 व्होल्ट/ 1 अॅम्पियर
👉 अश्चशक्ती :- यंत्राची शक्ती मोजण्याचे परिमाण 550 पौंड वजनाची वस्तु सेकंदामध्ये 1 फुट पुढे सरकण्यास लागणारी शक्ती म्हणजे एक अश्वशक्ती होय. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होय.
👉 जयूल :- कार्य किंवा ऊर्जेचे परिमाण 1 व्होल्ट दाबाच्या विद्युत मंडलतून 1 अॅम्पियर शक्तीचा विद्युत प्रवाह 1 सेकंद पाठविल्यास जेवढी ऊर्जा खर्च होईल ती 1 ज्यूल होय.
👉 वहोल्ट :- विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम विरोध असणार्या विद्युत मंडळातून एक अॅम्पियर प्रवाह पाठविण्यासाठी लागणारा एकूण विद्युत दाब म्हणजे एक व्होल्ट होय.
👉 वट :- विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम 1 अॅम्पियरचा परिवता प्रवाह 1 सेकंदात जेवढी ऊर्जा खर्च करेल ती एक वॅट होय. 1000 वॅट = 1 किलोवॅट.
👉 नॉट :- जहाजाच्या वेगाचे परिमाण. हा वेग दर ताशी साधारणपणे 1,853 मीटर किंवा 6,080 फुट इतका असतो. यालाच नॉटिकल मैल असेही म्हणतात. सागरावरील सर्व अंतरे याच परिमाणात मोजतात.
👉 सौर-दिन :- दर दिवशी सूर्य मध्यान्हीला डोक्यावर येत असतो. लागोपाठ येणार्या दोन मध्यान्हीमधील कालावधीला सौर-दिन असे म्हणतात. सौर-दिनाचा काल ऋतुनुसार बदलत असतो. संपूर्ण वर्षातील सौर-दिनांच्या कलावधीवरुन मध्य सौरदिन ठरवतात. मध्य सौर दिन सर्वसाधारणपणे 24 तासांचा असतो.
👉 परकाश वर्ष :- प्रकाशवर्ष विश्वातील ग्रह व तारे यातील अंतरे मोजण्याचे परिमाण आहे. प्रकाशाचा वेग दर सेकंदाला (3x10)8 मी./सेकंद इतका आहे. या वेगाने प्रकाश किरणाने वर्षभरात तोडलेले अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष होय. 1 प्रकाश वर्ष = (9.46x10)12 किमी .
ठाकरे सरकारचा एक निर्णय आणि राज्यातील सर्व शाळांमधली हजारो शिपाई पदं धोक्यात
राज्यातील सर्व अनुदानित व अंशत: अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये शिपाई पदे फक्त कंत्राटी पद्धतीनेच भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने या अनुषंगाने काढलेल्या निर्णयात ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिपायांसाठी पाच हजार रुपये, महापालिका क्षेत्र वगळून अन्य भागात ७ हजार ५०० रुपये तर शहरी भागात दहा हजार रुपये मानधनावर नियुक्ती केली जाईल असे शासन निर्णयात म्हटले आहे. सरकारचा हा निर्णय निषेधार्ह असल्याचे शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी म्हटले आहे.
राज्यातील ५२ हजार शिपाई पदे या निर्णयामुळे धोक्यात आली आहेत. या अनुषंगाने तत्कालीन शिक्षण आयुक्त भापकर यांनी दिलेल्या अहवालाचा विचार न करता राज्य सरकारने घेतलेला या निर्णयाला विरोध करू, असे आमदार काळे यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध मंजूर करण्याऐवजी प्रति शाळा शिपाईभत्ता लागू केला आहे. विद्याार्थिसंख्येच्या प्रमाणात किती पदे आणि त्यासाठीचे मानधन याचा तक्ता शासन निर्णयाने लागू करण्यात आला आहे.
मुंबई व पुणे महापालिका क्षेत्रांसाठी दहा हजार रुपये, मुंबई-पुणे व अन्य महापालिका क्षेत्रे वगळून प्रतिमाह ७ हजार ५०० रुपये तर ग्रामीण भागांसाठी हे मानधन फारच तुटपुंजे असल्याचे सांगण्यात येते. शेतात राबणाऱ्या मजुराला प्रतिदिन ४०० रुपये हजेरी मिळते तसेच महिला मजुरासही २०० रुपये मिळतात. अशा काळात पाच हजार रुपयात शिपाईभत्ता देण्याचा निर्णय अन्यायकारक आहे, असे सांगण्यात येत आहे. या अनुषंगाने बोलताना आमदार विक्रम काळे म्हणाले, की शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक वर्षे काम केले आहे. त्यांनी जुळवून आणलेल्या सरकारमध्ये असा निर्णय होणे चुकीचे आहे. या निर्णयाला पूर्ण ताकदीने विरोध करू.
खासगी शाळांमधील शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना
🔶राज्यातील विनाअनुदानित खासगी शाळांमध्ये १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यासाठी नवीन अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू करणारी १० जुलै २०२० ची अधिसूचना गुरुवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांनी रद्द केली. जुनी योजना लागू करण्याबाबत वित्त विभागाची मान्यता घेऊन मंत्रिमंडळापुढे तसा प्रस्ताव मांडावा लागेल, असे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलतना सांगितले.
🔶केंद्र व राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर शासकीय, निमशासकीय सेवेत नियुक्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना नवीन अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू केली. राज्यातील खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनाही नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली. जुनी योजना ही फक्त अनुदानित शाळांसाठी लागू करण्यात आली.
🔶कालांतराने विनाअनुदानित शाळांना अनुदान सुरू करण्यात आले. या मुद्यावर अशा शाळांमध्ये १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी योजना लागू करावी, अशी मागणी शिक्षक संघटना व लोकप्रतिनिधींनी केली. परंतु शालेय शिक्षण विभागाने १० जुलै २०२० रोजी १ नोव्हेंबर २००५ नंतर खासगी प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांत नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदायी योजना लागू करण्याची अधिसूचना काढली. त्यावरून वाद निर्माण झाला. ही अधिसूचना रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली.
1 जानेवारीपासून Cheque पेमेंटचा नियम बदलणार...
🚶♂नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जानेवारीपासून बँकिंग सिस्टममध्ये काही बदल होणार आहेत. चेक पेमेंट (Cheque Payment) करण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहे.
🚶♂भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) याबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. त्यानुसार, लोकांना 50 हजार रुपयांहून अधिकच्या रकमेवर जारी करण्यात आलेल्या नियमांचं पालन करावं असणार आहे.
🚶♂भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2021 पासून पॉझिटिव्ह पे सिस्टम (Positive Pay System) लागू होणार आहे.
🚶♂तर या सिस्टममध्ये 50 हजारांहून अधिकच्या पेमेंटसाठी दुसऱ्यांदा रि-कन्फर्म करावं लागेल. या सिस्टमअंतर्गत एसएमएस, मोबाईल अॅप, इंटरनेट बँकिंग आणि एटीएमद्वारे चेक लिहिण्याचा तपशील बँकेत जारी करावा लागेल.
🚶♂तर याच्या माध्यमातून चेकची तारीख, पेमेंट करणाऱ्या व्यक्तीचं नाव, पेयी अर्थात रक्कम घेणाऱ्या व्यक्तीचं नाव, रकमेचे डिटेल्स द्यावे लागतील.
भारतीय रेल्वेमध्ये मेगाभरती; 15 डिसेंबरपासून तीन टप्प्यात होणार ऑनलाइन परीक्षा
भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railway) दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विविध पदांसाठीच्या मेगा भरतीकरता (Mega Recruitment) 15 डिसेंबरपासून ऑनलाइन परीक्षा (online Exam) सुरू होणार आहेत.
तीन टप्प्यात या ऑनलाइन परीक्षा होणार आहेत. तब्बल एक लाख चाळीस हजार पदांसाठी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डतर्फे (Railway Recruitment Board-RRB) या परीक्षा घेण्यात येणार असून, याचं वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे.
'आजतक'ने दिलेल्या वृत्तानुसार, देशभरातील तब्बल 2.5 कोटी उमेदवार ऑनलाइन या परीक्षा देण्याची अपेक्षा आहे. या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी रेल्वेतर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. अनेक तारखांना आणि शिफ्टसमध्ये या परीक्षा होतील. पहिल्या टप्प्यातील परीक्षा 15 ते 18 डिसेंबर दरम्यान, तर दुसऱ्या टप्प्यातील एनटीपीसी विभागातील परीक्षा 28 डिसेंबरपासून सुरू होतील, त्या मार्चपर्यंत चालतील. तर तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा एप्रिल पासून सुरू होऊन जूनअखेरपर्यंत चालतील, असं रेल्वेनं कळवलं आहे.
देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन....
भारतातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते.
कोल्हापुरातील रुग्णालयात सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
एकेकाळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गौरविलेले आणि थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर चमलेले देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांचे सोमवारी सकाळी साडे आठ वाजता वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.
अनेक दिग्ग्जांना आस्मान दाखवणाऱ्या या मल्लाच्या निधनामुळे कोल्हापूरची लाल माती देखील अश्रूनी न्हावून निघाली आहे
Latest post
ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.
१. डॉ. अम्ब्रीश मिथल -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...
-
✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ? 👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये ) ✏️ मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 👉 360 ग्रॅम...
-
१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४ - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...
-
📖 MPSC Maths Marathi🌷: ⚫️ वर्तुळ ⚫️ 1. त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्या ...