तुम्हाला पाठ आहेत का :- महत्वाचे युद्ध सराव



🔶गरुड़ : भारत-फ्रांस.


🔶गरुड़ शक्ति : भारत-इंडोनेशिया.


🔶वरुण : भारत- फ्रांस.


🔶हन्ड-इन-हॅन्ड : भारत-चीन.


🔶जिमेक्स : भारत-जपान.


🔶धर्मा गार्डियन : भारत-जपान.


🔶कजिन संधि अभ्यास : भारत-

जापान तटरक्षकदल.


🔶सर्य किरण : भारत-नेपाळ.


🔶सिम्बेक्स : सिंगापुर-भारतीय नौदल.


🔶लाब्समर : भारत, ब्राझील, दक्षिण

अफ्रीका यांचं नौदल.


🔶कोंकण : भारतीय नौदल-ब्रिटन नेवी.


🔶इद्रधनुष : भारत-ब्रिटन.


🔶मालाबार : भारत-अमेरिका-जपान.


🔶रड फ्लैग : भारत-अमेरिका.


🔶कोप : भारत-अमेरिका.


🔶मित्र शक्ति : भारत-श्रीलंका.


🔶सलिनेक्स : भारत नौदल-श्रीलंका इंद्र :

भारत-रशिया.


🔶नसीम अल बह्न : भारत-ओमान.


🔶सम्प्रीती : भारत- बांग्लादेश.


🔶औसीइंडेक्स भारत-ऑस्ट्रेलिया नौदल.


🔶नोमेडिक एलीफैंट : मंगोलिया-भारतीय

सेना.


🔶एकुवेरिन : मालदीव-भारत.


वाचा :- चालू घडामोडी


● भारतातील सर्वात लांब चेनानी-नशरी बोगद्याचे नाव -------------- हे ठेवण्यात आले? :- डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी

जम्मू-काश्मीरमधील NH-44 वरील भारतातील सर्वात लांब चेनानी-नशरी बोगद्याचे नाव भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी असे ठेवण्यात आले. या बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ एप्रिल २०१७ मध्ये केले होते. हे पाटनिटॉप बोगदा म्हणून देखील ओळखले जाते. ९.२ किमी लांबीचा हा बोगदा आशियातील सर्वात उच्च तंत्रज्ञानाचा बोगदा मानला जातो. (जगात महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा ऑरलॅड व आयरडेल मार्गावर नार्वत आहे. त्याची लांबी २४.५१ कि. मी. आहे) हा बोगदा जम्मू-श्रीनगर महामार्गाचा एक भाग आहे आणि शिवालिक डोंगराच्या मध्यभागी आहे. यामुळे श्रीनगर आणि जम्मू हा रस्ता दोन तासात पूर्ण झाला आहे. या बोगद्याच्या निर्मितीमुळे जम्मू आणि श्रीनगरमधील अंतर ३० किलोमीटरने कमी झाले आहे. या बोगद्याचे प्रत्यक्ष काम युपीए सरकारच्या कालखंडात २३ मे २०११ रोजी सुरु झाले होते.


● राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावरून जाण्या- येण्यासाठी वाहनांवर फास्ट टॅग नावाचा स्टीकर लावणे बंधनकारक केले :- १ डिसेंबर २०१९

एक देश एक फास्ट टॅग या धोरणांतर्गत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणातर्फे १ डिसेंबर २०१९ पासून राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावरून जाण्या- येण्यासाठी वाहनांवर फास्ट टॅग नावाचा स्टीकर लावणे बंधनकारक केले आहे. सध्या ५२७ राष्ट्रीय महामार्गावर एकूण टोलनाके आहेत तर ३८० नाक्यावर फास्ट टॅग यंत्रणा कार्यरत आहे. या फास्ट टॅगची (राष्ट्रीय महामार्ग शुल्क ) मूळ कल्पना २००८ मधील म्हणजे युपीए सरकारच्या काळातील आहे.


● 2021 ची जनगणना ............ भाषांमध्ये होणार आहे :- १६

2021ची जनगणना 16 भाषांमधून केली जाणार आहे. ही जनगणना मोबाईल ॲपच्या माध्यमातून केली जाणर आहे. जनगणना दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. घर-यादी आणि घर गणना एप्रिल ते सप्टेंबर 2020 मध्ये तर लोकसंख्या गणना 9 ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान होणार आहे.


● 2 डिसेंबर 2019 रोजी आशियाई विकास बँकेचे दहावे अध्यक्ष म्हणून * कोणाची निवड करण्यात आली:- मसात्सुगु असकावा

2 डिसेंबर 2019 रोजी, मसात्सुगु असकावा यांची आशिया विकास बँकेचे दहावे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्याचा कार्यकाळ 17 जानेवारी 2020 पासून सुरू होईल. या पदावर ते टेकिको नाकाओची जागा घेणार आहेत. ते 23 नोव्हेंबर 2021 रोजी संपणार्याक टेकिको नाकाओच्या अध्यक्षपदाचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण करतील. मसात्सुगु आसाकावा सध्या जपानचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांचे विशेष सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

आशियाई विकास बँक:-

स्थापना:- १९ डिसेंबर १९६६

मुख्यालय:- मनीला, (फिलिपाईन्स)

एकूण सदस्य:-६८


● पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धाचे आयोजन २०२३ मध्ये १३ ते २९ जानेवारी दरम्यान कोणत्या देशात होणार आहे:- भारत

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) २०२३ मध्ये होणाऱ्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद भारताला बहाल केले. भारतात सलग दुसऱ्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धा

भुवनेश्वर आणि राउरकेला (ओडीशा) येथे होणार आहे. विश्वचषक हॉकी स्पर्धेचे चौथ्यांदा आयोजन करणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. याआधी भारताने १९८२ (मुंबई), २०१० (नवी दिल्ली) आणि २०१८ (भुवनेश्वर) साली विश्वचषक हॉकी स्पर्धा आयोजित केली होती. नेदरलँड्सने तीन वेळा विश्वचषक स्पर्धा भरवली आहे.


● लोकपालने -------------- हे ब्रीद वाक्य स्वीकारले आहे :- मा गृधः कस्यस्विद्धनम्

• 26 नोव्हेंबर 2019 रोजी लोकपालचे अध्यक्ष न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांच्या हस्ते नवी दिल्लीत लोकपालच्या बोधचिन्हाचे (लोगो) प्रकाशन व लोकपालचे ब्रीदवाक्य (घोषवाक्य / motto) म्हणून “मा गृधः कस्यस्विद्धनम्” स्वीकारण्यात आले. लोकपालपीठाने सर्वसंमतीने ‘ईशावास्योपनिषध’ याच्या पहिल्या श्लोकात असलेल्या “मा गृधः कस्यस्विद्धनम्” या वाक्याची निवड केली. ‘मा गृधः= लोभ करु नका’; ‘कस्यस्वित्=कोणाच्याही’, ‘धनम्=धनाचा’ म्हणजेच “कोणाच्याही संपत्तीचा लोभ करु नका” असा या वाक्याचा अर्थ होतो लोकपालच्या बोधचिन्ह आणि ब्रीदवाक्यासाठी एक मुक्त स्पर्धा घेण्यात आली होती. या निवड प्रक्रियेततून उत्तरप्रदेशच्या प्रयागराजचा रहिवासी प्रशांत मिश्रा यांच्या चिन्हाची निवड करण्यात आली.


वाचा :- महत्त्वाच्या चालू घडामोडी



 5 जानेवारी रोजी बिहारमध्ये ................. यांचे भारताच्या पहिल्या लोकसभेचे सदस्य (1952 साली स्थापन झालेले) आणि डुमराओं राजचे शेवटचे महाराज यांचे निधन झाले - कमल बहादुर सिंग


* जागतिक आर्थिक मंच (WEF) यांच्या वर्ष 2019 साठीच्या ‘ट्रॅव्हल अॅोण्ड टुरिझम कॉम्पिटिटिव्हनेस इंडेक्स’ (TTCI) मध्ये भारताचा ..........वा क्रमांक लागतो - 34 वा


* ------------ या राज्य पोलीस विभागाने विद्यार्थिनींना स्व-संरक्षण प्रशिक्षण देण्यासाठी तृतीय 'सुकन्या' प्रकल्पाला सुरूवात केली आहे. - कोलकाता पोलीस.


* ----------- या राज्य सरकारने शासकीय कर्मचार्यांाना 10 लक्ष रुपयांपर्यंत वैद्यकीय विमा देणारी ‘मुख्यमंत्री कर्मचारी आरोग्य विमा योजना’ सुरु केली - मध्यप्रदेश.


* ..............या शहरात नवे 'भारत दर्शन पार्क' उभारले जाणार आहे. - दिल्ली.


* परराष्ट्र कल्याण मंत्रालयातला ............. हा नवीन विभाग सुरु करण्यात आला आहे. - नवीन, उदयोन्मुख आणि धोरणात्मक तंत्रज्ञान (New, Emerging and Strategic Technologies -NEST) विभाग.


* ------------- या शिक्षणतज्ज्ञने असे सॉफ्टवेअर तयार केले आहे जे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून भारतीय शास्त्रीय संगीतामधल्या रागांची स्वरजुळणी करू शकते - विनोद विद्वन्स.


* 4-12 जानेवारी या कालावधीत नॅशनल बुक ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या "नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळावा" याचा ............ हा विषय होता. - "गांधीः द राइटर्स राइटर".


* टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 100 बळी घेणारा सर्वात तरुण गोलंदाज (वय: 18 वर्ष आणि 271 दिवस)........... हा होय. - मुजीब उर रहमान (अफगाणिस्तान).


* --------- भारतातील पहिल्या शहरी सहकारी बँकेला भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून लघू वित्तीय बँकेत रूपांतर करण्यास तत्वत: मान्यता मिळाली - शिवालिक मर्कंटाइल सहकारी बँक मर्यादित (उत्तरप्रदेश).


* 31 वा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव ------------------ या ठिकाणी भरविण्यात आला - अहमदाबाद, गुजरात.

* ---------------- या शहरात ‘शेतकरी विज्ञान परिषद’ आयोजित केली गेली होती- बेंगळुरु.


* अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी देशातली जागतिक दर्जाची सुविधा .....येथे उभारली जात आहे - छल्लाकेरे (चित्रदुर्ग जिल्हा, कर्नाटक).


* नवीन ‘जागतिक बोध संग्रहालय व शैक्षणिक संस्था’ येथे उभारली जाणार - - सांची, मध्यप्रदेश.


* भारत हवामान खात्याने ................सालानंतरचे 2019 हे सातवे सर्वात गरम वर्ष म्हणून जाहिर केले – 1901.


• महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 7 जानेवारी रोजी ..............या शहरात कला प्रदर्शनी भरविण्यात आले - ढाका, बांगलादेश.


• सेल्फी किंगडम (TSK)” नावाने उघडण्यात आलेले जगातले पहिले "सेल्फी संग्रहालय" ............ येथे आहे. – दुबई, संयुक्त अरब अमिराती.


• 2019 या वर्षी ....................या भारतातल्या UNESCO जागतिक वारसा स्थळाने 1020 वर्षे पूर्ण केलीत - खजुराहोची मंदिरे.

प्रथमच,................ या विधानसभा निवडणुकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाने सुसज्जित 11 मतदान केंद्रे असणार आहे. - दिल्ली.


• .............या व्यक्तीच्या जीवनावर ‘कर्मयोद्धा ग्रंथ’ हे पुस्तक लिहिले गेले आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी.


• .............या राज्याच्या विधानसभेनी देशभरातल्या इतर मागासवर्गीय (OBC) लोकसंख्या शोधण्यासाठी केंद्र सरकारकडे जाती-आधारित जनगणनेसाठी एकमताने एक ठराव मंजूर केला - महाराष्ट्र.


• 12 जानेवारी 2020 पासून सुरुवात झालेल्या ‘भविष्यातल्या ऊर्जेसंबंधी जागतिक शिखर परिषद ------------- येथे आयोजित केली होती – अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती.


• ‘ऑल इंडिया सीनियर रँकिंग बॅडमिंटन ही स्पर्धा .............. यांनी जिंकली( महिला आणि पुरुष एकेरी गट)- आकर्शी कश्यप आणि मिथुन मंजुनाथ


• 2018-19 हंगामासाठी BCCIच्या दिलीप सरदेसाई पुरस्कार------------- याला जाहिर झाला - जसप्रीत बुमराह


• महिला विभागात BCCIच्या पॉली उम्रीगर पुरस्काराची विजेती - पूनम यादव


• ................या देशाने ताशी 350 किलोमीटरने धावणारी विनाचालक बुलेट ट्रेन सादर केली – चीन (फूक्सिंग श्रेणीची ट्रेन)


• 10 जानेवारी 2020 रोजी .............या देशाच्या संसदेनी खाण- संबंधित विधेयकावर सर्वप्रथम विधानसभेची सार्वजनिक सुनावणी घेतली - भूतान


• ..............या ठिकाणी 14-16 जानेवारी  काळात ‘रायसीना संवाद 2020’ आयोजित करण्यात आला आहे - नवी दिल्ली.


• कोलकाता पोर्टचे ...................... हे नवे नाव ठेवण्यात आले आहे - श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट.


• भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) घोषणा केली आहे की कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी भारतातल्या................. या चार विमानतळांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे - नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

वाचा :- UAE चे Moon Mission



अलीकडेच संयुक्त अरब अमिरातीने (UAE) 2024 मध्ये मानवरहित अवकाशयान चंद्रावर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.


ठळक बाबी


रोव्हरचे नाव : रशीद , युएईचा मूळ संस्थापक असलेल्या यांच्या नावावरून शेख रशीद बिन सईद अल मकतूम ठेवले जाईल.


उद्दीष्ट: हा रोव्हर अशा चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध घेईल ज्या भागाचा  शोध मानवी मोहिमांनी यापूर्वी घेतला नाही.


चंद्रावर रोव्हर उतरवण्यास संयुक्त अरब अमिरातीला यश आल्यास अशी कामगिरी करणारा चौथा देश ठरणार आहे. अमेरिका, सोव्हिएत युनियन रशिया आणि चीन या देशांनाच अशी कामगिरी करता आली आहे


विशेष म्हणजे ,चंद्रावर अंतराळयान उतरवण्याचा प्रयत्न भारताने केला पण तो यशस्वी झाला नाही. भारताप्रमाणेच इस्त्राईल आणि जपाननेही प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही.


चंद्रयान -3 नावाच्या मिशनची योजना भारताने आखली आहे. ती 2021 च्या सुरूवातीस सुरू होण्याची शक्यता आहे.


नासाचा आर्टेमिस प्रोग्राम


आर्टेमिस प्रोग्रामद्वारे, नासाला 2024 पर्यंत माणसाला  (एक स्त्री आणि एक पुरुष) चंद्रावर पाठवायचे आहे. या मिशनचे लक्ष्य चंद्रच्या दक्षिण ध्रुवासह चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळवीरांना उतरवायचे आहे(लँडिंग करण्याचे आहे).


UAE चे अंतराळ अभियान


 जुलै २०२० मध्ये युएईने जपानमधून ‘अमल (होप)’ नावाचे यान मंगळावर  पाठवले 


यामुळे मंगळावर यान सोडणारा युएई हा पहिला मुस्लीम देश ठरला आहे.


समार्ट मुंबईचे शिल्पकार!



नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ यांचा, ३१ जुलै हा स्मृतिदिन. संस्कृत विषयातील शिष्यवृत्ती देणारे समाजसेवक म्हणून नाना महाराष्ट्रास माहीत आहेत पण, ते भारतीय रेल्वेचे जनक व आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकारही होते. नानांनी स्त्रीशिक्षण, पुनर्विवाह, सती बंदी व सोनापूर स्मशानभूमीस दिलेली जमीन तसेच आर्थिक सहकार्यातूनही समाजकार्य साधले. नानांच्या जीवनाचा बहुतांश हिस्सा या घडामोडींचा एक अविभाज्य घटक होता, हे अनेकांना माहीत नाही! नानांच्या सर्व कार्याचा विस्तृत वृत्तांत येथे मांडणे अशक्य आहे म्हणून, त्यांच्या १५१व्या स्मृतिदिनानिमित्त, त्यांच्या प्रेरणेतून घडलेल्या स्थापत्यविषयक कार्याचा हा आढावा.


मुंबईच्या आरंभापासून ते आजतागायत, 'व्यापार' हाच या शहराचा स्थायी स्वभाव बनून राहिला आहे. म्हणूनच मुंबईला 'सिटी ऑफ गोल्ड' किंवा देशाची 'आर्थिक राजधानी' असे म्हटले जाते. अठरा व एकोणिसाव्या शतकात मुंबईत झालेल्या घडामोडींना खूप महत्त्व आहे. त्या घडामोडीतूनच नानांच्या स्मृतीतील वैभवशाली चेहरा असलेली 'स्मार्ट मुंबई' निर्माण झाली.


१८व्या शतकाच्या पूर्वाधात, मुंबईसाठी सार्वजनिक सभागृहाची गरज ओळखून 'टाऊन हॉल' इमारतीचा प्रस्ताव राज्यपाल जोनाथन डंकनच्या राजवटीत मांडला गेला. या टाऊन हॉलचे बांधकाम सन १८२०मध्ये सुरू झाले व १८३३मध्ये पूर्ण झाले. ही भव्य इमारत इंग्रजांच्या सामर्थ्याचे पहिले प्रतीक म्हणून ओळखली जात असे. या इमारतीचा उपयोग त्या काळात अनेक कार्यासाठी केला गेला. यात कायदे मंडळाची बैठक, ‌मुंबई विद्यापीठाचा पदवीदान समारंभ एवढेच नव्हे तर १८६५ पासून १८७१ पर्यंत म्युनिसिपल कमिशनरला जागेच्या अडचणीमुळे जे. पी. मंडळाच्या सभादेखील याच हॉलमध्ये घ्याव्या लागत. या जागेतच एल्फिन्स्टन कॉलेज, मुंबई विद्यापीठ, विधिमंडळ व नगरपालिकेचा कारभार केला गेला. या सर्व घडामोडीत नानांचा प्रत्यक्ष सहभाग होता. सन १८३४ पासून एशियाटिक लायब्ररी येथे सुरू करण्यात आली. या लायब्ररीचा प्रथम सभासद होण्याचा मानही नानांनाच दिला गेला.


परदेशातील दळणवळण जहाजे व बोटीतून होत असे. पण देशांतर्गत दळणवळण सुलभ होऊन व्यापाराला गती यावी म्हणून मुंबईत १८४३ साली 'ग्रेट वेस्टर्न रेल्वे कंपनी' स्थापन केली. या समितीतील आद्य प्रवर्तकात नाना शंकरशेठ, जमशेठजी जीजीभाई व सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश अर्स्किन पेरी व इतर प्रवर्तक होते. या कंपनीच्या कार्यालयासाठी जागाही नानांनी त्यांच्या वाड्यात देऊ केली.


मुंबई-ठाणे रेल्वे लाइनचे काम सुरू असतानाच ब्रिटिश सत्तेचा उच्चांक दर्शवणारी दुसरी घटना म्हणजे आजची छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत होय. शे-सव्वाशे वर्षांपूर्वी, ज्या उद्देशाकरिता ही इमारत बनवली गेली तेच कार्य आजही चालते व जगातील सर्वोत्तम रेल्वे इमारत म्हणूनही तिची ओळख आहे. या इमारतीचे आराखडे फ्रेडिक विल्यम स्टीव्हन्स या ब्रिटिश आर्किटेक्टने, गॉथिक शैलीत बनवले होते. या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीत नानांचे स्मृतिशिल्प बसवण्यात आले आहे.


सन १८६४ मध्ये म्युनिसिपल अॅक्ट पास झाला. सुरुवातीस नगर शासनाचे काम गव्हर्नरच्यामार्फत चालत असे. मुंबई फोर्ट परिसरातील धनिकांनी मुंबई सेंट्रल, परळ व आजच्या सीएसटी स्टेशनच्या पुढे थेट भायखळ्यापर्यंत जागा घेऊन बंगले बांधण्यास सुरुवात केली. या दरम्यान फोर्ट परिसरात अनेक निवासी, नागरी व सरकारी इमारतींचे काम सुरू झाले.

पालिकेतील वाढलेल्या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन तीन म्युनिसिपल कमिशनर नेमण्यात आले. त्यानुसार मुंबई नगरपालिकेचे पहिले कार्यालय गिरगावातील एका वाड्यात सुरू केले होते. त्यानंतर ऱ्हिदम हाऊस या इमारतीत हलवले. मंडळाच्या सभेसाठी जागा अपुरी पडत असल्याकारणाने हे कार्यालय १८६६-१८९२ पर्यंत आर्मी-नेव्ही या इमारतीत नेण्यात आले. पालिकेच्या वाढत्या कामाचा व्याप व भविष्यातील हालचालीचा वेध लक्षात घेऊन नाना व जमशेठजी जीजीभाईंनी पालिकेसाठी जागेचा शोध सुरू केला. मुंबईतील नागरिकांना पालिकेत येणे सोयीचे जावे म्हणून सर्वानुमते सीएसटी (VT) समोरील मोकळ्या जागेची निवड केली. ही जागा निवडण्यामागचे कारणही केवढे सयुक्तिक होते हे आजच्या परिस्थितीवरून समजून येते. यानंतर आराखडा बनवण्यासाठी योग्य वास्तुरचनाकाराचा शोध घेण्याचे काम सुरू झाले. नियोजित पालिकेच्या आराखड्याचे काम, रेल्वे स्थानक व परिसरातील इमारतींच्या बाह्य सौंदर्याशी साधर्म्य साधू शकेल, अशा वास्तुरचनाकारासच देण्यात यावे असा ठराव पालिकेतील नगरसेवकांनी पास केला. सरतेशेवटी हे काम स्टीव्हन्सलाच करावे लागले! १८८३-९३ या दरम्यान आर्किटेक्ट स्टीव्हन्स सरकारी नोकरीत नसल्याने इंग्लंडमध्येच आराखडे बनवून पाठवले होते. स्टीव्हन्सने पालिकेची इमारत पूर्णतः इटालियन गॉथिक शैलीत न बनवता त्यात भारतीय इस्लामी शैलीतील घुमट व मनोऱ्यांचाही वापर खुबीने केला आहे. या सर्व घडामोडींतून त्या काळातील नगरसेवकांकडे दूरदृष्टी व वास्तुसौंदर्यशास्त्राबद्दल असलेल्या जाणिवेची प्रचिती येते!

मुंबईच्या जडणघडणीत फक्त ब्रिटिश राज्यकर्तेच नव्हे तर, अनेक भारतीय समाजसुधारकांनी योगदान दिले आहे. अनेक धनिक, समाजकल्याणाच्या हेतूने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, स्थापत्य व इतर माध्यमातून, सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत असत. या सामाजिक बांधिलकीतून समाजसेवेच्या विविध प्रथा निर्माण झाल्या.


नानांचा प्रत्यक्ष संबंध आलेल्या स्थापत्यविषयक नामावलीत ग्रँट मेडिकल कॉलेज, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, डॉ. भाई दाजी लाड संग्रहालय, जिजामाता उद्यान, मुंबई विद्यापीठ, एल्फिन्स्टन कॉलेज, नाना चौकातील भवानीशंकर देऊळ, जे. जे. हॉस्पिटलसारख्या सार्वजनिक हिताच्या इमारतींचा समावेश आहे. नानांनी एकनिष्ठेने देशबांधवांसाठी केलेल्या सेवेचे प्रतीक म्हणून ते हयात असतानाच पुतळ्याच्या रूपाने त्यांचे स्मारक उभारण्यात यावे अशा अर्थाचा ठराव प्रो. दादाभाई नवरोजी यांनी मांडला व तो सभेत पासही करून घेतला. दुर्दैवाने पुतळ्याचे काम नानांच्या हयातीत पूर्ण होऊ न शकल्यामुळे हा पूर्णाकृती पुतळा, नानांच्या समकालीनांचे पुतळे व तसबिरी ठेवण्यात आल्या आहेत, त्या टाऊन हॉल इमारतीच्या तळमजल्यावर बसवण्यात आला. म्हणूनच, नाना हेच खरे 'मुंबईचे अनभिषिक्त' सम्राट होते असा उल्लेख आचार्य प्र. के. अत्रेंनी केला होता, हे पटण्यासारखे आहे.


नानांनी समाजहिताच्या भावनेतून मुंबईसाठी केलेले कार्य स्मारकरूपातून सदैव स्मरणात रहावे असे मुंबईकरांना वाटणे साहजिक आहे. स्मारकाच्या जागेसाठी अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेने पुढाकार घेऊन व स्मारक समितीच्या सन्माननीय सदस्यांनी सुरेंद्रभाऊ वि. शंकरशेठ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. अॅड. मनमोहन चोणकर हे समितीचे सरचिटणीस आहेत. अॅड. चोणकरांनी नगरसेवक असताना स्मारकासाठी भूखंडाची मागणी महानगरपालिकेत मांडली. शहर प्रशासनाने, दि. २५ ऑगस्ट २०१४ रोजी सभागृहातील सर्व नगरसेवकांनी नाममात्र प्रतिवर्ष १ रु. भाड्याने, नाना शंकरशेठ स्मारक प्रतिष्ठान समितीस, वडाळा येथे १५०० चौ. मी. चा भूखंड देण्याचा ठराव मंजूर केला. सेना पक्षप्रमुख, महापौर, महानगरपालिका आयुक्त व सुधार ‌समिती सदस्यांनी सहकार्य केले. मुंबई महानगरपालिकेने, या स्मारकास नाममात्र दरात भूखंड देऊन सहकार्य केले. महाराष्ट्र सरकारनेही स्मारकाच्या यापुढील कार्यसिद्धीसाठी मोठ्या रकमेची आर्थिक मदत देऊन आपले कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन मुंबईतील नागरिकांच्या वतीने या लेखाच्या माध्यमातून मी करू इच्छितो. आज घडत असलेल्या मुंबईचा चेहरा व वास्तुसौंदर्यशास्त्रीय ओळख पुढील पिढ्यांकरिता कशी राहील, हे सांगणे कठीण आहे. मुंबईचे आद्य शिल्पकार म्हणून गौरवलेल्या नानांच्या नियोजित इमारतीच्या अंतर्बाह्य आराखड्यातून त्यांच्या स्मृतीतील मुंबईचे प्रतिकात्मक साधर्म्य साधणारी वैशिष्ट्ये जर का अंतर्भूत करू शकलो तर ती खऱ्या अर्थाने वाहिलेली श्रद्धांजली ठरेल!

ताराबाई शिंदे (१८५०-१९१०)



 ह्या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका व सत्यशोधक समाजाच्याकार्यकर्त्या होत. १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या स्त्री-पुरुष तुलना या पुस्तकाच्या त्या लेखिका होत.


ताराबाई ह्या बुलढाणा येथील रहिवासी होत्या. त्यांचे वडील बापुजी हरी शिंदे हे एक जमीनदार होते. ते सत्यशोधक समाजाचे सभासद होते.ताराबाई शिंदे यांचे भाऊ, रामचंद्र हरी शिंदे जोतिबांच्या कॉन्ट्रक्टिंग कंपनीत भागीदार होते. त्यामुळे ताराबाईंच्या घरात सुरुवातीपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे वातावरण होते. 



ताराबाईंनी आपल्या पुस्तकात विधवा-विवाहास उच्च वर्णीयांनी केलेली मनाई, केशवपनासारख्यादुष्ट रूढी, तसेच पुरुषांना अनेक लग्न करण्याची असलेली मुभा या सर्व प्रश्नांवर टीका केलेली दिसते. तत्कालीन महाराष्ट्रातील स्त्री समाजसुधारक म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थिती देखील सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात योगदान दिले.त्यानी स्त्री यांच्या शोषणा विरोधात दिलेला लढा हा सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेस चालना देणारा होता.

आधुनिक भारताचा इतिहास



भारतीय राष्ट्रीय चळवळ एका उत्क्रांतीची अभिव्यक्ती दर्शवते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१८८५) च्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या चळवळीला सुरुवात होते. या चळवळीची तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली जाते- मवाळ राजकारणाचा काळ (१८८५-१९०५); जहाल राजकारण्यांचा काळ (१९०५-१९२०); गांधी युग (१९२०-१९४७).

१८५७ चा उठाव दडपला गेल्यानंतर भारतीय समाज निपचित पडला होता. या निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे काम दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दिनशॉ वाच्छा, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या भारतीयांनी केले. त्यांनी राष्ट्रीय संघटनेच्या राजकारणाला निश्चित दिशा दिली. या संपूर्ण नेतृत्वाचा विश्वास उदारमतवाद, सांविधानिक मार्ग व क्रांतीपेक्षा उत्क्रांतीतून बदल या तत्त्वांवर होता. म्हणूनच मवाळांनी राजकीय सुधारणांसाठी अर्ज, विनंत्यांचा मार्ग अवलंबला. आíथक निस्सारणाचा सिद्धांत मवाळांचे सर्वात मोठे योगदान ठरते. मवाळांनी भारताच्या वसाहतवादी आíथक शोषणावर प्रकाश टाकून जी जनजागृती घडवून आणली ती राष्ट्रीय चळवळीच्या पुढील टप्प्याची आवश्यक पाश्र्वभूमी ठरते. तद्वतच, या सिद्धांताच्या माध्यमातून मवाळांनी भारताच्या आíथक राष्ट्रवादाचा भक्कम पाया घातला यात शंका नाही.

२०१४ च्या मुख्य परीक्षेमधील ब्रिटिश आíथक धोरणाच्या विविध अंगांच्या विश्लेषणाची अपेक्षा ठेवणारा प्रश्न याच आíथक शोषणाच्या व आíथक राष्ट्रवादाच्या आकलनाची अपेक्षा ठेवतो. या प्रश्नामध्ये ब्रिटिश कालखंडामधील समग्र आíथक धोरण, त्या धोरणाची उत्क्रांती यांचे विश्लेषण केंद्रस्थानी आहे.

लॉर्ड कर्झनने १९०५ साली केलेल्या बंगालच्या फाळणीतून मवाळ राजकारणाच्या मर्यादा तर स्पष्ट केल्याच, पण त्याही पुढे जाऊन ब्रिटिश सत्ता भारताच्या हितासाठी असल्याच्या मवाळांच्या मूलभूत विश्वासाला तडा गेला. म्हणूनच बंगालच्या फाळणीनंतर राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व जहालांच्या हाती येते. अर्थात, १९१५ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेवर मवाळांचेच वर्चस्व होते. जहालांनी काँग्रेसबाहेर राहून राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. राष्ट्रीय चळवळीच्या या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश ‘स्वराज’ हा होता व चळवळीच्या पद्धती स्वयंभू होत्या. मवाळांच्या पद्धती ब्रिटिश शासनाच्या प्रतिसादावर अवलंबून होत्या. जहालांनी परकीय मालावर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व असहकार या चतु:सूत्रीवर आधारित चळवळींचा मार्ग अवलंबून शासनावर दबाव निर्माण केला. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीन चंद्र पाल, अरिबदो घोष यांनी या टप्प्यातील चळवळीचे नेतृत्व केले.

लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर एका युगाचा अस्त होतो. तद्वतच, एका दुसऱ्या युगाची सुरुवात महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीतील सहभागाने होते. गांधीयुगामध्ये ‘अिहसक पद्धतीने केलेल्या असहकारातून स्वराज्य’ हा राष्ट्रीय चळवळीचा उद्देश होता. सत्याग्रह, अन्यायाचा उघड व सक्रिय प्रतिकार, अिहसक असहकार, भारतीय समाजाचा सर्वागीण विकास यांतून गांधींनी राष्ट्रीय चळवळीला वेगळी दिशा दिली व तिला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले.

भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या तीन टप्प्यांमधील घटनांचा सखोल अभ्यास आवश्यक ठरतो. मवाळांनी घडवून आणलेल्या राजकीय सुधारणा, वंगभंग चळवळ, होमरूल चळवळ, असहकार चळवळ, स्वराज पार्टी, नेहरू रिपोर्ट, सविनय कायदेभंगाची चळवळ, ‘चलेजाव’ चळवळ, गोलमेज परिषद यांसारख्या घटकांचा यात अंतर्भाव होतो. याव्यतिरिक्त भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे ठरते.

बंगालचे गव्हर्नर



🌸   रॉबर्ट क्लाईव्ह  :- इ . स . 1757 ते 1760


🍀  हॉलवेल : - इ. स . 1760 


🌸   वन्सिटार्ट : - इ . स . 1760 ते 1765 


🍀   रॉबर्ट क्लाईव्ह  : - इ . स . 1765 ते 1767 


🌸   वरलेस्ट : - इ . स . 1767 ते 1769 


🍀   कार्टीयर : - इ . स. 1769 ते 1772 


🌸  वॉरेन हेस्टिंग्ज : - इ . स . 1772 ते 1774

जीवनसत्त्व E इ



🌻रासायनिक नाव:-टोकोफेरोल


🌻परतिदिन गरज:-10 मायक्रो ग्राम


🗯मख्य कार्य:-


🔘रोगप्रतिकारक क्षमतेत भाग घेते


🔘अटीऑक्सिडेंट जीवनसत्व म्हणतात


🛑मख्य स्रोत:-सर्व वनस्पती तेल


🎯अभावाचा परिणाम:-


🔘वांझ पणा येतो


👉वांझपणा विरोधी जीवनसत्व म्हणतात

जीवनसत्त्व A अ



🔅रासायनिक नाव:-रेटिनॉल


☀️परतिदिन गरज:-1000 मायक्रो ग्राम


🎯मख्य कार्य:-


🔘डोळ्यात दंडपेशीत रोडॅपसीन रंगद्रव्य ची निर्मिती करणे


🔘शरीराची वाढ व डोळे निरोगी ठेवणे


🔘परतिकार क्षमतेत मदत


🔥मख्य स्रोत:-


✍️गाजर ,पालक ,मेथी


✍️टमाटे , आंबा ,दूध 


✍️दही ,अंडे ,यकृत


🗯अभावाचा परिणाम:-


👉रात आंधळेपणा


👉डोळे कोरडे पडणे


👉शक्राणू निर्मिती मध्ये अडथळा


✍️मतखडा संबंधित रोग


🔰गरोदरपणात याचे जास्त प्रमाण हानिकारक असते

महिलांना मतदानाचा अधिकार कधी मिळाला



🛑अमेरिका          : 1920


🛑यनायटेड किंग्डम : 1928


🛑 फरान्स            : 1945


🛑 जपान           :1945


🛑 इस्त्रायल        :1948


🛑 भारत.          :1950


🛑 सविझर्लंड.      :1971

1909 च्या भारत कौन्सिल ऍक्ट मधील तरतुदी



1)केंद्रीय व प्रांतीय विधीमंडळाचा विस्तार


2)निर्वाचन तत्वाला किंचित मान्यता


3)केंद्रीय व प्रांतीय विधीमंडळाच्या अधिकारात वाढ


4)मुस्लिम लोकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ


5) इंडिया कौन्सिलमध्ये भारतीय लोकांना प्रवेश


6)गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळमध्ये भारतीय सदस्यांची नियुक्ती


7)केंद्रीय विधिमंडळात सरकारी सदस्यांचे बहुमत


8)प्रांतीय विधिमंडळात बिनसरकारी सदस्यांचे बहुमत

कषी विधेयकांमुळे शेतकऱ्यांचा फायदाच.


🔰नवी दिल्ली : यापूर्वी  काही राज्यांत बाजार समिती कायद्याच्या नियमनातून फळे आणि भाज्या वगळल्याने शेतक ऱ्यांना फायदा झाला आहे. आता धान्य उत्पादक शेतक ऱ्यांना नवीन कृषी विधेयकांमुळे तसेच स्वातंत्र्य मिळणार आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात कृषी विधेयकांचे समर्थन केले.


🔰सध्या देशात कृषी विधेयकांच्या विरोधात मोठी आंदोलन  सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी  या विधेयकांचे फायदे या वेळी स्पष्ट केले. गत काँग्रेस सरकारांनी जी आर्थिक धोरणे राबवली त्यावर त्यांनी जोरदार टीका केली.


🔰पतप्रधान मोदी  म्हणाले, की देशातील शेतक ऱ्यांनी कृषी क्षेत्र मजबूत केले असून आत्मनिर्भर भारत घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जर महात्मा गांधी यांचे आर्थिक तत्त्वज्ञान अनुसरले असते तर आत्मनिर्भर भारत योजना राबवण्याची गरज पडली नसती, भारत आधीच आत्मनिर्भर झाला असता.


🔰‘मन की बात’ कार्यक्रमात विविध विषयांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले, की कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या जोखडातून शेतकऱ्यांना मुक्त केल्यानंतर काही राज्यांत शेतक ऱ्यांना आधीच फळ व भाज्या विक्रीतून फायदा झाला आहे. आपल्या कृषी क्षेत्राने कोविड १९ काळातही चांगली कामगिरी केली, त्याचे श्रेय शेतक ऱ्यांनाच आहे. देशाला आत्मनिर्भर करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. कृषी क्षेत्र जितके मजबूत तितका आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल.

शाश्वत विकास लक्ष (sustainable development goal)



(1) दारिद्र्य नष्ट करणे

(2) भूक नष्ट करणे

(3) चांगले आरोग्य व सुस्थिती

(4) गुणवत्तेचे शिक्षण

(5) लिंग समानता

(6) स्वच्छ पेयजल व स्वच्छता

(7) परवडण्याजोगी व स्वच्छ ऊर्जा

(8) चांगली कार्यस्थिती आणि आर्थिक वाढ

(9) उद्योग नवाचार आणि पायाभूत संरचना

(10) विषमता कमी करणे

(11) शाश्वत शहरे व समुदाय

(12) जबाबदार उपयोग व उत्पादन

(13) हवामान कृती

(14) पाण्याखालील जीवन

(15) जमिनीवरील जीवन

(16) शांतता न्याय व मजबूत संस्था

(17) लक्ष पूर्तीसाठी भागीदारी

भारताचे उपराष्ट्रपती (1952 ते 2019)



01. डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1952 ते 1962)


02. डाॅ. झाकीर हुसेन (1962 ते 1967)


03. वराहगिरी वेंकट गिरी (1967 ते 1969)


04. गोपाळ स्वरूप पाठक (1969 ते 1974)


05. बसप्पा धनप्पा जत्ती (1974 ते 1979)


06. न्या. महम्मद हिदायतुल्ला (1979 ते 1984)


07. रामास्वामी वेंकटरमण (1984 ते 1987)


08. शंकर दयाल शर्मा (1987 ते 1992)


09. कोचीरिल रमण नारायण (1992 ते 1997)


10. कृष्ण कांत (1997 ते 2002)


11. भैरवसिंह शेखावत (2002 ते 2007)


12. महम्मद हमिद अन्सारी (2007 ते 2017)


13. वेंकय्या नायडू (2017 ते आजपर्यंत)

जागतिक आनंद अहवाल World Happiness Report-2020


🔸UN Sustainable Solution Network द्वारे 2012 पासून जाहीर केला जातो


🔸2020 चा हा 8वा अहवाल आहे

एकूण 156 देशांची यादी जाहीर केली

या अहवालात भारताचा 144 या क्रमांक


🔸2019 मध्ये भारत 140 व्या क्रमांकावर होता


🔸2020 च्या अहवालानुसार प्रथम पाच आनंदी देश

1. फिनलंड


2. डेन्मार्क


3. स्विझरलँड 


4. आइलैंड


5.नार्वे


🔸शवटचे पाच देश


156. अफगाणिस्तान 


155. दक्षिण सुदान


154. झीबॉम्बे


153. रवांडा


152. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक

घटना आणि देशातील पहिले राज्य



● प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश


● माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू


● सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान


● पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान  


● संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड


● मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा


● भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश


● जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश


● संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ 


● देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब


● मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक


● विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक


● भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश


● मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू


● महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई)


● रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र 


● राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआरईजीए) लागू करणारे पहिले राज्य : आंध्रप्रदेश (2 फेब्रुवारी, 2006, बंदला पल्ली येथून) 


● अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य : छत्तीसगड


● मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य : मध्यप्रदेश


महारत्न , नवरत्न , मिनीरत्न :

• भारतीय उद्योगांना नवरत्न आणि मिनीरत्न दर्जा देण्यास सुरुवात 1997 साली - अर्जुनसेन गुप्ता समिती शिफारसीवरून


• उद्योगांना महारत्न देण्यास सुरुवात 19 मे 2010 पासून


• भारतात नवरत्न दरबार "गुप्त राजा विक्रमादित्य" आणि "मुघल बादशाह अकबर" ह्यांच्या दरबारी होता.


🔰 भारतातील महारत्न उद्योग

 एकूण - 10


1. BHEL


2. कोल इंडिया लिमिटेड


3. गेल (इंडिया) लिमिटेड


4. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड


5. एनटीपीसी लिमिटेड


6. ONGC कॉर्पोरेशन लिमिटेड


7. SAIL


8. BPCL


9. HPCL


10. PGCIL

(Power Grid Corporation of India Limited)


• नवरत्न उद्योग - 14

भूकंप


◾️‘भू’ म्‍हणजे जमीन व ‘कंप’ म्‍हणजे थरथर. भूकंप म्‍हणजे जमिनीचे थरथरणे. 


◾️भकवचाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे खडकांच्या थरांत प्रचंड ताण निर्माण होत असतो. 


◾️हा ताण विशिष्‍ट मर्यादेपलीकडे गेल्‍यावर तो ताण भूकवचात एखाद्या ठिकाणी मोकळा होतो. 


◾️ज‍या ठिकाणी तो मोकळा होतो, तेथे ऊर्जेचे उत्‍सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात. त्‍यामुळे भूकवच कंप पावते, म्‍हणजेच भूकंप होतो.  


◾️  भकवचात ज्‍या ठिकाणी हा साचलेला ताण मोकळा होतो, त्‍या ठिकाणाला ‘भूकंपाचे केंद्र’ किंवा ‘भूकंपनाभी’ असे म्‍हणतात. 


◾️या केंद्रापासून विविध दिशांनी ऊर्जालहरी पसरत असतात. 


◾️भकंपकेंद्रापासून ऊर्जालहरी ज्‍या ठिकाणी सर्वप्रथम पोहचतात त्‍या ठिकाणी भूकंपाचा धक्‍का सर्वप्रथम बसतो. 


◾️भपृष्‍ठावरील अशा ठिकाणाला भूकंपाचे अपिकेंद्र असे म्‍हणतात. भूकंपाचे अपिकेंद्र हे नेहमी भूकंप केंद्रास (नाभीस) लंबरूप असते.

देशातील सर्वांत लांब नदीवरील रोपवे


» ठिकाण - गुवाहाटी (आसाम)

» नदी - ब्रम्हपुत्रा

» लांबी - १.८२ किमी 

» गुवाहाटीला उत्तर गुवाहाटीशी जोडतो 


----------------------------------------------------


■ दिल्ली ते लंडन बस सेवा ■


» जगातील सर्वांत लांब बस सेवा 

» सुरु करणारी कंपनी - Adventures Overland 

» एकूण आंतर - सुमारे २०,००० किमी 

» जवळपास १८ देशांतून प्रवास

» प्रवास कालावधी - ७० दिवस 

» मे २०२१ मध्ये धावणार

भारताचा महान्यायवादी (Attorney General of India)



संविधानात “भाग 5 मधील प्रकरण 1 अंतर्गत कलम 76 मध्ये” महान्यायवादी पदाची तरतुद करण्यात आली आहे. 


महत्वाचे म्हणजे घटनेतील “कलम 88 आणि 105” ही देखील या पदाशी संबंधित कलमे आहेत..


कलम 88 नुसार, महान्यायवादी यांना सभागृहातील हक्क दिले आहेत. यानुसार भारताच्या महान्यायवादीस, संसदेच्या कोणत्याही सभागृहात, सभागृहाच्या कोणत्याही संयुक्त बैठकीत आणि संसदेच्या ज्या समितीत त्याचे नाव सदस्य म्हणून घातलेले असेल अशा कोणत्याही समितीत, भाषण करण्याचा आणि अन्यथा त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असेल, पण या कलमाच्या  आधारे त्याला मतदान करण्याचा हक्क असणार नाही.


कलम 105 नुसार, महान्यायवादी यांना संसदेची सभागृहे आणि त्यांचे सदस्य व समित्या यांचे अधिकार, विशेषाधिकार, इत्यादी दिले आहेत.


कलम 76 च्या व्यतिरिक्त जी दोन कलमे आहेत ती लक्षात असुद्या..

भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी....



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.म्हणून जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...



 १. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो? 


२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.


 २. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?


- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.


३. कसं लिहीलं गेलं संविधान?


-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.


४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?


-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा म

देशभरात आज 'संविधान दिवस' साजरा केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.



 १. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो? 


२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.


 २. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?


- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.


३. कसं लिहीलं गेलं संविधान?


-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.


४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?


-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.


 ५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?

-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.


६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?


-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.


 ७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?


- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.


 ८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?


-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.


 ९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?


- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.


१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?


-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.