Friday, 23 October 2020

भारतातून चहाची विक्रमी निर्यात.


🅾️भारताने यावर्षी चहाची विक्रमी निर्यात केली आहे. तब्बल ३५ वर्षांनंतर चहा निर्यातीत भारताला२३० दशलक्ष किलोचा टप्पा गाठण्यातयश आले आहे.गेल्या आर्थिक वर्षात देशातून २३२.९२ दशलक्ष किलो चहाचीनिर्यात झाली. 


🅾️तया मोबदल्यात देशाला ४,४९३.१० कोटी रुपये मिळालेआहेत. यापूर्वी १९८०-८१ या काणात २३१.७४ दशलक्ष किलो चहाची निर्यातझाली होती.गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निर्यातीचे प्रमाण१७ टक्क्यांनी वाढले आहे. रशिया, इराण, जर्मनी, पाकिस्तान, बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात आणिपोलंड यासारख्या देशांनी मोठ्या प्रमाणात चहाची खरेदी केल्याने निर्यातीत वाढ झाली आहे.


🅾️दशात लिलावाद्वारे विक्री झालेल्या चहालादेखील चांगली किंमत मिळाली आहे. लिलाव झालेल्या चहाची किंमत आणि प्रमाण अनुक्रमे ८.०५ टक्के व१७.८२ टक्क्यांनी वाढले, असे ताज्या अहवालात नमूद आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या 🏳️ सीमा .


१) मध्य प्रदेश 🐯 :-

 नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया..


२) कर्नाटक 🌮 :-

 कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड..


३) आंध्र प्रदेश 🍂 :-

 गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड..


४) गुजरात 🌾 :- 

ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे..


५) दादरा, नगर-हवेली 🏄🏼 :-

 ठाणे, नाशिक..


६) छत्तीसगड ⛰:-

 गोंदिया, गडचिरोली..


७) गोवा 🌴:-

 सिंधुदुर्ग.. 


ऑसिरिस रेक्स’ अवकाशयानाने बेन्नू या लघुग्रहावर यशस्वी अवतरण केले.


🔰नासाच्या ‘ऑसिरिस रेक्स’ अवकाशयानाने बेन्नू या लघुग्रहावर मंगळवारी यशस्वी अवतरण केले असून यांत्रिक बाहूच्या मदतीने त्याच्यावरील खडकाचे नमुने घेतले आहेत.


🔰ह खडक सौरमालेच्या जन्मावेळचे आहेत. ते आता पृथ्वीवर आणले जातील असे नासाने म्हटले  आहे.दी ओरिजिन्स, स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन रिसोर्स आयडेंटीफिकेशन, सिक्युरिटी रिगोलिथ एक्सप्लोरर (ओसिरिस-रेक्स ) अवकाशयान पृथ्वीनिकटच्या या लघुग्रहावर अलगद उतरले.


🔰तथील खडकाचे तुकडे व धूळ गोळा केली. आता ते नमुने 2023 पर्यंत पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहेत.बेन्नू हा लघुग्रह पृथ्वीपासून 321 दशलक्ष किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर आहे. या लघुग्रहाच्या अभ्यासातून सौरमालेच्या निर्मितीवेळच्या परिस्थितीचा अंदाज घेता येईल.