०४ नोव्हेंबर २०२०

Online Test Series

जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर.


करोनामुळे देशाला बसलेल्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर आणखीन एक चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. सामर्थ्यशाली देशांच्या यादीमधून भारत बाहेर फेकला गेला आहे. भारत हा आशियामधील चौथा सर्वात शक्तीशाली देश ठरला आहे. सिडनीमधील लोवी इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासामध्ये आशियामधील सर्वात प्रभावशाली देशांची यादी जाहीर केली आहे.


आशिया पॉवर इंडेक्स फॉर २०२० हा अहवाल सादर झाला असून आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये भारत हा अमेरिका, चीन आणि जपाननंतर चौथा सर्वात प्रभावशाली देश ठरला आहे. मात्र सर्वात सामर्थ्यशाली म्हणजेच मेजर पॉवर हा दर्जा भारताने गमावला आहे. ४० हून अधिक गुण असणाऱ्या देशांना प्रभावशाली देशांच्या यादीत स्थान दिलं जातं. मागील वर्षी भारताला ४१ गुण होते तर यंदा यामध्ये १.३ ची घट झाली असून भारताला  २०२० मध्ये ३९.७ गुण मिळाले आहेत.


आशिया पॅसिफिकमध्ये करोनामुळे सरासार परिस्थिती खालावत चाललेल्या १८ देशांमध्ये भारताचा समावेश आहे. करोनामुळे देशाच्या आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर मोठा ताण पडला असून यामुळेच भारताचा विकास मंदावला आहे असं लोवी इन्स्टिट्यूटने आपल्या अहवालात म्हटलं आहे. चीनच्या तुलनेत भारत म्हणावा तसा विकास करत नसल्याचेही या अहवालात म्हटलं आहे.


“लोकसंख्येच्या दृष्टीने चीनच्या बरोबरीने उभा राहणार भारत हा एकमेव देश असला तरी विकासाच्या बाबतीत तो पुढील काही वर्षांमध्ये चीनची बरोबर करु शकणार नाही. करोनाचा भारतावर मोठा परिणाम झाला असून या साथीमुळे दोन देशांमधील दरी अधिक वाढली आहे,” असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. २०३० पर्यंत भारत हा चीनच्या ४० टक्के विकास करु शकतो असं या अहवालात म्हटलं आहे. २०१० च्या आशिया पॉवर इंडेक्समध्ये हा विकासदर ५० टक्के असेल असं नमूद करण्यात आलं होतं. मात्र आता यामध्ये घट होणार असून तो ४० पर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

आम्ल

 🔴शरीरात तयार न होणारे आम्ल🔴


◾️वहॅलीन    ◾️लयुसीन


◾️आयसोल्युसिंन   ◾️अर्जेंनिन


◾️लायसीन     ◾️थरीओनीन


◾️फनीलाणीन   ◾️टरेप्टोफॅन


◾️हिस्टीडीन     ◾️मथीओनिन


🔴शरीरात तयार होणारे आम्ल🔴


▪️गलायसीन     ▪️ऍलणीनं


▪️गल्युत्मिक ऍसिड   ▪️सिस्टीन


▪️सरीन      ▪️असपारजिन


▪️आसपार्टीक ऍसिड  ▪️परोलिन


▪️टामरोसीन     ▪️गल्युटामाईन


✍️वरील 10 अमिनो आम्ल शरीरात तयार होतात.

पंचवार्षिक योजना


◾️ 1 एप्रिल 1951 पासून भारतात आर्थिक आर्थिक नियोजनास सुरवात झाली. 


◾️ही पध्दती भारताने रशियाकडून स्वीकारली आहे. तेव्हा पासून 11 योजना पूर्ण झाल्या असून 12 वी योजना चालू आहे. 


◾️7 वार्षिक योजनाही भारतात राबविल्या गेल्या त्यातील 1966-69 च्या कालावधीत योजनेला सुट्टी (Plan Holiday) असे म्हणतात. 


      🎇 पहिली पंचवार्षिक योजना 🎇


 📌  कालावधी: इ.स. १९५१ - इ.स. १९५६

📌  अध्यक्ष: पं.जवाहरलाल नेहरु.

📌 अग्रक्रम: 

कृषी  पहिल्या योजना काळात सार्वजनिक क्षेत्रात २०६९ कोटी रु. खर्च करण्याचे ठरविले , तरी प्रत्यक्षात मात्र १९६० कोटी रु. दुसऱ्या महायुद्धाचे झालेले परिणाम व नुकत्याच झालेल्या फाळणीमुळे मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली 


🏭 परकल्प :• 


🔹 १. दामोदर खोरे विकास योजना (झारखंड-पश्चिम बंगाल) 

🔹 २. भाक्रा-नानगल प्रकल्प (सतलज नदीवर,हिमाचल प्रदेश-पंजाब) 

🔹  ३. कोसी प्रकल्प (कोसी नदी बिहार) 

🔹 ४. हिराकूड योजना (महानदीवर ओरिसा) 

🔹 ५. सिंद्री (झारखंड) खत कारखाना 

🔹 ६. चित्तरंजन (पश्चिम बंगाल) येथे रेल्वे इंजिनचा कारखाना. 

🔹 ७. पेरांबुर (तामिळनाडू) येथे रेल्वे डब्यांचा कारखाना. 

🔹 ८. HMT- बँगलोर ९. हिंदुस्थान एंटीबायोटिक 

_________________________________

चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे




प्रश्न१) पृथ्वी 2 हे ____ क्षेपणास्त्र आहे.

उत्तर :-  पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र


प्रश्न२) कोणत्या राज्यातून रुशिकुल्य नदी वाहते?

उत्तर :-  ओडिशा


प्रश्न३) कोणत्या संस्थेनी “बेंडिंग द कर्व्ह: द रिस्टेरेटीव पॉवर ऑफ प्लॅनेट-बेस्ड डायट्स” या शीर्षकाखाली एक अहवाल प्रकाशित केला?

उत्तर :- वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड


प्रश्न४) कोणत्या राज्यात गोलकोंडा किल्ला आहे?

उत्तर :- तेलंगणा


प्रश्न५) कोणत्या कायद्यात ‘हलक पंचायत’ची तरतूद आहे?

उत्तर :- जम्मू व काश्मीर पंचायतराज अधिनियम, 1989


प्रश्न६) SLINEX’ ही भारत आणि ____ या देशांच्या नौदलांच्या दरम्यानची सागरी कवायत आहे.

उत्तर :- श्रीलंका


प्रश्न७) कोणती व्यक्ती ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द ईयर’ पुरस्काराची प्रथम भारतीय विजेता ठरली?

उत्तर :- ऐश्वर्या श्रीधर


प्रश्न८) कलेक्टिव्ह सेक्युरिटी ट्रीटी ऑर्गनाइझेशन (CSTO) ही _ या देशाच्या नेतृत्वाखाली असलेली एक युती आहे.

उत्तर :- रशिया


प्रश्न९) कोणत्या रेल्वे-नि-रस्ता पूलावरून ‘झिरो राजधानी’ रेलगाडी धावणार?

उत्तर :- बोगीबील


प्रश्न१०) कोणत्या शहरात जगातला सर्वात मोठा झिंक स्मेलटर प्रकल्प उभारला जाणार?

उत्तर :- गुजरात



 प्रश्न१) ‘जागतिक भूकबळी निर्देशांक 2020’ या 107 देशांच्या यादीत भारताला कोणत्या क्रमांक प्राप्त झाला?

उत्तर :- ९४ वा


प्रश्न२) कोणता देशातला पहिला 'हर घर जल' राज्य ठरला?

उत्तर :- गोवा


प्रश्न३) केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार कोणत्या वर्षापर्यंत भारत ट्रान्स-फॅट फ्री होणार?

उत्तर :- २०२२


प्रश्न४) कोणते राज्य ‘मिशन शक्ती’ नावाने महिला सशक्तीकरण अभियान राबवित आहे?

उत्तर :- उत्तरप्रदेश


प्रश्न५) 'लँसेट मेडिकल’ अहवालानुसार, भारताचे आयुर्मान किती आहे?

उत्तर :- ७०.८ वर्ष


प्रश्न६) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने ‘माय टाउन माय प्राइड’ कार्यक्रमाचा आरंभ केला?

उत्तर :- जम्मू व काश्मीर


प्रश्न७) कोणाला आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाचे नवीन अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले?

उत्तर :- डॉ मायकेल इराणी


प्रश्न८) कोणत्या दिवशी जागतिक अन्न दिन साजरा केला जातो?

उत्तर :- 16 ऑक्टोबर


प्रश्न९) कोण ‘द बॅटल ऑफ बिलॉन्गिंग’ या पुस्तकाचे लेखक आहेत?

उत्तर :- शशी थरूर


प्रश्न१०) कोणत्या देशाला भारताकडून किलो-श्रेणीची ‘INS सिंधुवीर’ पाणबुडी मिळणार आहे?

उत्तर :- म्यानमार



Q1) कोणत्या व्यक्तीची रोखे बाजारच्या आकडेवारीसाठी धोरणांची शिफारस करण्यासाठी SEBI संस्थेनी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली?

------- माधबी पुरी बुच


Q2) कोणत्या संस्थेच्यावतीने 'मेरी सहेली' उपक्रम चालवला जात आहे?

------ रेल्वे सुरक्षा दल


Q3) एशिया पॉवर इंडेक्स 2020’ यामधल्या सामर्थ्यशाली देशांच्या यादीत भारताचा क्रमांक कोणता आहे?

------- 4 था क्रमांक


Q4) कोणत्या व्यक्तीला वैद्यकीय संशोधनासाठी "आउटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ द वर्ल्ड 2020" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

-------  जाजिनी व्हर्गीस


Q5) भारतीय हवाई दलात सेवा दिलेल्या पहिल्या महिला अधिकारीचे नाव काय आहे, ज्यांचे नुकतेच निधन झाले?

------- विजयालक्ष्मी रामानन


Q6) कोणत्या मंत्रालयाच्यावतीने “लाइफ इन मिनीएचर” प्रकल्पाचा आरंभ करण्यात आला आहे?

-------- सांस्कृतिक मंत्रालय


Q7) कोणत्या संस्थेनी ‘स्टेट ऑफ द ग्लोबल एअर (SOGA) 2020’ अहवाल प्रसिद्ध केला?

--------  हेल्थ इफेक्ट इंस्टीट्यूट


Q8) मानवी शरीराच्या कोणत्या भागात “ट्युबरिअल सलायवरी ग्लॅंड” आहे?

---------  ग्रसनी यामध्ये


Q9) 'पोर्ट्रेट्स ऑफ पॉवर’ हे कोणत्या भारतीयाचे आत्मचरित्र आहे?

-------- एन. के. सिंग (15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष )


Q10) कोणत्या कंपनीची निवड NASA संस्थेनी चंद्रावर 4G सेल्युलर नेटवर्क तैनात करण्यासाठी केली?

--------  नोकिया




Q1) चीनच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाजाचे नाव काय आहे?

------ शनदोंग


Q2) कोणत्या संस्थेनी 'रीडिंग बिटवीन द लाईन्सः व्हॉट द वर्ल्ड रियली थिंक्स ऑफ टीचर्स' या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला?

------ वर्की फाउंडेशन


Q3) कोणत्या देशाने शांघाय सहकार्य संघटनेच्या विदेश व्यापार आणि अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या मंत्र्यांची 19 वी बैठक आयोजित केली?

----- भारत


Q4) खालीलपैकी कोणत्या बाबीशी ‘इंडिजेन जीनोम’ प्रकल्प संबंधित आहे?

------ व्यक्तींचा जीन क्रम


Q5) कोणत्या संस्थेनी "इलेक्ट्रिसिटी अॅक्सेस इन इंडिया अँड बेंचमार्किंग डिस्ट्रीब्यूशन यूटिलिटिज" अहवाल प्रकाशित केला?

-------  नीती आयोग


Q6) छत्तीसगड विधानसभेत मंजूर झालेल्या ‘कृषी उत्पन्न बाजार (दुरुस्ती) विधेयक-2020’ याच्याबाबतीतले कोणते विधान चुकीचे आहे?

------- कृषी उत्पन्न बाजारांचे नियमन करण्याचे अधिकार केंद्र सरकारला देते


Q7) _ ही संस्था ‘स्टेट फायनान्स’ विषयक वार्षिक अहवाल प्रकाशित करते.

------- भारतीय रिझर्व्ह बँक


Q8) कोणत्या देशाने "बाय, बाय कोरोना" या शीर्षकाखाली जगातले पहिले वैज्ञानिकदृष्टीचे कार्टून पुस्तक प्रकाशित केले?

------- भारत


Q9) कोणत्या संरक्षण दलाने “सिक्युअर अप्लिकेशन फॉर इंटरनेट (SAI)” नामक एक सुरक्षित मेसेजिंग अॅप विकसित केला?

------ भारतीय भुदल


Q10) भारताच्या कोणत्या शेजारी देशाने “नो मास्क नो सर्व्हिस” धोरण अंमलात आणले आहे?

------ बांग्लादेश



शाहिर अमर शेख


जन्म : २० ऑक्टोबर, १९१६

निधन :  २९ ऑगस्ट, १९६९


🌷 सयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या पोवाड्यांनी मराठी माणसाची अस्मिता जागविणारे शाहीर अमर शेख.


🌷 महबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव.


🌷 तयांचा जन्म सामान्य गरीब कुटुंबात बार्शी येथे झाला. 


🌷 तयांना पहाडी आवाजाची देणगी आणि प्रतिभाही मिळाली होती. आईकडून लोकगीतांचा वारसाही मिळाला होता.


🌷 परिस्थितीमुळे त्यांना लहानपणा पासूनच मालट्रकवर क्‍लिनर तसेच गिरणी कामगार म्हणून कष्टाची कामे करावी लागली होती. 


🌷 सोलापूरच्या गिरणी कामगार संपात त्यांनी पुढाकार घेतला त्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरुंगाची हवा खावी लागली.


🌷 तथे त्यांची कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांची गाठ पडली व ते डाव्या चळवळीकडे ओढले गेले. 


🌷 पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते कोल्हापूर येथे आले व मास्टर विनायकांच्या स्टुडिओत काम करु लागले.


🌷 यथेच त्यांच्या मित्रांनी त्यांचे नामकरण  'शाहीर अमर शेख’ असे नामकरण केले.


🌷 अमर शेख 1930-32 च्या सुमारास राष्ट्रीय चळवळीत सामील झाले.


🌷 पर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 


🌷 तयांची खरी ओळख झाली ती संयुक्त महाराष्ट्र चळवळीने. 


🌷 तयांची प्रतिभा बहरली व ते डफ घेऊन सभास्थानी आले व सभेचे फड जिंकू लागले, त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. 


🌷 सवतः कामगार असल्याने सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. 


🌷 सवरचित तसेच इतर कवींच्या रचनांही त्यांनी गायल्या.


🌷 ग. दि. माडगूळकर यांचे “रागरागाने गेला निघून’ हे “वैजयंता’ या चित्रपटातील वसंत पवार यांनी संगीतबध्द केलेले गीत आशा भोसले यांचे बरोबर त्यांनी गायले.


🌷 तयांच्या शाहिरीमधे पोवाडे लोकनाट्य यांचा समावेश असे. 


🌷 चिनी आक्रमणाचे वेळी त्यांनी कार्यक्रम करून लाखो रुपयांचा संरक्षण निधी गोळा करून राष्ट्रकार्यास हातभार लावला.


🌷 तयावेळी “बर्फ पेटला हिमालयाचा’ हे त्यांनी रचलेले व गायलेले गीत खूप गाजले होते.


🌷 तयांची लेखणी प्रसंगानुरूप चालत असे व वर्तमानाचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यातून डफाच्या ठेक्‍यातून आणि बुलंद आवाजातून लोकांच्या काळजाचा ठाव घेत असे.


🌷 आचार्य अत्रे त्यांना “महाराष्ट्राचा मायकोव्हस्की’ म्हणत.


🌷 “कलश’ (1958) आणि “धरतीमाता’ (1963) हे त्यांचे काव्यसंग्रह


🌷 “अमरगीत’ (1951) हा गीतसंग्रह आणि “पहिला बळी’ (1951) हे त्यांनी लिहिलेले नाटक. 


🌷 तयांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश असे.


🌷 जया पक्षासाठी त्यांनी जीवाचे रान केले तो पक्ष त्यांच्या जीवनाचे अखेरीस शेख यांना सोडावा लागला. 


🌷 तयांच्या विविध गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा व मल्लिका यांच्याकडे आला आहे. इंदापूर येथे शेख यांचे अपघाती निधन झाले.

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती..


🔶 मानवी डोक्याचे वजन ?

→   १४०० ग्रॅम.

 

🔶 सामान्य रक्तदाब ? 

→   १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 


🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?

→   न्यूरॉन. 


🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?

→   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.

→   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी. 


🔶 शरिरातील एकूण रक्त ? 

→   ५ ते ६ लीटर.

 

🔶 सर्वात लहान हाड ? 

→   स्टेटस ( कानाचे हाड ) 


🔶 सर्वात मोठे हाड ?

→   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड ) 


🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?

→   १२० दिवस. 


🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ? 

→   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी. 


🔶 पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ? 

→   २ ते ५ दिवस. 


🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?

→   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी. 


🔶 हिमोग्लोबिनचे प्रमाण ?

→   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी. 

→   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी. 


🔶 हरदयाचे सामान्य ठोके ? 

→   ७२ ते ७५ प्रति मिनिट. 


🔶 नाडी दर (पल्स रेट) ?

→   ७२ प्रतिमिनिट. 


🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?

→   थायरॉईड ग्रंथी. 


🔶 सर्वात मोठा स्नायू ?

→   ग्लुटियस म्याक्सीमस. 


🔶 एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?

→   ६३९.


🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?

→   मोनोसाईटस - ३ ते ८%. 

→   बेसोफिल्स - ०.५%. 

→   लिम्फोसाईटस - २० ते २५%. 

→   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%. 


🔶 शरीराचे तापमान ? 

→   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन. 


🔶 परौढांमधील दातांची संख्या ?

→   ३२.


 🔶 लहान मुलांमधील दातांची संख्या ?

→   २० दूधाचे दात. 


🔶 सर्वात पातळ त्वचा ? 

→   पापणी (कंजक्टायव्हा)

US Election : समजून घ्या काय आहे EARLY BALLOTS CAST सिस्टम




🔸करोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेच्या वापरात विक्रमी वाढ


🔸अमेरिकेत आज राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, दरम्यान, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार का? किंवा जो बायडेन यांच्याकडे राष्ट्राध्यक्षपदाची धुरा जाणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, काही राजकीय जाणकारांच्या मते डोनाल्ड ट्रम्प हे पराभूत होतील असं म्हटलं जात आहे. दरम्यान, अमेरिकेत EARLY BALLOTS CAST सिस्टमदेखील कार्यान्वित आहे.

जाणून घेऊया काय आहे ही प्रक्रिया.


🔸अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या मतदान प्रक्रियेपूर्वीच जवळपास साडेसात कोटी लोकांनी आपलं मत दिलं आहे. करोना विषाणूच्या संकटादरम्यान यावेळी मेल-इन मतदानाला प्रोत्साहन देण्यात आलं आहे. दरम्यान, याद्वारे निरनिराळ्या राज्यांतील अनेकांनी आपलं मत दिलं आहे. मुख्य मतदानाच्या मतमोजणीसोबतच ही मतं मोजली जाणार आहेत. अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेत EBCS बद्दल सांगण्यात आलं आहे. जी या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकते.


🔸काय आहे Early ballots cast system?


एकाच दिवसात कोट्यवधी लोकांनी मत देणं ही अशक्य बाब आहे. यासाठी अमेरिकेतील संविधानात एक पर्याय सूचवण्यात आला आहे. ज्याद्वारे मतदारांना मतपत्रिकेद्वारे किवा मेलद्वारे मत देता येतं. याचा वापर अमेरिकेतील ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या किंवा मतदान केंद्रांपासून दूर असलेल्या मतदारांना करता येतो. याव्यतिरिक्त वयस्क लोकांनादेखील हा पर्याय वापरता येतो. मतदानाच्या तीस दिवसांपूर्वी मतदारांना याद्वारे आपलं मत देता येतं. प्रत्येक राज्यांमध्ये स्थानिक निवडणूक आयोग याची तारीख निश्चित करत असतो. तसंच यासाठी नोंदणी करावी लागते, तेव्हाच आपलं मत मेल करता येतं. दरम्यान, या मतांची मोजणीदेखील मुख्य मतमोजणीसोबतच केली जाते. यावेळी या पर्यायानं सर्व विक्रम मोडीत काढल्याचं दिसत आहे. पहिल्या दोन आठवड्यांमध्येच २.७ कोटी लोकांनी तर आतापर्यंत जवळपास सात कोटींपेक्षा अधिक लोकांची या पर्यायाद्वारे मतदान केलं आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यात वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे.



🔸भारतीय वंशाच्या मतदारांची ताकद


अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे मतदार एक मोठी भूमिका बजावणार असल्याचं म्हटलं जात आहे. १६ राज्यांमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या अमेरिकेतील नागरिकांपेक्षाही अधिक आहे. परंतु १३ लाख भारतीय त्या आठ राज्यांमध्ये राहतात ज्या ठिकाणी चुरशीची लढत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही पक्षाला एक मतही बहुमोल ठरणार आहे. अमेरिकेत २८ ऑक्टोबरपर्यंत ७.५ कोटींपेक्षा अधिक मतं देण्यात आली आहेत. राजकीय क्षेत्रातील जाणकारांनुसार यावेळीही याप्रकारचे ‘सायलेंट वोटर’च ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेत मतदानासाठी मेल किंवा लवकर मत देणं आणि दुसरं मतदान केंद्रांवर जाऊन मत देणं असे पर्याय उपलब्ध आहेत.

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...