०९ डिसेंबर २०२०

समुद्री चाचण्यांसाठी 'विक्रांत' सज्ज



● भारताची विक्रांत ही पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका समुद्री चाचण्यांसाठी सज्ज झाली आहे.


● कोचीन बंदरातील तिच्या चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्या असून, आता जानेवारीपासून तिच्या समुद्रातील चाचण्या सुरू होतील. 


● 'विक्रांत', 'विराट' या इंग्लिश बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका निवृत्त झाल्यावर भारतीय नौदलाचा भार आता 'विक्रमादित्य' ही रशियन बनावटीची विमानवाहू युद्धनौका वाहत आहे. 


● कोचीन नौदल गोदीत बनवली जात असलेली 'विक्रांत' ही सुमारे चाळीस हजार टनी पहिलीवहिली स्वदेशी युद्धनौका आता विक्रमादित्यच्या जोडीला येत आहे. 


अशी आहे युद्धनौका

- वजन : ४० हजार टन

- लांबी : २६२ मीटर किंवा ८६० फूट

- स्की जंप (विमानोड्डाणासाठीची विशेष चढण)सह तीस विमाने हेलिकॉप्टरचा समावेश शक्य 

- मिग २९ विमाने व कामोव्ह किंवा सी-किंग हेलिकॉप्टर राहू शकतात

- कामोव्ह हेलिकॉप्टर शत्रूच्या हवाई हल्ल्याची पूर्वसूचना देईल

- सी-किंग हेलिकॉप्टर शत्रूच्या पाणबुड्यांना शोधून नष्ट करेल


महत्वाचे मुद्दे


● या विमानवाहू युद्धनौकेचे नाव ब्रिटनकडून खरेदी केलेल्या भारताच्या *पहिल्या विमानवाहू युद्धनौका  आयएनएस विक्रांत* च्या नावावरून ठेवण्यात आले आहे. *1997* मध्ये आयएनएस विक्रांतला नौदलाने आपल्या ताफ्यातून निवृत्त केले होते.


● सध्या, रशियाकडून घेण्यात आलेली  44,500 टन क्षमता असलेली *आयएनएस विक्रमादित्य* ही एकमेव विमानवाहू युद्धनौका भारताकडे आहे.


● आयएनएस विक्रमादित्यप्रमाणेच विक्रांतदेखील विमान प्रक्षेपित करण्यासाठी व उतरण्यासाठी करण्यासाठी *STOBAR* (Short Take-Off But Arrested Recovery) यंत्रणा वापरणार आहे.


● या युद्धनौकेची रचना आणि बांधणी पूर्णपणे भारतीय असून, या नौकेच्या बांधणीमुळे भारत अशी नौका तयार करण्याची शक्ती असणाऱ्या *अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स* या देशांच्या रांगेत जाऊन बसला आहे.

Forbes ची जगातील सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर, निर्मला सीतारामन यांना स्थान


🔥फोर्ब्सनं नुकतीच जगातील सर्वात सामर्थ्यवान महिलांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस, बायोकॉनच्या संस्थापन किरण मजूमदार-शॉ आणि एचसीएल एन्टरप्राईझेसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोशनी नाडार-मल्होत्रा यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.


🔥फोर्ब्सच्या जगातील सर्वात सामर्थ्यवान महिलांच्या यादीत जर्मनीच्या चान्सलर एंजेला मार्केल यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. तसंच या यादीत कमला हॅरिस या तिसऱ्या तर निर्मला सीतारामन यांना ४१ वं स्थान देण्यात आलं आहे. १७ व्या वार्षिक ‘फोर्ब्स पॉवर लिस्ट’मध्ये ३० देशांतील महिलांचा समावेश करण्यात आला आहे.


🔥“फोर्ब्सच्या या यादीत १० देशांतील प्रमुख महिला, ३८ मुख्य कार्यकारी अधिकारी, पाच मनोरंजन क्षेत्राशी निगडित महिलांचा समावेश आहे. जरी त्यांचं वय, नागरिकत्व आणि निरनिराळ्या क्षेत्रातील त्या असतील तरी त्यांनी २०२० मध्ये आवेव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला मिळालेल्या व्यासपीठाचा योग्यरित्या केला,” असं फोर्ब्सनं म्हटलं आहे.


🔥या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना ४१ वं स्थान देण्यात आलं आहे. तर एचसीएलच्या रोशनी नाडार-मल्होत्रा यांना ५५ वं, किरण मजूमदार शॉ यांना ६८ वं स्थान देण्यात आलं आहे. तर लँडमार्क समूहाच्या प्रमुख रेणुका जगतीयानी यांना या यादीत ९८ वं स्थान देण्यात आलं आहे. जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मार्केल या सलग दहाव्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहेत.

भाषण स्वातंत्र्याचा वापर करताना ‘अधिक जबाबदार’ वागा.


✳️सामान्य लोकांपर्यंत प्रभावशाली व्यक्तींची पोहोच, प्रभाव आणि अधिकार लक्षात घेता त्यांनी भाषण स्वातंत्र्याचा वापर करताना ‘अधिक जबाबदार’ असण्याची आवश्यकता आहे, हे त्यांचे कर्तव्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले.


✳️सर्वोच्च न्यायालयाने भाषण स्वातंत्र्याच्या निरनिराळ्या पैलूंचा ऊहापोह केला. बहुत्ववादाशी बांधील असलेल्या राज्यपद्धतीत द्वेषयुक्त भाषणाचा एखाद्या विशिष्ट गटाबाबत द्वेषाव्यतिरिक्त कुठलाही वैध उद्देश नसतो. 


✳️अशा द्वेषयुक्त भाषणाचे लोकशाहीबाबतच्या कुठल्याही वैध मार्गाने काल्पनिक योगदान असू शकत नाही; उलट त्यामुळे समानतेचा अधिकार नाकारला जातो, असेही न्यायालयाने सांगितले. सुफी संत ख्वाजा मोईउद्दीन चिश्ती यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी दूरचित्रवाणी वाहिनीचे निवेदक अमिश देवगण यांच्यावरचा प्राथमिक माहिती अहवाल रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देताना वरील विधान केले.


✳️सामान्य लोकांवर प्रभावशाली व्यक्तींचा प्रभाव आणि अधिकार यामुळे त्यांचे लोकांबाबत कर्तव्य असते व त्यांनी अधिक जबाबदार असायला हवे, असे न्या. अजय खानविलकर व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने सांगितले.

कृत्रिम सूर्य तयार करण्यात चीन यशस्वी


चीन कृत्रिम सूर्यनिर्मिती करणारे उपकरण बनविण्यात यशस्वी झाला असून त्याची प्रायोगिक चाचणी यशस्वी ठरली. प्रकल्पाच्या माध्यमातून 150 दशलक्ष अंश सेल्सियस पर्यंतचे तापमान निर्माण करण्याची योजना आखण्यात आली आहे.


ठळक बाबी


त्यासाठी ‘HL-2 M टॉकमॅक’ नामक एक उपकरण तयार केले गेले असून, या माध्यमातून नैसर्गिक सूर्याद्वारे मिळणारा प्रकाश निर्माण केला जाणार. निर्माण होणाऱ्या स्वच्छ ऊर्जेचा वापर थर्मोन्यूक्लियर अणुऊर्जेसाठी केला जाणार आहे.


या उपकरणामुळे आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर प्रायोगिक स्तरावरील अणुभट्टीत (ITER) अधिक प्रमाणात अणुऊर्जा निर्माण करणे सोपे होणार आहे. ITER हा एक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक प्रकल्प असून, तो 38 देशांच्या जागतिक सहकार्याने राबविला जात आहे.


सूर्याच्या  मुख्य भागाचे तापमान 13 दशलक्ष अंश सेल्सियसपर्यंत असल्याचे मानले जाते.

भारतीय वंशाचे अनिल सोनी WHO फाऊंडेशनचे पहिले सीईओ


⏺भारतीय वंशाचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अनिल सोनी यांना जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आलं आहे.


⏺आरोग्य विषयक समस्यांना तोंड देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं या जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची निर्मिती केली आहे. अनिल सोनी हे या संघटनेचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत.


⏺अनिल सोनी यांच्याकडे 1 जानेवारीपासून मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार दिला जाणार आहे. या दरम्या त्यांची लक्ष्य आरोग्य क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा फायदा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा असणार आहे.


⏺जागतिक आरोग्य संघटनेनं करोना महासाथीच्या दरम्यान मे 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची सुरूवात केली होती.


⏺तर आतापर्यंत अनिल सोनी हे ग्लोबव हेल्थकेअर कंपनी वियाट्रिस सोबत कार्यरत होते. ते ‘ग्लोबल इन्फेक्शन डिजिज’चे प्रमुख म्हणून वियाट्रिसमध्ये सेवा बजावत होते.


⏺तसेच यापूर्वी अनिल सोनी हे क्लिंटन हेल्थ अॅक्सेसमध्येही कार्यरत होते. 2005 ते 2010 या कालावधीत त्यांनी या ठिकाणी सेवा बजावली.

ओरछा, ग्वाल्हेर शहरांना युनेस्कोचा वारसा दर्जा



🏵मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर व ओरछा या ऐतिहासिक शहरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा शहरांच्या यादीत स्थान मिळाले आहे. शहरी स्थळ शिल्प प्रवर्गात हा बहुमान मिळाल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.


🏵तर राज्य सरकारच्या जनसंपर्क खात्याने म्हटले आहे की, ही दोन किल्ल्यांची शहरे आहेत त्यांना युनेस्कोचा वारसा दर्जा मिळाल्याबाबत पर्यटन तज्ज्ञांनी आनंद व्यक्त केला आहे.


🏵सयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना म्हणजे युनेस्कोने या शहरांना वारसा शहरांचा दर्जा दिला. त्यामुळे आता ग्वाल्हेर व ओरछा शहरांची स्थिती बदलणार आहे.

युनेस्को व राज्य सरकारचे पर्यटन खाते या शहरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करून त्यांचे सौंदर्य वाढवणार आहे.


🏵यनेस्कोचे पथक पुढील वर्षी या दोन शहरांना भेट देणार असून तेथील वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणी करणार आहे.


🏵दक्षिण आशियासाठी आदर्शवत ठरेल असे प्रकल्प यात हाती घेतले जातील. यात शहर सौंदर्याबाबत काही सूचना केल्या जातील पण त्यात इतिहास हरवणार नाही याची काळजी घेतली जाईल.

आयुष निर्यात संवर्धन परिषद’ची स्थापना करण्यासाठी वाणिज्य व उद्योग मंत्रालय आणि आयुष मंत्रालय एकत्र


🔰आयुष निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने, वाणिज्य व उद्योग मंत्रालय आणि आयुष मंत्रालय (आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी मंत्रालय) यांनी मिळून ‘आयुष निर्यात संवर्धन परिषद (AEPC)’ याची स्थापना करून एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.


🔰सपूर्ण आयुष (उत्पादनांच्या) निर्यातीला चालना देवून किंमत आणि दर्जा यांच्या स्पर्धात्मकतेसाठी संपूर्ण आयुष क्षेत्र एकत्रितपणे कार्य करणार आहे.


🔴ठळक बाबी....


🔰सकल्पित AEPC आयुष मंत्रालयात स्थापन करण्यात येणार आहे.

आयुषसाठी ‘हार्मोनाइज्ड सिस्टम (HS)’ कोडचे प्रमाणीकरण लवकरच करण्यात येणार.


🔰आयुषची उत्पादने आणि सेवा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित करण्यासाठी आयुष मंत्रालय ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सशी समन्वय साधून काम करणार.


🔰आयुष मंत्रालय आणि आयुष उद्योग त्यांच्या उत्तम कार्यपद्धती/यशोगाथा ओळखून त्यांचा लोकांपर्यंत प्रचार करणार.


🔰आयुष उद्योग आपल्या उत्पादनांचा दर्जा आणि मानके तसेच त्यांची किंमत स्पर्धात्मक दृष्ट्या योग्य असतील हे सुनिश्चित करणार.आयुष ब्रँड इंडिया उपक्रमांसाठी प्रयत्न करणार.

कॅनडाकडून डॉ. विजया वाड यांचा सन्मान.


🌷कनडाच्या पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी राजपत्र असलेले गौरवपत्र वादळवाट या पुस्तकाच्या लेखिका आणि मराठी विश्वकोशाच्या माजी अध्यक्षा डॉ. विजया वाड आणि वादळवाट पुस्तकातील रमेश खानविलकर यांच्या व्यक्तिमत्त्वावर असल्याने त्यांच्या आई शारदा श्रीराम खानविलकर या दोघींचा मूळचे महाराष्ट्रीयन असलेले कॅनडातील उद्योगपती डॉ. विजय ढवळे यांच्यातर्फे लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते एका कार्यक्रमात नुकताच सन्मान करण्यात आला.


🌷कनडाच्या पार्लमेंट हाऊसमध्ये आतापर्यंत फक्त चारच भारतीय लोकांचा सत्कार आणि सन्मान  तेथील पंतप्रधानांनी केला आहे.


🌷तर त्यापैकी एक असलेले मनोहर जोशी म्हणाले की, कॅनडा देशाची राजमुद्रा असलेले गौरवपत्र डॉ. विजया वाड आणि शारदा खानविलकर यांना माझ्या हस्ते देताना कॅनडा सरकारने या दोन मातांबरोबर माझाही गौरव केला आहे. डॉ. विजय ढवळे यांच्यामुळे आज या दोन्ही महान विभूती मातांचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले आहे. यावेळी रमेश खानविलकर हेही उपस्थित होते.

करोना लसीसंबंधी मोठी अपडेट, सीरमकडून तात्काळ मान्यता देण्यासाठी अर्ज


पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड-अ‍ॅझेन्काच्या करोना लसीच्या आपातकालीन वापराला अधिकृत मान्यता देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीजीसीआय) अर्ज केला आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, महामारीमुळे निर्माण झालेली वैद्यकीय गरज आणि लोकांच्या हितासाठी अशी कारणं सीरम इन्स्टिट्यूटने डीजीसीआयकडे सोपवण्यात आलेल्या अर्जात देण्यात आली आहेत.


‘फायझर’ची करोनाप्रतिबंधक लस भारतात वापरण्यासाठी कंपनीने औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला असतानाच ही माहिती समोर आली आहे. ब्रिटनने या लसीला आधीच परवानगी दिली असून एखाद्या देशात परवानगी मिळालेली करोनावरची ती पहिली लस ठरली आहे.


दरम्यान सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी मिळाली आहे. झायडस कॅडिलाच्या देशी करोना लशसीच्या तिसऱ्या टप्प्यांना परवानगी मिळाली आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज व रशियाच्या डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड यांनी स्पुटनिक ५ लशीची निर्मिती भारतात करण्याचे ठरवले असून त्यांच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. बायोलॉजिकल ई कंपनीने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू केल्या आहेत.

मलेरिया रोखण्यात भारताला यश.


🧲जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया जागतिक परिस्थिती अहवाल प्रसिद्ध केला असून भारतातील मलेरिया रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे निरीक्षण त्यात नोंदवण्यात आले आहे.मलेरियाचे अस्तित्व असलेल्या देशांपैकी त्याचा प्रसार रोखण्यात यशस्वी ठरलेला भारत हा एकमेव देश ठरला आहे.


🧲जागतिक आरोग्य संघटनेने भारतासह जगातील 11 देशांमध्ये मलेरियाच्या दृष्टीने जोखमीच्या प्रदेशांवर लक्ष केंद्रित केले होते. त्या देशांतील रुग्णसंख्येच्या गणितीय प्रारूपाच्या अभ्यासातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.


🧲2000 ते 2019 या कालावधीत भारतातील मलेरिया रुग्णांची संख्या तब्बल 72 टक्क्यांनी कमी करण्यात यश आले आहे. मलेरियामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्याही 74 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने अहवालात नमूद केले आहे.

मुखपट्टीविना फिरणाऱ्यांना समुदाय सेवेच्या शिक्षेस स्थगिती.


☄️सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीविना फिरताना आढळलेल्यांना कोविड-19 रुग्णसेवा केंद्रांत समुदाय सेवेसाठी पाठवण्याचे निर्देश देणाऱ्या गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली.


☄️तर हा आदेश ‘कायदेशीर अधिकार नसताना’ देण्यात आल्याचा आरोप करून गुजरात सरकारने त्याविरुद्ध केलेल्या अपिलाची न्या. अशोक भूषण, आर. सुभाष रेड्डी व एम.आर. शहा यांच्या खंडपीठाने नोंद घेतली.


☄️तसेच उच्च न्यायालयाचा हा आदेश कठोर असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर याचे गंभीर परिणाम होतील, असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला होता. त्याचीही नोंद खंडपीठाने घेतली.

कोविड-19 प्रतिसादाविषयी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेचे विशेष सत्र.


*⃣3 डिसेंबर 2020 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या (UNGA) विशेष सत्राला सुरुवात झाली. ही बैठक दोन दिवस चालणार आहे.


🌀ठळक बाबी...


*⃣या सत्रात कोविड-19 महामारीला दिला जाणारा प्रतिसाद आणि बिघडलेल्या अर्थव्यवस्थेपासून प्रगतीकडे वळण्याचा उत्तम मार्ग या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहेतसेच कोविड-19 लस, त्याची निर्मिती, वितरण, उत्पादक अश्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.जागतिक आरोग्य संघटनेचा ‘ACT-एक्सीलरेटर’ उपक्रम जगातल्या सर्वात गरीब लोकांना लसी वितरित करण्याचे काम करीत आहे.


🌀सयुक्त राष्ट्रसंघ (UN) विषयी


*⃣आतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्‍या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.


*⃣1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) पाच कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची संख्या 193 एवढी आहे.


*⃣सघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे.


*⃣UN च्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे.


*⃣सयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सर्वात प्रमुख अधिकारी पद ‘सरचिटणीस’ (Secretary‑General) हे असून वर्तमानात हे पद पोर्तुगालचे अँटोनियो गुटेरेस यांच्याकडे आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत -


*⃣UN महासभा (General Assembly)

UN सुरक्षा परिषद (Security Council)UN आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council ­ECOSOC)

UN सचिवालय

UN आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice) आणिUN विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).


🌀सयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत -


*⃣जागतिक बँक समूह

जागतिक आरोग्य संघटना (WHO)

जागतिक अन्न कार्यक्रम (World Food Program)

संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (United Nations Educational, Scientific and Cultural Organization –UNESCO)

संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations Children's Fund –UNICEF)

दिनांक 2 डिसेंबर 1984 या दिवशीची दुर्घटना

 


◾️भोपाळजवळील युनियन कार्बाइडच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले तर लाखो लोक त्याने प्रभावित झाले. या दुर्घटनेच्या स्मृतीत देशात 2 डिसेंबरला ‘राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन’ पाळला जातो.


◾️औद्योगिक क्षेत्राला या घटनेची आठवण राहावी आणि यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी जागृती पसरवण्यासाठी हा दिवस भारतात पाळला जातो.


◾️औद्योगिक तसेच वैयक्तिक पातळीवर होणार्‍या प्रदूषणाने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्याचा विपरीत परिणाम माणसांबरोबर इतर जीवसृष्टी, नैसर्गिक स्त्रोत आणि हवामानावरही होत आहे. प्रदूषणाच्या दुष्परिणांबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता वाढावी यासाठी प्रत्येक स्तरावर विविध उपक्रमे राबवली जातात.


🔺पार्श्वभूमी


◾️संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनी (ILO) त्याच्या “द सेफ्टी अँड हेल्थ अॅट द हार्ट ऑफ द फ्यूचर वर्क - बिल्डिंग ऑन 100 इयर्स ऑफ एक्स्पीरियन्स” या अहवालात हजारो लोकांना मृत्यूच्या दाढेत लोटणाऱ्या 1984 सालाच्या ‘भोपाळ वायुगळती’ घटनेला शतकातली सर्वात भीषण औद्योगिक घटना म्हणून नोंदवण्यात आले आहे.


◾️मध्यप्रदेशाच्या राजधानीत ‘युनियन कार्बाइड’ या किटकनाशके बनविण्याच्या प्रकल्पात मिथाइल आयसोसायनेट (मिक) वायूची गळती होऊन किमान 6 लाखांहून अधिक मजूर व परिसरातल्या रहिवाशांना फटका बसला होता. त्यात सरकारी आकड्यानुसार 15 हजारांवर लोकांचा मृत्यू झाला होता. विषारी कण अजूनही अस्तित्वात आहेत. त्यामुळे हजारो पिडीत व त्यांची पुढची पिढी श्वसनासंबंधी आजाराचा सामना करत आहे.

शांघाय सहकार्य संघटनेच्या सामायिक बौद्ध वारसाविषयक पहिल्या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे भारताकडून आयोजन.


🔰भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी 30 नोव्हेंबर 2020 रोजी शांघाय सहकार्य संघटनेतल्या (SCO) सामायिक बौद्ध वारसाविषयक पहिल्या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन केले.


🔰शांघाय सहकार्य संघटनेमधील सरकार प्रमुखांच्या परिषदेची 19 वी बैठक नवी दिल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती, ज्याचे अध्यक्षपद एम. व्यंकय्या नायडू यांच्याकडे होते.


❄️ठळक बाबी


🔰शांघाय सहकार संघटनेच्या सदस्य देशांचे एकत्रितपणे पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे आयोजन नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्यावतीने करण्यात आले आहे.


🔰या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेल्या कलाकृतींचे त्रिमितीय स्कॅनिंग करण्यात आले आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वेबजीएल मंच, आभासी जागेचा विनियोग, नवसंकल्पनेतून मांडणी आणि पुरातन वस्तूंविषयीचे निवेदन सादर करण्यात आले आहे.


🔰बौद्ध तत्वज्ञान आणि मध्य अशियातील कला हे शांघाय सहकार्य संघटनेतल्या (SCO) देशांना एकमेकांशी जोडणारे आहे. या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये अशिया खंडातल्या विविध संग्रहालयातल्या कलात्मक समृद्धीची झलक पहायला मिळते. त्याचबरोबर बौद्ध शाळांचा विकास कसा टप्प्याटप्याने होत गेला, याची माहिती देणारे आणि ऐतिहासिक काळाचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व करणारे प्रदर्शन आहे.


❄️शांघाय सहकार्य संघटना (SCO) विषयी


🔰शांघाय सहकार्य संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) याची स्थापना 15 जून 2001 रोजी झाली. संघटनेचे मुख्यालय बिजिंग (चीन) येथे आहे. ही एक यूरेशियन राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा युती आहे.


🔰SCO मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. चीन हा संघटनेचा संस्थापक देश आहे. भारताला या संघटनेचे 2017 साली पूर्ण सदस्यत्व मिळाले.

भारतीय आयटी क्षेत्राचे ‘पितामह’फकिर चंद


🔰भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘पितामह’ म्हणून परिचयाचे असलेले फकिर चंद कोहली यांचं वयाच्या 96 व्या वृद्धापकाळानं निधन झालं.


🔰कोहली हे देशातील सर्वात मोठी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) संस्थापक आणि पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी होते.


🔰1951 मध्ये ते टाटा इलेक्ट्रीक कंपनीत रूजू झाले आणि सिस्टमच्या संचालनासाठी आवश्यक लोड डिस्पॅचिंग सिस्टम स्थापित करण्यास त्यांनी मदत केली.


🔰1970 मध्ये फकीरचंद कोहली यांच्या खांद्यावर टाटा इलेक्ट्रीक कंपन्यांच्या संचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.


🔰1991 मध्ये टाटा-आयबीएमचा भाग म्हणून आयबीएमला भारतात आणण्याच्या निर्णयामध्ये कोहली सक्रियपणे सहभागी होते. 


🔰हा भारतातील हार्डवेअर उत्पादनाच्या संयुक्त उपक्रमाचा एक भाग होता. टीसीएसचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी देशाला १०० अब्ज डॉलर्सचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग तयार करण्यास मदत केली.


🔰भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फकिर चंद कोहली यांना 2002 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

सपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द


● मर्द            x     नामर्द


● शंका          x     खात्री


● कृपा           x    अवकृपा


● गमन           x    आगमन


● कल्याण      x     अकल्याण


● ज्ञात           x     अज्ञात


● सत्कर्म       x      दुष्कर्म


● खरे           x      खोटे


● भरती        x     ओहोटी


● सुसंबद्ध     x     असंबद्ध


● हर्ष            x     खेद


● विधायक    x     विघातक


● हानी          x     लाभ


● संघटन       x     विघटन


● सुंदर          x     कुरूप


● सार्थक       x     निरर्थक


● स्वस्थ        x     अस्वस्थ


● सुसंगत      x      विसंगत


● तप्त          x      थंड


● धर्म           x      अधर्म


● सनाथ       x      अनाथ


● सशक्त       x      अशक्त


● कीर्ती        x      अपकीर्ती


● ऐच्छिक     x     अनैच्छिक


● गुण          x      अवगुण

“संविधान सभेची पहिली बैठक”



आजच्या दिवशी संविधान सभा पहिल्यांदा एकत्र आली होती. 


🔸 सविधान सभा “सचिव एच. व्ही. आर. आयंगार” यांनी २० नोव्हेंबर १९४६ रोजी सर्व संविधान सभा सदस्यांना आमंत्रण दिले.


🔸९ डिंसेबर १९४६ रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीच्या परिषद भवनातील संविधान सभा चेंबर मध्ये हजर राहावे.


🔸फ्रांस देशांचे अनुकरण करुन संविधान सभा सल्लागार बी.एन. राव  यांनी सर्वात वयोवृद्ध सदस्य “डाॅ. सच्चिदानंद सिन्हा” यांना तात्पुरते अध्यक्ष करावे अशी शिफारस केली. 


🔸तसेच तात्पुरते उपाध्यक्ष म्हणुन “फ्रॅक ॲन्थोनी” यांची निवड झाली. 


🔸 पहील्या बैठकीला म्हणजेच ९ डिसेंबर १९४६ रोजी ११ वाजता “आचार्य जे. बी. कृपलानी” यांनी सिंन्हा यांचे नाव घोषित केले.


🔸 आचार्य जे. बी. कृपलानी हे पहिले व्यक्ती जे संविधान सभेसमोर बोलले.  कृपलानी त्याचवेळी “काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष” होते.


🔸9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेच्या पहील्या बैठकीला तात्पुरते अध्यक्ष म्हणुन काम पाहणारे “डाॅ. सच्चिदानंद सिन्हा” यांनी 3 देशांचे शुभकामना संदेश वाचुन दाखवले.


१) अमेरीका


२) चीन प्रजासत्ताक 


३) ॲास्ट्रेलिया 


यावर सिन्हा यांचे उद्गार -


“ज्या देशांनी आम्हाला असे उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी शुभ संदेश पाठविले त्या देशांच्या सरकारांप्रति आभार व्यक्त करण्यासाठी संदेश पाठविण्याकरिता ही सभा मला अधिकृत करेल आणि अनुमती देईल असा मला विश्वास वाटतो. आणि मी हेसुद्धा आवर्जून सांगू इच्छितो की, तुमच्या वांच्छित कार्याच्या सिद्धीसाठी हा मोठा शुभ संदेश आहे.” 

हायाबुसा-2’ यान पृथ्वीवर परतले


🌻‘रयुगू’ लघुग्रहाच्या पृष्ठभागाखालच्या खडकाचे नमुने घेवून जपानचे ‘हायाबुसा-2’ यान 6 डिसेंबर 2020 रोजी पृथ्वीवर परतले.


🌻शास्त्रज्ञांना आशा आहे की नमुन्याचे वजन 0.1 ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. नमुने असलेला एक कॅप्सूल दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटात सापडला.


🛑‘हायाबुसा-2’ मोहीम


🌻‘हायाबुसा-2’ हे JAXA या जपानी अंतराळ संशोधन संस्थेकडून संचालित केले जाणारे अंतराळयान आहे. ‘हायाबुसा-2’ यान 3 डिसेंबर 2014 रोजी अंतराळात पाठविण्यात आले होते. यान दीड वर्षाच्या कालावधीसाठी लघुग्रहाच्या (asteroid) निरीक्षणासाठी पाठवले गेले होते.


🌻अतराळयानावर असलेले रोव्हर ‘रयुगू (Ryugu)’ या नावाच्या लघुग्रहावर उतरविण्यात आले. एखाद्या लघुग्रहावर यान उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. लघुग्रहाच्या पृष्ठभागाची तपासणी आणि खडकाचे नमुने गोळा करण्याच्या उद्देशाने हे यान पाठविण्यात आले होते. लघुग्रहाच्या पृष्ठभागावरील एका विवरात स्फोट घडवून आणि त्यातून माती आणि खडकाचे नमुने गोळा करण्यात आले.


🌻हायाबुसा यानात ‘मिनरव्‍‌र्हा 2’ रोव्हर रोबोट व मस्कॉट हा फ्रेंच रोबोट यांचा समावेश होता. यान फ्रीजच्या आकाराएवढे होते. हायाबुसाचा अर्थ जपानी भाषेत ससाणा असा आहे.


🛑लघुग्रह म्हणजे काय आहे?


🌻सौरमालेची निर्मिती होत असताना जे काही उरले ते म्हणजे लघुग्रह वा अशनी आणि उल्का होय. ‘रयुगू’ हा अगदी प्राथमिक लघुग्रह आहे. त्याला स्वतःच्या अक्षाभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी साडेसात तास लागतात.


🛑‘रयुगू’ लघुग्रह


🌻‘रयुगू’ लघुग्रह पृथ्वीपासून 30 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. ‘रयुगू’ या लघुग्रहाची निर्मिती साधारणपणे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी म्हणजे सौरमालेच्या जन्मावेळची असून त्यात मोठ्या प्रमाणवर कार्बनी पदार्थ व पाणी आहे असे समजले जाते, त्यामुळे त्याच्या या संशोधनाला विशेष महत्त्व आहे.

Online Line Series

राष्ट्रप्रेमी बाबासाहेब....

 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही केवळ व्यक्ती नसून तो विचार आहे. हा विचार प्रेरणादायी आणि प्रवाही आहे. त्यांचे जीवन आणि कार्य हे तळागाळातील हजारो वर्षांच्या सामाजिक अन्याय आणि आर्थिक शोषणामुळे भरडलेल्या लोकांकरिता प्रेरणा आहे. ही प्रेरणा केवळ वैचारिक पातळीपुरती मर्यादित नाही, तर झोपलेल्या समाजाला जागृत करून त्यांच्यात स्वाभिमान, अस्मिता आणि आर्थिक सबळता निर्माण करण्याचा कृती कार्यक्रम आहे. जाज्वल्य-राष्ट्रनिष्ठा आणि देशप्रेम हे बाबासाहेबांच्या जीवन आणि कार्याचे अतूट अंग आहे. त्यांनी निर्माण केलेल्या आणि मूलभूत सिद्धान्त मांडणाऱ्या प्रचंड ग्रंथरचनेत, पत्रकारितेत, लिखाणात, भाषणात या देशाची भौगोलिक अखंडता आणि राष्ट्रीय एकता आणि अस्मिता याला छेद पडेल अथवा ती भंग पावेल असे कोणतेही वाक्य व वक्तव्य दिसून येत नाही. 'भारत' या शब्दाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विशेष आकर्षण होते. त्यांनी स्थापन केलेल्या एका पाक्षिकाचे नाव 'बहिष्कृत भारत' आणि मुद्रणालयाचे नाव भारत भूषण प्रिंटिंग प्रेस' असे होते. परंतु दुर्दैवाने बाबासाहेबांच्या राष्ट्रीय कार्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अजूनही संकुचित आणि पूर्वग्रहदूषित आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला नाही अथवा गांधीजींच्या राजकीय चळवळीत सहभागी झाले नाहीत. याचा अर्थ असा होत नाही की त्यांना भारताचे स्वातंत्र्य नको होते. त्यांना भारताचे नुसते स्वातंत्र्य नको होते, त्याचबरोबर दलित आणि अस्पृश्यांच्या सामाजिक आणि आर्थिक उत्थानाचा संबंध स्वातंत्र्याशी जोडणे आवश्यक वाटत होते. देश स्वतंत्र झाला पण लोक स्वतंत्र झाले का ? हा प्रश्न ते सदैव विचारीत असत. डॉ. बाबासाहेबांबद्दल सर्वसामान्य जनतेची अजूनही समजूत ब्रिटिशधार्जिणा, काँग्रेस-गांधी विरोधक, हिंदूद्वेष्टा आणि विशिष्ट वर्गाच्या हिताकरिता चळवळ करणारा इत्यादीवर आधारित आहे. पण ही पूर्णतः गैरसमजूत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांची साहित्य चळवळ, जीवन आणि कार्य यांचा अभ्यास केल्यास हे स्पष्ट दिसून येते की त्यांनी स्वराज्याला कधीही विरोध केलेला नाही. या उलट स्वतंत्र भारत हे मजबूत सबळ आणि प्रगत राष्ट्र झाले पाहिजे असे त्यांचे स्वप्न होते. बाबासाहेबांचा दृष्टिकोन, स्वराज्य हे केवळ मूठभर लोकांचे आणि सत्ताधीशांचे आहे, असा नव्हता; तर पीडित आणि उपेक्षितांसह सर्वांचे स्वातंत्र्य ही कल्पना बाबासाहेबांच्या मनात सतत होती. पण तसे स्वराज्य निर्माण होण्यास या देशातील समाजव्यवस्था अनुकूल नाही अशी शंका त्यांच्या मनात होती. गेली ७०० वर्षे राजकीय जमात म्हणून विशेषाधिकार भोगलेल्या बॅरिस्टर जिन्ना यांनी धर्माच्या नावाने भारताचे तुकडे पाडून पाकिस्तानची निर्मिती केली. पण व्यक्तिगत जीवनात अनेक अन्याय आणि अत्याचार भोगून हजारो वर्षांच्या सामाजिक गुलामगिरीची पूर्वपीठिका असताना सुद्धा त्यांनी या देशाची एकता आणि अखंडता एकात्मतेकरिता सदोदित प्रयत्न केले. बाबासाहेबांचे कार्य हे केवळ दलित उद्धारापुरते मर्यादित नव्हते, तर ते राष्ट्र उद्धाराचे कार्य होते.

         राष्ट्रीय एकात्मकतेच्या संदर्भात डॉ. बाबासाहेबांचे राष्ट्रप्रेम आणि निष्ठा ही वादातीत आहे. ब्रिटिश राजवटीच्या अनेक गोष्टींचे बाबासाहेबांनी गुणगान व समर्थन केले असले तरी त्यांनी त्यांच्या दोषांचा, अन्याय आणि अत्याचारांचाही प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. मुंबई विधान परिषदेत ते ब्रिटिश सरकारचे नामनिर्देशित सदस्य (१९२७-१९३९) होते. तरीपण त्यांनी ब्रिटिशांचे कायदे आणि धोरण यावर एक खरा राष्ट्रभक्त

आणि देशप्रेमी या नात्याने प्रखर टीका केलेली आहे. ‘आम्ही सर्व एक आहोत, ही भावना म्हणजेच राष्ट्र' भारतातील फार मोठा जनसमूह हा जातीच्या आणि अस्पृश्यतेच्या नावाखाली जर वेगळा पडलेला असेल तर तो समूह देशाच्या प्रमुख प्रवाहात कसा येईल ? म्हणजेच खऱ्या अर्थाने राष्ट्र म्हणता येणार नाही आणि राष्ट्रीय भावना निर्माण होणार नाही. आमची 'विविधतेतील एकता' केवळ घोषणा होईल. या वंचित जनसमूहाला, बाबासाहेबांनी आपल्या कार्याने आणि चळवळीने, प्रमुख प्रवाहात सहभागी करून घेण्याचे मोठे कार्य केले. राष्ट्रवाद ही खऱ्या अर्थाने लोकांची सांस्कृतिक आणि एकात्मिकतेची भावना आहे. ती मनुष्याच्या विचारांची उपज आहे. म्हणून त्याचा जीवन व कृती यांच्याशी सरळ संबंध आहे. वंचित वर्ग हा बहुधा आपल्या हक्काकरिता सशस्त्र क्रांतीकडे वळत असतो. परंतु बाबासाहेबांनी या वंचित वर्गाला कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन करण्याचे बाळकडू पाजले आहे. बाबासाहेब म्हणतात, “राष्ट्रवाद ही अशी सत्य स्थिती आहे की त्याला विसरता येत नाही किंवा नाकारता येत नाही." इतर संस्कृती आणि देशांचे उदाहरण देऊन बाबासाहेबांनी आक्रमक राष्ट्रवादाला नाकारले आहे. राष्ट्रीय सन्मान आणि सामाजिक एकता हे त्यांच्या राष्ट्रवादाचे मूलाधार होते. शोषित आणि वंचित वर्गाच्या हिताकरिता चळवळ करणे हा त्यांच्या राष्ट्रीय कार्याचाच भाग होय. 

त्यांच्या राष्ट्रीय भावनेत दोन गोष्टी प्रामुख्याने दिसून येतात- 

१. ब्रिटिश सत्तेचा अंत, स्वकीयांचे राज्य.

 २. जातिविहीन आणि समताधिष्ठित समाजाची निर्मिती.

त्यांची विचारधारा ही मानवतावादी आणि लोकशाहीवादी असली तरी ती प्रखर राष्ट्रभक्तीने ओतप्रोत होती. कारण वर्ण, जात, वंश आणि सांप्रदायिकता यांना बाबासाहेबांनी आपल्या राष्ट्रवादाचा आधार कधीही मानलेला नाही. सर्व भारतीय लोकांत एकात्मतेची भावना निर्माण व्हावी आणि आम्ही सर्व भारतीय आहोत म्हणून जगावे हे त्यांचे स्वप्न होते. दलित वर्गाचे स्वार्थ आणि देशाप्रति कर्तव्य, यात त्यांनी देशाला प्रथम स्थान दिलेले आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा देशातला पहिला संप; २५००० शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोर्चा



☝️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख केवळ दलितांचे कैवारी, राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनच सांगितली जाते. परंतु बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठीही अत्यंत महत्त्वाचे कार्य केले. 


📓 अवघ्या २७ वर्ष वयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील शेती आणि शेतकरी यांचे संशोधन करून ‘लहान शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाय’ हा शोधनिबंध लिहिला.


🧐 *देशातील पहिला संप* : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आला होता. 


● हा संप इ.स. १९२८-१९३४ या दरम्यान रायगड जिल्ह्यातल्या 'चरी' या गावात झाला. हा संप तब्बल सात वर्ष चालला.


● १० जानेवारी १९३८ रोजी २५,००० शेतकऱ्यांचा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळावर नेण्यात आला. 


● शेतकऱ्यांच्या यशस्वी मोर्च्यानंतर, शेतकऱ्यांची चळवळ अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने; त्यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी कोकणचा दौरा केला. 


● १७ सप्टेंबर १९३७ रोजी 

खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक बाबासाहेबांनी मुंबई विधिमंडळात मांडले होते. 


● शेतकऱ्यांच्या अनेक सभांमध्ये त्यांनी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. विशेष म्हणजे हे शेतकरी कुणबी, मराठा आणि मुसलमान होते.


● बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या जातींचा विचार न करता सर्व जातिधर्माच्या शेतकऱ्यांसाठी चळवळ उभारली होती परिणामी हा इतिहास प्रकाशझोतात येत नाही याचे दुःख आहे.



🌾 *बाबासाहेबांच्या दृष्टिकोकातून शेतीचे धोरण* : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांत महत्त्वाची संकल्पना मांडली ती ‘शेतीचे राष्ट्रीयीकरण’ करण्याची. 


⭕️ शासनाने शेतजमिनी ताब्यात घेऊन, त्या विकसित कराव्यात, अशा विकसित शेतजमिनी शेतकर्‍यांना काही अटींवर कसण्यासाठी द्याव्यात. 


⭕️ अशी शेती करण्यासाठी शासनाने अधिनियम बनवावेत. पीकपद्धती, पाणी उपलब्धता, बांधबंदिस्ती, उत्पादकता वाढ, साठवण व्यवस्था, शेतमालाची विक्री, शेतमालाचे भाव या संदर्भात स्पष्ट नियम करावेत. 


⭕️ यामुळे कोणत्याही एकाच पिकाखाली मोठे क्षेत्र येऊन, शेतमालाच्या उपलब्धतेत विषमता येणार नाही. 


⭕️ मागणी व पुरवठा या अर्थशास्त्रीय नियमानुसार, शेतमालाला रास्त भाव मिळतील. 


⭕️ तयाचबरोबर अतिरिक्त उत्पादन टळून शेतमालाचे नुकसानही टळेल. 


⭕️ नसर्गिक आपत्तीमुळे पिकांवर ओढवणाऱ्या नुकसानीमुळे पिक विमा हा असलाच पाहिजे जेणे करून शेतकऱ्यावर आत्महत्येचा प्रसंग ओढवणार नाही हा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचाच.


💥 आजही शेतकर्‍यांना शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी शासनाशी झगडावे लागते. 


🙏 या पार्श्‍वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीसाठी अधिनियम व कायदा असावा ही संकल्पना शेतकर्‍यांसाठी किती मोलाची आहे, हे अधोरेखित होते.

जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे :-



❇️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल


❇️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन


❇️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन


❇️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन


❇️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड


❇️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन


❇️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन


❇️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड


❇️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन


❇️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड


❇️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल


❇️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल


❇️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन

चीनचे चँग 5 हे अवकाशयान चंद्रावर यशस्वीरीत्या उतरले .


🌀 चीनची चँग 5 चांद्रमोहीम आतापर्यंतच्या टप्प्यांमध्ये यशस्वी झाली असून अमेरिकेनंतर चांद्रभूमीवर ध्वज लावणारा चीन हा दुसरा देश ठरला आहे.


🌀 चीनचे चँग 5 हे अवकाशयान चंद्रावर मंगळवारी यशस्वीरीत्या उतरले असून तेथे चीनचा ध्वज यंत्रमानावाच्या बाहूंनी लावण्यात आला.


🌀 तर हे यान तेथील खडकांचे नमुने गोळा करुन ते पृथ्वीवर आणणार आहे. त्याचे लँडर, ऑर्बिटर,अ‍ॅसेंडर, डिसेंडर असे अनेक भाग आहेत.

चीनच्या अवकाश संस्थेने म्हटले आहे,की कुठल्याही ग्रह किंवा उपग्रहावरून पुन्हा पृथ्वीच्या दिशेने यान उडवणारा चीन हा पहिला देश ठरला आहे.


🌀 चीनने पाठवलेल्या यानातील यांत्रिक बाहूने तेथे चीनचा ध्वज लावण्यात आला असून खडकांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत.


🌀 तसेच त्यातून चंद्रावरील ज्वालामुखी प्रक्रियेचाही अभ्यास केला जाणार आहे. हे खडकाचे नमुने पृथ्वीवर आणले जाणार आहेत.


🌀 चद्रावरून खडकाचे नमुने पृथ्वीवर आणणारा अमेरिका, रशिया नंतरचा चीन हा तिसरा देश ठरला आहे.


'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे सीईओ अदर पुनावाला यांना 'एशियन ऑफ दी इयर' पुरस्कार.


🏆 पण्यातील 'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'चे सीईओ अदर पुनावाला यांना 'एशियन ऑफ दी इयर' पुरस्कार जाहीर झाला आहे. सिंगापूरचं आघाडीचं वृत्तपत्र 'दी स्ट्रेट्स टाइम्स'कडून हा पुरस्कार दिला जातो. 


🏆 आशियातील सहा व्यक्तींची या पुरस्कारासाठी निवड झाली असून यात पुनावाला यांच्या नावाचा समावेश आहे. करोना महामारीविरोधातील लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.


🏆 जगातील सर्वात मोठी लस निर्मिती कंपनी असलेल्या 'सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने' ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटिश-स्वीडिश फार्मा कंपनी अस्ट्रा झेनेका यांच्या सहकार्याने कोविड-१९वर 'कोविशिल्ड' नावाने लस विकसित केली आहे. भारतात सध्या या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे.


🏆 वत्तपत्र 'द स्ट्रेट्स टाइम्स'कडून दिल्या जाणाऱ्या 'एशियन ऑफ दी इयर' पुरस्कारासाठी अदर पुनावाला यांच्याव्यतिरिक्त चिनी संशोधक झँग योंगझेन यांचा समावेश आहे. झँग यांनी आपल्या टीमसह Sars-CoV-2 विषाणूचा जिनोम सर्वप्रथम शोधून काढला आणि याबाबत ऑनलाइन माहिती प्रसिद्ध केली होती. त्यानंतर चीनचे मेजर जनरल चेन वेई, जपानचे डॉ. रुईची मोरिशिटा आणि सिंगापूरचे प्रा. ओई एंग एओंग यांचाही या यादीत समावेश आहे, या सर्वांनी लस निर्मितीत मोठे काम केले आहे.


🏆 दक्षिण कोरियाचे उद्योगपती सिओ जुंग जिन यांच्या कंपनीने लस तयार करुन वितरणाची जबाबदारी घेतली असून त्यांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. या सर्वांचा उल्लेख 'व्हायरस बस्टर्स' असा करण्यात आला आहे. पीटीआयने याबाबत वृत्त दिलं आहे.


🏆 या पुरस्काराच्या मानपत्रात म्हटलं की, Sars-Cov-2 विषाणूने अनेक बळी घेतले आहेत. जगातील जनजीवन ठप्प केले. अशावेळी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आशिया खंडातील या 'व्हायरस बस्टर्स'नी चांगले काम केले आहे. त्यांच्या धैर्याला व सर्जनशीलतेला आमचा सलाम. या अडचणीच्या काळात त्यांनी आशिया हा आशेचा किरण असल्याचे दाखवून दिले.


🏆 'दी स्ट्रेट्स टाइम्स'च्या परदेश विभाग संपादक भाग्यश्री गारेकर यांनी सांगितलं की, "आज एकही दिवस करोनाच्या उल्लेखाशिवाय जात नाही. आम्ही ज्यांची निवड केली आहे ते सर्वजण या सन्मानास पात्र आहेत. आशियातील सर्वात मोठ्या आरोग्य आव्हानाला तोंड देण्यात त्यांनी मदत केली आहे."

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...