नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
२९ नोव्हेंबर २०२०
पृथ्वी संबंधीची सविस्तर माहिती
पृथ्वीचा जन्म - 46000 अंदाजित कोटी वर्षापूर्वी
पृथ्वीचा आकार - जिऑइड
पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर - 14,88,00,000 कि.मी.
पृथ्वीचे क्षेत्रफळ - 5101 कोटी चौ.कि.मी.
पृथ्वीचे पाण्याचे क्षेत्रफळ - 3613(71%) कोटी चौ.कि.मी.
पृथ्वीचे जमीन क्षेत्रफळ - 1484(29%) कोटी चौ.कि.मी.
पृथ्वीची त्रिज्या - 6371 कि.मी.
पृथ्वीचा ध्रुवीय व्यास - 12714 कि.मी.
पृथ्वीचा विषवृत्तीय व्यास - 12,758 कि.मी.
पृथ्वीच्या विषवृत्तीय परिघाची लांबी - 40,077 कि.मी.
पृथ्वीच्या ध्रुवीय परिघाची लांबी - 40,009 कि.मी.
पृथ्वीच्या परिघाचे मापन करण्याचा पहिला प्रयत्न एरॅटोस्थेनिसने केला.
🎯पृथ्वीला प्राप्त झालेल्या गती व त्याचे परिणाम :
पृथ्वी सूर्याभोवती तसेच स्वत:भोवती फिरते. यामुळे पृथ्वीला परिवलन आणि परीभ्रमण अशा दोन गती प्राप्त झालेल्या आहेत.
५२व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. १९८५ साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला.
◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे.
◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे १०वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे.
◾️पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता.
◾️या कायद्यान्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.
◾️तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यंच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.
◾️ तया सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे.
‼️ पण २/३ पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही.
केशवानंद भारती खटला
संपुर्ण नक्की वाचा...
🔘 राज्यशास्त्र Imp घटक
🔸केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (१९७३) या खटल्यात स्वातंत्र्यानंतर लगेचच सरकार आणि न्यायसंस्था यांच्यात, सरकारी धोरण आणि त्याचे घटनात्मक कायदेशीर स्पष्टीकरण याविषयी संघर्ष झाला.
🔸घटनेची चौकट आणि संसदेचे कायदे करण्याचे अधिकार या विषयातली मतभिन्नता हे या संघर्षाचे प्रमुख कारण होते.
🔸राज्यघटना ही सरकारी समाज सुधारणेच्या धोरणातील मोठा अडथळा आहे, असे चित्र सरकारतर्फे रंगवले गेले.
🔸ससदेचे कायदे करण्याचे अधिकार अमर्याद आहेत, का राज्यघटनेचा त्यावर अंकुश आहे?
🔸या विषयावर शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार (१९५२) सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार (१९५२) आणि गोरखनाथ विरुद्ध पंजाब सरकार (१९६७) हे महत्त्वाचे खटले लढले गेले.
🔸गोरखनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, की *घटनेतील मूलभूत अधिकारांना (Fundamental Rights) बाधा येणारा कुठलाही कायदा किंवा घटनादुरुस्ती करावयाचा अधिकार संसदेला नाही.*
🔸या पार्श्वभूमीवर १९६३ मध्ये केरळ जमीन सुधारणा कायद्याला केशवानंद भारती खटल्यामध्ये आव्हान दिले गेले.
🔸या *खटल्यासाठी १३ न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन* केले गेले.
🔸 सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील हे सर्वांत मोठे खंडपीठ होते. या खंडपीठाने ८०० पानी निकालपत्रात* महत्त्वपूर्ण निर्णय दिला, की
' संसदेला घटनेच्या गाभ्याला धक्का लावता येणार नाही'.
🔸ससदेला घटनादुरुस्ती करावयाचा पूर्ण अधिकार आहे; परंतु या अधिकारात संसद घटनेचे मूलभूत स्वरूप बदलू शकत नाही. याचा अर्थ असा, की घटनादुरुस्ती अधिकारामध्ये घटनेचे मूळ स्वरूप बदलणे अंतर्भूत नाही.
🔸 सर्वोच्च न्यायालय राज्यघटनेचे संरक्षक आणि विश्लेषक असल्यामुळे घटनादुरुस्ती किंवा कायदा राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूपाला बाधक आहे किंवा नाही हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्वत-कडे ठेवला. म्हणजेच राज्यघटनेचा काही भाग भविष्यकाळातल्या सर्व संसद सदस्यांना बंधनकारक आहे असं स्पष्ट केलं.
🔸या बंधनकारक भागाची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली नाही; परंतु सर्वोच्च न्यायालयानं नंतर इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण (१९७५), मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार (१९८०), आय. आर. कोहेली विरुद्ध तमिळनाडू सरकार (२००७) या खटल्यांमध्ये राज्यघटनेच्या मूलभूत स्वरूप संकल्पनेवर शिक्कामोर्तब केलं.
🔸कशवानंद भारती खटल्यानं सर्वोच्च न्यायालयाने आपले राज्यघटनेच्या विश्लेषणाचे अंतिम अधिकार अबाधित ठेवून देशामध्ये लोकशाहीला धोका पोचणार नाही याची जनतेला खात्री दिली. *म्हणूनच या निर्णयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.*
आझाद हिंद सेना -
◾️ जयेष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी 1942 साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली.
◾️ नताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.
◾️ नताजींनी 1943 आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले.
◾️ आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
◾️ 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली.
◾️ आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले.
◾️ लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.
पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती
पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.
उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.
उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.
विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.
अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.
रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.
स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.
महणी व अर्थ
🔰 गाढवाने शेत खाल्ल्याचे पाप ना पुण्य - निरुपयोगी माणसावर केलेले उपकार अनाठायी जातात
🔰 गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता - मुर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग होत नाही
🔰 गाढवाला गुळाची चव काय - ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही, त्याला त्या गोष्टीचे महत्व कळू शकत नाही
🔰 गाव करी ते राव न करी - श्रीमंत माणूस पैशाच्या जोरावर जे करु शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या जोरावर करु शकतात
🔰 गाव तेथे उकीरडा - प्रत्येक समाजात काही वाईट माणसे असतातच
🔰 गरुची विद्या, गुरुलाच फळली - एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य
🔰 गळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी - गरिबीमुळे आपण काही करु शकत नसलो तरी गोड बोलणे शक्य असल्यास गोड तरी बोलावे
🔰 गळाचा गणपती, गुळाचाच नैवेद्य - एखाद्याची वस्तू घेऊन त्यालाच अर्पण करणे
🔰 गोगलगाय आणि पोटात पाय - बाह्यरुप एक आणि कृती दुसरीच
🔰 गोफण पडली तिकडे, गोटा पडला इकडे - कोणत्याही कामात ताळमेळ नसणे
🔰 गोरा गोमटा आणि कपाळ करंटा - फक्त दिखावट चांगली आणि प्रत्यक्षात काहीच नसणे
🔰 गोष्ट लहान, सांगणं महान - क्षुल्लक गोष्टीचा उदो उदो करणे
🔰 गोष्टी गोष्टी आणि मेला कोष्टी - लांबलचक गोष्टी करत बसलो तर मूळ कामधंदा बाजूलाच राहतो व नुकसान होते
🔰 गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट - निर्लज्ज माणसाशी झगडल्यामुळे फायद्यापेक्षा हानीच अधिक होते
🔰 घटका पाणी पिते, घड्याळ टोले खाते - प्रत्येक माणसाला त्याच्या कर्मानुसार वेगवेगळे सुखदुःखादि भोग प्राप्त होतात
🔰 घटकेत सौभाग्यवती घटकेत गंगा भागीरथी - कधी खूप लाड करावे, प्रेम करावे आणि कधी शिव्या द्याव्यात
🔰 घर चंद्रमौळी पण बायकोला साडीचोळी - स्वतःच्या घरची गरिबी असूनही बायकोसाठी खूप खर्च करणे
🔰 घर ना दार, चावडी बिऱ्हाड -
बायको पोरे नसणारा
भारतातली जागतिक वारसा स्थळे
🍀 आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत,
🍀 तयात 30 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे,
🍀 7 नैसर्गिक ठिकाणे
🍀 एक मिश्रित ठिकाण आहे.
🎇 ♻️सांस्कृतिक♻️ 🎇
💐आग्रा किल्ला 🏰, आग्रा( उत्तरप्रदेश)
💐अजिंठा लेणी, महाराष्ट्र
💐 नालंदा विद्यापीठ 🏢 , बिहार
💐 बौद्ध स्मारक , सांची, मध्यप्रदेश (1989)
💐 चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात
💐 छत्रपती शिवाजी टर्मिनस
🚂🚃🚃, मुंबई, महाराष्ट्र
💐 गोव्याचे चर्च 🏥आणि कॉन्व्हेंट
💐 एलिफंटा लेणी/ 🗿 घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र
💐 वल्लोर/ 🗿वरूळ लेणी, महाराष्ट्र
💐 फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश
💐 चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू
💐 हंपीमधील मंदिरे, कर्नाटक
💐 महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू
💐 पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक
💐राजस्थानामधील 🏔पर्वतीय किल्ले
💐 अहमदाबाद 🛣ह ऐतिहासिक शहर
💐 हुमायूनची कबर, दिल्ली
💐 खजुराहो, मध्यप्रदेश
💐महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार
💐 भारतातली पर्वतीय रेल्वे🚂🚃 (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)
💐 कुतुब मिनार🕌, दिल्ली
💐 राणी की वाव🏟, पटना, गुजरात
💐 लाल किल्ला 🏰🗼, दिल्ली
💐 दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश
💐 कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा
💐 ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश
💐 ले कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड
💐 जंतर मंतर, जयपूर
💐 मबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल ही इमारत
🎇♻️ नैसर्गिक ♻️🎇
💐 ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान 🦌🐕 , कुल्लू, हिमाचल प्रदेश
💐 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान🦏🦏, आसाम
💐 मानस राष्ट्रीय उद्यान 🐘 , आसाम
💐 केवलदेव राष्ट्रीय उद्यान 🦢🦌, राजस्थान
💐 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान 🐅🏝, पश्चिम बंगाल
💐 नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान🌻, उत्तराखंड
💐 पश्चिम घाट⛰⛰ (सह्याद्री पर्वतरांगा)
🎇♻️ मिश्र ♻️🎇
💐 खांगचेंडझोंगा 🐼 🐆राष्ट्रीय उद्यान, सिक्किम
“भारत हा गणराज्य किंवा प्रजासत्ताक ” (Republic) आहे याचा अर्थ.....
🔸गणराज्यात “राष्ट्रप्रमुख” हा लोंकामार्फत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडला जातो. तो वंशपरंपरागत नसतो.
🔸भारत हे गणराज्य आहे कारण, भारताचे राष्ट्रप्रमुख म्हणून काम करणारे राष्ट्रपती (President) हे लोकांद्वारे ५ वर्षांच्या कालावधीसाठी अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात.
🔸राजकीय सार्वभौमत्व लोकांच्या हाती असून राजा किंवा राणीसारख्या एका व्यक्तीच्या हाती नसते.
🔸गणराज्यात कोणताही अधिकार संपन्न वर्ग (priviledged class) नसतो आणि सर्व सार्वजनिक कार्यालये विना भेदभाव सर्वांना खुली असतात.
🔸 “भारत आणि अमेरिका” हे दोन Republic देशांची प्रमुख उदाहरणे आहेत.
🔸२६ जानेवारी १९५० ला भारत हा प्रजासत्ताक झाला.
🔸 महत्वाचे म्हणजे, भारताचे राष्ट्रपती आपल्या दस्तऐवजावर “PRESIDENT REPUBLIC OF INDIA” असेच लिहतात.
महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे
🔸परवरा नदी व मुला नदी - नेवासे,
अहमदनगर
🔸मळा व मुठा नदी - पुणे
🔸गोदावरी व प्राणहिता - सिंगेचा,
गडचिरोली
🔸तापी व पूर्णानदी - श्रीक्षेत्र चांगदेव
तिर्थक्षेत्र, जळगाव
🔸कष्णा व वेष्णानदी - माहुली,
सातारा
🔸तापी व पांजरानदी - मूडवद, धुळे
🔸कष्णा व पंचगंगा - नरसोबाची वाडी,
सांगली
🔸कष्णा व कोयना - कराड, सातारा
🔸गोदावरी व प्रवरा - टोके,
अहमदनगर
🔸कष्णा व येरळ - ब्रम्हनाळ, सांगली
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Latest post
ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.
१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...
-
✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ? 👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये ) ✏️ मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 👉 360 ग्रॅम...
-
१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४ - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...
-
📖 MPSC Maths Marathi🌷: ⚫️ वर्तुळ ⚫️ 1. त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्या ...