Saturday, 7 November 2020

प्राचीन भारताचा इतिहास :



▪️सिंधू संस्कृती


1) समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.


2) सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.


3) १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.


4) नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.


5) १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.


6) रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.


7) प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.


8) गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.


9) सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.


10) सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.


11) भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.


12) अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.


13) सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.


14) हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.


15) सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.


16) हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.


17) राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.


18) माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.

गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी (१८४८-५६)


१८४८ मध्ये लॉर्ड हार्डिगच्या जागी डलहौसी गव्हर्नर जनरल बनला. डलहौसीने आपल्या आठ वर्षांच्या कारकीर्दीत भारतात इंग्रज प्रशासनाचा पाया मजबूत केला. त्याच्या कार्यकाळात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी..


डलहौसी हा त्याच्या व्यपगत सिद्धान्तासाठी (Doctrine of Lapse) ओळखला जातो.

डलहौसीने संस्थानांना दत्तकपुत्र घेण्यास अनुमती दिली, पण दत्तकपुत्र हा गादीचा वारस मानण्यास त्याने नकार दिला. त्याचप्रमाणे द्वितीय आणि तृतीय प्रकारच्या संस्थानाला दत्तकपुत्र वारसा नेमण्यास मान्यता नाकारली.


डलहौसीने या सिद्धान्तानुसार सातारा (१८४८), संबलपूर व जैतपूर (१८४९), बगाढ (१८५०), उदयपूर (१८५२), झाशी (१८५३) व नागपूर (१८५४) खालसा केले.

लॉर्ड डलहौसीकृत सुधारणांचा एकमेव उद्देश सत्ता केंद्रीकरण हा होता.

लॉर्ड डलहौसीच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्याचा पश्चिम भागात विस्तार झाला.

लॉर्ड डलहौसीने सैन्यात तीन रेजिमेंटची भर घातली.

१८५३ मध्ये ठाणे ते मुंबई दरम्यान रेल्वे सुरू झाली.

भारतात टपाल तिकिटांचा वापर लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरू झाला. त्याच्या काळात भारतात रेल्वेचे जाळे ठेके पद्धतीने बांधण्यात आले.

लॉर्ड डलहौसीला भारतात ‘विद्युत तारेचा प्रारंभकर्ता’ असे म्हणतात.

लॉर्ड डलहौसीने व्यापारासाठी सर्व बंदरे खुली करून कर रद्द केला.

१८५४मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना केली.

१८५४चा वुडचा खलिता : त्यानुसार प्राथमिक शिक्षणापासून विश्वविद्यालयीन शिक्षणापर्यंत एक शिक्षण योजना बनविण्यात आली. यानुसार प्रत्येक प्रांतात स्वतंत्र शिक्षण असावे अशी शिफारस करण्यात आली.

त्याच्या कार्यकालात १८५६ साली विधवा विवाहासंदर्भात ‘विधवा पुनर्विवाह कायदा संमत झाला. त्यासाठी त्याला ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मदत केली.


१८५७ चा उठाव आणि डलहौसी : 


स्मिथच्या मतानुसार, १८५७ च्या उठावाला डलहौसीच जबाबदार होता. त्याने कोणत्याही कारणावरून, भारतीय राज्यांना ब्रिटिश प्रशासनात विलीन केले. यामुळे राजांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्याची परिणती १८५७ च्या उठावात झाली.


लॉर्ड कॅनिंग (१८५६ ते १८६२) : 


कॅनिंग हा ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल व ब्रिटिश संसदेद्वारा नियुक्त पहिला व्हॉईसरॉय होता. १८५८चा उठाव कॅनिंगच्या काळात झाला. उठाव मोडून काढण्याचे महत्त्वाचे काम त्याने केले. कॅनिंगने १८६१ साली पोलीस खात्यात सुधारणा केल्या. पोलीस विभागपदी इन्स्पेक्टर जनरल (कॅ), जिल्हा पोलीस प्रमुखपदी पोलीस अधीक्षक (रढ), तालुका प्रमुखपदी डेप्युटी इन्स्पेक्टर इत्यादी नेमणुका केल्या. कॅनिंगने मेकॉलेद्वारा तयार केलेली (१८३७ भारतीय दंडविधान) संहिता १८६० मध्ये लागू केली. १८६२ पासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली. कॅनिंगने मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे उच्च न्यायालयाच्या शाखा स्थापन केल्या. याच काळात १८६१ चा भारतीय विधिमंडळ कायदा (इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट) संमत झाला तसेच ‘इंडियन सिव्हिल सव्‍‌र्हिसेस’ परीक्षा सुरू झाल्या. इ.स. १८५७ मध्ये मुंबई, मद्रास, कलकत्ता (कलकत्ता- २४ जानेवारी) विश्वविद्यालयांची स्थापना करण्यात आली. राणीचा जाहीरनामा लॉर्ड कॅनिंगने १ नोव्हेंबर १८५८ रोजी अलाहाबादच्या दरबारात वाचून दाखवला. १८५९ मध्ये भारतमंत्री म्हणून चार्ल्स वुड आला. वुडच्या सहाय्याने कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षण खात्याची स्थापना केली. १८६१ च्या दुष्काळ परिस्थितीच्या चौकशीसाठी कर्नल स्मिथच्या अध्यक्षतेखाली हिंदुस्थानच्या इतिहासातील पहिला चौकशी आयोग कॅनिंगने नेमला.

पडित जवाहरलाल नेहरू



◾️भारताचे पहिले पंतप्रधान, विज्ञानवादी


👉🏻 जन्मदिन - १४ नोव्हेंबर १८८९*


🔵 बालदिवस


जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते.


● संक्षिप्त चरित्र


● वैयक्तिक आयुष्य


श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मिरी पंडितांच्या घरी नोव्हेंबर १४, इ.स. १८८९ रोजी झाला. फेब्रुवारी ७, इ.स. १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी करण्यात आला. इ.स. १९१७ साली त्यांना इंदिरा प्रियदर्शीनी हे कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांचे पिता मोतीलाल नेहरू यांचे फेब्रुवारी ६, इ.स. १९३१ रोजी व पत्नी श्रीमती कमला नेहरू यांचे फेब्रुवारी २८, इ.स. १९३६ रोजी निधन झाले.


● राजकीय आयुष्य


पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवणीद्वारे घेतले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरीता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले. विज्ञार्थी दशेत असताना सुद्धा त्यांना पारतंत्र्यातील विविध देशांच्या स्वातंत्र्यसंग्रामात रूची होती. आयर्लंड मधील सिन फेन मुव्हमेंट मध्ये त्यांनी विशेष रस घेतला. त्यामुळे भारतात परतल्यावर ते आपसुकच स्वातंत्र्य चळवळीत खेचले गेले.


१९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर काँग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरुल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरीत झाले. १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.


सप्टेंबर १९२३ मध्ये पं. नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठीहल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरु केली. १९२९ साली पं. नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य गेच ध्येय्य निश्चित केले गेले. १९३० ते १९३५ दरम्यान मीठाचा आणि अन्य सत्याग्रहांमुळे त्यांना अनेकदा कारावास भोगावा लागला. १४ फेब्रुवारी, १९३५ रोजी त्यांनी अल्मोरा जेलमध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, स्पेन आणि चीन येथे जाऊन आले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकाळी पण शेवटची ठरली. एकंदर पं. नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते दक्षिण पूर्व आशियाला जाऊन आले. त्यानंतर ६ जुलै, १९४६ रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.

सग्रामानंतरचा मराठवाडा...



1950 नंतर जन्माला आलेल्या नव्या पिढीला मराठवाडा मुक्तिसंग्राम म्हणजे काय?हे नव्या पिढीला‘मराठवाडा जन्मा’ची कथा सांगितली पाहिजे.....


आज 17 सप्टेंबर...हैद्रराबाद मुक्तिदिनानिमित्त..


‘‘निधडी छाती नि:स्पृह बाणा

लववी ना मान अशा आमच्या मराठवाड्याचा आम्हास अभिमान’’


असंख्य हुमात्म्यांच्या बलिदानातून,अनेकांच्या

त्यागातून सरसेनानी स्वामी रामानंद

तीर्थ,माणिकचंद पहाडे,गोविंदभाई श्रॉफ,विजयेेद्र काबरा यांसारख्या समर्थ नेत्यांच्या निकरांच्या लढ्यातून निर्माण झालेला हा एक कोटी लोकसंख्येचा मराठवाडा 17 सष्टेंबर रोजी सनई- चौघड्यांच्या मंगल निनादात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत हैद्रराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा करत आहोत.


ज्यांनी त्या काळात रझाकारांचा बेछूट

गोळीबार अनुभवला,अनन्वित छळ सोसला,निझाम नामक कसायाने सर्व तऱ्हेची दडपशाही केलेली पाहिली त्यांनी नव्या पिढीला‘मराठवाडा जन्मा’ची कथा सांगितली पाहिजे.मराठवाड्यातील

आबालवृद्ध निर्भयपणे या लढ्यात सामील झाले होते.रझाकाराच्या लाठ्या कमी पडल्या;पण हुतात्म्यांची वाण पडली नाही.पोलिसांच्या लाठ्या मोडल्या; पण मराठवाड्यातील माणसांचे कणे मोडले नाहीत.असा हा दिव्य लढा होता.17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबादच्या निझाम

संस्थानाच्या तावडीतून मराठवाड्याची सुटका झाली.त्या लढ्याची नुसती आठवण झाली तर अंगावर रोमांच उभे राहतात.मात्र,दुर्दैव असे की,या लढणा-

या सेनानींनी मराठवाडा मुक्त झाल्यानंतर सारे विसरून न लढणाऱ्या मराठी बांधवांच्या हाती सत्ता दिली.


मराठवाड्याने या देशाला हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करणारी माणसे दिली.एवढेच नव्हे,तर मराठवाड्याच्या या कसदार भूमीने या राज्याचे,देशाचे वैचारिक नेतृत्वही केले.गोविंदभाई श्रॉफ,विजयेंद्र काबरा,रफिक झकेरिया,अनंतराव भालेराव,आ.कृ.वाघमारे,शंकरराव चव्हाण,बापूसाहेब काळदाते अशा अनेक विचारवंतांनी समाजसुधारणेच्या संदर्भात व शिक्षण क्षेत्रातील मूलभूत धोरणांविषयी विचार केला.


मराठवाडा मुक्तिसंग्रामानंतर मराठवाड्यातील अनेक स्त्रिया शिकून

शिक्षिका,परिचारिका,डॉक्टर,लेखिका नावारूपाल आलेल्या दिसून येतात.जागतिक मराठी साहित्य

संमेलनाचे अध्यक्षपद डॉ.गंगाधर पानतावणे यांनी भूषवले.हैद्रराबाद

मुक्तिसंग्रामानंतर समताधिष्ठित,मूल्याधिष्ठित समाजव्यवस्था याचा जाणीवपूर्वक स्वीकारच केला गेला नाही.समाजमनावरील पडलेल्या खुणा बुजविण्यासाठी रचनात्मक नवनिर्माणशील व तरुण पिढीने समाजविधायक कार्याला स्वत:पासून सुरुवात करणे आवश्यक आहे.तीच या हैद्रराबाद मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना खरी मानवंदना  ठरेल.


राशबिहारी बोस:

 (२५ मे १८८६ — २१ जानेवारी १९४५). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक देशभक्त. फ्रेंच चंद्रनगरच्या परंतु सिमल्याला एकटे राहून सरकारी छापखान्यात नोकरी करणाऱ्या विनोदबिहारींचा हा मुलगा. त्यांच्या जन्मतिथीविषयी तसेच जन्म स्थानाविषयी एकवाक्यता नाही. बहुतेक तज्ञांच्या मते त्यांचा जन्म आजोळी सुबलदाह (बरद्वान) येथे झाला; पण आई लगेच गेली.  सावत्र आई व आजोबा कालिचरण यांनी संगोपन केले. चंद्रनगरला किंवा आजोळी कोणत्याच शाळेत हा आडदंड मुलगा स्थिर झाला नाही. उलट विद्यार्थिदशेतच चंद्रनगरच्या तरुण क्रांतिकारी गटाशी त्याने सूत जमविले होते. श्रीष घोष व अमरेंद्र चतर्जी यांनी त्याला क्रांतिदीक्षा दिली होती. मुलगा शिकत नाही म्हणून वडिलांनी त्याला पुढे सिमल्याला आणले. घरीच इंग्रजी व टंकलेखन शिकविले. दोन्हीत चांगली प्रगती झाल्यावर आपल्याच छापखान्यात चिकटवून दिले. स्वतंत्र वृत्ती व क्रांतीकडे ओढा असल्यामुळे घर सोडून दूर डेहराडूनला जंगल खात्यात राशबिहारींनी नोकरी धरली. १९०८ पासून १९१३ पर्यंत वारंवार रजा घेत असूनसुद्धा कशीबशी नोकरी टिकली. त्या वेळी बंगालच्या अनेक शहरांतून त्याचप्रमाणे बनारस, दिल्ली, लाहोर इ. शहरांतून क्रांतिगट कार्यरत होते.

प्रत्येक गटात एक तरी बंगाली असायचाच. त्यामुळे राशबिहारींना या सर्वांशी संबंध ठेवणे सुलभ गेले. १९१२ च्या मध्यास त्यांनी बंगाल-चंद्रनगरला जाऊन बाँब व बाँब साहित्य आणि अनेक तरुण क्रांतिकारक जमविले. बसंतकुमारला आपल्या घरी बरेच महिने ठेवून पूर्ण संधा दिली. बंगाली व पंजाबी क्रांतिकारी नेत्यांच्या सल्ल्याने व्हाइसरॉयवर बाँब टाकण्याची योजना आखली. बंसतकुमार तयार झाल्यावर त्यास लाहोरला धाडले. २२ डिसेंबरला लॉर्ड चार्ल्स हार्डिंग मोठ्या मिरवणुकीने दिल्ली येथे प्रवेश करून तेथे भारताची राजधानी सुरू करणार होते. आदल्या दिवशी राशबिहारी डेहराडूनहून व बसंतकुमार लाहोरहून दिल्लीला आले. एका क्रांतिकारक मित्राकडे दोघेही उतरले. दुसऱ्या दिवशी हत्तीच्या अंबारीत दिमाखाने बसलेल्या व्हाइसरॉयसाहेबांवर बसंतने बाँब फेकला. हार्डिंगना गंभीर इजा झाली. शरीररक्षक ठार झाला. राशबिहारी बरोबर होतेच. दोघेही नंतर लाहोर-डेहराडूनला परतले. पुढे राशबिहारींनी पुरविलेल्या बाँबच्या साहाय्याने व बसंतकुमारच्या मदतीने लाहोर गटाने धमाल उडवून दिली; पण शेवटी बिंग फुटले. दिल्ली कटाच्या खटल्यात बसंतकुमारसह चौघांना फाशी देण्यात आले. राशबिहारींवर वॉरंट होते; पण ते बनारसला गेले. तेथल्या अनुशीलन गटाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपविण्यात आले.

गदर चळवळ १९१४ च्या महायुद्धानंतर सुरू झाली. गदर क्रांतिकारकांच्या हालचाली सॅन फ्रॅन्सिस्कोपासून पंजाबपर्यंत पसरल्या होत्या. विष्णुपंत पिंगळे बनारस गटाचे साह्य घेण्यासाठी राशबिहारींना बनारसलाच भेटले. ज्या पंजाबमध्ये मुख्य उठाव योजिला होता, तेथेच समर्थ नेतृत्वाची उणीव होती. पिंगळ्यांच्या विनंतीवरून राशबिहारींनी पंजाबच्या गदर उठावाची योजना तयार करण्याचे मान्य केले. थोड्याच अवधीत त्यांनी सुसूत्रता आणली. क्रांतिकारकांचा विश्वास संपादन केला; पण एका घरभेद्यानेच संकल्पित उठावाची खडान् खडा माहिती पुरविल्यामुळे आदल्या दिवशीच धरपकडी झाल्या. या वेळीही राशबिहारी पोलिसांचे हाती लागले नाहीत. निरनिराळ्या खटल्यांतून ते फरारी आरोपी म्हणून जाहीर करण्यात आले होते. हजारो रुपयांची इनामे घोषित झाली होती.

अनेक भाषांवर प्रभुत्व, गुप्ततेच्या नियमांचे काटेकोर पालन, चाणाक्षपणा, हजरबाबीपणा आणि बेमालूम वेषांतरे करण्याची हातोटी, यांमुळे ते पुढे काही महिने पंजाब, बनारस, चंद्रनगर येथे राहू शकले. शेवटी जून १९१५ मध्ये ते जपानला पवननाथ टागोरांच्या पारपत्राच्या मदतीने निसटले. तेथेही युद्ध संपेपर्यंत त्यांनी क्रांतिकार्य चालू ठेवले होते. जपानी सरकारने त्यांना पकडण्याचे व ब्रिटिशांच्या हवाली करण्याचे हुकूम काढले. तेव्हा ते तेथेही अज्ञातवासात गेले. पुढे शोभा व जपानी युवतीशी विवाह केल्यामुळे काही वर्षांनी म्हणजे १९२३ साली त्यांना जपानी नागरिकत्व मिळाले. पुढील १८-१९ वर्षे त्यांनी लेखन-भाषणाद्वारे हिंदी स्वांतत्र्याच्या प्रश्नावर जपानी जनतेमध्ये जाणीव निर्माण करण्याचा अखंड प्रयत्न केला. जपानी जीवनाशीही ते समरस झाले होते.

पूर्व आशियातील हिंदी लोकांची १९४२ च्या मार्चमध्ये भव्य परिषद घेऊन त्यांनी हिंद स्वराज्य लीग स्थापन केली. हिंदी युद्धकैदी व इतर नागरिकांमधून आझाद हिंद फौज उभी करण्याचे कामीही त्यांनी हातभार लावला. जुलैमध्ये लीगचे दुसरे अधिवेशन बँकॉकला भरले. त्यात आझाद हिंद सेनेला जपानी सेनेच्या समान दर्जा मिळावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच राशबिहारींच्या नेतृत्वाखालच्या अस्थायी सरकारचे व आझाद हिंद फौजेचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी जपानला यावे असे जाहीर आवाहन नेताजी सुभाषचंद्र बोस यांना करण्यात आले. वर्षभराने नेताजींकडे दोन्ही संघटना सुपूर्द करून मोठ्या आनंदाने राशबिहारींनी प्रमुख सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांचा तरुण मुलगा महासिदे जपानी फौजेत होता. त्याला ब्रिटिश सेनेशी झालेल्या लढाईत वीरमरण आले. दुसरे महायुद्ध चालू असतानाच त्यांनी देह ठेवला. त्यांची पत्नी शोभा व मुलगी टेटूकी पुढे जपानमध्येच स्थायिक झाल्या.

गोपाळ कृष्ण गोखले

(९ मे १८६६–१९ फेब्रुवारी १९१५). आधुनिक भारताचे एक महान नेते आणि नेमस्त पक्षाचे अध्वर्यु. त्यांचा जन्म कात्‌लुक (रत्नागिरी जिल्हा) येथील एका सामान्य कुटुंबात झाला. अत्यंत गरिबीत गोखले यांचे पहिले दिवस गेले. अठराव्या वर्षी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीचा मार्ग व स्वीकारता स्वार्थत्यागपूर्वक देशसेवा करण्याचे व्रत घेतले. विसाव्या वर्षी ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक झाले आणि त्यांनी सुधारक पत्राचे सहकारी संपादक म्हणून काम सुरू केले. ते सार्वजनिक सभेचे चिटणीस (१८८७) व सभेच्या त्रैमासिकाचे संपादक झाले आणि पुढे १८९१ मध्ये ते परिषदेचे चिटणीस तसेच राष्ट्रसभेचे चिटणीस झाले. वेल्बी आयोगासारख्या महत्त्वाच्या आयोगापुढील प्रमुख साक्षीदार म्हणून त्यांनी एकतिसाव्या वर्षी साक्ष दिली. प्रांतिक विधिमंडळात प्रवेश केल्यानंतर चार वर्षांतच ते केंद्रीय विधिमंडळात निवडून गेले. १९०५ साली ते वाराणसी येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. येथे १९०६ मध्ये त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. महात्मा गांधीनीही पुढे भारत सेवक समाजाचे अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

लोकमान्य टिळक व गोखले यांचे सार्वजनिक जीवन एकाच वेळी सुरू झाले व तेही एकाच व्यासपीठावरून. क्रॉफर्ड प्रकरणातील मामलेदारांवरील अन्यायाला गोखले यांनी सार्वजनिक सभेचे चिटणीस गोपाळ कृष्ण गोखलेगोपाळ कृष्ण गोखले या नात्याने वाचा फोडली व टिळकांनी हे प्रकरण धसास लावले. १८८९ मध्ये मुंबईत काँग्रेसचे अधिवेशन भरले, तेव्हा दोघांनीही एकाच उपसूचनेवर भाषण केले. पण यानंतर दोघांचा मार्ग वेगळा झाला. टिळक जहाल राजकारणाकडे वळले. गोखले यांनी लोकशिक्षणाच्या द्वारे समाजजागृती करण्याचा व राजकीय सुधारणांसाठी सतत प्रयत्न करून ज्या सवलती मिळतील, त्या राबविण्याचा मार्ग स्वीकारला. गोखले यांचे नाव सर्वत्र प्रथम गाजले ते वेल्बी आयोगापुढील त्यांच्या साक्षीने. हिंदुस्थानात राज्यकारभाराचा खर्च कसा वाढत आहे व त्यामुळे करवाढ कशी डोईजड होत आहे; हे त्यांनी सप्रमाण दाखवून राजकीय सुधारणांची आवश्यकता प्रतिपादन केली. गोखले यांच्या या अभ्यासपूर्व साक्षीचा बराच प्रभाव पडला. न्यायमूर्ती रानडे यांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडे त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादींचा जो अभ्यास केला, त्याचा उपयोग त्यांना या साक्षीच्या वेळीच नव्हे, तर नंतरच्याही जीवनात झाला. ‘अभ्यासेचि प्रकटावे’ या समर्थांच्या उक्तीचे मूर्तिमंत रूप म्हणजे नामदार गोखले.

सार्वजनिक जीवनाला गोखले यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक व नंतर प्राचार्यपदापासून सुरुवात केली. पण त्यांच्या कर्तृत्वाला ते श्रेय अपुरे होते. १९०२ मध्ये गोखले मध्यवर्ती कायदेमंडळावर निवडून गेल्यावर त्यांनी अर्थसंकल्पांवर जे भाषण केले, त्यामुळे त्यांचे कर्तृत्व न नेतृत्व देशमान्य झाले. त्या विधिमंडळात त्यांनी अर्थसंकल्पावर बारा भाषण केली. त्यांतून तत्कालीन भारताच्या राजकीय, आर्थिक, शैक्षणिक वगैरे प्रश्नांचा उत्कृष्ट ऊहापोह त्यांनी केला. भारताची शेती, शेतकऱ्यांच्या अडचणी, आयातनिर्यात, करभार, उद्योग, रुपयाचे पौंडाशी नाते, लष्करावरील खर्च असे अनेक विषय त्यांनी व्यासंगपूर्वक हाताळले. उपहास वा घणाघाती घाव हा त्यांच्या भाषणाचा विशेष नव्हे, तर प्रतिपक्षाचे मत समर्पक युक्तिवाद करून वळविण्यावर त्यांचा कटाक्ष असे. गोखले बोलू लागले, की आपल्यापुढे गुलाब पुष्पांचा सडा पडल्यासारखा वाटे, असे सी. वाय्. चिंतामणी यांनी म्हटले आहे. १९०६ सालच्या अर्थसंकल्पावरील गोखले यांचे भाषण ऐकल्यावर, असे भाषण इंग्लंडच्या पार्लमेंटमध्येही क्वचितच ऐकावयास मिळते, असा अभिप्राय व्हाइसरॉय लॉर्ड मिंटो यांनी दिला. इंग्लंडमधील नेशन या त्या वेळच्या नामवंत पत्राचे संपादक मॅसिंगहॅम यांनी गोखले हे तेव्हाचे पंतप्रधान अ‍ॅस्क्विथ यांच्या पेक्षाही श्रेष्ठ असल्याचे मत दिले होते.

आपल्या समाज स्वायत्ततेचा उपयोग घेण्यास लायक बनवायचा, तर निःस्वार्थ अशा समाज सेवकांची एक संख्या तयार केली पाहिजे, असे गोखले यांना वाटत होते. समाजाचे अंतर्बाह्य स्वरूप बदलल्याखेरीज तो स्वातंत्र्याला पात्र होणार नाही, ही रानडे यांची धारणा होती आणि त्याच उद्देशाने त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली (१९०५).

वंगभंगामुळे जो प्रक्षोभ माजला, त्यामुळे गोखले व तत्सम नेत्यांच्या सनदशीर राजकारणाला मोठा धक्का बसला. पण गोखले यांनी राजकीय सुधारणा मिळविण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांचे मत वळविण्याच्या आपल्या प्रयत्नांत कसूर केली नाही. मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा (१९१९) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कायद्याच्या जडणघडणीत गोखले यांचा फार मोठा हात होता. इंग्लंडमध्ये वास्तव्य करून या कामी त्यांनी बरीच शिष्टाई केली होती. सनदशीर राजकारणाचे गोखले प्रवर्तक खरे; पण अखेरच्या काळात कायदेभंगाच्या चळवळीसही त्यांचा विशिष्ट मर्यादेपर्यंत पाठिंबा होता. म. गांधींनी त्यांना गुरू मानले होते. राजकारणातील त्यांच्या कार्याव्यतिरिक्त एक थोर समाजसुधारक म्हणूनही गोखल्यांचे नाव प्रसिद्ध आहे. भारत सेवक समाजाच्या कार्याबरोबर अस्पृश्यता व जातिव्यवस्था यांचे निर्मूलन व्हावे, म्हणून ते नेहमी प्रयत्नशील होते. स्त्रीस्वातंत्र्याचा तसेच त्यांच्या शिक्षणाचा त्यांनी हिरिरीने पुरस्कार केला आणि तत्संबंधीचे आपले विचार वृत्तपत्रकार या नात्याने सुधारक, सार्वजनिक सभा, राष्ट्रसभा समाचार इ. वृत्तपत्रांतून स्पष्ट मांडले. सर्व स्तरांतील लोकांना शिक्षण घेणे सुलभ जावे, म्हणून प्राथमिक शिक्षण मोफत असावे, असे ते म्हणत. याकरिता त्यांनी प्रयत्नही केले.

हायलँड या लेखकाने गोखले यांची तुलना इटलीतील काव्हूरशी केली आहे. काव्हूरप्रमाणेच शक्य कोटीतील काय आहे, प्रस्थापित यंत्रणेतील दोष कसे दूर करता येतील, याचा विचार करून त्या दिशेने प्रयत्न करण्याची त्यांची वृत्ती होती. दोघेही सनदशीर राजकारणावर भिस्त ठेवणारे होते. या राजकारणाची जहालांकडून अतिशय निर्भर्त्सना झाली. पण गोखले यांचे कर्तृत्व, देशसेवा, स्वार्थत्याग, अभ्यास यांबद्दल सरकारप्रमाणेच लोकपक्षाचे नेतेही आदर बाळगीत. लोकमान्यांनी गोखल्यांवरील मृत्युलेखात त्यांच्या या गुणांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. लोकपक्ष व सरकार या दोघांकडून मान्यता मिळणारा असा पुरुष विरळाच सापडतो.

स्वामी विवेकानंद

 स्वामी विवेकानंदांचे मुळचे नाव नरेंद्र. रामकृष्ण परमहंससारख्या तपस्वींनी, श्रेष्ठ गुरूंनी त्यांना "विवेकानंद" नाव दिले. लहानपणापासूनच नरेंद्र तल्लख बुद्धीचा, संवेदनाक्षम व विचारी ! काहीसा एक्कल कोंडा पण तेजस्वी!  भारतीय संस्कृती, धर्म, रीती भाती इ.चा सखोल अभ्यास केला. वाचनाची प्रचंड आवड, उत्कृष्ट वक्ता! त्याच्या शब्दांनी परकीयांना मोहून टाकले. प्राथमिक गरजांची पूर्ती करणारे शिक्षण स्वामींना अभिप्रेत होते. भारतातील अध्य्त्म आणि पाश्चात्यांचे विज्ञान एकत्र असल्याच भारत जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र ठरेल. त्यासाठी परदेशात जाऊन विद्यार्थाने शिकावे व शिकवावे असे त्यांचे विचार होते.

नव-नवीन विचार रोज आत्मसात करावेत. मानोंनिग्रह हवा. त्यासाठी मन-साक्षरता जरुरी, मुलांना योग्य स्वातंत्र्य देणे गरजेचे, वृत्तीमध्ये सतत बदल व्हावे तरच देशाची उन्नती होईल. असे त्यांचे मत होते. प्रत्येक स्त्री मधे पुरुषतत्वे असतात. तसेच प्रत्येक  पुरुषात स्त्री तत्वे असतात. त्यामुळे स्त्री-पुरुष समानता मानने गरजेचे असे ते म्हणत! वृत्तीने संन्यस्त होते, पण सर्व विषयांचा सखोल अभ्यास होता. विचार परखड, वाणी शुद्ध, स्पष्ट, अनेक भाषा अवगत होत्या. कलकत्त्या जवळ हुबळी नदीच्या काठी बेल्लूर मठाची स्थापना केली. कट्टर हिंदुवादी होते. मानवतावादाचा, तत्वाचा प्रसार करू मार्गदर्शन केले.

स्वामी विवेकानंद जयंती हा दिवस युवक दिन म्हणून साजरा करतात. युवकात सर्व प्रकारचे बल असते.  तारुण्यात प्रवेश करताना युवा पिढीला अनेक आव्हानांना, स्पर्धेला सामोरे जावे लागते. युवा पिढी इंटरनेट व मोबाईल च्या जाळ्यात अडकत आहे. यंत्राचे आपण गुलाम होण्यापेक्षा यंत्राच्या सहाय्याने आपल्यातील बल वाढवणे, बुद्धीला चालना देणे यासाठी यंत्राचा वापर करावा. अति वापरणे बुद्धीला गंज चढतो. shortcuts वर वर चांगले, पण चिकाटी धरून अंतरापर्यंत जाऊन शिक्षण घेण्याचे बळ  मिळवणे जरुरी. नाविन्याची ओढ, उमेद व जोम आहे. पण योग्य दिशेचा अभाव प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याचे बळ अंगी कारावे. आयत्या वाढलेल्या तटावर कोणीही ताव मारेल, पण ताट उपलब्ध करण्याचे बळ (क्षमता) हवी.

भाषा-सदृश्य व प्रवाही हवी. सतत शिकत राहण्याची क्षमता वृत्ती अंगी बाणणे जरुरी. सकारात्मक दृष्टी हवी. विवेकानंदाप्रमाणे पराकोटीचे उच्च विचार करण्याची तयारी करणे. उच्च विचार करण्याची सवय लागली की आचरण शुद्ध होते

जागतिकीकरणामुळे जग जवळ आले. work satisfaction नाही, संधी नाही, असे नकारात्मक विचार न आणता सकारात्मक विचारांचे बळ अंगीकारावे. Selfhelp, self study हे तत्व चिरंतन आहे. सतत कोणाच्या तरी खांद्यावर आपले ओझे न टाकता आपलेच खांदे मजबूत करणे महत्वाचे! संयम, शांतता हे गुण योगोभ्यासाने अंगी बांधतात. पालकांनी बालकाचे आत्मिक बळ वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. सतत अपेक्षांचे, इच्छांचे ओझे पाल्यांवर घालु नये. जीवनातल्या बदलत्या परिस्थितीनुसार बदलने जरुरी याची जाणीव करून देणे गरजेचे! स्पर्धेचा घोडा बनू नये किंवा जे मागेल ते ते पुरवणे असेही अति लाड करू नयेत. उंच भरारी सर्वच जन मारू शकत नाहीत, पण दुबळेपणा झटकून जमिनीवर घट्ट पाय रोऊन जमीन (धरणीमाता) सुवर्णमय बनवण्याचे बळ बालकांच्यात निर्माण करणे, त्यांना सुखी करणे महत्वाचे! हीच स्वामीजींना भावपूर्वक श्रद्धांजली.

डॉ. झाकिर हुसेन


(८ फ्रेब्रुवारी १८९७ – ३ मे १९६९ ). भारताचे तिसरे राष्ट्रपती व एक ख्यातनाम शिक्षणतज्ञ. त्यांचा जन्म अफ्रिडी अफगाण मुसलमान कुटुंबात हैदराबाद (सिंध) येथे झाला. त्यांचे वडील वकील होते; पण झाकिर हुसेन नऊ वर्षांचे होते, तेव्हा ते वारले. त्यामुळे शिक्षणासाठी त्यांस अनेक ठिकाणी हिंडावे लागले. इटावा, अलीगढ आणि बर्लिन या ठिकाणी शिक्षण घेऊन अखेर त्यांनी अर्थशास्त्र विषयात पीएच्.डी. ही पदवी मिळविली. ही पदवी मिळविण्यापूर्वी ते १९२० मध्ये ⇨जामिआ मिल्लिया इस्लामिया या शिक्षणसंस्थेकडे आकर्षित झाले होते. जर्मनीहून भारतात परत येताच, त्यांनी आपले सर्व जीवन या संस्थेस समर्पित केले. १९२५ मध्ये ही संस्था दिल्लीस हलविण्यात आली व तिचे झाकिर हुसेन १९२६ मध्ये कुलगुरू झाले. त्यांनी जवळजवळ बावीस वर्षे (१९२६–४८) या संस्थेचे कार्य केले व तिला एका अभिनव शिक्षणसंस्थेचे स्वरूप दिले. शैक्षणिक वाटचालीतील त्यांची स्फूर्तिस्थाने दोन होती : म. गांधी व जर्मन शिक्षणशास्त्रज्ञ केर्शेनस्टाइनर. विद्यापीठात बौद्धिक स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्य पुरेपुर असावे आणि व्यासंगी विद्वानांचे ते सभास्थान व्हावे; कारण अशा वातावरणात विद्यार्थ्यांचे नीतिधैर्य विकास पावते अशी त्यांची धारणा होती. त्यांनी स्वयंशिक्षणावर भर देऊन नव्या शैक्षणिक कल्पना जामिआ मिल्लियामध्ये रुजविल्या. ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू झाले (१९४८–५६). १९५६ साली ते राज्यसभेवर निवडून आले. पुढे ते बिहारचे राज्यपाल झाले आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले (१९६२). १९६७ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले.

अनेक शैक्षणिक समित्यांवर त्यांनी काम केले. त्यांपैकी यूनेस्को, विद्यापीठ अनुदान आयोग, मध्यवर्ती माध्यमिक मंडळ, विद्यापीठीय शैक्षणिक आयोग ह्या काही महत्त्वाच्या संस्था होत. त्यांना अनेक परदेशीय आणि भारतीय विद्यापीठांनी डी. लिट्. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले. भारत सरकारने त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा यथोचित गौरव पद्मविभूषण (१९५४) आणि सर्वोच्च असा भारतरत्न (१९६३) हा पुरस्कार देऊन केला. महात्मा गांधींचे ते प्रथमपासून निष्ठावान अनुयायी होते. महात्माजींनी त्यांना मूलोद्योग शिक्षण समितीचे १९३७ मध्ये अध्यक्ष केले. आयुष्यभर त्यांनी या शिक्षणपद्धतीचा पुरस्कार केला.

त्यांनी शिक्षण, अर्थशास्त्र वगैरे विषयांचे आपले विचार अनेक व्याख्यानांद्वारे मांडले. त्यांपैकी काही व्याख्याने द डायनॅमिक युनिव्हर्सिटी या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. जर्मन भाषेमध्ये त्यांनी म.गांधींचे चरित्र लिहिले, तसेच प्लेटोच्या रिपब्लिकचे उर्दूत भाषांतर केले. लहान मुलांकरिता काही गोष्टीही त्यांनी लिहिल्या.

स्फटिकांचा आणि चित्रविचित्र खड्यांचा संग्रह करणे, हा त्यांचा आवडता छंद होता. ते ग्रंथप्रेमी होते व त्यांचे ग्रंथालय नव्या नव्या ग्रंथांनी नेहमी भरलेले असे. राष्ट्रपती असतानाच नवी दिल्ली येथे ते हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. एक नेमस्त, चारित्र्यवान व शिक्षणतज्ञ असा राष्ट्रीय मुस्लिम नेता म्हणून त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे.

रामकृष्ण परमहंस

 

(१८ फेब्रुवारी १८३६–१५ ऑगस्ट १८८६). एकोणिसाव्या शतकात बंगालमध्ये होऊन गेलेले एक जगविख्यात सत्पुरुष. मूळ नाव गदाधर, वडील क्षुदिराम चतर्जी, आई चंद्रामणीदेवी. गदाधरांचा जन्म कलकत्त्यापासून सु. १०० किमी. दूर असलेल्या कामारपुकुर या खेड्यात व शालेय शिक्षण गावातील धर्मदास लाहा यांच्या शाळेत केवळ एकदोन इयत्ता इतकेच झाले. अगदी लहानपणापासून ईश्वरभक्ती व साधुबैरागी यांकडे त्यांची ओढ होती.काळ्याभोर ढगांच्या पृष्ठभूमीवरून आकाशातून उडत चाललेली पांढऱ्या शुभ्र बगळ्यांची रांग पाहून गदाधरांचे भान नष्ट झाले. भक्तिपर गाणी ऐकताना, शिवाची भूमिका नाटकात करीत असतानाही तसाच भावावेश होई. ईश्वराशी मन असे तन्मय होण्याची जन्मसिद्ध प्रवृत्ती त्यांच्या ठायी होती व ती सतत टिकून राहिली. १८४३ मध्ये त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.

गदाधरांची नवव्या वर्षी मुंज झाली. आधी शब्द दिला होता म्हणून मुंजीच्या वेळी पहिली भिक्षा त्यांनी धानी लोहारणीकडून घेतली. हे परंपरेहून वेगळे पाऊल होते.उदरनिर्वाहासाठी पाठशाळा चालवणारा थोरला भाऊ राजकुमार याने १८५२ मध्ये गदाधरांना कलकत्त्यास आणले. शाळेत शिकण्याचा विषय काढला, तर गदाधरांनी म्हटले, ‘मला भातभाकरीची विद्या नको, ईश्वरदर्शन होईल अशी विद्या हवी’. कलकत्त्यापासून सु. ६ किमी. वरील दक्षिणेश्वर या खेड्यात गंगेच्या तीरावर १८५५ मध्ये राणी रासमणीने उभारलेल्या कालीमातेच्या मंदिरात रामकुमार पुजारी झाला. शुद्राची सेवा ब्राह्मणाने करू नये, या कारणासाठी प्रथम नकार दिलेल्या गदाधरांनी राणी रासमणीचे जावई व मंदिराचे व्यवस्थापक मथुरानाश विश्वास यांच्या आग्रहावरून वर्षभराने ते पुजारीपण स्वीकारले. १८५६ मध्ये रामकुमारचा मृत्यु झाला.

यानंतर गदाधरांची ईश्वरभक्ती उत्कट होत चालली. मंदिराजवळच्या पंचवटीतील वडाच्या झाडाखाली ते रात्री जात. धोतर सोडून ठेवीत, ब्राह्मणत्त्वाचे चिन्ह असे यज्ञोपवीत काढून ठेवीत आणि ध्यानधारणा करीत. उत्कटता वाढत चालली. रात्र व दिवस यांचे भान नष्ट होत गेले. ‘आई, दर्शन दे’ असा आक्रोश सुरू झाला. अशा वेळी तहानभुकेची वा अंगावरच्या वस्त्राचीही शुद्ध त्यांना राहत नसे.भाचा हृदय हा दोन घास गदाधरांना भरवी. अखेर एके दिवशी आवेगाच्या भरात गाभाऱ्यातील कालीमातेचे खड्‌ग घेतले व ते मानेवर चालवणार, एवढ्यात जगन्मातेचे दर्शन त्यांना झाले. या वेळी त्यांचे वय पंचवीस होते. यानंतरचे त्यांचे सारे दैनंदिन जीवन ईश्वरानुभवाच्या प्रकाशात उजळून निघाले. गदाधरांस रामकृष्ण हे नाव कोणी व केव्हा दिले हे ठरवता येत नाही. रामकृष्ण विवाहित होते. १८५९ मध्ये वयाच्या तेविसाव्या वर्षी जयरामवाटी येथील रामचंद्र मुखोपाध्याय यांची सहा वर्षांची कन्या सारदामणी हिच्याशी त्यांचा विवाह झाला. पण लौकिक अर्थाने त्यांनी वैवाहिक जीवन स्वीकारले नाही. वयाच्या अठराव्या वर्षी दक्षिणेश्वरला आलेल्या सारदादेवींची त्यांनी जगन्माता या नात्याने केलेली षोडशी पूजा, हा रामकृष्णांच्या आध्यात्मिक साधनेतील अखेरचा टप्पा. सारदादेवींना रामकृष्णांनी आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णपणे सहभागी करून घेतले आणि त्याही सर्वार्थांनी त्यांच्या सहधर्मिणी झाल्या. रामकृष्णांच्या खालोखाल त्यांच्या अनुयायीवर्गात सारदामाता यांचे स्थान मान्यता पावले आहे.

कालीमातेची रीतसर पूजा करू लागण्याच्या आधीचा एक धार्मिक विधी म्हणून रामकृष्णांनी कलकत्त्यातील केनाराम भट्टाचार्य यांच्याकडून दीक्षा घेतली होती. ते साधनाकालापूर्वीचे त्यांचे दीक्षागुरू. त्यानंतरचे त्यांचे गुरू दोन. १८६१ मध्ये दक्षिणेश्वरला आलेल्या भैरवी ब्राह्मणी या चाळिशीतील संन्यासिनीने दोन अडीच वर्षांच्या अवधीत रामकृष्णांकडून तंत्रमार्गानुसार सर्व प्रकारच्या साधना करून घेतल्या. रामकृष्ण हे ईश्वराचा अवतार आहेत, असे शास्त्रीपंडितांच्या सभेत भैरवी ब्राह्मणीने प्रथम म्हटले. सुमारे सहा वर्षे रामकृष्णांच्या सहवासात राहून ती काशीला गेली. १८६४ मध्ये तोतापुरी हा संन्यासी दक्षिणेश्वरला आला. त्याने रामकृष्णांकडून वेदान्ताची साधना करून घेतली. त्या आधी त्यांना संन्यास दीक्षा दिली. तीन दिवसांनी समाधी लागली. ती तीन दिवस राहिली. हा निराकाराचा साक्षात्कार. दहा महिने राहून तोतापुरी गेल्यावर रामकृष्ण अद्वैतानुभवाच्या अवस्थेत सतत सहा महिने होते. त्यानंतर त्यांना आदेश मिळाला. ‘भावमुखी राहा’. १८६६ मध्ये गोविंद राय यांच्यामुळे इस्लाम धर्मानुसार त्यांची साधना झाली, तर शंभुचरण मल्लिक यांच्यामुळे बायबलचा परिचय झाला. येशू ख्रिस्तीने दर्शन दिले आणि आपल्या शरीरात प्रवेश केला, असे रामकृष्णांनी म्हटले आहे. या सर्व अनुभवांतून, सारे धर्म हे एका परमेश्वराकडे जाण्याचे मार्ग आहेत, हे रामकृष्णांचे मत बनले. १८६८ मध्ये त्यांनी मधुरबाबूंबरोबर काशीवृंदावनची यात्रा केली.

कलकत्त्यातील सुशिक्षितांना रामकृष्णांची माहिती ब्राह्मो समाजाचे नेते  केशवचंद्र सेन यांनी रामकृष्णांवर लिहिलेल्या लेखामुळे प्रथम झाली. दक्षिणेश्वरला दर्शनासाठी लोक येऊ लागले. रामकृष्णांचे भक्तगणांशी तासनतास चालणारे संवाद  महेंद्रनाथ गुप्त यांनी ‘एम्.’ या टोपणनावाने श्रीरामकृष्ण कथामृत – ५ खंड, १८९७ – १९३२ (म. भा. श्री रामकृष्ण वचनामृत – १९५१) या ग्रंथात संकलित केले. अखेरच्या चार वर्षातील हे संवाद आहेत. त्यांवरून त्यांची शिकवणूक कळते. या ग्रंथाचे इंग्रजी रूपांतर स्वामी निखिलानंदांनी द गॉस्पेल ऑफ श्रीरामकृष्ण (१९४४) या नावाने केले. या ग्रंथाची तुलना बायबलशी केली गेली. रामकृष्णांचा उपदेश अधिकारानुसार असे.कामिनीकांचनाच्या मोहात मर्यादेबाहेर गुंतू नये, आपली किमान कौटुंबिक कर्तव्ये पार पाडावीत, ईश्वरदर्शन हे जीवनाचे ध्येय मानावे व त्यासाठी पतिपत्नींनी मिळून प्रयत्न करावा, असा उपदेश ते प्रापंचिकांना करीत. कामिनीकांचनाचा सर्वथा त्याग, संन्यासव्रताचा स्वीकार व आध्यात्मिक जीवनाचा आदर्श हा उपदेश त्यांनी अगदी निवडक करूण शिष्यांना केला. कलियुगात सत्यपालन हीच तपश्चर्या, माया टाळावी पण दया टाकू नये, शिवभावाने जीवांची सेवा करावी, निर्विकल्प समाधीपेक्षा सारे विश्व हे परमेश्वराचे रूप हा अनुभाव श्रेष्ठ होय, ज्ञान वा भक्ती किंवा साकार वा निराकार यांतील आपल्याला रुचेल व पचेल ते घ्यावे, अशी त्यांची काही प्रमुख विचारसूत्रे आहेत.

रामकृष्णांनी एकही ग्रंथ वाचला नव्हात, काही पुराणे-प्रवचने ऐकली होती. आध्यात्मिक साधनेतून घेतलेला साक्षात अनुभव हा त्यांच्या विचारांचा एकमेव आधार होता. सारे बोलणे प्रचीतीचे होते. त्यामुळे स्वामी दयानंद, बंकिमचंद्र चतर्जी, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर किंवा केशवचंद्र सेन अशा नामवंत व्यक्तीही त्यांच्या आध्यात्मिक धारणेच्या दर्शनाने प्रभावित झाल्या. बलराम बसू, डॉ. रामचंद्र दत्त, साधू नागमहाशय, महेंद्रनाथ गुप्त, गिरीशचंद्र घोष, सुरेंद्रनाथ मित्र हे त्यांचे प्रमुख गृहस्थाश्रमी शिष्य होते. काही स्त्रियाही त्यांच्या शिष्यवर्गात होत्या. दहा बारा तरुण अंतरंगशिष्य हे सारे संन्यासी होते. त्यांतील अग्रणी म्हणजे स्वामी  विवेकानंद. त्यांनी स्थापन केलेल्या  रामकृष्ण मिशन या संस्थेच्या देशविदेशांतील शंभरावरील शाखांच्या द्वारा रामकृष्णांचा आध्यात्मिक संदेश आज जगात सर्वदूर पसरलेला आहे. रामकृष्ण अखेरचे सात-आठ महिने घशाच्या कर्करोगाने आजारी होते. कलकत्त्यामधील काशीपूरच्या उद्यानगृहात त्यांनी महासमाधी घेतली.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्


सर्वपल्ली राधाकृष्णन् : (५ सप्टेंबर १८८८ – १६ एप्रिल १९७५). भारताचे दुसरे राष्ट्रपती (१९६२ – ६७) आणि पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर तत्त्वचिंतक. त्यांच्या इंडियन फिलॉसॉफी या द्विखंडात्मक ग्रंथात भारतीय तत्त्वज्ञान इंग्रजीत सुंदर शैलीत मांडले आहे. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तिरुत्तनी या गावी झाला व उच्च शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये झाले. नंतर मद्रासचे प्रेसिडेन्सी कॉलेज (१९०९ – १६). म्हैसूर विद्यापीठ (१९१६ –२१), ‘राजे पंचम जॉर्ज अध्यासन’, कलकत्ता विद्यापीठ (१९२९ ३१) या ठिकाणी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.त्याच वेळी ते ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचे प्राध्यापक (१९२९) व नंतर वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू (१९३१ –३५), लंडन येथे ‘पौरस्त्य धर्म आणि नीतिशास्त्र’ यांचे प्राध्यापक (स्फाल्डिंग प्रोफेसर). बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू (१९३९ ४८) होते. १९३१ ते ३९ पर्यंत ते राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते. १९४९ ते १९५२ पर्यंत भारताचे रशियातील राजदूत म्हणून त्यांनी काम पाहिले. त्या वेळी आपली नेहमीची प्रथा मोडून स्टालिनने त्यांना मुद्दाम बोलावून त्यांची भेट घेतली.

अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेचे (१९२७) आणि अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे (१९३०) अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. ऑक्सफर्ड येथील ऑप्टन व्याख्यानमाला तसेच हिबर्ट व्याख्यानमाला गुंफण्याचा बहुमानही त्यांना लाभला. १९५४ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन गौरविले. १९५२ ते १९६७ पर्यंत प्रथम भारताचे उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती होऊन ते निवृत्त झाले. निवृत्तिकालात ते मद्रास येथे जाऊन राहिले.तेथेच थोड्या विमनस्क अवस्थेत त्यांचे निधन झाले.

त्यांनी तत्त्वचिंतनात स्वतःची अशी कोणतीच भर घातली नाही अशी टीका पुष्कळदा केली जाते. ती खरीही आहे आणि खोटीही आहे. खरी अशाकरता, की आपल्या लिखाणात शंकराचार्याच्या केवलाद्वैत मताचीच थोडी फेरमांडणी करून त्यांनी जी मांडणी केली ती आधुनिक काळाला साजेल अशी केली. नित्य परिवर्तनशील परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर शाश्वत मूल्यांचे पुनर्संस्करण केले. शांकर तत्त्वज्ञानाच्या आधारावर प्रवृत्तीपर जीवन जगता येईल असे त्यांनी दाखवून दिले. सगुण ब्रह्म अथवा ईश्वर हा निर्गुण परब्रह्माचा खालच्या पातळीवरील आविष्कार आहे असे न म्हणता, भक्ताशी असलेल्या त्याच्या संबंधाच्या अपेक्षेने ग्रहण केल्यावर जो ईश्वर म्हणून भासतो त्याचेच संबंध – निरपेक्ष रीतीने ग्रहण केल्यावर तो परब्रह्म म्हणून उरतो असे त्यांचे प्रतिपादन आहे. राधाकृष्णन् यांनी मायावाद स्वीकारला; जग ईश्वरावर अवलंबून आहे, स्वप्रतिष्ठित नाही आणि अशाश्वत आहे असा त्यांनी त्याचा अर्थ केला. हिंदू धर्मास काही अर्वाचीन रूप मिळाले आहे असे मानल्यास त्याचे श्रेय स्वामी विवेकानंद, डॉ. भगवानदास, म. गांधी इत्यादींच्या प्रमाणे राधाकृष्णन् यांनाही आहे.

सर्व धर्मांतील मूलभूत सत्य एकच आहे आणि ही वृत्ती हिंदू धर्माने विशेषकरून जोपासली आहे. असे राधाकृष्णन् यांनी सांगितले. कोणत्याही धर्माच्या शिकवणुकी या तत्त्वज्ञानाचा अभ्यासविषय आहेत; देवशास्त्राच्या (थिऑलॉजीच्या) नाहीत असे त्यांचे म्हणणे होते. असे ते म्हणू शकले याचे कारण ज्ञानमीमांसेत प्रत्यक्ष व अनुमान यांच्याप्रमाणेच अंतःप्रज्ञ (इंट्यूइशन) हेही सत्यज्ञान मिळविण्याचे एक साधन आहे असे त्यांनी मानलेले आहे. धर्मग्रंथांचे प्रामाण्य त्यांत ग्रथित असलेल्या ऋषींच्या गूढानुभूतींवर आहे, त्या ग्रंथाच्या ईश्वरकर्तृत्वावर नाही, अशी त्यांची भूमिका आहे. ही दृष्टी पतकरली म्हणजे धर्माची चिकित्सा करता येते आणि प्रस्थापित धर्ममतांचा समन्वयही करता येतो.

बुद्धाने अनात्मवाद सांगितला; पण राधाकृष्णन् यांच्या मताप्रमाणे तो अनात्मवाद आणि वेदान्ताचा आत्मवाद अथवा ब्रह्मवाद यांच्यात विरोध नाही.बुद्धाने नाकारला तो ‘मी’ आणि ‘माझे’ अशी वृत्ती निर्माण करणारा जीवात्मा होय. जीवात्मा हा अहंकाराचा परिणाम होय. अहंकाराचा लोप झाला म्हणजे निर्वाणरूपी परम शांतीचा अनुभव येतो. वेदान्तही अहंकाराचे विसर्जन करावयास सांगतो. अहंकार नष्ट झाल्यावर जो शुद्ध चैतन्याचा अनुभव येतो, त्यास वेदान्तात आत्म्याचा अनुभव म्हणतात.

खरे म्हटले तर धर्म एकच असतो. संप्रदाय अनेक असतात. याचा अर्थ असा नव्हे, की कोणताही संप्रदाय व त्याच्या विशिष्ट परंपरा नाहीशा केल्या पाहिजेत. इतकेच केले पाहिजे, की संप्रदायांनी आपापली आग्रही वृत्ती सोडली पाहिजे.

द रेन ऑफ रिलिजन इन कंटेंपररी फिलॉसॉफी या १९२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात त्यांच्या मनाचा कल रामानुजांच्या विशिष्टाद्वैत मताकडे– म्हणजे सगुणोपासनेकडे- झुकलेला दिसतो. पुढे १९२३ (पहिला भाग) व १९२७ (दुसरा भाग) या साली प्रसिद्ध झालेल्या इंडियन फिलॉसॉफी या ग्रंथात शंकराचार्याचे केवलाद्वैत मत त्यांनी शिरोधार्य मानलेले दिसते. पण १९२९ साली प्रसिद्ध झालेल्या अॅन आयडियालिस्ट व्ह्यू ऑफ लाइफ या ग्रंथात त्यांचे जीवनविषयक समग्र तत्त्वज्ञान साररूपाने आले आहे असे म्हणता येईल. यात असे म्हटले आहे, की देहपातापूर्वीही व्यक्तीला ईश्वराशी सायुज्यता मिळू शकेल; पण अंतिम मोक्ष अथवा ब्रह्म-निर्वाण हे सर्व जीव मुक्त झाल्याशिवाय एका व्यक्तिला प्राप्त होणार नाही. म्हणून सायुज्य मुक्ती प्राप्त झालेले महामानव हे इतर जीवांच्या उद्धारासाठी प्रयत्नशील राहतात. हे मत महायान पंथातील बौद्ध मतासारखे बोधिसत्व संकल्पनेसारखे आहे. त्यांनी उपनिषदे वप्रिन्सिपल उपनिषद्स (१९५३), ब्रह्मसूत्रे (द ब्रह्मसूत्राज – १९६०) व भगवद्‌गीता (द भगवद्‌गीता – १९४८) या वेदान्ताच्या ⇨ प्रस्थानत्रयीवर भाष्यस्वरूप ग्रंथ लिहिल्यामुळे प्राचीन अर्थाने त्यांना ‘आचार्य’ ही उपाधी लावता येईल. यांशिवाय द फिलॉसॉफी ऑफ रविंद्रनाथ टागोर (१९१८), द हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ (१९२६), ईस्ट अँड वेस्ट इन रिलिजन (१९३३), ईस्टर्न रिलिजन्स अँड वेस्टर्न थॉट (१९३९), द धम्मपद (१९५०), द रिकव्हरी ऑफ फेथ (१९५५) इ. त्यांची ग्रंथरचना आहे.

धर्म व तत्त्वज्ञान यांप्रमाणे शिक्षण हाही त्यांच्या परिशीलनाचा विषय होता. शिक्षणाने व्यक्तीला आत्मभान झाले पाहिजे आणि आपल्या विचाराची दिशा ठरविता आली पाहिजे, असे त्यांचे मत होते. स्वतंत्र भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचे (१९४८) ते अध्यक्ष होते. त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी व ह्या आदर्श शिक्षकाच्या सन्मानार्थ भारतात सर्वत्र त्यांचा जन्मदिन (५ सप्टेंबर) हा ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा केला जाते.

आज ज्याला विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान म्हणतात त्याच्याशी आपल्या विचारांचा सांधा जमवून घेण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. त्याचप्रमाणे आजच्या अस्तित्ववादाविषयीही त्यांनी फारसा आदर दाखविला नाही. त्यांच्या मते, उपनिषदांतील तत्त्वज्ञान हेच खरे अस्तित्ववादी आहे. कारण, त्याची सुरूवात आत्म्याच्या अस्तित्वापासून होते. जडवादात अंतःप्रज्ञेला अथवा गूढानुभूतीला स्थान नसल्यामुळे आध्यात्मिक मर्मदृष्टीला तो पारखा होतो.

गाडगे महाराज



गाडगे महाराज (जन्म: फेब्रुवारी २३, १८७६- मृत्यु: २० डिंसेंबर १९५६ ) हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.


बालपण :

गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते.

डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.


सामाजिक सुधारणा :

१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्‍यांना शिकविला.

दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.


समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.


त्यांनीनाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.


महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.


अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.

"संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश "

गाडगेबाबा प्रबोधन काव्य

भुकेलेल्यांना = अन्न

तहानलेल्यांना = पाणी

उघड्यानागड्यांना = वस्त्र

गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत

बेघरांना = आसरा

अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार

बेकारांना = रोजगार

पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय

गरीब तरुण-तरुणींचे = लग्न

दुःखी व निराशांना = हिंमत

गोरगरिबांना = शिक्षण

हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!


संक्षिप्त चरित्र :-

गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.

ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले.

१९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.

१९२५- मुर्तिजापूर येथे गोरक्षण कार्य केले आणि धर्मशाळा व विद्यालय बांधले.

१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली.

"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.

फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.

गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.

१९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.

गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.

"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले.[१]

आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'

१९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.

१९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.

गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.

डॉ आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत.

२० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू. गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.


गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते.


गाडगेबाबा आणि बाबासाहेब आंबेडकर :

१४ जुलै १९४१ ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्‍या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."

तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.


गाडगेबाबांचे विचार :

एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना...समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, " बिचार्‍या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता ?त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून ?"

पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते.. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले "टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू? महाराज काय बी करा पण आम्हालाबी ब्राह्मण करा."


गाडगे महाराज यांच्यावरील पुस्तके :

The Wandering Saint (वसंत शिरवाडकर) - श्री गाडगे बाबा प्रकाशन समिती, मुंबई

आपले संत (एस.ए. कुलकर्णी) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९३)

कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे) -लोकवाड्मय गृह, मुंबई (१९९२)

गाडगेबाबा (वसंत पोतदार) -अक्षर प्रकाशन, मुंबई (१९९९)

गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी) - विजयश्री प्रकाशन, अमरावती (१९९३)

गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार) -योगेश प्रकाशन, पुणे (१९९३)

दिव्याला गाडगे महाराज (गो. भट) -नवलवय मुद्रणालय, अहमदाबाद (१९८२)

मानवता के पुजारी संत श्री गाडगे बाबा (स्यमंत सुधाकर) -गाडगेबाबा प्रकाशन समिती, मुंबई (१९९०)

मुलांचे गाडगेबाबा (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला कोल्हापूर (१९९२)

लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)

लोकोत्तर गाडगेबाबा जीवन आणि कार्य (द.ता. भोसले) -ग्रंथाली, मुंबई (२००७)

श्री. संत गाडगे महाराज (मधुकर केचे) -साकेत प्रकाशन, औरंगाबाद (२००४)

श्री. संत गाडगे महाराज (गो.नी. दांडेकर) -मॅजेस्टिक, प्रकाशन मुंबई (१९९५)

श्री. संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पा.बा. कवडे) -अण्णासाहेब कोरपे चॉरिटेबल ट्रस्ट, अकोला (१९९४)

श्री. गाडगे महाराज गौरव ग्रंथ (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)

श्री. गाडगे महाराज शेवटचे कीर्तन (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९५)

श्री. गाडगेबाबांचे विचार (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला, कोल्हापूर (१९९६)

श्री. गाडगेबाबांची पत्रे (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९१)

श्री. संत गाडगेबाबा विचार धन (ह.रा. हिवरे) -नारायणराव अमृतराव लभडे प्रकाशन (१९९९)

संत गाडगे महाराज (डॉ. श्याम दयार्णव कोपर्डेकर) - (१९९६)

संत गाडगे बाबांच्या आठवणी (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)


संकीर्ण :

डेबू हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे.

देवकीनंदन गोपाळा हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे.


पुरस्कार :

गाडगेबाबा यांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान चालवले जाते. त्यांच्या नावाने काही पुरस्कारही देण्यात येतात.

१. महाराष्ट्र सरकारतर्फे गाडगेबाबा निर्मल ग्राम पुरस्कार

२. पिंपरी शहर लॉन्ड्री संघटनेचे (अ) राष्ट्रसंत गाडगेबाबा सामाजिक जाणीव पुरस्कार.(ब) राष्ट्रसंत गाडगेबाबा युवा समाजभूषण पुरस्कार.

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले विविध उठाव :


👉1.संन्याशाचा उठाव

1765-1800

बंगाल

शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक


👉2.चुआरांचा उठाव

1768

बंगाल-मिजापूर जिल्हा

जगन्नाथ घाला


👉3.हो जमातीचे बंड

1820

छोटा नागपूर व सिंग

भूम


👉4.जमिनदारांचा उठाव

1803

ओडिशा

जगबंधु


👉5.खोंडांचा उठाव

1836

पर्वतीय प्रदेश

दोरा बिसाई


👉6.संथाळांचा उठाव

1855

कान्हू व सिंधू


👉7.खासींचा उठाव

1824आसाम

निरत सिंग


👉8.कुंकिंचा उठाव

1826

मणिपूर


👉9.दक्षिण भारतातील उठाव


👉10.पाळेगारांचा उठाव

1790

मद्रास


👉11.म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव

1830

म्हैसूर


👉12.विजयनगरचा उठाव

1765

विजयनगर


👉13.गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव

1870

गोरखपूर


👉14.रोहिलखंडातील उठाव

1801

रोहिलखंड


👉15.रामोश्यांचा उठाव

1826

महाराष्ट्र

उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत


👉16.भिल्ल व कोळ्यांचा उठाव

1824


👉17.केतूरच्या देसाईचा उठाव

1824

केतूर


👉18.फोंडा सावंतचा उठाव

1838


👉19.लखनऊ उठाव


👉21.भिल्लाचा उठाव

1825

खानदेश


👉21.दख्खनचे दंगे

1875

पुणे,सातारा,महाराष्ट्र

शेतकरी

रशिया



🎯रशियाचा इतिहास🎯


🔵रशिया हा युरेशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे . रशिया हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश आहे. 


🔴पर्वेकडील स्लेव्स आणि फिंनो-युग्रिक लोक यांनी रशियाच्या इतिहास्ची सुरुवात केली . 


🔵रशियाची राजधानी *मॉस्को* आहे . तिकडे अधिक्रत लोक रशियन भाषा म्हणतात . 


🔴जन १२, १९९० तारिखला रशिया स्वातंत्र घोषित झाला पण मान्यता त्यांना डिसेंबर २६, १९९१ ला मिळाली . 


*🎯रशियन साम्राज्य-🎯*


🔵रशियन साम्राज्य ही जगातील एक भूतपूर्व महासत्ता आहे. रशियातील *झारशाही* नंतर १७२१ साली रशियन साम्राज्याची स्थापना झाली व १९१७ सालच्या रशियन क्रांती दरम्यान त्याचा पाडाव झाला. 


🔴रशियन साम्राज्याच्या अस्तानंतर सोविएट संघाचा उदय झाला.१७२१ साली, पीटर द ग्रेट अधिपत्याखाली रशियन साम्राज्य उदयास आले. 


*🔵पीटरने*एप्रिल २७, इ.स. १६८२ पासून मृत्यूपर्यंत राज्य केले. इ.स. १६९६पर्यंत पीटरचा सावत्रभाऊ इव्हान पाचवा व पीटर असे दोघांनी एकत्र राज्य सांभाळले. 


🔴पीटरने रशियाचे साम्राज्य युरोप व आशियामध्ये सर्वदूर फैलावले व रशियाला जगातील महासत्तेचा दर्जा दिला. 


🔵या कारणास्तव त्याचा उल्लेख रशियात व इतरत्र पीटर द ग्रेट (प्योत्र वेलिकी, महान पीटर) असा करतात. 


🔴इ.स. १६८२ ते १७२५ या काळात पीटर रशियावर राज्य करत होता. त्याने उत्तरेकडच्या एका युद्धात स्वीडिश साम्राज्याचा पराभव केला . व स्वीडनकडील प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले. 


🔵ह प्रदेश बाल्टिक समुद्राला लागून असल्याने रशियाला समुद्रातून व्यापार करणे शक्य झाले.


🔴 बाल्टिक समुद्राला लागूनच पीटर द ग्रेटने *सेंट पीटर्सबर्ग* ही राजधानी उभारली.


🔵 एलिझाबेथ ही पीटर द ग्रेट ची मुलगी होती . पीटरनंतर गादीवर *एलिझाबेथ* बसली . तिच्या कारकीर्दीत रशियाने ७ वर्षीय युद्धात भाग घेतला, व पूर्व प्रशिया जिंकुन घेतले. 


🔵कथेरिन दुसरी किंवा *"महान कॅथेरिन"* हिने रशियावर इ.स. १७६२-९६ या कालावधीत राज्य केले. हिचा कालखंड रशियाच्या प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो.


🔴१९१४ चा विश्व युद्ध मध्ये पण रशीयन्स्नी बरेच देशांना मजा चाखावला होता .१९२२ आणि १९९१ सदीच्या मध्यात रशियाचा इतिहासला लोक ' *सोविएट युनिअन 'चा इतिहास* असे म्हणत होते .


 *🎯सोव्हियेत रशिया-🎯*


सोव्हियेत संघ हा एक भूतपूर्व देश आहे. सोव्हियेत संघाची स्थापना ३० डिसेंबर १९२२ रोजी झाली व २६ डिसेंबर १९९१ रोजी त्याचे १५ देशांमध्ये विघटन झाले.


🔵सोव्हियेत संघ हा जगातील सर्वात विशाल देश होता.  


🔴सोवियेत संघातल्या लहान मोठ्या सर्व नद्या धरून त्यांची एकूण संख्या एक लाखाच्यावर होती. 


🔵जगातील सर्वात मोठ्या ९ नद्यांपैकी *ओब, येनिसी, लेना व अमूर* या ४ मोठ्या नद्या सोवियेत संघात होत्या.


*🔴आर्क्टिक* समुद्राचा सुमारे ४,००० मैलांचा समुद्र किनारा सोवियेत संघाला लाभला होता. वर्षातील बहुतेक वेळ हा समुद्र बर्फाच्छादित राहत असल्याने नौकानयनास तो फारसा उपयोगी नव्हता. 


🔵समारे एक लाख पन्नास हजार चौरस मैल क्षेत्रफळ असलेला व चारही बाजुने भूमीने वेढलेला *कास्पियन* समुद्राला तर जगातील सर्वात मोठे सरोवर म्हणता येईल. 


🔴सबेरियातील *बैकाल सरोवर* जगातील सर्वात खोल सरोवर ठरते. विशाल आणि विस्तृत पर्वतरांगाही सोवियेत संघाला लाभल्या होत्या.सोव्हियेत संघामध्ये एकूण १५ संघीय गणराज्ये होती. 


🔵१९९१ साली सोव्हियेत संघाचे विघटन झाल्यानंतर ह्या १५ गणराज्यांचे रुपांतर १५ स्वतंत्र देशांमध्ये झाले.

मध्ययुगीन भारत (थोडक्यात)



गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौज च्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली.


त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली.


१३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात शंकराचार्यांनी प्राचीन अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले.


आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारतातील बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते. 


या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहार पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या. 


प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले. 


प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओळखली जात,


त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते.


या राजपूत राज्यांनी उत्तर भारतातील मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली.


भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्धयांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घौरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला व स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली.


या काळात दक्षिण व मध्य भारतात चालुक्य साम्राज्य होते. *चालुक्यांचा कार्यकाल इस ५५० ते ७५० इतका होता.* चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बदामी इथे होती.


आजही बदामी इथे चालुक्यांचा इतिहास सांगणारी प्राचीन मंदीरे आढळून येतात. पल्लवांनी देखिल याच काळात अजून दक्षिणेला राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्यातील स्थापत्यामधील प्रगती लक्षणीय होती. 


अजंठा व वेरुळची लेणी चालुक्य राज्यकर्त्यांनी बांधल्या असे मानतात. चालुक्यांचे राज्य जसे जसे क्षीण होत गेले तसे त्याचे विभाजन होत गेले. महाराष्ट्रात देवगीरीचे यादवांनी चालुक्य राज्य चालवले तर वारंगळमध्ये काकतीय तर कर्नाटक होयसाळांनी ताबा घेतला.


चालुक्यांचे राज्य क्षीण झाल्यानंतर दक्षिणेत प्राचीन चोल साम्राज्याने जबरदस्त उभारी घेतली व भारताच्या इतिहासातील एक अतिशय प्रभावी साम्राज्य बनले.


राजाराज चोल व राजेंद्र चोल यांनी चोल साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पार मलेशिया आणि थायलंड पर्यंत नेल्या. साम्राज्यवादी चोलांचे साम्राज्य भारताबाहेर पसरण्यास त्यांची प्रभावी नौदलीय सैन्यरचना उपयोगी ठरली.


या काळात दक्षिण भारतातील राज्यांनी पाश्चिमात्य व पौर्वात्य जगाशी व्यापार वाढवला व प्रबळ बनले. १३४३ पर्यंत चोलांचा प्रभाव कमी झाला व दक्षिणेतील सर्व लहान मोठी राज्ये विजयनगर साम्राज्यात संमिलीत झाली.


या काळात उत्तरेत इस्लामी राज्यकर्त्यांची पकड मजबूत झाली होती. विजयनगरचे साम्राज्य शेवटी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणाने लयाला गेले.

आजाद हिंद सेनेची स्थापना

 


👑 भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 


👑 दसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला.  


👑 फसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना.  


👑 बरिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.


👑 जयेष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. 


👑 जपानमधील रासबिहारी बोस यांनी सिंगापूर, मलाया, ब्रम्हदेश येथील हिंदी लोकांचा हिंद स्वातंत्र्य संघ स्थापन केला. हिंदी सैन्यात राष्ट्रप्रेम निर्माण केले रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेंनेची स्थापना केली


👑 नताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. 


👑 नताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले. 


👑 आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली. 


👑 आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबन्यात आले.

जागतिक इतिहास



🔹बस्टील

""""""""""""""""""""


 बॅस्टील पॅरिसच्या पूर्वबाजूस असलेला व ब्रिटिशांच्या हल्ल्यापासून पॅरिसचे रक्षण करण्यासाठी बांधलेला फ्रान्समधील इतिहास प्रसिद्ध किल्ला.

बॅस्टील या शद्बाचे दोन अर्थ आहेत : तटबंदीयुक्त इमारत व शस्त्रागार. याची उभारणी ह्यूजिस ऑब्रिएट याच्या मार्गदर्शनाखाली १३६९-१३७० मध्ये शतवार्षिक युद्धाच्या वेळी झाली.


 पाचव्या चार्ल्सच्या राजवाड्याच्या संरक्षणार्थ ती करण्यात आली. या आयताकृती किल्ल्याला २३ मी. उंचीचे आठ बुरूज असून ते सलग भिंतीने जोडलेले होते. किल्ल्याच्या सभोवती रुंद खंदक होता. फ्रान्सचा शासकीय तुरुंग म्हणून याची प्रसिद्धी होती.


तेथे राजकीय व संकीर्ण स्वरुपाचे गुन्हेगार कैदी म्हणून ठेवीत. सोळाव्या शतकापर्यंत त्याचा लष्करी दृष्ट्या उपयोग केला जाई. त्यानंतर १६२० पासून फ्रान्सचा पंतप्रधान आर्मां झां रीशल्य याने त्याचा कारागृह म्हणून प्रथम वापर करण्यास सुरुवात केली. सुमारे ४० कैदी येथे असत. त्यांचा येथे अनन्वित छळ केला जाई. 


राजाच्या विरोधकांची न्यायालयीन चौकशी न करता त्यांच्या कारवासाची मुदत राजाच्या मर्जीवर अवलंबून असे. येथे जप्त केलेली पुस्तकेही आणून ठेवीत. या किल्ल्याच्या व्यवस्थापनास फार खर्च येऊ लागला; म्हणून तो पाडण्यात यावा, अशा प्रकारचे विचारही १७८४ मध्ये प्रसृत झाले.



फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात बॅस्टील हे अनियंत्रित राज्यसत्तेच्या अन्यायाचे व जुलमाचे प्रतीक मानले गेले. जुलै १७८९ च्या सुरुवातीस १६ व्या लूईने राष्ट्रीय सभा (नॅशनल असेंब्ली) नेस्तनाबूत करण्यासाठी पॅरिसच्या आसपास लष्कराची जमवाजमव सुरू केली, तेव्हा राष्ट्रीय सभेने त्याला लष्कर मागे घेण्यास सांगितले; पण लुईने ह्या कृतीस नकार दिला व त्या वेळचा लोकप्रिय झालेला अर्थमंत्री झाक नेकेर यास बडतर्फ केले (१७८१).


राजाच्या बेमुर्वतपणामुळे चिडून जाऊन कॅमिल देमुलच्या नेतृत्वाखाली जनतेने जोराचा उठाव केला व केला व १४ जुलै १७८९ रोजी तेथील कैदी सोडविण्यासाठी व युद्धसामग्री हस्तगत करण्यासाठी बॅस्तीलच्या किल्ल्यावर हल्ला केला. किल्ल्यावरील प्रमुख अधिकारी व राज्यपाल बेरनार रने झॉरदां लोनो याच्या मदतीस यावेळी फक्त १३० फ्रेंच सैनिक होते. 


त्यास पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा तेथे नव्हता. थोड्याशा प्रतिकारानंतर दुपारच्या सुमारास लोनोने किल्ला क्रांतिकारकांच्या ताब्यात दिला. क्रांतिकारकांनी किल्ल्यात प्रवेश केल्यावर तुरुंग फोडून तेथील कैद्यांस मुक्त केले आणि किल्ल्याच्या मोडतोडीस प्रारंभ केला. त्या वेळी आत फक्त सात कैदी होते. प्रक्षुब्ध जमावाने लोनोचा बळी घेतला.


बॅस्टीलचा पाडाव हा लष्करी दृष्ट्या फारसा महत्त्वाचा नसला, तरी त्याचे राजकीय महत्त्व मोठे आहे. यामुळे क्रांतीकारकांना लुईविरुद्ध महत्त्वाचा विजय मिळाला. लोकांचा लूईबद्दलचा आदर कमी झाला. बॅस्तीलच्या पाडावामुळे पॅरिसच्या जनतेत स्वसामर्थ्याची प्रखर जाणीव झाली.


बॅस्टीलचा किल्ला पुढे संपूर्णपणे पाडण्यात येऊन त्या जागी १७८९ व १८३० मध्ये झालेल्या क्रांत्यांमधील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ एक ब्राँझचा स्तंभ उभारण्यात आला. पुढे १४ जुलै हा बॅस्तीलदिन म्हणून राष्ट्रीय सुटीचा दिवस जाहीर करण्यात आला (१८८०). तो दिवस मिरवणुका, भाषणे, नृत्य इत्यादींनी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो.

महादेव गौविंद रानडे -

 

         -------------------

🔸 जन्म - १८ जानेवारी १८४२

     ( निफाड, नाशिक )


🔸 मत्यू - १६ जानेवारी १९०१


🔗 रानडे यांना हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हनुन संबोधले जाते 


🔗 तसेच त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी म्हनतात.रानडे हे अक्कलकोटी राज्याचे कारभारी होते.


🔗 रानडे हे गौपाळ कृष्ण गौखले यांचे गुरू होते. त्यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक म्हटले जाते.


🔗 समाजसुधारकांसाठी सर्वांगीन प्रतिमान मांडनारे प्रज्ञावंत रानडे हे आर्थिक राष्ट्रवादी होते.

🔻 १८८७ - सामाजिक परीषद 

🔻 १८९० - औद्योगिक परीषद


🔸 सस्थात्मिक योगदान -


🔻 १८६५ - विधवा विवाहोत्तेजक मंडळी

🔻 १८६७ - मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापनेत सहभाग

🔻 १८७० - सार्वजनिक सभा स्थापनेत सहभाग


उद्दिष्ट -

थंड गौळा होउन पडलेल्या समाजात विचार , संघटना व कृतीची सांगड घालन्यासाठी व्यासपीठ उभे केले

🔻 वकृत्वत्तेजक सभा - पुणे

भारत स्वातंत्र्याचा इतिहास



भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले :


भारताचे संविधान तयार करण्याचे काम संविधान समितीने 1947 साली सुरू केले.

 या समितीत डॉ. राजेंद्रप्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी यांसारखे ज्येष्ठ राष्ट्रीय पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बॅ. जयकर यांच्यासारखे प्रख्यात कायदेपंडित; तसेच सरोजिनी नायडू, हंसाबेन मेहता यांसारख्या कर्तबगार महिलाही होत्या.

 संविधान समितीने तयार केलेले संविधान 26 जानेवारी, 1950 रोजी अमलात आले.

 ब्रिटिश साम्राज्यवादाविरुध्द लढताना स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता व लोकशाही या मूल्यांवरील निष्ठा भारतीयांनी उराशी बाळगल्या होत्या.

 या मूल्यांच्या पायावरच आपल्या संविधानाची उभारणी झाली.


संस्थानांचे भारतात विलीनीकरण :


भारतावरील ब्रिटिश सत्तेचा शेवट होताच भारतातील संस्थाने स्वतंत्र होतील अशी तरतूद भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यात केली होती.

 संस्थानांनी स्वतंत्र राहायचे की भारत किंवा पाकिस्तान यांपैकी एका राज्यात विलीन व्हायचे हा निर्णय त्यांनी घ्यायला होता.

 संस्थाने स्वतंत्र राहिली तर भारत शेकडो तुकडयांत विभागला जाणार होता. देशाची एकात्मता व सुरक्षितताही धोक्यात येणार होती.

 संस्थानी प्रजा मात्र भारतात सामील होण्यास उत्सुक होती.

 या पेचातून त्या वेळचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढला.

 भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे हे त्यांनी संस्थानिकांना पटवून दिले.

 तसेच संस्थानिकांच्या प्रतिष्ठेला व मानमरातबाला धक्का लावला जाणार नाही असे आश्वासनाही त्यांनी दिले.

 भारत सरकारशी करार करून संस्थानिकांनी फक्त संरक्षण, परराष्ट्रीय संबंध आणि दळणवळण या बाबी भारत सरकारच्या हाती सोपवाव्यात असे त्यांनी सुचवले.

 याला संस्थानिकांनी मान्यता दिली. जूनागड, हैदराबाद व काश्मीर सोडून बहुतेक सर्व संस्थाने 15 ऑगस्ट, 1947 पूर्वी भारतात विलीन झाली.


जूनागडचे विलीनीकरण :


जूनागड हे सौराष्ट्रातील एक लहानसे संस्थान होते.

 तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते, तर जूनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता.

 त्याच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला. तेव्हा नवाब पाकिस्तानात निघून गेला.

 त्यानंतर फेब्रुवारी 1948 मध्ये जूनागड भारतात विलीन झाले.

ब्राम्हो समाज व त्याची स्थापना



धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या युगाला राजा राममोहन रॉय यांच्या कार्यापासूनच खर्‍या अर्थाने सुरवात झाली राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772 रोजी राधानगर (बंगाल) येथे झाला.

 विद्यार्थीदशेत असताना इंग्रजी संस्कृत, अरबी, आणि फार्सी, या भाषा चा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांनी बंगालमध्ये इंग्रजी राजवट कशी स्थिर झाली हे प्रत्यक्ष पाहिले.

 ब्रिटिशांचे अनेक गुण भारतीय विचारवंतांना अंतर्मुख करु लागले होते.

 आपल्या समाजातील रुढी, परंपरा व अंधश्रध्दा यामुळे भारतीय समाजाची अधोगती झाली आहे, याची जाणीव रॉय यांना होती.

 त्यांनी काही काळ ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीपण केली होती त्या काळात ख्रिश्चन मिशनर्‍यांचे कार्य त्यांनी अगदी जवळून पाहिले होते.

 हिंदू धर्मातील एकेश्र्वरवाद, मुर्तिपूजा, आणि जातिभेद, समाजाच्या प्रगतीतील प्रमुख अडथळे आहेत. असे त्यांचे मत होते.

 त्यामुळे भारतीय समाजाला जागृत करावयाचे असेल तर या अनिष्ट रुढी आणि परंपरांचा त्याग केला पाहिजे असा प्रसार रॉय यांनी सुरु होता.

 सतीची चाल बंद करण्याचा प्रयत्न रॉय यांनी केला. अर्थात हे काम सोपे नव्हते शतकानुशतकांचा धर्माचा पगडा समाजातील उच्चवर्णियांवर होता.

 स्वार्थी भटभिक्षुकांची समाजावर फार जबरदस्त पकड होती.

 पती निधनानंतर विधवा स्त्रीने स्वत:च्या मृत पतिसमवेत जाळून घेणे म्हणजे सती जाणे आणि हाच धर्म मानला जात होता.

 संवाद कौमुदी नावाच्या पाक्षिकातून त्यांनी सतीच्या अमानुष पध्दतीवर कडाडुन टिका केली.

 रॉयसारख्या लोकांचा पाठिंबा असल्यामुळे बेंटिंकने 1829 साली सतीबंदीचा कायदा केला सतीच्या रुढीप्रमाणे बालविवाह, कन्याविक्रय आणि बहुपत्नित्वाची पध्दती समाजासाठी लांच्छानास्पद असल्याचे मत रॉय यांनी मांडले होते.


ब्राम्हो समाजाची स्थापना :


त्या सुमारास ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदू धर्मावर प्रखर हल्ले होते.

 हे हल्ले परतवून हिंदू धर्म व संस्कृती यांचे संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या बुरसटलेल्या धर्मकल्पना हिंदूंनी फेकून दिल्या पाहिजेत असे रॉय यांना वाटत होते.

 हिंदू धर्माची मूळ बैठक वेदांताच्या तत्वज्ञानावर आहे हे ओळखून रॉय यांनी वैदिक विचारसरणीचा पुरस्कार केला. वेदांत सूत्रावरील शांकर भाष्याचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले.

 अनेक उपनिषदांचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले.

 वेदांत सार नावाचा ग्रंथ लिहून वेदांचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

 केवळ ग्रंथ लिहून व वृत्तपेतातून लेखन करुन धार्मिक व सामाजिक सुधारणा होणार नाहीत याची त्यांना जाणीव होती.

 म्हणून त्यांनी 1828 मध्ये ब्राम्होसमाज स्थापन केला. तेव्हा ब्राम्हो समाजाला असंख्य अनुयायी मिळाले. या समाजाचा प्रसार बंगाल बाहेर इतर प्रांतातही झाला होता.

खुदीराम बोस


भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक

स्मृतिदिन - ११-०८-१९०५


खुदीराम बोस  : भारतातील सर्वात तरूण वयाचा क्रांतीकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्याच्या लहानपणीच आई (लक्ष्मीप्रियादेवी) आणि वडील (त्रैलोक्यनाथ) यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी पालनपोषण केले.


बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटीश सरकारने १९०३ साली निश्चित केले. सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्याने सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणाऱ्यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणाऱ्या न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली.


यातच खुदीरामने किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याचा सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती याच्या सहकाऱ्याने दि. ३० एप्रील १९०५ या दिवशी किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर बाँब फेकून त्याला मारण्याचे निश्चित झाले. त्याप्रमाणे एक बाँब फेकण्यात आला. परंतु तो चुकून दुसऱ्याच एका गाडीवर फेकण्यात आल्याने त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला.


घटनेच्या दुसऱ्या दिवशी खुदीराम पकडल्या गेला तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीरामवर खटला भरण्यात आला. त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्याला दि. ११-०८-१९०५ या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बाँबचा उपयोग करणारा खुदीराम पहिला क्रांतीकारक ठरला.

गोपाल गणेश आगरकर:



जन्म : 14 जुलै 1856, करहाड तालुक्यातील टेंभू.

मृत्यू : 17 जून 1895,पुणे

1 जानेवारी 1880 – चिपळूणकर, टिळक व अगरकर ‘न्यू इंग्लिश स्कूल ’ची स्थापना केली.

1884 – डेक्कन एजुकेशन सोसायटी ची स्थापना.

बुद्धीप्रामान्यवाद, वैज्ञानिक द्रुष्टिकोण, एहिक जीवनाची स्मृधता यावर भर .

संस्थात्मिक योगदान :


1881 – लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरीचे संपदकत्व .

15 आक्टोंबर 1888 – ‘सुधारक ’ साप्ताहिक.

गुलामांचे राष्ट्र या पुस्तकात हिन्दी लोकांचा आळशी वृत्तीची टीका.

स्त्रियांनी जकिते घातलीच पाहिजेत याविषयावर निबंध.

अकोल्यातल्या वर्हाघड समाचार या वर्तमान पत्रातून लेखन.

शेक्सपिअरच्या हॅल्मेट या नाटकाचे विकारविलासित या नावाने मराठी रूपांतर.

'डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस' हे पुस्तक.

हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या निबंधात ब्रिटीशांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका.

वैशिष्टे :


इष्ट असेल ते बोलणार......

राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्यला अधिक महत्व.

हर्बर्ट स्पेन्सरच्या सोशॉलॉजी व एथिक्स आणि जॉन मिलच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या ग्रंथाचा प्रभाव.

बुध्दिप्रामाण्यवाद व व्यक्तीस्वातंत्र्य या दोन तत्वांना महत्व.

ऐहिक जीवन समृद्ध करावे, पारलौकिक जीवनाचा विचार करणे व्यर्थ, असे मत.

जिवंतपणी स्वतः ची प्रेतयात्रा पहावी लागलेले समाजसुधारक.

धोंडो केशव कर्वे



जन्म - रत्नागिरी, 18 एप्रिल 1858.

मृत्यू - 9 नोव्हेंबर 1962.

1942 - बनारस विद्यापीठाची डि. लिटू.

1958 - भारतरत्न. जन्मशताब्दी वर्ष.

कर्वे यांना महर्षि ही पदवी जनतेने दिली.

स्त्री शिक्षण हा यांच्या कार्याचा केंद्रबिंदू.

विधवविवाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला.

संस्थात्मक योगदान :


1893 - विधवा विवाहोत्तेजक मंडळी.

1 जानेवारी 1899 - अनाथ बालिका आश्रम.

1907 - हिंगणे महिला विद्यालय.

1910 - निष्काम कर्मकठ.

1916 - महिला विद्यापीठ, पुणे.

1916 - महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडल.

1 जानेवारी 1944 - समता संघ.

1945 - पुणे बलअध्यापक मंदिर, शिशुविहार.

1948 - जातींनीर्मुलन संघ.

1918 - पुणे - कन्याशाळा.

1960 - सातारा - बलमनोहर मंदिर.

वैशिष्टे :


मानवी समता - मासिक.

1893 - विधवेशी पुनर्विवाह.

1894 - पुनर्विवाहितांचा मेळावा.

1915 च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष.

1928 - आत्मवृत्त या नावाचे आत्मचरित्र.

जपानमधील महिला विद्यापीठाची माहिती देणार्‍या पुस्तकावरून पहिले महिला विद्यापीठ स्थापन.

'अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार' - आचार्य अत्रे.

आचार्य विनोबा भावे



जन्म - 11 सप्टेंबर 1895 गगोदा (रायगड).

मृत्यू - 11 नोव्हेंबर 1982.

आचार्य विनोबा भावे हे म. गांधीचे मानसपूत्र होते.

भावे यांचे विनायक नरहर भावे, हे मूळ नाव.


संस्थात्मक योगदान :


1921 - वर्ध्याजवळ पवणारा येथे आश्रमाची स्थापना.

संम्ययोगी समाज निर्मितीचा श्रीगणेश केला.

18 एप्रिल 1951 भूदान चळवळ, आंध्रप्रदेशातील पोचमपल्ली येथून सुरवात.

कांचनमुक्ती प्रयोगात पैशाला कमी व श्रमला जास्त महत्व.


आचार्य यांचे लेखन :


1923-महाराष्ट्र धर्म मासिक.

गीताई - भागवतगीतेचे समश्लोकी भाषांतर.

मधुकर(निबंधसंग्रह)

गीता प्रवचने.

'स्वराज्य शस्त्र' हा ग्रंथ.

विचर पोथी.

जीवनसृष्टी.

अभंगव्रते.

गीताई शब्दार्थ कोश.

गीताई - धुले येथील तुरुंगात सांगितली व सोने गुरुजींनी लिहून घेतली.


वैशिष्टे :


वैयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून निवड.

गीता, इसपनीती या पुस्तकाचा प्रभाव.

चंबल खोर्‍यातील दरोडेखोरांचे हृदयपरिवर्तन.

मंगरौठ - उत्तरप्रदेश येथे 'सब भूमी गोपाल की' हा नारा दिला.

'जय जगत' घोषणा

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर


जन्म - 14 एप्रिल 1891 महू, मध्यप्रदेश.

मृत्यू - 6 डिसेंबर 1956, मुंबई.


 त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते.

तसेच दलितांचा मुक्तिदाता म्हणून आंबेडकरांना संबोधले जाते.

1990 - 91 मरणोत्तर भारतरत्न हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सामाजिक न्यायवर्ष म्हणून साजरे केले जाते.

हिंदू कोड बिल मांडल्यामुळे त्यांना 'आधुनिक मनू' म्हटले जाते.

सामाजिक समता हा यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिन्दु होता.

आंबेडकर हे 1947 - 51 नेहरू मंत्रिमंडळात कायदेमंत्री होते.


संस्थात्मक योगदान :


1924 - बहिष्कृत हितकारिणीची स्थापना.

1924 - बहिष्कृत मेळा. नागपूरहुन रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची घोषणा.

20 मार्च 1927 - महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह.

25 डिसेंबर 1927 - मनुस्मृती दहन.

2 मार्च 1930 - नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह (1935 मध्ये मंदिर खुले)

24 सप्टेंबर 1932 - पुणे करार, अस्पृश्यांसाठी कायदे मंडळात 148 जागा राखीव.

1933 - मुखेड येथे धार्मिक ग्रंथाचे पारायण.

ऑगस्ट 1936 - स्वातंत्र् मजुर पक्षाची स्थापना.

1937 - बाळासाहेब खरे सरकारात विरोधी पक्ष नेते.

1942 - नागपूर येथे All India Scheduled Castes Federation ची स्थापना. यांसाठी आप्पा दुराई यांनी मदत केली.

मे - 1946 : Peoples Education Society स्थापना.

20 जुलै 1946 - सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई. मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद.


आंबेडकरांचे लेखन :


The Problem Of Rupee

1916 - Cast In India

1930 - जनता वृत्तपत्र (1956 साली जनताचे नाव प्रबुद्ध भारत केले.)

1946 - The Untouchables

1956 - Thoughts on pakisthan.

1957 - बुद्ध आणि धम्म, हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर 1957 मध्ये प्रकाशित.

'मुकनायक' ची सुरुवात संत तुकाराम यांच्या तर 'बहिकृत भारत'ची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांनी होत असे.

1920 - मुकनायक.

1927 - समता.

1946 - Who Were Shudras?


वैशिष्ट्ये :


गौतम बुद्ध, महात्मा फुले, कबीर हे तीन गुरु.

1920 - च्या माणगाव परिषदेचे अध्यक्षपद.

1930, 31-32 या तीनही गोलमेज परिषदांत अस्पृशांचे प्रतिनिधित्व.

1935 - येवला (नाशिक) या ठिकाणी धर्मांतर घोषणा. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही,अशी घोषणा.

शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा, हा संदेश दिला.

29 ऑगस्ट 1947; मसुदा समितीचे अध्यक्ष.

1948 - हिंदू कोडबिल संसदेत मांडले.

14 ऑक्टोबर 1956 धंर्मांतर. नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. चंद्रमणी महास्थावीर यांनी दीक्षा दिली.

राजर्षि शाहू महाराज :



जन्म - 16 जुलै 1874.

मृत्यू - 6 मे 1922.

एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्‍या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना 'राजर्षी' ही पदवी बहाल करण्यात आली.

महाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्‍यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.

भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.

एक कल्याणकारी राजा.

संस्थात्मक योगदान :


ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्‍या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.

1901 - मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).

नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.

1902 - राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.

15 नोव्हेंबर 1906 - किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.

1907 - मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.

1911 - जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.

1911 - शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.

1917 - माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.

14 फेब्रुवारी 1919 - पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.

लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.

पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.

जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.

1894 - बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.

1917 - विधवा विवाहाचा कायदा.

1918 - आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.

1918 - महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या.

वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली.

1920 - माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन.

1895 - गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी.

1899 - वेदोक्त प्रकरण - सत्यशोधक चळवळीचे ब्राह्यणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास करणीभूत.

यामुळे पुरोहितगिरी व ब्राम्हंणाच्या मक्तेदारीस शह.

1906 - शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना.

1907 - सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविधेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुत्स्यांचे मैदान.

1911 - सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली.

1911 - भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले.

1912 - कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन.

1916 - निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना.

1918 - कुलकर्णी वेतणे रद्द. तलाठी नेमले.

1918 - आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले.

1919 - स्त्रियांना क्रूरपणे वागविन्यास प्रतिबंध करणारा कायदा.

1920 - घटस्फोटाचा कायदा. देवदासी प्रथा कायद्याने बंद.

1920 - हुबळी येथील ब्राह्येनेत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.

कोल्हापूर शहरास 'वस्तीगृहांची जननी' म्हटले जाते.

ब्राम्ह्येणत्तर चळवळीचे नेतृत्व.

वैशिष्टे :


महात्मा फुले व सत्यशोधक समाजाचा प्रारंभ.

सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील म. फुले यांचे खरेखरे वारसदार.

जाती भेदास तीव्र विरोध, लोककल्याणकारी राज्य.

पददलित व मागास वर्गीयांची उन्नती हेच जीवन कार्य.

उदार विचार प्रणालीचा राजा.

राज्य सोडावे लागले तर बेहत्तर, पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही.


कामगारांनो संघटित व्हा व आपले हक्क प्राप्त करून घ्या, हा संदेश. He Was a King But a Democratic King - भाई माधवराव बागल.


शाहू राजा नुसता मराठा नव्हता, तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होतो. - वि. रा. शिंदे.


टीकाकारांकडून 'शुद्रांचा राजा' असा उल्लेख.

1857 च्या पूर्वीचे उठाव :



आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 - 18)


गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला.

बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला.

शीख राजा रनजीसिंहचे लढण्यासाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न केला.

शेवटी इंग्रजांकडून पराभव पत्कारला.

हटकरांचा उठाव - मराठवाड्यात


नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात 1800 - 1820 या काळात.

नेता - नौसोजी नाईक

प्रमुख ठाणे - नोव्हा

ब्रिटीशांनी उठाव मोडून काढला.  

खानदेशातील भिल्लाचा उठाव


भिल्लाची खानदेशात लूटमार.याला यशवंतराव होळकरची फूस होती.

नेते - काजरसिंग, भीमा नाईक, भागोजि नाईक, नेवश्य नाईक, कलुबाबा, दौलत नाईक, तंट्या भिल्ल

भिल्लणा वठणीवर आणण्यासाठी लॉर्ड एलफिन्स्टनने प्रयत्न केले.


खानदेशातील भिल्लाचा उठावाचे उपाय:

1825 मध्ये भिल्लाकरिता जमिनी देणे, वसाहती निर्माण करणे.

भिल्लाणा पोलिस दलात नोकर्‍या दिल्या.  

बंडखोर भिल्लाणा वठणीवर आणण्यासाठी इतर भिल्लाचा वापर केला.

काजरसिंग नाईकचा उठाव:


1875 च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले.

पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता.

ब्रिटीशांचा 7 लाखाचा खजिना लुटला.

1858 च्या 'अंबापाणी' लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई स्रियांचाही सहभाग होता.

तिसरे कर्नाटक युध्द (1756-1763)



1756 मध्ये युरोपात इंग्लंड व फ्रान्समध्ये पुन्हा युध्द सुरु झाले. ते सप्तवर्षीय म्हणून प्रसिध्द आहे.


  फ्रेंच सरकारने ताबडतोब काऊंट लाली यास भारतात पाठविले तो जवळजवळ एक वर्ष प्रवास करीत एप्रिल 1758 मध्ये भारतात येऊन पोहोचला या दरम्यान सिरोजउद्दीला या पराभव करुन इंग्रजानी बंगालवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते.


  त्यास इंग्रजांचा जो प्रचंड आर्थिक फायदा झाला, त्याचा उपभोग त्यांनी फ्रेंचांविरुध्द लढण्यास केला.

  काऊंट लालीने 1758 मध्येच पाॅंडेचरी जवळ असलेला सेंट डेविड किल्ला जिंकून घेतला त्यानंतर त्याने तंजावरवर आक्रमण करण्याचा आदेश दिला.


  कारण तंजावरच्या राजाकडून 56 लक्ष रुपये घ्यावयाचे होते, परंतु या मोहिमेत अपयश आल्यामुळे फ्रेंचांच्या आरमार आल्यामुळे त्याने हा वेढा उठवला.


  दुसर्‍या बाजूला पोकॅाकच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमारी तुकडीने डी अ‍ॅशच्या नेतृत्वाखाली असलेल्या फ्रेंच आरमारी तुकडीचा तीन वेळा पराभव करुन त्यांना भारतीय सागरातून परत सेनानी सरआयकूट याने वांदिवाश येथे फ्रेंचांचा जबरदस्त पराभव केला.

  खुद्द बुसीला युध्दकैदी बनविण्यात आले.


  युध्दातील या पराभावामुळे फ्रेंच पॉडेंचरीला परत गेले. पण इंग्रजांनी पाँडेचरीलाच वेढा घातला शेवटी आठ महिन्यानंतर फ्रेंचांनी पॉडेचरी इंग्रजांच्या ताब्यात दिले.


  कर्नाटकाच्या तिसर्‍या युध्दात फ्रेंचांचा अंतिम पराभव झाल्यामुळे हे युध्द निर्णायक सिध्द झाले.


  1763 च्या पॅरिसच्यातहाने सप्तवर्षीय युध्द थांबल्यावर भारतातील संघर्षही संपुष्टात आला.


  या तहानुसार पॉडेचरी व काही प्रदेश फ्रेंचांना परत मिळाला असला तरी यापुढे फ्रेंचांनी इंग्रजाविरूध्द युध्द करण्याची हिंमत केली नाही. येथून फ्रेंच सत्ता भारतात वाढू शकती नाही.

आधुनिक भारताचा इतिहास



भारतीय राष्ट्रीय चळवळ एका उत्क्रांतीची अभिव्यक्ती दर्शवते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१८८५) च्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या चळवळीला सुरुवात होते. या चळवळीची तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली जाते- मवाळ राजकारणाचा काळ (१८८५-१९०५); जहाल राजकारण्यांचा काळ (१९०५-१९२०); गांधी युग (१९२०-१९४७).


१८५७ चा उठाव दडपला गेल्यानंतर भारतीय समाज निपचित पडला होता. या निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे काम दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दिनशॉ वाच्छा, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या भारतीयांनी केले. त्यांनी राष्ट्रीय संघटनेच्या राजकारणाला निश्चित दिशा दिली. या संपूर्ण नेतृत्वाचा विश्वास उदारमतवाद, सांविधानिक मार्ग व क्रांतीपेक्षा उत्क्रांतीतून बदल या तत्त्वांवर होता. म्हणूनच मवाळांनी राजकीय सुधारणांसाठी अर्ज, विनंत्यांचा मार्ग अवलंबला. आíथक निस्सारणाचा सिद्धांत मवाळांचे सर्वात मोठे योगदान ठरते. मवाळांनी भारताच्या वसाहतवादी आíथक शोषणावर प्रकाश टाकून जी जनजागृती घडवून आणली ती राष्ट्रीय चळवळीच्या पुढील टप्प्याची आवश्यक पाश्र्वभूमी ठरते. तद्वतच, या सिद्धांताच्या माध्यमातून मवाळांनी भारताच्या आíथक राष्ट्रवादाचा भक्कम पाया घातला यात शंका नाही.


२०१४ च्या मुख्य परीक्षेमधील ब्रिटिश आíथक धोरणाच्या विविध अंगांच्या विश्लेषणाची अपेक्षा ठेवणारा प्रश्न याच आíथक शोषणाच्या व आíथक राष्ट्रवादाच्या आकलनाची अपेक्षा ठेवतो. या प्रश्नामध्ये ब्रिटिश कालखंडामधील समग्र आíथक धोरण, त्या धोरणाची उत्क्रांती यांचे विश्लेषण केंद्रस्थानी आहे.


लॉर्ड कर्झनने १९०५ साली केलेल्या बंगालच्या फाळणीतून मवाळ राजकारणाच्या मर्यादा तर स्पष्ट केल्याच, पण त्याही पुढे जाऊन ब्रिटिश सत्ता भारताच्या हितासाठी असल्याच्या मवाळांच्या मूलभूत विश्वासाला तडा गेला. म्हणूनच बंगालच्या फाळणीनंतर राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व जहालांच्या हाती येते. अर्थात, १९१५ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेवर मवाळांचेच वर्चस्व होते. जहालांनी काँग्रेसबाहेर राहून राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. राष्ट्रीय चळवळीच्या या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश ‘स्वराज’ हा होता व चळवळीच्या पद्धती स्वयंभू होत्या. मवाळांच्या पद्धती ब्रिटिश शासनाच्या प्रतिसादावर अवलंबून होत्या. जहालांनी परकीय मालावर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व असहकार या चतु:सूत्रीवर आधारित चळवळींचा मार्ग अवलंबून शासनावर दबाव निर्माण केला. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीन चंद्र पाल, अरिबदो घोष यांनी या टप्प्यातील चळवळीचे नेतृत्व केले.


लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर एका युगाचा अस्त होतो. तद्वतच, एका दुसऱ्या युगाची सुरुवात महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीतील सहभागाने होते. गांधीयुगामध्ये ‘अिहसक पद्धतीने केलेल्या असहकारातून स्वराज्य’ हा राष्ट्रीय चळवळीचा उद्देश होता. सत्याग्रह, अन्यायाचा उघड व सक्रिय प्रतिकार, अिहसक असहकार, भारतीय समाजाचा सर्वागीण विकास यांतून गांधींनी राष्ट्रीय चळवळीला वेगळी दिशा दिली व तिला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले.


भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या तीन टप्प्यांमधील घटनांचा सखोल अभ्यास आवश्यक ठरतो. मवाळांनी घडवून आणलेल्या राजकीय सुधारणा, वंगभंग चळवळ, होमरूल चळवळ, असहकार चळवळ, स्वराज पार्टी, नेहरू रिपोर्ट, सविनय कायदेभंगाची चळवळ, ‘चलेजाव’ चळवळ, गोलमेज परिषद यांसारख्या घटकांचा यात अंतर्भाव होतो. याव्यतिरिक्त भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे ठरते.

गोंद्या आला रे .....



कालच्या दिवशी १८९७ साली पुण्यात एक प्रतिशोधाचे धगधगते अग्निकुंड पेटले. त्यात जुलमी ब्रिटिश अधिकारी रँड याचा वध तर झालाच, पण पुणेकर जनतेवर झालेल्या अत्याचाराचा प्रतिशोध म्हणून रँडवर ही कारवाई करणारे तीन युवा क्रांतिकारक चाफेकर बंधू यांनीही फाशीच्या तक्तावर चढून आत्माहुती दिली. 


त्यांच्या या बलिदानाने साऱ्या देशात खळबळ उडाली. चाफेकर बंधू अमर झाले.


वासुदेव, दामोदर व बाळकृष्ण हे तिघे चाफेकर बंधू मुळचे कोकणातले. त्यांचे कुटुंब पुण्याजवळ चिंचवडला स्थायिक झाले. तिथेच त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनजागृतीचे कार्य सुरू केले.


ते लोकमान्य टिळकांच्या संपर्कात आले व त्यांच्या कार्याला दिशा व गती लाभली. १८९7मध्ये प्लेगच्या साथीने पुण्यात अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केले. 


रँडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या साऱ्याचा सूड घेण्याची व रँडचा वध करण्याची योजना त्यांनी तयार केली.


त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव भारतातही साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. तसेच मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. 


याच संधीचा फ़ायदा घेत दामोदर चाफेकर यांनी गणेश खिंडीत पाळत ठेवली व २२ जून १८९७ च्या मध्यरात्री रँडच्या घोडागाडीवर चढून जवळून गोळ्या झाडल्या. रँड काही काळ कोमात राहिला व ३ जुलै १८९७ रोजी मरण पावला. 


याचवेळेस दामोदराचा  भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या.


चाफेकर बंधू निसटण्यास यशस्वी झाले तरी नंतर, तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास येरवडा तुरुंगात फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेवाला ८ मे १८९९ व बाळकृष्णाला १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले, व तीनही चापेकर बंधू हुतात्मा झाले.


तीन सख्ख्या भावांनी एकाच वेळी स्वातंत्र्य लढ्यास बलिदान करण्याची जगातील ही बहुधा पहिली व एकमेव घटना!


त्यांच्या तेजस्वी स्मृतींना आदरांजली!

Online Test Series

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...