Sunday, 11 October 2020

मूलभूत संरचनेशी संबंधित खटले व मूळ संरचनेतील घटक (सर्वोच्च न्यायालय ठरविल्याप्रमाणे)



📌दिल्ली जुदिशियल सर्विसेस असोसिएशन खटला ( 1991)

1)कलम ३२, १३६, १४१ व १४२ अनुसार सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार.


📌इद्र सहानी खटला (1992)

 -मंडल खटला या नावाने ओळखला जातो.

1)कायद्याचे राज्य


📌कमार पद्मा प्रसाद खटला 1992

स्वतंत्र न्यायव्यवस्था.


📌कीहोतो हॉलोहोन खटला (1993 )

- पक्षांतर खटला नावाने ओळखला जातो

१. मुक्त व न्याय्य निवडणुका 

२. सार्वभौम, लोकशाही व प्रजासत्ताक संरचना.


📌रघुनाथराव खटला (1993)

१. समानतेचे तत्त्व

२. भारताची एकात्मता व अखंडता


📌एस. आर. बोम्मई. खटला (1994)

१. संघराज्यीय प्रणाली

२. धर्मनिरपेक्षता

३. लोकशाही

४. देशाची एकात्मता व अखंडता

५. सामाजिक न्याय

६. न्यायालयीन पुनर्विलोकन


📌एल. चंद्रकुमार खटला (1997)

कलम २२६ व २२७ अनुसार उच्च न्यायालयाचे अधिकार.


📌इद्र सहानी खटला ( 2000)

समानतेचे तत्त्व


📌ऑल इंडिया जजेस असोसिएशन खटला 2002.

1)स्वतंत्र न्यायव्यवस्था


📌कलदीप नायर खटला (2006)

१. लोकशाही

२. मुक्त व न्याय्य निवडणुका


📌एम नागराज खटला(2006)

समानतेचे तत्त्व

संविधान सभेची सत्रेः संविधान सभेची एकूण 11 सत्रे झाली.


ती पुढीलप्रमाणे


📌१.पहिले सत्र  : ९ ते २३ डिसेंबर, १९४६


📌२.दुसरे सत्र : २० ते २५ जानेवारी, १९४७


📌३.तिसरे सत्र  : २८ एप्रिल ते २ मे, १९४७


📌४.चौथे सत्र : १४ ते ३१ जुलै, १९४७


📌५.पाचवे सत्र :  १४ ते ३० ऑगस्ट, १९४७


📌६.सहावे सत्र : २७ जानेवारी, १९४८ 


📌७.सातवे सत्र :  ४ नोव्हेंबर, १९४८ ते ८ जानेवारी, १९४९


📌८.आठवे सत्र  : १६ मे ते १६ जून, १९४९


📌९.नववे सत्र : ३० जुलै ते १८ सप्टेंबर, १९४९


📌 १०.दहावे सत्र :  ६ ते १७ ऑक्टोबर, १९४९.


📌११.अकरावे सत्र : १४ ते २६ नोव्हेंबर, १९४९.


(संविधान सभेची संविधान सभा म्हणून शेवटची सभा २४ जानेवारी, १९५० रोजी झाली, ज्या दिवशी २८४ सदस्यांनी घटनेच्या तीन प्रतींवर सह्या 

वाचा :- महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने

  


1) गाडगे महाराज - अमरावती


2) समर्थ रामदास- सज्जनगड


3) संत एकनाथ - पैठण


4) गजानन महाराज - शेगाव


5) संत ज्ञानेश्वर - आळंदी


6) संत गोरोबा कुंभार - ढोकी


7) संत चोखा मेळा - पंढरपूर


8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी


9) संत तुकडोजी  - मोझरी


10) संत तुकाराम - देहू


11) साईबाबा - शिर्डी


12) जनार्दन स्वामी - कोपरगाव 


13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर


14) दामाजी पंत - मंगळवेढा


15) श्रीधरस्वामी - पंढरपूर


16) गुरुगोविंदसिंह - नांदेड


17) रामदासस्वामी - जांब


18) सोपानदेव - आपेगाव


19) गोविंदप्रभू - रिधपुर


20) जनाबाई - गंगाखेड


21) निवृत्तीनाथ - आपेगाव

राज्यसेवा पूर्व परीक्षा सराव पेपर

 1.  आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) याचे मुख्यालय कुठे आहे?

(A) बिजींग, चीन✅

(B) जिनेव्हा, स्वित्झर्लंड

(C) शांघाय, चीन

(D) टोकियो, जापान


2.  जुलै 2019 मध्ये हुसेन मुहम्मद इरशाद यांचा मृत्यू झाला. ते ____ या देशाचे माजी राष्ट्रपती होते.

(A) अफगाणिस्तान

(B) इराक

(C) बांग्लादेश✅

(D) सौदी अरब



3.  कोणत्या खेळाडूने विक्रमी सहाव्यांदा ब्रिटिश ग्रँड प्रिक्स ही शर्यत जिंकली?

(A) वल्टरी बोटास

(B) सेबेस्टियन व्हेटेल

(C) मॅक्स वर्स्टपेन

(D) लेविस हॅमिल्टन ✅

 


4.  लॅटीशा चॅन आणि इवान डोडिग यांनी 2019 विम्बल्डन स्पर्धेच्या मिश्र गटाचे विजेतेपद जिंकले. चॅन हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

(A) चीन

(B) जापान

(C) तैवान ✅

(D) क्रोएशिया



5.  कुसुम योजनेचा उद्देश काय आहे ?

(A) सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यास प्रोत्साहन देणे  ✅

(B) वस्त्र उद्योग क्षेत्रातील क्षमता वाढवणे

(C) शालेय पोषण स्तराची सुधारणा

(D) स्वच्छ इंधन पुरवठा करणे

 


6.   मेक्सिको देशाचा सर्वोच्च पुरस्कार Mexican Order of Aztec Eagle देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले?

(A) रतन टाटा

(B) डॉ. रघुपती सिंघानीया  ✅ 

(C) पृथ्वीराज सिंह ओबरॉय

(D) आनंद महिंद्रा



7. भारतातील पहिले ऊर्जा सल्लागार केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे ?

(A) आयआयटी मद्रास

(B) आयआयटी मुंबई

(C) आयआयटी कानपूर ✅ 

(D) आयआयएम अहमदाबाद




8.  जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या दलित पँथर या सामाजिक संघटनेच्या सहसंस्थापकाचे नाव काय होते?

(A) नामदेव ढसाळ

(B) जे. व्ही. पवार

(C) अरुण कांबळे

(D) राजा ढाले ✅



9.  15 जुलै रोजी नियमांचे पालन न केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेनी कोणत्या बँकेला 7 कोटी रुपयांचा दंड ठोठावला?

(A) बँक ऑफ महाराष्ट्र

(B) पंजाब नॅशनल बँक

(C) भारतीय स्टेट बँक ✅

(D) कॅनरा बँक



10.    2020 साली रायफल / पिस्तूल / शॉटगन या प्रकारांसाठी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) विश्वचषक कुठे खेळवला जाणार आहे?

(A) नवी दिल्ली ✅

(B) महाराष्ट्र

(C) पश्चिम बंगाल

(D) गोवा



11.  कोणत्या व्यक्तीची सिंगापूर इंटरनॅशनल कमर्शियल कोर्ट (SICC) याचे आंतरराष्ट्रीय न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली गेली आहे?

(A) दिपक मिश्रा

(B) ए. के. सिक्री ✅

(C) मदन लोकुर

(D) टी. एस. ठाकुर



12.   भारतातल्या महिलांना डिजिटल कृतींचा अवलंब करण्यास आणि डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी GSMAच्या ‘कनेक्टेड विमेन’ या उपक्रमासोबत ____ ने भागीदारी केली.

(A) BSNL

(B) एअरटेल

(C) रिलायन्स जियो ✅

(D) व्होडाफोन



13.   जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या आसामी साहित्यकाराचे नाव काय होते?

(A) इंदिरा गोस्वामी

(B) माहीम बोरा

(C) पुरोबी बोर्मूदेय ✅

(D) यापैकी नाही



14.  कोणत्या व्यक्तीची हिमाचल प्रदेश राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नेमणूक केली गेली?

(A) आचार्य देवव्रत

(B) कलराज मिश्रा ✅

(C) केशरी नाथ त्रिपाठी

(D) कल्याण सिंग


1) खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापतीपद भूषविलेले नाही ? 

 A. के.एस. हेगडे

 B. हुकुम सिंह

 C. कृष्णकांत🔰

 D. गुरदयालसिंग धिल्लन.

____________________

2) खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघामध्ये राज्यांच्या निर्मिती बद्दल योग्य आहे?

(a) ते विद्यमान राज्यांतील प्रदेश वेगळे करून केले जाऊ शकते.

(b) ते आणखी दोन राज्ये किंवा राज्यातील भाग एकत्रित करून करता येईल.

(c) नव्या राज्यांची निर्मिती एका सामान्य कायद्याने करता येते.

(d) राज्यांच्या संमती शिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही.

पर्यायी उत्तरे 

 A. (a), (b), (d)

 B. (a), (b), (c)🔰

 C. (a), (c), (d)

 D. (b), (c), (d).


____________________

3) राज्यघटनेनुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केली जावू शकते :

(a) जेंव्हा राज्यशासनाद्वारे मांडलेले विधेयक राज्य विधिमंडळात नामंजूर होते.

(b) जर राज्यघटनेतील तरतूदीप्रमाणे राज्यशासन काम करीत नसेल,

(c) जर केन्द्राने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यास राज्य शासन असमर्थ असेल.

(d) जेंव्हा राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात महत्वाच्या मुद्यावर मतभिन्नता असेल.

पर्यायी उत्तरे :

 A. (a), (b) आणि (c)

 B. (b) आणि (c)🔰

 C. (a), (b) आणि (d)

 D. (a), (c) आणि (d).

___________________

____________________

4) अचूक जोड़ी कोणती ?

 A. कलम 79 - लोकसभेची रचना

 B. कलम 84 - संसद सदस्यत्वाची पात्रता🔰

 C. कलम 99 - संसद सचिवालय 

 D. कलम 85 - सदस्यांची अपात्रता.

____________________

5) भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठीच्या निर्वाचक गणांमध्ये (इलेक्टोरल कॉलेज)

_ समावेश होतो.

 A. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा 

 B. संसदेतील निवडून आलेल्या सदस्यांचा आणि राज्यांच्या विधान सभांमधील निवडून आलेल्या सदस्यांचा

 C. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सर्व सदस्यांचा🔰

 D. संसद आणि राज्यांच्या विधान सभांमधील सर्व सदस्यांचा.

____________________


6) पुढील विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ?

(a) केंद्रातील मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या संसदेला जबाबदार असतात.

(b) लोकसभा व राज्यसभा यांचे सदस्य असलेल्या व्यक्ती ह्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये मंत्री होण्यास पात्र असतात.

पर्यायी उत्तरे 

 A. फक्त (a)

 B. फक्त (b)🔰

 C. दोन्ही

 D. कोणतेही नाही.

____________________


7) भारतीय राज्यघटनेतील _ सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते.

 A. कलम 20 

 B. कलम 21🔰

 C. कलम 22

 D. कलम 31.


______________________


8) राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने जानेवारी 2014 पर्यंत भारतातील ____ समुदायांना अल्पसंख्यांक समुदाय म्हणून सूचित केले होते.

 A. पाच

 B. सहा🔰

 C. सात

 D. आठ.

____________________


9) खालीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहेत ?

(a) राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे त्या सभागृहाचे सदस्य नसतात.

(b) उपाध्यक्ष जेव्हा सभागृहाचे कामकाज चालवतात तेव्हा ते पहिल्या फेरीत मतदान करू शकतात.

पर्यायी उत्तरे :

 A. केवळ (a) योग्य आहे

 B. केवळ (b) योग्य आहे

 C. (a) आणि (b) दोन्ही योग्य आहेत

 D. (a) आणि (b) दोन्ही अयोग्य आहेत.🔰

____________________


10) राज्यसभेचे अध्यक्ष ___ पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनेलचे नामांकन करतात

 A. दोन

 B. पाच 

 C. सहा🔰

 D. चार.

प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल संपूर्ण माहिती



·         सृष्टी -प्राणी


·         उपसृष्टी - मेटाझुआ


विभाग -1 : असमपृष्ठरज्जू प्राणी


संघ


1.    प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.


2.    पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा


3.    सिलेंटराटा - हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन


4.    प्लॅटीहेल्मिन्थीस - प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म


5.    नेमॅटहेल्मिन्थीस - अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म


6.    अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस


7.    आथ्रोपोडा - खेकडा , झुरळ , कोळी


8.    मोलुस्का - शंख , शिंपला , गोगलगाय


9.    इकायानोडर्माटा - तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर


10. हेमिकॉर्डाटा - बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस

चीनकडे जगातील सर्वात मोठे नौदल, युद्धनौकांमध्ये अमेरिकेला टाकलं मागे .



🧬विस्तारवादी दृष्टीकोन बाळगणारा चीन सातत्याने आपली लष्करी ताकत वाढवत चालला आहे. सध्याच्याघडीला चीनकडे जगातील सर्वात मोठे नौदल आहे. या समुद्री शक्तीच्या बळावर चीनकडून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील विविध भागात आपल्या नौदलासाठी तळ उभारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. रणनितीच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास प्रतिस्पर्धी देशांवर कुरघोडी करण्याचा चीनचा उद्देश आहे. दक्षिण चीन समुद्र त्याचे चांगले उदहारण आहे.


🧬पढच्या दशकभरात अणवस्त्रांची संख्या दुप्पट करण्याचेही चीनने लक्ष्य ठेवले आहे. चीनकडे असलेली दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे, अण्वस्त्र पाणबुडया, एअर डिफेन्स सिस्टिम, अवकाश आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर क्षमता याचा पेंटागॉनने अभ्यास करुन त्यासंबंधीचा सविस्तर अहवाल अमेरिकन काँग्रेसला मंगळवारी सादर केला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.


🧬लडाखमध्ये सुरु असलेला ताजा संघर्ष तसेच हिंदी महासागर क्षेत्रातील चिनी नौदलाच्या वाढत्या हालचाली या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पेंटागॉनच्या या अहवालाची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये आफ्रिकेतील डिजीबाऊटी येथे चीनने परदेशातील पहिला लष्करी तळ स्थापन केला. चिनी नौदलाकडून या तळाचे संचालन केले जाते. त्यानंतरच चिनी नौदलाच्या हिंदी महासागर क्षेत्रातील हालचालीत वाढ झाली. त्याशिवाय पाकिस्तानातील कराची, ग्वादर बंदरातही चीनचा कुठल्याही आडकाठीशिवाय मुक्तपणे वावर सुरु असतो.

यशवंतराव चव्हाण: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार



- आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 35 वी पुण्यतिथी. 

- महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केलेले आहे. 


यशवंतरावांची ग्रंथसंपदा

आपले नवे मुंबई राज्य, ॠणानुबंध, कृष्णाकाठ, भूमिका, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे, युगांतर.


यशवंतरावांचे आयुष्य रेखाटणारी पुस्तके: आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार, आमचे नेते यशवंतराव, कृष्णाकाठचा माणूस, घडविले त्यांना माऊलीने, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, मुलांचे यशवंतराव चव्हाण, यशवंतराव : इतिहासाचे एक पान, यशवंतराव : एक इतिहास.


यशवंतरावांचे आर्थिक विचार

यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.


यशवंतरावांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी


- यशवंतरावांना भाषण, संगीत आणि भजन-कीर्तनाची आवड होती. त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली. 

- त्यांनी सालसेत येथे सत्याग्रहात भाग घेतला होता. 

- येरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत, एस.एम.जोशी यांच्याशी त्यांची ओळख झाली. तेथेच त्यांना राजकीय, सामाजिक प्रश्नांची जाणीव झाली.

- 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केल्यानंतर त्यांनी त्यामध्ये भाग घेतला. 

- 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवादाशी विचारांशी त्यांचा परिचय होऊन काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले.

- दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाणांना रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका अमान्य झाली. 

- 1942 साली छोडो भारत आंदोलनात ते सहभागी झाले. 

- 1946 साली मुंबई प्रांताच्या विधिमंडळाच्या निवडणुकीत ते सातारा मतदार संघातून निवडून संसदीय चिटणीस झाले.

- 1948 साली त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीसपदावर नियुक्ती झाली.1952 ला ते स्थानिक स्वराज्य व पुरवठा खात्याचे मंत्री झाले.

- 1 नोव्हेंबर 1956 ला द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले व 1960 साली संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.

- 1962-66 या काळात ते भारताचे संरक्षणमंत्री, 1966-70 गृहमंत्री, 1970-74 पर्यंत अर्थमंत्री व 1974 साली परराष्ट्रमंत्री बनले.

- यशवंतराव चव्हाण यांनी 25 नोव्हेंबर 1984 रोजी जगाचा निरोप घेतला.

महाराष्ट्रातील मुख्य संस्था




1. सत्यशोधक समाज

- स्थापना: 24 सप्टेंबर 1873, पुणे

- संस्थापक: महात्मा फुले 

- ब्रीद वाक्य: सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोच मध्यस्थी


2. प्रार्थना समाज

- स्थापना: 31 मार्च 1867, मुंबई 

- संस्थापक अध्यक्ष: डाॅ. आत्माराम पांडुरंग 

- प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले.


3. सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना असोसिएशन)

- स्थापना: 2 एप्रिल 1870, पुणे 

- संस्थापक: न्या. रानडे & गणेश वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)

- पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी


4. आर्य समाज

- स्थापना: 10 एप्रिल 1875, मुंबई 

- संस्थापक: स्वामी दयानंद सरस्वती

शोध व संशोधक


◾️ विमान – राईट बंधू

◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल

◾️ रडार - टेलर व यंग


◾️ रडिओ - जी. मार्कोनी

◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट

◾️ थर्मामीटर - गॅलिलीयो

◾️ हलीकॉप्टर - सिकोर्स्की


◾️ विजेचा दिवा - एडिसन

◾️ रफ्रीजरेटर - पार्किन्स

◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस

◾️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन


◾️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल

◾️ रडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी

◾️ टलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल

◾️ गरामोफोन - एडिसन


◾️ टलिव्हिजन - जॉन बेअर्ड

◾️ पनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग

◾️ उत्क्रांतिवाद - डार्विन

◾️ भमिती - युक्लीड


◾️ दवीची लस - जेन्नर

◾️ अधांसाठी लिपी - ब्रेल लुईस

◾️ अटी रेबीज -लुई पाश्चर


◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन

◾️ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश

◾️ नयूट्रोन – चॅडविक


◾️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर

◾️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे

◾️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल

◾️ गरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) संस्थेचे 7 नवीन क्षेत्र



भारत सरकारच्या संस्कृति मंत्रालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) या संस्थेच्या 7 नवीन क्षेत्रांची नावे जाहीर केली. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत -


🔸तरिची (तामिळनाडू)


🔸रायगंज (पश्चिम बंगाल)


🔸राजकोट (गुजरात)


🔸जबलपूर (मध्यप्रदेश)


🔸झांसी (उत्तरप्रदेश)


🔸मरठ (उत्तरप्रदेश)


🔸हम्पी शहर (कर्नाटक).


भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विषयी


🔸भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ही एक भारतीय सरकारी संस्था आहे जी संस्कृति मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. पुरातत्व संशोधनात्मक कार्य तसेच देशातल्या सांस्कृतिक स्मारकांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी ही संस्था जबाबदार आहे. त्याची स्थापना 1861 साली अलेक्झांडर कनिंघम या ब्रिटिश अधिकाऱ्याने केली होती. संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली या शहरात आहे.


🔸भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) यांच्याकडून ऐतिहासिक महत्व आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तु वा स्मारकांना ‘राष्ट्रीय महत्त्व’ म्हणून घोषित केले जाते. ‘प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्वविषयक ठिकाणे व अवशेष अधिनियम-1958’ यामध्ये ‘प्राचीन स्मारक’ या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे. या कायद्याच्या अंतर्गत ‘प्राचीन स्मारक’ घोषित केले जाते, जे ऐतिहासिक आहे आणि 100 वर्षांपेक्षा अधिक काळापासून अस्तित्वात आहे.

भारतातील रस्त्यासंबंधी



राष्ट्रीय महामार्गाचा विकास व देखभाल खालील यंत्रणांमार्फत होते

- उत्तर पूर्व व उत्तर सीमा भागात सीमा रस्ते संघटना (BRO): स्थापना 1960

- रस्त्यांचा धोरणात्मक विकास भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI): स्थापना 1988

- सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD)


- रस्त्यांसंबंधी महत्त्वाची योजना: नागपूर योजना (1943)

- National Highway Development Project (NHAI): राष्ट्रीय महामार्गाचा विकास करण्यासाठी 1998 मध्ये स्थापना

- प्रधानमंत्री ग्रामसडक योजना (PMGSY): गावांना रस्त्यांनी जोडण्यासाठी 20 डिसेंबर 2000 मध्ये सुरू करण्यात आली.

- प्रधानमंत्री भारत जोडो परियोजना (PMBJP): शहरांना राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यासाठी 14 जानेवारी 2004 रोजी सुरू करण्यात आली. 

- केंद्रीय रस्ते निधी: रस्त्यांची उभारणी व देखभालीसाठी 2000 मध्ये निर्मिती 

- भारत निर्माण योजना: 2005-06 मध्ये सुरू करण्यात आली. 

नरेंद्र मोदी यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान



👍  सौदी अरेबिया  -  ऑर्डर ऑफ अब्दुल्ला झीझ अल सौद  . पुरस्कार


👍 अफगाणिस्तान  - स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्लाह खान पुरस्‍कार


👍  पलेस्टाईन   -  अँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार


👍  सयुक्त अरब अमिराती - ऑर्डर ओ झायेद पुरस्कार


👍 रशिया  - सेट अँड्र्यू पुरस्कार


👍  मालदीव  - ऑर्डर ऑफ डिस्टींग्युईश्ड रूल ऑफ निशान इझुद्दिन पुरस्कार

देशातील वीजनिर्मिती प्रकल्प



● जलविद्युत निर्मिती प्रकल्प 

- टेहरी (उत्तराखंड), कोयना (महाराष्ट्र), श्री शैलम (आंध्रप्रदेश), नाथ्या झाक्री (हिमाचल प्रदेश)


● नैसर्गिक वायूधारित वीज निर्मिती प्रकल्प 

- समरलकोटा & कोंडापल्ली (आंध्रप्रदेश), अंजनवेल (महाराष्ट्र), बवाना (दिल्ली)


● औष्णिक ऊर्जाधारित वीज निर्मिती प्रकल्प 

- विंध्यनगर (मध्य प्रदेश), मुन्द्रा (गुजरात), तमनार (छत्तीसगढ), चंद्रपूर (महाराष्ट्र)


● अणूविद्युत निर्मिती प्रकल्प 

- कुंडनकुलम (तामिळनाडू), तारापूर (महाराष्ट्र), रावतभाटा (राजस्थान), कैगा (कर्नाटक)


अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना



- कर्मचारी राज्य विमा महामंडळाने(ESIC) २०१८ मध्ये सुरू केली होती. कोविड-१९ मुळे योजनेच्या नियमात बदल व शिथिलता आणली आहे.

- संगठित क्षेत्रातील कर्मचारी जे ESIC मध्ये विमाकृत आहेत त्या व्यक्तीस राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय अडचणींमुळे १(यापूर्वी३ महिने) महिन्यांपेक्षा जास्त काळ नोकरी गमवावी लागल्यास त्यास जास्तीत जास्त २४ महिन्यांपर्यंत साहाय्य उपलब्ध करून देणे!

- वेतनाच्या ५०%(यापूर्वी २५%) एवढे साहाय्य दिले जाते.


✅ "काळ्या समुद्रात" नैसर्गिक वायूचा साठा सापडल्याची घोषणा "तुर्कस्थान"चे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगेन यांनी केली. हा साठी 340 अब्ज घनमीटर एवढा असल्याचा अंदाज आहे.


✅ ३ रा ड्रॅगनफ्लाय महोत्सव, २०२०

- वर्ल्ड वाईड फ़ंड(wwf) व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने "ड्रॅगनफ्लाय कीटकांचे संवर्धन व्हावे यासाठी" 

- यावर्षी केरळमध्ये "थंबी महोत्सवम" हा याचाच एक भाग म्हणून साजरा केला जाणार आहे. 

- २०१८ मध्ये सुरुवात.


✅ "तृतीयपंथी व्यक्तींसाठी राष्ट्रीय परिषद" स्थापन

- तृतीयपंथी व्यक्ती(हक्क संरक्षण) कायदा, २०१९ अंतर्गत स्थापना.

- अध्यक्ष- केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री

- सदस्य- इतर खात्यांचे प्रतिनिधी, तृतीयपंथी प्रतिनिधी, नीती आयोग, मानवी हक्क आयोग इ.

विविध घोषित वर्ष


● २०२४:-

• आंतरराष्ट्रीय उंटवंशीय वर्ष ( Camelids) (युनो)


● २०२३:-

• आंतरराष्ट्रीय भरड वर्ष (अन्न व कृषी संस्था )


● २०२२:-

• आंतरराष्ट्रीय मच्छीमार व मत्स्यसवर्धानाचे वर्ष (युनो)


● २०२१:-

• आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास वर्ष


● २०२०:-

• गतिशीलतेचे वर्ष केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)

• उंदरांचे वर्ष (चीन)

• परिचारिका आणि दाई वर्ष (जागतिक आरोग्य संघटना)

• वनस्पतींच्या आरोग्यासाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष (युनो)

• भारत-चीन सांस्कृतिक आणि जनतेतील आदानप्रदान वर्ष म्हणून जाहिर.(भारत- चीन दोन्ही देशांनी )

• कृत्रिम बुद्धीमत्तेचे वर्ष (तेलगंणा)


● २०१९:-

• आंतरराष्ट्रीय आदिवासी वर्ष (युनो)

• देशी भाषांचे आंतरराष्ट्रीय वर्ष (युनो)

• आंतरराष्ट्रीय नियमन वर्ष (युनो)

• रासायनिक मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीचे वर्ष (युनो)

• पाण्याचे वर्ष (कर्नाटक)

• Year Of Next Of Kin ( भारतीय लष्कर)


● २०१८

• निरोगी बालक वर्ष (झारखंड)

• कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या सैनिकांचे वर्ष (भारतीय लष्कर)

• राष्ट्रीय तृणधान्य वर्ष (भारत सरकार )


● २०१८-१९ :-

• महिला सुरक्षा वर्ष (भारतीय रेल्वे )


● २०१७ :-

• आंतरराष्ट्रीय विकासासाठे शाश्वत पर्यटन वर्ष (युनो)

• व्हिजीट महाराष्ट्र वर्ष (महाराष्ट्र सरकार)

• सफरचंद वर्ष (जम्मू काश्मीर)

• भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांनी २०१७ हे सांस्कृतिक देवाण घेवाणीचे वर्ष म्हणून साजरे केले

असहकार चळवळ


◾️ 1920 सालच्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीच्या कार्यक्रमास मान्यता दिली.

➡️ तयात पुढील बाबींचा समावेश होता.

1) सरकारी नोकर्‍या व पदव्या यांचा त्याग करणे.

2) सरकारी सभा समारंभावर बहिष्कार टाकणे.

3) सरकारी शाळा- महाविदयांलयातून मुलांना काढून घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थांत दाखल करणे

4) सरकारी कोर्ट्सकचेर्‍यांवर बहिष्कार घालणे.

5) प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे.

6) परदेशी मालावर बहिष्कार टाकणे व स्वदेशी मालाचा वापर करणे.

7) दारूबंदीचा प्रचार व दारूच्या दुकानांसमोर निदर्शने करणे.

◾️ असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

◾️  शासनाने दडपशाहीचे धोरण स्वीकांरताच गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.

◾️ चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी 5 फेब्रुवारी, 1922 रोजी घेतला.

🟢 विधायक कार्यक्रम :-

◾️ गांधीजीनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली.

◾️ तयामुळे राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागात पोचली व तिला जनाधार प्राप्त झाला.

वातावरणाविषयी माहिती


पृथ्वी भोवतीच्या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात. वातावरणाचे खालील स्तर पडतात.


1. तपांबर


भूपृष्ठापासून तेरा किलोमीटर ऊंची पर्यंतच्या हवेच्या थर तपांबर म्हणून ओळखला जातो. या थराची विषुववृत्तावरील जाडी जवळजवळ सोळा किलोमीटर असून ध्रुवावर ती सहा किलोमिटरच्या दरम्यान आहे.


समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. या कारणामुळे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी थंड हवेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत.


2. तपस्तब्धी


भुपृष्ठापासून जवळजवळ दहा किलोमिटरच्या उंचीपर्यंत वातावरणाच्या तापमानात सतत घट होत जाते. त्यानंतर तीन किलोमीटरच्या थरातील तापमानात कोणताही बदल होत नसल्यामुळे वातावरणाचा हा थर स्थिर तापमानाचा थर म्हणून ओळखला जातो. या थराला तपस्तब्धी असे म्हणतात.


3. स्थितांबर


तपस्तब्धीनंतर वातावरणाच्या या थराला सुरुवात होते. स्थितांबराच्या या भागाची जाडी जवळजवळ 13 ते 50 किलोमीटर पर्यंत आहे. या थरामधील सुरुवातीच्या 32 ते 40 किलोमीटर उंचीच्या भागात तापमान सारखेच आढळते. स्थितांबरामध्ये खालील स्थराचे अस्तित्व आढळते.

ओझोनोस्पीअर – स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायुचा स्तर आहे. हा थर ओझोनोस्पीअर या नावाने ओळखला जात असून या थरामध्ये सूर्यापासून आलेली अल्ट्राव्होयलेट किरणे शोषली जातात.

मध्यांबर – स्थितांबरचा वर मध्यांबर आहे. या भागात तापमानाचे प्रमाण सर्वात कमी आहे.


4. आयनाबंर


मध्यांबराच्या पलीकडील हवेच्या भागास आयनांबर म्हणतात. या थराची जाडी 80 ते 500 किलोमीटर पर्यंत आहे. या भागात हवेचे अत्यंत विरळ अस्तित्व आहे. सूर्यापासुन आलेल्या अल्ट्राव्होयलेट किरणाची हवेच्या अणूवर प्रक्रिया होऊन तेथे आयनांबर थर निर्माण झालेला आहे. यामध्ये खालील स्तर आढळतात.


इ-लेअर – या थरातील 100 ते 208 किलोमिटरचा थर इ-लेअर (E-Layaer) म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नेभोवाणीकडून निघालेल्या मध्यम रेडिओ लहरी पृथ्वीवर प्रवर्तित होतात.


एफ-लेअर – त्यानंतरचा थर (F-Layer) एफ-लेअर म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नभोवाणी केंद्रामधून निघालेल्या लघु रेडिओ लहरी पृथ्वीवर परावर्तीत होतात.


5. बाहयांबर


आयनाबंराच्या पलीकडील हवेच्या भागास बाहयांबर म्हणतात. या थरात उंचीनुसार तापमान वाढत जाते. या भागात हायड्रोजन सारख्या हलक्या वायूचे अस्तित्व आढळते.

मुस्लिम लीग


 

   🖍ठिकाण :- ढाका 

   🖍सस्थापक अध्यक्ष :- सलीम उल्ला 

   🖍मख्यालय :- लखनऊ

   🖍उद्देश :- ब्रिटिश साम्राज्याप्रती मुस्लिमांमध्ये 

सहानुभूती निर्माण करुन मुस्लिम गटास काँग्रेसपासून दूर ठेवणे,मुस्लिमांच्या राजकीय व इतर हक्कांचे संरक्षण करणे, तसेच मुस्लिमांसाठी इंग्रज सरकारप्रती राजनिष्ठेची भावना दृढ करणे व त्यांच्या आकांक्षा, गरजा सरकारसमोर संयमपूर्ण शब्दात ठेवणे हा होता. 

 

 🖌 मस्लिम लीगची स्थापना ‘All Indian  

Mohammadan Educational Conference’ 

च्या 20 व्या वार्षिक सभेच्या शेवटच्या दिवशी  

करण्यात आली.ही सभा ढाका येथे 27 ते 30 डिसेंबर दरम्यान घेण्यात आली होती. 

🖌या सभेत मुस्लिम लीग ही राजकीय पार्टी स्थापन करण्याचा प्रस्ताव ढाक्याचे नवाब सलीम उल्ला आणि मोहसीन यांनी मिळून मांडला. 

  🖌अखेर आगाखान यांनी सुचविल्यानंतर या संघटनेला ‘All Indian Muslim League’ असे नाव देण्यात आले. 

  🖌मस्लिम लीगचे पहिले वार्षिक अधिवेशन 29 - 30 डिसेंबर 1907 रोजी कराची येथे अहमजी पिरभॉय यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

  🖌पढच्या वर्षीच मोहम्मद अली गोहर यांनी कराची येथे मुस्लिम लीगची घटना (ग्रीन बुक) लिहिली. 


          मुस्लिम लीगचे अध्यक्ष

1907 अहमजी पीरभॉय 

1908-1912 आगाखान 

1912-1918 सर मुहम्मद अली 

1919-1930 मुहम्मद अली जिना 

1931 सर मुहम्मद शफी 

1931-1932 सर मुहम्मद झफररुल्ला खान 

1932-1933 मिया अब्दुल अझीझ 

1933-1934 हफिज हिदायत हुसेन 

1934-1947 मुहम्मद अली जिना

कधी आणि कसं ठरतं बहुमत...



- विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यानंतर राज्यपाल मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देतात.

बहुमत चाचणीला इंग्रजीमध्ये फ्लोअर टेस्ट असं म्हणतात.

- सत्ता स्थापन झाल्यानंतर पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच बहुमत सिद्ध करण्याची वेळ आल्यास विधानसभेचं विशेष सत्र बोलावलं जातं.

- निवडून आलेल्या सर्व आमदारांपैकी सभागृहामध्ये उपस्थित असलेले किती आमदार मतदान करतात, यावर बहुमत चाचणीचा निकाल अवलंबून असतो.

- ठराविक एका बाजूने मतदान करण्यात यावेसाठी पक्षाच्या गटनेत्याकडून व्हीप म्हणजेच पक्षादेश काढला जातो. व्हीप असला तरी मतदान करायचं की नाही याचा निर्णय आमदार स्वतः घेऊ शकतात. मतदान जर पक्षादेशानुसार झाले नाही तर आमदारावर पक्ष कारवाई करु शकतो.

- बहुमत चाचणीच्या वेळी जेवढे आमदार मतदान करतात तो आकडा गृहित धरुन त्याच निकषांवर बहुमताचा आकडा ठरवला जातो.

- बहुमत चाचणीसाठी आवाजी पद्धतीने, हात उंचावून किंवा गुप्त पद्धतीने मतदान घेतलं जातं. मतदान कोणत्या पद्धतीने घ्यायचं हा निर्णय राज्यपालांचा असतो.


● बहुमताचे चार प्रकार


1. साधे बहुमत: साधे बहुमत म्हणजे उपस्थित व मतदान करणार्‍या सदस्यांचे बहुमत 


2. पूर्ण बहुमत किंवा निरपेक्ष बहुमत: सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या अर्ध्याहून अधिक सदस्य एका ठराविक पक्षाचे असणे


3. प्रभावी बहुमत: सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येतून गैरहजर आणि रिक्त जागांची संख्या वजा करून उर्वरित उपस्थित व मतदान करणार्‍या सदस्यांचे बहुमत म्हणजे प्रभावी बहुमत होय.


4. विशेष बहुमत: साधे, पूर्ण, प्रभावी बहुमत सोडून इतर सर्व बहुमतांना विशेष बहुमत म्हणतात. यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो: सभागृहाचे दोन तृतीयांश बहुमत, हजर व मतदानात भाग घेणार्‍या सदस्यांचे दोन तृतीयांश बहुमत, पूर्ण बहुमत + उपस्थित व मतदान करणार्‍या दोन तृतीयांश सदस्यांचे बहुमत. 


स्वच्छता सर्वेक्षण 2020



- आज झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात देशातील सर्वाधिक स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराला मिळाला आहे. 

- विशेष म्हणजे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या स्वच्छ शहर श्रेणीमध्ये तीनही राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्रातील शहरांनी मिळविले आहे. त्यामध्ये प्रथम पुरस्कार कराड, द्वितीय सासवड तर तृतीय क्रमांक लोणावळा शहराने मिळविला आहे.

- नागरी स्वच्छता अभियानातील राष्ट्रीय १२ पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ पुरस्कारांसह अन्य १३ असे एकूण १७ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. मोठ्या राज्यांच्या मानांकनात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक मिळाला आहे. 

- सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्राने यंदा हॅट्रीक साधली आहे. सलग तीनही वर्षी देशात सर्वाधिक पुरस्कार मिळवत महाराष्ट्र देशात अग्रेसर राहिला आहे. 

- केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या 'स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२०' चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. 

- इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. सलग चौथ्यांदा इंदौरने बाजी मारली आहे. 

- गुजरातमधील सूरत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर नवी मुंबई आहे. नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. 

- ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ मध्ये नवी मुंबईने स्वच्छ शहरात राज्यात प्रथम व देशात सातव्या क्रमांक मिळवला होता.

- केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने हरदीपसिंह पुरी यांनी याची घोषणा केली आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षणचं हे पाचवं वर्ष आहे.

- स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबईसह इतर शहरांचाही समावेश आहे. यामध्ये नाशिक ११, ठाणे १४, पुणे १५, नागूपर १८, कल्याण डोंबिवली २२, पिंपरी चिंचवड २४, औरंगाबाद २६, वसई-विरार ३२ आणि मुंबई ३५ व्या क्रमांकावर आहे.

- 'स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२०' हे २८ दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आलं होतं. स्वच्छता अॅपवरुन १ कोटी ७० लाख लोकांनी अभियानासाठी नोंदणी केली होती. सोशल मीडियावरुन ११ कोटी लोकांनी अभियानाला प्रतिसाद दिला. तर साडे पाच लाखांहून अधिक स्वच्छता कामगारांना सामाजिक कल्याणकारी योजनांशी जोडण्यात आलं.

- याआधी ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत कचरामुक्त शहर मोहिमेत देशातील पाच शहरांत नवी मुंबईला स्थान मिळाले होते. नवी मुंबई राज्यातील एकमेव शहर ठरलं होतं. पाहणीच्या आधारे कचरामुक्त शहराचा दर्जा ठरविण्यात आला होता. यावेळी नवी मुंबईला पंचतारांकित दर्जा मिळाला होता. 

- देशातील पाच शहरांत नवी मुंबईचा समावेश झाला होता, तसंच राज्यातील एकमेव शहर ठरलं होतं. गेल्या वर्षीही नवी मुंबईने हा दर्जा मिळवला होता.