Wednesday, 11 November 2020

पदवीधर मतदान म्हणजे काय?


पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020


आपल्याकडे ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत सर्वच निवडणुकांना महत्व आहे. परंतु दुर्दैवाने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे फारसं गांभीर्याने पाहिलं जात नाही. कित्येकांना तर अशी काही निवडणूक असते हेच मुळात माहीत नाही म्हणून हा माहिती देण्याचा प्रपंच… 


आपल्या महाराष्ट्र राज्यात विधानसभा आणि विधानपरिषद अशी दोन कायदेमंडळ गृहे आहेत हे आपण नागरिकशास्त्रात वाचले असेलच. महाराष्ट्रासह भारतातील एकूण सात राज्यात अशी द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राचा समावेश होतो. या सर्व राज्यांमध्ये विधानसभेसोबत विधानपरिषदेचेही कामकाज चालते. विधानसभेच्या सदस्यांना इंग्रजीत MLA म्हणतात तसे विधानपरिषदेच्या सदस्यांना MLC (Member of Legislative Council) असे संबोधले जाते. नुकतीच आपली विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे तिथले सदस्य कसे निवडले जातात हे सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु विधानपरिषदेचे सदस्य कसे निवडले जातात याची थोडी कल्पना असणे गरजेचे आहे. 


महाराष्‍ट्र विधानपरिषदेत एकूण 78 सदस्य कार्यरत असतात. त्यापैकी 31 सदस्य विधानसभेतून, 21 सदस्य स्थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधून, 12 सदस्य राज्‍यपालांच्या नेमणूकीमधून, 7 सदस्‍य शिक्षक मतदार संघातून आणि 7 सदस्‍य 'पदवीधर' मतदार संघातून निवडले जातात. विधानपरिषदेच्या सदस्यांच्या निवडी एकाचवेळी होत नाहीत. विधान परिषद हे कायम सभागृह असते. त्‍यातील सदस्यांचा सहा वर्षाचा कार्यकाळ असतो आणि दर दोन वर्षानी एक तृतीयांश सभासद निवृत्त होत असतात व तितकेच नवीन नेमले जातात. आपल्या महाराष्‍ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. त्यात सात पदवीधर मतदारसंघ मुंबई, पुणे, कोकण, औरंगाबाद, नागपुर, नाशिक आणि अमरावती याप्रमाणे विभागले गेले आहेत. 


आता येणाऱ्या काळात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आहेत. पण मी त्याबद्दल आजच का सांगतोय? कारण या निवडणुकीसाठी मतदार म्हणून नाव नोंदनी वेळ संपली आहे.  

लक्षात घ्या, सामान्य नागरिक म्हणून आपली जशी कर्तव्ये आणि अधिकार असतात तसेच अधिकार पदवीधर म्हणूनही असतात. ग्रॅज्युएट झाल्यावर घटनेने आपल्याला आपला प्रतिनिधी निवडायची संधी दिली असते. हा आपण निवडलेला प्रतिनिधी आपल्या समस्या सभागृहात मांडतो आणि त्याचा पाठपुरावा करतो. जर तो तसे करत नसेल तर त्याला जाब विचारण्याचा अधिकारही आपल्याला आहे. आपण अपेक्षेप्रमाणे कामे झाली नाही तर आमदाराला जाब विचारतोच ना? मग निवडून गेलेला पदवीधर प्रतिनिधी नेमकं काय करतोय हे ही जाणून घ्यायला हवंच की.  


● पदवीधर मतदार नोंदणीकरिता पात्रता:

१. तो भारताचा नागरीक असावा.

२. तो मतदार नोंदणीकरिता अर्हता दिनांकाच्‍या किमान ३ वर्षापूर्वी, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किंवा तत्‍सम विद्‍यापिठाचा पदवीधर असावा.

३. सर्वसाधारणपणे संबंधित मतदारसंघातील रहिवासी असावा

४. त्‍याने विहित कागदपत्रांसह फॉर्म क्र. १८ भरावा.

५. पदविका (Diploma) जर पदवीतूल्‍य असेल तरच पदवीधर गृहित धरण्‍यात येईल.  


● पदवीधर मतदार नोंदणीकरिता आवश्‍यक इतर कागदपत्रे:

१. रहिवासाचा पुरावा. (पासपोर्ट, वाहन अनुज्ञप्‍ती, टेलीफोन/विज बिल किंवा इतर मान्‍यताप्राप्‍त कागदपत्रांची साक्षांकित प्रत.)

२. मार्क लिस्‍टची साक्षांकित प्रत.

३. पदवी/पदविकेची साक्षांकित प्रत.

४. विवाहित महिलेने विवाहानंतर नाव बदलले असल्‍यास त्‍याबाबतचे राजपत्र, पॅन कार्ड, राजपत्र नसल्‍यास प्रतिज्ञापत्र.

५. प्रमाणपत्रांचे साक्षांकन संबंधित जिल्ह्यात कार्यरत तहसीलदार किंवा गट विकास अधिकारी, किंवा शासन मान्‍यता प्राप्‍त विद्‍यालयाचे प्राचार्य किंवा जिल्ह्यातील अन्‍य राजपत्रित अधिकार्‍यांकडून करून घ्‍यावे. 

६. ही कागदपत्रे आपण तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय येथे जमा करू शकता. 


● मतदान पद्धत 

- पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान हे मतपत्रिकेवर होते.

- मतपत्रिकेवर नमुद उमेदवार क्रमांकानुसार, उमेदवारांना पसंती क्रमांक द्यायचा असतो.

- सर्वात पहिली पसंती असणा-या उमेदवारासमोर मराठी, इंग्रजी किंवा रोमन यापैकी एका भाषेतील आकडय़ांमध्ये अंक लिहिता येतो.

- पसंती क्रमांक लिहिताना तो एका भाषेतील आकडय़ांमध्येच लिहावा. उदाहरणार्थ (१, २, ३ असे मराठीत किंवा 1, 2, 3 असे इंग्रजीत पसंतीनुसार आकडे लिहिता येतील). 

- मतपत्रिकेवर पसंती क्रमांक सोडून दुस-या कसल्याही खाणाखुणा करू नयेत. 

- मतपत्रिकेवर पसंती क्रमांक लिहिताना स्वत:चा पेन किंवा पेन्सिल वापरण्यास परवानगी नाही. जांभळ्या रंगाचा स्केच पेन मतदान केंद्रावर मतदारांना दिला जातो, त्याचाच वापर मतदानासाठी करण्‍यात यावा. अन्‍यथा मत बाद ठरेल.  

- "वरीलपैकी कोणी पर्याय नाही" (नोटा) हा पर्याय मतपत्रिकेवर उपलब्ध असतो.

- 'नोटा' किंवा पसंती क्रमाने मत देता येते. यापैकी एकच पर्याय मतदारांनी वापरावा.

मी कधी असे आवाहन करत नाही, पण यावेळी करतो... पोस्ट जास्तीतजास्त शेअर करा... आपले मतदान अमूल्य असते

आपण सुशिक्षित मतदार आहात 

आपले मतदानाने योग्य उमेदवार निवडा

----- ------


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल


🛑 असमपृष्ठरज्जू प्राणी 🛑


🔶प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.


🔶पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा


🔶 सिलेंटराटा - हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन


🔶 प्लॅटीहेल्मिन्थीस - प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म


🔶 नेमॅटहेल्मिन्थीस - अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म


🔶 अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस


🔶 आथ्रोपोडा - खेकडा , झुरळ , कोळी


🔶 मोलुस्का - शंख , शिंपला , गोगलगाय


🔶 इकायानोडर्माटा - तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर


🔶हेमिकॉर्डाटा - बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस

काकोरी कट (Kakori conspiracy)



🔰9 ऑगस्ट 1925🔰


🔰लखनौ ते सहारनपूर दरम्यान काकोरी


🔰सहभाग:- चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, मन्मथनाथ गुप्ता, अशफाक उल्लाखान, राजेंद्रनाथ लाहिडी, रोशनलाल इत्यादी क्रांतिकारक अग्रणी होते. (एकून 10 जणांचा समावेश) 


🔰बरिटिशांच्याविरुद्ध सशस्त्र लढा देण्याच्या हेतूने काकोरी (उत्तर प्रदेश) येथे घडवून आणलेला प्रसिद्ध क्रांतिकारी कट.


🔰सरकारी पोस्ट कार्यालयांमध्ये जमा झालेला पैसा रेल्वे मार्गाने जाणार असल्याची माहिती क्रांतिकारकांना मिळाली


🔰लखनौ ते सहारनपूर मार्गावर लखनौपासून आठ मैल अंतरावर असलेल्या काकोरी या गावाजवळ सशस्त्र क्रांतिकारकांनी रेल्वे थांबवून त्यातील खजिना लुटावा अशी योजना आखली.


🔰 9 ऑगस्ट 1925 रोजी क्रांतिकारक सरकारी खजिना घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यात जाऊन बसले. रेल्वे आडवळणी अशा काकोरी स्थानकाजवळ येताच त्यांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली


🔰रामप्रसाद बिस्मिल यांनी चैन खेचुन रेल्वे थांबवली


🔰कवळ दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही नियोजित लूट यशस्वी केली. या घटनेलाच ‘काकोरी कट’ असे म्हणतात.


🔰या कटात जवळपास 8000 रुपये लुटले


🔰काकोरी खटल्याचे कामकाज एप्रिल १९२७ पर्यंत चालले.


🔰यामधील रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाखान, रोशनलाल व राजेंद्रनाथ लाहिडी यांना फाशी दिली


🔰कारस्थानांमध्ये सहभागी असलेले चंद्रशेखर आझाद ब्रिटिशांना गुंगारा देऊन भूमिगत राहिले.


🔰सशस्त्र क्रांती करण्याच्या उद्देशाने चंद्रशेखर आझाद यांनी ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोशिएशनʼ या जुन्या संस्थेचे ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोशिएशनʼ असे नामकरण करून क्रांतिकार्य चालू ठेवले.

वाचा :- महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने



1) गाडगे महाराज - अमरावती


2) समर्थ रामदास- सज्जनगड


3) संत एकनाथ - पैठण


4) गजानन महाराज - शेगाव


5) संत ज्ञानेश्वर - आळंदी


6) संत गोरोबा कुंभार - ढोकी


7) संत चोखा मेळा - पंढरपूर


8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी


9) संत तुकडोजी  - मोझरी


10) संत तुकाराम - देहू


11) साईबाबा - शिर्डी


12) जनार्दन स्वामी - कोपरगाव 


13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर


14) दामाजी पंत - मंगळवेढा


15) श्रीधरस्वामी - पंढरपूर


16) गुरुगोविंदसिंह - नांदेड


17) रामदासस्वामी - जांब


18) सोपानदेव - आपेगाव


19) गोविंदप्रभू - रिधपुर


20) जनाबाई - गंगाखेड


21) निवृत्तीनाथ - आपेगाव

भारतीय क्षेपणास्त्रे




1. बराक 8 - भारत-इस्त्रायलच्या संयुक्त विध्यमाने, 70 किमी क्षमता, जमिनीवरून हवेत मारा.


2. निर्भय - 1000 किमी पल्ला, डिआरडिओ तर्फे विकसित.


3. पिनाका अग्निबाण प्रणाली 6 - अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला.


4. आकाश - एकामागोमाग एक तीन क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता, हवाई दलात तैनात. (जमिनीवरून हवेत मारा करणारे)


5. अस्त्र-सुखोई 30 - विमानांवर तैनात, स्वदेशी बनावटीचे, पल्ला 60 किलोमीटर (हवेतून हवेत मारा करणारे.)


6. पृथ्वी संरक्षण प्रणाली - हवामानाच्या थरांबाहेर 120 किलोमीटरवर शत्रूच्या क्षेपस्त्रांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता. (जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे)


7. ब्राम्होस - पल्ला 300 किमी, गती 2.8 माक, आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, अण्वस्त्रवहन क्षमता.


8. त्रिशूल - जमिनीवरून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्राविरोधी क्षेपणास्त्र.


9. नाग - रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र.


10. सूर्या - आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र.


11. सागरिका - पाण्याखालून मारा करणारे क्षेपणास्त्र. पाणबुडीवरून जमिनीवर मारा करणारे.


12. शौर्य - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.


13. धनुष - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.

अमेरिकेने टाकलेला 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' म्हणजे नेमके काय?

 


अमेरिकेने अफगाणिस्तानातील नंगरहार प्रांतात आयसिसला लक्ष्य करताना जीबीयू-४३/बी मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्ट (एमओएबी) नावाचा बॉम्ब टाकला. या बॉम्बला 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' असेही म्हटले जाते. अफगाणिस्तानातील आयसिसच्या तळांना लक्ष्य करत अमेरिकेने सर्वाधिक मोठा बॉम्ब हल्ला केला आहे. या कारवाईनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याचे अभिनंदन केले.


मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्टचा वापर शत्रूवर मानसिक दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने केला जातो. गुरुवारी अमेरिकेने या बॉम्बचा वापर करण्याआधी कोणत्याही देशाने या बॉम्बचा वापर केला नव्हता. त्यामुळे मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्टचा वापर करणारा अमेरिका हा पहिला देश ठरला आहे. अनेक वृत्तांनुसार, अफगाणिस्तानातील नंगरहारमध्ये या बॉम्बच्या वापरानंतर तब्बल ३०० मीटरचा खड्डा पडला आहे.


मदर ऑफ ऑल बॉम्ब नावाने ओळखल्या जाणाऱ्या बॉम्बला जाळीदार पंख असतात. बॉम्ब आकाशातून टाकण्यात आल्यानंतर पंख बॉम्बच्या वजनाला नियंत्रित करतात. हा बॉम्ब इतका मोठा असतो की तो फक्त विमानाच्या माध्यमातूनच टाकला जाऊ शकतो. या बॉम्बला पॅलेटवर ठेवले जाते. यानंतर पॅराशूटच्या मदतीने बॉम्बला विमानाबाहेर टाकले जाते. पॅराशूटच्या मदतीने पॅलेटला खेचण्यात आल्यानंतर पॅलेट बॉम्बपासून वेगळे करण्यात येते आणि त्यानंतर बॉम्ब टार्गेटवर टाकला जातो. यानंतर बॉम्ब लक्ष्याच्या दिशेने वेगाने जातो. उपग्रहाच्या माध्यमातून या बॉम्बचे नियंत्रण केले जाते.


जमिनीपासून सहा फूट अंतरावर बॉम्बचा स्फोट घडवण्यात येतो. बॉम्ब स्फोटाची तीव्रता जास्तीत जास्त राखण्यासाठी जमिनीपासून काही अंतरावर असतानाच स्फोट घडवला जातो. मोठे लक्ष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आणि जमिनीवरील सैन्याला, शस्त्रास्त्र साठ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी मदर ऑफ ऑल बॉम्बचा वापर केला जातो. या स्फोटाची तीव्रता ११ टिएनटी बॉम्बच्या स्फोटांएवढी असते. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणूबॉम्बमध्ये १५ टन टिएनटी स्फोटके होती.


२००३ मध्ये इराक युद्धादरम्यान अमेरिकेने एमओएबी बॉम्बची चाचणी घेतली होती. मात्र अद्यापपर्यंत अमेरिकेसह कोणत्याही देशाने या बॉम्बचा वापर केला नव्हता. अमेरिकेने मदर ऑफ ऑप बॉम्बची निर्मिती केल्यावर रशियाने त्यापेक्षा चारपट अधिक संहारक बॉम्बची निर्मिती करत त्याला फादर ऑफ ऑल बॉम्ब असे नाव दिले. मदर ऑफ ऑप बॉम्ब ३० फूट लांब आणि ४० इंच रुंद असतो. या बॉम्बचे वजन ९ हजार ५०० किलो असते. या बॉम्बचे वजन हिरोशिमामध्ये टाकण्यात आलेल्या बॉम्बपेक्षा जास्त होते.


मदर ऑफ ऑल बॉम्ब अतिशय विध्वंसक असतो. या बॉम्बच्या स्फोटानंतर सर्व दिशांना साधारणत: एका मैलापर्यंत नुकसान होते. मात्र अणूबॉम्ब नसल्याने यामुळे कोणताही किरणोत्सार होत नाही. या स्फोटानंतरच्या अवघ्या काही सेकंदांनतर आसपासच्या भागातील ऑक्सिजन संपतो. त्यामुळे परिसरातील लोकांचा श्वास गुदमरतो. स्फोटाच्या आवाजानंतर एक प्रकाशाचा किरण निघतो आणि एक विध्वंसक लाट एका मैलापर्यंत जाऊन तिच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे जबरदस्त नुकसान करते. यामुळे बहुतांश लोकांचा मृत्यू होता. अनेकांच्या कानांमधून रक्तस्राव सुरु होतो. परिसरातील झाडे उन्मळून पडतात आणि इमारती कोसळतात.


जिभेचा रंग काय सांगतो ?



अनेकदा आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. कधी तुम्ही हा विचार केला आहे का की तुमची जीभ पाहुण डॉक्टरला आजाराचं निदान कसं होत असेल. पण आम्ही तुम्हाला आज ही गोष्ट सांगणार आहोत की का डॉक्टर जीभ बघतो.

जीभचा रंग हा तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. पाहा काय आहे जीभेच्या रंगामागचं खरं कारण.


 काय सांगते तुमची जीभ.


१. गुलाबी रंग - गुलाबी रंगाची जीभेवर जर कोणत्याही प्रकारचे डाग नसतील तर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित आहात.


२. तुमच्या जीभेवर जर सफेद रंगाचा थर असेल तर तुमच्या पचन क्रिया व्यवस्थित नाही. तुमच्यात अशक्तपणा आहे. काही वेळेस हे वायरल इंफेक्शनचा ही प्रकार असू शकतो.


३. पिवळा रंग - पिवळा रंग सांगतो की तुम्हाला सर्दी, वायरल इंफेक्शन किंवा तुमच्या शरिरात हिट वाढली आहे. काही वेळेस हा पचन न होण्याच्या समस्येचंही संकेत देतो.


४. लाल रंग - लाल रंगाची जीभ ताप, रक्तात उष्णता वाढणे किंवा अंतर्गत जखम आणि इंफेक्शनचं संकेत देते.


५. कोरडी जीभ - जीभ कोरडी पडणे आणि पिवळी पडणे म्हणजे काविळ, अशक्तपणा, कमी झोप, आतड्यांना सूज थकवा याचे संकेत देते.


६. निळा रंग - शरिरात विटामिन बी-2 ची कमतरता आणि महिलांना दुखणे याचा संकेत देते. कोणत्याही औषधाच्या साईड इफेक्टमुळे देखील जीभ निळी पडते.


७. जीभेचा सर्वात पुढचा भाग लाल होणं हा मानसिक समस्येचं संकेत देतो.


८. जीभेछ्च्यावर अनेकदा सफेद डाग तयार होतात हे इंफेक्शन आणि अधिक घाम येण्याचे संकेत असतात.

महत्वाच्या संज्ञा




*काचेचा रंग - वापरावयाची धातूसंयुगे*


 लाल - क्युप्रस ऑक्साइड


निळा - कोबाल्ट ऑक्साइड


हिरवा - क्रोमीअम ऑक्साइड किंवा फेरस ऑक्साइड


जांभळा - मॅगनीज डाय ऑक्साइड


पिवळा - अॅटीमनी सल्फाइड


दुधी - टिन ऑक्साइड किंवा कॅल्शिअम सल्फेट 


*समीश्रे - घटक*


 पितळ - तांबे+जस्त


ब्रांझ - तांबे+कथिल


अल्युमिनीअम ब्रांझ - तांबे+अॅल्युमिनीअम


जर्मन सिल्व्हर - तांबे+जस्त+निकेल


गनमेटल - तांबे+जस्त+कथिल


ड्युरॅल्युमिनीअम - तांबे+अॅल्युमिनीअम+मॅग्नेशियम


मॅग्नेलियम - मॅग्नेशियम+अॅल्युमिनीअम


स्टेनलेस स्टील - क्रोमियम+लोखंड+कार्बन


नायक्रोम -    लोह+निकेल+क्रोमियम+मॅगेनीज 


*व्यावहारिक नाव - शास्त्रीय नाव*


 मार्श गॅस - मिथेन             


 खाण्याचा - सोडीयम बाय कार्बोनेट


धुण्याचा सोडा - सोडीयम कार्बोनेट


मीठ - सोडीयम क्लोराइड


व्हाईट व्हिट्रीऑल - झिंक सल्फेट


ब्ल्यु व्हिट्रीऑल - कॉपर सल्फेट


ग्रीन व्हिट्रीऑल - फेरस सल्फेट


जलकाच -    सोडीयम सिलिकेट


फॉस्जीन - कार्बोनिल क्लोराइड


जिप्सम सॉल्ट - मॅग्नेशियम सल्फेट


ग्लोबर्स सॉल्ट - सोडीयम सल्फेट


बेकिंग सोडा - सोडीयम बाय कार्बोनेट


फेरस अमोनियम सल्फेट - मोहर सॉल्ट


ल्युनर कॉस्टीक - सिल्व्हर नायट्रेट


संगमवर - कॅल्शियम कार्बोनेट


मोरचूद - कॉपर सल्फेट


रडार




रेडिओ डिटेकशन अँड रेजिंग


💎```हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे याच्या दृष्टीक्षेपात येणाऱ्या,हलणाऱ्या व स्तब्ध वस्तूंची नोंद घेऊ शकते डोळ्याला न दिसणाऱ्या वस्तूंची दिशा ,अंतर,उंची आणि वेग यांची माहिती करून घेण्याची क्षमता या उपकरणात आहे.```


💎```रडार चा मूळ उद्देश वस्तूंचे अस्तिस्त्व नोंदणे

आपल्या डोळ्यांना वस्तू दिसण्याचे कारण प्रकाशाच्या लहरी वस्तूवर पडतात आणि तेथून त्या आपल्या डोळ्यांच्या दिशेने  परावर्तित होतात .आपल्या डोळ्यामध्ये प्रतिबिंबित होतात.```


💎```रडार शक्तिशाली रेडिओ ट्रांसमीटर (प्रक्षेपक यंत्र)वापरून रेडिओ लहरींचे प्रक्षेपण करून वस्तू प्रकाशमान करतो```


💎```संवेदनाक्षम रेडिओ receiver परावर्तित लहरींचा शोध घेतो अशा परावर्तित लहरींना प्रतिध्वनी म्हणतात

या लहरी दूरध्वनी यंत्राच्या श्रावकामार्फत इलेक्टरोनिकसच्या साहाय्याने पडद्यावर प्रदर्शित केल्या जातात```


💎```या प्रकाशाचे ठिपके किंवा प्रत्यक्ष वस्तूंचे प्रतिबिंब्या स्वरूपात दिसते```


💎```दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हे यंत्र सैन्याच्या वापरासाठी ,विमान,व युद्धनौका यांचा शोध घेण्यासाठी होते

आता हे यंत्र विमान व नौकांच्या मार्गदर्शनासाठी,वादळे किंवा आकाशातील इतर गोंधळ तसेच ग्रह उपग्रह यांच्या अभ्यासासाठी वापरले जाते```


धवनी:



'ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना'.

ध्वनीचे स्वरूप :'ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते'.


ध्वनीची निर्मिती आघाताने, छेडल्याने, हवा फुंकल्याने, ओरखडल्याने, विविध वस्तु हालल्याने अशा अनेक कारणाने होवू शकते.


प्रत्येक उदाहरणात कंपन ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.


कंपन : वस्तूची जलद गतीने पुढे-मागे होणारी हालचाल म्हणजे कंपन होय.


उदा. तंतुवाद्यातील तारेची कंपने




ध्वनी हे तरंगाच्या स्वरुपात प्रसारित होतो.


वस्तु विक्षोभित होते आणि कंप पावते तेव्हा ध्वनी निर्माण होतो.


ध्वनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो त्याला माध्यम म्हणतात. ते घन, द्रव किंवा वायु असू शकते.


ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही.


प्रत्येक्षात कंपित वस्तूपासून ऐकणार्‍यापर्यंत कण प्रवास करीत नाहीत.

ध्वनी तरंगाची वैशिष्ट्ये :


जेव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो.


संपीडने : कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग म्हणजे संपीडने होय.


संपीडनांपाशी घनता तसेच दाब उच्च असतो.


विरलने : कमी दाबाचे असे भाग की जेथे कण विखुरलेले असतात त्याला विरलने म्हणतात.


विरलनापाशी घनता तसेच दाब कमी असतो.


दोन लगतच्या संपीडनातील किंवा दोन लगतच्या विरलनातील अंतरास तरंगलांबी म्हणतात.


त्याचे SI पद्धतीत एकक मीटर तर तरंगलांबी ग्रीक अक्षर लॅम्डा ने दर्शवतात.


वारंवारता :


घनतेचे उच्चतम किंमतीपासून कमीत कमी किंमतीपर्यंत आणि पुन्हा उच्चतम किंमतीपर्यंत होणारा बदल एक आंदोलन घडवितो.


एकक कालावधीत होणारी आंदोलनाची संख्या म्हणजे तरंगाची वारंवारता होय.


ध्वनी तरंगाची वारंवारता ग्रीक अक्षर न्यू ने दर्शवितात.


त्याचे SI पद्धतीत एकक हर्टझ असून ते Hz ने दर्शवितात.


(note- हर्टंझ (1857-1894) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. सर्वप्रथम त्यांनी बिनतारी संदेशवहनाचे प्रसारण व तरंगांची स्वीकृत केली. )

तरंगकाल :


लगतची दोन संपीडणे किंवा विरलने यांना ठराविक बिंदु पार करून जाण्यास लागणारा वेळ म्हणजे 'तरंगकाल' होय.


माध्यमाच्या घनतेमध्ये एक संपूर्ण आंदोलन होण्यास लागणारा वेळ हा ध्वनी लहरीचा तरंगकाल असतो.


तो 'T'ने दर्शविला जातो.


SI पद्धतीत तरंगकालाचे एकक सेकंद आहे.


u=1/t



ध्वनीचा वेग :


तरंगावरील संपीडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदुने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय.


वेग=अंतर/काल


एका तरंगकालात कापलेले अंतर,


वेग= तरंगलांबी/तरंगकाल


वेग= वारंवारता*तरंगलांबी


मानवी श्रवण मर्यादा :


मानवी कानांची ध्वनी ऐकण्याची मर्यादा सुमारे 20 हर्टझ ते 20,000 हर्टझ आहे.


पाच वर्षाच्या आतील मुले आणि कुत्र्यांसारखे काही प्राणी 25000 हर्टझ पर्यंत ध्वनी एकू शकतात.



श्रव्यातील ध्वनी :


20000 हर्टझ पेक्षा अधिक वारंवारता असणार्‍या ध्वनीला श्रव्यातील ध्वनी असे म्हणतात.


निसर्गात डॉल्फिन्स, वटवाघुळे, उंदीर वगैरे तो निर्माण करू शकतात.


उपयोग :


जहाजावरून जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्रव्यातील ध्वनी उपयोगी ठरते.

ध्वनीचे परिवर्तन :


ध्वनी तरंगांचे घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होते.


ध्वनीच्या परावर्तनासाठी फक्त मोठ्या आकाराचा खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते.


प्रतिध्वनी :


मूल ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती म्हणजे प्रतिध्वनी होय.


अंतर= वेग*काल


निनाद :


एखाद्या ठिकाणाहून ध्वनी तरंगांचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन, ध्वनीतरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो.त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होतो त्यालाच निनाद म्हणतात.



सोनार (SONAR):


Sound Navigation And Ranging याचे लघुरूप म्हणजे SONAR होय.


पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग श्रव्यातील ध्वनी तरंगाच्या उपयोग करून SONAR मोजते.

संगणकाविषयी माहिती भाग :



DOT म्हणजे - डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन

  

SSA म्हणजे - सर्व शिक्षा अभियान

  

SARI म्हणजे - सस्टेनेबल अॅक्सेस इन रूरल इंडिया

  

CIC म्हणजे - कॉम्युनिटी इन्फ्रोर्मेशन सेंटर

  

CIC ची सुरुवात झाली - 17 ऑगस्ट 2002

  

ई-वेस्ट म्हणजे - इलेक्ट्रॉनिक कचरा

  

सॉफ्टवेअर चोरी रोखण्यासाठीचा कायदा - इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अॅक्ट

  

नॅशनल अॅरोलॅटिक लॅब - बंगळुरू

  

सी-डॅक चे मुख्यालय - पुणे

  

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - मुंबई

  

'अनुराग' ही संगणकविषयक संस्था - हैदराबाद

  

संगणकाच्या चौथ्या पिढीचा कालावधी - 1970-80

  

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली हिरवी रेषा संकेत आहे - व्याकरणातील चुका

  

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली लाल रेषा संकेत आहे - स्पेलिंग मिस्टेक

  

रिसायकल बिन या चित्राने दर्शवितात - डस्ट बिन

  

नेटस्केप नेव्हीगेटर प्रकार आहे - ब्राऊझरचा

  

डॉसची आज्ञावली या भाषेत असते - अमेरिकन

  

बारकोड रिडर्सना म्हणतात - हॅन्डहेल्ड स्कॅनर

  

ई-मेल म्हणजे - इलेक्ट्रॉनिक मेलिंग

Greenhouse effect हरितगृह परिणाम


हरितगृह परिणाम:-


   सूर्याकडून पृथ्‍वीकडे येणारी ऊर्जा लघू प्रारणांच्‍या (Short Waves) रूपाने येते. पृथ्‍वीकडून उत्‍सर्जित होणारी ऊर्जा दीर्घ प्रारणांच्‍या (Lonh waves) रूपाने आढळते. वातावरणातील जलबाष्‍प, कार्बन डाय ऑक्‍साईड हे घटक सूर्याकडून पृथ्‍वीकडे येणार्‍या प्रारणांसाठी पारदर्शक आहेत. परंतु पृथ्‍वीकडून अवकाशात उत्‍सर्जित होणारी दीर्घ प्रारणे मात्र हे घटक अडवतात. वातावरणाच्‍या अध:स्‍तरात अडलेल्‍या दीर्घ प्रारणांमुळे वातावरणाचे तापमान वाढते. यालाच हरितगृह परिणाम असे म्‍हणतात.




हरितगृह परिणामामुळेच पृथ्‍वीचे वातावरण उबदार बनले आहे. त्‍यामुळेच पृथ्‍वीवर सजीव सृष्‍टीचे अस्तित्‍व आढळते. म्‍हणजेच हरितगृह परिणाम आवश्‍यक व 

उपकारक आहे. या परिणामाचा उपयोग शेतीमध्‍ये केला जातो. काही पिकांना दमट हवामानाची गरज असते. ते निर्माण करण्‍यासाठी प्‍लास्टिकचा कागद वापरून हरितगृह निर्माण केले जाते.


  प्‍लास्टिक कागदामुळे पृथ्‍वीकडून अवकाशात जाणारी दीर्घ प्रारणे अडवली जातात. त्‍यामुळे हरितगृहामधील तापमान वाढते. वाढलेल्‍या तापमानामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढते. थंड हवामानाच्‍या प्रदेशात प्‍लास्टिक कागदाऐवजी काचेचा उपयोग केला जातो. या रचनेला ग्‍लास हाऊस असे म्‍हणतात. या ग्‍लास हाऊसमध्‍ये अत्‍यंत कमी तापमान असणार्‍या प्रदेशातही पिके घेता येतात.


हरितगृह परिणामात वाढ:-

मानवाच्‍या विविध क्रियांमुळे वातावरणातील हरितगृह घटकांचे प्रमाण वाढले आहे. जलबाष्‍प, कार्बन डाय ऑक्‍साइड यांच्‍याप्रमाणेच कार्बन मोनोक्‍साइड, सल्‍फर डाय ऑक्‍साइड, सल्‍फर ट्राय ऑक्‍साइड, मिथेन, नायट्रोजन डाय ऑक्‍साइड, क्‍लोरोफ्‍ल्‍युरो कार्बन्स हेदेखील हरितगृह वायू आहेत. त्‍यांचे वातावरणातील प्रमाण लक्षणीयरि‍त्‍या वाढले आहे. त्‍यामुळे वातावरणाचे तापमान वाढत आहे. यालाच ‘जागतिक तापमानवाढ'  असे म्हणतात. ही जागतिक तापमानवाढच मानवनिर्मित हवामान बदलाचे मुख्‍य कारण आहे.



हवामान बदलाचे परिणाम अल्‍पकालीन व दीर्घकालीन स्‍वरूपाचे आढळतात:-



सागर जल पातळीत वाढ

महासागरांचे आम्‍लीकरण

मासेमारीवर परिणाम

प्रवालींचा नाश व विरंजन

हिमरेषांच्‍या उंचीत वाढ

तापमान, पाऊस, कार्बन डाय ऑक्‍साइडचे प्रमाण या घटकांचा शेतीवर मोठा प्रभाव पडतो.

सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी :



1 Joule = 107 अर्ग

 

फटक्यामध्ये रासायनिक ऊर्जा साठविलेली असते.

 

ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सांगतो की, ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्ठही करता येत नाही. केवळ तिचे एका प्रकारातून दुसर्यार प्रकारात रूपांतर करता येते.

 

कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती होय. तसेच एकक कालात केलेले कार्य म्हणजे शक्ती होय.

 

SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.

 

१ वॅट = १ ज्युल/से = 1 N – m/s तसेच 1 HP = 746 वॅट

 

माध्यमातून प्रक्षोभाचा जो आकृतीबंध प्रवास घडतो त्या आकृतिबंधास ‘तरंग’ असे म्हणतात.

 

यांत्रिक तरंग दोन प्रकारचे असतात. १) अनुतरंग (longitudinal wave), २) अवतरंग (transverse wave)

 

ध्वनीचा कोरड्या हवेतील वेग 00से तापमानाला 332 मी/से. आहे.

 

ज्या ध्वनी तरंगाची वारंवारता २० Hz पेक्षा कमी किंवा २०,००० Hz पेक्षा जास्त असते असे ध्वनी माणसाला ऐकू येत नाहीत. त्याला अवश्राव्य ध्वनी म्हणतात.

 

प्रकाशाचा वेग 3 x 108 m/s आणि ध्वनीचा वेग ३४० m/s आहे.

 

ध्वनीलहरींचे परावर्तन होऊन 1/10 सेकंदानंतर त्या आपल्या कानावर पडल्यास मूळ आवाज पुन्हा ऐकू येतो. हाच प्रतिध्वनी होय.

 

प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी किमान १७ मी. अंतर असणे आवश्यक आहे.

 

वटवाघूळ उच्च वारंवारतेचा ध्वनी निर्माण करतात. या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी असे म्हणतात.

 

प्रतिध्वनीचे तत्व SONAR पद्धतीत वापरतात.

 

SONAR- Sound Navigation And Ranging System

 

पाण्यामध्ये ध्वनीचा वेग १४१० m/s आहे तर समुद्राच्या पाण्यात हाच वेग १५५० m/s आहे. लोखंडामध्ये ध्वनीचा वेग सुमारे ५१०० m/s आहे.

 

ध्वनीच्या तीव्रतेचे एकक डेसिबल (decibel) हे आहे. लघुरूपात डेसिबल हे dB असे लिहितात.

 

नकोसा वाटणारा ध्वनी म्हणजे कुरव होय.

 

पाण्याचे तापमान ४°से. पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्टपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखविते.


सर्वसामान्य मानवी डोळा त्यावर ताण न देता वस्तु स्पष्ट पाहण्याचे किमान अंतर म्हणजे २५ सेंमी होय.

 

निकटदृष्टीता फक्त जवळच्या वस्तु स्पष्ट दिसतात. अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरुन या दृष्टीदोषाचे निराकरण करता येते.

 

दूरदृष्टीता – नेत्रगोल उभट होण्याने निर्माण होतो. लांबच्या वस्तु नीटपणे दिसू शकतात. बहिर्वक भिंगाचा चष्मा वापरुन हा दोष दूर करता येतो.

 

अबिंदुकता – एकाच प्रतलातील क्षितीज समांतर रेषा व क्षितीज लंब रेषा यांच्या प्रतिमा वेगवेगळ्या प्रतलात तयार होतात. या दोषाला अबिंदुकता असे म्हणतात. दंडगोल भिंगाचा चष्मा वापरुन दूर करतात.

 

वृद्ध दृष्टीता – निकट बिंदूचे डोळ्यापासूनचे अंतर वयाबरोबर वाढते. निकटबिंदूच्या डोळ्यापासून मागे सरण्याला वृद्धदृष्टीता असे म्हणतात.

 

बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरुन वृद्धदृष्टीता दूर करता येते.

 

जेव्हा अबिंदुकता आणि निकटदृष्टीता किंवा दूरदृष्टीता असे दोन दोष असतील तेव्हा त्यांना घालविण्यासाठी तीन अंक दिलेले असतात.

 

साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक असेही म्हणतात. रत्नाची पारख करण्यासाठी व त्यातील दोष शोधण्यासाठी जव्हेरी याचा उपयोग करतात.

 

संयुक्त सूक्ष्मदर्शक हा नेत्रिका व पदार्थभिंग अशा दोन बहिवक्र भिंगाचा बनलेला असतो.

 

अपवर्तन होताना पांढर्या  प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात अपस्करण होऊन पांढर्या. वस्तूंच्या रंगीत प्रतिमा तयार होतात. त्याला वर्णीय विपयन असे म्हणतात.

 

वस्तु दूर केल्यानंतरही १/१६ सेकंदापर्यंत प्रतिमेची दृष्टीपटलावरील ठसा तसाच राहतो. दृष्टिपटलावरील संवेदना टिकणे या परिणामाला दृष्टीसातत्य असे म्हणतात.

 

दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदुस प्रकाशाच्या तेजस्वितेची किंवा अंधुकतेची माहिती पुरवितात.

शक्ती

 


कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण म्हणजे 'शक्ती' होय.


कार्य करण्याच्या दरास 'शक्ती' म्हणतात.


केलेले कार्य समान असले तरी त्यांनी वापरलेली शक्ती वेगवेगळी असे शकते.


गच्चीवरील पाण्याची टाकी एक माणूस दिवसभरत बादलीच्या सहाय्याने भरू शकतो, तर तेच काम करण्यासाठी मोटारीला 5 मिनिटे लागू शकतात.


शक्ती (P) = कार्य/काल = w/t


शक्तीचे एकक=>


SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.


1 वॅट = 1 ज्युल/सेकंद


1 किलोवॅट = 1000 वॅट


औधोगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती Horse Power या एककाचा वापर प्रचलित आहे.


1 अश्वशक्ती = 746 वॅट


व्यावहारिक उपयोगासाठी शक्तीचे एकक किलोवॅट तास हे आहे.


1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 J प्रति सेकंद या प्रमाणे केलेले कार्य.


1 Kwhr = 1 Kw × 1 hr


= 1000w × 3600 s


= 3.6 × 106 Joules


घरगुती वापर, औधोगिक, व्यावहारीक उपयोगासाठी हे एकक वापरतात.

___________________________________

बल



निसर्गात आढलाणाऱ्या आणि परस्परांपासून भिन्न असणाऱ्या सर्व बलांचे 4 मुख्य गटात वर्गीकरण करता येते.


गुरुत्व बल


विधुत चुंबकीय बल


केंद्रकीय बल


क्षीण बल


गुरुत्वबल (Gravitational Force)=>


सफरचंद खालीच का पडले ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.


न्यूटनच्या म्हणण्यानुसार विश्वातील प्रत्येक वस्तु दुसर्या  वस्तूला स्वत:कडे ओढते. या प्रकारे प्रयुक्त आकर्षणबलास 'गुरुत्वबल' असे म्हणतात.


हे बल परस्परांकडे आकर्षित होणार्‍या दोन वस्तूंच्या वस्तुमानावर अवलंबून असते. ओढणार्‍या वस्तूंचे वस्तूमान जास्त असेल तर बलाचे परिमाणही जास्त असते.


एखाधा वस्तूवर समान अंतरावर पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते. कारण चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा कमी असते.


गुरुत्वबल दोन वस्तूंमधील अंतरावरदेखील अवलंबून असते. जर दोन वस्तूंमधील अंतर कमी असेल तर त्यांच्यातील गुरुत्वबल जास्त असते.


न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम असे सांगतो की विश्वातील कोणत्याही दोन वस्तु कोठेही असल्या तरी त्यांच्या परस्परांना आकर्षित करणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणकाराशी समानुपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते.


F=G m1 m2 /r2  G = विश्वगुरुत्व स्थिरांक


SI पद्धतीत G = 6.67 × 10-11 Nm2/kg2


CGS पद्धतीत G = 6.67 × 10-8 dyne.cm2/g2


पृथ्वीचे गुरुत्व त्वरण=>


एखादी वस्तु विशिष्ट उंचीवरून हवेतून खाली सोडली तर ती सरळ खाली येते. खाली येताना वेग वाढतो. याचा अर्थ त्याच्यात त्वरण निर्माण होते. यालाच 'गुरुत्व त्वरण' असे म्हणतात.

उष्णता



उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर करुन ती मिळविता येते.


थंडीच्या दिवसात आपण हातावर हात घासतो. या प्रकियेत यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते.


जेव्हा आपण गिझरचे बटण चालू करतो तेव्हा विधुत ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते. या उलट जेव्हा पाणी तापविले जाते तेव्हा पाण्याचे रूपांतर वाफेत होते.


वाफेच्या इंजिनामध्ये वाफेचे रूपांतर यांत्रिक उर्जेत होते व वाफेच्या इंजिनाच्या सहाय्याने रेल्वे धावते.


पाण्याचे असंगत आचरण=>


सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते.


परंतु पाण्याचे तापमान 4℃ पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते.


0℃ तापमानाचे पाणी तापविले असता सुरूवातीस 4℃ तापमान होईलपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते.


4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्युनतम होते आणि 4℃ च्या पुढे तापमान गेल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते.


पाण्याचे 0℃पासून 4℃ पर्यंत पाण्याचे तापमान वाढविल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते.


4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्यूनतम (Minimum) असते. म्हणून पाण्याची घनता 4℃ ला उच्चतम (Maximum) असते.


पाण्याचे असंगत आचरण होपच्या उपकरणाच्या सहाय्याने दाखविता येते.


बर्फ पाण्यावर तरंगते याचाच अर्थ त्याची घनता 0℃ तापमानाच्या पाण्यापेक्षा कमी आहे असा होतो.


थंड प्रदेशामध्ये हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 0℃  पेक्षाही कमी होऊ शकते. तापमान कमी होत जाते तसतसे तळी आणि तलावातील पाणी आकुंचन पावू लागते. त्याची घनता वाढते. ते तळाकडे जाऊ लागते. ही क्रिया संपूर्ण पाण्याचे तापमान 4℃होईपर्यंत चालू राहते.


तापमान 4℃ पेक्षा कमी होऊ लागल्यानंतर ते आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावू लागते.

सामान्य विज्ञान इयत्ता 8 वी शॉर्ट नोट्स :



सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित आठ ग्रह फिरतात.


 चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

 प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे ५० मिनिटे उशिरा होतो.

 चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास २७.३ दिवस लागतात.

 एका अमावस्येपासुन दुसर्‍या आमवस्येपर्यंतचा काळ २९.५ दिवसांचा असतो.


 एकूण ८८ तारकासमूह मानले जातात. त्यातील ३७ तारकासमूह उत्तर खगोलीय तर ५१ तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.


 प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी २७ नक्षत्रांची कल्पना केली आहे.


 प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.


 बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त ८८ दिवस तर नेपच्यूनचा सुमारे १४६ वर्षे इतका मोठा असतो.

  बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.

 पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला पहाटतारा म्हणतात.


 पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना अंतर्ग्रह, तर कक्षेबाहेरील ग्रहांना बाह्यग्रह म्हणतात.

 मंगळ हा पहिला बाह्यग्रह आहे.


  सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु

 गुरूला एकूण ६३ उपग्रह आहेत.

 शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.


 शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.


 धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.

 हॅले हा धूमकेतू ७६ वर्षानी दिसतो. आता २०६० मध्ये दिसेल.


 भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट १९ एप्रिल १९७५ रोजी सोडण्यात आला.

 त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - १, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.

 ‘इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत २१ उपग्रह सोडण्यात आले.


 GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.

टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.


 आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार १९७५ पासून अंमलात आला आहे. 


जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या १९९२ च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.


  ५ मार्च १८७२ रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.


 चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित होतात.


 मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणोत्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.


 इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन हे अनुतील मूलकण आहेत.

 अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्युट्रॉन असतात. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.

  प्रोटॉन धनप्रभारीत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत तर न्युट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.

 अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.

 अनुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या संख्याची बेरीज.

  मूलद्रव्याच्या संस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणूवस्तुमानांक भिन्न असतो.

 मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याचा क्षमतेला संयुजा म्हणतात.


 विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.

 जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.

 स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात.

 पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.


 साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.

 संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ

 संपर्कजन्य रोग – खरूज, इसब, गजकर्ण, इ.


 पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.


 रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.


 WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्र  काढली आहेत. (Directly Observed Treatment)

 मनुष्यप्राणी ‘व्हीब्रिओ कॉलरा’ या कॉलर्‍याचा जिवाणू वाहक आहे.


 लसीकरण – बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.

 त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.

Online Test Series

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...