१० डिसेंबर २०२०

महाराष्ट्रात 'दिशा कायदा' मंजूर



राज्यातील महिलांच्या सुरक्षेचे मोठे कवच निर्माण करणारा 'दिशा' कायदा अधिवेशनात मंजूर करण्यात आला आहे. 


 यानुसार एखाद्या महिलेवर अतिप्रसंग झाला तर सीआरपी कलमाच्या बदलासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. 


 यानुसार जन्मठेपेची शिक्षा आता मृत्यूदंडात करण्यात आली आहे. या कायद्याला दिशा कायदा शक्ती बिल असं नाव देण्यात येणार आहे. 


 दरम्यान, या कायद्यानुसार आता फास्ट ट्रॅकवर आरोपींना शिक्षा करण्यात येणार आहे.


📚 काय आहे दिशा कायदा : #Act


 बलात्काऱ्याला कठोरात कठोर शिक्षा आणि तीसुद्धा अवघ्या 21 दिवसात देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने दिशा विधेयक 2019 आणलं.


 या नव्या कायद्यानुसार बलात्काराचा आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपींना 21 दिवसांत फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. 


सध्याच्या कायद्यांतर्गत खटला चालवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी मिळतो. या प्रकरणांसाठी 13 जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे. 


या न्यायालयांमध्ये बलात्कार, लैंगिक छळ आणि महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार यावरील खटले चालवले जाणार आहे.


Forbes ची जगातील सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर, निर्मला सीतारामन यांना ४१ वे स्थान.



🏆 फोर्ब्सच्या जगातील सर्वात सामर्थ्यवान महिलांच्या यादीत जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. 


🏆 तसंच या यादीत कमला हॅरिस या तिसऱ्या तर निर्मला सीतारामन यांना ४१ वं स्थान देण्यात आलं आहे.


🏆 १७ व्या वार्षिक 'फोर्ब्स पॉवर लिस्ट'मध्ये ३० देशांतील महिलांचा समावेश करण्यात आला आहे.


🏆 "फोर्ब्सच्या या यादीत १० देशांतील प्रमुख महिला, ३८ मुख्य कार्यकारी अधिकारी, पाच मनोरंजन क्षेत्राशी निगडित महिलांचा समावेश आहे. जरी त्यांचं वय, नागरिकत्व आणि निरनिराळ्या क्षेत्रातील त्या असतील तरी त्यांनी २०२० मध्ये आवेव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला मिळालेल्या व्यासपीठाचा योग्यरित्या केला.


🏆 या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ४१ वं स्थान देण्यात आलं आहे. 


🏆 तर एचसीएलच्या रोशनी नाडार-मल्होत्रा यांना ५५ वं, 


🏆 किरण मजूमदार शॉ यांना ६८ वं स्थान देण्यात आलं आहे. 


🏆 तर लँडमार्क समूहाच्या प्रमुख रेणुका जगतीयानी यांना या यादीत ९८ वं स्थान देण्यात आलं आहे. 


🏆 जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मार्केल या सलग दहाव्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहेत. एन्जेला मार्केल या युरोपमधील प्रमुख नेत्या आहेत.


🏆 जर्मनीला आर्थिक संकटातून बाहेर काढून त्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध करून जर्मनीत दहा लाख निर्वासितांना राहण्याची परवानगी देणाऱ्या मार्केल यांचं नेतृत्व खंबीर आहे. 


🏆 अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना या यादीत तिसरं स्थान देण्यात आलं आहे. 


🏆 तर न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी करोना महासाथीदरम्यान देशात कडक लॉकडाउन लागू करून आपल्या देशाला मोठ्या संकटातून वाचवल्यामुळे त्यांना या यादीत दुसरं स्थान देण्यात आलं आहे.


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे


Q1) कोणत्या देशाने 1 नोव्हेंबरपासून जगातल्या सर्वात मोठ्या जनगणना प्रक्रियेचा प्रारंभ केला?

--->>>>> चीन


Q2) कोणत्या राज्याने MSME उद्योगांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने ग्लोबल अलायन्स फॉर मास एंटरप्रेन्योरशीप या संस्थेसोबत सामंजस्य करार केला?

--->>>>> पंजाब


Q3) कोण न्यूझीलँड सरकारमधले भारतीय वंशाचे पहिले मंत्री आहेत?

--->>>>> प्रियंका राधाकृष्णन


Q4) कोणत्या राज्याच्या नागरी आणि संबंधित सेवा परीक्षेत प्रवेश मिळविण्यासाठी केल्या जाणाऱ्या अर्जामध्ये लिंग वर्गामध्ये 'ट्रान्सजेंडर' हा नवा पर्याय सादर केला गेला आहे?

--->>>>> आसाम


Q5) UNESCO संस्थेच्या ‘मॅन अँड बायोस्फीअर’ कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला ‘पन्ना जीवावरण अभयारण्य’ कोणत्या राज्यात आहे?

--->>>>> मध्यप्रदेश


Q6) कोणत्या शहरात भारतातले पहिले ‘टायर उद्यान’ तयार करण्यात आले आहे?

--->>>>> कोलकत्ता


Q7) कोणत्या दिवशी ‘पत्रकारांविरुद्ध गुन्ह्यांसाठी माफी देण्याच्या समाप्तीसाठी आंतरराष्ट्रीय दिन’ पाळला जातो?

--->>>>> 2 नोव्हेंबर


Q8) कोणत्या संस्थेनी हायड्रोजनची निर्मिती करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOC) सोबत करार केला?

--->>>>> भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू


Q9) कोणत्या राज्यात देशातल्या पहिल्या सौर-चालित छोट्या रेलगाडीचे उद्घाटन झाले?

--->>>>> केरळ


Q10) कोणती व्यक्ती विमानचालन कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आलेली पहिली महिला ठरली?

--->>>>> हरप्रीत ए. डी सिंग


Q1) कोणत्या देशाचे नाव अमेरिकेच्या ‘स्टेट स्पॉन्सर ऑफ टेररिजम’ याच्या यादीतून वगळण्यात आले?

उत्तर :- सुदान


Q2) कोणत्या जिल्ह्यात ‘डोब्रा चंटी पूल’ उभारण्यात आला?

उत्तर :- टिहरी-गढवाल


Q3) कोणत्या संस्थेनी ‘अग्नीशोधक आणि अग्नीशमन प्रणाली (FDSS)’ तंत्रज्ञान विकसित केले?

उत्तर :- अग्नी स्फोटक व पर्यावरण सुरक्षा केंद्र (CFEES)


Q4) कोणत्या राज्यात ‘पाक्के व्याघ्र प्रकल्प’ आहे?

उत्तर :- अरुणाचल प्रदेश


Q5) 2020 साली ‘शांती आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन’चा विषय काय आहे?

उत्तर :- सायन्स फॉर अँड विथ सोसायटी


Q6) कोणत्या व्यक्तीला ‘JCB प्राइज फॉर लिटरेचर 2020’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

उत्तर :-  एस. हरीश


Q7) कोणत्या राज्यात ‘हॉर्नबिल महोत्सव’ साजरा करतात?

उत्तर :-  नागालँड


Q8) कोण तृतीयपंथी लोकांच्या जीवनावर लिहिलेल्या “रासाथी” या शीर्षकाच्या कादंबरीचे लेखक आहे?

उत्तर :- ससिंद्रन कल्लीनकील


Q9) कोणत्या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन’ साजरा करतात?

उत्तर :- 9 नोव्हेंबर


Q10) ___ संस्थेच्यावतीने ‘अॅंटी-सॅटेलाईट (ए-सॅट)’ क्षेपणास्त्र प्रणालीच्या एका प्रतिरूपाचे अनावरण करण्यात आले.

उत्तर :- संरक्षण संशोधन विकास संघटना (DRDO)

Q1) कोणत्या देशात भारताच्या ‘रुपे कार्ड’ प्रकल्पाच्या द्वितीय टप्प्याचे उद्घाटन केले गेले?

उत्तर :- भूतान


Q2) कोणत्या व्यक्तीची आंतर-संसदीय संघासाठी (IPU) बाह्य लेखा परीक्षक या पदासाठी निवड झाली?

उत्तर :- गिरीश चंद्र मुर्मू


Q3) कोणत्या राज्यात 'महा आवास योजना' याचे उद्घाटन झाले?

उत्तर :- महाराष्ट्र


Q4) कोणत्या विषयाच्या संदर्भात मोहंती समिती नेमण्यात आली आहे?

उत्तर :- मोठ्या कॉर्पोरेट उद्योगांना बँक परवाना देणे


Q5) कोणत्या तारखेला राष्ट्रीय विद्यार्थी सेना (NCC) यांनी 72 वा वर्धापनदिन साजरा केला?

उत्तर :- 22 नोव्हेंबर 2020


Q6) कोणत्या राज्यात भारतातले पहिले ‘शेवाळ उद्यान’ (मॉस गार्डन) उभारले जात आहे?

उत्तर :- उत्तराखंड


Q7) कोणत्या योजनेच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘आवास दिन' साजरा करतात?

उत्तर :- प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण


Q8) कोणत्या व्यक्तीला 2020 साली बुकर पारितोषिक दिला गेला?

उत्तर :- स्‍टुअर्ट डग्लस


Q9) कोणत्या देशाच्या राजदूताच्या परिचय पत्राचा राष्ट्रपती कोविंद यांनी स्वीकार केला?

उत्तर :- ताजिकिस्तान


Q10) ‘राष्ट्रीय नवजात सप्ताह 2020’ याचा विषय काय आहे?

उत्तर :- प्रत्येक आरोग्य सुविधा केंद्रावर आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नवजात बालकासाठी गुणवत्ता, समता, गौरव


Q1) कोणत्या देशाची प्रथमच भारतासोबत शिखर परिषद आयोजित करण्यात आली?
उत्तर :- लक्झेमबर्ग

Q2) _ राज्यात काकातीया राजवंशाच्या अपूर्ण भव्य मंदिराचे अवशेष सापडले.
उत्तर :- तेलंगणा

Q3) कोणत्या दिवशी ‘जागतिक मत्स्यपालन दिन’ साजरा करतात?
उत्तर :-  21 नोव्हेंबर

Q4) कोणत्या संस्थेनी ‘आनंद’ नामक एक नवे व्यवसाय अॅप तयार केले?
उत्तर :-  एलआयसी इंडिया

Q5) जागतिक ‘TRACE ब्रायबरी रिस्क मॅट्रिक्स 2020’ याच्या यादीत भारताचा क्रमांक आहे?
उत्तर :- 77 वा

Q6) कोणत्या मंत्रालयाच्यावतीने ‘सफाईमित्र सुरक्षा आव्हान’चे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर :- गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालय

Q7) ‘द रिपब्लिकन एथीक: खंड तिसरा’ हा _ यांच्या निवडक भाषणांचा पुस्तकसंग्रह आहे.
उत्तर :- राम नाथ कोविंद

Q8) कोणती व्यक्ती मोल्दोवा देशाची प्रथम महिला राष्ट्रपती आहे?
उत्तर :- मैया सांडू

Q9) कोणत्या व्यक्तीला ‘वातायन जीवनगौरव पुरस्कार 2020’ देवून सन्मानित केले जाणार आहे?
उत्तर :- रमेश पोखरियाल ‘निशंक’

Q10) कोणत्या दिवशी ‘जागतिक तत्वज्ञान दिन’ साजरा करतात?
उत्तर :- नोव्हेंबर महिन्याचा तिसरा गुरुवार

Q1) कोणत्या केंद्रशासित प्रदेशात ‘कत्चल बेट’ आहे?
उत्तर :- निकोबार

Q2) कोणत्या देशाने Chang’e-5 (चांग’ई-5) नामक चंद्र मोहीम चंद्राकडे पाठवली?
उत्तर :- चीन

Q3) कोणता देश 2023 साली ‘जी-20 नेत्यांची शिखर परिषद’चे नियोजन करणार आहे?
उत्तर :- भारत

Q4) कोणत्या खेळाडूने लंडन शहरात ‘2020 ATP टूर फायनल्स’ ही टेनिस स्पर्धा जिंकली?
उत्तर :-  डेनिल मेदवेदेव

Q5) कोणती संस्था ‘विमानचालन सुरक्षा जागृती सप्ताह 2020’ (23-27 नोव्हेंबर) पाळत आहे?
उत्तर :- भारतीय विमानतळ प्राधिकरण

Q6) कोणत्या देशाने ‘APEC शिखर परिषद 2020’ याचे आयोजन केले?
उत्तर :- मलेशिया

Q7) कोणत्या अंतराळ संस्थेनी वाढत्या जागतिक समुद्र पातळीवर नजर ठेवण्यासाठी ‘सेंटिनेल-6’ उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठवला?
उत्तर :- NASA

Q8) कोणत्या ठिकाणी ‘SITMEX-20’ नामक सागरी कवायत आयोजित करण्यात आली?
उत्तर :- अंदमान समुद्र

Q9) कोणत्या राज्यात सर्वात प्राचीन ज्ञात असलेल्या मानवनिर्मित नॅनो-रचना सापडल्या?
उत्तर :- तामिळनाडू

Q10) कोणता शहरात भारतातला एकमेव ‘चेरी ब्लॉसम महोत्सव’ आयोजित केला जातो?
उत्तर :- शिलॉंग

Q1) कोणते  देश ‘शुक्रयान’ मोहीमेत भारताला सहकार्य करणार आहे?
उत्तर :- रशिया,फ्रान्स,स्वीडन

Q2) कोणत्या दिवशी ‘लचित दिन’ साजरा करतात?
उत्तर :- 24 नोव्हेंबर

Q3) 'मॅमोथ ऑपरेशन' कशा संदर्भात आहे?
उत्तर :- कोविड-19 लसीचे वितरण

Q4) कोणती व्यक्ती ‘नॅशनल यूनियनिस्ट पार्टी’ या पक्षाची सह-संस्थापक होती?
उत्तर :- सर छोटू राम

Q5) पंजाब राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात नवे मेगा फूड पार्क उभारण्यात आले?
उत्तर :- कपूरतला

Q6) कोणत्या बाबीच्या संदर्भात “अभयम् अ‍ॅप” आहे?
उत्तर :-  महिला आणि मुलांची सुरक्षा

Q7) कोणत्या राज्यात 80 व्या ‘अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद’ (AIPOC) याचे आयोजन करण्यात आले?
उत्तर :- गुजरात

Q8) कोणता कर्नाटक राज्यातला नवनिर्मित 31 वा जिल्हा असणार?
उत्तर :-  विजयनगर

Q9) कोणत्या राज्यात ग्रामीण भागात व कृषी क्षेत्रासाठी स्वच्छ ऊर्जा निर्मितीचा भारतातला पहिला ‘कॉन्व्हर्जेंस’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे?
उत्तर :- गोवा

Q10) कोणत्या कंपनीने गगनयान मोहिमेचा ‘बूस्टर’ हा पहिला भाग ISRO संस्थेकडे सोपवला?
उत्तर :- लार्सन अँड टुब्रो

Q1) भारताच्या मदतीने काबुल नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणाचे नाव काय आहे?
उत्तर :- शाहतुत धरण
 
Q2) कोणता राज्य ‘खाऱ्या पाण्यावरील प्रक्रिया प्रकल्प’ उभरणारा देशातला चौथा राज्य ठरणार?
उत्तर :- महाराष्ट्र

Q3) तृतीयपंथी व्यक्तींसाठी समर्पित असलेल्या संकेतस्थळाचे नाव काय आहे?
उत्तर :- नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स

Q4) माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कोणत्या कलमाच्या अन्वये भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेला धोका असलेल्या 43 मोबाइल अॅपवर बंदी घातली?
उत्तर :- 69(अ)

Q5) ‘सहकार प्रज्ञा’ काय आहे?
उत्तर :- ग्रामीण भागात प्राथमिक सहकारी संस्थांना प्रशिक्षण देणे

Q6) 2020 साली आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मूलन दिनाचा विषय काय होता?
उत्तर :- ऑरेंज द वर्ल्ड: फंड, रिस्पॉन्ड, प्रीव्हेंट, कलेक्ट!

Q7) कोणत्या राज्यात “हर घर नल योजना”चे उद्घाटन झाले?
उत्तर :-  उत्तरप्रदेश

Q8) कोणत्या देशाने देशातल्या सूचीबद्ध संस्थांमध्ये वरिष्ठ व्यवस्थापन पदांवर महिलांना नेमण्यासाठी निश्चित जागा राखीव ठेवण्याविषयीचा प्रस्ताव मांडला?
उत्तर :- जर्मनी

Q9) कोणत्या जिल्ह्यात संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी आशियातली पहिली मिल उभारली जात आहे?
उत्तर :- परभणी

Q10) कोणत्या खेळाडूने ‘लिन्झ ओपन’ ही टेनिस स्पर्धा जिंकली?
उत्तर :- आर्यना सबलेन्का


Q1) कोणता देश कोळश्यापासून वीज निर्मिती करणारा पहिला अरबी देश ठरला आहे?
उत्तर :- संयुक्त अरब अमिरात

Q2) कोणत्या मंत्रालयाने ‘मध FPO कार्यक्रम’ याचे उद्घाटन केले?
उत्तर :- कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

Q3) कोणते शहर जगातले सर्वाधिक जोडलेले शहर ठरले आहे?
उत्तर :- शांघाय

Q4) कोणत्या विमानचालन कंपनीने लडाखमध्ये लेहसाठी समर्पित अश्या मालवाहतूक सेवेचे उद्घाटन केले?
उत्तर :- स्पाइसजेट

Q5) कोणते नाव ‘अयोध्या विमानतळ’ला देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे?
उत्तर :- मर्यादा पुरुषोत्तम श्री राम विमानतळ

Q6) कोणत्या व्यक्तीला भारतीय माहिती तंत्रज्ञान (IT) उद्योगाचे जनक म्हणून ओळखले जाते?
उत्तर :-  फकीर चंद कोहली

Q7) कोणती व्यक्ती भारतीय भूदलाचे नवे प्रमुख अभियंता आहे?
उत्तर :-  लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग

Q8) कोणत्या ठिकाणी “प्रोव्हिजन ऑफ सोलर फोटो व्होल्टिक पॉवरप्लांट 1.5 MW” नामक प्रकल्प उभारण्यात आला आहे?
उत्तर :- लडाख

Q9) “UDIN” याचे पूर्ण नाव काय आहे?
उत्तर :- युनिक डॉक्युमेंट आयडेंटिफिकेशन नंबर

Q10) कोणत्या मंत्रालयाने “इंडिया क्लायमेट चेंज नॉलेज पोर्टल” संकेतस्थळ तयार केले?
उत्तर :- पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय

Q1) कोणता ‘संयुक्त राष्ट्रसंघ अणुशस्त्रे प्रतिबंधक करार’ याला मान्यता देणारा 50वा देश ठरला?
----- होंडुरास

Q2) कोणत्या देशाकडून ‘यलो डस्ट’ (पिवळे वादळ) वाहते?
------- चीन

Q3) कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात भारतातले पहिले ‘वालुधन्व उद्यान’ बांधले जाणार आहे?
------- गोवा

Q4) कोणती भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) दलाची प्रशासकीय संस्था आहे?
------- गृह मंत्रालय

Q5) कोणत्या देशाला अमेरिकेनी तीन शस्त्रप्रणालींची विक्री करण्यास मान्यता दिली?
--------- तैवान

Q6) कोणत्या मंत्रालयाने खर्च कमी करण्याच्या हेतूने जमीन हस्तांतरणाविषयी नवीन नियम तयार केले?
-------- संरक्षण मंत्रालय

Q7) कोणत्या प्राण्याच्या संरक्षणार्थ ‘बिश्केक घोषणापत्र’ आहे?
-------  हिम बिबट्या

Q8) कोणत्या दिवशी जगभरात ‘जागतिक पोलिओ दिन’ पाळला जातो?
--------  24 ऑक्टोबर

Q9) कोणत्या शहरात यू.एन. मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटर सोबत करार झालेले पेडियाट्रिक हार्ट रुग्णालय उभारले जाणार आहे?
-------- अहमदाबाद

Q10) कोणत्या शहरामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेली दीक्षाभूमी आहे?
------- नागपूर

Q1) कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी ‘SCO स्टार्टअप फोरम’ याची एक स्टार्टअप इनक्यूबेटर म्हणून स्थापना केली?
---------- शांघाय सहकार्य संघटना

Q2) कोणत्या देशानी टपालांच्या वाहतूकीविषयी सीमाशुल्कविषयक माहितीचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आदान-प्रदान करण्यासाठी भारतीय टपाल विभागासोबत करार केला?
---------- अमेरिका

Q3) कोणते भाजीपाल्यासाठी किमान किंमत निश्चित करणारे पहिले राज्य ठरले?
---------- केरळ

Q4) पायदळ दिवस _ यासाठी साजरा केला जातो.
---------- पायदळाच्या तुकडीने बजावलेल्या कामगिरीचे स्मरण करणे ( 27ऑक्टोबर )

Q5) कोणत्या संस्थेच्या मदतीने केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्रालयाने आदिवासी कल्याणासाठी दोन उत्कृष्टता केंद्रे उघडली?
------------ आर्ट ऑफ लिव्हिंग

Q6) _ यांना श्रद्धांजली म्हणून भारतात ‘सतर्कता जागृती सप्ताह’ पाळला जातो.
----------  सरदार वल्लभ भाई पटेल

Q7) कोणते उच्च न्यायालय आभासी पद्धतीने वास्तविक वेळेत न्यायालयीन कार्यवाही पार पाडणारे पहिले ठरले आहे?
---------- गुजरात

Q8) 2020 साली जागतिक द्रुकश्राव्य वारसा दिनाचा विषय काय आहे?
-----------  युवर विंडो टू द वर्ल्ड

Q9) कोणती व्यक्ती भारतातले प्रदीर्घ काळ सेवा देणारे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून निवृत्त झाली?
--------- आदित्य पुरी

Q10) कोणता चौथ्या ‘इंडिया एनर्जी फोरम’ बैठकीचा विषय होता?
-------------  बदलत्या जागतिक काळात भारताचे ऊर्जा भवितव्य

प्रश्न१) __ येथे भारतातील पाहिले ट्रान्स-शिपमेंट हब आहे?
--- केरळ

प्रश्न२)  __ या दिवशी 'जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो?
---- 15 जुलै रोजी

प्रश्न३) कोणत्या व्यक्तीला 2020 सालासाठी "इन्फा बिजीनेस लीडर ऑफ द इअर" चा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?
----- वेद प्रकाश दुडेजा  

प्रश्न४) कोणत्या भारतीय व्यक्तीची अफगाणिस्तान देशात नवीन भारतीय दूत म्हणून नेमणूक झाली आहे?
---- रुद्रेंद्र टंडन

प्रश्न५) कोणती व्यक्ती पोलंड देशात झालेल्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत विजयी झाली?
----- आंद्रेज दुडा

प्रश्न६) कोणत्या व्यक्तीला 2020 साली 'मोहुन बागान रत्न' पुरस्कार दिला जाणार आहे?
----- गुरबक्श सिंग

प्रश्न७) कोणत्या व्यक्तीला 2020 सालाचा ‘वोन करमन पुरस्कार’ देण्याचे जाहीर झाले?
----- डॉ. कैलासावदिवू सिवन

प्रश्न८)  'ए सॉंग ऑफ इंडिया’ हे शीर्षक असलेले पुस्तक _ ह्यांनी लिहिले आहे.
----- रस्किन बाँड 

प्रश्न९) हॉकी इंडियाचे नवीन अधिकृत अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?
------ ज्ञानेंद्रो निंगोम्बाम

प्रश्न१०) कोणत्या योजनेला ‘वंदे भारत’ मोहिमेचे नवे रूप म्हणून ओळखले जाते?
------- एअर बबल

प्रश्न११) 'FIFA विश्व चषक 2022’ ही स्पर्धा _ देशात खेळवली जाणार आहे.
-------- कतार

प्रश्न१२) कोणती व्यक्ती सुरिनाम देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवडली गेली?
 ------ चंद्रिकापरसाद 'चान' संतोखी

प्रश्न१३)  यांनी "द तंगम्स" या शीर्षकाच्या पुस्तकाचे अनावरण केले.
------ पेमा खंडू

प्रश्न१४) कोणत्या वनाला ‘वन्यजीव अभयारण्य’चा दर्जा प्रदान करण्यात आला आहे?
------ पोबा

प्रश्न१५) _ ही कंपनी “अंजी खाड पूल” हा भारतातील पहिला तारांच्या सहाय्याने उभारलेला रेल्वे पूल बांधणार आहे.
------  के. आर. सी. एल.

Q1) कोणत्या राज्य सरकारने जमीन व मालमत्ता-संबंधित सर्व माहिती ऑनलाइन मिळविण्यासाठी ‘धरणी’ संकेतस्थळ तयार केले?
------- तेलंगणा

Q2) कोणत्या व्यक्तीच्या स्मरणार्थ देशात ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा केला जातो?
-------  सरदार वल्लभभाई पटेल

Q3) कोणत्या मंत्रालयाने “SERB-POWER” नावाच्या उपक्रमाचा आरंभ केला?
------- विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय

Q4) कोणत्या दलाने राजस्थानमध्ये 'फिट इंडिया वॉकथॉन' आयोजित केले?
-------- भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP)

Q5) कोणत्या संस्थेनी 'डूईंग बिझनेस इन इंडिया रिपोर्ट, 2020' हा अहवाल प्रसिद्ध केला?
------- UK-इंडिया बिझिनेस कौन्सिल

Q6) कोणत्या व्यक्तीची भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणूक झाली?
-------- यशवर्धन कुमार सिन्हा

Q7) कोणत्या कंपनीने डिजिटल कौशल्यासह 1 लक्ष महिलांना सक्षम करण्यासाठी NSDC संस्थेसोबत एक सहकार्य करार केला?
-------- मायक्रोसॉफ्ट

Q8) कोणते मंत्रालय NABCB कडून मान्यता प्राप्त झालेली राष्ट्रीय उत्पादकता परिषद नियमित करते?
--------- वाणिज्य व उद्योग मंत्रालय

Q9) कोणता ‘संयुक्त राष्ट्रसंघ अणुशस्त्रे प्रतिबंधक करार’ याला मान्यता देणारा 50वा देश ठरला?
------- होंडुरास

Q10) कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात भारतातले पहिले ‘वालुधन्व उद्यान’ बांधले जाणार आहे?
-------- गोवा

भारतीय वंशाचे चौहान ब्रिटिश कोलंबिया विधानसभा सभापतिपदी


• कॅनडातील भारतीय वंशाचे राज चौहान यांची ब्रिटिश कोलंबिया विधानसभा विधिमंडळाचे सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. 


• या पदावर निवड झालेले ते भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती ठरले आहेत. 


• ते या विधीमंडळात पाच वेळा निवडून आले असून यापूर्वी त्यांनी या विधिमंडळाचे उपाध्यक्षपद भूषविलेले आहे.


• चौहान हे मूळ पंजाबचे असून १९७३ ला ते कॅनडाला स्थलांतरित झाले होते.


भारताच्या सर्व पंतप्रधानांची यादी....



 1. जवाहरलाल नेहरू

कार्यकाळ:-

 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964

 16 वर्षे, 286 दिवस

 भारताचे पहिले पंतप्रधान आणि प्रदीर्घ काळ सेवा देणारे पंतप्रधान


 २. गुलझारी लाल नंदा

कार्यकाळ:-

 27 मे 1964 ते 9 जून 1964

 13 दिवस

 पहिले कार्यवाहक पंतप्रधान, सर्वात कमी काळ पंतप्रधान


 3. लाल बहादूर शास्त्री

कार्यकाळ:-

 9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966

 1 वर्ष, 216 दिवस

 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी त्यांनी "जय जवान जय किसान" हा नारा दिला.


 4.  गुलझारी लाल नंदा

कार्यकाळ:-

 11 जानेवारी 1966 ते 24 जानेवारी 1966

 13 दिवस



5. इंदिरा गांधी

कार्यकाळ:-

 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977

 11 वर्षे, 59 दिवस

 भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान


 5. मोरारजी देसाई

कार्यकाळ:-

 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979

 2 वर्षे, 126 दिवस

 सर्वात वयोवृद्ध पंतप्रधान (८१ वर्षे) आणि पदाचा राजीनामा देणारे पहिले पंतप्रधान


 6. चरणसिंग

कार्यकाळ:-

 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980

 170 दिवस

 एकमेव पंतप्रधान ज्यानी संसदेला तोंड दिले नाही..


 7. इंदिरा गांधी

कार्यकाळ:-

 14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984

 4 वर्षे, 291 दिवस

 दुस-यांदा पंतप्रधानपदावर काम करणारी पहिली महिला


 8. राजीव गांधी

कार्यकाळ:-

 31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989

 5 वर्षे, 32 दिवस

 सर्वात तरुण पंतप्रधान (40 वर्षे)


 9. विश्वनाथ प्रताप सिंह

कार्यकाळ:-

 2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990

 343 दिवस

 अविश्वास ठराव मंजूर करून पद सोडणरे पंतप्रधान 


 10. चंद्रशेखर

कार्यकाळ:-

 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991

 223 दिवस

कार्यकाळ:-

 समाजवादी जनता पार्टीशी संबंधित


 11. पीव्ही नरसिंहराव

कार्यकाळ:-

 21 जून 1991 ते 16 मे 1996

 4 वर्षे, 330 दिवस

 दक्षिण भारतातूंन पहिले पंतप्रधान


 12. अटलबिहारी वाजपेयी

कार्यकाळ:-

 16 मे 1996 ते 1 जून 1996

 16 दिवस

 सरकार केवळ 1 मताने पडले


 13. एचडी देव गौडा

कार्यकाळ:-

 1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997

 324 दिवस

 जनता दलाचे पंतप्रधान 


 14. इंदर कुमार गुजराल

कार्यकाळ:-

 21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998

 332 दिवस

 स्वतंत्रपणे भारताचे 13 वे पंतप्रधान


 15.  अटलबिहारी वाजपेयी

कार्यकाळ:-

 19 मार्च 1998 ते 22 मे 2004

 6 वर्षे, 64 दिवस

 कॉंग्रेस व्यतिरिक्त प्रथम पंतप्रधान ज्यांनी संपुर्ण कार्यकाळ  पूर्ण केलेले पंतप्रधान 


 16. मनमोहन सिंग

कार्यकाळ:-

 22 मे 2004 ते 26 मे 2014

 10 वर्षे, 2 दिवस

 प्रथम शीख पंतप्रधान


 17. नरेंद्र मोदी

कार्यकाळ:-

 26 मे 2014 आत्तापर्यंत

करोना काळातलं पहिलं मिशन, ISRO कडून PSLV C49 लाँच-



📚करोना काळात इस्रोने अर्थात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने आपलं मिशन पार पाडलं आहे. ISRO PSLV -C49 चं लाँचिंग करुन भारताने आणखी एक इतिहास घढवला आहे. 


📚३ वाजून २ मिनिटांनी हे PSLV C49 लाँच करण्यात येणार होतं मात्र यासाठी १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागला. इस्रोचं हे ५१ वं मिशन आहे. या प्रक्षेपणाचं लाइव्ह प्रसारण इस्त्रोची वेबसाइट, यूट्युब चॅनल, फेसबुक आणि ट्विटरवरही करण्यात आलं. 


📚अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट हे अर्थ अर्थ ऑब्झर्वेशन रिसेट सॅटेलाइटचेच आधुनिक व्हर्जन आहे. याद्वारे ढगांच्या आडूनही पृथ्वीवरचे फोटो सुस्पष्टरित्या टिपता येणार आहेत.


📚दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रोचं या मोहिमेसाठी कौतुक केलं आहे. आपला देश करोना संकटाशी लढत असतानाही देशाच्या वैज्ञानिकांनी जे यशस्वी लाँचिंग करुन दाखवलं त्याचा मला अभिमान वाटतो अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचं कौतुक केलं आहे.


📚EOS-01 हे एक अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. याचा उपयोग शेती, फॉरेस्ट्री आणि आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी करण्यात येणार आहे. कस्टमर सॅटेलाईट्सला कमर्शिअल कराराअंतर्गत लाँच करण्यात आला आहे. हा करार न्यूस्पेस इंडिया लिमिटेड आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेससोबत करण्यात आला.

भारतीय वंशाचे अनिल सोनी WHO फाऊंडेशनचे पहिले सीईओ



भारतीय वंशाचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अनिल सोनी यांना जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आलं आहे.


आरोग्य विषयक समस्यांना तोंड देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं या जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची निर्मिती केली आहे. अनिल सोनी हे या संघटनेचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत.


अनिल सोनी यांच्याकडे 1 जानेवारीपासून मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार दिला जाणार आहे. या दरम्या त्यांची लक्ष्य आरोग्य क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा फायदा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा असणार आहे.


जागतिक आरोग्य संघटनेनं करोना महासाथीच्या दरम्यान मे 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची सुरूवात केली होती.


तर आतापर्यंत अनिल सोनी हे ग्लोबव हेल्थकेअर कंपनी वियाट्रिस सोबत कार्यरत होते. ते ‘ग्लोबल इन्फेक्शन डिजिज’चे प्रमुख म्हणून वियाट्रिसमध्ये सेवा बजावत होते.


तसेच यापूर्वी अनिल सोनी हे क्लिंटन हेल्थ अॅक्सेसमध्येही कार्यरत होते. 2005 ते 2010 या कालावधीत त्यांनी या ठिकाणी सेवा बजावली. याव्यतिरिक्त सोनी यांनी बिल आणि मलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या आरोग्य विभागातही कार्यभार सांभाळला होता. त्यांनी एचआयव्हीच्या उपचारांमध्येही मोलाची भूमिका बजावली आहे.

फायझर लशीमुळे 10 दिवसांत संरक्षण.



कोविड-19 विषाणूवरील फायझर व बायोएनटेक  यांची लस पहिल्याच मात्रेत दहा दिवसांत विषाणूपासून रुग्णाला उत्तम संरक्षण देते, असे दिसून आले आहे.

तर अमेरिकी अन्न व औषध प्रशासनापुढे या लशीच्या चाचण्यांबाबतची जी कागदपत्रे मांडण्यात आली  त्यातून हे स्पष्ट झाले आहे.


अमेरिकेतील लस सल्लागार गटाची जी बैठक झाली, त्यात लशीबाबत अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाली. या बैठकीत ज्या माहिती अहवालांचे सादरीकरण झाले त्यात 53 पानांच्या मूळ माहिती विश्लेषण पुस्तिकेचा समावेश आले.तसेच गेल्या महिन्यात ही लस दोन मात्रा दिल्यानंतर 95 टक्के प्रभावी ठरली होती. ती 21 दिवसांच्या  अंतराने देण्यात आली.

 

गेल्या महिन्यात बायोएनटेक व फायझर यांनी लशीच्या दोन मात्रानंतर 95 टक्के प्रभावाचा दावा केला असून प्रत्यक्षात फायझरची लस फार लवकर करोनाविरोधात काम करू लागते.


वय, वंश, वजन यापैकी कुठल्याही घटकाचा विचार केला, तरी ही लस जास्त चांगली व वेगाने विषाणूचा प्रतिबंध करणारी असल्याचे दिसून आले आहे. या लशीचे कुठलेही गंभीर गैरपरिणाम दिसून आलेले नाहीत.

अमेरिकेत डीएसीए पुन्हा लागू; न्यायालयाचा आदेश.



डेफर्ड  अ‍ॅक्शन फॉर चाइल्डहूड अरायव्हल्स (डीएसीए) हा कायदा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाने २०१७ मध्ये घेतलेला निर्णय अमेरिकी न्यायालयाने रद्दबातल केला असून ओबामा काळातील हा कायदा पुन्हा लागू करण्याचा आदेश दिला आहे.


कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरित व्यक्तींना  त्यामुळे दिलासा मिळाला असून त्यात काही भारतीयांचा समावेश आहे. ट्रम्प प्रशासनाने डीएसीए कायदा २०१७ मध्ये रद्द केला होता, पण त्याला सर्वोच्च न्यायालयाने जूनमध्येही विरोध केला होता.


शुक्रवारी न्यूयॉर्कमधील पूर्व जिल्ह्यचे न्यायाधीश निकोलस गरॉफिस यांनी अंतर्गत सुरक्षा विभागाला असा आदेश दिला,की डीएसीए कायद्यान्वये संबंधिताना दोन वर्षे वाढवून देण्यात यावीत. लोकांचे स्थलांतर अर्ज स्वीकारण्यास सुरूवात करावी. सोमवारपासून मुदतवाढीचे हे अर्ज स्वीकारण्यात यावेत. 

मराठा आरक्षणावरील स्थगितीसंदर्भात तूर्तास दिलासा नाही, जानेवारीत पुन्हा सुनावणी


आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत जानेवारीत पुन्हा सुनावणी होणार आहे. 


मराठा आरक्षणाच्या स्थगितीपूर्वीच्या नोकरभरतीच्या अंमलबजावणीला परवानगी नाही, असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे.


आम्ही कोणतीही भरती थांबवण्यास नकार दिलेला नाही मात्र या अॅक्ट अंतर्गत ही भरती करता येणार नाही असं कोर्टाने म्हटलं आहे.

2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रेकडान्सिंगचे पदार्पण.


🌺बरेकडान्सला अधिकृत ऑलिम्पिक क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्यात आली आहे.पॅरिसला 2024 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत ब्रेकडान्सच्या समावेशाचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) घेतला आहे.


🌺तर युवा पिढीला ऑलिम्पिकडे मोठय़ा प्रमाणात आकर्षित करण्यासाठी रस्त्यावरील नृत्याला म्हणजेच ‘स्ट्रीट डान्स’ला मान्यता देण्याचा निर्णय ‘आयओसी’ने घेतला आहे. त्यानुसार 2024मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये ब्रेकडान्सिंगचा समावेश असेल.


🌺तसेच याआधी टोक्यो ऑलिम्पिकमधून स्केटबोर्डिग, क्लायम्बिंग आणि सर्फिग या खेळांचे पदार्पण होणार होते. मात्र करोनामुळे यावर्षीचा ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षांपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे.यास्थितीत स्केटबोर्डिग, क्लायम्बिंग आणि सर्फिग या तीन्ही खेळांना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान देण्यात आले आहे.

जगाचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम


🌷‘‘विश्वकल्याणासाठी भारताचे विचार अधिक प्रभावी असून, जगाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या परंपरेत आहेत. विविधतांना जोडणारा घटक फक्त भारताजवळच असून, आम्हाला तो जगाला द्यायचा आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारत पूर्णपणे सक्षम आहे’’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे झालेल्या कार्यक्रमात केले. ‘जागतिक परिप्रेक्ष्यात भारताची भूमिका’ या विषयावर ते बोलत होते.


🌷भागवत म्हणाले की, ‘‘एकीकडे अमेरिका आणि दुसरीकडे रशिया असे दोन ध्रुव जगात निर्माण झाल्याचे आम्ही पाहिले आहे. दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करू इच्छित नव्हते. त्यामुळे त्यांनी इतर देशांना शस्त्रपुरवठा करून  युद्ध करणे सुरू केले. सोबतच त्यांनी आर्थिक क्षेत्रावरही नियंत्रणास सुरुवात केली. त्यामुळे ‘शीतयुद्ध’ नावाची नवी युद्धशैली आम्ही पाहिली. त्यात अमेरिका जिंकली आणि रशियाचा पराभव झाला. त्यामुळे अमेरिका ही एक महाशक्ती बनली. आता अमेरिकेच्या वर्चस्वाखालीच सर्व सूत्रे हलणार, असे सांगण्यात येऊ लागले. पण तसे झाले नाही.’’


🌷‘‘जगाला सुखी करण्याची गोष्ट तर दूरच, पण अमेरिका या जगाला एकत्रही ठेवू शकली नाहीत. कालौघात अनेक भाषा संपल्या, अनेक संस्कृतींचा अंत झाला, विविधतेची आणि पर्यावरणाची हानी झाली. संपूर्ण जगाच्या कल्याणाची इच्छा ‘मॅक्झिमम गुड्स, मॅक्झिमम पीपल’ पर्यंत मर्यादित आणि तीही काही मोजक्या देशांपुरती सिमीत राहिली’’,याकडे भागवत यांनी लक्ष वेधले. जगाच्या दक्षिण गोलार्धातील सारे देश नैसर्गिक साधन-संपत्तीने समृद्ध होते. विकसित देशांनी मोजक्या लोकसंख्येसाठी सारी साधने वापरली, असे भागवत यांनी सांगितले.

कोविड साथीमुळे २०३०पर्यंत १ अब्ज लोक दारिद्रय़ात


महिलांमधील दारिद्रय़ वाढून आणखी १०२ दशलक्ष महिला दारिद्रय़ाच्या खाईत जातील.


⚡️कोविड १९ साथीमुळे अनेकांचे रोजगार गेले असून अतिरिक्त २०७ दशलक्ष लोक दारिद्रय़ाच्या खाईत ढकलले जाणार असून २०३० पर्यंत १ अब्ज लोक दारिद्रय़ात असतील, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे.

किमान १ अब्ज लोक २०३० पर्यंत दारिद्रय़ात दिवस कंठत असतील.


⚡️ यएनडीपी व डेनव्हर विद्यापीठाचे पार्डी सेंटर फॉर इंटरनॅशनल फ्युचर्स यांच्या संयुक्त विद्यामाने कोविड साथीच्या दूरगामी परिणामांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार २७० दशलक्ष लोक दारिद्रय़ाच्या खाईत ढकलले जाणार असून दारिद्रय़ात जीवन जगणाऱ्या लोकांची संख्या २०३० पर्यंत म्हणजे आणखी दहा वर्षांत १ अब्ज होईल. कोविड काळातील मूलभूत स्थितीचा विचार करता अलीकडचा मृत्युदर व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अर्थव्यवस्थांबाबत अलीकडे दिलेले अंदाज यावरून २०३० पर्यंत आणखी ४४ दशलक्ष अतिदारिद्रय़ात जाणार आहेत.  महिलांमधील दारिद्रय़ वाढून आणखी १०२ दशलक्ष महिला दारिद्रय़ाच्या खाईत जातील.

माऊंट एव्हरेस्टच्या नव्या उंचीची अधिकृत घोषणा


📍 जगातील सर्वात उंच शिखर अशी ओळख असलेल्या माऊंट एव्हरेस्टची नवी उंची ८,८४८.८६ मीटर असल्याची अधिकृत घोषणा नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांनी केली. 


👉 माऊंट एव्हरेस्टची उंची ही आधीपेक्षा ०.८६ सेंटीमीटर एवढी वाढली असल्याचीही माहिती ग्यावली यांनी दिली. 


✨ जवळपास वर्षभर या शिखराची उंचीच्या मोजमापावर काम सुरू होते. त्यानंतर अखेर आज मंगळवारी नेपाळने एव्हरेस्टची नवी उंची अधिकृतपणे जाहीर केली. 


🎯 दरम्यान, भूकंपानंतर हे शिखर काहीसं खचलं असल्याची शक्यता असल्याने पुनर्मोजणीचा निर्णय घेण्यात आल्याचे नेपाळ सरकारकडून सांगण्यात आले आहे.

सना युद्धाभ्यास भारत और विश्व के देशों के बीच


🟥 गरुड़ : भारत - फ्रांस


🟥 हण्ड इन हैण्ड : भारत - चीन


🟥 इद्र : भारत - रूस


🟥 जिमेक्स : भारत - जापान


🟥 मालाबार : अमेरिका - भारत


🟥 सर्य किरण : भारत और नेपाल


🟥 वरुण : फ्रांस और भारत


🟥 सिम्बेक्स : सिंगापुर नौसेना और भारतीय नौसेना


🟥 लाब्समर : ब्राजील के साथ भारत और दक्षिण अफ्रीका के नौसेना


🟥 कोंकण : भारतीय नौसेना और ब्रिटेन की रॉयल नेवी


🟥 औसीइंडेक्स : भारतीय और ऑस्ट्रेलियाई नौसेना


🟥 इद्रधनुष: भारत - ब्रिटेन के वायु अभ्यास


🟥 नोमेडिक एलीफैंट : मंगोलिया के साथ भारतीय सेना का अभ्यास 


🟥एकुवेरिन : मालदीव और भारत


🟥 गरुड़ शक्ति : भारत और इंडोनेशिया


🟥 मित्र शक्ति : भारत - श्रीलंका


🟥 नसीम अल बह्र : भारत - ओमान


🟥 सलिनेक्स : भारत और श्रीलंका के बीच नौसेना में संयुक्त अभ्यास 


🟥 कजिन संधि अभ्यास : भारत और जापान के तटरक्षकों का सहयोग


🟥मालाबार : भारत और अमेरिका


🟥 यद्ध अभ्यास : भारत और अमेरिका


🟥 रड फ्लैग : भारत और अमेरिका


🟥कोप : भारत और अमेरिका

Companies & Their Founder


1. Walmart के संस्थापक कौन है ?

Answer - सैम वॉल्टन (Sam Walton) 1962


2. Paytm के संस्थापक कौन है ?

Answer - विजय शेखर शर्मा (2010)


3. Google के संस्थापक कौन है ?

Answer - लैरी पेज, सर्फ ब्रिन (1998)


4. Microsoft के संस्थापक कौन है ?

Answer - बिल गेट्स, पॉल एलन (1975)


5. WhatsApp के संस्थापक कौन है ?

Answer - ब्रायन ऐक्टन ,जैन कौम (2009)


6. Amazon के संस्थापक कौन है ?

Answer - जैफ बेजोस (Jef bez0s) 1994


7. Flipkart के संस्थापक कौन है ?

Answer - सचिन बंसल और बिन्नी बंसल (2007)


8. Yahoo के संस्थापक कौन है ?

Answer - David filo, Jerry yang (1994)


9. Apple के संस्थापक कौन है ?

Answer - स्टीव जॉब्स (1976)


10. Wikipedia के संस्थापक कौन है ?

Answer - जिमी वेल्स (2001)


11. Motorola के संस्थापक कौन है ?

Answer - Paul & Joseph Gablin (1928)


12. Facebook के संस्थापक कौन है ?

Answer - मार्क जुकरबर्ग (2004)


13. Alibaba के संस्थापक कौन है ?

Answer - जैक मा (1999)


14. Nokia के संस्थापक कौन है ?

Answer - Fredrik Idestam, Leo Mechelin


15. Reliance के संस्थापक कौन है ?

Answer - धीरूभाई अम्बानी (1997)


16. Ebay के संस्थापक कौन है ?

Answer - Pierre Omidyar (1995)


17. Twitter के संस्थापक कौन है ?

Answer - जैक डॉर्स (2006)


18. Instagram के संस्थापक कौन है ?

Answer - केविन सिस्ट्रोम, माइक करिजर (2010)


19. YouTube के संस्थापक कौन है ?

Answer - Jawed KarimStee Chen (2005)


20. Skype के संस्थापक कौन है ?

Answer - Niklas Zennstrom Janus Friis (2003)


21. Tesla के संस्थापक कौन है ?

Answer - एलोन मस्क (2003)


22. Intel के संस्थापक कौन है ?

Answer - गॉर्डन मूरे (1968)


23. Samsung के संस्थापक कौन है ?

Answer - Lee Byungchul (1938)


24. Xiaomi के संस्थापक कौन है ?

Answer - Lie Jun (2010)

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना


🔖केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘आत्मनिर्भर भारत रोजगार योजना’ (ABRY) याला आपली मंजूरी दिली. औपचारिक क्षेत्रात रोजगार वाढविण्यासाठी आणि ‘आत्मनिर्भर भारत पॅकेज 3.0’ अंतर्गत कोविड-19 महामारीच्या धक्क्यातून व्यवस्था बाहेर काढण्यासाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही योजना आहे.


📍ठळक वैशिष्ट्ये....


🔖ही योजना वर्ष 2020 ते वर्ष 2023 या कालावधीत लागू राहणार. योजनेच्या अंमलबजावणीसाठी 22810 कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.


🔖1 ऑक्टोबर 2020 रोजी किंवा त्यानंतर 30 जून 2021 पर्यंतच्या कालावधीत रोजगार दिलेल्या नवीन कर्मचार्‍यांच्या संदर्भात भारत सरकार दोन वर्षांसाठी अनुदान देणार.


🔖1000 कर्मचार्‍यांच्या आस्थापनांमध्ये कामावर घेतलेल्या नवीन कर्मचार्‍यांच्या बाबतीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) यामध्ये 12 टक्के कर्मचार्‍यांचे योगदान आणि 12 टक्के नियोक्ता यांचे योगदान असे एकूण 24 टक्के योगदान भारत सरकार दोन वर्षांच्या कालावधीत देणार.


🔖1000 कर्मचार्‍यांपेक्षा अधिक संख्या असणाऱ्या आस्थापनांच्या बाबतीत भारत सरकार केवळ कर्मचार्‍यांचे 12 टक्के योगदानच देणार.


🔖15 हजार रुपयांपेक्षा कमी मासिक वेतन घेणारे कर्मचारी या योजनेचा लाभ घेवू शकतात.


🔖कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सदस्यांच्या आधार-जोडलेल्या खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने योगदान जमा करणार. तसेच संस्था या योजनेसाठी एक सॉफ्टवेअर विकसित करणार आहे.

नौदलाने दिली ‘स्मॅश 200 प्लस’ची ऑर्डर.


🔰भारतीय नौदलाला लवकरच इस्रायलकडून ‘स्मॅश 200 प्लस’ सिस्टिम मिळणार आहे. भारतीय नौदलाने या सिस्टिमसाठी ऑर्डर दिली आहे.

तर हे ड्रोन विरोधी शस्त्र आहे. या सिस्टिमद्वारे दिवसा तसेच रात्रीच्यावेळीही शत्रुंची छोटी ड्रोन्स पाडता येतील. ‘स्मॅश 200 प्लस’ ही एक कॉम्प्युटराइज्ड फायर कंट्रोल आणि इलेक्ट्रो-ऑप्टिक साइट सिस्टिम आहे.


🔰बदुक किंवा मशीन गनवर ‘स्मॅश 200 प्लस’ सिस्टिम बसवता येईल.पुढच्यावर्षीपासून ‘स्मॅश 200 प्लस’ सिस्टिमचा पुरवठा सुरु होईल.तसेच ‘स्मॅश 200 प्लस’ची किंमत 10 लाखापेक्षा कमी आहे. बंदुक किंवा मशीन गनवर ही सिस्टिम बसवून 120 मीटर अंतरावरुन वेगाने लक्ष्याच्या दिशेने येणारी छोटी ड्रोन्स हवेतच नष्ट करता  येईल.

भारत इस्रायलकडून ही सिस्टिम विकत घेणार  असला, तरी अशा पद्धतीचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे.


🔰भारत अमेरिकेसोबत मिळून छोटी एरियल सिस्टम ड्रोन स्वार्म (थव्याच्या स्वरुपात) तसेच ड्रोन्स विरोधी सिस्टिम विकसित करण्याचे काम सुरु करणार आहे. अमेरिकेबरोबर झालेल्या DTTI द्विपक्षीय करारातंर्गत ही सिस्टिम विकसित करण्यात  येईल.

महिला व बालकांना 'शक्ती'!; ठाकरे सरकार करणार 'हे' दोन कठोर कायदे



महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, याकरिता प्रस्तावित कायद्यांची चौकट अधिक बळकट करण्यासाठी शक्ती या दोन प्रस्तावित कायद्यांना विधिमंडळासमोर सादर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.


प्रस्तावित कायद्यांची ठळक वैशिष्टे पुढील प्रमाणे आहेत ..


१) हे नवीन गुन्हे समाविष्ट


- समाज माध्यमांमधून महिलांना धमकावणे व बदनामी करणे.

- बलात्कार, विनयभंग आणि ॲसीड हल्ला याबाबत खोटी तक्रार करणे.

- समाजमाध्यम, इंटरनेट व मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी तपास कार्यात सहकार्य न करणे.

- एखाद्या लोकसेवकाने तपासकार्यात सहकार्य न करणे.



- बलात्कार पीडितेचे नाव छापण्यावर बंधने होती ती बंधने विनयभंग आणि ॲसीड हल्ला याबाबत लागू करणे.


२) शिक्षेत वाढ


- बलात्कार, ॲसीड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी मृत्युदंड प्रस्तावित केला आहे.

- शिक्षांचा कालावधी वाढविला आहे.

- ॲसीड हल्ला प्रकरणी दंडाची तरतूद केली असून ती रक्कम पीडितेला वैद्यकीय उपचार व प्लास्टीक सर्जरीकरिता देण्याचे प्रस्तावित आहे.