Friday, 11 December 2020

MPSC QUESTIONS SET

प्रश्न क्रमांक 01 

खालीलपैकी कोणत्या साली'ऑर्डर ऑफ अब्दुलअझीझ अल सौद' या सौदी अरेबियाच्या सर्वोच्च नागरी सन्मानने मोदींना सन्मानित करण्यात आले.

1 : 2015

2 : 2016🧧

3 : 2017

4 : 2018

5 : यापैकी नाही


💠💠💠💠💠💠💠💠💠💠


प्रश्न क्रमांक 02

'ग्रँड कॉलर ऑफ स्टेट ऑफ – – – – –2018' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मोदींना मिळाला आहे

1 : पॅलेन्स्टाईन🧧

2 : बहरीन

3 : इटली

4 : फ्रांस

5 : यापैकी नाही


💠💠💠💠💠💠💠💠💠💠


प्रश्न क्रमांक 03

ऑर्डर ऑफ डिस्टिंग्वुइश रूल ऑफ इझुद्दीन' हा पुरस्कार मोदींना खालीलपैकी कोणत्या देशाकडून देण्यात आला आहे

1 : मालदीव🧧

2 : पॅलेन्स्टाईन

3 : बहरीन

4 : सौदी अरेबिया

5 : यापैकी नाही


💠💠💠💠💠💠💠💠💠💠


प्रश्न क्रमांक 04

खालील पैकी कोणत्या देशाचा ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू हा सर्वोच्च पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे

1 : इटली

2 : जर्मनी

3 : रशिया🧧

4 : अमेरिका

5 : यापैकी नाही


💠💠💠💠💠💠💠💠💠💠


प्रश्न क्रमांक 05

उष्णतेच्या लाटेमुळे होणारी मनुष्य हानी रोखण्यासाठी कुठे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणद्वारे कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे ?

1) नागपूर🧧

2) नाशिक

3) पुणे

4) मुंबई

5) यांपैकी नाही


💠💠💠💠💠💠💠💠💠💠


प्रश्न क्रमांक 06

नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते गीता आराधना महोत्सवात भगवत गीतेचे अनावरण करण्यात आले आहे. त्याचे वजन किती किलोग्रॅम आहे ?

1) 800🧧

2) 600

3) 500

4) 700


💠💠💠💠💠💠💠💠💠💠


प्रश्न क्रमांक 07

आर्थिक साहाय्याकरिता भारत व इटली दरम्यान कितवी संयुक्त परिषद दिल्ली येथे  आयोजित करण्यात आलेली आहे ?

1) 18

2) 22

3) 20🧧

4) 19


💠💠💠💠💠💠💠💠💠💠


प्रश्न क्रमांक 08

विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाचा कितवा स्थापना दिवस दिल्लीमध्ये नुकताच आयोजित करण्यात आला ?

1) 35

2) 33🧧

3) 36

4) 34


💠💠💠💠💠💠💠💠💠💠


प्रश्न क्रमांक 09

गांधी शांतता पुरस्कार प्रदान करतेवेळी कोणते गीत जगातील 150 कलाकारांनी गांधीजींच्या 150 जयंती निमित्त सादर केले ?

1) सारे जहाँ से अच्छा

2) वंदे मातरम

3) विजयी विश्व तिरंगा प्यारा

4) वैष्णव जण तो🧧


💠💠💠💠💠💠💠💠💠💠


प्रश्न क्रमांक 10

कुठल्या देशाने RTGS डॉलर ने व्यापार सुरू केलाय ?

1) इंग्लड

2) न्यूझीलंड

3) झिम्बाब्वे🧧

4) ऑस्ट्रेलिया


💠💠💠💠💠💠💠💠💠💠


JP (जॅकपॉट प्रश्न)

'स्टेट ऑर्डर ऑफ गाझी आमीर अमानुल्लाह खान' या कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने  नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले होते.


*उत्तर : अफगाणिस्तान*



मराठी व्याकरण


१) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ? 


o   विश्वास पाटील

o   आनंद यादव

o   रणजीत देसाई

o   शिवाजी सावंत ✅


२) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ? 


o   यशवंत कानेटकर

o   वि. स. खांडेकर ✅

o   व्यंकटेश माडगुळकर

o   आण्णाभाऊ साठे


३) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ? 


o   आण्णाभाऊ साठे ✅

o   बा. भ. बोरकर

o   गौरी देशपांडे

o   व्यंकटेश माडगुळकर


४) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ? 


o   लक्ष्मीकांत तांबोळी

o   प्रा. व. भा. बोधे

o   विश्वास महिपाती पाटील ✅

o   वा. म. जोशी


५) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ? 


o   गावचा टिनोपाल गुरुजी ✅

o   चंद्रमुखी

o   ग्रंथकाली

o   मंजुघोषा


६) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत . 


o   नामदेव ढसाळ ✅

o   दया पवार

o   जोगेंद्र कवाडे

o   आरती प्रभू


७) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ? 


o   झाडाझडती

o   संभाजी

o   बनगरवाडी ✅

o   सात सक त्रेचाळीस


८) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ? 


o   श्री. ना, पेंडसे

o   भालचंद्र नेमाडे ✅

o   रा. रं. बोराडे

o   ग.ल. ठोकळ 


९) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ? 


o   मुक्तामाला

o   बळीबा पाटील

o   यमुना पर्यटन ✅

o   मोचनगड


१०) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ? 


o   एकेक पान गळावया ✅

o   स्फोट

o   कल्याणी

o   झाड


११) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ? 


o   गौरी देशपांडे

o   शैला बेल्ले

o   जोत्स्ना देवधर

o   सुमती क्षेत्रमाडे ✅


१२) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ? 


o   डॉ. यशवंत पाटणे ✅

o   आशा कर्दळे

o   ह.ना.आपटे

o   व.ह. पिटके


१३) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ? 


o   वामन परत आला

o   जगबुडी

o   एक होता फेंगाड्या

o   गावपांढर ✅


१४) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ? 


o   राजेंद्र मलोसे ✅

o   भाऊ पाध्ये

o   दादासाहेब मोरे

o   जयंत नारळीकर


१५) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ? 


o   कल्पनेच्या तीरावर ✅

o   गारंबीचा बापू

o   पांढरे ढग

o   वस्ती वाढते आहे

-----------------------------------------------------

भारताचे परराष्ट्रमंत्री


भारताचा परराष्ट्रमंत्री किंवा भारताचा विदेशमंत्री हा भारत देशाच्या केंद्र सरकारमधील एक प्रमुख कॅबिनेट मंत्री व भारतीय परराष्ट्रमंत्रालयाचा प्रमुख आहे. भारत सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेला परराष्ट्रमंत्री हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी व देशाची परराष्ट्र धोरणे ठरवण्यासाठी जबाबदार आहे.

परराष्ट्रमंत्री हा संसदेच्या लोकसभा अथवा राज्यसभेचा विद्यमान सदस्य असणे बंधनकारक असून त्याची निवड पंतप्रधानाद्वारे व पदनियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते. जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले परराष्ट्रमंत्री होते. ते ह्या पदावर १७ वर्षे राहिले.

परराष्ट्रमंत्र्यांची यादी

नाव  (कार्यकाळ)


▪️जवाहरलाल नेहरू  (२ सप्टेंबर १९४६ - २७ मे १९६४)

▪️गलझारीलाल नंदा  (२७ मे १९६४- ९ जून १९६४) 

▪️लाल बहादूर शास्त्री  (९ जून १९६४- १७ जुलै १९६४)

▪️सरदार स्वरणसिंग  (१८ जुलै १९६४- १४ नोव्हेंबर १९६६)  

▪️एम.सी. छगला  (१४ नोव्हेंबर १९६६- ५ सप्टेंबर १९६७)

▪️इदिरा गांधी  (६ सप्टेंबर १९६७- १३ फेब्रुवारी १९६९)

▪️दिनेश सिंग  (१४ फेब्रुवारी १९६९- २७ जून १९७०)

▪️सरदार स्वरणसिंग  (२७ जून १९७०- १० ऑक्टोबर १९७४)

▪️यशवंतराव चव्हाण  (१० ऑक्टोबर १९७४- २४ मार्च १९७७)

▪️अटलबिहारी वाजपेयी  (२६ मार्च १९७७- २८ जुलै १९७९)

▪️शयाम नंदन प्रसाद मिश्रा  (२८ जुलै १९७९- १३ जानेवारी १९८०)

▪️पी.व्ही. नरसिंह राव  (१४ जानेवारी १९८०- १९ जुलै १९८४)

▪️इदिरा गांधी  (१९ जुलै १९८४- ३१ ऑक्टोबर १९८४)

▪️राजीव गांधी  (३१ ऑक्टोबर १९८४- २४ सप्टेंबर १९८५)

▪️बलीराम भगत  (२५ सप्टेंबर १९८५- १२ मे १९८६)

▪️पी. शिवशंकर  (१२ मे १९८६- २२ ऑक्टोबर १९८६)

▪️नारायण दत्त तिवारी  (२२ ऑक्टोबर १९८६- २५ जुलै १९८७)

▪️राजीव गांधी  (२५ जुलै १९८७- २५ जून १९८८)

▪️पी.व्ही. नरसिंह राव  (२५ जून १९८८- २ डिसेंबर १९८९)

▪️विश्वनाथ प्रताप सिंग  (२ डिसेंबर १९८९- ५ डिसेंबर १९८९) 

▪️इदर कुमार गुजराल  (५ डिसेंबर १९८९- १० नोव्हेंबर १९९०)

▪️विद्याचरण शुक्ला  (२१ नोव्हेंबर १९९०- २० फेब्रुवारी १९९१)

▪️माधवसिंह सोळंकी  (२१ जून १९९१- ३१ मार्च १९९२)

▪️पी.व्ही. नरसिंह राव  (३१ मार्च १९९२- १८ जानेवारी १९९३)

▪️दिनेश सिंग  (१८ जानेवारी १९९३- १० फेब्रुवारी १९९५)

▪️परणव मुखर्जी  (१० फेब्रुवारी १९९५- १६ मे १९९६)

▪️सिकंदर बख्त  (२१ मे १९९६- १ जून १९९६)

▪️इदर कुमार गुजराल  (१ जून १९९६- १८ मार्च १९९८)

▪️अटलबिहारी वाजपेयी  (१९ मार्च १९९८- ५ डिसेंबर १९९८) 

▪️जसवंत सिंग  (५ डिसेंबर १९९८- २३ जून २००२)

▪️यशवंत सिन्हा  (१ जुलै २००२- २२ मे २००४)

▪️नटवर सिंग  (२२ मे २००४[१]- ६ नोव्हेंबर २००५)

▪️मनमोहन सिंग  (६ नोव्हेंबर २००५- २४ ऑक्टोबर २००६)

▪️परणव मुखर्जी  (२४ ऑक्टोबर २००६[३]- २२ मे २००९)

▪️एस.एम. कृष्णा  (२२ मे २००९- २६ ऑक्टोबर २०१२)

▪️सलमान खुर्शीद  (२८ ऑक्टोबर २०१२- २६ मे २०१४)

▪️सषमा स्वराज  (२६ मे २०१४- )


भारतातील प्रथम महिला


नोबेल विजेती – मदर तेरेसा (१९७९)


अंतराळवीरांगना – कल्पना चावला (१९९७)


आय.पी.एस. अधिकारी – किरण बेदी (१९७२)


युनायटेड नेशन्स सिविल पोलीस सल्लागार – किरण बेदी (२००३)


न्यायाधीश – जस्टीस एम. फातिमा बिवी (१९८९)


महिला टेनिस संघटना (WTA)चा किताब पटकावणारी – सानिया मिर्झा (२००५)


महिला टेनिस संघटना (WTA)चा किताब दोनवेळा पटकावणारी – सानिया मिर्झा (२०१५)


बॅडमिंटनमध्ये ऑलिंपिक पदक विजेती – सायना नेहवाल (२०१२)


बॅडमिंटनमध्ये जगामध्ये क्रमवारीत अव्वल – सायना नेहवाल (२०१५)


जागतिक मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धेत सहा वेळा पदक विजेती – मेरी कॉम


ऑलिंपिक २०१२ मध्ये पात्र एकमेव महिला बॉक्सर – मेरी कॉम (२०१२)


आशियाई खेळात बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक विजेती – मेरी कॉम (२०१४)


माउंट एवरेस्ट सर करणारी महिला – बचेंद्री पाल (१९८४)


आय.ए.एस. अधिकारी – अन्ना मल्होत्रा (१९५१)


वैमानिक – हरिता कौर देओल (१९९४)


भारतीय भूदलात (आर्मीत) रुजू होणारी – प्रिया झिंगण (१९९३)


भौतिकशास्त्रज्ञ – आनंदीबाई गोपाळराव जोशी (१८८७)


कन्याकुमारी ते काश्मीर(लेह) [५४५३ किमी] प्रवास मोटारसायकलने पूर्ण करणारी – रोशनी शर्मा (२०१४)


रिक्षाचालक – शीला डावरे (१९८८)


पायांवर शस्त्रक्रिया होऊनदेखील माउंट एवरेस्ट चढणारी- अरुणिमा सिन्हा (२१०३)


मिस वर्ल्ड(जगतसुंदरी) किताब पटकावणारी – रिता फारिया पॉवेल (१९६६)


इंग्लिश खाडी पार करणारी – आरती साहा (१९५९)


पद्मश्री मिळवणारी पहिली खेळाडू – आरती साहा (१९६०)


टेस्ट क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी – मिथाली राज (२००४)


पंतप्रधान – इंदिरा गांधी (१९६६)


भारतरत्न मिळवणारी – इंदिरा गांधी (१९७१)


राष्ट्रपती – प्रतिभाताई पाटील (२००७)


भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर – अंजली गुप्ता (२००१)


भारतीय एयरलाईन्स मध्ये कॅप्टन – दुर्गा बॅनर्जी (१९६६)


रेल्वेमंत्री – ममता बॅनर्जी (२००२)


राज्यपाल – सरोजिनी नायडू (१९४७)


मुख्यमंत्री – सुचेता कृपलानी (१९६३, उत्तरप्रदेश)


राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष – एनी बेझंट (१९१७)


रेमन मॅगसेसे विजेती – कमलादेवी चट्टोपाध्याय (१९६६)


मिस युनिव्हर्स(विश्वसुंदरी) – सुश्मिता सेन (१९९४)


ज्ञानपीठ पुरस्कार – आशापूर्णा देवी (१९७६)


बुकर पुरस्कार – अरुंधती रॉय (१९९७)


साहित्य अकादमी पुरस्कार – अमृता प्रीतम (१९५६, पंजाबी)


राजीव गांधी खेलरत्न – कर्नम मल्लेश्वरी (१९९५)


अशोकचक्र विजेती – नीरजा भानोत(१९८७) (‘नीरजा’ चित्रपट हिच्यावर आधारित)


परराष्ट्र मंत्री – सुषमा स्वराज (२०१४)


युनोच्या आमसभा अध्यक्ष – विजयालक्ष्मी पंडित (१९५३)


दिल्लीच्या तख्तावर बसणारी राज्यकर्ती – रझिया सुलतान (१२३६)


उच्च न्यायालय न्यायाधीश – लीला सेठ (१९९१)


वकील – कॉर्नलिया सोराबजी (१८९२)


लोकसभा अध्यक्ष (पहिली महिला ) - मीरा कुमार

संसद सदस्यांचे वेतन भत्ते आणि निवृत्तीवेतन(दुरुस्ती) विधेयक, 2020


🔰 संसद सदस्यांचे वेतन भत्ते आणि निवृत्तीवेतन(दुरुस्ती) विधेयक, 2020 लोकसभेत पास करण्यात आला आहे.


🔰 या विधायकात खासदारांच्या पगारामध्ये 30% कपात करण्याची तरतूद करण्यात आली आहे.


🔰 सध्या प्रत्येक खासदाराला महिन्याला एक लाख रुपये वेतन, 70,000 रुपये मतदानसंघ भत्ता, 60,000 रुपये कार्यालय चालवण्यासाठी मिळतात.


🔰 पतप्रधान आणि मंत्री परिषदेसह सर्व खासदारांना 2020 ते 2021 या आर्थिक वर्षासाठी 30% वेतन कपात लागू आहे.


🔰 भारतचे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांनी व सर्व राज्यपालांनी त्यांचे वेतन 30% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.


🔰या दुरुस्तीमुळे केवळ खासदारांचे वेतन कपात होणार असून माजी खासदारांचे भत्ते किंवा निवृत्तिवेतन कपात होणार नाही.


🔰ह विधयक मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते (दुरूस्ती) अध्यादेश, 2020 ची जागा घेईल.


🔰या विधयकावरून संसद सदस्यांचे वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतन कायदा 1954 मध्ये बदल करण्यात येणार आहे.

शरद पवारांना मिळणार यूपीएच अध्यक्षपद.


🔰महाराष्ट्रात महाविकास शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा महत्त्वाची भूमिका असल्याचं म्हटलं जातं. तर दुसरीकडे सध्या देशात सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रपतींची भेट घेत नवे कृषी कायदे मागे घेण्याची रणनीती शरद पवार आणि सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी यांनी तयार केली आणि यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानीही भेट झाली.

दरम्यान, शरद पवार हे आता केंद्रात विरोधकांच्या नेतृत्वाच्या भूमिकेत येणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 


🔰रिपब्लिक टीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार लवकरच ते यूपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारू शकतात अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.तर या प्रकरणी सुरूवातीच्या टप्प्यातील चर्चा पूर्ण झाल्या असल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली. बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये आणि हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी नेतृत्वाकडे याबाबत विचारणा केली होती.


🔰तर काही नेत्यांनी काँग्रेसची सूत्र पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याची मागणीही केली होती. परंतु राहुल गांधी यांनी यापूर्वी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे सोनिया गांधी यांच्याकडून यूपीएचं अध्यक्षपदही स्वीकारण्यास नकार दिल्याचं सूत्रांनी रिपब्लिक टीव्हीशी बोलताना सांगितलं.


🔰दशात सध्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. विरोधकांच्या एका शिष्टमंडळानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली होती. त्यावेळी राहुल गांधीदेखील त्या ठिकाणी उपस्थित होते. अशावेळीही त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व शरद पवार यांनी केलं होतं. 2004 पासून सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

गूगलवर ‘करोना’चा नव्हे; ‘आयपीएल’चा सर्वाधिक शोध.


🔰करोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला असताना, गूगल या सर्च इंजिनवर जास्तीतजास्त लोकांनी याच शब्दाचा शोध घेतला असावा असे कुणालाही वाटणे साहजिक आहे. मात्र, शोधविषयाच्या बाबतीत इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) करोना विषाणूवरही मात केल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या गूगल इंडियाच्या ‘सर्च इन २०२०’मुळे उघड झाले आहे. यामुळे भारताचे क्रिकेटप्रेम पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.


🔰गल्या वर्षी ‘आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप’ ही गूगल सर्चवरील ‘टॉप ट्रेंडिंग क्वेरी’ होती.


🔰करीडा आणि वृत्त कार्यक्रमांपैकी आयपीएलचा सर्वाधिक शोध घेण्यात आला. यानंतर करोना विषाणू, अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, बिहार निवडणूक निकाल आणि दिल्ली निवडणूक निकाल याचा गूगलवर सर्वात जास्त शोध घेण्यात आलेल्या विषयांमध्ये समावेश आहे.


🔰कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे आयपीएलची तेरावी आवृत्ती संयुक्त अरब अमिरातींमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली. गेल्या वर्षीपेक्षा तिच्या प्रेक्षकसंख्येत या वर्षी २८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसले.

आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणार नवं संसद भवन


🔰नवीन संसद भवनाची निर्मिती ही नव्या व जुन्याच्या सहअस्तित्वाचे उदाहरण आहे. आज १३० कोटींपेक्षा जास्त भारतीयांसाठी अत्यंत सौभाग्याचा व गर्वाचा दिवस आहे. आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरत आहोत. काळ आणि गरजेच्या अनुषंगाने स्वतःमध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न आहे. नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणारं असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली येथे सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यासाठी पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्यानंतर बोलताना म्हटलं.


🔰‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यासाठी आज(गुरूवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.


🔰याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपल्या सध्याच्या संसद भवनाने स्वातंत्र्याचे आंदोलन व नंतर स्वतंत्र भारताला घडण्यासाठी आपली महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारची निर्मिती देखील इथेच झाली व पहिली संसद देखील इथंच बसली. याच संसद भवनात आपल्या राज्यघटनेची रचना झाली. आपल्या लोकशाहीची पुर्नस्थापना झाली.


🔰ससदेची सध्याची इमारत स्वतंत्र भारताचे प्रत्येक चढ-उतार, आपली प्रत्येक आव्हानं, आपल्या आशा-आकांक्षा, समाधान, आपल्या यशाचे प्रतीक राहिलेली आहे. या इमारतीत बनलेला प्रत्येक कायदा, या कायद्याच्या निर्मिती दरम्यान झालेल्या अनेक गंभीर चर्चा, हे सर्व आपल्या लोकशाहीचा ठेवा आहे. मात्र संसदेच्या शक्तीशाली इतिहासाबरोबरच यथार्थ स्वीकारणे तेवढंच आवश्यक आहे. ही इमारत आता जवळजवळ १०० वर्षांची होत आहे. मागील दशकात तत्कालीन गरजांना लक्षात घेता सातत्याने यामध्ये बदल केले गेले. या प्रक्रियेत अनेकदा भिंती तोडण्यात आल्या आहेत, अन्य सुविधांमध्ये बदल केले गेले. सदस्यांना बसण्यास पुरेसी जागा मिळावी यासाठी भिंती देखील हटवल्या गेल्या आहेत. एवढं सर्व झाल्यानंतर हे संसद भवन आता विश्रांती मागत आहे.

साक्षरतेच्या बाबतीत शेवटची दहा राज्य.


 🅾️बिहार ---------------------------------------------- 63.82 टक्के 


🅾️तलंगणा ----------------------------------------------- 66.5 टक्के 


🅾️अरुणाचल प्रदेश -------------------------------------       66.95 टक्के 


🅾️राजस्थान --------------------------------------------- 67.06 टक्के 


🅾️आध्र प्रदेश --------------------------------------------  67.4 टक्के 


🅾️झारखंड ----------------------------------------------- 67.63 टक्के 


🅾️जम्मू आणि कश्मीर------------------------------------68.74 टक्के 


🅾️उत्तर प्रदेश---------------------------------------------69.72 टक्के 


🅾️मध्य प्रदेश ---------------------------------------------  70.63 टक्के 


🅾️छत्तीसगड----------------------------------------------71.04 टक्के 

साक्षरतेच्या बाबतीत भारतातील प्रथम दहा जिल्हे .


🅾️सराश्चिप (मिझोराम)-------------------------97.91 टक्के 


🅾️ऐझवाल (मिझोराम)-------------------------97.89 टक्के 


🅾️माहे (पद्दूचेरी )-----------------------------97.87 टक्के 


🅾️कोट्टायम (केरळ)----------------------------97.21टक्के


🅾️पठाणमतीता(केरळ)------------------------96.55 टक्के 


🅾️चांफाइ(मिझोराम)---------------------------95.91 टक्के 


🅾️एरणाकुलम(केरळ)-------------------------95.89 टक्के 


🅾️अल्लापुझा(केरळ)---------------------------95.72 टक्के 


🅾️कानूर (केरळ)-------------------------------95.10 टक्के 


🅾️थरिसुर (केरळ)-------------------------------95.08 टक्के     


महाराष्ट्र- जिल्हे व त्यांची प्रसिद्धि.


१)मुंबई--------भारताचे प्रवेशद्वार, भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर,भारताची राजधानी


२)रत्नागिरी---देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा


३)सोलापूर----ज्वारीचे कोठार,सोलापुरी चादरी


४)कोल्हापुर--कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा


५)रायगड-----तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा


६)सातारा----कुंतल देश व शुरांचा  जिल्हा


७)बिड------जुन्या मराठी कविंचा जिल्हा, मिठगरांचा जिल्हा, देवळादेवळा जिल्हा, ऊस कामगारांचा जिल्हा


८)परभणी---ज्वारीचे कोठार


९)उस्मानाबाद--श्री.भवानी मातेचा जिल्हा


१०)औरंगाबाद--वेरुळ-अजिंठा लेण्यांचा जिल्हा, मराठवाडयाची  राजधानी


११)नांदेड--संस्कृत कवींचा जिल्हा


१२)अमरावती--देवी रुख्मिणी व  दमयंतीचा जिल्हा


१३)बुलढाणा--महाराष्ट्राची कापसाची बाजारपेठ


१४)नागपुर----संत्र्यांचा जिल्हा


१५)भंडारा-----तलावांचा जिल्हा


१६)गडचिरोली--जंगलांचा जिल्हा


१७)चंद्रपुर----गौंड राजांचा जिल्हा

 

१८)धुळे----सोलर सिटीचा जिल्हा

                     

१९)नंदुरबार-आदिवासी बहुल जिल्हा


२०)यवतमाळ- पांढरे सोने-कापसाचा जिल्हा

                    

२१)जळगाव--कापसाचे शेत, केळीच्या बागा,अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार


२२)अहमदनगर-साखर कारखाने असलेला जिल्हा


२३)नाशिक---मुंबईची परसबाग,  द्राक्षांचा जिल्हा,मुंबईचा गवळीवाडा


२४) सांगली - हळदीचा जिल्हा ,कलावंतांचा जिल्हा 

जागतिक आनंद अहवाल


🔰UN Sustainable Solution Network द्वारे 2012 पासून जाहीर केला जातो


🔰2020 चा हा आठवा अहवाल आहे.


🔰एकूण 156 देशांची यादी जाहीर केली आहे या अहवालात भारताचा 144 या क्रमांक आहे .


🔰2019 मध्ये भारत 140 व्या क्रमांकावर होता.


🔰2020 च्या अहवालानुसार प्रथम पाच आनंदी देश पुढीलप्रमाणे .


1. फिनलंड


2. डेन्मार्क


3. स्विझरलँड 


4. आइलैंड


5.नार्वे.

अकगणित अभ्यासाच्या दृष्टीने विविध परिणामे अभ्यासाने अगत्याचे ठरते.

 

1) अंतरासाठीची परिमाणे :

▪️ 10 मिलीमीटर = 1 सेंटीमीटर

▪️ 100 सेंटीमीटर = 1 मीटर

▪️ 1000 मीटर = 1 किलोमीटर


2) वस्तुमानासाठीची परिमाणे :

▪️ 1000 मिलिलिटर = 1 लिटर 

▪️ 1000 ग्रॅम = 1 किलोग्रॅम

▪️ 100 किलोग्रॅम = 1 क्विंटल

▪️ 10 क्विंटल = 1 टन 


3) कालमापनासाठीची परिमाणे :

▪️ 60 सेकंद = 1 मिनिट

▪️ 60 मिनिट = 1 तास

▪️ 24 तास = 1 दिवस


4) इतर परिमाणे :

▪️ 24 कागद = 1 दस्ता

▪️ 20 दस्ते = 1 रिम 

▪️ 12 नग = 1 डझन

▪️ 12 डझन = 1 ग्रॉस

▪️ 100 नग = 1 शेकडा 

▪️ 100 पैसे = 1 रुपया

‘जिनोव्हा’च्या लसीला मानवी चाचण्यांसाठी मान्यत.


♻️पुण्यातील जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सने विकसित केलेल्या ‘एचजीसीओ 19’ या कोरोना लसीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना भारतीय औषध महानियंत्रकांकडून मान्यता देण्यात आली आहे. ही देशातील पहिली एमआरएनए आधारीत लस आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपुर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिनोव्हाच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधत लसीच्या प्रगतीची माहिती घेतली होती.

 

♻️अमेरिकेतील एचडीटी बायोटेक कॉर्पोरेशनच्या सहकार्याने ही लस विकसीत करण्यात आली आहे.तर केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाने या लसीच्या विकसनासाठी अर्थसहाय्य केले आहे. 


♻️जिनोव्हा कडून काही दिवसांपुर्वीच चाचण्यांसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार तज्ज्ञ समितीने काही अटींच्या आधारे चाचण्यांना मान्यता दिली आहे.पहिल्या टप्प्यातील चाचण्यांची अंतरिम माहिती समितीकडे सादर केल्याशिवाय चाचणीचा दुसरा टप्पा सुरू करता येणार नाही, असे समितीने म्हटले आहे. 


♻️दरम्यान, पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटकडून ‘कोविशिल्ड’ लसीच्या आपत्कालीन वापरासाठी औषध महानियंत्रकांकडे परवानगी मागितली आहे. त्यातच पुण्यातीलच ‘जिनोव्हा’च्या ‘एमआरएनए’  आधारीत लसीचीही लवकरच चाचणी सुरू होणार असल्याने संपुर्ण जगाचे लक्ष पुण्याने वेधले आहे.

12 डिसेंबरपासून पोस्ट ऑफिसचा नवा नियम.



♓️जर तुमचे सुद्धा पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर तुम्हाला आता हे नवीन नियम माहीत असणे आवश्यक आहे. 12 डिसेंबर 2020 पासून पोस्ट ऑफिसच्या नियमामध्ये बदल होणार आहेत.तर नव्या नियमानुसार, 11 डिसेंबरपर्यंत ग्राहकांना पोस्ट ऑफिस बचत खात्यात (Post Office Savings Account) किमान 500 रुपये शिल्लक (बॅलन्स) ठेवणे आवश्यक आहे.12 डिसेंबरला ग्राहकांच्या खात्यात किमान बॅलन्स नसेल तर देखभाल शुल्क (Maintenance Charges) द्यावे लागणार आहे.


♓️इडिया पोस्टने(India Post)ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. इंडिया पोस्टने एका ट्वीटमध्ये लिहिले आहे की, आता पोस्ट ऑफिस सेव्हिंग खात्यात किमान बॅलन्स ठेवणे बंधनकारक आहे.


♓️इडिया पोस्टने माहिती देताना म्हटले आहे की, 11 डिसेंबर 2020 नंतर पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर लागू होणारी देखभाल फी टाळण्यासाठी आपल्या खात्यात लवकरच किमान 500 रुपयांचा बॅलन्स निश्चित करा. अन्यथा आर्थिक वर्षाच्या अखेरीस देखभालच्या नावाखाली खात्यातून 100 रुपये वजा केले जातील.इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटनुसार पोस्ट ऑफिस बचत खात्यावर वार्षिक व्याज दर 4 टक्के  आहे. 


♓️वयाज कमीतकमी बॅलन्स रकमेच्या आधारे महिन्याच्या 10 व्या आणि महिन्याच्या शेवटी कॅलक्युलेशन केले जाते. ग्राहक जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून त्यांच्या सोयीनुसार ते खाते उघडू शकतात.

देशातील सर्वात मोठ्या मद्यनिर्मिती कंपनीच्या मुख्य कार्यकारी अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला




भारतातील सर्वात मोठी मद्यनिर्मिती कंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड या कंपनीत हिना नागराजन यांची कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुरूवारी कंपनीनं याबाबत माहिती दिली. सध्या आनंद कृपालू हे या पदावर कार्यरत आहेत. 


आता आनंद कृपालू यांची जागा या हिना नागराजन या घेणार आहेत. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी पदी नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.


आनंद कृपालू हे २०१४ या कंपनीत रूजू झाले होते. ते युनाटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदी ३० जून २०२१ पर्यंत कायम राहणार आहेत. हिना नागराजन या १ जुलै २०२१ पासून कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रं स्वीकारतील, असं कंपनीकडून सांगण्यात आलं.


हिना नागराजन या सध्या USL ची मूळ कंपनी जियाजिओ मध्ये आफ्रिकन बाजार विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहे.

लॉर्ड विलिंग्टन (1931-36)


दुसरी गोलमेज परिषद . पुन्हा सविनय कायदेभंगाची चळवळ. 1934 ला आंदोलन मागे.


पंतप्रधान मॅक्डोनाल्डद्वारा कम्युनल अवॉर्डची घोषणा. त्याविरोधात गांधींचे उपोषण येरवडा येथे.


🍀  पणे करार – 1932


1935 चा भारत सरकार अधिनियम


🌸  1935 – आरबीआयची स्थापना


🍀  1935 भारतापासून बर्मा वेगळा


🌸   समाजवादी पक्ष (1934) – आचार्य नरेंद्र देव – जयप्रकाश नारायण


🍀  अखिल भारतीय किसान सभा – 1936

Online Test

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...