Monday, 30 November 2020

भारतात विदेशी कोरोना लसीचं उत्पादन...


💫 भारतात सध्या ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीचं भारतात ट्रायल सुरू असून पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियामार्फत या लशीचं भारतात उत्पादन घेतलं जातं आहे. 


✨ दरम्यान, आता भारतात आणखी एका विदेशी कोरोना लशीचं उत्पादन घेतलं जाणार आहे. रशियाच्या Sputnik V लशीचं भारतात उत्पादन घेतलं जाणार आहे.  


👉 RDIF आणि हैदराबादमधील हेट्रो फार्मा कंपनीचा करार झाला असून हेट्रो कंपनी भारतात वर्षाला 100 दशलक्षपेक्षा अधिक डोस तयार करणार असल्याची माहिती रशियानं दिली. 


📍 2021 पासून भारतात रशियन कोरोना लशीचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली जाणार आहे. डॉ. रेड्डीज कंपनीमार्फत या लशीचं दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. 


📌 दरम्यान, या लशीला11 ऑगस्टला मंजुरी देण्यात आली असून यानंतर पहिली कोरोना लस तयार करणारा रशिया जगातील पहिला देश बनला आहे.

जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताच्या GDP दरात 7.5 टक्क्यांची घट



🔰कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, 2020-21 या आर्थिक वर्षांच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) दरात 7.5 टक्क्यांची घट झाली.


🔰चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत GDP दरात 23.9 टक्क्यांची घट झाली होती. मागील तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात आकुंचन झाल्यानंतर लक्षणीय सुधारणा झाली आहे.


🔴सथूल देशांतर्गत उत्पादन (GDP) विषयी...


🔰उत्पादन, उत्पन्न आणि उत्पादन व्यय असे हे तीन प्रवाह राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहाची तीन स्वरूपे आहेत. यांपैकी कोणत्याही स्वरूपातले वर्ष किंवा इतर हव्या असलेल्या कालखंडातला एकूण प्रवाह म्हणजे त्या वर्षातले किंवा कालखंडातले ‘राष्ट्रीय उत्पन्न’ होय.


🔰एकूण राष्ट्रीय उत्पादन दोन घटकांचे बनलेले असते. त्यांपैकी पहिला व अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे देशात उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवाकर्मे, ज्याला ‘स्थूल देशांतर्गत उत्पादन’ (GDP) असे म्हणतात. ‘GDP’मधून भांडवली वस्तूंची झीज वजा केली म्हणजे ‘निव्वळ देशांतर्गत उत्पादन’ (NDP) मिळते. ‘एकूण राष्ट्रीय उत्पादन’चा दुसरा घटक म्हणजे देशातील रहिवाशांना त्यांच्या परदेशांतल्या मालमत्तेवर मिळणारे उत्पन्न वजा परदेशांतल्या रहिवाशांना देशातल्या त्यांच्या मालमत्तेवर मिळणारे उत्पन्न, ज्याला परदेशातून प्राप्त होणारे निव्वळ घटक उत्पन्न असे म्हणतात.


🔰राष्ट्रीय उत्पन्नाची जगातली पहिली परिगणना 1665 साली इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रज्ञ सर विल्यम पेटी यांनी केली.भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची पहिली परिगणना विख्यात नेते आणि अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नवरोजी यांनी 1876 साली 1867-68 या वर्षासाठी केली.

ओबीसींसाठी केंद्राचा निर्णय, सैनिक शाळांमध्ये २७ टक्के आरक्षण जाहीर



🔶 दशभरातील सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून (२०२१-२२) हे आरक्षण लागू होणार आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी सैनिक स्कूल सोसायटी देशभरातील ३३ निवासी शाळांचं कारभार पाहतं.


🔶यासंबंधीचा अधिकृत आदेश जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे सैनिक शाळांमध्ये आता अनुसूचित जाती १५ टक्के, अनुसूचित जमाती सात टक्के, ओबीसी २७ टक्के, संरक्षण विभाग १३ टक्के आणि खुल्या प्रवर्गासाठी ३८ टक्के अशी विभागणी असणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. १३ ऑक्टोबर रोजीचं हे परिपत्रक देशभरातील सैनिक शाळांच्या प्राध्यापकांना पाठवण्यात आलं आहे.परिपत्रकातील माहितीनुसार, सैनिक शाळा ज्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात असते तेथील मुलांसाठी ६७ टक्के जागा राखीव असतात. उर्वरित ३३ टक्के जागा इतर राज्यांमधील मुलांसाठी असतात. A आणि B अशा पद्दतीनं या यादीची क्रमवारी केली जाते. आरक्षणाचा निर्णय दोन्ही याद्यांमध्ये लागू असणार आहे.

गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी २०२१-२२ शैक्षणिक सत्रात सैनिक शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्याचा प्रस्ताव मान्य केला होता. टप्प्याटप्प्याने मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. मिझोराममधील सैनिक शाळेतील पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...