Friday, 20 November 2020

Online Test Series

अपंग व्यक्ति अधिकार कायदा - २०१६


🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻

*# कलम ३ (१)*
दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल.

*# कलम ४ (१)*
दिव्यांग स्त्रिया व मुले त्यांचे हक्क इतरांप्रमाणेच उपभोगतील हे सुनिश्चित करण्यासाठी शासन व स्थानिक प्राधिकरणे उपाययोजना करतील.

*# कलम ५ (१)*
दिव्यांग असलेल्या व्यक्तींना समाजामध्ये राहण्याचा अधिकार असेल. *(२)* कोणत्याही विशिष्ट निवासी व्यवस्थेत राहणे दिव्यांगांना बंधनकारक करता येणार नाही. वय, लिंग विचारात घेऊन राहण्याकरता अावश्यक असणारी वैयक्तिक मदत समाविष्ट आहे. यामध्ये प्रवेश दिला जाईल.

*# कलम ६ (१)*
सुयोग्य शासन अपंगत्व असलेल्या व्यक्तिंना अत्याचार, क्रूर, अमानुष किंवा अपमानास्पद वागणुकीपासुन संरक्षण देण्यासाठी योग्य उपाय योजना करील.

*# कलम ७ (४)*
कोणताही पोलीस अधिकारी ज्याकडे अपंग व्यक्तीशी गैरवर्तन, हिंसा, किंवा शोषण केले गेल्याची माहिती कळते त्याने पिडीत व्यक्तीस योग्य कायदेशीर मदत करावी. ज्यात मोफत कायदेशीर मदत मिळविण्याचा अधिकार असेल.

*# कलम ८*
अपंग असलेल्यांना धोका,  सशस्त्र संघर्ष, मानवहितवादी आणीबाणी, नैसर्गिक आपत्ती परिस्थितीत समान सुरक्षितता व संरक्षण मिळेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्ह्यातील अपंग व्यक्तींच्या तपशिलाची नोंद ठेवेल.

*# कलम ९*
अपंगत्वाच्या कारणांमुळे अपंग व्यक्तीस पालकांपासून वेगळे करता येणार नाही. पाल्याच्या सर्वोत्तम हिताच्या दृष्टीने अावश्यक असल्यामुळे सक्षम न्यायालयाच्या आदेशानुसार असेल तर असे प्रकरण वगळून.

*# कलम १०*
अपंग व्यक्तिस पुनरुत्पादन करण्याचा अधिकार तसेच कुटूंब नियोजन माहिती मिळवण्याचा तसेच संमती शिवाय वैद्यकीय प्रक्रियेला सामोरे न जाण्याचा अधिकार असेल.

*# कलम ११*
अपंग व्यक्तीस निवडणूक आयोग मतदानामध्ये सुगम्यता / सुलभता प्रदान करेल.

*# कलम १२*
अपंग व्यक्तीस भेदभावाशिवाय न्यायालयीन किंवा इतर कोणत्याही पंचायतीमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार राहिल. उच्च आधाराची गरज असल्यास शासन योग्य त्या आधाराच्या योजना व्यवस्थित राबविण्यासाठी पावले उचलेल इत्यादी.

*# कलम १३*
अपंग व्यक्तीस इतरांप्रमाणे चल, अचल मालमत्तेवर मालकी किंवा वारसाने प्राप्त करण्याचे, आर्थिक मुद्द्यांना नियंत्रित करण्याचे, बँकेचे कर्ज घेण्याचे हक्क असतील. अपंग व्यक्तीला सहाय्य देणारी कोणतीही व्यक्ती अवास्तव प्रभावाचा वापर करणार नाही. स्वायत्तता, सन्मान व खाजगीपणाचा आदर करेल.

*# कलम १४*
अपंग व्यक्तिस पालकत्वासंबंधी अधिकार आहेत.

*# कलम १६*
अपंग व्यक्तीस शिक्षणात सोयी सुविधा मिळविण्याचे हक्क आहेत.

*# कलम १७*
अपंग व्यक्तीस मोफत शिक्षण, शिष्यवृत्ती, शिक्षण संस्था इत्यादी विषयी तरतुदी आहेत.

*# कलम १९*
अपंग व्यक्तिच्या व्यावसायिक शिक्षण व स्वयंरोजगार विषयी तरतुदी आहेत.

*# कलम २०*
कोणतीही शासकीय आस्थापना अपंग कर्मचारी व्यक्तीशी भेदभाव करणार नाही. वाजवी सोयी आणि योग्य असे अडथळामुक्त व अनुकूल वातावरण निर्माण व उपलब्ध करून देईल. अपंगत्वाच्या आधारे बढती / पदोन्नती नाकारली जाणार नाही. सेवेच्या दरम्यान अपंगत्व आलेल्या व्यक्तीला बडतर्फ करणार नाही. सांभाळत असलेल्या पदासाठी कर्मचारी योग्य ठरत नसेल तर त्याला दुसर्‍या पदावर स्थानांतरीत केले जाऊ शकते. तसेच जर दुसर्‍या पदावर समाऊन घेणे शक्य नसेल तर त्याला दुसरे योग्य पद मिळेपर्यंत किंवा तो सेवानिवृत्तीच्या वयाला पोचत नाही तोवर त्याला एका सुपर न्युमरी / मानद पदावर ठेवले जाऊ शकते. सुयोग्य प्रशासन अपंग कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आणि स्थानांतराबद्दल धोरण आखेल.

*# कलम २२*
प्रत्येक आस्थापना अपंग कर्मचारी व्यक्तींच्या अभिलेखांची नोंद ठेवेल. प्रत्येक रोजगार केंद्र सुद्धा रोजगार शोधणार्‍या  अपंग व्यक्तीच्या नोंदी ठेवतील.

*# कलम २३*
प्रत्येक शासकीय आस्थापना तक्रार निवारण अधिकार्‍यांची नेमणूक करेल. कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंदवल्यास दोन आठवड्याच्या आत चौकशी केली जाईल. पिडीत व्यक्ती केलेल्या कारवाईने समाधानी नसल्यास जिल्हास्तरीय अपंग समितीला संपर्क करु शकतो.

*# कलम २५*
अपंग व्यक्तीस प्राधान्यक्रमाने आरोग्य सेवा मिळविण्याचा अधिकार आहे.

*# कलम २९*
अपंग व्यक्तीस सांस्कृतिक जीवन आणि इतरांसह मनोरंजक उपक्रमात सहभागी होण्याचा हक्क आहे. अपंग कलाकार आणि लेखकांना त्याची आवड आणि गुणांचा पाठपुरावा करण्यासाठी सुविधा, सहाय्य आणि प्रायोजकत्व इत्यादी अधिकार.

*# कलम ३०*
अपंग व्यक्तीस क्रिडा विषयक सुविधा मिळविण्याचा हक्क आहे.

*# कलम ३४*
अपंग व्यक्तींना किमान ४% शासकीय आस्थापनेत आरक्षण असेल.

*# कलम ३५*
अपंग व्यक्तींना खाजगी क्षेत्रात किमान ५% आरक्षण असेल.

*# कलम ३७*
अपंग व्यक्तीस शेतजमीन आणि घर वाटपात ५% आरक्षण आणि अपंग महिलांना योग्य प्राधान्य.

*# कलम ३८*
लक्षणीय अपंगत्व असलेल्या व्यक्तिस उच्च सहाय्य.

*# कलम ४१*
अपंग व्यक्तीस सुगम्य वाहतुक सुविधा - बस थांबे, रेल्वे स्टेशन, विमान तळ इत्यादीवरील जागा, तिकिट काऊंटर, शौचालय इत्यादी अपंग व्यक्तीशी सुसंगत असावे.

*# कलम ७४* नुसार मुख्य आयुक्त तर *# कलम ७९* नुसार राज्य आयुक्त अपंगांना न्याय देण्यासाठी असतील.

*# कलम ८४* नुसार विषेश न्यायालय तर *# कलम ८५* नुसार विषेश सरकारी वकील अपंगांसाठी असतील.

*# कलम ८८*
शासन अपंग व्यक्तींसाठी राज्य निधीची तरतूद करेल.

*# कलम ८९*
नियमाचे उल्लंघन केल्यास ₹ १०,०००/- ते ₹ ५,००,०००/- पर्यंत दंडाची तरतुद.

*# कलम ९२*
जो कुणी अपंग व्यक्तीचा सार्वजनिक ठिकाणी अपमान करतो, धमकी देतो, मारहाण करतो, शक्ती वापरतो, अप्रतिष्ठा करतो, अपंग महिलेचा विनयभंग करतो, अपंग व्यक्तीवर ताबा व नियंत्रण मिळवतो, अन्न किंवा द्रव्य नाकारतो, लैंगिक शोषण करतो, कोणत्याही अंगाला किंवा ज्ञानेंद्रियाला स्वेच्छेने जखमी करतो, सहायक साधनांना क्षती पोहोचवतो किंवा तसा प्रयत्न किंवा हस्तक्षेप करतो, अपंगत्व असलेल्या महिलेवर तिच्या संमतीशिवाय वैद्यकीय प्रक्रिया निर्देशित करणे किंवा चालवणे, ज्यामध्ये गर्भाचा गर्भपात होतो किंवा होण्याची शक्यता असते (मात्र वैद्यकीय तज्ञांच्या व पालकाच्या व अपंग स्त्रीच्या संमतीने वैद्यकीय प्रक्रिया केली जाऊ शकते.) यासाठी ६ महिने ते ५ वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा तसेच दंडही होऊ शकतो.

*# कलम ९३*
जो कुणी अपंग हिताची माहिती, दस्तावेज, लेखा किंवा अन्य कागदपत्रे सादर करण्यास अपयशी ठरतो जे त्याचे कर्तव्य आहे. यातील प्रत्येक गुन्ह्याबाबतीत जास्तीत जास्त ₹ २५,०००/- पर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते आणि सातत्याने अपयश आल्यास किंवा नकार दिल्यास दंडाची शिक्षा दिलेल्या मुळ आदेशाच्या तारखेनंतर पुढील प्रत्येक दिवसासाठी ₹ १०००/- असेल.

*# कलम ९६*
या कायद्यातील तरतुदी इतर कोणत्याही कायद्याच्या तरतुदींच्या अतिरिक्त असतील, ना की त्यांचे महत्व कमी करणार्‍या.

कर्कवृत्त


❇️भारतातील 8 राज्यातून जाते


❇️खालील शहराजवळून जाते


🔳गांधीनगर:-गुजरात


🔳बनसवारा:-राजस्थान


🔳विदिशा:-मध्य प्रदेश


🔳अबिकापूर:-छत्तीसगड


🔳रांची:-झारखंड


🔳कष्णनगर:-पश्चिम बंगाल


🔳उदयपूर:-त्रिपुरा


🔳शियालसुक:-मिझोराम

महाराष्ट्रातील सात आश्चर्ये


जगात जशी सात आश्चर्ये आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रात राज्यातील काही अद्भुत आणि सुंदर स्थळांना जून २०१३ रोजी आश्चर्यांचा दर्जा दिला आहे. जगभरातून साधारणपणे २२ लाख मतांच्या आधारे ही सात आश्चर्ये निवडण्यात आलेली आहेत. चला तर बघूया कोणती आहेत ती आश्चर्ये :


१) *विश्व विपश्यना पॅगोडा(स्तूप)* :


हा पॅगोडा जगातील सर्वात मोठा खांब-विरहित पॅगोडा आहे, जो मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला आहे. गौतम बुद्धांच्या स्मृतींची जपणूक करण्यासाठी हा पॅगोडा बांधण्यात आलेला आहे. या पॅगोडाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पती यांच्या हस्ते ८ फेब्रुवारी २००९ साली करण्यात आले. हा पॅगोडा शांती आणि ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. दररोज येथे दीड ते दोन हजार पर्यटक भेट देत असतात. स्तूपाच्या कळसाची उंची २९ मी. असून भूकंपरोधक आहे. एकावेळी ८ ते १० हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था केली आहे.


२) *छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)* :


हे रेल्वे स्थानक व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त १८८७ मध्ये बांधले गेले आहे. मुंबई शहरातील ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक व मध्य रेल्वेचे मुख्यालय अशी याची ओळख आहे. सर्वात व्यस्त व गजबजलेले स्थानक अशीही याची ख्याती आहे. या स्थानकावर एकूण १८ फलाट आहेत. २००८ साली अतिरेक्यांनी याच स्थानकावर अतिरेकी हल्ला केला होता.


३) *अजिंठा लेणी* :


इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन चौथे शतक या काळात या बौद्धलेण्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण २९ लेणी आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या वाघुर नदीच्या परिसरात ही लेणी अस्तित्वात आहेत. ही लेणी नदीपात्रापासून ४० ते १०० फुट उंचीवर डोंगररांगांमध्ये कोरलेली आहेत. या लेण्यांत गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्र तसेच बौद्ध तत्वज्ञान चित्रशिल्प रुपात तयार केले आहे. 


४) *कास पठार* :


या पठारावर पावसाळ्यात असंख्य रानफुले फुलतात. या फुलांमध्ये अनेक दुर्मिळ प्रकारची फुले आढळून येतात. हे पठार विविध प्रकारची फुले आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराचे क्षेत्रफळ १० चौ.कि.मी. असून पठारावर २८० फुलांच्या जाती व वनस्पती, वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. रंगीबेरंगी फुले व फुलपाखरे पाहण्यासाठी पर्यटकांची येथे तुडुंब गर्दी असते.


५) *रायगड किल्ला* :


स्वराज्याची राजधानी असलेला किल्ला म्हणजे रायगड होय. या डोंगरी किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ८२० मीटर आहे. या किल्ल्याला अजून १५ नावानी संबोधले जाते. गडाला १४३५ पायऱ्या आहेत. अवघड व दुर्गम भागातील भागातील हा गड एक पर्यटनस्थळ म्हणून नावाजलेला आहे. गडावर एकूण २५ हून अधिक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.


६) *लोणार सरोवर* :


एका उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून हे सरोवर पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. या सरोवराचे  पाणी अल्कधर्मी आहे. सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार सरोवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या परिसारत बाराशे वर्षांपूर्वीची १५ मंदिरे अस्तित्वात आहेत. या सरोवराचे क्षेत्रफळ १.१३ चौ.कि.मी. इतके असून सरासरी खोली १३७ मीटर आहे. अमेरिकेतील अनेक संस्थांनी येथे येऊन संशोधन केलेले आहे.


७) *दौलताबादचा किल्ला* :


हा गड यादवकालीन ऐतिहासिक किल्ला आहे. देवगिरी किल्ल्याला २८ नोव्हेंबर १९५१ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मेंढातोफ होय. या तोफेत एकाच माऱ्यात पूर्ण गड उध्वस्त करण्याची क्षमता होती. ती तोफ पंचधातूंपासून बनवलेली आहे. प्राचीन काळातील गड म्हणून हा गड प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावाजला गेला आहे. या गडावर लोक भरपूर प्रमाणात भेट देतात.

नागरिकत्व: काय आहे नेहरू-लियाकत करार?


- मंजूर होण्यापूर्वी नेहरू-लियाकत कराराचा अनेक नेत्यांनी दाखलाGदिला. भारत आणि पाकिस्तान या दोन देशाच्या प्रमुखांमध्ये सहा दिवस चाललेल्या चर्चेनंतर ८ एप्रिल १९५० रोजी दिल्ली करार झाला, ज्याला दिल्ली पॅक्ट असंही बोललं जातं. 


- नेहरू-लियाकत नावाने प्रसिद्ध असलेला हा करार उभय देशांमधील अल्पसंख्यांकांचे अधिकार सुनिश्चित करण्यासाठी टाकलेलं पाऊल होतं. याशिवाय दोन्ही देशातील युद्ध टाळणं हाही या कराराचा महत्त्वाचा उद्देश होता.


-१९४७ च्या फाळणीनंतरचा रक्तरंजित इतिहास सर्वांना परिचित आहे. दोन्हीही बाजूंना दंगली उसळल्या, ज्यात लाखो लोकांचा मृत्यू झाला, हजारो महिलांवर बलात्कार करण्यात आला, अल्पवयीन मुलींचं अपहरण झालं आणि त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आलं. या संघर्षामुळे दोन्ही देशातील अल्पसंख्यांक असुरक्षित होते. 


-  डिसेंबर १९४९ मध्ये भारत-पाकिस्तानमधील व्यापारिक संबंधही बंद झाले. जीव वाचवण्यासाठी अल्पसंख्यांक घर-दार सर्व काही सोडून निघून गेले. लाखोंच्या संख्येने हिंदू-मुस्लिमांचं स्थलांतर झालं. 


- स्वतःचा देश सोडून जे लोक कुठेही गेले नाही, त्यांना संशयास्पद नजरेने पाहिलं जाऊ लागलं.

ब्रिटिश काळातील शिक्षण विषयक समिती आणि आयोग



1.जेम्स थॉमसन शिक्षण व्यवस्था-1843-53


2.मेकॉले समिती-1853


3.वुडचा खलिता-1854


4.हंटर समिती-1882-83


5.थॉमस रॅले-1904 यांच्या शिफारशीने  भारतीय विद्यापीठ कायदा 1904


6.सॅडलर समिती-1917-18


7.हारटोग समिती-1929


8.वर्धा योजना/मौलिक व आधारभूत शिक्षण-1937


9.सार्जंट योजना-1944


10.राधाकृष्ण आयोग-1948


Trick :


 शिक्षणासाठी=( थॉमसन,मेकॉले,वुडला )-हंटर ने मारल्याने ते रडले(रॅले),सॅड झाले,हर्ट झाल्याने -वर्ध्यास अर्जंट(सार्जंट) राधाकृष्ण यांच्याकडे गेले.

मराठी म्हणी


1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे

2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही

3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे

4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच

5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे

6. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा

7. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते

8. नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो

9. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे

10. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही

11. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा

12. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे

13. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे

14. दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर

15. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही

16. एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो

17. पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे

18. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो

19. रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी

22. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते

21. शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ

22. नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती

23. नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे

24. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण

25. कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे

26. आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे

27. काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे

28. झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत

29. पायीची वहाण पायी बरी – योग्यतेप्रमाणे वागवावे

30. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये

31. उंटावरून शेळ्या हाकणे – आळस, हलगर्जीपणा करणे

32. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही

33. कोल्हा काकडीला राजी – लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात

34. गाढवाला गुळाची चव काय – अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते

35. घोडामैदानजवळ असणे – परीक्षा लवकरच होणे

36. डोंगर पोखरून उंदीर कढणे – जास्त श्रम करून कमी फायदा होणे

37. भरंवशाच्या म्हशीला टोणगा – पूर्ण निराशा करणे

38. वरातीमागून घोडे – एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे

39. पाण्यात राहून माशाशी वॆर – बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे ?

40. खायला काळ भुईला भार – ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो

41. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले – दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे

42. नाव मोठे लक्षण खोटे – कीर्ती मोठी पण कृती छोटी

43. हपापाचा माल गपापा – लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते

44. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे

45. गर्जेल तो पडेल काय? – पोकळ बडबडणारा काही करून दखवत नाही

46. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही – कष्टाशिवाय यश मिळत नाही

47. वारा पाहून पाठ फिरवावी – वातावरण पाहून वागावे

48. कुंपणानेच शेत खाणे – रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे

49. दगडावरची रेघ- कायमची गोष्ट

कोकण खाडी


कोकणातल्या सह्याद्रीच्या पर्वतांमध्ये उगम पावण्या पश्चिमे सखल जीवनयात्रा अरबी समुद्रास रहेका। संपूर्ण पाणी पाणी नदीच्या उतारात भागास “खादी” असे म्हणतात. कोकणचा किनारा अनेक खडके बनलेला आहे.


..


१) डहानुची खाडी, जि. राहतात


२) दातीवाडी खादी, जि. राहतात


३) वसईची खाडी, जि. राहतात


४) धरमतरची खाडी, जि. मत दिले


५) रोह खादी, जि. मत दिले


६) राजपुरी खाडी, जि. रत्नागिरी


७) बाणकोट्टीची खाडी, जि. रत्नागिरी


८) दाझलची खाडी, जि. रत्नागिरी


९) जय, जि. रत्नागिरी


१०) विजयदुर्ग, जि. सिंधुदूर्ग


११) तेरेखोलची खाडी, सिंधुदूर्ग

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...