Wednesday, 18 November 2020

प्रश्नसंच


1. कोणत्या राज्याला 28 ऑगस्ट 2018 पासून आणखी सहा महिन्यासाठी "अशांत शेत्र" म्हणून घोषित करण्यात आले आहे?

A) बिहार      

B) आसाम 💬      

C) अरुणाचल प्रदेश        

D) सिक्किम


2. मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसींना 27 टक्के आरक्षण देताना कोणत्या सालच्या जनगणनेचा आधार घेण्यात आला होता?

A) 1931💬      

B) 1971          

C) 1951        

D) 1961


3. यावर्षीचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार कोणास देण्यात आला आहे?

A) फ्रान्सिस दिब्रिटो                  

B) रामकृष्ण महाराज लहवितकर    

C) किसन महाराज साखरे💬    

D) रामकृष्ण महाराज बोधले


4. जगात सर्वाधिक इंटरनेट ग्राहकांच्या बाबतीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

A) चीन 💬        

B) ब्राझील          

C) भारत          

D) अमेरिका


5. BIMSTEC या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

A) 1991          

B) 1996        

C) 1997💬      

D) 1998


6. कोणता देश 29व्या " अबू धाबी आंतरराष्ट्रीय पुस्तक " मेळाव्याचा (ADIBF) " सन्माननीय पाहुणा " आहे?

A) बांग्लादेश        

B)  इराण          

C) भारत 💬        

D) पाकिस्तान


7. कोणत्या भारतीयास UN च्या सहाय्यक महासचिव तसेच संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रमाच्या (UNEP) न्यूयॉर्क येथील कार्यालयाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केले गेले आहे?

A) सत्या त्रिपाठी💬        

B) प्रज्ञा झा        

C) शशी थरूर        

D) यापैकी नाही


8. भारतातील किती राज्यांमध्ये सध्या विधानपरिषद अस्तित्वात आहे?

A) पाच          

B) सहा          

C) सात💬        

D) आठ


9. कोणत्या हवाई वाहतूक कंपनीने नुकताच जैवइंधनावर विमान वाहतुकीचा  प्रयोग यशस्वी केला आहे?

A) इंडिगो        

B) स्पाइस जेट 💬    

C) एअर इंडिया        

D) गो एअर


10.  "अटल जी ने कहा" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

A) नरेंद्र मोदी      

B) ब्रिजेंद्रा रेही 💬      

C) व्ही एस नाईक        

D) सत्येन्द्र अगरवाल




11. चर्चेत असलेली नाओमी ओसाका ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या देशाची आहे?

A) जपान 💬    

B) अमेरिका      

C) इंग्लंड      

D) सर्बिया




12. "अभयम-181" या नावाचे मोबाईल अॅप हे महिलांना सुरक्षा देण्याच्या हेतूने कोणत्या राज्य सरकारने लॉंच केले आहे?

A) गुजरात💬      

B) महाराष्ट्र      

C) मध्य प्रदेश    

D) तामिळनाडू




13. कम्युनिशंस कम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी एग्रीमेंट


(COMCASA) हा करार खालील कोणत्या दोन देशात झाला?

A) भारत - फ्रान्स    

B) भारत - जपान      

C) जपान - अमेरिका    

D) भारत - अमेरिका💬




14. रंजन गोगोई हे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश असून ते सर्वोच्च न्यायालयाचे कितवी सरन्यायाधीश आहे?

A) 44      

B) 45      

C) 46💬    

D) 47




15. खालीलपैकी कोणत्या देशाने ' NOPE ' या मंगळ मोहिमेची घोषणा केली आहे?

A) इस्राईल      

B) यूएई 💬      

C) सौदी अरेबिया          

D) इराण




16. नुकताच निवृत्त झालेला क्रिकेटपटू ऍलिस्टर कुक हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

A) दक्षिण आफ्रिका        

B) ऑस्ट्रेलिया      

C) वेस्ट इंडिज      

D) इंग्लंड💬




17. भारतात प्रथमच भरविण्यात आलेल्या 'FIBA 3×3 world tour master' ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

A) बास्केटबॉल 💬      

B) बॉक्सिंग    

C) ब्रिज      

D) बॅटमिंटन




18.  भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये कोणत्या संघाला नमवत ब्राँझ पदक मिळविले?

A) जपान      

B) दक्षिण कोरिया    

C) पाकिस्तान💬    

D) फिलिपिन्स




19. "Moving on, moving forward : A year in office" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

A) व्यंकय्या नायडू 💬    

B) रामनाथ कोविंद    

C) सुमित्रा महाजन    

D) अरुण जेटली




20. नुकतेच निधन झालेले आर्थर परेरा हे कोणत्या खेळाशी संबंधित होते?

A) बुद्धिबळ      

B) बॅटमिंटन      

C) फुटबॉल💬      

D) टेनिस




21. राज्य शासनातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत देण्यात येणारा 2016- 17 चा " तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम " या पुरस्कारात प्रथम क्रमांक कोणत्या ग्रामपंचायतीस मिळाला?

A) शेळगाव गौरी    

B) मन्याचीवाडी      

C) हिवरे बाजार 💬    

D) खाटाव




22. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी कोणास देण्यात आला?

A) विजय भटकर      

B) गिरीश प्रभुणे      

C)सुहास बहुळकर 💬        

D) यापैकी नाही




23. दुसरी "जागतिक हिंदू परिषद" कुठे पार पडली?

A) नवी दिल्ली        

B) लंडन        

C) शिकागो 💬      

D) न्यूयॉर्क






 1. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?

अ) ती प्रौढ मताधिकारावर आधारित न्हवती

ब) ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती.

क) ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या

ड) ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे.


1.अ आणि ब

2. ब आणि क

3. अ आणि ड✅

4  वरील सर्व




2.खालीलपैकी कोणती सेवा अखिल भारतीय सेवा म्हणून गणली जात नाही

1. भारतीय प्रशासकीय सेवा 

2. भारतीय पोलीस सेवा

3. भारतीय विदेश सेवा✅

4. भारतीय वन सेवा




3.घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली?

1. सिमला परिषद

2. कॅबिनेट मशीन✅

3. क्रिप्स योजना

4.यापैकी नाही






4.राज्यपालांची नेमणूक कोण करतात?


1. पंतप्रधान


2. मुख्यमंत्री


3. राष्ट्रपती✅


4. उपराष्ट्रपती




5.खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

1.लोकसभेपेक्षा राज्यसभेला व्यापक अधिकार आहेत

2.राज्यसभेपेक्षा लोकसभेला व्यापक अधिकार आहेत✅

3. राज्यसभेचा कालावधी 6 वर्ष असतो

4. लोकसभा हे स्थायी सभागृह आहे.




6.राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?

1. राष्ट्रपती

2. पंतप्रधान

3 उपराष्ट्रपती✅

4. गृहमंत्री




7.भारतीय घटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यामागील मुख्य संकल्पना म्हणजे ......

1. कल्याणकारी राज्याची निर्मिती✅

2. समाजवादी व निधर्मी समाज रचना

3. व्यक्तीस्वातंत्र्याची हमी

4. मूलभूत हक्कांना बाधा पोहोचविण्यास प्रतिरोध




8.भारतीय राज्यघटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे?

1. भारतीय नियोजन आयोग

2. भारतीय निवडणूक आयोग

3. संघ लोकसेवा आयोग

4. भारतीय वित्त आयोग✅




9.वन हा विषय कोणत्या सुचितील आहे?

1. केंद्र

2. राज्य✅

3. समवर्ती

4. यापैकी सर्व




10.वार्षिक केंद्रीय आर्थिक अंदाजपत्रकाला लोकसभेची मंजुरी न मिळाल्यास ....

1. अंदाजपत्रक दुरुस्त करून फेरसादर केले जाते 

2. राज्यसभेचा अभिप्राय घेण्याकरिता पाठविले जाते 

3. राष्ट्रपतींचे अभिप्रायासाठी पाठविले जाते

4. पंतप्रधान व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.




प्रश्न 1 मातृत्व वंदना योजना महाराष्ट्रात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकचा ठरला आहे?

A  कोल्हापूर 

B  सातारा  

C  पुणे 

D  नाशिक 


उत्तर  2




प्रश्न 2  इम्रान खान हे पाकिस्तान या देशाचे 22 वे पंतप्रधान ठरले आहेत त्यांनी जो पक्ष स्थापन केला होता तेहरिक-ए-इन्साफ याची स्थापना पुढील पैकी केव्हा करण्यात आली होती?

A  14 ऑगस्ट 1993

B  16  जुलै  1996

C  22 एप्रिल 1996

D  16 ऑक्टोबर 1998


उत्तर  C




प्रश्न 3  पुढील विधाने अभ्यासा?

अ  इस्रोने 23 नोवेंबर 2018 रोजी तीस उपग्रह अवकाशात सोडले

ब 30 पैकी पंचवीस उपग्रह हे अमेरिकेचे आहेत

क या मोहिमेत भारतासह एकूण दहा देश सहभागी आहेत

वरीलपैकी कोणती विधान/ने सत्य आहे


1  फक्त अ

2  ब आणि  क

3  फक्त  क

4  अ आणि  ब


उत्तर  4




प्र 4  इसरो ने जे 30 उपग्रह सोडले त्यामध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही?

1  अमेरिका

2   जपान

3   स्पेन

4   नेदरलँड


उत्तर  2




प्र  5 हाइपर सपेक्ट्रल इमेजिंग सॅटॅलाइट हा उपग्रह कोणत्या  कोणत्या देशाने विकसित केला आहे?

1  फ्रांस

2  रशिया

3  भारत

4   चीन


उत्तर  3




प्र  6  इंडियन पोस्टल पेमेंट बँक ची सुरुवात प्रायोगिक तत्वावर खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू करण्यात आली होती?

1   पुणे

2   रांची

3  अलाहाबाद

4   लखनऊ


उत्तर  2




प्र  7   पुढील पैकी कोणती बँक ही ग्राहकांना क्रेडिट कार्ड सेवा पुरवत नाही?

1  बंधन बँक

2  देना बँक

3  महाराष्ट्र ग्रामीण बँक

4  पोस्टल पेमेंट बँक

उत्तर 4




8  वारसा यादीत पुढिलपैकी कोणत्या रेल्वेचा समावेश होत नाही?

1  निलगिरी

2  दार्जिलिंग

3  पठाणकोट

4  कलका


उत्तर  3




प्र  9  नुकतेच भारतीय रेल्वे ने कोणत्या देशाच्या रेल्वे सोबत करारावर हस्ताक्षर केले? 

1  चीन

2  रशिया

3  नेपाळ

4  म्यानमार


उत्तर  3




प्र  10  महाराष्ट्रत पहिला समलिंगी विवाह कोठे पार पडला?

1  नाशिक

2  नागपूर

3 यवतमाळ

4  पुणे


उत्तर 3 


१.संविधानावर अशी एकमेव स्त्री आहे जिने सही केलेली आहे?

१)विजयालक्ष्मी पंडित

२)हंसाबेन मेहता✅✅✅

३)सरोजिनी नायडू

4)वरीलपैकी यात ती स्त्री नाही





२.भारतीय संविधान कोणत्या दिवस स्वीकारले?

१)२६जानेवारी१९५०

२)२६जानेवारी१९४९

३)२६नोव्हेंबर१९४९✅✅✅

५)२६नोव्हेंबर १९५०




३.भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते?

१)डॉ बाबासाहेब आंबेडकर

२)डॉ राजेंद्र प्रसाद✅✅ 

३)पंडित नेहरू

४)वरीलपैकी एकही स्थायी अध्यक्ष नव्हते




४.मार्गदर्शक तत्व .......या देशाकडून घेतले आहे?

१)दक्षिण आफ्रिका

२)अमेरिका

३)आयर्लंड ✅✅✅

४)वरीलपैकी एकही नाही 



५.राज्य घटनेत एकूण २५भाग आहेत,त्यात कितव्या भागामध्ये पंचायत राज ची तरतूद केली आहे? 

१)सहावा

२)नववा✅✅✅

३) पाचवा

४)वरीलपैकी नाही




६.मूलभूत कर्तव्ये कुठल्या कलमा मध्ये आहे?

१)कलम ५१ब

२)कलम५१अ✅✅✅

३)कलम ५१क

४)वरील कलमांचा काहीही संबंध नाही




७.१२४हे कलम खालील पैकी कशाशी निगडित आहे?

१)उच्च न्यायालय

२)सर्वोच्च न्यायालय✅✅✅

३)जिल्हा न्यायालय

४)कुटुंब न्यायालय




८.खालील पैकी संसद बरोबर काय?

१)लोकसभा+राज्यसभा+विधानसभा

२)लोकसभा +विधानसभा+राज्यपाल

३)लोकसभा+राज्यसभा+राष्ट्रपती✅✅✅

४)मुळात अस काही नसतं




९.पक्षांतर केल्यास कुठल्या परिशिष्ट नुसार  सदस्याचे सदस्यत्व रद्द होते?

१)९ 

२)१०✅✅✅

३)११

४)यापैकी नाही



१०.कलम .......नुसार कोणतेही धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागते?

१)१०९✅✅✅

२)१०८

३)१०७

४)१०६




 ११.तिन्ही सेनादलाचे सर सेनापती हे असतात? 

१)सवरक्षण मंत्री 

२)गृहमंत्री

३)पंतप्रधान

४)राष्ट्रपती✅✅✅




१२.संसदेचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढता येत नाही?

१)हे विधान असत्य आहे

२)हे विधान सत्य आहे✅✅✅कलम 123 नुसार  (राष्ट्रपती काढता)

३)वरीलपैकी दोन्ही बरोबर

४)वरीलपैकी दोन्ही चूक




१३.उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना कोण शपथ देतात?

१)राष्ट्रपती

२)उपराष्ट्रपती

३)राज्यपाल✅✅✅

४)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश



१४.भारताचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (CAG)ची नियुक्ती राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करता?

१)१४७

२)१४८✅✅✅(केंद्राचे व राज्याचे जमाखर्च लेखे तपासणे

३)१४९

४)१५१




१५.सुचीमधील विषययाची क्रमानुसार योग्य पर्याय निवडा?

1.केंद्र सूची 

2.राज्य सूची 

3.समवर्ती सूची

१)५२,६१,१००

२)१००,६१,५२✅✅✅

३)६१,५२,१०० 

४)५२,१००,६१




१६.राज्यसभेच्या सभासदांना सभापती निवडण्याचा अधिकार नसतो.

हे विधान चूक की बरोबर

१)चूक 

२)बरोबर✅✅✅कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात

३)काही अंशी चूक 

४)वरील वाक्याचा खालील उत्तराशी तिळमात्र सम्बध  नाही




१७.खालील पैकी कोणाचा उल्लेख 'ग्रह मालिकेतील सूर्य 'असा केला जातो?

१)राज्यपाल 

२)राष्ट्रपती

३)पंतप्रधान✅✅✅

४)उपराष्ट्रपती




१८.भारत हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?

१)धर्मनिरपेक्ष

२) गणराज्य

३)समाजवादी

४)साम्यवादी✅✅✅




१९.भारतीय घटनादुरुस्ती चे अधिकार कोणास आहे?

१)सर्वोच्च न्यायालय

२)राष्ट्रपती

३)भारतीय जनता

४)कायदेमंडळ✅✅✅




२०.मतदानासाठी आवश्यक पात्राता वय २१वरून१८वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?

१)६२

२)६१✅✅✅

३)७१

४)८९

डॉ एे पी जे अब्दुल कलाम



◾️जन्म : 15 ऑक्टोबर 1931 रामेश्वर येथे.


◾️अबुल पाकिर जेनुलब्दिन अब्दुल कलाम


◾️ए.पी.जे अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते.


◾️कार्यकाळ 

25 जुलै  2002 – 25 जुलै 2007


◾️


◾️तयांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले


◾️1963 मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पीएसएलव्ही (सॅटेलाईट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेतला


◾️इदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला


◾️अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले.


◾️सरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टॅंक) रणगाडा व लाइट कॉंबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.


◾️भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्यविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला


◾️कलाम हे राष्ट्रपती भवनवर आलेले प्रथम शास्त्रज्ञ होते


🚀 1985 : त्रिशूल, 

🚀1988 : पृथ्वी, 

🚀1989 : अग्नी, 

🚀1990 : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.


◾️5 अग्नी बाणांमुळे त्यांना मिसाईल मँन म्हणतात


◾️ सप्टेंबर 2015 : बंगालच्या उपसागरात ओरिसाच्या किनाऱ्याजवळ असलेल्या व्हीलर आयलंडचे प्रचलित नाव बदलून ते अब्दुल कलाम बेट असे करण्यात आले.


◾️ए.पी.जे. अब्दुल कलाम 27 जुलै 2015 रोजी कलाम शिलॉंग येथे भारतीय शास्त्र व्यवस्थापन शिलॉंग येथे "पृथ्वी नावाचा एक जिवंत ग्रह तयार करणे" या विषयावर व्याख्यान देण्यासाठी गेले. 


◾️तथेच त्यांचे निधन झाले


◾️अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो.

कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना.



🔰कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना  करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी यासंबंधी आदेश दिला आहे.


🔰मराठा विकास प्राधिकरणासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली असून निधी राखीव ठेवण्यात आला आहे.


🔰तसेच कर्नाटक राज्यात तसंच खासकरुन सीमारेषेवरील परिसरात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजातील नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


🔰तर अधिकृत आदेशानुसार, गेल्या कित्येक दशकांपासून कर्नाटक राज्यात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजाच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


🔰मराठा विकास प्राधिकरणाचं मुख्य लक्ष्य समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक विकासाकडे असणार आहे.

आरसेप व्यापार करारावर 15 प्रमुख देशांच्या स्वाक्षऱ्या .


🅾️‘आरसेप’ म्हणजे प्रादेशिक सर्वंकष इकॉनॉमिक पार्टनरशिप) करारावर आशिया—पॅसिफिकमधील चीनसह पंधरा प्रमुख देशांनी स्वाक्षरी केली आहे.तर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यापार करार मानला जात आहे. 


🅾️‘आसियान’ (‘असोसिएशन ऑफ साउथ इस्ट एशियन नेशन्स’) देशांच्या वार्षिक परिषदेच्यावेळी रविवारी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.


🅾️करोनामुळे बिघडलेली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी या देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून भारत व अमेरिका मात्र त्यापासून दूर राहिले आहेत.


🅾️जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नात या देशांचा वाटा  30 टक्के आहे. 2012 मध्ये आरसेप कराराची संकल्पना मांडली गेली होती. या करारावर आग्नेय आशिया शिखर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले असून त्यामुळे करोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थांना सावरण्याची संधी मिळणार आहे.

राज्यपालांना विधान परिषद नामनिर्देशित सदस्यांची नावे फेटाळण्याचा अधिकार आहे का ?



👉घटनात्मक तरतुद :- कलम 171( 3, 5 ) कलमानुसार राज्यपालास विधान परिषदेत साहित्य, विज्ञान, कला सहकार आणि समाजसेवा या क्षेत्रातील विशेषज्ञान असलेल्या व्यक्तींना नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे.

  अर्थातच या नेमणुका नेहमीच वादग्रस्त ठरतात व यातून सरकार व राज्यपाल असा नवावाद  उद्भवतो. केंद्र आणि राज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाची सरकारे असतील तर हा वाद अधिक तीव्रपणे दिसून येतो.सध्या अशीच परिस्थिती महाराष्ट्रात दिसून येत आहे.


 ♦️ इतर घटनात्मक मुद्दे व पेचप्रसंग.

📌कलम 167 नुसार मुख्यमंत्र्यांकडून राज्याच्या प्रशासकीय व कायदेशीर बाबी संबंधी माहिती मागविणे हा राज्यपालांचा घटनात्मक

स्वेचछाधिन अधिकार आहे. याच कलमांतर्गत नामनिर्देशित सदस्यांच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांकडून माहिती मागण्याचा अधिकार राज्यपालांना मिळतो.परंतु नामनिर्देशित सदस्यांच्या नावांना मंजुरी देणे हा राज्यपालांचा  स्वेचछाधिन अधिकार आहे का/नाही याबाबत स्पष्टपणे तरतुद आढळत नाही.

 👉 आरंभी उच्च न्यायालयांचे सुद्धा याबाबत एकमत नव्हते.


📌163(1) कलमानुसार घटनात्मक 

स्वेचछाधिन अधिकार वगळता राज्यपालांना सहाय्य व सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्री परिषदेची तरतूद आढळते. परंतु हा सल्ला राष्ट्रपती प्रमाणे राज्यपालांवरती बंधनकारक नाही. याआधारे राज्यपाल नावांची यादी फेटाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.(रामनाईक यांनी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव सरकारने दिलेली यादी नामंजूर केली होती) 


 ♦️राज्यपाल काय आक्षेप घेतील ?


📌शिफारस केलेल्या यादीतील काही ठराविक नावे वगळली तर इतर नावांना राजकीय पार्श्वभूमी आहे.


📌अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय:-

 एखाद्या व्यक्तीने राजकारणात तसेच प्रशासनात दीर्घकाळ भाग घेतला असेल तर तिला समाजसेवेचा व्यावहारिक अनुभव आहे असे गृहीत धरता येईल.

(याच व इतर निर्णयांच्या आधारे राज्यपालांचा आक्षेप न्यायालयीन लढाईमध्ये खोडून काढला जाईल )


📌 1974 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की राज्यपालाचे स्वेचछाधिन अधिकार वगळता त्याला आपली कार्य पार पाडताना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच वागावे लागेल. (या आधारे राज्यपालांना शिफारस केलेल्या नामनिर्देशीत सदस्यांची यादी नामंजूर करता येणार नाही).


♦️तात्पर्य :- वरील सर्व चर्चेवरून असे दिसते की घटनात्मकदृष्ट्या सरकारने दिलेली नामनिर्देशित सदस्यांची यादी मंजूर करणे राज्यपालांवर बंधनकारक आहे की नाही हा मुद्धा विवादास्पद आहे परंतु नावांची शिफारस घटनात्मक तरतुदींना अनुसरून नसेल तर राज्यपाल अशी यादी नामंजूर करू शकतात हे मात्र फिक्स.


महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:


1)  कोकण (30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.


2) पुणे प.महाराष्ट्र 

(57268 चौ.किमी) : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.


3) नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): 

नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.


4) औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.


5) अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.


6) नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.


अरुणाचल प्रदेशात सर्वोत्तम स्त्री-पुरुष प्रमाण आहे:



🔰 एक अहवाल

‘व्हाईटल स्टॅटिस्टिक्स ऑफ इंडिया बेस्ड ऑन द सिविल रजिस्ट्रेशन सिस्टम’ अहवालात दिलेल्या आकडेवारीमधून असे दिसून आले आहे की, अरुणाचल प्रदेशात सर्वोत्तम स्त्री-पुरुष प्रमाणाची नोंद झाली आहे.


🔴ठळक बाबी....


🔰अरुणाचल प्रदेशात दर एक हजार पुरुषांमागे 1084 महिला असल्याची नोंद झाली असून त्याच्यापाठोपाठ नागालँड (965), मिझोरम (964), केरळ (963) आणि कर्नाटक (957) असा राज्यांचा क्रम लागतो आहे.


🔰मणीपूर राज्यात अत्यंत वाईट स्त्री-पुरुष प्रमाणाची नोंद झाली आहे. मणीपूरमध्ये दर एक हजार पुरुषांमागे 757 महिला असल्याची नोंद झाली असून त्याच्यावरती लक्षद्वीप (839), दमण व दीव (877), पंजाब (896) आणि गुजरात (896) ही राज्ये आहेत.


🔰राजधानी दिल्लीत स्त्री-पुरुष प्रमाण दर एक हजार पुरुषांमागे 929 एवढे आहे. जम्मू व काश्मीरमध्ये हे प्रमाण 952 एवढे आहे.


🔰2018 साली जन्म नोंदणीचा दर 89.3 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो 2009 साली 81.3 टक्के होता.सरासरी, जन्म किंवा मृत्यूच्या नोंदणीसाठी विहित कालावधी 21 दिवसांचा आहे.

अरबी समुद्रात मलबार नौदल कवायती सुरू.



🛳 भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व जपान यांच्या नौदलांनी मंगळवारी उत्तर अरबी समुद्रात मलबार नौदल कवायती सुरू केल्या.


🛳 यात दोन विमानवाहू जहाजांसह अनेक आघाडीची लढाऊ जहाजे, पाणबुडय़ा आणि सागरी टेहळणी विमाने सहभागी झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


🛳 चार दिवसांच्या या कवायतीचे प्रमुख आकर्षण भारतीय नौदलाच्या विक्रमादित्य कॅरियर बॅटल ग्रुप आणि अमेरिकी नौदलाच्या निमित्झ स्ट्राईक ग्रुप यांचा सहभाग आहे.


🛳 यएसएस निमित्झ हे जगातील सर्वात मोठे लढाऊ जहाज आहे.


🛳 मलबार कवायतींचा पहिला टप्पा ३ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत बंगालच्या उपसागरात पार पडला. त्यात पाणबुडीरोधक आणि हवाई युद्धरोधक मोहिमांसह अनेक गुंतागुंतीच्या कवायती करण्यात आल्या.


🛳 ऑस्ट्रेलियन नौदलाने त्यांच्या एचएमएएस बलार्ट हे अंकाझ श्रेणीचे लढाऊ जहाज तैनात केले असून, जपानी नौदलाने त्यांची आघाडीची विनाशिका जेएस मुरासामे या कवायतींसाठी पाठवली आहे.


🛳 भारत व चीन यांच्यात पूर्व लडाखमध्ये सीमेवर सहा महिन्यांपासून तणाव असतानाच्या काळातच ही मोठी कवायत होत आहे. 


🛳 ‘क्वाड’ आघाडीचे भाग असलेल्या ४ देशांच्या नौदलांमध्ये गुंतागुंतीच्या मोहिमा समन्वयाने पार पाडणे हा त्यांचा उद्देश आहे.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...