Sunday, 13 December 2020

राष्ट्रसभेची स्थापना



राष्ट्रसभेच्या स्थापनेपुर्वीच्या हालचाली


* हिंदी लोकांच्या दु:खांना वाचा फोडण्यासाठी, विशेषत: सुशिक्षित हिंदी तरुणात ऐक्याची भावना निर्माण करून सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी, सुरेंद्रनाथ बनर्जी यांनी बंगालमध्ये २६ जुलै १८७६ साली तरुणांची ' इंडियन असोसिएशन '  ची स्थापना केली. 


* १८५१  सालीच बंगाली विचारवंतानी ' ब्रिटिश इंडिया असोशिएशन ' स्थापन केली होती. 


* मुंबईमध्ये या सुमारास  ' बॉम्बे असोसिएशन ' नावाची संघटना नौरोजी, शंकरशेठ, तेलंग, फिरोजशहा मेहता आदींनी स्थापना केली. 


* १८६७ साली पुण्यात ' सार्वजनिक सभा ' स्थापना झाली.


* १८८४ साली मद्रासमध्ये ' महाजन सभा ' नावाची संघटना स्थापना झाली.


राष्ट्रसभेची स्थापना 


१८५७ च्या उठावानंतर आपल्या स्वातंत्र्यासाठी जुने नेतृत्व व जुन्या प्रेरणा उपयोगी पडणार नाहीत. याची खात्री लोकांना झाली. याच वर्गाने येथून पुढे आपल्या समाजाचे नेतृत्व केले व कालांतराने स्वातंत्र्याची चळवळ उभी केली. या स्वातंत्र्याच्या चळवळीचा उदय होण्यापूर्वी प्रथम राष्ट्रवादाचा उदभव झाला.


राष्ट्रसभेच्या (काँग्रेसच्या) स्थापनेची कारणे


* विविध धर्मसुधारणा चळवळ - १९ व्या शतकात हिंदुस्तानात ब्राम्होसमाज, आर्य समाज, थिओसोफ़िकल सोसायटी, रामकृष्ण मिशन, प्रार्थना समाज, धर्मसंघटना तयार झाल्या. या धर्मसुधारणा सुरु करणाऱ्या राजा राममोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस, या महान पुरुषांनी जागृती घडून आणली.


* समाजसुधारकांचे प्रयत्न


* पाश्चात्य शिक्षणाचा परिणाम


वृत्तपत्रांची महत्वपूर्ण कामगिरी


हिंदुस्तानातील अगदी प्रारंभीची  वृत्तपत्रे इंग्रज गृहस्थांनी सुरु केली होती. प्रारंभीच्या कालखंडात ' दि इंडियन मिरर - कलकत्ता, बॉम्बे समाचार व इंदुप्रकाश - मुंबई, द हिंदू - मद्रास, ट्रिब्युन - लाहोर, वृत्तपत्र हे जनजागृतीचे व राजकीय असंतोषाच्या निर्मितीचे फार मोठे साधन आहे. राजा राममोहन राय - संवाद कौमुदी, देवेंद्रनाथ - तत्वबोधिनी पत्रिका, अरविंद बाबूचे - वंदे मातरम, सुरेंद्रनाथांचे - बंगाली, लोकमान्यचे - मराठा, केसरी  व लाला लजपतराय यांचे - द पिपल.


राष्ट्रसभेची स्थापना व कार्य


* राष्ट्रीय साहित्याची कामगिरी


* हिंदुस्तानच्या प्राचीन संस्कृतीचे पश्चात्त संशोधक व त्यांचे कार्य


* इंग्रजी भाषेचे हिंदी एकात्मतेस सहाय्य


* रेल्वे, तारायंत्रे, पोष्ट इत्यादी भौतिक सुधारणांचा हातभार


* इंग्रजांच्या अतिकेंद्रित राज्यकारभाराचा परिणाम


* आर्थिक शोषण करण्याचे इंग्रजांचे धोरण


लॉर्ड लिटनची दडपशाही धोरणे


* याच सुमारास लिटनने 'Arms Act' पास करून हिंदी लोकांच्या हत्यारे बाळगन्यावर कडक निर्बंध लादण्यात आले.


* इंग्रजांचा वंशश्रेष्ठत्वाचा अहंकार व उद्दामपणा


* इल्बर्ट बिलापासून मिळालेला धडा


* हिंदी सुशिक्षीतावरील अन्याय


१८८५ ते १९०५ या काळातील राष्ट्रसभेची कामगिरी


* सरकारविरुद्ध घेतलेला आक्रमक पवित्रा


* राष्ट्रसभेत हिंदी लोकांनी उत्साह निर्माण केला.


* युरोपियन नेत्यांचे सहकार्य मिळविले.


* राष्ट्रसभेच्या ब्रिटीश समितीचे कार्य


* सरकारविरुद्ध विजय


* राष्ट्रवादी भावनेची वाढ


राष्ट्रसभेचा पहिला कालखंड


* राष्ट्रसभेचे [ काँग्रेसचे ] पहिले अधिवेशन मुंबई येथे डिसेंबर १८८५ मध्ये भरले. त्या अधिवेशनात सर्व हिंदुस्तानातून एकूण ७२ प्रतिनिधी जमा झाले होते.


* दादाभाई नौरोजी यांनी Indian parliamentary Commitee  स्थापन केली.

छत्रपती शाहू महाराज



छत्रपती शाहू (कोल्हापूर) : (२६ जून १८७४– ६ मे १९२२). महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले (१७ मार्च १८८४). राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना राज्याधिकार (२ एप्रिल १८९४) प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला (१८९१). त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या.


त्यांनी प्रशासन-यंत्रणेनची पुनर्ररचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ. ब. लठ्ठे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला; त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले.


कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला (१८९९). कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. लो. टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले. शाहूंनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली. ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले; पण शेवटी शाहूंचीच सरशी झाली. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला. कुलकर्णी-वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना शाहूंचा पाठिंबा या बाबींमुळे तर हा विरोध वाढतच गेला.


वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली होती. परिणामी ते म. फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्‌गुरू' पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले (१९२०). धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत हा एक अभिनव प्रयोग होता.


शाहूंनी आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला. वेदांवरील श्रद्धा व जातिभेदाला विरोध, या आर्यसमाजाच्या तत्त्वांमुळे त्यांनी स्वत:ला ‘आर्यसमाजी' म्हणून घोषित केले; तथापि त्याच्या ते आहारी गेले नाहीत. अर्यसमाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली. पुढे राजाराम कॉलेज आर्यसमाजाकडे चालविण्यासाठी दिले गेले.


बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला (१९१७). प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.


खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून शाहूंनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नासिक, पुणे, नगर, नागपूर इ. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या.


मागासलेल्या जातींत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने शाहूंनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५०% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले. अस्पृश्यतेचे उच्चाटन हे शाहूंनी आपले जीवितकर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूम जारी केले (१९१८-१९). त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले. समाजातील तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. त्यांच्यापैकी अनेकांना माहूत, हूलस्वार, पोलीस, स्वत:चे मोटारचालक म्हणून नेमले. महार-वतन खालसा करून महारांची वेठबिगारीतून आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातींची ‘हजेरी' पद्धतीतून मुक्तता केली. फासेपारधी, कोरवी, माकडवाले यांसारख्या भटक्या व विमुक्त जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले. त्यांना आपले रक्षक म्हणून नेमले. खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले (१९१८). जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणार कायदा जारी केला (१९२०).


याच सुमारास शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली (१९१९). बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला.


अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातिभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली (१९१८). स्वत: पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय (धनगर-मराठा) विवाह घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला (१९१९). मागासलेल्या वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली.


सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. ‘शाहू मिल' ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थानचा कायापालट करणार उपक्रम ठरला. संस्थानी मुलखातील हे सर्वांत मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान सुजलाम्‌-सुफलाम्‌ करून टाकले. शाहूंनी ‘सहकारी संस्थांचा कायदा' करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली (१९१३).


शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अल्दियाखॉं, हैदरबक्षखॉं, भूर्जीखॉं, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायक-गायिकांनी शाहूंच्या आश्रयाने अखिल भारतीय कीर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. बालगंधर्व व संगीतसूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शहूंनीच महाराष्ट्राला दिले. संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह) बांधले. त्याच्या शेजारीच खुल्या नाट्यगृहाचीही सोय केली. शाहूंच्या दरबारात आबालाल रहिमानसारखा महान चित्रकार कलावंत होऊन गेला. बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी प्रभृती चित्रकारांना त्यांचे प्रोत्साहन मिळाले. मल्लविद्येच्या प्रांतात शाहूंनी संस्थानासह सर्व देशांतील मल्लांना उदार आश्रय दिला. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान बांधले. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर ही ‘मल्लविद्येची पंढरी' बनली. खुद्द शाहू हे मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध होते. यांशिवाय त्यांनी कोल्हापुरात साठमारी हा हत्तीचा खेळ सुरू केला. शिकार तर त्यांचा आवडीचा छंद होता. पट्टीचा शिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.


शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी' पदवी बहाल केली (१९१९). त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने (१९१८) ते खचून गेले, तशातच मधुमेहाने ते ग्रासले होते. अखेर मुंबई येथे त्यांचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी 06 May 1922 रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले.

१८५७ च्या उठाव अयशस्वी होण्याची कारणे


* बंडाचा फैलाव सर्व हिंदुस्तानावर झाला नाही.


* हिंदी राजेरजवाड्यांचा पाठींब्याचा अभाव.


* बंडवाल्यांचा सर्वसामान्य नेता मिळू शकला नाही.


* सर्वमान्य ध्येयाचा व कार्यक्रमाचा अभाव


* हिंदी नेते लष्करी डावपेचात कमी पडले.


* साधनसामग्री, अनुभव व मनोधैर्य यात इंग्रज वरचढ


* उठावास जनतेचा पाठींबा पाहिजे तसा मिळाला नाही.


* बंडवाल्यांचा नेत्यात दुही होती


* आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल

जगातील आश्चर्ये



🔺मानवनिर्मित आश्चर्ये


1) इजिप्त मधील पिरॅमिड - इसवी पूर्व २७०० ते २५०० पाहिले इजिप्तच्या प्राचीन राज्यांनी फॅरो अनेक थडगी पिरॅमिट्स नाईल नदीच्या काठी आहेत. त्यापैकी कैरोजवळ नाईलच्या पश्चिम तीरावरील गिझा येथे प्रचंड पिरॅमिड आहेत. यातील सर्वात मोठा पिरॅमिड खुफूचा पिरॅमिड आहे. त्याने १३ एकर जागा व्यापली आहे.


2)बॅबिलॉन इराक येथील तरंगता बगीचा - प्राचीन मॅसोपोटोमियाचा खाल्डिन राजा दुसरा नेबूचाडनेझार याने आपल्या राजवाड्याच्या ४०० बाय ४०० फूट मापाच्या चौरस गच्चीवर तरंगता व झुलता बगीचा बांधला तो ७५ फूट उंचीवर होता.


3) अलेक्झांड्रिया बंदराजवळील दीपगृह - राजा दुसरा टॉलेमी यांनी फॅरोस बेटावर हे संगमररी दीपगृह बांधले. याची उंची १२२ मीटर होती. आज हे दीपगृह अस्तित्वात नाही कारण ते भूकंपामुळे नष्ट झाले.


4) ऱ्होड्स बेटावरील प्रचंड पुतळा - भूमध्य समुद्रातील ऱ्होड्स नावाच्या एक ग्रीक बेटावरील अपोलो या ग्रीक सूर्यदेवाचा ब्राँझ धातूचा पुतळा चेरेस या शिल्पकाराने बनविला होता.


5) इफेसस - आजच्या तुर्कस्तानातील अर्टेमिस या ग्रीक देवीचे भव्य मंदिर आर्टेमिस किंवा डायना देवीचे भव्य संगमवारी मंदिर आहे. सुमारे १८ मी उंच व छप्पर लाकडी होते.


6) हेलीकर्णासस - तुर्कस्तान येथील भव्य कबर - प्राचीन आशिया मायनरमधील कारियाचा राजा मॉसेलस याच्या मृत्यूनंतर त्याची राणी आर्टेमिसिया हिने राजाची ही भव्य कबर खोदली.


7) झ्यूस - प्राचीन ग्रीसमधील ऑलम्पिया येथील झ्यूस या ग्रीक देवाचा सिंहासनावर बसलेला सुमारे ४० फूट उंचीचा हा पुतळा फिडियस या शिल्पकाराने बनविला आहे. सोने व हस्तिदंत या पुतळ्यात समाविष्ट आहे.


8) चीनची भिंत - शी हवांग टी या चिनी सम्राटाने मंगोल आक्रमणापासून चीनचे रक्षण व्हावे म्हणून बांधलेली २४१५ किमीची जगातील सर्वात लांब भिंत. उंची सुमारे २२ फूट, जाडी सुमारे २० फूट.


9) स्टोन हेंज - सॅलिबरी मैदान येथील प्राचीन अनेक टन वजनाच्या शिळांची वर्तुळाकृती रचना.


10) कलोसियम - प्राचीन रोममधील भव्य खुले प्रेक्षागार व रंगमंच. यात सुमारे ४५,००० प्रेक्षकांची बसण्याची व

५००० प्रेक्षकांची उभे राहण्याची सोय होती. सम्राट टायसन यांनी हे बांधकाम केले होते.


11) स्फिक्स - ईजिप्तमधील गिझा येथील पिरॅमिडसमोरील मानवी शीर्ष व सिंहाचे शरीर असलेला आणि एकाच सलग पाषणातून कोरलेला १६० फूट लांब व ७० फूट उंच पुतळा. 


12) नानकिंग मनोरा - चीनच्या इतिहासातील राजधानी नानकिंग येथे असलेला हा मनोरा चिनी मातीचा आहे. 


13) पिसाचा झुकता मनोरा - इटलीतील पिसा येथे हा सुप्रसिद्ध मनोरा जो बांधकाम करत असताना काही दोषामुळे कलू लागला तर त्याचा तोल साधत त्याचे बांधकाम सुरू ठेवले. त्यामुळे हा झुकता बनला. 


14) अंगकोर मंदिर - कंबोडियातील  मंदिर पहिला धरणीद्रवर्मन व दुसरा सूर्यववर्मन यांच्या कारकिर्दीत विष्णूचे भव्य मंदिर. 


15) ताजमहाल - मोघल सम्राट शहाजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मुर्तीप्रित्यर्थ ही वास्तू बांधली. आग्रा येथे यमुना नदीच्या ठिकाणी संपूर्ण पांढऱ्या संगमवरी दगडात बांधली आहे. 


16) श्वेन डेगॉन पॅगोडा - म्यानमारची राजधानी यांगोनजवळील ही वस्तू म्हणजे बौद्ध मंदिर आहे. ९८ मीटर उंचीचे असून ते सोन्याचे मढवलेले आहे. व या मंदिरात भगवान बुद्धाचे आठ केस जतुन ठेवले आहे. 


17) भूमिगत कब्रस्तान - इटलीच्या रोम शहरात हे आरंभीच्या ख्रिस्ती धर्मियांचे कबरस्थान आहे. 


18) हॅगिया सोफिया चर्च - रोमन सम्राट काँस्टंन्तीन याने हे चर्च बांधले हे भव्य चर्च तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे आहे. भव्य घुमट हे या वास्तूचे वैशिष्ट्य आहे. 


19) अल्हाम्ब्रा राजवाडा - अरबांनी स्पेनमधील आपल्या वर्चस्वाच्या काळात ग्रानाडा येथे अल अहमद या मूर सुलतानाने हा किल्लासदृश्य राजवाडा बांधला.


पराचीन भारताचा इतिहास :



▪️सिंधू संस्कृती


1) समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.


2) सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.


3) १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.


4) नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.


5) १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.


6) रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.


7) प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.


8) गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.


9) सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.


10) सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.


11) भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.


12) अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.


13) सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.


14) हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.


15) सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.


16) हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.


17) राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.


18) माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.

आझाद हिंद सरकार


◆ नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी सिंगापूरच्या भूमीवरून आझाद हिंद राष्ट्राची घोषणा केली व स्वत:चे सरकारही स्थापन केले, त्या ओजस्वी व ऐतिहासिक घटनेला आज ७५ वर्षे झाली.


◆ ब्रिटिश सत्तेने भारताला 'स्वातंत्र्य' देण्याच्या आधीच नेताजींनी स्वतंत्र राष्ट्राची द्वाही फिरवली. हे राष्ट्र औट घटकेचे-इन मिन दोन वर्षांचेच होते, हे खरे पण त्यामुळे ब्रिटिश सत्तेसमोर आव्हान उभे ठाकले, हेही वास्तव आहे.


◆ जर्मनी, जपान यांचे दोस्त राष्ट्रांविरुद्ध महायुद्ध चालू असतानाच जपानच्या मदतीने नेताजींनी 'अर्जी-ए-हुकुमत आझाद हिंद' या स्वतंत्र राष्ट्राची घोषणा करून साऱ्या जगाला धक्का दिला. १८५७च्या लढ्यानंतर ब्रिटिश साम्राज्याला असे आव्हान कुणी दिले नव्हते.


◆  नव्या देशाकडे स्वत:ची भूमी नव्हती. म्हणून जपानने त्यांच्या ताब्यात आलेली अंदमान, निकोबार बेटे दिली. पोर्ट ब्लेअर ही राजधानी घोषित करण्यात आली. तिथे तिरंगा फडकला व नेताजींनी 'राष्ट्रप्रमुख' म्हणून मानवंदनाही स्वीकारली.


◆  जपान, जर्मनीचे साथी असलेल्या फिलिपाइन्स, क्रोशिया, इटली, थायलंड आदी सात देशांनी नेताजींच्या सरकारला मान्यता दिली. १९४३च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या पूर्व आशिया परिषदेला 'राष्ट्प्रमुख' म्हणून नेताजी उपस्थित राहिले.


◆  अंदमान-निकोबार द्विप समुहाचे नाव बदलून ते शहीद व स्वराज असे करण्यात आले.


◆  हे सारे होत असले तरी ते सारेच क्षणभंगूर ठरले कारण युद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय होत गेला व जपानचा आधार तुटल्याने आझाद हिंद एकाकी पडले. त्यातच १८ आॅगस्ट १९४५ ला नेताजी गूढरित्या गायब झाले.


◆  त्यांच्या जाण्याबरोबरच आझाद हिंदचे स्वप्नही उध्वस्त झाले. नेताजींचा हा क्रांतिकारक प्रयत्न तिथेच थिजला.


◆  १५ आॅगस्ट १९४७ ला भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले पण 'अर्जी-ए-हुकुमत आझाद हिंद'च्या खुणा मात्र पुसून टाकण्यात आल्या.


◆  शहीद व स्वराज ही नेताजींनी बदललेली अंदमान, निकोबारची नावेही आपण राखली नाहीत.

कपनी कायद्यांचे परिणाम



०१. औद्योगिक क्रांतीच्या प्रगतीबरोबर इंग्लंड मध्ये कापड धंद्याचा चांगला झाला. भारतातही या सुताला मागणी वाढू लागली. १८२७ साली सुताचा खप ३० लाख पौंड होता. तो १८३७ मध्ये दुपटीपेक्षा अधिक झाला. त्यामुळे मलमलीसाठी प्रसिद्ध असलेले ढाका शहर पार उध्वस्त झाले.


०२. १७०० व १७२० मध्ये ब्रिटीश संसदेने कायदे करून भारतीय सुती व रेशमी कापड इंग्लंड वासियांना वापरण्यास बंदी केली.


०३. मुगल बादशाहने कंपनीच्या व्यापारावर जकातमाफी दिलेली होती. कंपनीचे व्यापारी याचा गैरफायदा घेत असत. याच कारणावरून जेव्हा नवाब मीर कासीमने सर्वांनाच जकातमाफी करून टाकली तेव्हा इंग्रजांनी नवाबाशी युद्ध केले.


०४. इंग्रजाच्या धोरणामुळे विणकर व अन्य वस्तूंचे उत्पादक देशोधडीला लागण्याची वेळ आली. बंगालमध्ये सत्ता हाती येताच रेशमी कापड उत्पादकांना पद्धतशीरपणे नाहीसे करण्याची योजना आखली गेली.


०५. नील उद्योगावर कंपनीच्या धोरणामुळे झालेल्या घातक परिणामांचे वर्णन निलदर्पण नाटकात पहावयास मिळते. त्या नाटकाचे इंग्रजीत भाषांतर करणाऱ्या जेम्स लॉंग यांना दंड व कैदेची शिक्षा करण्यात आली.


०६. जहाज बांधणीचा व्यवसाय भारतात फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. जमशेदजी जीजीभाई सारखे उद्योजक १८४९ पर्यंत दीर्घ पल्ल्याच्या प्रवास करणाऱ्या बोटी बांधत असत.


०७. इंग्रजांनी भारताचे फार मोठे आर्थिक शोषण केले. अनेक भारतीयांना भारतीय संपत्तीचे होणारे शोषण स्पष्ट जाणवले होते. एक हिंदू या टोपण नावाने लिहिणाऱ्या भास्कर पांडुरंग तर्खडकर यांनी बॉम्बे टाइम्स मधील आपल्या पत्रात याबद्दल सरकारचे वाभाडे काढले.

ब्रिटिशांचे लष्करी धोरण



०१. कंपनी शासनाचा शक्तिशाली आधार म्हणजे लष्कर होय. लष्करी शक्तीवर त्यांनी अंतर्गत व बाह्य शत्रूंचा बिमोड करुन भारतावर राज्य स्थापन केले. राजकीय सत्तेला उद्भवणाऱ्या धोक्याचा शेवट करण्याच्या हेतुने अनेक ठिकाणी लष्करी ठाणी उभारुन सरकारला मदत केली.


०२. ब्रिटिश प्रदेशातील व भारतीय संस्थानातील जनतेने उठाव केल्यास ते दडपण्यासाठी संस्थानिकांना मदत करणे. चोर, लुटारु, दरोडेखोर, इ. रस्ते सुरक्षित ठेवणे. व्यापार्यांना रक्षण देणे. भारतीय राज्यकर्त्यानी कमी केलेल्या सैनिकांनी ब्रिटिश सैन्यात सामावून घेणे. हा भारतातील ब्रिटीश लष्कराचा उद्देश होता.


०३. राजाचे लष्कर व हिंदी लष्कर असे ब्रिटीश लष्कराचे दोन प्रमुख विभाग होते. राजाचे लष्कर यामधील अधिकारी स्वत:ला श्रेष्ठ समजत असत. त्यांना पगारही जादा असे यामध्ये युरोपीय सैनिक असे हिंदी लष्करातील सैनिकांना दुय्यम स्थान असून पगारही कमी होता. १८५६ मध्ये कंपनीकडेही २,७५,००० हिंदी लष्करात ३००रु पगाराचे फक्त ३ अधिकारी होते. १८५७ च्या उठावाच्यावेळी कंपनीकडे ३,११,३७४ लष्करामध्ये फक्त ४५,५२२ एवढेच युरोपिय होते.


०४. कंपनीच्या सेवेसाठी मोठे लष्कर इंग्लंडमधून आणणे शक्य नव्हते. युरोपियन फौजांचा खर्चही फार मोठा होता. नेपोलियनमुळे युरोपमध्ये युध्द सुरु असल्याने इंग्लंडच्या सुरक्षिततेसाठी मोठया लष्कराची गरज होती. भारतात चांगल्या दर्जाचे सैनिक मोठया संख्येने उपलब्ध होते. अनेक जातींच्या व टोळयांचा मुख्य व्यवसाय सैनिकांचा हता. शिस्त, प्रशिक्षण, शूर असे भारतीय राज्यकर्त्याच्या विसर्जित करण्यात आलेल्या लष्करातील लोक मोठया प्रमाणात होते. या कारणामुळे ब्रिटिशांनी हिंदी लोकांना लष्करात प्रवेश दिला.

कंपनी सरकारची न्याय व्यवस्था



०१. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना १६०० च्या चार्टर अॅक्टनुसार करण्यात आली. या अॅक्टनुसार कंपनीला कायदे व नियम तयार करणे, अध्यादेश काढणे इ. अधिकार देण्यात आले होते. हे अधिकार कंपनीच्या ताब्यातील प्रदेश व तिचे प्रशासन या संदर्भात दिले होते.


०२. कंपनीच्या कायद्यानुसार दिवाणी व फौजदारी खटल्यांचा निकाल दिला जात नसे. १६६९ च्या कायद्यानुसार कंपनीच्या ताब्यात मुंबई देण्यात आली. तसेच या प्रदेशा संदर्भात कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला. १७८३-१७८६ च्या कायद्यानुसार व्यापारी व नाविक दलासंबंधी न्यायालये स्थापन करण्याचा अधिकार कंपनीला देण्यात आला.


०३. १७२६ मध्ये मुंबई, मद्रास, फ़ोर्ट विल्यम (कलकत्ता) येथे मेयर कोर्ट स्थापण्याची परवानगी कंपनीला देण्यात आली. प्रत्येक कोर्टमध्ये १ मेयर व ९ मदतनीस असत. ९ पैकी ७ जण ब्रिटनमध्ये जन्मलेले व ब्रिटिश नागरिक असावेत असे बंधन होते. या कोर्टनी आपल्या क्षेत्रातील दिवाणी खटल्यांचा निकाल देणे, त्याच्या विरोधात सरकारच्या कोर्टात अपील करणे अशी त्यांची कार्ये होती.


०४. सरकारी कोर्टचे सदस्य त्या प्रांताचे गव्हर्नर व कौन्सिलचे तीन सदस्य असत. खटल्याचा अंतिम निकाल ब्रिटिश कायद्यानुसार दिला जात असे. ही न्यायालय व्यवस्था १७७२ पर्यत सूरू होती. त्यानंतर त्यात बदल होत गेले.


०५. कंपनीच्या न्यायव्यवस्थेबरोबरच स्थानिक न्यायालये होती. नबाबाला दिवाणी व फौजदारी अधिकार होते. त्याच्या कोर्टातील फौजदारी खटल्यासाठी मुसलमानी कायदा तर दिवाणी खटल्यासाठी हिंदू व मुसलमान अशा दोन्ही कायद्यांचा आधार घेतला जात असे नबाब हा त्याच्या प्रांताचा प्रमुख न्यायाधीश असे.

महालवारी पद्धती



०१. जमीनदारी व रयतवारी पद्धतीच्या अपयशामुळे ही तिसरी पद्धत लागू केली गेली. यानुसार एक महाल अथवा एक विभाग यातील जमीनमालकांना त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी सरकारच्या महसुलाकरिता संयुक्तपणे व व्यक्तिशः जबाबदार धरले जात असे. ही पद्धत आग्रा, अवध आणि उत्तर प्रदेशातील नंतरच्या काळात ब्रिटीश राज्यास जोडल्या गेलेल्या प्रदेशांसाठी लागू करण्यात आली.


०२. जर महाल मोठा असेल तर त्यातील काही निवडक मालकांवर महालातील महसूल वसुलीची जबाबदारी सोपविण्यात येत असे. प्रत्यक्षात एखाद्या गावातील समस्त गावकऱ्यांशी संयुक्तपणे व व्यक्तिशः ही महालवारी पद्धत लागू करण्यात आली.


०३. या पद्धतीनुसार जमिनीची मालकी व भोगवटा एकाच मालकाकडे असे व त्यानेच ती जमीन कसावयाची होती. सर्व शेतकरी जमीन मालकांनी संयुक्तपणे महसूल सरकारकडे जमा करावयाचा होता. गावप्रमुखाकरवी किंवा इतर मध्यस्थाकरवी सर्व महसूल सरकारी खजिन्यात जमा केला जात असे.

रयतवारी पद्धती



०१. थॉमस मनरो व कॅप्टन रीड यांनी ही पद्धती १८२२ मध्ये मद्रास, मुंबई, पूर्व बंगाल, आसामचा काही भाग व कुर्ग या प्रांतात लागू केली.


०२. या पद्धतनुसार शेतकऱ्यांना जमिनीची मालकी व भोगवट्याचे अधिकार देण्यात आले.त्यांनी जमीन महसूल थेट सरकारकडे जमा करावा असे ठरविण्यात आले. यामुळे सरकार व रयत यांच्यात थेट संबंध प्रस्थापित झाला.


०३. या पद्धतीत प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्याच्या कुवतीनुसार महसूल आकारणी ठरविण्यात आली. जमिनीची मोजणी आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पादनाचा अंदाज करण्यात आला. जमिनीच्या उत्पादनाच्या ५५ टक्के महसुलाची सरकारची मागणी कायम करण्यात आली.


०४. प्रत्यक्षात रयतवारी पद्धत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी पद्धत ठरली. कारण सरकारने मुळात महसूल खूपच जास्त ठरविला होता. या पद्धतीत शेतकरी मालक झाला तरी त्याची परिस्थिती सुधारली नाही.

कोल्हापूरच्या गडकरींचा उठाव



०१. १ ऑक्टोबर १८१२च्या तहाने कोल्हापूर कंपनीचे मांडलिक झाले होते. १८२१ साली गादीवर बसलेले शहाजी बाबासाहेब इंग्रजद्वेष्टे होते. त्यांना राणी जिजाबाईपासून चौथा शिवाजी व राणी दिवणाबाईपासून चिमासाहेब अशी दोन अपत्ये होती.


०२. १८३८ मध्ये राजे शहाजीचा मृत्यू झाला. त्यांची दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने राण्यांनी राज्यकारभार पाहिला. पण त्यांचे आपापसांत पटत नसल्याने इंग्रजांनी मध्ये हस्तक्षेप केला. इंग्रज सरकारने राज्यकारभार सुधारण्यासाठी दाजीकृष्ण पंडित यास दिवाण नेमले. हे धाकट्या राणीस व त्यांच्या समर्थकांस आवडले नाही.


०३. दाजी पंडितने शेतसारा वसूल करण्यासाठी मामलेदाराची नेमणूक केली. मामलेदार हे गडकरीपेक्षा कनिष्ट असल्याने गडकरींनी त्याकडे शेतसारा भरण्यास नकार दिला. सामानगडावर वसुलीसाठी आलेल्या मामलेदारांच्या माणसांना गाडकऱ्यांनी मारले. त्यामुळे दाजी पंडितने बेळगावहून सैन्य मागविले.


०४. कॅप्टन औट्रमच्या नेतृत्वाखालील १२०० सैनिकांनी सामानगडावर हल्ला केला व गडकऱ्यांचा पराभव केला. ऑक्टोबर १८४४ मध्ये बंडवाल्यांनी प्रतीसरकारची स्थापना केली व दाजी पंडितास पकडून कोल्हापूरचा ताबा घेतला. त्यासोबतच सामानगडही ताब्यात घेतला. पण गडकऱ्यांना पुढे कोल्हापूरहून मदत न मिळाल्यामुळे गडकरी शरण आले


धर्माजी प्रतापरावाचा उठाव

 


०१. बीड येथे धर्माजी प्रतापराव याने १८१८ मध्ये निजामाला विरोध केला. हा उठाव मोडण्यासाठी निजाम सरकारने ११ जुलै १८१८ रोजी नवाब मुर्तुजा यारजंग याला लेफ्टनंट जेम्स सदरलैंड याच्या नेतृत्वाखाली रवाना केले. ३० जुलै १८१८ रोजी सदरलैंडने धर्माजी लपून बसलेल्या दिवे गावातील किल्ल्याला वेढा घातला. त्यामुळे धर्माजी व त्याचा भाऊ कंपनीच्या हाती आले.

हटकरांचा उठाव



०१. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात हंसाजी नाईक हटकर यांचे छोटेसे राज्य होते. नोव्हाचा किल्ला हंसाजीचा प्रमुख आधार होता. त्यावेळी मराठवाडा हा इंग्रजांचा मांडलिक निजामच्या ताब्यात होता. हंसाजीने १८१९-२० मध्ये निजाम व इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला.


०२. मेजर पिटसन, कॅप्टन इव्हान्स डेविड, कॅप्टन मैडोज टेलर यांनी ४००० सैनिकांसह हंसाजीवर हल्ला केला. इंग्रजांनी नोव्हा किल्ल्यावर तोफा डागून तो किल्ला ताब्यात घेतला. तेव्हा हंसाजीने उमरखेड येथून इंग्रजांशी लढा दिला. इंग्रजांनी हंसाजी हटकर याचा पराभव केला व त्याचे राज्य ताब्यात घेतले.

गौंड जमातीतील उठाव



०१. १८१७-१८ च्या काळात नागपूरचे राजे अप्पासाहेब भोसले यांनी गौंड या आदिवासी जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध उठाव केला. बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला. भोसलेंनी रणजीतसिंहासह अनेक हिंदी संस्थानिकांचे मन वळवून इंग्रंजांच्या विरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांना इंग्रजांकडून पराभव पत्करावा लागला. १८४० मध्ये भोसलेंचा जोधपुर येथे मृत्यू झाला.

कोळ्यांचा उठाव



०१. १८२८, १८३९, १८४४ ते १८४८ या दरम्यान महाराष्ट्रात कोळ्यांनी तीन टप्प्यात उठाव केला. रामजी भांगडिया, रघु भांगडिया, बापू भांगडिया, चिमणाजी जाधव व नाना दरबारे यांनी या उठावाचे नेतृत्व केले.


०२. १८२४ साली मुंबई भागात कोळ्यांनी नेटिव्ह इन्फ्रंटीकडून उठाव केला. ब्रिटिशांनी तो उठाव मोडून काढला. म्हणून १८२८ साली मुंबई पोलिसातील कोळी अधिकारी रामजी भांगडिया यांनी नोकरीचा राजीनामा देऊन त्या भागात कोळ्यांचे नेतृव केले. त्यांनी मुंबई भागात दोन वर्षे ब्रिटीशांशी लढा दिला. हा उठाव दडपून टाकण्यासाठी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश आले व त्यांनी हा उठाव मोडून काढला.


०३. १८३९ साली कोळ्यांनी पुण्यात अचानक उठावास सुरुवात केली. त्यावेळी आता संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे अशी घोषणा दिली. कोळ्यांनी दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद देऊन मराठी राज्याची पुनर्स्थापना केली.


०४. यावेळी घोडनदी जवळील सरकारी खजिन्याला १५० कोळ्यांनी वेढा घातला. त्यावेळी पुण्याचा आसिस्टंट कलेक्टर रोज याने कोळ्यांच्या बंदोबस्तासाठी पुण्याहून सैन्य मागविले. यावेळी ५४ कोळ्यांवर खटले भरून २८ जणांना कमीअधिक प्रमाणात शिक्षा दिली व दोघांना फाशी देण्यात आली.


०५. १८४४ साली कोळ्यांनी शस्त्रास्त्रे व माणसे जमवून रघु भांगडिया व बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली पुणे, नाशिक, सातारा. नगर व पुरंदर याभागात परत उठाव केला.


०६. नाणे घाट व माळशेज घाट ताब्यात घेऊन कोळ्यांनी कोकणचा मार्ग अडविला. इंग्रज अधिकारी कॅप्टन जेलने या उठावाचा बंदोबस्त केला. १८४५ मध्ये ब्रिटिशांनी बापू भांगडियाला पकडले. १८५० पर्यंत ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील कोळ्यांचा कायमचा बंदोबस्त केला.

1857 का विद्रोह



Q1. 1857 में अंग्रेजी साम्राज्य के विरुद्ध पंजाब में किसने सशस्त्र विद्रोह किया?*

(A) सैनिकों ने 

(B) नामधारी सिखों ने✅

(C) अकाली सिखों ने 

(D) निरंकारी सिखों ने 


Q2. अंग्रेजी भारतीय सेना में चर्बी वालेय कारतूसों से चलने वाली एनफील्ड राइफल कब शामिल की गई?

(A) नवम्बर 1856 

(B) दिसम्बर 1856 

(C) जनवरी 1857✅

(D) फरवरी 1857 


Q3. 1857 के बरेली विद्रोह का नेता कौन था?

(A) खान बहादुर✅ 

(B) कुँवर सिंह 

(C) मौलवी अहमदशाह 

(D) बिरजिस कादिर 


Q4. कानुपर के गदर का नेतृत्व किसने किया था?

(A) बेगम हजरत महल 

(B) नाना साहिब✅ 

(C) तांत्या टोपे 

(D) रानी लक्ष्मीबाई 


Q5. किसी स्थान पर हुए विद्रोह के दमन के दौरान ब्रिटिश सैन्य अधिकारी हैवलाक की मौत हो गई?

(A) दिल्ली 

(B) कानपुर 

(C) लखनऊ✅

(D) झांसी 


Q6. सर्वप्रथम किसने 1857 के विद्रोह के तुंरत बाद इसे एक ‘राष्ट्रीय विद्रोह’ की संज्ञा दी?

(A) बेंजामिन डिजरायली✅

(B) वी.डी. सावरकर 

(C) के. एम. पणिक्कर 

(D) ताराचंद 


Q7. वह कौन-सा ब्रिटिश सेनापति था, जिसकी 1857 के विद्रोह को दबाने में महत्त्वपूर्ण भूमिका रही?

(A) आउट्रम 

(B) चार्ल्स नेपियर 

(C) कैम्पबेल✅

(D) हैवलॉक 


Q8. निम्नलिखित में से वह कौन-सा स्थान था, जो 1857 के विद्रोह से अछूता रहा?

(A) अवध 

(B) मद्रास✅ 

(C) पूर्वी पंजाब 

(D) मध्य प्रदेश 



Q9. ‘इस मिसाल में हम मुसलमानों को हिन्दुओं से भिड़ा नहीं पाए।’ निम्नलिखित में से कौन-सी एक घटना से एचिसन के इस कथन का सम्बन्ध है?

(A) 1857 का विद्रोह✅

(B) चम्पारण सत्याग्रह, 1917 

(C) खिलाफत और असहयोग आन्दोलन, 1919-22 

(D) 1942 की अगस्त क्रांति 


Q10. बिहार के जगदीशपुर में विद्रोह के दमन का श्रेय किस ब्रिटिश अधिकारी को है?

(A) हडसन 

(B) हैवलाक 

(C) ह्यूरोज 

(D) टेलर व विसेंट आयर✅


Q11. 1857 के विद्रोह के दौरान दिल्ली में विद्रोह का सैन्य-नेतृत्व किसने किया?

(A) बख्त खाँ 

(B) लियाकत अली 

(C) बहादुरशाह II ‘जफर’✅

(D) इनमें से कोई नहीं 


Q12. आधुनिक इतिहासकार, जिसने 1857 के विद्रोह को ‘स्वतन्त्रता की पहली लड़ाई’ कहा था

(A) आर. सी. मजुमदार 

(B) एस. एन. सेन 

(C) वी. डी. सावरकर✅

(D) अशोक मेहता 


धरणांची पाणी क्षमता


● धरणातील पाणी आवक जावक मापे बघा, किती पाणी येते वा जाते माहिती आहे कां ???


1) टीएमसी ( TMC) म्हणजे काय ??

2) क्युसेक (Cusec )म्हणजे काय ??

3) क्युमेक (Cumec ) म्हणजे काय??


● सध्या सर्वदूर चांगला पाऊस होतो आहे, धरणे भरत आहेत, काही धरणांतून पाणीही सोडल्या जात आहे.


● इतके टीएमसी पाणी जमा झाले, तितके क्युसेक पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो. पण या संज्ञांचा नेमका अर्थ काय ???


● आपणास फक्त "लिटर" ही संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवूया.


● पाणी मोजण्याची एकके


● स्थिर पाणी मोजण्याची एकके – 

1) लिटर 

2) घनफूट 

3) घनमीटर  

4) धरणातील पाणी मोजण्याचे एकक – टीएमसी  TMC (Thousand Million Cubic Feet) (अब्ज घनफूट)


● एक टीएमसी म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (01 अब्ज) इतके घन फूट.


1 टीएमसी  = 28,316,846,592 लिटर्स


2) वाहते पाणी मोजण्याची एकके-


1) 1 क्यूसेक ( Cusec )– एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्यूसेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 28.3 लिटर पाणी बाहेर पडते. 


2) 1 क्युमेक (Cumec) - एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 1,000 लिटर पाणी बाहेर पडते. 


● उदा.

पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता 1.97 टीएमसी आहे.

म्हणजेच त्यामध्ये 1.97 x 28.317 अब्ज लिटर्स पाणी मावते.


● याच धरणातून सध्या 500 क्युसेक पाणी नदीत सोडले जातआहे.


● म्हणजेच 500 x 27.317 लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.



◆ महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी असलेली 06 धरणे 


1)उजनी  117.27 टीएमसी 

2)कोयना  105.27 टीएमसी 

3)जायकवाडी 76.65 टीएमसी  ( पैठण )

4)पेंच तोतलाडोह  35.90 टीएमसी 

5) वारणा  34.40 टीएमसी

6) पूर्णा येलदरी  28.56 टीएमसी


विभ्याजतेच्या कसोट्या नोट्स



♦️ वयाख्या

१ ची कसोटी


१ या संख्येने कोणत्याही संख्येस निःशेष भाग जातो. आणि  भागाकार तीच संख्या असते


२ ची कसोटी


ज्या संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस २ ने निःशेष भाग जातो.


३ ची कसोटी


दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केल्यास येणाऱ्या बेरजेस जर ३ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ३ ने निःशेष भाग जातो.


४ ची कसोटी


दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या २ अंकी संख्येस जर ४ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी ० येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो.


५ ची कसोटी


ज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५ पैकी एक अंक असेल तर त्या संख्येस ५ ने निःशेष भाग जातो


६ ची कसोटी


ज्या संख्येस २ व ३ या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ६ ने निःशेष भाग जातो


७ ची कसोटी


दिलेल्या संख्येतील एखादा अंक जर क्रमवार ६ च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.


दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाला २ ने गुणून उरलेल्या संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी जर ० किंवा ७ च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.


८ ची कसोटी


दिलेल्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येस जर ८ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक,दशक व शतक स्थानी ० येत असेल तर त्या संख्येस ८ ने निःशेष भाग जातो.


९ ची कसोटी


दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेस जर ९ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ९ ने निःशेष भाग जातो.


१० ची कसोटी


ज्या संख्येच्या एकक स्थानी ० असते  त्या सर्व संख्येस १० ने निःशेष भाग जातो.


११ ची कसोटी


दिलेल्या संख्येतील समस्थानी आणि विषमस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करून त्या बेरजेतील फरक जर ० किंवा ११च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ११ ने निःशेष भाग जातो.


१२ ची कसोटी


ज्या संख्येला ३ आणि ४ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १२ ने निःशेष भाग जातो.


१४ ची कसोटी


ज्या संख्येला ७ आणि २ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १४ ने निःशेष भाग जातो.


१५ ची कसोटी


ज्या संख्येला ३ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १५ ने निःशेष भाग जातो.


१८ ची कसोटी


ज्या संख्येला २ आणि ९ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १८ ने निःशेष भाग जातो.


२० ची कसोटी


ज्या संख्येला ४ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २० ने निःशेष भाग जातो.


२१ ची कसोटी


ज्या संख्येला ७ आणि ३ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २१ ने निःशेष भाग जातो.


२२ ची कसोटी


ज्या संख्येला २ आणि ११ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २२ ने निःशेष भाग जातो.


२४ ची कसोटी


ज्या संख्येला ३ आणि ८ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.


३० ची कसोटी


ज्या संख्येला ३ आणि १० या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.


उदाहरणे

खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने निःशेष भाग जाईल

a. 3256     b. 46732     c. 98673     d. 53216

उत्तर :-

a. 3256, 3+2+5+6=16

b. 46732, 4+6+7+3+2=22

c. 98673, 9+8+6+7+3=33

33 या संख्येला ३ ने निःशेष भाग जातो म्हणून पर्याय c याचे उत्तर असेल.

भारताच्या स्वदेशी mRNA लसीच्या मानवी वैद्यकीय चाचण्यांसाठी औषध नियमकांची परवानगी


🔰भारताच्या पहिल्या स्वदेशी उमेदवार mRNA लसीला पहिला/दूसरा टप्प्याची मानवी वैद्यकीय चाचणी घेण्यासाठी भारतीय औषध नियामकांकडून मान्यता मिळाली आहे.


🔰HGCO19 ही स्वदेशी उमेदवार mRNA लस पुणे शहरातल्या जेनोवा कंपनीने विकसित केली आहे.


🛑लसीविषयी  


🔰mRNA लस रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण करण्यासाठी लस पारंपारिक प्रारुपे वापरत नाही. 


🔰तयाऐवजी, mRNA लस विषाणूच्या सिंथेटिक RNAद्वारे शरीरात प्रथिने तयार करण्यासाठी आण्विक सूचना मिळवते. चाचणीसाठीचे प्रारुप (होस्ट बॉडी) याचा वापर व्हायरल प्रोटीन तयार करण्यासाठी करते जे मान्यताप्राप्त आहे आणि त्याद्वारे शरीरात रोगाविरूद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.


🔰mRNA लस सुरक्षित समजली जाते कारण ती संक्रामक नसलेली, निसर्गामध्ये एकत्रित न-होणारी आणि प्रमाणित पेशीय यंत्रणेद्वारे क्षीण होणारी आहे. सेल सायटोप्लाझमच्या आत असलेल्या प्रथिने संरचनेत रुपांतर करण्याच्या त्यांच्या मूळ क्षमतेमुळे त्यांची अत्यधिक कार्यक्षमता अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त, लस पूर्णपणे सिंथेटीक आहे आणि वाढीसाठी त्यांना अंडी किंवा जीवाणूची आवश्यकता नसते. लस कमी खर्चात त्वरीत उत्पादन करता येते.


🔰HGCO19 लस 2 ते 8 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानात दोन महिने स्थिर राहू शकते.


🔰HGCO19 लसीच्या विकासाला विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या IND-CEPI मोहीमेच्या माध्यमातून अनुदान दिले गेले आहे.

केरळमधील नागरिकांना करोना लस मिळणार मोफत


🔰केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी करोना लशीसंदर्भात एक मोठी घोषणा केली.

केरळमध्ये करोनावरील लस मोफत दिली जाणार  असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे.


🔰करळ आता तिसरे राज्य ठरले आहे, जिथे करोना लस मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.


🔰तर या अगोदर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी ऑक्टोबर महिन्यात घोषणा केली होती की, एकदा करोनावरील लस आली की ती राज्यातील नागरिकांना मोफत दिली जाईल.


🔰यानंतर मध्यप्रदेशकडून देखील ऑक्टोबरच्या शेवटी अशाचप्रकारची घोषणा केली गेली.

डॉक्टरांना दहा वर्ष द्यावी लागणार शासकीय रुग्णालयात सेवा


🔰उत्तर प्रदेशात शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्या कमी असून, डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणं अनिवार्य असतं.


🔰तर उत्तर प्रदेश सरकारने डॉक्टरकीची पदवी घेतल्यानंतर 10 वर्षे शासकीय रुग्णालयात काम करणं सक्तीचं केलं आहे. जर मध्येच सेवा सोडली, तर डॉक्टरांना 1 कोटी रुपये दंड भरावा लागणार  आहे.


🔰उत्तर प्रदेशात सध्या वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रामीण एक वर्ष नोकरी केल्यास 10 अंकांची सूट  दिली जाते.


🔰तर दोन वर्ष सेवा केल्यास 20 अंकांची सूट देण्यात येते. त्याचबरोबर डॉक्टर पदव्युत्तर अभ्यासक्रमाबरोबरच इतर प्रमाणपत्र अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेऊ शकतात.

डिजिटल मतदार ओळखपत्रांचा प्रस्ताव


🔰निवडणूक आयोग मतदारांना डिजिटल पद्धतीची ओळखपत्रे जारी करण्याबाबत विचार करीत असून ही मतदार ओळखपत्रे डिजिटल रूपात असल्यास ती चटकन वापरता येऊ शकतात. असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.


🔰डिजिटल मतदान ओळखपत्र मतदार मोबाइलमध्ये बाळगू शकतात काय या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की एकदा निवडणूक आयोगाने डिजिटल मतदार ओळखपत्रांचा निर्णय घेतल्यानंतर ती पुढची पायरी असू शकते.


🔰तसेच हे ओळखपत्र मोबाइलवर , संकेतस्थळावर, ई-मेलरूपात ठेवता येणारे किंवा मुद्रित स्वरूपात मतदानावेळी स्वतजवळ बाळगता येणारे अशा कुठल्याही प्रकारात आणता येईल.


🔰डिजिटल स्वरूपात व्यक्तीचे छायाचित्रही स्पष्ट असेल. अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे, की तंत्रज्ञानाचा गैरवापर टाळण्यासाठी हा निर्णय घेताना सुरक्षेचा विचार करावा लागेल.

Online Test Series

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...