Tuesday, 24 November 2020

इस्रोच्या शुक्रयान मोहिमेतील वैज्ञानिक उपकरणांसाठी परदेशी प्रस्ताव.



🔰भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या शुक्रयान मोहिमेसमवेत वैज्ञानिक उपकरणे पाठवण्यासाठी परदेशातून अनेक प्रस्ताव आले असून त्यात वीस प्रस्तावांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. यात फ्रान्सच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. याशिवाय रशिया, स्वीडन व जर्मनी या देशांचेही प्रस्ताव असून ते देशही भारताच्या शुक्रयानासमवेत संशोधनासाठी वैज्ञानिक उपकरणे पाठवण्यास तयार आहेत.


🔰शक्राच्या अभ्यासासाठी हे यान पाठवले जाणार असून त्यात परदेशांतून वैज्ञानिक उपकरणे पाठवण्यासाठी काही प्रस्ताव आले होते, त्यातील वीस वैज्ञानिक उपकरणांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. हे २० पेलोड म्हणजे वैज्ञानिक उपकरणे वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी पाठवले जाणार आहेत.


🔰फरान्सच्या सीएनइएस संस्थेचे ‘व्हीनस इन्फ्रारेड अ‍ॅटमॉस्फेरिक गॅस लिंकर’ हे उपकरण रशियाच्या रॉसकॉसमॉस अवकाश संशोधन संस्थेच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. फ्रान्सच्या सीएनआरएस संस्थेने ‘लॅटमॉस’ नावाचे उपकरण तयार केले असून त्याच्या मदतीने शुक्राच्या वातावरणाचा अभ्यास करता येईल.

महाराष्ट्राच्या ‘या’ जिल्ह्यात १ डिसेंबरपासून सुरू होणार शाळा.


🔰पालघर: जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगर पंचायत क्षेत्रातील तसेच बोईसर-तारापूर औद्योगिक परिसर क्षेत्रातील नववी ते १२ इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. तर उर्वरित ग्रामीण भागातील शाळा मात्र १ डिसेंबरनंतर शालेय व्यवस्थापन समितीला विश्वासात घेऊन सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.


🔰जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची अनुमती राज्य शासनाने दिली असून त्याबाबतचा जिल्हास्तरीय निर्णय घेण्यासाठी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. या बैठकीत शिक्षण विभाग तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा अभिप्राय जाणून घेतल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे तसेच खासदार, आमदार आणि वसई विरार महानगरपालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.


🔰वसई विरार महानगरपालिका क्षेत्र, पालघर, डहाणू व जव्हार नगरपालिका क्षेत्र, तलासरी, वाडा, मोखाडा व विक्रमगड नगरपंचायत क्षेत्र तसेच बोईसर- तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये ३१ डिसेंबरपर्यंत शाळा सुरू करू नयेत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले आहेत.


🔰तयाचप्रमाणे पाच हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये तूर्तास शाळा सुरू करण्यात येऊ नये असे सूचित करण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून ३० नोव्हेंबरपर्यंत संमती पत्र घेण्यात येणार आहे. त्या संमतीपत्रांनंतर स्थानिक परिस्थितीनुसार शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

शंभर वर्षांपूर्वी चोरलेली अन्नपूर्णेची मूर्ती लवकरच भारतात.


🔰वाराणसीतील मंदिरातून १०० वर्षांपूर्वी चोरण्यात आलेली आणि कॅनडातील एका विद्यापीठाच्या कला दालनात ठेवण्यात आलेली अन्नपूर्णा या हिंदू देवतेची मूर्ती कॅनडातील संबंधित विद्यापीठ लवकरच भारताकडे सुपूर्द करणार आहे.


🔰मकेन्झी कलादालनात रेजिना विद्यापीठाचा वस्तुसंग्रह असून तेथे सध्या ही मूर्ती ठेवली आहे. जवळपास १०० वर्षांपूर्वी ही मूर्ती चुकीने नेण्यात आल्याचे मॅकेन्झीच्या संग्रहालयाची पाहणी करीत असताना दिव्या मेहरा या कलाकाराच्या निदर्शनास आले, असे विद्यापीठाने एका निवेदनात म्हटले आहे.


🔰अन्नपूर्णा देवीची ही मूर्ती आभासी पद्धतीने भारतात पाठविण्याचा समारंभ १९ नोव्हेंबर रोजी पार पडला. मात्र आता ही मूर्ती लवकरच भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही मूर्ती अधिकृतपणे भारतात पाठविण्यासाठी विद्यापीठाचे अंतरिम अध्यक्ष आणि कुलगरू डॉ. थॉमस चेस यांनी कॅनडातील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांच्याशी दूरचित्रसंवाद साधला.

राष्ट्रीय जल पुरस्कारात महाराष्ट्राची सरशी.


🔰जलसंधारण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय जल पुरस्कारावर आपली मोहर उमटवली आहे. विविध क्षेत्रात एकूण 6 पुरस्कार पटकाविले आहेत.


🔰तर सांगली जिल्ह्याला नदी पुनरुज्जीवनासाठी तर अमरावती जिल्ह्यातील शरद पाणी वापर ठिंबक सिंचन सहकारी सोसायटीला पहिला पुरस्कार मिळाला. याशिवाय नाशिक, जळगाव आणि बीड  जिल्हयांनीही या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.


🔰कद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने जलसंधारण क्षेत्रात वैविध्यपूर्ण व उल्लेखनिय कार्य करणाºया व्यक्ती व संस्थाच्या कार्याचा गौरव म्हणून ‘राष्ट्रीय जल पुरस्कार 2019’ चे वितरण करण्यात आले.

भारताची IRNSS प्रणाली “वर्ल्ड वाइड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम (WWRNS)” याचा एक घटक बनला


🔰हिंद महासागर प्रदेशात कार्य करण्यासाठी भारताची स्वदेशी GPS प्रणाली ‘इंडियन रीजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (IRNSS)’ याला आंतरराष्ट्रीय समुद्री संघटनेनी (IMO) “वर्ल्ड वाइड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम (WWRNS)” याच्या एका घटकाच्या रूपात स्वीकारले आहे.


🔰“वर्ल्ड वाइड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम (WWRNS)” याचा एक घटक बनल्यामुळे ही प्रणाली 50°N अक्षांश, 55°E रेखांश, 5°S अक्षांश आणि 110°E रेखांश, जे भारतीय सीमेपासून अंदाजे 1500 किलोमीटरपर्यंत आहे, एवढ्या क्षेत्रात व्यापलेल्या महासागराच्या जलक्षेत्रामध्ये जहाजांच्या सुचालनामध्ये सहाय्य करण्यासाठी ठिकाणाची माहिती मिळविण्यासाठी GPS आणि GLONASS प्रणाली प्रमाणेच IRNSS वापरण्यास व्यापारी जहाजांना सक्षम करणार.


🌍भारताची ‘NavIC’ प्रणाली


🔰भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भारतासाठी ‘NavIC’ (नॅव्हिगेशन वीथ इंडियन कॉन्स्टीलेशन) नावाने स्वदेशी सुचालन प्रणाली तयार करीत आहे. या प्रणालीच्या उपग्रहांची शृंखला भारताने यशस्वीरीत्या पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित केलेली आहे.


🔰‘NavIC’ प्रणाली ही अमेरिकेच्या ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम (GPS) सेवेप्रमाणेच आहे. भारताकडून ‘NavIC’ या नावाने ‘भारतीय प्रादेशिक सुचालन उपग्रह प्रणाली’ (इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम - IRNSS)’ उभारण्यासाठी एकूण सात उपग्रहांचा वापर केला जात आहे.


🔰IRNSS उपग्रहांना पृथ्वीच्या उप-भौगोलिक समांतर कक्षेत (sub-GTO) प्रस्थापित करण्यात आले आहेत. त्यातला आठवा IRNSS-1H हा खासगी कंपन्यांकडून तयार करण्यात आलेला आणि सक्रियपणे पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आलेला भारताचा पहिला उपग्रह आहे.


🔰IRNSS दोन प्रकारच्या सेवा प्रदान करते - सर्व वापरकर्त्यांसाठी स्टँडर्ड पोजिशनिंग सर्व्हिस (SPS) आणि केवळ अधिकृत वापरकर्त्यांसाठी रेस्ट्रीक्टेड सर्व्हिस (RS).


🔰ही प्रणाली भारताच्या सर्व बाजूंनी सुमारे 1500 किलोमीटरच्या सीमेच्या आत कार्य करते. ही प्रणाली वापरकर्त्या संस्थेला रस्त्यावर आणि समुद्रात त्यांचे वाहन चालविण्यासाठी योजनेची आखणी करण्यास आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करणार. आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडणार्‍या मच्छीमारांना त्याद्वारे सावध केले जाऊ शकते आणि लोकांना त्यांना आवश्यक असलेला पत्ता शोधण्यास मदत होऊ शकणार. शिवाय दूरसंचार आणि पॉवर ग्रीड कार्यामध्येही याची मदत होऊ शकते.

व्यापारासाठी लाचखोरीमध्ये भारत 77 व्या स्थानावर


🔰व्यापारासाठी लाचखोरी करण्याबाबत भारत 45 गुण मिळवून जगात 77 व्या स्थानावर आहे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.‘ट्रेस’ या लाचखोरीविरोधी संघटनेने 194 देश, प्रांत त्याचप्रमाणे स्वायत्त आणि निमस्वायत्त प्रदेशांमध्ये पाहणी केली.


🔰तर या वर्षीच्या आकडेवारीनुसार, उत्तर कोरिया, तुर्कमेनिस्तान, दक्षिण सुदान, व्हनेझुएला व एरिट्रिया हे देश लाचखोरीत आघाडीवर असल्याचे, तर डेन्मार्क, नॉर्वे, फिनलण्ड, स्वीडन आणि न्यूझीलंड  सर्वात तळाशी आहेत.

महिला पोलिसाचा विशेष बढती देऊन सन्मान


🔰दिल्लीच्या एका महिला हेड कॉन्स्टेबलने केवळ अडीच महिन्यांत 76 बेपत्ता लहान मुलांचा शोध  घेतल्याबद्दल त्यांचा ‘ऑऊट ऑफ टर्न प्रमोशन’  देऊन गौरव करण्यात आला आहे.


🔰तर या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तीन महिन्यांत विशेष बढती मिळवणाऱ्या त्या पहिल्या पोलीस कर्मचारी ठरल्या आहेत.


🔰सीमा ढाका यांना आपल्या कामाच्याप्रती निष्ठा आणि प्रामाणिकपणासाठी या विशेष बढतीनं गौरविण्यात आलं आहे.


🔰दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी बुधवारी ही घोषणा केली. पोलीस आयुक्त श्रीवास्तव यांनी काही महिन्यांपूर्वी पोलिसांसाठी एक प्रोत्साहन योजना जाहीर केली होती.

‘या’ कंपन्या चालवणार देशात Private Trains?; रेल्वे लवकरच घेणार निर्णय .


🔰भारत सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाला यापूर्वीच परवानगी दिली आहे. या परवानगीनंतर अनेक कंपन्यांनी प्रवासी खासगी रेल्वे चालवण्यास उत्सुकता दाखवत आपले अर्ज सादर केले आहेत.


🔰रल्वेच्या खासगीकरणामध्ये पहिल्या टप्प्यात 12 ट्रेन्स चालवल्या जाणार आहेत. या खासगी ट्रेन कोण चालवणार यासंदर्भात रेल्वेने अर्ज मागवले होते. याला प्रतिसाद देताना एकूण 16 खासगी कंपन्यांकडून 120 अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी करुन त्या कंपन्यांच्या नावांना अंतिम स्वरुप देण्यास सुरूवात झाली आहे.


🔰या कंपन्यांची नावं पुढे :-


1. IRCTC

2. GMR Highways Ltd.

3. Gateway Rail Freight Ltd.

4. IRB Infrastructures Developers

5. Welspun Enterprise Ltd.

2030 पासून ब्रिटनमध्ये पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या कार्स मिळणार नाही.


🔰पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ब्रिटनने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असून पुढील दहा वर्षांमध्ये पेट्रोल तसेच डिझेलचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे उद्देश समोर ठेवलं आहे.


2030 पासून देशामध्ये पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या कार्सच्या विक्रीवर बंदी घालण्याची घोषणा ब्रिटनने केली आहे.


🔰तर अशाप्रकारे वाहनविक्रीवर बंदी घालण्याची घोषणा करुन दहा वर्षांमध्ये पूर्णपणे इलेक्ट्रीक्स कार्स असणारा ब्रिटन हा पहिला देश ठरणार आहे.


🔰बरिटन सरकारने बुधवारी 10 मुद्दांच्या समावेश असणारी ‘ग्रीन इंडस्ट्रीयल रिव्होल्यूशन’ योजना लागू करत असल्याची घोषणा केली.

UAE ने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणं केलं बंद


🔰संयुक्त अरब अमिरातीने पुढील सूचना मिळेपर्यंत पाकिस्तान आणि अन्य अकरा देशातील नागरिकांना नव्याने व्हिजिट व्हिसा जारी करणं बंद केलं आहे.

UAE ने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिजिट व्हिसा बंद केल्याच्या वृत्तावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शिक्कामोर्तब केलं आहे.


🔰तर करोना व्हायरसच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असावा, असे एक्स्प्रेस ट्रिब्युन वर्तमानपत्राने म्हटले आहे.


🔰तसेच मागच्या आठवडयाभरात पाकिस्तानात नव्याने दोन हजार करोना रुग्णांची नोंद झाली आहे. जून महिन्यात पाकिस्तानात करोना रुग्णांची संख्या वाढली होती. त्यावेळी यूएईने प्रवासी सेवा बंद केली होती.

७४ वर्षात पहिल्यांदाच बिहारच्या कॅबिनेटमध्ये नाही एकही मुस्लीम मंत्री.


🔰बिहारचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी नितीश कुमार यांनी सातव्यांदा शपथ घेतली. याचबरोबर यावेळी अन्य १४ मंत्र्यांना देखील शपथ देण्यात आली.  यानंतर परत एकदा बिहारमध्ये नितीशराज सुरू झालं. मात्र, यंदा प्रथमच बिहार कॅबिनेटमध्ये एकही मुस्लीम चेहरा नसल्याचं समोर आलं आहे. एवढच नाहीतर बिहारमधील सत्ताधारी एनडीएकडे मुस्लीम समाजाचा एकही आमदार नाही.


🔰सवातंत्र्यानंतर कदाचित असं पहिल्यांदाच होत असेल,की बिहारमधील सत्ताधारी आघाडी विधानसभेतील सत्तेच्या खुर्च्यांवर मुस्लीम आमदाराविना बसली आहे. टाईम्स नाऊने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.


🔰बिहारमधील एनडीएमध्ये भाजपा, जनता दल संयुक्त, हिंदुस्थान अवाम मोर्चा(सेक्युलर) व विकास इन्सान पार्टी या पक्षांचा समावेश आहे. तरी, यापैकी कोणत्याही एका पक्षाला मुस्लीम आमदाराला निवडून विधानसभेत पाठवता आलेले नाही. विशेष म्हणजे या राज्यात १६ टक्क्यांपेक्षा अधिक मुस्लीम लोकसंख्या आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला जो बायडेन यांना फोन, अभिनंदन करत म्हणाले.



🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी यावेळी अमेरिकेसोबत असणाऱ्या धोरणात्मक भागीदारीचा पुनरुच्चारही केला. तसंच ही भागीदारी अजून मजबूत करण्यासंबंधी चर्चा केली.


🔰मगळवारी रात्री उशिरा ट्विट करत नरेंद्र मोदींनी जो बायडेन यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचंही अभिनंदन केलं. कमला हॅरिस यांचा विजय भारतीय-अमेरिकन समुदायासाठी अभिमानाची बाब असल्याचं ते म्हणाले आहेत.


🔰नरेंद्र मोदींनी ट्विट करत म्हटलं आहे की, “अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना फोन करुन अभिनंदन केलं. भारत आणि अमेरिकेतील धोरणात्मक भागीदारीसंबंधी आपल्या वचनबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार केला. याशिवाय आम्ही करोना महामारी, हवामान बदल, इंडो-पॅसिफिक भागात सहकार्य अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली”.


🔰नरेंद्र मोदी यांनी यावेळी अजून एक ट्विट उपाध्यपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस यांचंही अभिनंदन केलं आहे.


🔰याआधी मंगळवारी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी जो बायडेन यांच्या नेतृत्वात अमेरिकेसोबत सकारात्मक संबंध निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला. दहशतवाद, हवामान बदल आणि करोनाविरोधातील लढ्यात भारत एकत्रितपणे काम करण्याची शक्यता आहे. याशिवाय जो बायडेन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरुपी जागा देण्याच्या दाव्याचं समर्थन करण्याची शक्यता आहे.

रामायण, महाभारतामधील गोष्टी ऐकत मोठा झालो - बराक ओबामा.


🔰अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आपल्या राजकीय प्रवासापासून ते खासगी गोष्टींपर्यंत अनेक गोष्टींवर ओबामा यांनी भाष्य केलेलं पुस्तक सध्या भारतातही चांगलेच चर्चेत आहे. याच पुस्तकामध्ये भारतीय काँग्रेससंदर्भात ओबामा यांनी व्यक्त केलेल्या मतांमुळे सध्या देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. मात्र याच पुस्तकामध्ये ओबामा यांनी आपले बालपण हे रामायण, महाभारतामधील गोष्टी ऐकत गेल्याचे म्हटले आहे.


🔰भारत आणि तेथील संस्कृतीबद्दल आपल्या मनात कायम विशेष स्थान राहिलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे इंडोनेशियामध्ये बालपण गेलं असून तिथे मी बालपणी रामायण, महाभारतामधील गोष्टी अनेकदा ऐकल्याचा उल्लेख ओबामांनी केला आहे.


🔰“भारताचे आकारमान आणि जागतिक लोकसंख्येपैकी प्रत्येक सहावी व्यक्ती या देशात रहात असल्याने, वेगवेगळ्या वंशाचे दोन हजारहून अधिक संस्कृती आणि सातशेहून अधिक भाषा बोलला जाणारा हा देश असल्याने त्याचा अधिक प्रभाव दिसून येतो,” असं ओबामा यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून २०१० साली आपण भारताला पहिल्यांदा भेट दिली. त्यापूर्वी आपण कधीही भारतामध्ये गेलो नव्हतो मात्र भारत देशाला माझ्या मनात कायमच विशेष स्थान होतं, असं ओबामा यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर मान्य केला पराभव, बायडेन यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रण.



💥अमेरिकेत नुकतीच राष्ट्राध्यक्ष निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. तर जो बायडेन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. मात्र निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प आपल्या दावर अडून राहिले होते आणि आपला पराभव मान्य करण्यास तयार नव्हते. पण आता अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तांतरणाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे.


💥अमेरिकेतील निवडणुका होऊन तीन ते चार आठवडे उलटले असून डोनाल्ड ट्रम्प निकाल आपल्या बाजूने येईल असा विश्वास वारंवार व्यक्त करत होते. निकाल आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा जो बायडेन आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षावर निशाणा साधला आहे. 


💥निवडणुकीचा निकाल स्पष्ट असतानाही डोनाल्ड ट्रम्प अजिबात पराभव मान्य करत नव्हते. यासाठी त्यांनी कायदेशीर मार्गही निवडला होता. पण तिथेदेखील त्यांच्या हाती निराशाच आली. अशा परिस्थितीत अखेर डोनाल्ड ट्रम्प पराभव मान्य करताना दिसत आहेत.


💥डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जीएसएला (General Service of Administration) सत्तांतरणाच्या प्रक्रियेला परवानगी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे करण्याची गरज आहे ते करा असं सांगितलं आहे. यानंतर अमेरिकेच्या जीएसए एमिली मर्फी यांनी जो बायडेन यांना पत्र लिहिलं असून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे.

माजी न्या. सीएस कर्णन यांच्यावर गुन्हा




सर्वोच्च न्यायालय व मद्रास उच्च न्यायालयातील काही न्यायाधीशांविरोधात, महिला कर्मचार्यांविरोधात अपशब्द वापरण्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सीएस कर्णन यांच्याविरोधात चेन्नई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चेन्नईतील एका वकिलाने चेन्नई सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती, त्यानंतर कर्णन यांच्याविरोधात आयपीसी कलम १५३ व ५०९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.


कर्णन यांच्याविरोधातली ही तक्रार सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याकडेही पाठवण्यात आली असून या तक्रारीत एका व्हीडिओचा उल्लेख आहे. या व्हीडिओमध्ये कर्णन महिलांच्याविरोधात अपशब्द बोलत असून काही न्यायाधीश व अधिकार्यांच्या पत्नींनाही ते धमकावत आहेत. त्याचबरोबर न्यायालयातल्या महिला कर्मचारी व महिला न्यायाधीशांचा सर्वोच्च न्यायालय व मद्रास उच्च न्यायालयातील काही न्यायाधीश लैंगिक छळ करत आहेत, याचाही खुलासा करत आहेत.


न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी यापूर्वी २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने माजी न्या. कर्णन यांना दोषी ठरवले होते व त्यांना ६ महिन्यांचा तुरुंगवास झाला आहे.

सर्वाधिक अंधश्रद्धा वैद्यकीय क्षेत्रात’


🎍दशात धर्माच्या खालोखाल सर्वात जास्त अंधश्रद्धा या वैद्यकीय क्षेत्रात आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील अंधश्रद्धा रोखणे हेच आजच्या काळातील सर्वात मोठे आव्हान असल्याचे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले.


🎍आरोग्य या विषयासाठी वाहिलेल्या ‘आरोग्य ज्ञानेश्वरी’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन कुबेर यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी विरारमध्ये झाले. विरार येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी हे संपादक असलेल्या या दिवाळी अंकाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.


🎍सरक्षण आणि औषधनिर्मिती या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार होत असल्याचे सांगून कुबेर म्हणाले,‘ वैद्यकीय क्षेत्रातील अंधश्रद्धेमुळे अनारोग्य तयार झाले तितके औषध कंपन्यांमुळे झालेले नाही. ऐकीव माहितीवर नखांवर नख घासणे, स्मरणशक्ती वाढविणारी औषधे घेणाऱ्यांच्या संख्येवरूनच या अंधश्रद्धांची कल्पना करता येईल.’


🎍अफवांचा बुडबुडा विचारांच्या टाचणीने फोडता येऊ शकतो. पण, नवीन प्रश्न विचारण्याची लोकांमधील जाणीवच हरवत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. समूहाचे मानसशास्त्र अफवांवर आहे. अशा वेळी जनजागृती करणे हे कठीण काम असल्याचे त्यांनी नमूद केले.

जगातील काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांचे आत्मचरित्र



🔰 अ शॉर्ट अँट हिस्ट्री : अभिनव बिंद्रा 

🔰 सट्रेट फ्रॉम द हर्ट : कपिल देव

🔰 अनब्रेकेबल : मेरी कॉम 

🔰 द रेस ऑफ माय लाईफ : मिल्खा सिंह

🔰 गोल्डन गर्ल : पी टी उषा 

🔰 पलेयिंग ईट माय वे : सचिन तेंडुलकर

🔰 पलेयिंग टु वीन : सायना नेहवाल

🔰 द टेस्ट ऑफ माय लाईफ : युवराज सिंह 

🔰 सनी डेस् : सुनील गावसकर 

🔰 द ग्रेटेस्ट : मोहम्मद अली 

🔰 अट द क्लोस ऑफ प्ले : रीकी पॉटींग 

🔰 नो स्पिन : शेन वॉर्न

🔰 २८१ अँन्ड बियॉन्ड : वी वी एस लक्ष्मण

🔰 गम चेंजर : शाहिद आफ्रिदी

🔰 माईंड मास्टर : विश्वनाथन आनंद

🔰 शटलिंग टु द टॉप : पी वी सिंधू .

पिलीभीत व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय “TX2 पुरस्कार” मिळाला



✍️उत्तरप्रदेशातल्या पिलीभीत व्याघ्र प्रकल्प आणि उत्तरप्रदेश वन विभागाने आंतरराष्ट्रीय किर्तीचा “TX2 पुरस्कार” जिंकला.


🔴 ठळक बाबी....


✍️कवळ 4 वर्षांमध्ये वाघांची संख्या दुप्पट केल्याबद्दल हा पुरस्कार दिला गेला आहे.पिलीभीत व्याघ्र प्रकल्पात केवळ 4 वर्षांमध्ये 40 वाघांची वाढ झाली.पिलीभीत व्याघ्र प्रकल्प उत्तरप्रदेशातल्या पिलीभीत आणि शाहजहांपूर या जिल्ह्यांमध्ये आहे.भारतात एकूण 13 व्याघ्र प्रकल्प आहेत.


🔴 “TX2 पुरस्कार” विषयी...


✍️TX2 पुरस्काराची स्थापना 2010 साली झाली. हा एक वार्षिक पुरस्कार आहे.वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय गाठणाऱ्याचा सन्मान करण्याच्या हेतूने या पुरस्काराची स्थापना करण्यात आली.


✍️सयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP), ग्लोबल टायगर फोरम (GTF), आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN), वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (WWF), कन्झर्व्हेशन अश्यूअर्ड/टायगर स्टँडर्ड्स आणि लायन्स शेअर या संघटना पुरस्काराचे भागीदार आहेत.

पाकिस्तानात सापडलं भगवान विष्णूचं १३०० वर्षांपूर्वीचं मंदिर


🔰पाकिस्तानमधील स्वात जिल्ह्यात एका पर्वतावर पाकिस्तान आणि इटलीच्या पुरातत्त्वतज्ज्ञांनी तेराशे वर्षांपूर्वीचं एक हिंदू मंदिर शोधलं आहे. पुरातत्त्वतज्ज्ञांनी शोधलेलं हे मंदिर भगवान विष्णूचं असल्याचं सांगितलं जात आहे. गुरुवारी खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पुरातत्त्व खात्यातील अधिकारी फजल खालिक यांनी या शोधाची घोषणा करताना सापडलेले मंदिर हे भगवान विष्णूंचं असल्याचं सांगितलं.


🔰वायव्य पाकिस्तानच्या स्वात जिल्ह्यात बारिकोट घुंडई येथे उत्खननादरम्यान मंदिराचा शोध लागला आहे. हिंदू शाही काळातील हिंदूंनी १३०० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले होते, अशी माहिती फजल खालिक यांनी दिली. हिंदू शाही किंवा काबूल शाही एक हिंदू राजवंश होते. ज्यांचं साम्राज्य काबुल खोरं (पूर्व अफगाणिस्तान), गंधार(आधुनिक पाकिस्तान-अफगाणिस्तान) आणि सध्याच्या वायव्य भारतावर होतं.


🔰मदिराच्या उत्खननादरम्यान पुरातत्त्वशास्त्रज्ञांना मंदिराच्या जागेजवळ छावण्यांचे आणि पहारेकऱ्यांसाठी असलेल्या टेहळणी बुरुजांचे अवशेषही सापडलेत. याशिवाय, तज्ज्ञांना मंदिराच्या जागेजवळ पाण्याचा कुंडही सापडला आहे. हिंदू भाविक देवदर्शनापूर्वी स्नानासाठी या कुंडाचा वापर करत असावेत असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

डग्लस स्टुअर्ट यांच्या ‘शगी बेन’ कादंबरीला बुकर पुरस्कार


⚡️ गलासगो शहरातील १९८० च्या दशकातील निम्नमध्यमवर्गीय जगणे केंद्रभागी करणाऱ्या स्कॉटिश अमेरिकी लेखक डग्लस स्टुअर्ट यांच्या ‘शगी बेन’ कादंबरीला यंदाचा बुकर पुरस्कार मिळाला. त्यांची ही पदार्पणातील कादंबरी आहे.


💁‍♂️ सटुअर्ट यांनी स्कॉटलंडमधील बालपण आत्मकथेऐवजी कादंबरीच्या रुपात समोर आणले. उपजीविकेसाठी वस्रोद्योगात असलेल्या या लेखकाने ग्लासगो शहर आणि त्या भवतीच्या उपनगरांचे पर्यटन ‘शगी बेन’मधून घडविले. 


✒️ तिथल्या माणसांइतक्याच कुरूप बनलेल्या शहरांचे हे तिथल्या साहित्य किंवा पत्रकारितेतूनही अधोरेखित न झालेले सूक्ष्म अवलोकन आहे. 


💫 दबईस्थित भारतीय वंशाच्या लेखिका अवनी दोशी यांचे नाव अंतिम सहा लेखकात होते, मात्र त्यांच्या ‘बन्र्ट शुगर’ या कादंबरीला बुकरचा मान मिळाला नाही. 


👉 झिम्बाब्वेचे लेखक त्सित्सी दांगारेम्ब्वा यांची ‘धिस मोर्नेबल बॉडी’, डायन कुक यांची ‘दी विल्डरनेस’, माझा मेंगिस्टे यांची ‘दी शॅडो किंग’, ब्रँडन टेलर यांची ‘रिअल लाइफ’ या कादंबऱ्या शर्यतीत होत्या. 


📌 सटुअर्ट यांनी कादंबरी आपल्या आईला अर्पण केली आहे.

टस्लाचे प्रमुख एलन मस्क जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती मार्क झुकरबर्गला मागे टाकले


ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सनुसार, एलन मस्क यांच्याकडे 110 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे, तर फेसबुकचे मार्क झुकरबर्ग 104 अब्ज डॉलर्स संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत. एलन मस्क यांच्या रॉकेट कंपनीने चार अंतराळवीरांना अंतराळात पाठवल्यानंतर एकाच दिवसात त्यांच्या संपत्तीमध्ये सुमारे 7.61 अब्ज डॉलर्सची वाढ झाली. याव्यतिरिक्त इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला ही एस अँड पी 500 कंपन्यांच्या यादीत सामील झाली आहे. मस्क यांच्या वार्षिक संपत्तीमध्ये आतापर्यंत तब्बल 82 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.


🔰 जगभरातील पहिल्या 5 श्रीमंत व्यक्ती 🔰


१) अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस

२) मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स

३) टेसलाचे संस्थापक एलन मस्क

४) फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग

५) एलव्हीएमएचचे बर्नार्ड अर्नाल्ट

टेस्लाचे प्रमुख एलन मस्क जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती


⚡️ कोरोनाच्या काळात अनेक मोठ्या कंपन्यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. तर काही कंपन्यांना टाळंही लागलं आहे. 


💁‍♂️ दसऱ्या बाजूला काही कंपन्यांना लॉकडाउनच्या काळात मोठी उभारी मिळाल्याचंही पाहायला मिळत आहे.


👉 सपेस एक्स आणि टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली असून ते जगातील श्रीमंतांच्या यादीत आता तिसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. 


😳 विशेष म्हणजे एलन मस्क यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुगरबर्ग यांना मागे टाकलं आहे.


😍 बलूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सच्या माहितीनुसार, टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्याकडे ११० अब्ज डॉलरची संपत्ती आहे. तर फेसबुकचे मार्क झुकरबर्ग १०४ अब्ज डॉलर संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत.


👀 *जगभरातील टॉप १० श्रीमंत व्यक्ती* : 

१. अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस : १८५ अब्ज डॉलर

२. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स : १२९ अब्ज डॉलर

३. टेस्ला, स्पेस एक्सचे एलन मस्क : ११० अब्ज डॉलर

४. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग : १०४ अब्ज डॉलर

५. एलवीएमएचचे बर्नार्ड अर्नाल्ट : १०२ अब्ज डॉलर

६. बर्कशायर हॅथवेचे वॉरेन बफेट : ८८ अब्ज डॉलर

७. गुगलचे के लैरी पेज : ८२.७ अब्ज डॉलर

८. गुगलचे सर्जी ब्रिन : ८० अब्ज डॉलर

९. मायक्रोसॉफ्टचे स्टीव्ह बॉलमर : ७७.५ अब्ज डॉलर

१०. रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी : ७५.५ अब्ज डॉलर

जागतिक आरोग्य संघटनेत अमेरिकेचा पुन्हा सहभाग



🔰चीनने आंतरराष्ट्रीय नियमाधिष्ठित व्यवस्थेचे पालन करावे, असे मत अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केले असून जागतिक आरोग्य संघटनेत अमेरिका पुन्हा सहभागी होईल, असे स्पष्ट केले आहे.


🔰करोना साथ वाईट पद्धतीने हाताळून चीनच्या हातचे बाहुले बनल्याची टीका करत ट्रम्प प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेतली व त्यांचा निधीही बंद केला होता. बायडेन यांनी गुरुवारी  सांगितले, की चीनने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अध्यक्षीय चर्चेत बायडेन यांनी चीनला शिक्षा करण्याचे वक्तव्य केले होते पण त्यावर खुलासा करताना त्यांनी आता असे म्हटले आहे,  चीनने संघटनेच्या नियमांचे पालन करावे एवढेच आमचे म्हणणे आहे.


🔰सत्ता हाती घेताच पहिल्या दिवसापासून आम्ही जागतिक आरोग्य संघटनेत परत सामील होऊ असे सांगून ते म्हणाले, की पॅरिस हवामान करारातही आम्ही पुन्हा सहभागी होऊ. जगातील इतर देश व अमेरिका मिळून काही सीमारेषा स्पष्ट करणे गरजेचे आहे, ज्या चीनला समजतील असे त्यांनी म्हटले आहे.

कोरोना लस- भारत 150 कोटी डोस खरेदी करणार



⚜️ भारताने कोरोना लसीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने तब्बल 150 कोटी कोरोना लसीचे डोस खरेदी करण्यासाठी डील केली आहे. 


⚜️ भारताने लसीच्या 150 कोटी डोससाठी लस बनवणाऱ्या कंपन्यांसोबत अॅडव्हान्समध्ये करार केला. कोरोनावरील लसीच्या खरेदीची डील पक्की करणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.


⚜️ दरम्यान, भारतात कोरोना लस सर्वांना मोफत मिळण्याची शक्यता आहे.

जल जीवन अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 5 नव्या तंत्रांची मदत


🎲जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागातल्या बहुशाखीय तांत्रिक समितीकडून पाच अभिनव तंत्रांची शिफारस करण्यात आली आहे. त्यापैकी पेयजल पुरविण्यासाठी तीन प्रकारच्या तर स्वच्छतेसाठी दोन तंत्रांची शिफारस करण्यात आली आहे.


♟शिफारस केलेले तंत्र....


🎲गरुंडफोस एक्युप्युअर - सौर ऊर्जेवर चालणारा जल शुद्धिकरण, जल प्रक्रिया प्रकल्पजनजल ‘वॉटर ऑन व्हील’ – ही इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) तंत्रज्ञानाचा उपयोग करणारी यंत्रणा आहे, ज्यामार्फत वैश्विक स्थान प्रणालीने (GPS) सक्षम असलेल्या विजेरी वाहनाच्या माध्यमातून घरापर्यंत सुरक्षित पाणी पुरविले जाणार.

प्रीस्टो ऑनलाइन क्लोरिनेटर – हे पाण्यातील प्रदूषण दूर करून पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरले जाणारे विजेचा वापर न करणारे ऑनलाइन क्लोरिनेटर आहे.


🎲जॉकासौ तंत्रज्ञान – हे सांडपाणी, स्वयंपाकघर आणि स्नानासाठी वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी भूमिगत बसवले जाणारे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे.एफबीटेक - या तंत्रज्ञानाच्या मदतीने विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया तंत्रज्ञान वापरून जलशुद्धी केले जाते.


♟पार्श्वभूमी...


🎲दशातल्या ग्रामीण भागामध्ये सन 2024 पर्यंत प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पेयजल पुरविण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजीवणीमध्ये येणाऱ्या विविध समस्या सोडवत असताना जलशक्ती मंत्रालय अभिनव तंत्रांची मदत घेत आहे.


🎲पाणी योजनेचे काम करताना त्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जल स्त्रोतांची उपलब्धता आणि जलस्तर त्याचबरोबर पाण्याची गुणवत्ता, जलपूर्ती आणि स्वच्छता यांच्यामध्ये समन्वय साधणे, तसेच अनेक ठिकाणी पाण्याचा रंग राखाडी असतो काही ठिकाणी पाण्यामध्ये गाळ साठलेला असतो, अशा विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना जलशक्ती मंत्रालयाकडून ऑनलाइन मदत देण्यात येत आहे.

South Asian Association for Regional Cooperation


🤝 सथापना : 8 December 1985


🏛 मख्यालय : काठमांडू ( नेपाळ )


👥 सदस्य देश : ८


📌 भारत 🇮🇳

📌 पाकिस्तान 🇵🇰

📌 अफगाणिस्तान  🇦🇫

📌 नपाळ 🇳🇵

📌 बांगलादेश 🇧🇩

📌 शरीलंका 🇱🇰

📌 मालदीव 🇲🇻

📌 भतान 🇧🇹


🔰 सार्क राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांची आकडेवारी 🔰


📌 लोकसंख्या : २१.३%

📌 सकल गृह उत्पन्न : १.३%

📌 निर्यात : ०.९%

📌 आयात : १.०%

📌 अन्नधान्याचे उत्पादन : ९.७%

📌 आंतरविभागीय व्यापार : ३.४%

आसाममध्ये आभासी न्यायालय आणि ‘ई-चालान’ प्रकल्प कार्यरत


🌷आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते आसाममध्ये दिनांक 12 नोव्हेंबर 2020 रोजी “आभासी न्यायालय (वाहतूक)” आणि “ई-चालान” प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.


🌷गवाहाटी उच्च न्यायालयाची माहिती व दूरसंचार तंत्रज्ञान समिती आणि आसाम सरकार तसेच आसाम पोलीस विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने हा प्रकल्प राबवला जात असून प्रकल्पातून खटल्यांचा निपटारा केला जात आहे.


🌷आसाममध्ये आभासी न्यायालयामध्ये सुमारे 10 न्यायाधीशांचे कार्य केवळ एक न्यायाधीश करू शकणार आहेत. उर्वरित 9 न्यायाधीश आता इतर न्यायालयीन काम करू शकणार आहेत.


💢पार्श्वभूमी


🌷कद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्यावतीने ई-चालान हा उपक्रम सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये NIC संस्थेनी विकसित केलेल्या सॉफ्टवेअरनुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ‘ई-चालान’ पाठवले जाते.


🌷सर्वोच्च न्यायालयाने पुढाकाराने विधी व न्याय मंत्रालयाच्या सहकार्याने ई-समिती तयार करण्यात आली असून त्याद्वारे आभासी न्यायालयाचे कामकाज ऑनलाइन चालते. न्यायालयांमध्ये प्रत्यक्ष न्यायाधीशांना येऊन बसण्याऐवजी ते कार्य संगणकीय प्रणालीनुसार केले जाते. या आभासी न्यायालयाचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यभर विस्तारले जाऊ शकते. तसेच सातही दिवस आणि दिवसाचे 24 तास न्यायालयाचे कामकाज चालवून खटल्यांचा निपटारा करणे शक्य आहे. आभासी न्यायालय ही एकल प्रक्रिया असल्यामुळे इथे युक्तिवाद करण्याची गरज असलेले खटले सुनावणीसाठी येणार नाहीत. तसेच दिलेल्या निर्णयानुसार दंड अथवा नुकसान भरपाईची रक्कम ऑनलाइन भरणे शक्य होणार आहे.


🌷नयायालयीन प्रकरणांचा निपटारा त्वरेने होत असल्यामुळे नागरिक आणि न्यायालयीन अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास या प्रकल्पामुळे मदत होणार आहे. तसेच त्यामुळे वाहतूक पोलीस विभागावर अधिक जबाबदारी येणार असून गैरव्यवहाराला आळा बसणार, परिणामी लोकांचे जीवन अधिक सुकर होणार.


🌷सध्या भारतामध्ये 9 आभासी न्यायालये कार्यरत आहेत; ते पुढीलप्रमाणे आहेत - दिल्ली, दिल्ली NBT, हरयाणा, महाराष्ट्र (पुणे आणि नागपूर), तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आसाम. या सर्व न्यायालयांमध्ये वाहतूक चालान विषयक खटले हाताळण्यात येतात.

भारतीय नोटावरील प्रतिमा


⚜️ 10 ₹:- कोणार्क सूर्य मंदिर


⚜️ 20 ₹:- वेरूळ लेण्या


⚜️ 50 ₹:- हंपी रथ


⚜️ 100 ₹:- राणी ची विहीर


⚜️ 200 ₹:- सांची स्तूप


⚜️ 500 ₹:- लाल किल्ला


⚜️ 2000 ₹:- मंगळयान

न्यूझीलंडमध्ये महिला पोलिसांना हिजाब परिधानाची परवानगी.


🔰नयूझीलंडमध्ये पोलीस दलात मुस्लीम महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या गणवेशात ‘हिजाब’चा समावेश करण्यात आला आहे. पण हा हिजाब विशिष्ट पद्धतीचा आहे. कॉन्स्टेबल झिना अली या ‘हिजाब’ गणवेश परिधान करणाऱ्या पहिल्याच आहेत.


🔰झिना (वय ३०) या ख्राइस्ट चर्च दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या वर्षी पोलीस दलात सामील झाल्या. त्यावेळी न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींवर हल्ला करण्यात आला, त्यात ५१ जण ठार झाले होते.


🔰या आठवडय़ात त्या पोलीस अधिकारी झाल्या असून हिजाब परिधान करणाऱ्या पहिल्या महिला पोलीस ठरल्या आहेत. झिना यांनी हा गणवेश तयार करण्यात मोठी भूमिका पार पाडली. यात धर्म व संस्कृती दोन्हींचा समावेश आहे.

भारताचा ‘परम सिद्धी’ जगातला 63 व्या क्रमांकाचा सर्वात शक्तिशाली महासंगणक.


🌹भारताच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कंप्यूटिंग" (C-DAC) येथे नॅशनल सुपरकंप्यूटिंग मिशन (NSM) अंतर्गत प्रस्थापित केलेल्या उच्च कामगिरी संगणन-कृत्रीम बुद्धिमत्ता (HPC-AI) महासंगणक “परम सिद्धि” याने जगातल्या अव्वल 500 सर्वात शक्तिशाली एकसंध संगणक प्रणालींच्या जागतिक क्रमवारीत 63 वा क्रमांक पटकावला आहे.


🧩ठळक बाबी....


🌹परम सिद्धी महासंगणक NVIDA डीजीएक्स सुपर पीओडी संदर्भ आर्किटेक्चर नेटवर्किंग व सी-डॅकच्या स्वदेशी विकसित HPC-AI इंजिन, सॉफ्टवेअर फ्रेमवर्क आणि क्लाऊड प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. 


🌹ही प्रणाली सखोल शिक्षण, व्हिज्युअल संगणन, आभासी वास्तविकता, प्रवेगक संगणन तसेच ग्राफिक्स व्हर्च्युअलायझेशन अश्या प्रगत तंत्रामध्ये मदत करीत आहे.कृत्रीम बुद्धिमत्ता यंत्रणा प्रगत साहित्य, संगणकीय रसायनशास्त्र आणि खगोलशास्त्र यासारख्या क्षेत्रात विनियोगाच्या विकासाला बळकटी प्रदान करते.


🌹तयाद्वारे औषधाची रचना व प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रणालीसाठी एका व्यासपिठाच्या अंतर्गत अनेक पद्धती विकसित केल्या जात आहेत तसेच मुंबई, दिल्ली, चेन्नई, पटना आणि गुवाहाटी सारख्या पूरग्रस्त मेट्रो शहरांसाठी पूर पूर्वानुमान पद्धती विकसित करण्यात येत आहेत. जलद सिमुलेशन, मेडिकल इमेजिंग, जीनोम सीक्वेन्सिंग आणि पूर्वानुमान या पद्धतींच्या माध्यमातून कोविड-19 विरूद्धच्या लढाईत संशोधन व विकासाला त्यामुळे गती प्राप्त झाली.

12 वी BRICS शिखर परिषद.


⛔️17 नोव्हेंबर 2020 रोजी 12 वी ‘BRICS शिखर परिषद’ आभासी माध्यमातून पार पाडण्यात आली. “वैश्विक स्थिरता, सामायिक सुरक्षा आणि अभिनव वाढीसाठी BRICS भागीदारी” या विषयाखाली BRICS नेत्यांनी यावर्षी चर्चा केली.


⛔️यावर्षी परिषदेचे अध्यक्षपद रशियाकडे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले.


💮BRICS समूहाबद्दल...


⛔️BRICS हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच राष्ट्रांचा समूह आहे. 2006 साली समूहाची स्थापना झाली. 2011 साली BRIC समुहात दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला आणि समूहाला BRICS हे नाव दिले गेले. BRICS देशांमधले द्विपक्षीय संबंध प्रामुख्याने हस्तक्षेप-मुक्त, समानता आणि परस्पर लाभाच्या आधारे प्रस्थापित केले जातात.


⛔️रशियाच्या येकतेरिनबर्ग शहरात दिनांक 16 जून 2009 रोजी BRIC समूहाची पहिली औपचारिक परिषद आयोजित करण्यात आली होती. 2009 सालापासून BRICS राष्ट्रे औपचारिक परिषदेत दरवर्षी भेट घेतात.

जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा “रेसिप्रोकल अॅक्सेस अॅग्रीमेंट”


🔰दक्षिण चीन समुद्र आणि प्रशांत महासागर प्रदेशातले चीनचे वाढते प्रभुत्व कमी करण्याच्या हेतूने 17 नोव्हेंबर 2020 रोजी जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या दरम्यान “रेसिप्रोकल अॅक्सेस अॅग्रीमेंट” नामक एक करार झाला.


🔰करारामुळे जपानी आणि ऑस्ट्रेलियाच्या सैन्य दलांना परस्परांच्या देशांची भेट घेण्यास तसेच प्रशिक्षण व संयुक्त मोहिमा आयोजित करण्याची परवानगी मिळते.


🔴दक्षिण चीन समुद्र...


🔰दक्षिण चीन समुद्र हा प्रशांत महासागराचा एक भाग आहे. चीन, तैवान, मलेशिया, ब्रुनेई, इंडोनेशिया, सिंगापूर व व्हियेतनाम हे दक्षिण चीन समुद्राच्या भोवतालचे देश आहेत. नैसर्गिक वायू आणि तेल यांचे समृध्द साठे या समुद्राखाली असल्याने चीन देश या जवळजवळ संपूर्ण समुद्रावर आपला दावा करीत आहे.


🔴परशांत महासागर...


🔰परशांत महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे. प्रशांत महासागराच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, दक्षिणेला दक्षिणी महासागर, पश्चिमेला आशिया व ऑस्ट्रेलिया तर पूर्वेला अमेरिका खंड आहेत. प्रशांत महासागराने पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 32 टक्के भाग व्यापला आहे व जगातले एकूण पाण्याच्या 46 टक्के पाणी प्रशांत महासागरामध्ये आहे.

ज्ञानेंद्रिये (Sensory Organs)



◆ प्राण्यांमध्ये पाच प्रकारची ज्ञानेंद्रिये असतात- डोळे, नाक, कान, त्वचा व जीभ.


■ डोळे (Eyes):

◆ ८० टक्के जगाचे ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे होते.

◆ पापणीची सतत उघडझाप चालू असते. त्याद्वारे अश्रू डोळ्यावर समप्रमाणात पसरविले जाऊन डोळा ओलसर राहतो.

◆ अश्रू हे सोडियम क्लोराईड व सोडियम बाय कार्बोनेटचे मिश्रण असते. त्यामध्ये लायसोझाइम (Lysozyme) नावाचे विकर असते. जे ऍन्टीसेप्टीक म्हणून काम करते.

========================

■ बुबुळ (Cornea):-

◆ नेत्रदानामध्ये डोळ्याचा हा भाग काढला जातो. मृत्यूनंतर तो चार तासाच्या आत काढणे गरजेचे असते.

◆ बुबुळ रोपणास Keratoplasty असे म्हणतात. मानवी अवयवाचे पहिले यशस्वी रोपण (Transplantation) बुबुळाचे करण्यात आले होते. ते एक्वर्ड कौराड झिर्म (Edward Kourad Zirm) या शास्त्रज्ञाने 7 डिसेंबर 1905 रोजी केले होते.

========================

■ दृष्टिपटल (Retina):

◆ हा डोळ्याचा पडदा असून वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होते. वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर उलटी (inverted & Reversed) पडत असते. मात्र, मेंदूमार्फत तिचे आकलन सुलट केले जाते.

========================

■ दृष्टीसातत्य :

◆ वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर १/१६ सेकंदासाठी राहत असते. त्याच्या आतच त्याच वस्तूची प्रतिमा पुन्हा पडल्यास त्या दोन प्रतिमांमधील फरक जाणवून येत नाही. याला दृष्टिसातत्य असे म्हणतात. त्यामुळेच सिनेमाच्या पडद्यावर हलणारी चित्रे पाहणे शक्य होते.

========================

■ दृष्टिदोष (Defects Of Vision):

◆ दृष्टिदोष हे प्रामुख्याने नेत्रभिंगातील संरचनात्मक दोषामुळे निर्माण होत असतात.

१) निकटदृष्टिता / हृस्वदृष्टी (Myopia/ Near-sightedness):

◆ जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. तर लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.

◆ डोळ्याचा आकार मोठा, लांबट व चपटा होतो, त्यामुळे वस्तूची प्रतिमा पडद्याच्या अलीकडेच पडते.

◆ प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्याच्या अलीकडेच काही अंतरावर होते. अर्थात, प्रकाशकिरण ज्यावेळी पडद्यावर पोहोचतात त्यावेळी ते विकेंद्रित झालेले असतात.

उपाय: अंतर्गोल भिंगाचा चष्मा

========================

२) दूरदृष्टिता/ दीर्घदृष्टी (Hypermetropia/Longsightedness):

◆ दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, तर जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.

◆ डोळ्याचा आकार मोठा व उभट होतो. त्यामुळे प्रतिमा पडद्याच्या मागे पडते.

उपाय: बहिर्गोल भिंगाचा चष्मा.

========================

३) विष्मदृष्टी / अबिंदूकता (Astigmatism):

◆ बुबुळाच्या किंवा भिंगाच्या किंवा दोघांच्या वक्रतेमध्ये कमी -जास्तपणा निर्माण झाल्यास हा दोष निर्माण होतो.

◆ त्यामुळे वस्तूपासून येणाऱ्या प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्यावर एकाच ठिकाणी न होता दोन किंवा अधिक ठिकाणी होते. त्यामुळे वस्तू अस्पष्ट दिसतात.

◆ हा दोष ह्रस्व व दीर्घदृष्टी या दोन्हींमध्ये आढळू शकतो. 

उपाय: दंडगोलाकार भिंगाचा चष्मा.

========================

४) वृध्ददृष्टिता/ चाळीसी (Presbyopia):

◆ वाढत्या वयामुळे होणार दोष दूरदृष्टीतेचा एक प्रकार समायोजी स्नायू दुर्बल बनल्याने भिंगाच्या समायोजन शक्तीमध्ये हळूहळू होणाऱ्या कमतरतेमुळे निर्माण होतो, त्यामुळे जवळच्या वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत.

उपाय: वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे.


वाचा :- काही महत्त्वपुर्ण व्यक्ती व त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट



🔰 दगल : गीता - बबिता फोगाट 

🔰 अझहर : मोहम्मद अझरुद्दीन 

🔰 नीरजा : नीरजा भनोत 

🔰 सरबजीत : सरबजीत सिंह 

🔰 अलिगढ : डॉ श्रीनिवास सिरस 

🔰 मरी कॉम : मेरी कॉम 

🔰 मांझी : दशरथ मांझी 

🔰 भाग मिल्खा भाग : मिल्खा सिंह

🔰 बांदीत क्वीन : फुलन देवी

🔰 हरीशचंद्राची फॅक्टरी : दादासाहेब फाळके

🔰 मटो : सादत हसन मंटो

🔰 शाबाश मिठू : मिताली राज

🔰 शरशाह : कैप्टन विक्रम बत्रा

🔰 "८३ : कपिल देव

🔰 झलकी : कैलाश सत्यार्थी

🔰 सरमा : संदिप सिंह

🔰 मदान : सय्यद अब्दुल रहमान

🔰 थलाईवी : जे जयललिता

🔰 गल मकई : मलाला युसुफजाई

राष्ट्रीय विद्यार्थी सेनेचा 72 वा वर्धापनदिन साजरा



🔰 जगातली सर्वात मोठी गणवेषधारी युवा संघटना असणारी राष्ट्रीय विद्यार्थी सेना (NCC) यांनी दिनांक 22 नोव्हेंबर 2020 रोजी 72 वा वर्धापनदिन साजरा केला.


📌 ठळक बाबी 


🔰 वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय युध्द स्मारकावर जाऊन आदरांजली वाहून करण्यात आली. राष्ट्रीय विद्यार्थी सेनेचे उपव्यवस्थापक लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा यांनी सर्व विद्यार्थीसैनिक बांधवांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले.


🔰 NCC वर्धापनदिन भारतभर विद्यार्थीसैनिक रक्तदान शिबिरे आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा केला.


🔰 यावर्षी विद्यार्थीसैनिक आणि त्यांच्या सहकारी NCC अधिकाऱ्यांनी 'एक भारत श्रेष्ठ भारत', 'आत्मनिर्भर भारत', 'फिट इंडिया', 'स्वच्छता अभियान', 'प्रदूषण महापंधरवडा', अशा मोहिमांचे नेतृत्व केले तसेच विविध सरकारी उपक्रम उदाहरणार्थ, 'डिजिटल साक्षरता', 'आंतरराष्ट्रीय योगदिन', वृक्षारोपण आणि 'लसीकरण मोहीम' यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

देशाच्या सीमावर्ती आणि किनारपट्टीच्या भागात NCC या योजनेचा विस्तार करण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 15 ऑगस्‍ट 2020 रोजी जाहीर केली. त्यामुळे तेथील युवा वर्गाला सशस्त्र सैन्य दलात सामील होण्यासाठी प्रेरणा मिळण्यास मदत होणार.


📌 राष्ट्रीय विद्यार्थी सेना (NCC) विषयी 


🔰 राष्ट्रीय विद्यार्थी सेना (National Cadet Corps -NCC) ही देशातल्या तरुणांना शिस्तबद्ध व राष्ट्रीय नागरिकत्व क्षेत्रात प्रोत्साहन देणारी भुदल, नौदल आणि हवाई दल यांची एक तिहेरी सेवा संघटना आहे. NCC ची 1948 साली स्थापना झाली व त्याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे. दरवर्षी NCC कडून मुली तसेच मुलांसाठी पर्वतारोहण आणि इतर छोट्या स्वरूपाच्या मोहिमा आयोजित केल्या जातात.

पृथ्वीच्या भूकवचात आढळणाऱ्या मूलद्रव्यांचा त्यांच्या प्रमाणानुसार योग्य उतरता क्रम


१)ऑक्सिजन -46 टक्के

२)सिलिकॉन -28%

३)ॲल्युमिनियम- ८ टक्के

४)लोह - ५ टक्के

५)मॅग्नेशियम- ४ टक्के

६)कॅल्शियम -२.४ टक्के

७)पोटॅशियम - २.३ टक्के

८)सोडियम-१ टक्के


 ●लक्षात ठेवण्यासाठी trick - OSAI (ओ साई) MCPS

Online Test Series

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...