२७ नोव्हेंबर २०२०

वासुदेव बळवंत फडके


🖍वासुदेव बळवंत फडकेंचा जन्म 4 नाेव्हेंबर 1845 रोजी कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण येथे एका मध्यवर्गीय कुटुंबात झाला. 


🖍फडके यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. 


🖍1857 च्या उठावानंतर भारतात इंग्रजांविरोधात जो पहिला सशस्त्र उठाव झाला तो फडके यांचा होता. 


🖍 पशवाईच्या काळात पनवेल जवळील कर्नाळ जिल्ह्याची किल्लेदारी ही फडक्यांच्या घराण्यात होती. 

त्यांना सुभेदार फडके म्हणून देखील ओळखले जात असे.


🖍उदरनिर्वाहासाठी वासुदेव फडके यांनी प्रथम रेल्वे खात्यात लिपिक म्हणून कामास सुरुवात केली व नंतर ते लष्करी खात्यात नोकरीस लागले. 


🖍 इग्रजांकडून त्यांना नेहमी अपमानास्पद वागणूक मिळत असे व त्यांच्या या नोकरीमुळे त्यांना त्यांच्या आईच्या अंत्यविधीस देखील जाता आले नाही. 


🖍फडकेंवर न्या. रानडे व गणेश वासुदेव जोशी (सार्वजनिक काका) यांचा प्रभाव होता. 


🖍1873 मध्येफडकेंनी स्वदेशी वस्तु वापरण्याची शपथ घेतली तसेच समाजात समानता, ऐक्य व 

समन्वय निर्माण करण्यासाठी ऐक्यवर्धीनी संस्था सुरू केली. 


🖍 पणे येथे फडकेंने 1874 मध्ये पुना नेटिव्ह इन्स्टिट्युशन ही शाळा स्थापन करुन स्वदेशीचा पुरस्कार देखील केला. 


🖍फडके हे दत्त उपासक होते व त्यांनी दत्तमाहात्म्य हा 7,000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला 

होता. 


🖍शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज भारतातून जाणार नाहीत असे त्यांना वाटत असल्यामुळे इंग्रजांविरोधी उठावास त्यांनी सुरूवात केली व इंग्रजांना आपली ओळख पटू नये म्हणून त्यांनी दाढी वाढविली व वैराग्याचा वेश घेवून जन जागृती करत ते गावोगावी फिरू लागले. 


🖍 दौलतराव नाईकांच्या मदतीने लोणीजवळ धामरी गावावर त्यांनी पहिला दरोडा घातला यामध्ये त्यांना केवळ 3,000 रुपये मिळाले. 


🖍 सरकारी खजिन्यास कडक बंदोबस्त असल्यामुळे सरकारी खजिना लुटण्यापेक्षा खेड्यापाड्यातील श्रीमंताची व सावकारांची घरे लुटण्यावर त्यांचा भर होता. त्यांनी लोणी, खेड, जेजुरी जवळील वाल्हे, पुरंदर, हुरणे, सोलापूर, वरसगाव येथे दरोडा टाकून लुटमार केली. याच काळात त्यांनी रामदरा, मल्हारगाव येथील जंगलांचा आश्रय घेवून आसपासचा प्रदेश देखील लुटला. 


🖍 अखेर दिवसेंदिवस या लुटीच्या बातमीने हादरुन पुण्याचा पोलीस प्रमुख मेजर डॅनिअल याने फडकेंचा शोध घेत असता शुक्रवार पेठेत पोचला व त्याठिकाणी त्यास तलवारी, बंदुका मिळाल्या व डॅनीअलने लगेलच फडकेंवर अटक वॉरंट काढले व यानुसार फडकेंना पकडण्यासाठी मुंबई सरकारने 4,000 रुपयांचे रोख बक्षिस घोषित केले. 


🖍 यावर प्रतिउत्तर म्हणून फडकेंनी जाहीर केले की, मुंबईचा गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल याचे डोके कापून आणणाऱ्यास 10,000 रुपयांची बक्षिस दिले जाईल. परंतु फडकेंचा उत्साह फार काळ टिकू शकला नाही व रामोशांनी देखील त्यांची साथ सोडली होती. 


🖍 अखेर 23 जुलै 1879 रोजी विजापूर जवळील देवर नावडगी या गावाच्या बाहेर एका बाैध्द विहारमध्ये गाढ झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आली होती. 


🖍 नया. अल्फ्रेड केसर यांच्या समोर सदरील खटला सुरू झाला व त्यांनी सत्र न्या. न्युनहॅमकडे हा खटला वर्ग केला. फडकेंचे वकीलपत्र ग.वा. जोशींनी घेतले होते व उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले होते. 


🖍 फडके यांच्या बचावासाठी जनतेने उस्ताहाने निधीदेखील गोळा केला परंतू कोर्टाने त्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.


🖍 अखेर जानेवारी 1880 मध्ये त्यांची तेहरान बोटीने एडण येथे रवानगी करण्यात आली व तेथेच 17 फेब्रुवारी 1883 रोजी तेथील इंग्रजांच्या होणारया छळाला बळी पडून त्यांचे निधन झाले.


🖍 "  देशप्रेमाने ओथंबलेला हिमलया सारखा उत्तुंग महापुरुष " असा फडकेंचा गौरव बंगालमध्ये प्रसिध्ह अमृतबाजार पत्रिकेने त्यांच्या अटकेनंतर एका पत्रात केला होता.


'मलबार नौदल युद्ध सराव' ( malabar exercise 2020)


04 नोव्हेंबर 2020 


⚓️ सहभागी देश : 

भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया


⚓️ ठिकाण : 

बंगालचा उपसागर, अरबी समुद्र


⚓️ कालावधी :  

हा सराव दोन टप्प्यात होईल. 

- पहिला टप्पा विशाखापट्टणममध्ये ३ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर या काळात होणार आहे.

- दुसरा टप्पा नोव्हेंबरच्या मध्यात अरबी समुद्रात प्रस्तावित आहे.


⚓️ उद्देश : 

प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी पोषक वातावरण तयार करणे.


⚓️ पार्श्वभूमी :

- क्वाड सदस्य देशांमध्ये भविष्यात लष्करी सहकार्य राहावे याचा प्रयत्न म्हणून या कवायतींकडे पाहिले जात आहे. 

- जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचेही अनेक वादग्रस्त प्रश्नांवरून चीनशी संबंध ताणले गेले आहेत. 

- इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनचा वाढणारा प्रभाव हा प्रश्न प्रामुख्याने चर्चेचा मुद्दा आहे. 

- या कवायतींमध्ये सहभाग घेतलेले देश इंडो-पॅसिफिक क्षेत्रात संरक्षणविषयक सहकार्य करण्यास बांधील आहेत हे यावरून स्पष्ट होते

   

⚓️ विशेष :

- यंदाच्या मलबार युद्ध सरावाचं विशेष महत्त्व म्हणजे १३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया या सरावात पुनरागमन करत आहे. 

- करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चार देशातील हा नौदलाच्या युद्ध सरावात कुठलाही प्रत्यक्ष संपर्क नसेल.

राज्यघटना बाबत मते


❇️एन श्रीनिवासन:-


🔳भाषा आणि आशय या बाबतीत घटना जवळजवळ 1935 च्या कायद्यासारखीच आहे


❇️आयव्हर जेंनीग्स:-


🔳1935 च्या कायद्यातून काही तरतुदी जशास तश्या घेतल्या आहेत


❇️के हनुमंतय्या:-


🔳आम्हला विना किंवा सतार याचे संगीत हवे होते पण येथे इंग्लिश घोष विभागाचे संगीत आहे


🔳जया प्रकारची घटना गांधीजींना नको होती व त्यांना अपेक्षित न्हवती नेमक्या त्याच प्रकारची ही घटना आहे


❇️लोकनाथ मिश्र:-


🔳पश्चिमचे गुलामी अनुकरण,त्याहून पश्चिमेला गुलामी शरणागती


❇️लक्ष्मीनारायण साहू:-


🔳मसुदा ज्या विचारधारावर आधारलेला आहे त्याचे मूळ भारतीय विचारधाराशी कोणतेही नाते दिसत नाही


❇️एच बी कामत:-


🔳आपल्या समितीसाठी हत्ती हे चिन्ह स्वीकारले आहे ते राज्यघटनाशी सुसंगत आहे.

विभक्ती व त्याचे प्रकार


🔰 नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.


🔰 नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात.


🔰 नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात.


⭕️ परथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत – 

      कर्ता


⭕️ वदितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते – 

      कर्म


⭕️ ततीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण


⭕️ चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते – 

      संप्रदान


⭕️ पचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान


⭕️ षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध


⭕️ सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ – 

     अधिकरण


⭕️ सबोधन – नो – संबोधन

लोकपाल



    पहिले लोकपाल:-पिनाकी चंद्र घोष


गैर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम


 न्यायिक सदस्य:- दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अजयकुमार त्रिपाठी, अभिलाषा कुमारी


🛑 लोकपाल निवड समिती

1)पंतप्रधान

2)सरन्यायाधीश

3)लोकसभा अध्यक्ष

4)लोकसभा विरोधी पक्षनेते

5)कायदेतज्ज्ञ


🛑 लोकपाल पात्रता


1)सर्वोच्च न्यायालयचे निवृत्त मुख्य सरन्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश

2)भ्रष्टाचार विरोधी धोरण,सार्वजनिक प्रशासन,दक्षता,विमा बँकिंग याबाबत किमान 25 वर्षे अनुभव


🛑 अध्यक्ष अपात्रता


 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती संसद व विधिमंडळ सदस्यअपराधी दोषी


🛑 कार्यकाल


5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्ष पर्यंत जो अगोदर  संपेल तो


 🛑 पगार


अध्यक्षाला सरन्यायाधीश प्रमाणे

सदस्य ला न्यायाधीश प्रमाणे


🛑 लोकपाल कायदा 2013


   राज्यसभा:-17 डिसेंबर 2013

लोकसभा:-18 डिसेंबर 2013

राष्ट्रपती:-1 जानेवारी 2014

अंमलबजावणी :-16 जानेवारी 2014


🛑 रचना: 1 अध्यक्ष व जास्तीत जास्त 8 सदस्य

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून १८ दहशतवाद्यांची यादी जाहीर




केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी दहशतवाद्यांविरोधात मोठा पाऊल उचलत, एक नवी यादी जाहीर केली आहे. बेकायदा कृत्यविरोधी दुरुस्ती विधेयक (यूएपीए) अंतर्गत गृह मंत्रालयाने १८ दहशतवाद्यांची यादी घोषित केली आहे. या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊत इब्राहिमच्या अनेक सहकाऱ्यांची नावं आहेत. छोटा शकील, टायगर मेमन यांचा देखील या यादीत समावेश आहे.


या १८ दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानस्थित असलेल्या दहशतवाद्यांचा देखील समावेश आहे. सरकारने २६/११ मुंबई हल्ल्यातील आरोपी लष्कर ए तोयबाचा युसूफ मुजम्मील, लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा मेव्हणा अब्दुर रहमान मक्की, १९९९ मधील कंधार आयसी-८१४ विमान अपहरणातील आरोपी युसूफ अजहर, मुंबई बॉम्ब स्फोटाचा कट रचणारा टायगर मेमन, छोटा शकील, हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या भटकल बंधूंना देखील दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.


हे आहेत १८ दहशतवादी -


१. साजिद मीर (लष्कर ए तोयबा), २. युसूफ भट्ट (लष्कर ए तोयबा), ३.अब्दुर रहमान मक्की (लष्कर ए तोयबा), ४. शाहीद महमूद (लष्कर ए तोयबा) ५. फरहातुल्लाह गोरी ६.अब्दुल रऊफ असगर ७. इब्राहीम अतहर ८. युसूफ अजहर ९. शाहीद लतीफ १०. मोहम्मद युसूफ शाह (हिजबुल मुजाहिद्दीन) ११. गुलाम नबी खान (हिजबुल मुजाहिद्दीन) १२. जफर हुसैन भट्ट १३. रियाज इस्माइल १४. मोहम्मद इकबाल १५. छोटा शकील १६. मोहम्मद अनीस १७. टाइगर मेमन १८. जावेद चिकना

२०१९ व २०२० मधील काही महत्त्वाची पुस्तके / आत्मचरित्रे व त्यांचे लेखक


🔰 बाय बाय कोरोना : पी के श्रीवास्तव

🔰 यवर बेस्ट डे ईस टुडे : अनुपम खेर

🔰 द इंडिया वे : एस जयशंकर

🔰 पोर्टरेटस् ऑफ पॉवर : एन के सिंह 

🔰 द बँटल ऑफ बिलोंगिंग : शशी थरुर

🔰 वन अरेंजड् मर्डर : चेतन भगत

🔰 विशेष : कोड टु विन : निरुपमा यादव

🔰 बाबू द अनफॉर्गेटेबल : मनीष सिसोदिया

🔰 वॉईसेस ऑफ डिसेंट : रोमिला थापर

🔰 अ प्रोमिसड लॅन्ड : बराक ओबामा

🔰 आझादी : फ्रीडम . फॅसिझम. फिक्शन : अरुंधती रॉय

🔰 माय लाईफ इन डिझाईन : गौरी खान

🔰 लट अस ड्रीम : पोप फ्रान्सिस

🔰 करिकेट द्रोना : जतिन परांजपे

🔰 अमेझिंग अयोध्या : नीना राय

🔰 द एंडगेम : हुसैन झैदी

🔰 अ सॉंग ऑफ इंडिया : रस्किन बाँड

🔰 ओवरड्राफ्ट : सेविंग द इंडियन सेवर : उर्जित पटेल

🔰 लिजेंन्ड ऑफ सुहेलदेव : अमिश त्रिपाठी

🔰 कोर्टस् ऑफ इंडिया : रंजन गोगोई

🔰 लिसनिंग , लर्निंग , लिडींग : वैकय्या नायडू 

🔰 माय लाईफ , माय मिशन : बाबा रामदेव

🔰 वी आर डीसप्लेसड् : मलाला युसुफजाई

🔰 एवरी वोट काऊंटस् : नवीन चावला

🔰 विराट : द मेकिंग ऑफ ए चॅम्पियन : नीरज झा

🔰 द थर्ड पिलर : रघुराम राजन

🔰 आय डु व्हाँट आय डु : रघुराम राजन

🔰 गम चेंजर : शाहिद आफ्रीदी

🔰 चजिंग इंडिया : मनमोहन सिंह

🔰 द पँराडॉक्सीकल प्राईम मिनिस्टर : शशि थरुर

🔰 मातोश्री : सुमित्रा महाजन

🔰 सिटीझन दिल्ली : माय टाईम , माय लाईफ : शिला दिक्षित

🔰 २८१ अँन्ड बियॉन्ड : वी वी एस लक्ष्मण 

🔰 आवर हाऊस इस ऑन फायर : ग्रेटा थनबर्ग

🔰 माइंड मास्टर : विश्वनाथन आनंद .

महत्वाचे प्रश्नसंच

 (०१)  राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?

उत्तर- २४ डिसेंबर.


(०२)  सायकलचा शोध कोणी लावला ?

उत्तर- मॅकमिलन.


(०३)  'कुरल' या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?

उत्तर- पांडूरंग सदाशिव साने.


(०४)  भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?

उत्तर- १९२० मध्ये.


(०५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?

उत्तर- सोलापूर.


(०६)  भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?

उत्तर- वड.


(०७)  विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?

उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.


(०८)  कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?

उत्तर- विंबलडन.


(०९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?

उत्तर- २० मार्च १९२७.


(१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ?

उत्तर- C₁₂H₂₂O₁₁ 


(११)  भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर- दादासाहेब फाळके.


(१२)  डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- रूडाल्फ डिझेल.


(१३)  'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

उत्तर- अनंत भवानीबाबा घोलप/ अनंत फंदी


(१४)  व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

उत्तर- २७० ते २८० ग्रॅम.


(१५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

उत्तर- ४ सप्टेंबर १९२७.


(१६)  महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?

उत्तर- पुणे.


(१७)  वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- जेम्स वॅट.


(१८)  'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?

उत्तर- राम गणेश गडकरी.


(१९)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?

उत्तर- ८ जुलै १९३०.


(२०) ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे ?

उत्तर- C₆H₁₂O₆ 


(२१)  राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?

उत्तर- त्याग आणि शौर्य.


(२२)  टेलिफोनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- अलेक्झांडर ग्रॅहम बेल.


(२३)  ना. धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?

उत्तर- रानकवी.


(२४)  अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?

उत्तर- २९ आॅगस्ट.


(२५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ?

उत्तर- २७ मे १९३५.


(२६)  न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

उत्तर- किवी.


(२७)  ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.


(२८)  मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ?

उत्तर- विवेकसिंधू.


(२९)  'सनी डेज' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- सुनील गावस्कर.


(३०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ?

उत्तर- महात्मा फुले.


(३१)  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?

उत्तर- व्हाइट हाऊस.


(३२)  अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?

उत्तर- ब्रेल लुईस.


(३३)  ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?*

उत्तर- अरूणा ढेरे.


(३४)  'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- पी. टी. उषा.


(३५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?

उत्तर- फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.


(३६) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती ?

उत्तर- मोचनगड, गुंजीकर यांची 


(३७)  महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- सयाजीराव लक्ष्मण सीलप


(३८)  देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता ?

उत्तर- कोल्हापूर.


(३९)  श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते  ?

उत्तर- प्र.के.अत्रे 


(४०)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?

उत्तर- 1990 


(४१)  तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ?

उत्तर- कावेरी नदी.


(४२)  पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?

उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग.


(४३)  आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?

उत्तर- कृष्णाजी केशव दामले.


(४४)  अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- अॅथेलेटिक्स.


(४५)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ?

उत्तर- २५ डिसेंबर १९२७.

 

(४६)  सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?

उत्तर- रोम.


(४७)  डायनामाइटचा शोध कोणी लावला ?

उत्तर- आल्फ्रेड नोबेल.


(४८)  आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ?

उत्तर- ह. ना. आपटे.


(४९)  'प्लेईंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे ?

उत्तर- सायना नेहवाल.


(५०)  डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य 'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.' हे होते ?

उत्तर- बहिष्कृत हितकारिणी सभा.

लव्ह जिहाद विरोधात योगी सरकारने केला कायदा; अध्यादेशाला मंजुरी



उत्तर प्रदेश कॅबिनेटने ‘लव्ह जिहाद’विरोधातील अध्याधेशास आज मंजुरी दिली आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा अध्यादेश पारीत केला गेला.


अध्यादेशानुसार धर्मपरिवर्तन करण्यास जबरदस्ती करणाऱ्यास एक ते पाच वर्षे कारावासाची शिक्षा व १५ हजार रुपये दंड असणार आहे. तसेच, अल्पवयीन व अनुसूचित जाती / जमातीमधील महिलांच्या धर्मांतरणासाठी तीन ते दहा वर्षे कारावास व २५ हजार रुपये दंड असणार आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी ही माहिती दिली आहे.


तसेच, अनेकांचे जबरदस्ती धर्मांतरण केल्याप्रकरणी अध्यादेशात तीन ते दहा वर्षे कारावसाच्या शिक्षेसह ५० हजार रुपये दंडाची तरतूद आहे. याशिवाय एखाद्या व्यक्तीस धर्मांतरण करून विवाह करायचा असल्यास, त्याला दोन महिने अगोदर जिल्हाधिकाऱ्यांकडून तशी परवानगी घ्यावी लागणार आहे, असे देखील सांगण्यात आले आहे.


उत्तर प्रदेशात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर पावलं उचलली आहेत. काही दिवसांअगोदरच या संदर्भात राज्याच्या गृहमंत्रालयाने कायदे व विधी विभागाकडे प्रस्ताव देखील पाठवला होता.


लव्ह जिहादच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, महिलांच्या सन्मानाशी खेळणाऱ्यांचे आता राम नाम सत्य होईल, असा गंभीर इशारा या अगोदरच दिलेला आहे.


'अलाहाबाद न्यायालयानं निर्णय दिला आहे की, केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही. धर्म परिवर्तन नाही केले गेले पाहिजे. याला मान्यता मिळाली नाही पाहिजे. 


यासाठी सरकार देखील निर्णय घेत आहे की, लव्ह जिहादला कठोरपणे रोखण्याचं काम केले जावे. सरकार लव्ह जिहादला रोखण्यासाठी कायदा तयार करणार आहे. मी त्या लोकांना इशारा देत आहे, जे आपली ओळख लपवतात व आमच्या बहिणींच्या सन्मानाशी खेळतात, जर तुम्ही सुधाराला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार आहे.” असं योगी आदित्यनाथ यांनी एका सभेत बोलून दाखवलं होतं.

भारतीय रेल्वेनं 13 लाख कर्मचाऱ्यांना दिलं मोठं गिफ्ट


🔰भारतीय रेल्वेने आपल्या 13 लाख कर्मचार्‍यांना मोठे गिफ्ट दिले आहे. रेल्वेने कर्मचार्‍यांच्या सोयीसाठी आता डिजिटल ऑनलाईन मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (HRMS) सुरू केली आहे.


🔰तर या सुविधेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना अ‍ॅडव्हान्स मॉड्यूलद्वारे त्यांचे पीएफ बॅलेन्स चेक करता येणार आहे. याशिवाय त्यांना अ‍ॅडव्हान्स पीएफसाठी ऑनलाईन अर्जही करता येणार आहे.


🔰रल्वे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, की सुधारित उत्पादकता आणि कर्मचार्‍यांना फायदा मिळवून देण्यासाठी भारतीय रेल्वेने एचआरएमएस हा एक खास प्रकल्प सुरू केला आहे.


🔰रल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनोदकुमार यादव यांनी गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने, रेल्वे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी उपयुक्त एचआरएमएस (HRMS) आणि यूझर डेपोची मॉड्यूल्स लॉन्च करण्यात आले आहेत. यात कर्मचारी सेल्फ सर्व्हिसचा (ESS) लाभ घेऊ शकतात.

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच


🔰आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) घेतला आहे.


🔰यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमानसेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असं जाहीर करण्यात आलं होतं. पण करोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


🔰नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने परिपत्रक जारी करुन याबाबत आदेश दिले आहेत. मात्र, या कालावधीत ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत सुरू असलेल्या खास विमानांना उड्डाणाची परवानगी असेल.

तसंच, डीजीसीएकडून परवानगी मिळालेल्या विशेष विमानांवर बंदी नसेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.


🔰यापूर्वी डीजीसीएने आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी  30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. करोना व्हायरसमुळे यावर्षी 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यावेळी देशांतर्गत विमानांवरही बंदी होती, पण 25 मेपासून देशांतर्गत विमानांना पुन्हा परवानगी देण्यात आलीये.


🔰तर, आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक 30 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता होती, पण आता करोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याने 31 डिसेंबर 2020 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार आहे.

लाच घेण्यात भारत आशिया खंडात अव्वल.


🔰ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने केलेल्या सर्व्हेनुसार, भारतात लाचखोरीचं प्रमाण हे 39 टक्के आहे. गेल्या 12 महिन्यांत भ्रष्टाचारात वाढ झाल्याचे 47 टक्के लोकांचं म्हणणं आहे.सरकार भ्रष्टाचार संपवण्यासाठी योग्य पावलं उचलत असल्याचं या सर्व्हेत सहभागी झालेल्या 63 टक्के लोकांचं म्हणणं आहे.


🔰भारतात 46 टक्के लोक आपलं काम करुन घेण्यासाठी वैयक्तिक संबंधांचा फायदा उठवतात. लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये सुमारे निम्म्या लोकांकडून लाच मागण्यात आली आहे.

तर वैयक्तिक संबंधांचा वापर करणारे 32 टक्के लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी जर असं केलं नाही तर त्याचं काम होतच नाही.


🔰भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे कंबोडिया. या देशात 37 टक्के लोक लाच देतात. यानंतर भ्रष्टाचाराचं प्रमाणं 30 टक्के असल्याने इंडोनेशिया तिसऱ्या स्थानी आहे. तर सर्वात कमी लाचखोरी चालणारे देश आहेत मालदीव आणि जपान. या दोन्ही देशांमध्ये दोन टक्के लोकच लाच घेतात.


🔰आशिया खंडातील दक्षिण कोरियामध्ये भ्रष्टाचाराचा  दर 10 टक्के आहे. तसेच नेपाळमध्ये 12 टक्के लोकचं भ्रष्टाचार करतात. मात्र, या सर्व्हेमध्ये पाकिस्तानचा समावेश करण्यात आलेला नाही.

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने ‘ग्लोबल करप्शन बॅरोमीटर-आशिया’या नावाने आपला अहवाल सादर केला आहे.

तृतीयपंथी’ व्यक्तींसाठी समर्पित असलेल्या राष्ट्रीय संकेतस्थळाचे उद्घाटन


🔰कद्रीय सामाजिक न्याय व सक्षमिकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते ‘तृतीयपंथी’ व्यक्तींसाठी समर्पित असलेल्या राष्ट्रीय संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच संकटात सापडलेल्या तृतीयपंथी व्यक्तींना निवारा देण्यासाठी गुजरातच्या वडोदरा शहरात ‘गरिमा गृह’ या नावाने एका केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.


🔰29 सप्टेंबर 2020 रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या “तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम-2020” यामध्ये समर्पित असे एक राष्ट्रीय संकेतस्थळ तयार करण्याची तरतुद आहे.


🔰ह व्यासपीठ एखाद्या तृतीयपंथी व्यक्तीला देशात कोणत्याही भागातून प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यात मदत करते. प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय कोणत्याही कार्यालयाला भेट न देता त्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे.


🔴‘गरिमा गृह’ विषयी...


🔰‘गरिमा गृह’चे व्यवस्थापन संपूर्णपणे तृतीयपंथीयांकडून संचालित केल्या जाणाऱ्या ‘लक्ष्य ट्रस्ट’कडून केले जाणार आहे. तृतीयपंथी व्यक्तींना निवारा, अन्न, वैद्यकीय सेवा आणि करमणुकीच्या सुविधा या मूलभूत सुविधा पुरवणे तसेच त्यांना कौशल्य विकासाचे धडे देऊन त्यांना सक्षम करणे, ज्यामुळे त्यांना सन्मानाने जीवन जगता येणार, या उद्देशाने ही संस्था आहे.


🔰‘गरिमा गृह’ प्रमाणेच आणखी 13 केंद्रांची स्थापना करण्यासाठी 10 शहरांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यात वडोदरा, नवी दिल्ली, पटना, भुवनेश्वर, जयपूर, कोलकाता, मणीपुर, चेन्नई, रायपूर, मुंबई या शहरांचा समावेश आहे. या योजनेत मंत्रालयाने निश्चित केलेल्या प्रत्येक केंद्रावर किमान 25 लोकांचे पुनर्वसन केले जाणार.

चीनच्या आणखी 42 उपयोजनांवर बंदी.



🔰चीनच्या 42 मोबाइल उपयोजनांवर इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदी घातली असून त्यात अलीबाबा वर्कबेंच, अलीएक्स्प्रेस, अलीपे कॅशियर, कॅमकार्ड, वुई डेट यांचा समावेश आहे. भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षा व सार्वजनिक व्यवस्था यांना या उपयोजनांमुळे धोका असल्याचे सांगण्यात आले.तर मंत्रालयाने म्हटले आहे की, भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने दिलेल्या अहवालाच्या आधारे या उपयोजनांवर बंदी घालण्यात येत आहे.


🔰तसेच 29 जुलै रोजी सरकारने चीनच्या 59 उपयोजनांवर बंदी घातली होती त्यात टिक टॉक, युसी ब्राउजर यांचा समावेश होता. त्यानंतर 2 सप्टेंबरला 118 उपयोजनांवर बंदी घालण्यात आली त्यात पबजी नॉर्डिक मॅप,लिव्हिक, पबजी मोबाइल लाइट, वुई चॅट वर्क, बायडू, टेनसेंटर वेयुन यांचा समावेश होता. त्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 69 ए अन्वये बंदी घालण्यात आली.

चद्रावरील खडकांचे नमुने आणण्यासाठी चीनचे यान रवाना.


🔰चद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्यासाठी चीनचे मानवरहित यान मंगळवारी चंद्राकडे रवाना झाले आहे.चीनच्या चँग इ -5 या शोधक यानाने दक्षिणेकडील हैनान प्रांतात वेंगचँग अवकाशयान उड्डाण तळावरून यशस्वी झेप घेतल्याची माहिती सीजीटीएन या संस्थेने दिली आहे.


🔰तर हे यान लाँग मार्च 5 या प्रक्षेपकाच्या मदतीने बीजिंगच्या प्रमाणवेळेनुसार पहाटे 4.30 वाजता अवकाशात झेपावले.

चँग इ- 5 ही अतिशय गुंतागुंतीची चांद्रमोहीम असून त्यात अवकाश इतिहासावर भर देण्यात आला आहे. गेल्या चाळीस वर्षांच्या काळात जगात प्रथमच चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याची मोहीम राबवली जात आहे.


🔰तसेच अमेरिकेने चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करण्यासाठी अवकाशवीर पाठवले होते. रशियाने खडकांचे नमुने आणण्यासाठी मानवरहित मोहिमा राबवल्या होत्या. ही अवकाशयाने चंद्रावर जाऊन परत आली होती. चीनची मोहीम गुंतागुंतीची आहे कारण त्यात हे यान चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केले जाणार असून तेथील खडकांचे जास्तीत जास्त नमुने गोळा करणार आहे.

भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९-२०२०)



🌀 निवार : तमिळनाडू , आंध्रप्रदेश 

✔️ नाव दिले : इराण


🌀 फनी : ओडिशा , पश्र्चिम बंगाल 

✔️ नाव दिले : बांग्लादेश


🌀 वायु : भारत , पाकिस्तान

✔️ नाव दिले : भारत 


🌀 हिक्का : गुजरात

✔️ नाव दिले : मालदीव 


🌀 महा : ओमान , श्रीलंका , भारत 

✔️ नाव दिले : ओमान


🌀 बलबुल : बांग्लादेश , भारत

✔️ नाव दिले : पाकिस्तान


🌀 कयार : सोमालिया , भारत , येमन

✔️ नाव दिले : म्यानमार 


🌀 पवन : सोमालिया , भारत 

✔️ नाव दिले : श्रीलंका 


🌀 अम्फान : ओडिशा , पश्र्चिम बंगाल

✔️ नाव दिले : थायलंड


🌀 निसर्ग : महाराष्ट्र , गोवा , गुजरात

✔️ नाव दिले : बांग्लादेश .

उमंग इंटरनॅशनल”: उमंग मोबाईल अ‍ॅपची आंतरराष्ट्रीय आवृत्ती


♒️कद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते उमंग अॅपच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीचे अनावरण करण्यात आले.


♨️ठळक बाबी ...


♒️परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समन्वयाने “उमंग इंटरनॅशनल” अॅपमार्फत भारत सरकारच्या सेवा दिल्या जाणार आहेत.

ही आवृत्ती अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड या निवडक देशांसाठी तयार करण्यात आली आहे.


♒️अपमार्फत भारतीय आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, अनिवासी भारतीय, परदेशातले भारतीय पर्यटक यांना भारत सरकारच्या सेवांचा कोणत्याही वेळी लाभ घेता येणार.

उमंग अॅपवर उपलब्ध असणाऱ्या भारतीय सांस्कृतिक सेवांमुळे भारताला जागतिक पातळीवर नेण्यास मदत होणार आणि परदेशी पर्यटकांमध्ये भारताला भेट देण्याविषयी आवड निर्माण होणार.


♨️उमंग अ‍ॅपविषयी...


♒️“उमंग” (UMANG - युनिफाईड मोबाईल अ‍ॅप्लीकेशन फॉर न्यू-एज गवर्नन्स) मोबाईल अ‍ॅप हा भारत सरकारचा एकल, एकात्मिक, सुरक्षित, बहुविध, बहु-भाषी, बहु-सेवा मोबाईल अ‍ॅप (सुपर-अ‍ॅप) आहे. अॅपमार्फत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागाच्या उच्च प्रभावित सेवा प्रदान केल्या जातात.


♒️उमंगची निर्मिती इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग (NeGD) यांनी केली आहे. त्याचे लोकार्पण 23 नोव्हेंबर 2017 रोजी करण्यात आले होते.


♒️“उमंग” अ‍ॅपने तीन वर्षे पूर्ण केली असून 2000 पेक्षा अधिक सेवांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. अ‍ॅपवर सध्या 2039 सेवा (88 केंद्रीय विभागाच्या 373 सेवा, 27 राज्यांच्या 101 विभागाच्या 487 सेवा आणि 1179 सेवा उपयोगिता बिल देयके) उपलब्ध आहेत आणि यात निरंतर वाढ होत आहे.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...