नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
०६ ऑक्टोबर २०२०
महिला आयोगाच्या अध्यक्षांची अद्यापही नियुक्ती नाही
🔰अमरावती : हाथरस बलात्कार प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असताना महाराष्ट्रातील महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. अध्यक्षांच्या नियुक्तीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना आतापर्यंत आठ ते दहा पत्रे दिली. मात्र अद्यापही अध्यक्षाची नेमणूक झाली नसल्याची खंत राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्याच सरकारबाबत व्यक्त केली आहे. लवकरच सर्व मंत्री एकत्र बसून महिला आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्ती करतील, असा आशावाददेखील त्यांनी व्यक्त केला.
🔰एका वृत्तवाहिनीशी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, करोना संकटाच्या काळातही घरगुती हिंसाचार, कार्यालयस्थळी लैंगिक छळ, महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा स्थितीत महिला आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे. अध्यक्षांच्या नियुक्तीसंदर्भात मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री आणि नेत्यांना मी पत्रे लिहिली, पण अजून महिला आयोगाच्या अध्यक्ष नियुक्तीचा मुहूर्त राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सापडलेला नाही.
🔰भाजप सरकारमध्ये विजया रहाटकर या राज्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या, मात्र त्यांनी ४ फेब्रुवारीला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. परंतु अध्यक्ष नेमण्यासाठी सर्व जण एकत्र येऊन लवकरच निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अर्मेनिया-अझरबैजान युद्ध
🔰अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातला दशकांपासून सुरू असलेला सीमावाद 27 सप्टेंबर 2020 रोजी पुन्हा एकदा उफाळून आला. दोनही देश वादग्रस्त नागोर्नो-काराबाखच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत.
🔴नागोर्नो-काराबाख प्रदेश
🔰नागोर्नो-काराबाख हा 4,000 किलोमीटरवर पसरलेला डोंगराळ प्रदेश आहे. तिथे अर्मेनियातले ख्रिश्चन आणि मुस्लीम तुर्क राहतात. सोव्हियत संघादरम्यान ते अझरबैजानमधले एक स्वायत्त क्षेत्र होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या परिसराला अझरबैजानचा भाग समजले जाते. परंतु, तिथे बहुतांश अर्मेनियाचे नागरिक राहतात.
🔰1980च्या दशकाच्या शेवटापासून ते 1990च्या दशकापर्यंत चाललेल्या युद्धात 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि 10 लक्षाहून अधिक लोकांचे स्थलांतर झाले. त्यादरम्यान फुटीरवादी गटांनी नागोर्नो-काराबाखच्या काही भागांवर ताबा मिळवला होता. परंतु, 1994 सालामधल्या युद्ध विरामानंतरही तिथे सातत्याने संघर्ष चालू आहेत.
🔴पार्श्वभूमी
🔰अर्मेनिया आणि अझरबैजान ही आशिया खंडातली शेजारी-शेजारी राष्ट्रे आहेत. दोन्ही देश एकेकाळी सोवियत संघाचे भाग होते. दोन्ही देश यूरोपच्या अगदी जवळ आहेत.
🔰दोन्ही देश सोवियत संघाचे भाग होते. 1980च्या दशकात जेव्हा सोवियत संघाचे पतन झाले, तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये वाद सुरु झाला. नागोर्नो-काराबाख या भागावरुन उभय देशांमध्ये वाद आहे. हा भाग अर्मेनिया आणि अझरबैजानच्या सीमेवर आहे. 1991 साली दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. तीन वर्षांच्या संघर्षानंतर रशियाने हस्तक्षेप केल्याने 1994 साली युद्धविराम देण्यात आला होता.
🔰आतरराष्ट्रीय कायद्यानुसार हा भाग अजरबैजानचा आहे, परंतु त्यावर अर्मेनियातल्या टोळ्यांचा ताबा आहे. त्यामुळे आर्मेनियन सैन्याने हा भाग आपल्या ताब्यात ठेवला आहे. या भागात नेहमीच तणावाची स्थिती राहिली आहे.
🔰अर्मेनिया हा पश्चिम आशिया आणि युरोपच्या काकेशस क्षेत्रात वसलेला एक पर्वतीय देश आहे. देशाची राजधानी येरेवन हे शहर आहे आणि द्राम हे राष्ट्रीय चलन आहे.
🔰अझरबैजान हा आशिया आणि युरोपमधला एक देश आहे, ज्यास कॅस्परियन समुद्र आणि काकेशस पर्वत सीमारेषा आहे. बाकू ही अझरबैजानची राजधानी आहे आणि अझरबैजानी मनात हे राष्ट्रीय चलन आहे.
चीनमधील ‘या’ विषाणूचाही भारतात मोठ्या प्रमाणात होऊ शकतो संसर्ग; ICMR च्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली भीती.
🔰दिवसोंदिवस देशामध्ये करोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यातच आता इंडियन काऊन्सील ऑफ मेडीकल रिसर्चच्या (आयसीएमआर) संशोधकांना आणखीन एका विषाणूचा शोध लागला आहे. या विषाणूचे नाव कॅट क्यू व्हायरस (सीक्यूव्ही) असं आहे. या विषाणूचाही देशात मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.
🔰अॅन्थ्रोपॉड प्रकारच्या या विषाणूचा डुक्कर तसेच डासांच्या माध्यमातून संसर्ग होतो. यापूर्वी चीन आणि व्हिएतनाममध्ये हा विषाणू मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे.
🔰या नवीन संशोधनासंदर्भातील वृत्त लाइव्ह मींटने दिलं आहे.पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, आयसीएमआरच्या संशोधकांना ८८३ नमुन्यांपैकी दोन नमुन्यांमध्ये सीक्यूव्हीच्या अॅण्टीबॉडीज आढळून आल्या आहेत. आणखीन संशोधन केलं असता या दोन्ही रुग्णांना यापूर्वी कधी ना कधी सीक्यूव्हीचा संसर्ग झाल्याचे दिसून आलं आहे. हे दोन्ही रुग्ण कर्नाटकमधील आहे.
🔰२०१४ आणि २०१७ च्या कालावधीमध्ये त्यांच्या शरीरामध्ये अॅण्टी-सीक्यूव्ही आयजीजी अॅण्टीबॉडीज आढळून आल्या.
लाइव्ह मींटने आयसीएमच्या शास्त्रज्ञांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार या रुग्णांना डुक्कर किंवा जंगलातील पक्षांच्या माध्यमातून या विषाणूचा संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
🔰मानवामध्ये आढळून आलेल्या अॅण्टी-सीक्यूव्ही आयजीजी अॅण्टीबॉडीज आणि डासांमध्ये आढललेल्या सीक्यूव्ही विषाणूंमुळे या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळेच आता संशोधकांनी सीक्यूव्हीची चाचणी करण्यासाठी मॉलिक्युलर आणि सेरोलॉजिकल पद्धतीवर काम करण्यास सुरुवात केली आहे.
🔰या विषाणूंचा संसर्ग ज्या डासांच्या माध्यमांमधून होतो त्यांचीही चाचणी करण्यास संशोधकांनी सुरुवात केली आहे. या विषाणूचा भारतामधील डासांवर कसा परिणाम होतो यावर सध्या संशोधन सुरु आहे. डासांच्या माध्यमातून या विषाणूंचा संसर्ग होतो.
🔰तयाचप्रमाणे पक्षांमधूनही या विषाणूचा संसर्ग होतो असंही सांगितलं जात असलं तरी त्याचा ठोस पुरावा अध्याप उपलब्ध नाहीत. पाळलेल्या डुक्करांमध्येही हा विषाणू आढळून आल्याचा प्रकार चीनमध्ये समोर आला आहे.
बोंगोसागर”: भारतीय नौदल आणि बांगलादेश नौदल यांची संयुक्त सागरी कवायत.
🔰भारतीय नौदल आणि बांगलादेश नौदल यांनी “बोंगोसागर” नामक संयुक्त सागरी कवायत आयोजित केली. 3 ऑक्टोबर 2020 पासून तीन दिवस हा युद्धसराव चालणार आहे. यंदा या कवायतीचे हे दुसरे वर्ष आहे.
🌺ठळक बाबी...
🔰दोन्ही देशांच्या नौदलांची ही संयुक्त कवायत बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आली.
🔰दरम्यान दोन्ही देश संयुक्तपणे गस्त घालून परस्परांच्या सागरी सीमेचे रक्षण करणे तसेच गस्त घालताना सतत एकमेकांशी समन्वय ठेवणे या मोहिमा पार पाडणार.
🔰भारताकडून कवायतीसाठी INS किल्टन ही पाणबुडीविरोधी युद्धनौका आणि INS खुकरी ही अचूक क्षेपणास्त्र हल्ले करणारी युद्धनौका सहभागी झाली.
🔰भारताच्या ‘सागर’ (Security And Growth for All in the Region - SAGAR) नामक दृष्टीकोनाच्या पार्श्वभूमीवर शेजारी देशांसोबत समन्वय राखण्यासाठी, एकमेकांना सहकार्य करण्यासाठी 'बोंगोसागर' कवायत केली जात.
🔴बांगला देश विषयी...
🔰बांगलादेश हा दक्षिण आशियातला गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशातला एक प्रजासत्ताक देश आहे. ढाका ही देशाची राजधानी आहे आणि बांगलादेशी टाका हे राष्ट्रीय चलन आहे.
🔰भारतीय उपखंडाच्या ईशान्य भागातल्या या राष्ट्राचा उदय 1971 साली झाला. तत्पूर्वी हा देश पूर्व पाकिस्तान या नावाने पाकिस्तानचाच एक प्रांत होता. पाकिस्तानच्या इतर प्रांतांपासून तो 1750 किलोमीटरच्या भारतीय प्रदेशाने अलग केलेला होता. बांगला देशाच्या पश्चिमेस व वायव्येस भारतातले पश्चिम बंगाल, उत्तरेस आसाम व मेघालय, पूर्वेस आसाम व त्रिपुरा आणि मिझोरम ही राज्ये आहे.
भारतीय संविधानातील संसदेविषयीची कलमे आणि तरतुदी
♦️सविधानाच्या भाग 5 मधील प्रकरण 2
📌1)संसद - कलम 79-88.
📌2)राज्यसभा - कलम 80.
📌3)लोकसभा - कलम 81.
📌4)संसदेचे अधिकार
-कलम 89-98.
📌5)कामकाज चालवणे
- कलम 99-100.
📌6)सदस्यांची अपात्रता
- कलम 101-104.
📌7)संसद सदस्यांचे अधिकार, विशेषाधिकार
- कलम 105-106.
📌8) वैधानिक कार्यपद्धत.
- कलम 107-111
📌9) वित्तीय बाबींमधील कार्यपद्धती
- कलम 112-117
📌10) सर्वसाधारण कार्यपद्धत
- कलम 118-122.
काही महत्त्वाचे चालु घडामोडी प्रश्न
1). ‘अर्थशॉट पारितोषिक’ कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
. हवामानातले बदल
2. धोरणात्मक महत्त्व असलेला ‘राबंग पूल’ कोणत्या राज्यात आहे?
. अरुणाचल प्रदेश
3. NITI आयोगाच्या ‘शाश्वत विकास ध्येये निर्देशांक’ यामध्ये कोणते राज्य अग्रस्थानी आहे?
. केरळ
4. दुसरी ‘तेजस’ रेलगाडी कोणत्या शहरांच्या दरम्यान धावणार आहे?
. अहमदाबाद आणि मुंबई
5. ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट 2019’ अहवालानुसार, खारफुटीच्या जंगलात किती वाढ झाली आहे?
. 54 चौरस किलोमीटर
6. ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट’ अहवालानुसार कोणत्या राज्याने वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ दर्शविलेली आहे?
. कर्नाटक
7. नवे ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर’ नावाचे डिजिटल व्यासपीठ कशासाठी आहे?
. हरवलेला मोबाईल फोन
8. ‘बायोमेट्रिक’-क्षम सेंट्रलाइज्ड अॅक्सेस कंट्रोल सिस्टम’ (CACS) याचे अनावरण कोणत्या मंत्रालयाने केले?
. नागरी उड्डयन मंत्रालय
9. कोणत्या व्यक्तीला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार 2019’ मिळाला?
. अमिताभ बच्चन
10. तृतीयलिंगी समुदायासाठी भारतातले पहिले विद्यापीठ कुठे उभारले जाणार आहे?
. उत्तरप्रदेश
11. 2019 साली गुगल सर्च इंजिनवर भारतातले सर्वाधिक शोधले जाणारे उद्योगपती कोण?
. रतन टाटा
12. ‘भारतीय आर्थिक संघ’ (IEA) याच्या 102 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन कुणाच्या हस्ते झाले?
. उपराष्ट्रपती वेंकैया नायडू
13. ओडिशा राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात नवीन LPG बॉटलिंग प्लांट उभारण्यात आला?
. बालांगीर
14. ‘डिफएक्सपो 2020’ या प्रदर्शनीसाठी एका अॅप्लिकेशनचे अनावरण कोणत्या मंत्रालयाकडून झाले?
. संरक्षण मंत्रालय
https://t.me/Dhay_amcheadhikari
15. UIDAI संस्थेनी केलेल्या घोषणेनुसार, किती लोकांकडे आधार पत्र आहे?
. 125 कोटी
16. कोणत्या राज्यात ‘डबल स्टॅक ट्रेन’ची पहिली चाचणी घेण्यात आली?
. हरयाणा
17. डिसेंबर 2019 मध्ये निधन झालेले विकास सबनीस हे कोण होते?
. राजकीय व्यंगचित्रकार
18. फानफोन चक्रीवादळ कोणत्या देशाला धडकले?
. फिलीपिन्स
19. कोणत्या देशाने त्यांचे पहिले हायपरसोनिक आण्विक क्षेपणास्त्र तैनात केले?
. रशिया
20. प्रथम ‘मंडू महोत्सव’ कुठे आयोजित करण्यात आले?
. मध्यप्रदेश
21. ‘विस्डेन’संस्थेच्या ‘दशकातले पाच क्रिकेटपटू’ च्या यादीत कोणत्या भारतीय खेळाडूला स्थान मिळाले आहे?
. विराट कोहली
22. पाकिस्तान या देशाने कोणत्या देशातून ‘पोलिओ मार्कर’ आयात करण्याचा निर्णय घेतला?
. भारत
23. 26 डिसेंबर या दिवशी कोणत्या व्यक्तीची 120 वी जयंती साजरी केली गेली?
. शहीद उधम सिंग
24. कोणत्या वर्षी ‘भारतनेट’ प्रकल्प राबविण्यास सुरूवात झाली?
. वर्ष 2011
25. मोठ्या राज्यांच्या गटात कोणते राज्य ‘सुशासन निर्देशांक’मध्ये अव्वल ठरले?
. तामिळनाडू
26. क्युबा देशाचे पंतप्रधान कोण आहेत?
. मॅन्युएल मरेरो क्रूझ
27. QRSAM क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या संस्थेनी घेतली आहे?
. संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO)
28. पाकिस्तान या देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश कोण आहेत?
. गुलजार अहमद
29. आंध्रप्रदेश राज्याचे ‘दहशतवाद-रोधी दल’ कोणत्या नावाने ओळखले जाते?
. ऑक्टोपस
30. ICCच्या ताज्या 2019 कसोटी मानांकन यादीत कोणता खेळाडू अग्रस्थानी आहे?
. विराट कोहली
राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन
1) 1885- मुंबई - व्योमेश्चंद्र बॅनर्जी- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी उपस्थित होते.
2)1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी -पहिले पारसी अध्यक्ष
3)1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी -पहिले मुस्लीम अध्यक्ष
4)1888 -अलाहाबाद - जॉर्ज यूल -पहिले ब्रिटीश अध्यक्ष
5)1889- मुंबई- सर विल्यम वेडनबर्ग - दुसरे ब्रिटीश अध्यक्ष
7) 1891 - नागपूर - पी आनंद चार्लू
11) 1895 -पुणे -सुरेंद्रनाथ बॅनर्जी - ICS परीक्षा भारतात घेतली.
12) 1896 -कलकत्ता- महमद रहिमतुल्ला सयानी -वंदे मातरम टागोरांनी गायले.
16) 1900 - लाहोर - एन.जी. चंदावरकर - पहिले मराठी अध्यक्ष
22) 1906 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच चतुसुत्रीचा स्विकार केला.
23) 1907 -सुरत -रासबिहारी घोष - मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट
26) 1911 - कलकत्ता बिशण नारायण धर - जण-गण-मन टागोरांनी गायले.
31) 1916 - लखनौ - अंबिका चरण मुजूमदार ऐक्य -करार/लखनौ करार
32) 1917 - कलकत्ता -अॅनी बेझंट पहिल्या महिला अध्यक्ष
35) 1920 - नागपूर - सी विजय राघवाचार्य- काँग्रेसच्या घटनेत बदल
39) 1924- बेळगाव -महात्मा गांधी एकदाच अध्यक्ष
40) 1925 -कानपूर -सरोजिनी नायडू - पहिली भारतीय महिला अध्यक्षा
43) 1926 - कलकत्ता -मोतीलाल नेहरू - वसाहतीची मागणी, पहिले युवक अधिवेशन
44) 1929 -लाहोर -जवाहरलाल नेहरू - पूर्ण स्वराज्याची मागणी
50) 1936 - फैजपूर - जवाहलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन
51) 1938 -हरिपूरा -सुभाषचंद्र बोस - पटट्भी सितारामय्याचा पराभव
52) 1939 -त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट
53) 1940 - रामगड -अब्दुल कलाम आझाद - सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण अध्यक्ष
61) 1955 - आवडी -यू.एन.ढेबर समाजवादाचा ठराव मांडला
कुंदा नदी
◾️निलगिरीत उगम पावणारी तमिळनाडू राज्यातील नदी. लांबी सु. ११९ किमी. ऊटकमंडच्या आग्नेयीस सु. २४ किमी. वर देवबेट्टा, कौलिनबेट्टा, करायकुडी, पोर्थिमुंड इ. शिखरांच्या १,७०० मी. पेक्षा अधिक उंचीच्या पर्वतप्रदेशात उगम पावणाऱ्या अॅवलांच व एमेरल्ड या प्रवाहांनी मिळून कुंदा नदी झालेली आहे. तिच्या व दक्षिणेकडील अपर भवानीच्या
. 🎇 कुंदा नदीप्रकल्प 🎇
◾️खोऱ्यादरम्यान निलगिरी पठाराच्या नैर्ऋत्येस कुंदा पर्वतरांग आहे. तिच्यात अॅवलांच, बेअरहिल, माकुर्ती ही २,५०० मी. हून अधिक उंचीची शिखरे असून, त्या भागात नैर्ऋत्य व ईशान्य मान्सूनचा पाऊस दरवर्षी सु. ४०० सेंमी. पडतो. ते पाणी भवानीला आणि कुंदेला मिळते. सिल्लाहल्ला, कनारहल्ला, पेंगुबहल्ला इ. उपनद्यांचे पाणी घेऊन कुंदा अपर भवानीला मिळते. या दोन्ही नद्या मग भवानी या नावाने कावेरीला मिळतात. निलगिरीच्या उभ्या उतारांवरून कुंदा वेगाने खाली येते. मंडनायूजवळ तिला सु. ६६ मी. उंचीचा एक धबधबा आहे. कुंदेच्या परिसरातील वनश्री अत्यंत नयनरम्य आहे.
Latest post
Mpsc pre exam samples questions
1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे? A. ...
-
MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम पेपर- १ (गुण २०० - कालावधी २ तास) 1.राज्य ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्त्व...
-
१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...
-
✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ? 👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये ) ✏️ मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 👉 360 ग्रॅम...